मराठी भाषेतील संत प्रणीत वाङ्मय व संस्कृत भाषेतील श्रुति-स्मृति
साहित्य (शक्य तेथे मराठी अर्थासहित) यास वाहिलेले संकेत स्थळ.
काही काम झालेले आहे, बरेच काही व्हावयाचे आहे...

तो पर्यंत वर दिसणार्‍या दुव्यांमधून उपलब्ध साहित्य पहावे -

Read Disclaimerपारमार्थिक ग्रंथसंग्रह
दृक्-श्राव्य (VIDEOs)
श्राव्य - ग्रंथ (AUDIO BOOKS)
प्रवचन, निरूपण इत्यादि

सूचना/अभिप्रायसाठी
संपर्क करा-
GUEST BOOK

प्रस्तावना

भारतीय जनजीवन पद्धति धर्ममय आहे. या जीवन पद्धतीचा मूळ आधार आहे ती प्राचीन भारतीय संस्कृति, आणि तिचे अधिष्ठान म्हणजे ’वेद’. ’वेदोऽखिलो धर्ममूलम्’ - संपूर्ण वेद हे धर्माचे मूल आहे. वेदांना संस्कृत भाषेतील आद्य ग्रंथ म्हणतात. ’संस्कृतं संस्कृतेर्मूलम्’ - संस्कृत भाषेतील वाङ्‍मय हेच भारतील संस्कृतीचे मूळ आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे भारतीयांचे चतुर्विध पुरुषार्थ मानले गेले आहेत, आणि सर्व प्राचीन वाङ्‍मय आहे ते मुख्यतः या चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिसाठी.     

seperator

आपले वेद - ऋग्वेद

मन बुद्धि यांच्या अती शुद्धावस्थेत ’ज्ञाना’चे दर्शन होते. अव्यक्त ज्ञान बुद्धिद्वारे व्यक्त होते. आणि बुद्धित व्यक्त व्हावयाचे एक साधन आहे त्याला म्हणतात शब्द - वाक् - वाणी. व्यवहार दशेत जाणणे, उमजणे होतच असते. पण शाश्वत, नित्य तत्त्वांचे दिव्य स्फुरण होऊन जे वाक्‌द्वारा बाहेर पडते त्याला दर्शनशास्त्र म्हणण्याचा प्रघात आहे. ज्यांना नित्य तत्त्वांचे दिव्य दर्शन घडते त्यांना द्रष्टा वा ऋषि म्हणतात. असे दर्शन मनाच्या उत्थान दशेत, समाधीदशेतच होऊ शकते. ऋ. (१३२४.३) या ऋचेत म्हटले आहे की ऋषिंना आपल्या अंतःकरणात ज्या वाक् (वेदवाणी) ची प्राप्ती झाली ती त्यांनी सर्व मनुष्य जातीला शिकविली. अशी वेदवाणी ज्यांना ज्या स्वरूपात प्राप्त झाली त्याला "मंत्र" म्हटले गेले आहे. मंत्र ऋषिगणांना वाक्‌रूपे ’दिसले’. ऋग्वेदाच्या ब्राह्मण ग्रंथापैकी कौषितकी ब्राह्मण (१०.३०) व ऐतरेय ब्राह्मण (३.९) यानुसार ’ऋषिंना वेदमंत्र दिसले’ असाच अभिप्राय आहे. म्हणून वैदिक संहितेच्या सूक्त, ऋचा यासंबंधी ज्या ऋषिंच्या नावाचा उल्लेख केला जातो त्यांना त्या मंत्राचे प्रणेते न मानता त्या त्या मंत्रांचे त्यांना मंत्रद्रष्टे मानले जाते.     

seperator

आपली उपनिषदे

उपनिषद ग्रंथ हे चार वेदांच्या संहिता, त्यांचे ब्राह्मण व आरण्यक असे भाग यातील सगुण निर्गुण ब्रह्म पतिपादक वेचक उतारे आहेत. प्राचिन काळी प्रत्येक वेदाच्या अनेक शाखा उपलब्ध होत्या त्यापैकी चारही वेदांच्या मिळून आता फक्त १३ शाखा उपलब्ध आहेत. पण एकेकाळी चार वेदांच्या हजारचे वर शाखा होत्या असे म्हणतात. प्रयेक शाखेचे एक उपनिषद म्हटले तरी हजारचे वर उपनिषदे होती हे ओघाने आलेच. पण सध्या प्रकाशित अशी जवळपास २२०-२२५ उपनिषदेच उपलब्ध आहेत. ह्याव्यतिरिक्त आणखी थोडेफार अप्रकाशित उपनिषदे असू शकतील. उपनिषदांची साधारण विभागणी आढळते ती अशी - १) प्रमुख उपनिषदे - ह्यांना दशोपनिषदे असेंही म्हणतात. यांत प्रामुख्याने 'ब्रह्म' विषयक विवेचन आढळते. व्यासांनी ब्रह्मसूत्रांमध्ये फक्त दश उपनिषदांचाच उल्लेख केलेला आढळतो तसेच आद्य शंकराचार्यांनी ह्या दहाही उपनिषदांवर भाष्य केलेले असल्यामुळे ह्या दश उपनिषदांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. २) वैष्णव उपनिषदे ३) शैव उपनिषदे ४) शाक्त उपनिषदे ५) संन्यास उपनिषदे ६) सामान्य उपनिषदे. वैष्णव-शैव-शाक्त यां नांवावरूनच कल्पना करूं शकतो कीं परमेश्वराच्या त्या त्या सगुणरुपासंबंधी ही उपनिषदें आहेत. संन्यास उपनिषदांमध्ये संन्यास ह्या चतुर्थ आश्रमाबद्दल विवेचन आढळते. १) ते ५) व्यतिरिक्त जी उपनिषदे आढळतात ती सामान्य वर्गांत मोडतात. उपलब्ध असलेल्या २२० उपनिषदांपैकीं प्रभु रामचंद्रांनी हनुमंतास १०८ उपनिषदांचा अभ्यास करण्याचे सुचविले आहे, म्हणून प्रस्तुत १०८ उपनिषदांचाच विचार करायचा आणि जमेल तसा त्यांचा मराठी अनुवाद करायचा मानस आहे.     

seperator

वाल्मीकि रामायण

वेद ज्या परमात्माचे वर्णन करतात तेच श्रीमन्नारायणतत्त्व श्रीमद्‌रामायणात श्रीरामरूपाने निवेदित आहे. वेदवेद्य परमपुरुषोत्तमाचे दशरथनंदन श्रीरामाच्या रूपामध्ये अवतरण झाल्यवर साक्षात् वेदच श्रीवाल्मीकिंच्या मुखातून श्रीरामायणरूपात प्रकट झाले, अशी आस्तिकांची चिरकालापासून मान्यता आहे. म्हणून श्रीमद्‌वाल्मीकीय रामायणास वेदतुल्यच प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. तसेच महर्षि वाल्मीकि आदिकवि आहेत, म्हणून विश्वातील समस्त कवींचे गुरु आहेत. त्यांचे 'आदिकाव्य' श्रीमद्‌वाल्मीकीय रामायण भूतलावरील प्रथम काव्य आहे. ती सर्वांसाठी पूज्य वस्तू आहे. भारतासाठी तर ती परम गौरवाची गोष्ट आहे आणि देशाचा खराखुरा बहुमूल्य राष्ट्रीय निधि आहे. या नात्यानेही ती सर्वांसाठी संग्रह, पठण, मनन आणि श्रवण करण्याची वस्तु आहे. याचे एकेक अक्षर महापातकाचा नाश करणारे आहे - एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् । तसेच हे समस्त काव्यांचे बीज आहे - काव्यबीजं सनातनम् ( बृहद्धर्म १.३०.४७) श्रीवाल्मीकिंच्या रामायणानंतर अनेकांनी ’रामायण’ काव्ये केली आहेत. त्यातील काही ग्रंथ इथे पाहू ...     

seperator

श्रीज्ञानेश्वरी

श्रीज्ञानेश्वरांची श्रीज्ञानेश्वरी - भावार्थदीपिका - टंकलिखित करून दोन वर्षे उलटली. पण प्रत्येक ग्रंथात ग्रंथाबद्दल माहिती देणारे जसे 'पहिले पान' (प्रस्तावना म्हणा) असते; ज्यात हा ग्रंथ कशाविषयी आहे हे थोडक्यात सांगितले जाते असे 'पहिले पान' म्हणून काय लिहू हा मोठा प्रश्न होता. कारण श्रीज्ञानेश्वरीबद्दल कांही सांगणे म्हणजे एखाद्या काजव्याने वा पणतीने सूर्याची तोंड ओळख करण्याचा प्रयत्‍न करावा अशा प्रकारचे आहे. पण केव्हाना केव्हा तरी हे 'पहिले पान' लिहिणे आवश्यकच होते, एक औपचारीक आवश्यकता म्हणून.      पुढे पहा ... >>

seperator

श्रीमत् दासबोध

विविधांगी धर्मकार्य करीत असताना वेळोवेळी समर्थ रामदास स्वामींकडून विपुल लेखन होत गेले. त्यांच्या या अफाट ग्रंथरचनेमध्ये दासबोध, मनाचे श्लोक, रामायण, आत्माराम, करुणाष्टके, जुना दासबोध (एकवीस समासी), स्फुट प्रकरणे, स्फुट श्लोक, अष्टाक्षरी पाच लघुकाव्ये, चौदा ओवीशते, स्फुट ओव्या, अवांतर व प्रासंगिक प्रकरणे, विविध आरत्या, सवाया, अभंग, पदे, ललिते, मानसपूजा इत्यादींचा समावेश होतो. या सर्व वाङ्‍मयात दासबोध हा समर्थांचा प्रमुख ग्रंथ मानला जातो. त्याचे महत्त्व तसे आहेही. श्री समर्थांनी हा ग्रंथ स्वमुखे सांगितला आणि त्यांचे शिष्योत्तम श्री कल्याणस्वामी यांनी तो लिहून घेतला असे म्हटले जाते. अर्थात हा एकटकी सलगपणे लिहून पूर्ण झालेला ग्रंथ नाही. वेळ मिळेल त्याप्रमाणे त्याचे लेखन व अनेकवार संपादन झाले आहे. अनेक वर्षांच्या परिश्रमाने उपलब्ध रूपात पूर्णत्व पावलेल्या या ग्रंथात एकूण वीस दशक असून, प्रत्येक दशकात दहा समास म्हणजे एकूण सर्व मिळून दोनशे समासांचा हा ग्रंथराज आहे.      पुढे पहा... >>

seperator

श्रीब्रह्मचैतन्य

सद्‍गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्रीमहाराजांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावलें. त्यांचे शिष्य-प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र व कर्नाटकांत बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानांतही आहेत. त्यांची प्रथम पत्‍नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केलें. त्यांनी आपल्या घरीं आणि इतरत्र अनेक ठिकाणीं श्रीराममंदिरांची स्थापना करून उपासनेची केंद्रें निर्माण केली. त्यांनी असंख्य लोकांना व्यसनें, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचनें व भजनकीर्तनें यांचा उपयोग केला. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरीबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळांत मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठानें, नामजप, भजनसप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावलें. आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न केला... पुढे पहा... >>

seperator
=======================================================