|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय १ ला - अन्वयार्थ
उद्धव आणि विदुर यांची भेट - पुरा - पूर्वी - ऋद्धिमत् - समृद्ध अशा - स्वगृहं - आपल्या घराला - त्यक्त्वा - सोडून - वनं - अरण्याला - प्रविष्टेन - गेलेल्या - क्षत्त्रा - विदुराकडून - भगवान् - भगवान् - मैत्रेयः - मैत्रेय - एवं - याप्रमाणे - एतत् - हे - किल - खरोखर - पृष्टः - विचारला गेला. ॥१॥ वा - किंवा - अयं - हा - वः - तुमचा - मंत्रकृत् - मसलतगार - अखिलेश्वरः - सर्वेश्वर - भगवान् - श्रीकृष्ण - पौरवेन्द्रगृहं - दुर्योधनाच्या घराला - हित्वा - सोडून - आत्मसात्कृतं - आपलेसे मानलेल्या - यत् - ज्या - विदुरगृहं - विदुराच्या घरी - प्रविवेश - शिरला ॥२॥ प्रभो - हे समर्थ शुक्राचार्य ! - भगवता - भगवान् - मैत्रेयेण - मैत्रेयाशी - सह - सहवर्तमान - क्षत्तुः - विदुराचा - संगमः - समागम - कुत्र - कोठे - वा - किंवा - संवादः - भाषण - कदा - केव्हा - आस - झाले - एतत् - हे - नः - आम्हाला - वर्णय - वर्णन करा. ॥३॥ अमलात्मनः - निर्मळ अन्तःकरणाच्या - तस्य - त्या - विदुरस्य - विदुराचा - तस्मिन् - त्या - वरीयसी - श्रेष्ठ अशा - मैत्रेये - मैत्रेयाचे ठिकाणी केलेला - प्रश्नः - प्रश्न - अल्पार्थोदयः - क्षुद्र अर्थ प्रगट करणारा - नहि - नाही - तर्हि - तर - साधुवादोपबृंहितः - चांगल्या भाषणाने वृद्धिंगत झालेला असाच - बभूव - झाला ॥४॥ परीक्षिता - परीक्षित् - राज्ञा - राजाने - एवं - याप्रमाणे - पृष्टः - विचारलेला - सः - तो - अयं - हा - सुबहुवित् - अत्यंत बहुश्रुत - ऋषिवर्यः - ऋषिश्रेष्ठ - शुकः - शुकाचार्य - प्रीतात्मा - प्रसन्न आहे मन ज्याचे असा - तं - त्या - राजानम् - राजाला - श्रूयतां - ऐकावे - इति - असे - प्रत्याह - प्रत्युत्तर देता झाला. ॥५॥ यदा - जेव्हा - तु - तर - विनष्टदॄष्टिः - नाहीशी झाली आहे दॄष्टि असा - राजा - राजा - धृतराष्ट्रः - धृतराष्ट्र - असाधून् - दुष्ट अशा - स्वसुतान् - आपल्या मुलांना - अधर्मेण - अधर्माने - पुष्णन् - पोसणारा - यविष्टस्य - कनिष्ठ अशा - भ्रातुः - भावाच्या - विबन्धून् - निराधार अशा - सुतान् - पुत्रांना - लाक्षाभवने - लाक्षागृहात - प्रवेश्य - घालून - ददाह - जाळीता झाला. ॥६॥ नृपः - राजा - धृतराष्ट्रः - धृतराष्ट्र - यदा - जेव्हा - सभायां - सभेत - स्वास्त्रैः - आपल्या अश्रूंनी - कुचकुङ्कुमानि - स्तनावरील केशरादि उट्याना - हरन्त्याः - धुवून टाकणार्या - कुरुदेवदेव्याः - व कुरुकुळाला प्रकाशित करणार्या पांडवांची पत्नी द्रौपदीनामक अशा - स्नुषायाः - सुनेच्या - केशाभिमर्शं - केसांस स्पर्श करण्यासंबंधी - गर्ह्यं - निंद्य - सुतकर्म - पुत्राच्या कृत्याला - न वारयामासं - न निवारण करिता झाला. ॥७॥ यत् - ज्या कारणास्तव - तमः - अज्ञानाला - जुषाणः - सेवणारा - धृतराष्ट्रः - धृतराष्ट्र - द्यूते - द्युतात - तु - तर - अधर्मेण - अधर्माने - जितस्य - जिंकलेल्या - साधोः - सज्जन अशा - सत्यावलम्बस्य - खर्यावरच अवलंबून राहणार्या - वनागतस्य - अरण्यात गेलेल्या - समयेन - वनवासाची मुदत ठरल्याप्रमाणे संपवून - याचतः - मागणी करणार्या - अज्ञातशत्रोः - धर्मराजाच्या - दायं - वडिलोपार्जित हिश्शाला - न अदात् - न देता झाला. ॥८॥ यदा - जेव्हा - पार्थप्रहितः - कुंतीपुत्र अशा धर्मराजाने पाठविलेल्या - जगद्गुरुः - त्रैलोक्याचा उपदेशक - कृष्णः - श्रीकृष्ण - सभयां - सभेत - पुंसां - पुरुषांस - अमृतायनानि - अमृताप्रमाणे तरतरी उत्पन्न करणारी - यानि - जी - वचांसि - भाषणे - जगाद - स्पष्टरीतीने बोलता झाला. - तानि - ती - क्षतपुण्यलेशः - ज्याच्या जवळ थोडेही पुण्य शिल्लक राहीले नाही असा - राजा - ध्रुतराष्ट्र राजा - ऊरू - विशेष महत्त्वाची अशी - न मेने - न मानिता झाला. ॥९॥ यदा - जेव्हा - मंत्रदृशां - मसलत देणार्या - वरीयान् - श्रेष्ठ - विदुरः - विदुर - पूर्वजेन - जेष्ठ भावाने - मंत्राय - मसलतीकरिता - उपहूतः - बोलावला असता - भवनं - घरात - प्रविष्टः - गेलेला असा - किल - खरोखर - पृष्टः - विचारला गेला. - अथ - नंतर - मन्त्त्रिणः - मसलतदार लोक - यत् - ज्याला - वैदुरिकं - विदुरनीतिशास्त्र असे - वदन्ति - म्हणतात - तत् - त्याला - आह - सांगता झाला. ॥१०॥ तव - तुझ्या - दुर्विषहं - असह्य - आगः - अपराधाला - तितिक्षतः - सहन करणार्या - अजातशत्रोः - धर्मराजाच्या - दायं - वडिलोपार्जित हिश्शाला - प्रतियच्छ - परत देऊन टाक - यत्र - ज्याविषयी - सहानुजः - भावासह - वृकोदराहिः - भीमरूपी सर्प - रूषा - क्रोधाने - श्वसन् - फूत्कार टाकणारा असा - वर्तते - राहिला आहे. - यत् - ज्याला - त्वं - तू - अलं - पुष्कळ - बिभेति - भितोस. ॥११॥ सक्षितिदेवदेवः - ब्राह्मण व देव ह्यांसहवर्तमान - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - देवः - तेजस्वी असा - मुकुन्दः - श्रीकृष्ण - तु - तर - पार्थान् - पाण्डवांना - गृहीतवान् - घेता झाला. - यः - जो - यदुदेवदेवः - मोठमोठ्या यादवांमध्ये वर्चस्वाने राहणारा - विनिर्जिताशेषनृदेवदेवः - ज्याने संपूर्ण राज्य जिंकले आहेत असा - कृष्णः - श्रीकृष्ण - स्वपुर्यां - आपल्या द्वारका नगरीत - आस्ते - रहातो. ॥१२॥ कृष्णात् - श्रीकृष्णापासून - विमुखः - पराङ्मुख - गतश्रीः - ऐश्वर्यरहित - त्वं - तू - अपत्यमत्या - पुत्रबुद्धीने - यं - ज्याला - पुष्णासि - पोषितोस - सः - तो - एषः - हा - पुरूषद्विट् - श्रीकृष्णाचा द्वेष करणारा - दुर्योधनः - दुर्योधन - गृहान् - घरात - प्रविष्टः - शिरलेला - दोषः - मूर्तिमंत दोष असाच - आस्ते - राहत आहे. - कुलकौशलाय - वंशाच्या कल्याणाकरिता - आशु - लवकर - अशैवं - अमंगळ अशा - अमुं - या दुर्योधनाला - त्यज - टाकून दे. ॥१३॥ तत्र - तेथे - इति - याप्रमाणे - ऊचिवान् - बोलला. - सत्स्पृहणीयशीलः - साधूंना अनुकरणीय ज्याचा स्वभाव आहे असा - क्षत्ता - विदुर - प्रवृद्धकोपस्फुरिताधरेण - फारच रागावल्यामुळे ज्याचे अधरोष्ठ फुरफुरत आहेत अशा - सकर्णानुजसौबलेन - कर्ण, दुःशासन व शकुनि यांसह - सुयोधनेन - दुर्योधनने - असत्कृतः - अपमानिला गेला. ॥१४॥ जिद्मं - कपटी अशा - दास्याः - व दासीचा - सुतं - पुत्र अशा - एनं - ह्या - विदुरं - विदुराला - अत्र - येथे - कः - कोण - उपजुहाव - बोलाविता झाला - यद्बलिना- ज्याच्या अन्नाने - एव - च - पुष्टः - पोसलेला - तस्मिन् - त्याच्यावरच - प्रतीपः - शत्रुत्व करणारा - परकृत्ये - शत्रुकार्याविषयी - आस्ते - उद्युक्त होत आहे. - श्वसानः - जिवंत असा - आशु - लवकर - पुरात् - नगरातून - निर्वास्यतां - घालवून दिला जावा. ॥१५॥ सः - तो - विदुरः - विदुर - भ्रातुः - भावाच्या - पुरः - समक्ष - अत्युल्बणकर्णबाणै - अत्यंत प्रखर वाग्बाणांनी कानावर प्रहार करणार्या - वचोभिः - भाषणांनी - इत्थं - याप्रमाणे - मर्मसु - मर्मस्थलावर - ताडितः - ताडन केलेला - अपि - सुद्धा - स्वयं - स्वतः - भगवतः - परमेश्वराच्या - मायां - मायेला - उरु - अधिक - मानयानः - मान देणारा असा होत्साता - गतव्यथः - पीडारहित - धनुः - धनुष्याला - द्वारि - दरवाज्यावर - निधाय - ठेवून - अयात् - निघाला. ॥१६॥ कौरवपुण्यलब्धः - कौरवांच्या पुण्याईने मिळालेला - गजाह्वयात् - हस्तिनापुरातून - निर्गतः - निघालेला - सः - तो - विदुरः - विदुर - पुण्यचिकीर्षया - पुण्य करण्याच्या इच्छेने - उर्व्यां - पृथ्वीवर - तीर्थपदः - पवित्र आहेत पदे ज्याची अशा श्रीहरीच्या - पदानि - स्थानाप्रत - अन्वाक्रमत् - क्रमाने गेला - य़ानि - ज्या - तीर्थानि - तीर्थाच्या ठीकाणी - सहस्त्रमूर्तिः - सहस्त्रावधि आहेत रूपे ज्याची असा परमेश्वर - स्वधिष्ठितः - चांगल्या तर्हेने राहिला आहे. ॥१७॥ अनन्यः - एकटा - सः विदुरः - तो विदुर - पुरेषु - नगरांत - पुण्योपवनाद्रिकुञ्जेषु - पुण्यकारक ठिकाणे,बागबगीचे,पर्वत व लतागृहे ह्या ठिकाणी - अपङ्कतोयेषु - निर्मळ पाणी असणार्या - सरित्सरस्सु - नद्या व सरोवरे ह्या ठिकाणी - अनन्तलिङ्गैः - वैष्णवचिन्हांनी - समलङ्कृतेषु - भूषित अशा - तीर्थायतनेषु - तीर्थे व क्षेत्रे य ठिकाणी - चचार - हिंडू लागला. ॥१८॥ गां - पृथ्वीवर - पर्यटन - फिरणारा - मेध्यविविक्तवृत्तिः - पवित्र व निर्भेळ पदार्थांवरच उपजीविका चालविणारा - सदाप्लुतः - नेहमी तीर्थस्नान करणारा - अधःशयनः - जमिनीवर निजणारा - अवधूतः - अभ्यंग स्नान न करणारा - अवधूतवेषः - साधूप्रमाणे वेष घेतलेला - स्वैः - स्वतःच्या नातलगांनी - अलक्षितः - न ओळखिलेला - विदुरः - विदुर - हरितोषणानि - परमेश्वाराला संतुष्ट करणारी - व्रतानि - व्रते - चेरे - आचरिता झाला. ॥१९॥ इत्थं - याप्रमाणे - भारतं - भारतासंबंधी - वर्षम् एव - खंडालाच - व्रजन् - गमन करणारा - यावत् - ज्या विवक्षित - कालेन - काही वेळाने - प्रभासं - प्रभासाला - गतवान् - गेला - तावत् - त्याच सुमारास - पार्थः - धर्मराज - एकचक्रां - एकाची सत्ता आहे जीवर अशा - एकातपत्रां - एकछत्री - क्षितिं - पृथ्वीला - अजितेन - श्रीकृष्णासह - शशास - पाळिता झाला. ॥२०॥ अथ - नंतर - तत्र - तेथे - यथा - जसे - वेणुजवह्निसंश्रयं - वेळूपासून घर्षणाने उत्पन्न झालेल्या अग्नीच्या संपर्काने - वनं - अरण्य - दग्धं - जळून जाते - तथा - तशा रीतीने - संस्पर्धया - एकमेकाला जिंकण्याच्या इच्छेने - संभूतां - झालेल्या - सुहृद्विनष्टिं - मित्रनाशाला - शुश्राय - ऐकता झाला - अथ - नंतर - अनुशोचन् - शोक करणारा - तूष्णीं - स्तब्ध होऊन - सरस्वतीं - सरस्वतीच्या - प्रत्यक् - उगमाजवळ - इयाय - गेला. ॥२१॥ सः - तो - विदुरः - विदुर - तस्यां - तेथील - त्रितस्य - त्रिताच्या - उशनसः - शुक्राचार्याच्या - च - आणि - मनोः - मनूच्या - पृथोः - पृथूच्या - अथ - नंतर - अग्नेः - अग्नीच्या - असितस्य - असिताच्या - वायोः - वायूच्या - सुदासस्य - सुदासाच्या - गवां - गाईच्या - गुहस्य - कार्तिकेयाच्या - च - आणि - श्राद्धदेवस्य - श्राद्धदेवाच्या - यत् - ज्या प्रसिद्ध - तीर्थं - तीर्थाला - आसिवेषे - यथेच्छ सेविता झाला. ॥२२॥ इह - येथे - सः - तो विदुर - च - आणि - अन्यानि - दुसरी - प्रत्यङ्गमुख्याङ्कितमन्दिराणि - प्रत्येक अवयवाच्या मुख्य चिन्हांनी शोभित आहेत मंदिरे ज्यात अशी - द्विजदेवदेवैः - ऋषी व देव यांनी - कृतानि - निर्मिलेली - विष्णोः - विष्णूची - नानायतनानि - अनेक देवालये - आसिषेवे - यथेच्छ सेविता झाला. - यद्दर्शनात् - ज्यांच्या दर्शनाने - कृष्णं - श्रीकृष्णाला - अनुस्मरन्ति - आठवतात. ॥२३॥ ततः - नंतर - तु - तर - ऋद्धं - समृद्ध - सुराष्ट्रं - सौराष्ट्र देशाला - सौवीरमत्स्यान् - व सौवीर आणि मस्त्य देशांना - च - आणि - कुरुजाङ्गलान् - कुरु व जाङ्गल ह्या देशांना - अतिव्रज्य - उल्लंघून - तावत् - तेवढ्या - कालेन - काळाने - यमुनां - यमुनेला - उपेत्य - प्राप्त होऊन - तत्र - तेथे - भागवतं - भगवद्भक्त अशा - उद्धवं - उद्धवाला - ददर्श - पाहता झाला. ॥२४॥ सः - तो - प्रशान्तं - शान्त - बृहस्पतेः - बृहस्पतीपासून - प्राप्तनयं - नीतिशास्त्र शिकलेल्या - प्रतीतं - प्रसिद्ध अशा - वासुदेवानुचरं - श्रीकृष्णाची सेवा करणार्या - उद्धवं - उद्धवाला - प्रणयेन - प्रेमाने - गाढं - दृढ - आलिंङ्ग्य - आलिंगन देऊन - भगवत्प्रजानां - भगवंताचा आश्रय करून राहणार्या - स्वानां - स्वकीयांच्या - भद्रं - खुशालीबद्दल - अपृच्छत् - विचारू लागला ॥२५॥ स्वनाभ्यपाद्मानुवृत्त्या - आपल्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून - इह - येथे - अवतीर्णौ - अवतीर्ण झालेले - पुराणौ - पुरातन असे - पुरुषौ - दोन पुरुष - उर्व्याः - पृथ्वीच्या - कुशलं - कल्याणाला - विधाय - करून - कृतक्षणौ - भोगिला आहे आनंद ज्यांनी असे - शूरगेहे - शूरसेनाच्या घरी - किल - खरोखर - कुशलं - खुशाल - आसाते कच्चित् - आहेत काय ? ॥२६॥ अङ्ग - अहो - कुरूणां - कुरुकुलोत्पन्न अशा - नः - आमचा - परमः - मोठा - सुहृतः - मित्र - भामः - पूज्य - सः - तो - शौरिः - वसुदेव - सुखं - सुखी - आस्ते कच्चित् - आहे ना ? - यः - जो - वै - खरोखर - वदान्यः - दानधर्म करणारा उदार - स्वसृणां - बहिणींचा - वरतर्पणेन - इष्ट वराने तृप्ति करून - पितृवत् - बाप मुलींना देतो त्याप्रमाणे - वरान् - योग्य वस्तूंना - ददाति - देतो ॥२७॥ अङ्ग - अहो - यदूनां - यादवांमध्ये - वीरः - पराक्रमी - वरूथाधिपतिः - सेनापति - प्रद्युम्नः - प्रद्युम्न - सुखं - सुखी - आस्ते कच्चित् - आहे ना ? - रुक्मिणी - रुक्मिणी - विप्रान् - ब्राह्मणांना - आराध्य - पूजून - आदिसर्गे - पूर्वजन्मी - यं - ज्याला - स्मरं - मदन - इति ब्रुवन्ति तं - असे म्हणतात त्याला - भगवतः - श्रीकृष्णापासून - अभिलेभे - मिळवती झाली. ॥२८॥ शतपत्रनेत्रः - कमलनेत्र श्रीकृष्ण - नृपासनाशां - सिंहासनाच्या इच्छेला - दूरात् - दुरूनच - परिहृत्य - सोडून देऊन - यं - ज्याला - अभ्यषिंचत् - अभिषेकिता झाला - सात्वतवृष्णिभोजदाशार्हकाणां - सात्त्वत,वृष्णि,भोज व दाशार्ह ह्यांचा - अधिपः - पालक - सः - तो - उग्रसेनः - उग्रसेन - सुखं - कुशल - आस्ते कच्चित् - आहे ना? ॥२९॥ सौम्य - हे शान्त उद्धवा! - व्रताढ्या - व्रताचरणाने महत्त्वाला पोचलेली - जाम्बवती - जाम्बवती - यं - ज्या - देवं - तेजस्वी - गुहं - गुहाला - असूत - उत्पन्न करती झाली - यः - जो - अग्रे - पूर्वी - अंबिकया - पार्वतीने - धृतः - धारण केला होता - सः - तो - सदृक्षः - सारख्याच योग्यतेचा - हरेः - श्रीकृष्णाचा - सुतः - पुत्र - रथिनां - रथीलोकात - अग्रणोः - नायक - सांबः - सांब - साधु - चांगला - आस्ते कच्चित् - आहे काय ? ॥३०॥ फाल्गुनात् - अर्जुनापासून - लब्धधनूरहस्य - मिळविले आहे धनुर्विद्येचे रहस्य ज्याने असा - सः - तो - युयुधानाः - सात्यकि - क्षेमं - खुशाल - आस्ते कच्चित् - आहे काय ? - यः - जो - अधोक्षजसेवया - श्रीकृष्णाची सेवा करून - यतिभिः - साधूंनी - दुरापां - मिळविण्यास कठीण अशा - तदीयां - श्रीकृष्णविषयक - गतिं - गतीला - अञ्जसा एव - तत्काळच - लेभे - मिळविता झाला ॥३१॥ बुधः - बुद्धिवान् - अनमीवः - निष्पाप - भगवत्प्रपन्नः - श्रीकृष्णाची भक्ति करणारा - श्वफल्कपुत्रः - श्वफल्काचा मुलगा अक्रूर - स्वस्ति - कुशल - आस्ते कच्चित् - आहे काय ? - यः - जो - प्रेमविभिन्नधैर्यः - प्रेमामुळे धैर्य नाहिसे झालेला - कृष्णपादाङ्कितमार्गपांसुषु - श्रीकृष्णाच्या पायावरील चक्रादि चिन्हे उमटलेल्या रस्त्यावरील धुळीचे ठिकाणी - अचेष्टत - गडबडा लोळला ॥३२॥ देवमातुः - देवांच्या आईच्या - इव - प्रमाणे - विष्णुप्रजायाः - जिच्यापासून विष्णु श्रीकृष्णनावाने पुत्ररूपाने अवतीर्ण झाला अशा - देवकभोजपुत्र्याः - भोजकुलोत्पन्न् देवकन्या जी देवकी तिचे - शिवं - कुशल - कच्चित् - आहे काय ? - यथा - जसे - त्रयी - तीन वेद - यज्ञ्वितानां - यज्ञाचा विस्तार करणार्या - अर्थं - अर्थाला - तथा - तसे - या - जी - वै - खरोखर - देवं - परमेश्वराला - स्वगर्भेण - आपल्या गर्भाने - दधार - धरती झाली ॥३३॥ यः - जो - सात्वतां - सात्वत कुलात उत्पन्न झालेल्या - वः - तुमचा - कामदुघः - इच्छा पूर्ण करणारा - सः - तो - भगवान् - सर्वगुणसंपन्न - अनिरुद्धः - अनिरुद्ध - सुखं - सुखी - आस्ते - आहे - अपिस्वित् - काय ? - यं - ज्याला - सत्त्वतुरीयतत्त्वं - अंतःकरणाचे चवथे तत्त्वच असा - मनोमयं - मनस्वरूप - शब्दयोनिं - शब्दाचे उत्पत्तिकारण असे - आमनन्ति - मानतात. ॥३४॥ सौम्यः - हे शांत उद्धवा ! - च - आणि - अन्ये - दुसरे - ये - जे - निजात्मदैवं - आपला मुख्य देव अशा श्रीकृष्णाला - अनन्यवृत्त्या - अनन्यभावाने - समनुव्रताः - भजणारे - हृदीकसत्यात्मजचारुदेष्णगदादयः - हृदीक, सत्यभामेचा पुत्र चारुदेष्ण, गद वगैरे - स्वस्ति - सुखाने - चरन्ति - राहतात - अपिस्वित् - काय ? ॥३५॥ धर्मः - धर्मराज - स्वदोर्भ्यां - आपले बाहूच की काय अशा - विजयाच्युताभ्यां - अर्जुन व श्रीकृष्ण यांसह - धर्मेण - धर्माने - सेतुं - धर्ममर्यादेला - परिपाति अपि - रक्षितो काय ? - यत्सभायां - ज्या धर्मराजाच्या सभेत - दुर्योधनः - दुर्योधन - विजयानुवृत्त्या - अर्जुनाने राजे जिंकून मिळविलेल्या अर्थात् अर्जुनाच्या मागोमाग येणार्या - साम्राज्यलक्ष्म्या - सार्वभौम संपत्तीने - अतप्यत - संतप्त झाला होता. ॥२६॥ वा - अथवा - अत्यमर्षी - अतिरागीट - भीमः - भीम - कृताघेषु - पापाचरण करणार्या - दुर्योधनादिषु - दुर्योधनादि शत्रूंच्या ठिकाणी - अहिवत् - सर्पाप्रमाणे - दीर्घतमं -अत्यंत मोठ्या - अघं - सूड घेण्याच्या क्रियेला - व्यमुञ्चत् किं - करता झाला काय - गदायाः - गदेच्या - विचित्रं - अद्भुत - मार्गं - भ्रमणक्रियेला - चरतः - करणार्या - यस्य - ज्या - भीमस्य - भीमाच्या - अंघ्रिपातं - पादप्रहाराला - रणभूः - युद्धभूमी - न सहे - सहन करीत नव्हती. ॥३७॥ रथयूथपानां - महारथ्यांमध्ये - यशोधाः - उत्तम तर्हेने कीर्ति मिळविलेला - गाण्डीवधन्वा - गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन - उपरतारिः - शत्रूंना मारून स्वस्थ असा - आस्ते कच्चित् - आहे काय ? - यच्छरकूटगूढः - ज्या अर्जुनाच्या बाणवृष्टीने आच्छादून गेलेला - अलक्षितः - ओळखता न येणारा - माया किरातः - कपटाने भिल्लवेष घेतलेला - गिरीशः - शंकर - तुतोष - संतुष्ट झाला ॥३८॥ पक्ष्मभिः - पापण्यांनी - वृते - वेष्टिल्यामुळे रक्षिले गेलेल्या - अक्षिणी इव - दोन डोळ्यांप्रमाणे - पार्थैः - धर्म, भीम व अर्जुन या तीन कुंतीपुत्रांनी - वृतौ - रक्षिलेले - यमौ - जुळे - पृथायाः - कुन्तीचे - तनयौ - पुत्र नकुळ व सहदेव - सुपर्णौ वज्रिवक्त्रात् इव - इंद्राच्या मुखातून अमृताला घेणारे दोन गरुडच की काय अशाप्रमाणे - मृधे - युद्धात - परात् - शत्रूपासून - स्वरिक्थं - आपल्या द्रव्यभागाला - उद्दाय - घेऊन - रेमाते उतस्वित् - आनंदाने खेळतात काय ? ॥३९॥ अहो - कितीहो आश्चर्य - पृथा - कुंती - अपि - सुद्धा - तेन - त्या - राजर्षिवर्येण - श्रेष्ठ राजर्षि अशा पंडुराजाने - विनाअपि - विरहित अशीहि - अर्भकार्थे - पुत्रांकरिताच - ध्रियते - जिवंत राहिली आहे - यः - जो - तु - तर - अधिरथः - महापराक्रमी - एकवीरः - अद्वितीय शूर - धनुर्द्वितीयः - फक्त ज्याला साहाय्य करणारे दुसरे धनुष्यच आहे असा पांडुराजा - चतस्त्रः - चार - ककुभः - दिशांना - विजिग्ये - जिंकिता झाला. ॥४०॥ सौम्य - हे शान्तस्वभावाच्या उद्धवा ! - अधः - अधोगतीला - पतन्तं - जाणार्या - तं - त्या - धृतराष्ट्रं - धृतराष्ट्राबद्दल - अनुशोचे - वाईट वाटते - यः - जो - परेताय - मेलेल्या - भ्रात्रे - भाऊ पांडुराजाशी - विदुद्रुहे - वैर करिता झाला - स्वपुत्रान् - आपल्या मुलांना - समनुव्रतेन - अनुसरणार्या - येन - ज्या धृतराष्ट्राने - सुहृन् - स्नेही असा - अहं - मी - स्वपुर्याः - आपल्या नगरातून - निर्यापितः - घालवून दिला गेलो ॥४१॥ सः - तो - अहं - मी - मर्त्यविडम्बनेन - मनुष्याचे अनुकरण करण्याने - नृणां - मनुष्यांचा - दृशः - दृष्टींना - चालयतः - चाळविणार्या - विधातुः - जगद्रक्षक - हरेः - श्रीकृष्णाच्या - प्रसादात् - अनुग्रहाने - पदवीं - सन्मार्गाला - पश्यन् - पहाणारा होत्साता - गतविस्मयः - आश्चर्य न मानणारा - नान्योपलक्ष्यः - वेष बदलल्यामुळे दुसर्याला ओळखता न येणारा असा - अत्र - येथे - चरामि - फिरत आहे ॥४२॥ भगवान् - सर्वगुणसंपन्न परमेश्वर - नूनं - खरोखर - त्रिमदोत्पथानां - तीन प्रकारच्या मदाने उन्मत्त झालेल्या - चमूभिः - सैन्यानी - मुहुः - वारंवार - महीं - पृथ्वीला - चालयतां - हलवून सोडणार्या - नृपाणां - राजांच्या - वधात् - नाशाने - प्रपन्नार्तिजिहीर्षया - शरणागतांची पीडा दूर करण्याच्या इच्छेने - ईशः - समर्थ - अपि - असूनसुद्धा - कुरुणां - कौरवांच्या - अघं - पापाचरणाला - उपैक्षत - उपेक्षापूर्वक सहन करिता झाला. ॥४३॥ अजस्य - जन्मरहित ईश्वराचे - जन्म - जन्माला येणे - उत्पथनाशनाय - दुर्मार्गाने वागणार्यांच्या नाशाकरिता - अकर्तुः - कर्मरहित अशा परमेश्वराची - कर्माणि - कर्मे - पुंसां - पुरुषांना - ग्रहणाय - सन्मार्गात आणण्याकरिता - अन्यथा - असे नसेल तर - गुणानां - त्रिगुणांहून - परः - निराळा - कः - कोणता - देहयोगं - देहसंबंधाला - उत - आणि - कर्मतंत्रं - कर्मजालाला - ननु - खरोखर - अर्हति - स्वीकारण्यास ईच्छितो. ॥४४॥ सखे - हे मित्रा उद्धवा - प्रपन्नाखिललोकपानां - शरण आलेल्या सर्व राजांच्या - च - आणि - स्वे - आपल्या - अनुशासने - आज्ञेत - अवस्थितानां - राहिलेल्या साधूंच्या - अर्थाय - कल्याणाकरिता - यदुषु - यादवांमध्ये - जातस्य - जन्म घेतलेल्या - तीर्थकीर्तेः - पवित्र कीर्तीच्या - तस्य - त्या श्रीकृष्णाच्या - वार्तां - कथांना - कीर्तय - वर्णन करून सांगा. ॥४५॥ अध्याय पहिला समाप्त |