सर्व प्रथम आपण या पानावर आलात याबद्दल धन्यवाद. मला कळून चुकले आहे की माझ्या wishlist नुसार मी एकट्याने वा सध्या मिळत असलेल्या मदतीच्या साहाय्याने पुढील दहा वर्षे देखील काम पूर्ण होण्यास अपुरी आहेत. म्हणून हे appeal

  • १) बरेच मराठी/संस्कृत साहित्य ’सत्संगधारा’वर आणायचा मानस आहे. तेव्हा सर्वात मोठी गरज आहे ती टंकलेखनाची (typing) आपण टंकलेखनामध्ये मदत करू शकता वा काही पृष्ठे/पाने sponsor करू शकता

  • २) टंकलिखित साहित्य निर्दोष असावे यासाठी ते तपासण्याची (proof-check) मदत करू शकता, चुका आढळल्यास त्या निर्देशनास आणून देऊ शकता.

  • ३) Creating Audio-Books - मौखिक ग्रंथ तयार करण्यासाठी आपण आपला वेळ, आवाज वा उपकरणे (audio recorders etc) देऊन मदत करू शकता

  • ४) Website development मध्ये गति असणार्‍यांकडून html/php coding ची मदत

  • ५) पुस्तके, xerox, scanning, printing, maintainance, audio equipments अशा विविध गोष्टींसाठी लागणारे खर्च share करू शकता

  • ६) बरेचसे साहित्य अजून मराठीत उपलब्ध नाही - उदा. देवी भागवत, आनंदरामायण, गर्गसंहिता (श्रीकृष्णांच्या लीला) इ. असे बरेचसे साहित्य मराठीतून अनुवादीत करून घ्यावयाचे आहे. तसेच भागवतावरील, भगवद् गीतेवरील अनेक भाष्यकारांच्या भाष्याचाही मराठीतून अनुवाद इ. करून घ्यायचे आहे.

  • संकेतस्थळ समृद्ध, उपयुक्त व आकर्षक करण्याच्या दृष्टीने काही सूचना असल्यास जरूर कळवाव्यात. तसेच अभिप्रायही.

  • supporting financially for any of the above.GO TOP