|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय १० वा - अन्वयार्थ
भागवताची दहा लक्षणे - अत्र - येथे - सर्गः - तात्त्विक सृष्टि - विसर्गः - स्थावरजंगम सृष्टि - स्थानं - स्थिती - पोषणं - ईश्वरानुग्रहाने पुष्ट होणे - ऊतयः - कर्मवासना - मन्वन्तरेशानुकथाः - सद्धर्म व अवतारकथा - निरोधः - संहार - मुक्तिः - मोक्ष - च - आणि - आश्रयः - परमेश्वर ॥१॥ इह - येथे - महात्मनः - थोर मनाचे पुरुष - दशमस्य - दहाव्या लक्षणांच्या - विशुद्ध्यर्थं - शुद्ध ज्ञानासाठी - नवानां - नऊ लक्षणांच्या - लक्षणम् - स्वरूपाला - अञ्जसा - प्रत्यक्ष - श्रुतेन - वेदादिकांच्या श्रवणाने - च - आणि - अर्थेन - अर्थाने - वर्णयन्ति - वर्णन करून सांगतात. ॥२॥ गुणवैषम्यात् - गुणांच्या न्यूनाधिक्याने - ब्रह्मणः - ब्रह्मापासून - भूतमात्रेन्द्रियधियां - महाभूते, विषय, इन्द्रिये आणि बुद्धि यांची - जन्म - उत्पत्ति - सर्गः - सर्ग - उदाहृतः - बोललेला आहे - पौरुषः - पुरुषापासून झालेली सृष्टि - विसर्गः - विसर्ग - स्मृतः - सांगितला आहे. ॥३॥ वैकुण्ठविजयः स्थितिः - परमेश्वराचा विजय म्हणजे स्थिति - तदनुग्रहः पोषणं - त्याचा अनुग्रह म्हणजे पोषण - सद्धर्मः मन्वतराणि - साधूंनी आचरिलेला धर्म म्हणजे मन्वन्तरे - कर्मवासनाः ऊतयः - फलेच्छेने कर्मे करणे म्हणजे ऊति. ॥४॥ हरेः - भगवंताच्या - च - आणि - अस्य - ह्याचे - अनुवर्तिनां पुंसां - अनुकरण करणार्या भक्तांच्या - अवतारानुचरितं - अवतारांचे व त्यांतील कथांचे वर्णन - नानाख्यानोपबृंहिताः - अनेक कथानकांनी भरलेल्या - ईशकथाः - ईशकथा असे - प्रोक्ताः - म्हटले आहे. ॥५॥ शक्तिभिः सह - तत्त्वांसह - अस्य आत्मनः - ह्या आत्म्याचे - अनुशयनं - लीन होणे - निरोधः - ह्याला निरोध म्हणतात - अन्यथा - दुसर्या मायिक - रूपं - स्वरूपाला - हित्वा - टाकून - स्वरूपेण - शुद्धात्मरूपाने - व्यवस्थितिः - राहणे - मुक्तिः - त्याला मुक्ति म्हणतात. ॥६॥ आभासः - भ्रम - च - आणि - निरोधः - लय - यतः - ज्यापासून - अध्यवसीयते - निश्चितपणे ठरविला जातो - सः - तो - आश्रयः - आश्रय - परं ब्रह्म - परब्रह्म - परमात्मा - परमात्मा - इति - असा - शब्दयते - संबोधिला जातो. ॥७॥ यः - जो - अयं - हा - अध्यात्मिकः - इंद्रियाभिमानी - पुरुषः - जीव - सः एव - तोच - असौ - हा - आधिदैविकः - इंद्रियदेवतारूपी - यः - जो - तत्र - त्यांत - उभयविच्छेदः - दोहोंचा वियोग तो - पुरुषः - जीव - आधिभौतिकः हि - खरोखर शारीरिक ॥८॥ यदा - जेव्हा - असौ - हा - शुचिः - निर्मल - पुरुषः - पुरुष - अण्डं - ब्रह्मांडाला - विनिर्भिदय - फोडून - विनिर्गतः - बाहेर पडला - सः - तो - आत्मनः - आपल्या - अयनं - स्थानाला - अन्विच्छन् - इच्छिणारा - शुचीः - निर्मळ - अपः - उदकाला - अस्राक्षीत् - उत्पन्न करिता झाला. ॥१०॥ स्वसृष्टासु - स्वतः उत्पन्न केलेल्या - तासु - त्या उदकांत - सहस्रपरिवत्सरान् - हजारो वर्षेपर्यंत - अवात्सीत् - वास करिता झाला. - यत् - ज्या अर्थी - आपः - उदक - पुरुषोद्भवाः - पुरुषापासून उत्पन्न झालेले - तेन - त्या अर्थी - नारायणः नाम - नारायण नावाचा झाला. ॥११॥ द्रव्यं - द्रव्य - च - आणि - कर्म - कर्म - कालः - काळ - च - आणि - स्वभावः - स्वभाव - च - आणि - जीवः - जीव - एव - सुद्धा - यदनुग्रहतः - ज्याच्या अनुग्रहामुळे - सन्ति - आहेत - यदुपेक्षया - ज्याने त्यांत दुर्लक्ष केल्यामुळे - न सन्ति - असत नाही. ॥१२॥ योगतल्पात् - योगशय्येवरून - समुत्थितः - उठलेला - एकः - एकटा - देवः - परमेश्वर - नानात्वम् - पुष्कळपणाला - अन्विच्छन् - क्रमाक्रमाने इच्छिणारा - हिरण्मयं - तेजोरूप - वीर्यं - वीर्याला - मायया - मायेच्या योगे - त्रिधा - तीन प्रकाराने - व्यसृजत् - सोडिता झाला. ॥१३॥ अथ - नंतर - प्रभुः - समर्थ परमेश्वर - एकं - एका - पौरुषं - पुरुषासंबंधी - वीर्यं - वीर्याला - अधिदैवं - अधिदैवनामक - अथ - आणि - अध्यात्मं - अध्यात्मनामक - अधिभूतं - व अधिभूतनामक - इति - अशा प्रकारे - त्रिधा - तीन विभाग करून - अभिदयत - निरनिराळे करिता झाला. - तत् - ते - शृणु - ऐक. ॥१४॥ विचेष्टतः - हालचाल करणार्या - पुरुषस्य - पुरुषाच्या - अन्तःशरीरे - शरीरांच्या आंत - आकाशात् - आकाशापासून - ओजः - इन्द्रियशक्ति - सहः - मानसिक शक्ति - बलम् - शारीरिक शक्ति - जज्ञे - उत्पन्न झाली - ततः - त्या तीन शक्तींपासून - महान् - मोठा - असुः - सर्वोत्पादनसमर्थ - प्राणः - प्राण ॥१५॥ अनुगाः - सेवक - नरदेवम् इव - राजाप्रमाणे - सर्वजन्तुषु - सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी - प्राणन्तं - संचार करणार्या - यम् अनु - ज्याला अनुलक्षून - प्राणाः - इंद्रिये - प्राणन्ति - चलनवलन करितात. - अपानन्तं - सोडणार्याला अनुलक्षून - अपानन्ति - चलनवलनादि व्यापार बंद करितात. ॥१६॥ क्षिपता - चलनवलनादि कार्य करणार्या - प्राणेन - प्राणाने - प्रभोः - समर्थ प्रभूच्या - अन्तः - आत - क्षुत्तृट् - भूक व तहान - आजायते - उत्पन्न होते - पिपासतः - पिण्याची इच्छा करणार्याला - च - आणि - जक्षतः - खाण्याची इच्छा करणार्याला - प्राक् - प्रथम - मुखं - तोंड - निरभिदयंत - उत्पन्न झाले.॥१७॥ मुखतः - तोंडापासून - तालु - ताळू - निर्भिन्नं - उत्पन्न झाली - तत्र - तेथे - जिह्वा - जीभ - उपजायते - उत्पन्न होते - ततः - त्या जिभेपासून - नानारसः - अनेक प्रकारचा रस - जज्ञे - उत्पन्न झाला - यः - जो रस - जिह्वया - जिभेने - अधिगम्यते - जाणला जातो. ॥१८॥ विवक्षोः - बोलण्याची इच्छा करणार्याला - भूम्नः - पुरुषाच्या - मुखतः - तोंडापासून - वह्निः - अग्नि - वै - आणि - वाक् - वाणी - तयोः - त्या दोघांचे कार्य - व्याहृतं - भाषण होय - तस्य - त्याचा - जले - पाण्यात - सुचिरं - पुष्कळ काळपर्यंत - निरोधः - कोंडमारा - समजायत - झाला. ॥१९॥ नभस्वति - वायु - दोधूयति - जोरजोराने वाहत असता - नासिके - दोन नाकपुडया - निरभिदयेतां - बाहेर पडल्या - तत्र - तेथे - गन्धवहः - सुगंधाला वाहून नेणारा - वायुः - वायु - जिघृक्षतः - सुगंध घेऊ इच्छिणार्या पुरुषाच्या - नसि - नाकांत - घ्राणः - सुगंध घेण्यालायक घ्राणनामक इंद्रिय होय. ॥२०॥ यदा - जेव्हा - आत्मनि - त्या विराट् देहात - निरालोकं - अंधकार युक्त - आत्मानं - आत्म्याला - दिदृक्षतः - पाहू इच्छिणार्या - तस्य - त्यास - अक्षिणी - दोन डोळे - निर्भिन्ने - उत्पन्न झाले. - हि - खरोखर - ज्योतिः - तेज - च - आणि - चक्षुः - नेत्रेंद्रिय - गुणग्रहः - रूपविषयाचे ग्रहण ॥२१॥ ऋषिभिः - ऋषींकडून - बोध्यमानस्य - स्तुती केलेल्या - आत्मनः - आत्म्याला - तत् - त्या स्तुतीला - जिघृक्षतः - श्रवणव्दारा घेण्याची इच्छा करणार्याला - कर्णौ - दोन कान - निरभिदयेतां - उत्पन्न झाले - ततः - त्यापासून - दिशः - दिशा - च - आणि - श्रोत्रं - श्रवणेंद्रिय - गुणग्रहः - शब्दविषयांचे ग्रहण करण्याची क्रिया॥२२॥ वस्तुनः - पदार्थाचे - मृदुकाठिन्य - मृदुत्व, कठीणपणा, - लघुगुर्वोष्णशीतताम् - लघु, गुरु, उष्ण आणि थंड ह्या सर्वांना - जिघृक्षतः - घेण्याची इच्छा करणार्या पुरुषास - त्वक् - त्वचा - निर्भिन्ना - उत्पन्न झाली - तस्यां - तिच्या ठिकाणी - रोममहीरुहाः - केस व वृक्ष - तत्र च - आणि त्यावर - त्वचा - कातडीने - लब्धगुणः - झालेला आहे स्पर्शगुणाचा लाभ ज्याला असा - वातः - वायु - अन्तः - आंत - च - आणि - बहिः - बाहेर - वृतः - वेढून राहिला आहे. ॥२३॥ नानाकर्मचिकीर्षया - अनेक कर्मे करण्याच्या इच्छेने - तस्य - त्या पुरुषाला - हस्तौ - दोन हात - रुरुहतुः - उत्पन्न झाले - तयोः तु - मग त्या दोन हातांचे ठिकाणी - बलं - बळ - इंद्रः - इंद्र देवता - च - आणि - उभयाश्रयं - त्या दोन्ही कर्माला आश्रय आहे ज्याचा असे - आदानं - स्वीकाराचे कार्य॥२४॥ अभिकामिकां - इच्छेला अनुसरणार्या - गतिं - गतीला - जिगीषतः - मिळविण्याची इच्छा करणार्या पुरुषास - पादौ - दोन पाय - रुरुहाते - उगवले - पद्भ्यां - दोन्ही पायांसह - स्वयं - स्वतः - यज्ञः - यज्ञस्वरूपी नारायण - नृभिः - मनुष्यांकडून - कर्मभिः - गमनादि क्रियांच्या योगाने - हव्यं - यज्ञसामग्री - क्रियते - प्राप्त केली जाते. ॥२५॥ प्रजानन्दामृतार्थिनः - प्रजोत्पादन कृत्यांत आनंदामृतरसाचा लाभ घेण्यास इच्छिणार्या पुरुषास - वै - खरोखर - शिश्नः - जननक्रियेचे स्थान - निरभिदयत - उत्पन्न झाले - उपस्थः - जननेंद्रिय - आसीत् - झाले - कामानां - कामांचे - प्रियं - आवडते - तत् - ते - उभयाश्रयं - दोघांच्या आश्रयाने प्राप्त होणारे आहे. ॥२६॥ धातुमलं - खाल्लेल्या अन्नाचा निःसत्त्व भाग - उत्सिसृक्षोः - सोडण्याची इच्छा करणार्या पुरुषास - गुदं - गुदव्दार - वै - खरोखर - निरभिदयत - उत्पन्न झाले - ततः - त्या गुदापासून - पायुः - पायु नावाचे इंद्रिय - ततः - तेथून - मित्रः - मित्रनामक देवता - उभयाश्रयः - दोघांचा आश्रय करून राहणारी - उत्सर्गः - मल सोडण्याची क्रिया ॥२७॥ पुर्याः - एका शरीरांतून - पुरः - दुसर्या शरीरामध्ये - आसिसृप्सोः - जाण्याची इच्छा करणार्या पुरुषास - नाभिव्दारं - नाभिस्थान - तत्र - तेथे - अपानः - अपान झाले - ततः - त्या अपानापासून - मृत्यूः - मृत्यु उत्पन्न झाला - उभयाश्रयं - दोहोंच्या आश्रयाने होणारे - अपानतः - अपानाहून - पृथक्त्वं - संबंध तुटण्याचे कार्य ॥२८॥ अन्नपानानां - भक्ष्यपेयपदार्थांना - आदित्सोः - घेण्याची इच्छा करणार्या पुरुषास - कुक्ष्यन्त्रनाडयः - उदर, आंतडी व नाडया - आसन् - असत्या झाल्या - तदाश्रये - त्यांवर अवलंबून राहिलेला - तुष्टिः - संतोष - च - आणि - पुष्टिः - पोषण - तयोः - त्या दोघांमध्ये - नदयः - नदया - समुद्राः - समुद्र ॥२९॥ आत्ममायां - स्वतःच्या मायेला - निदिध्यासोः - चिन्तण्याची इच्छा करणार्यास - हृदयं - हृदय - निरभिदयत - उत्पन्न झाले - ततः - त्या हृदयापासून - मनः - मन - ततः - त्या मनापासून - चंद्रः - चंद्र - संकल्पः - संकल्प - च एव - आणखीही - कामः - काम उत्पन्न झाला. ॥३०॥ सप्त - सात - त्वक्चर्ममांसरुधिर - त्वचा, चर्म, मांस, रक्त, - मेदोमज्जास्थिधातवः - मेद, मज्जा व अस्थि ह्या धातु - भूम्यप्तेजोमयाः - पृथ्वी, उदक व तेज यांनी बनलेल्या आहेत. - व्योमाम्बुवायुभिः - आकाश, उदक व वायु ह्यायोगे - प्राणः - प्राण ॥३१॥ इन्द्रियाणि - इन्द्रिये - गुणात्मकानि - विषयस्वरूपी होत - गुणाः - विषय - भूतादिप्रभवाः - भूतांचे मूळ जो अहंकार त्यापासून उत्पन्न झालेले - मनः - मन - सर्वविकारात्मा - सर्व विकारांनी व्यापिलेले - बुद्धिः - बुद्धि - विज्ञानरूपिणी - विविधज्ञानाने युक्त ॥३२॥ च - आणि - एतत् - हे - मह्यादिभिः - पृथ्वी वगैरे - अष्टभिः - आठ - आवरणैः - आच्छादनांनी - बहिः - बाहेरून - आवृतम् - वेष्टिलेले - भगवतः - भगवंताचे - स्थूलं - विराट् - रूपं - स्वरूप - मया - माझ्याकडून - ते - तुला - व्याहृतं - सांगितले गेले आहे. ॥३३॥ अतः - ह्याहून - परं - दुसरे - सूक्ष्मतमं - अत्यंत सूक्ष्म - अव्यक्तं - अस्पष्ट - निर्विशेषणं - विशेषणरहित - अनादिमध्यनिधनं - आदिमध्यान्तररहित - नित्यं - नेहमीचे - वाङ्मनसः - वाणी व मन ह्याहून - परं - पलीकडे ॥३४॥ अमुनी - ही - भगवद्रूपे - भगवंताची दोन स्वरूपे - मया - माझ्याकडून - ते - तुला - अनुवर्णिते - क्रमाने सांगितली आहेत. - विपश्चितः - विव्दान - मायासृष्टे - मायेने उत्पादिलेली - उभे - दोन्ही - अपि - सुद्धा - न गृहणन्ति - स्वीकारीत नाहीत.॥३५॥ परः - श्रेष्ठ - अकर्मकः - कर्म न करणारा - ब्रह्मरूपधृक् - ब्रह्मदेवाचे स्वरूप घेणारा - सकर्मा - कर्म करणारा - सः - तो - भगवान् - परमेश्वर - वाच्यवाचकतया - वाच्यवाचकभावाने - नामरूपक्रियाः - नाव, रूप व क्रिया - धत्ते - धरतो. ॥३६॥ नृप - हे राजा ! - प्रजापतीन् - प्रजापतींना - मनून् - मनूंना - देवान् - देवांना - ऋषीन् - ऋषींना - पितृगणान् - पितृगणांना - सिद्धचारणगन्धर्वान् - सिद्ध, चारण व गन्धर्व ह्यांना - विदयाध्रासुरगुह्यकान् - विदयाधर, असुर व यक्ष ह्यांना - पृथक् - निरनिराळ्या ॥३७॥ किन्नराप्सरसः - किन्नर व अप्सरा ह्यांना - नागान् - वासुकिप्रमुख नागांना किंवा हत्तींना - सर्पान् - सापांना - किंपुरुषोरगान् - किंपुरुष व इतर किरकोळ सर्प त्यांना - मातृः - मातृदेवतांना - रक्षःपिशाचान् - राक्षस व पिशाच यांना - च - आणि - प्रेतभूतविनायकान् - प्रेत, भूत व विनायक ह्यांना ॥३८॥ कूष्माण्डोन्मादवेतालान् - कूष्माण्ड, उन्माद, वेताळ ह्यांना - यातुधानान् - यातुधानांना - ग्रहाम् - ग्रहांना - खगान् - पक्ष्यांना - मृगान् - मृगांना - पशून् - पशूंना - वृक्षान् - वृक्षांना - गिरीन् - पर्वतांना - सरीसृपान् - सरपटणार्या बारीक जीवांना - अपि - सुद्धा ॥३९॥ ये - जे - अन्ये - दुसरे - व्दिविधाः - दोन प्रकारचे - चतुर्विधाः - चार प्रकारचे - जलस्थलनभौकसः - पाण्यात, जमिनीवर व आकाशात राहणारे - कर्मणां - कर्माच्या - गतयः - गति - तु - तर - कुशलाकुशलाः - उत्तम व अधम - मिश्राः - उत्तमाधमाने मिश्रित म्हणजे मध्यम - इमाः - ह्या - सुरनृनारकाः - देव, मनुष्य व नरक अशा - सत्त्वं - सत्त्वगुण - रजः - रजोगुण - तमः - तमोगुण - इति - ह्यांनी क्रमाने बनलेल्या - तिस्रः - तीन गति आहेत. ॥४०॥ राजन् - हे राजा - यदा - जेव्हा - एकैकतरः - ह्यापैकी कोणताही एकच - स्वभावः - गुणस्वभाव - अन्याभ्यां - दुसर्या दोहोशी - उपहन्यते - मिसळला जातो - तत्रापि - तेव्हा त्यात सुद्धा - गतयः - गति - एकैकशः - प्रत्येकाच्या - त्रिधा - तीन तीन प्रकारांनी - भिदयन्ते - निरनिराळ्या मानल्या जातात. ॥४१॥ धर्मरूपधृक् - धर्माचे स्वरूप धारण करणारा - जगद्धाता - जग उत्पन्न करणारा - सः एव - तोच - भगवान् - परमेश्वर - तिर्यङ्नरसुरात्मभिः - पशु, मनुष्य, देव वगैरे रूपांनी - इदं - ह्या - विश्वं - जगाला - स्थापयन् - राखणारा - पुष्णाति - पोषितो. ॥४२॥ ततः - नंतर - अनिलः - वायु - घनानीकम् इव - मेघपङ्क्तीप्रमाणे - कालाग्निरुद्रात्मा - काळ, अग्नि, व रुद्र अशी रूपे घेणारा - आत्मनः - आत्म्यापासून - यत् - जे - इदं - हे - सृष्टं - उत्पन्न केलेले - कालेन - योग्य वेळी - संनियच्छति - संहारितो. ॥४३॥ भगवत्तमः - षड्गुणैश्वर्यवस्तूंमध्ये अत्यंत श्रेष्ठ असा - भगवान् - परमेश्वर - इत्थंभावेन - याप्रमाणे - कथितः - सांगितला आहे - हि - कारण - सूरयः - ज्ञानी - इत्थंभावेन - अशा रीतीने - परं - परमेश्वराला - द्रष्टुं - पाहण्याला - न अर्हन्ति - समर्थ होत नाहीत. ॥४४॥ अस्य - ह्या - परस्य - परमेश्वराच्या - जन्मादौ - जन्म वगैरेंमध्ये - कर्मणि - व कर्मामध्ये - न अनुविधीयते - कर्तृत्व संबंध मानिला जात नाही - कर्तृत्वप्रतिषेधार्थं - परमेश्वराला कर्तृत्वसंबंध नाही हे सिद्ध करण्यासाठीच - हि - कारण - तत् - ते कर्तृत्व - मायया - मायेने - आरोपितं - आरोपित केले आहे. ॥४५॥ अयं - हा - तु - तर - ब्रह्मणः - ब्रह्मदेवाचा - कल्पः - कल्प - सविकल्पः - अवांतर दैनंदिन कल्पासह - उदाहृतः - सांगितला आहे. - यत्र - ज्यात - प्राकृतवैकृताः - प्रकृतिजन्य व विकृतिजन्य - सर्गाः - सर्ग असा - साधारणः - सर्वसामान्य - विधिः - सृष्टीप्रकार आहे. ॥४६॥ कालस्य - काळाचे - परिमाणं - प्रमाण - च - आणि - कल्पलक्षणविग्रहम् - कल्पांचे लक्षण व त्यांचे विभाग - यथा - जसे - पुरस्तात् - क्रमाने येईल तसे पुढे - व्याख्यास्ये - मी सांगेन - अथो - ह्यानंतर - पाद्मं - पाद्म नामक - कल्पं - कल्पाला - शृणु - ऐक. ॥४७॥ सूत - हे सूता ! - भवान् - आपण - नः - आम्हाला - यत् - जे - आह - बोलला - भागवतोत्तमः - भगवद्भक्तात श्रेष्ठ असा - क्षत्ता - विदुर - दुस्त्यजान् - टाकण्यास कठीण अशा - बन्धून् - भाऊबंदांना - त्यक्त्वा - टाकून - भुवः - पृथ्वीवरील - तीर्थानि - तीर्थांना - चचार - फिरला. ॥४८॥ अध्यात्मसंश्रितः - आत्मज्ञानाने युक्त - तस्य - त्या - कौषारवेः - मैत्रेयाचा - संवादः - भाषण - कुत्र - कोठे - यव्दा - किंवा - सः - तो - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न मैत्रेय - पृष्टः - विचारला गेला असता - तस्मै - त्या विदुराला - तत्त्वं - ज्ञानाला - उवाच - बोलला. ॥४९॥ सौम्य - हे शांत सूता ! - तत् - ते - इदं - हे - विदुरस्य - विदुराचे - विचेष्टितं - चरित्र - च - आणि - बन्धुत्यागनिमित्तं - बंधूंचा त्याग करण्याचे कारण - तथैव - त्याचप्रमाणे - पुनः - फिरून - आगतवान् - परत आला - नः - आंम्हाला - ब्रूहि - सांगा. ॥५०॥ परीक्षिता - परीक्षित - राज्ञा - राजाने - पृष्टः - विचारलेला - महामुनिः - महर्षि शुकाचार्य - यत् - जे - अवोचत् - बोलला - तत् - ते - राज्ञः - राजाच्या - प्रश्नानुसारतः - प्रश्नांच्या क्रमाने - वः - तुम्हाला - अभिधास्ये - मी सांगेन - शृणुत - ऐका. ॥५१॥ स्कंध दुसरा - अध्याय दहावा समाप्त |