Disclaimer

ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायात श्लोक २४-२९ याठिकाणी श्री ज्ञानेश्वरांनी अर्जुनाच्या तोंडी भगवान् श्रीकृष्णास श्रद्धेसंबंधी एक प्रश्न मांडण्याआधी शास्त्रासंबंधी एक प्रस्ताव उपस्थित केला आहे. अर्जुन म्हणतो - तक्षकाच्या फणीपाशी येऊन त्यातील मणी, आणि सिंहाच्या नाकातील केस कसा काढायचा ? आणि मग त्या केसात तो मणी ओवून तो दागिना कंठात बांधावा; अन्यथा भोंड्या गळ्यानेच असायचे काय ? तसेच शास्त्रांची निरनिराळी मते कोण, केव्हा एकत्र करील व त्यांच्या एकवाक्यतेची प्राप्ति केव्हा होणार ? आणि काही काळाने एकवाक्यता झाली तरी पुढे आचरण करण्याकरिता वेळ कसा सापडणार व तसे दीर्घ आयुष्य कसे लाभणार ? आणि शास्त्र, अर्थ, देश, काल या चौघांनी फलद्रूप होणारा उपाय सर्वांस कसा मिळणार ? सारांश शास्त्राने कर्मानुष्ठानाकरिता सांगितलेला शुद्ध देश मिळणे सोपे नाही, शास्त्राने सांगितलेला काळाचा अवकाश प्राप्त होणे कठीण, शास्त्रांचा अभ्यास करविणारा गुरु वा विद्वान हेही दूरच; बरे शास्त्रार्थ ग्रहण करण्यास समर्थ बुद्धी असली तरी शास्त्रग्रंथ सर्वदेशी कसे उपलब्ध व्हावे ? पण या आधुनिक काळात महाजालाच्या (web world) साह्याने ग्रंथ तरी उपलब्ध होणे शक्य झाले आहे.

संस्कृत साहित्यातील सर्व काव्यग्रंथ मराठी अनुवाद व श्राव्यसहित प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे. मी संस्कृतचा पद्धतशीर अभ्यास केलेला नाही. रामायण, भागवताची पारायणे करताना सामासिक शब्दांव्यतिरिक्तही बरेचसे शब्द जोडून लिहिण्याच्या/ छापण्याच्या पद्धतीमुळे बरेच ठिकाणी तालात/ठेक्यात पारायण करणे कठीण होतेच, शिवाय अर्थबोधही लांब राहतो. हे लक्षात घेऊन मी बरेच ठिकाणी संधीफोड केली आहे. सर्व ग्रंथ शब्दांकित (text form) करण्याचा एक उद्देश म्हणजे एखादा संदर्भ शोधणे (searching सोयीचे व्हावे एवढेच. या संकेतस्थळावरील साहित्य ग्रंथांची ओळख वा प्राथमिक अभ्यास करण्यार्‍यांसाठीच आहे. विद्वान व व्याकरणपटूंचा अभ्यास या संकेतस्थळावरील लेखन पद्धतीच्या फार पुढचा असल्यामुळे त्यांना याचा संदर्भ शोधण्याव्यतिरिक्त उपयोग नाही. संस्कृत साहित्यात संधीछेद करताना मतिनुसार विशेष काळजी घेतली आहे, तरीपण बरेच दोष आढळण्याची शक्यता आहेच. विशेष अभ्यासासाठी इतरत्र मार्गदर्शन घेणे उपयुक्त होईल.

Disclaimer

In the commentary by Shri Dnyaneshwar on 17 th chapter of Bhagawad Gita - Arjuna says to Shri Krishna: There are many Shastras and after reconciling their meaning and getting at the fundamental doctrine, there remains much to do. A lifetime is not enough to do all, that is asked for. Therefore, doing everything according to the Shastras is a difficult thing. When you said that without knowledge of the Shastras liberation is impossible, then a doubt arises. Facilities for learning are not always available and the span of life is short. A preceptor, who can really teach, is not always found. The equipment is not always at hand. The intelligence of everyone is not capable, even if all these are available, of grasping the full meaning.

With the technology available now, at least teachings in Granthas can be available anywhere. The purpose of this website is to encode the Granthas for primary introduction and ease of searching, especially for beginners and not so advanced students. I have not learnt sanskrit formally nor studied rules and grammar systematically. Still the presented content is with sandhis split for ease of chanting and understanding text. The text as such does not match exactly with printed books. While splitting sandhis though adequate care is taken, there is possibility of errors leading to distortion. The content, therefore, is not expected to be considered as standard and obviously may not match expections of learned and experts in sanskrit grammer. For further studies please be guided by experts.



GO TOP