अध्याय १ ला
अध्याय २ रा
अध्याय ३ रा
अध्याय ४ था
अध्याय ५ वा
अध्याय ६ वा
अध्याय ७ वा
अध्याय ८ वा
अध्याय ९ वा
अध्याय १० वा
अध्याय ११ वा
अध्याय १२ वा
अध्याय १३ वा
अध्याय १४ वा
अध्याय १५ वा
अध्याय १६ वा
अध्याय १७ वा
अध्याय १८ वा
अध्याय १९ वा
अध्याय २० वा
अध्याय २१ वा
अध्याय २२ वा
अध्याय २३ वा
अध्याय २४ वा
अध्याय २५ वा
अध्याय २६ वा
अध्याय २७ वा
अध्याय २८ वा
अध्याय २९ वा
अध्याय ३० वा
अध्याय ३१ वा
अध्याय ३२ वा
अध्याय ३३ वा
अध्याय ३४ वा
अध्याय ३५ वा
अध्याय ३६ वा
अध्याय ३७ वा
अध्याय ३८ वा
अध्याय ३९ वा
अध्याय ४० वा
अध्याय ४१ वा
अध्याय ४२ वा
अध्याय ४३ वा
अध्याय ४४ वा
अध्याय ४५ वा
अध्याय ४६ वा
अध्याय ४७ वा
अध्याय ४८ वा
अध्याय ४९ वा
अध्याय ५० वा
अध्याय ५१ वा
अध्याय ५२ वा
अध्याय ५३ वा
अध्याय ५४ वा
अध्याय ५५ वा
अध्याय ५६ वा
अध्याय ५७ वा
अध्याय ५८ वा
अध्याय ५९ वा
अध्याय ६० वा
अध्याय ६१ वा
अध्याय ६२ वा
अध्याय ६३ वा
अध्याय ६४ वा


श्रीधरस्वामीकृत 'पांडवप्रताप' - ग्रंथपरिचय


धर्मो विवर्धति युधिष्टिरकीर्तनेन, पापं प्रणश्यति वृकोदरकीर्तनेन ।
शत्रुर्विनश्यति धनञ्चयकीर्तनेन, माद्रीसुतौ कथयतां न भवन्ति रोगाः ॥
भगवान श्रीकृष्णांना पूर्ण शरणागत असलेल्या भक्तश्रेष्ठ पांडवांच्या नामसंकीर्तनाचे फळ वरील श्लोकात आले आहे. कवी म्हणतो, ''धर्मराजाचे नाव घेतल्याने धर्म वाढतो, भीमाचे नाव घेतल्याने पाप नाहीसे होते. अर्जुनाच्या नामसंकीर्तनाने शत्रूंचा नाश होतो आणि नकुलसहदेवांचे नाव घेतले असता रोग नाहीसे होतात.'' पांडवांच्या केवळ नामसंकीर्तनाचा जर एवढा प्रभाव, तर त्यांच्या चरित्र-वाचन-श्रवणाचा प्रभाव केवढा असेल बरे ! कवी श्रीधरस्वामी याची फलश्रुती लिहितात-
शुद्ध भावार्थेकरून । परम शुचिर्भूत होऊन ।
श्रवण करितां एक आवर्तन । धनधान्यवृद्धि होय पै ॥ ६४.६६ ॥
गृही संग्रहितां हा ग्रंथ । आधि व्याधि न होय तेथ ।
संसार सुखरूप होय समस्त । आनंदभरित सर्वदा ॥ ६५.६८ ॥
याचप्रमाणे आणखीही या ग्रंथाच्या श्रवण-पठनाची फळे त्यांनी सांगितली आहेत.

पांडवप्रताप म्हणजे पांडवांचे पराक्रम. अर्थात भगवंतांच्या साह्याने भगवद्‌भक्तांनी केलेले पराक्रम. परंतु येथे श्रीधरस्वामींनी 'पांडवप्रताप' या नावाने १३९३७ ओव्यात संपूर्ण महाभारतकथाच संक्षेपाने सांगितली आहे, आणि ती सांगताना पांडवांच्या वीरगाथेला प्राधान्य दिले आहे. ग्रंथकार म्हणतात-
सवालक्ष मूळभारत । तितक्याचा जो मथितार्थ ।
आला चौसष्ट अध्यायांत । कथा सर्व आकर्षूनी ॥ ६४.६४ ॥
पाल्हाळ केला नाहीं बहुत । अथवा नसे संकलित ।
नेमस्त धरोनि मथितार्थ । पांडवप्रताप संपविला ॥ ६४.६५ ॥

श्रीधरांची वाणी रसाळ, वर्णनशैली वाचकांना मंत्रमुग्ध करणारी, शब्दपांडित्य बृहस्पतीला लाजविणारे. तरीही हे कर्तृत्व आपले नाही, असे त्यांनी या ग्रंथात वारंवार प्रतिपादन केले आहे. एकदा हा ग्रंथ आपल्या हातून पूर्ण होणार नाही, असे वाटून त्यांनी तो अर्धवट ठेवून दिला. त्यावेळी श्रीपांडुरंग त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणाले, ''श्रीधरा ! ऊठ आणि हा ग्रंथ पुरा कर. तुझ्या लेखनात मी रस पुरवीन आणि तुझा ग्रंथ सारे संत, भक्त व पंडित आपल्या हृदयी धरतील.'' पुढे एके ठिकाणी ते लिहितात-
तो क्षणाक्षणां येऊन । जागें करी थापटून ।
म्हणे श्रीधरा ऊठ करीं लेखन । कर्णी तुज सांगतों मी ॥ ५३.११५ ॥
सकळ पाल्हाळ टाकूनी । सारांश अर्थ सांगतों कानीं ।
तोचि तूं पत्रीं लिहोनी । ठेवितां मज आवडे ॥ ५३.११७ ॥

महाभारतातील आश्रमवासिक पर्वापर्यंतचाच कथा भाग श्रीधरांनी लिहिला. त्यापुढील मौसल पर्व, महाप्रास्थानिक पर्व व स्वर्गारोहण पर्व यांवर त्यांनी लिहिले नाही. एक पंडित त्यांना म्हणाले देखील की, "यावर तुम्ही लिहिले नाही, तर तुमचा ग्रंथ अपुरा राहील म्हणून हा भाग तुम्ही लिहाच." तो लिहिण्याचा विचार करीत श्रीधरस्वामी झोपी गेले. त्याच रात्री स्वप्नात येऊन पंढरीनाथ म्हणाले,
तुझा ग्रंथ पाहता सप्रेम । पंढरीस उभा मी पुरुषोत्तम ।
तरी न वर्णीं तू निजधाम । अज अक्षय मी असें ॥ ६४.१५० ॥
'न जायते म्रियते वा' हें वचन । गीतेमाजी बोलिलों मी जाण ।
क्षराक्षरातीत पूर्ण । उत्तमपुरुष अक्षय मी ॥ १५१ ॥
हरिविजय रामविजय ग्रंथ । तिसरा हा पांडवप्रताप अद्‌भूत ।
तिहींत निजधाम यथार्थ । वर्णूं देत नाहीं मी ॥ १५४ ॥
आणि इतके मी सांगूनही जर तू लिहिशील तर,
तथापि करिसी अतिशय । तरी लिहितां वाचितां होईल प्रलय ।
तुझी स्फूर्ती पावेल लय । ग्रीष्मकाळींचे तोय जैसें ॥ १५५ ॥
या सर्वांवरून भगवान श्रीपंढरीनाथांच्या आज्ञेने व प्रेरणेनेच हा ग्रंथ तयार झाला असल्याने हा प्रासादिक किंवा वरद ग्रंथ आहे, हे सिद्ध होते.

भारतीय समाजात मान्यता पावलेल्या रामायण, महा भारत व श्रीमद्‌भागवत या तीन पूज्य ग्रंथांवर श्रीधरस्वामींनी मराठी भाषेत ओवी छंदात रामविजय, पांडवप्रताप व हरिविजय असे तीन ग्रंथ रचले व तेही पंढरपुरातच. महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागात या ग्रंथांची पारायणे व निरूपणे होतात. त्यावेळी श्रोते अक्षरशः त्या त्या रसात बुडून गेलेले आढळतात.
-------------------------
वरील प्रकाशकीय निवेदन व ऊर्वरीत ग्रंथ ’गीताप्रेस’ गोरखपुर यांनी प्रकाशित केलेल्या संस्करणावरून घेतला आहे. या कामात पूर्णतः मुंबईचे श्री श्रीकांत देवधर यांचाच सिंहाचा वाटा आहे.

GO TOP