|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ९ वा - अन्वयार्थ
ब्रह्मदेवाचे भगवद्धामदर्शन आणि त्यांना भगवंतांच्या द्वारा चतुःश्लोकी भागवताचा उपदेश - राजन् - हे परिक्षित राजा ! - स्वप्नद्रष्टुःइव - स्वप्नात पाहणार्या पुरुषाप्रमाणे - आत्ममायाम् ऋते - स्वतःच्या मायेचा स्वीकार केल्याशिवाय - परस्य - श्रेष्ठ अशा - अनुभवात्मनः - अनुभव घेणार्या आत्म्याचा - अर्थसंबंधः - देहादि पदार्थांशी संबंध - अञ्जसा - वास्तविक रीतीने - न घटेत - घडत नाही. ॥१॥ बहुरूपया - अनेक स्वरूपे धारण करणार्या - मायया - मायेच्या योगे - बहुरूपः इव - अनेक स्वरूपे धारण केलेला असा - आभाति - भासतो - अस्याः - ह्या मायेच्या - गुणेषु - तीन गुणांच्या ठिकाणी - रममाणः - रमणारा - अहं मम - मी माझे - इति - असे - मन्यते - मानतो. ॥२॥ यर्हि - जेव्हा - कालमाययोः - काल व माया या दोहोंच्या - परस्मिन् - पलीकडे असणार्या - स्वे - आत्मविषयक - महिम्नि - माहात्म्यात - रमेत - रममाण होतो. - तदा - तेव्हा - वाव - खरोखर - गतसंमोहः - मोहरहित - उभयं - अहंता व ममता ह्या दोहोला - त्यक्त्वा - टाकून - उदास्ते - उदासीनपणाने राहतो. ॥३॥ अव्यलीकव्रतादृतः - निष्कपट व्रताचरणाने आदराला प्राप्त झालेला - भगवान् - परमेश्वर - ब्रह्मणे - ब्रह्मदेवाला - ऋतं - खर्या - रूपं - स्वरूपाला - दर्शयन् - दाखविणारा असा होत्साता - यत् आह - जे बोलला ते - आत्मतत्त्वविशुद्धयर्थं - जीवाला तत्त्वज्ञान प्राप्त व्हावे एवढयाकरिता ॥४॥ आदिदेवः - मुख्य देव - जगतां - जगामध्ये - पर - श्रेष्ठ - गुरुः - उपदेशक - सः - तो ब्रह्मदेव - स्वधिषण्यो - स्वस्थानावर - आस्थाय - बसून - सिसृक्षया - उत्पत्ति करण्याच्या इच्छेने - ऐक्षत - पाहू लागला - यया - ज्यायोगे - प्रपञ्चनिर्माणविधीः - सृष्टी उत्पन्न करण्याची पद्धति - भवेत् - माहीत होईल - तां - त्या - अत्र - ह्या बाबतीत - संमतां - सर्वमान्य अशा - दृशं - ज्ञानाला - न अध्यगच्छत् - प्राप्त करू शकला नाही. ॥५॥ चिंतयन् - विचार करणारा - विभुः - सर्वव्यापी - सः - तो ब्रह्मदेव - एकदा - एके वेळी - अंभसि - उदकात - व्दिर्गदितं - दोनदा उच्चारिलेले - यत् - जे - स्पर्शेषु - स्पर्श नावाच्या अक्षरांपैकी - षोडशं - सोळावे म्हणजे ‘त’ हे अक्षर - च - आणि - एकविंश - एकविसावे ‘प’ अक्षर - व्दयक्षरं - दोन अक्षरांनी युक्त - वचः - शब्द - उपाशृणोत् - ऐकता झाला - नृप - हे परीक्षित राजा - यत् - जो शब्द - निष्किंचनानां - दरिद्री लोकांचे - धनं - द्रव्य - विदुः - समजतात. ॥६॥ तत् - त्या ‘तप’ ह्या शब्दाला - निशम्य - ऐकून - वक्तृदिदृक्षया - बोलणार्याला पाहण्याच्या इच्छेने - दिशः - दाही दिशांकडे - विलोक्य - पाहून - तत्र - तेथे - अन्यत् - दुसरे काहीही - अपश्यमानः - न पाहणारा - स्वधिष्ण्यं - स्वस्थानावर - आस्थाय - बसून - तत् - ते तपच - हितं - कल्याणकारक आहे - विमृश्य - असे विचारपूर्वक ठरवून - उपादिष्टः - गुरूने उपदेश केलेला - इव - जणू काय - तपसि - तपामध्ये - मनः - अंतःकरण - आदधे - ठेविता झाला. ॥७॥ अमोघदर्शनः - व्यर्थ न जाणारे आहे दर्शन ज्याला असा - तपतां - तपस्व्यांमध्ये - तपीयान् - मोठा तपस्वी - जितानिलात्मा - जिंकिली आहेत वायु आणि मन ज्याने असा - विजितोभयेन्द्रियः - जिंकिली आहेत दोन्ही प्रकारची इंद्रिये ज्याने असा - समाहितः - सावधानपणाने - दिव्यं - देवांची - सहस्राब्दं - हजार वर्षे - अखिललोकतापनं - सर्व लोकांना प्रकाशित करणारे - तपः - तप - अतप्यत स्म - अनुष्ठिता झाला. ॥८॥ सभाजितः - प्रसन्न केलेला - भगवान् - परमेश्वर - व्यपेतसंक्लेशविमोहसाध्वसं - नष्ट झाली आहेत क्लेश, मोह व भीती जेथून असा - स्वदृष्टवद्भिः - महापुण्यवान अशा - विबुधैः - देवांनी - अभिष्टुतं - स्तुति केलेला - स्वलोकं - आपला लोक - तस्मै - त्या ब्रह्मदेवाला - संदर्शयामास - दाखविता झाला - यत् - ज्याहून - परं - दुसरे - न - नाही. ॥९॥ यत्र - जेथे - रजः - रजोगुण - च - आणि - तमः - तमोगुण - तयोः - त्या दोघांचे - मिश्रं - मिश्रण ज्यात आहे असा - सत्त्वं - सत्त्वगुण - न प्रवर्तते - राहात नाही - च - आणि - कालविक्रमः - काळाचा पराक्रम - न - जेथे चालत नाही - यत्र - जेथे - माया - माया - न - नाही - उत - मग तर - अपरे - दुसरे - किं - कसे असणार - यत्र - जेथे - सुरासुरार्चिताः - देवदैत्यांनी पूजिलेले असे - हरेः अनुव्रताः - भगवंताच्या व्रताचा स्वीकार करणारे भक्त राहातात. ॥१०॥ श्यामावदाताः - नीलवर्णाचे व तेजस्वी - शतपत्रलोचनाः - कमलाप्रमाणे सुंदर नेत्र आहेत ज्यांचे असे - पिशङ्गवस्त्राः - पिंगट वस्त्रे आहेत ज्यांची असे - सुरुचः - कांतिमान - सुपेशसः - सुकुमार - सर्वे - सगळे - चतुर्बाहवः - चार आहेत हात ज्यांना असे - उन्मिषन्मणिप्रवेकनिष्काभरणाः - चकाकणार्या उत्तम मण्यांनी खचित असे सुवर्णाचे अलंकार धारण करणारे - सुवर्चसः - अत्यंत तेजस्वी - प्रवालवैदूर्यमृणालवर्चसः - पोवळी, वैदूर्य, कमलतंतु ह्यांच्याप्रमाणे तेज आहे ज्यांचे असे - परिस्फुरत्कुंडलमौलिमालिनः - चकाकणारी कुंडले, मुकुट आणि माळा धारण करणारे. ॥११॥ यथा - जसे - सविदयुदभ्रावलिभिः - विजेने युक्त अशा मेघपंक्तींनी - नभः - आकाश - यः - जो - महात्मनां - महात्म्यांच्या - भ्राजिष्णुभिः - दैदिप्यमान अशा - लसव्दिमानावलिभिः - शोभणार्या विमानपंक्तींनी - परितः - सभोवार - प्रमदोत्तमादयुभिः - तरुण स्त्रियांच्या कांतीने - विदयोतमानः - प्रकाशमान असा - विराजते - शोभतो. ॥१२॥ यत्र - जेथे - या - जी - प्रेङ्खंश्रिता - झोपाळ्यावर बसलेली - कुसुमाकरानुगैः - वसंत ऋतुला अनुसरणार्या भ्रमरांनी - विगीयमाना - गायिलेली - प्रियकर्म - पतीचे चरित्र - गायती - गाणारी - रुपिणि - मूर्तिमंत - श्रीः - लक्ष्मी - बहुधा - अनेकप्रकारे - विभूतिभिः - ऐश्वर्यांनी - उरुगायपादयोः - परमेश्वराच्या चरणकमलांचा - मानं - सत्कार - करोति - करिते. ॥१३॥ तत्र - तेथे - अखिलसात्वतां पतिं - संपूर्ण भक्तांचा रक्षक अशा - श्रियःपतिं - लक्ष्मीचा पति अशा - यज्ञपतिं - यज्ञाची मुख्य देवता अशा - सुनन्दनन्दप्रबलार्हणादिभिः - सुनंद, नंद, प्रबल व अर्हण इत्यादी - स्वपार्षदमुख्यैः - आपल्या मुख्य सेवकांनी - परिसेवितं - सेविलेल्या - विभुं - परमेश्वराला - ददर्श - पाहता झाला.॥१४॥ भृत्यप्रसादाभिमुखं - भक्तांवर प्रसाद करण्याला उत्सुक - दृगासवं - ज्याची दृष्टी मदयाप्रमाणे मोह उत्पन्न करणारी आहे अशा - प्रसन्नहासारुणलोचनाननम् - शांत व सुंदर हास्य आणि आरक्त नेत्र यांनी युक्त आहे मुख ज्याचे असा - किरीटिनं - मुकुट धारण करणारा - कुंडलिनं - कानात कुंडले असलेला - चतुर्भुजं - चार हात असणारा - पीतांबर - पिवळे वस्त्र परिधान केलेला - वक्षसि - वक्षःस्थलाच्या ठिकाणी - श्रिया - श्रीवत्सलांछनाच्या शोभेने - लक्षितं - चिन्हित असा ॥१५॥ परं - उंच अशा - अध्यर्हणीयासनं - सर्वोत्कृष्ट सिंहासनावर - आस्थितं - बसलेल्या - चतुःषोडशपञ्चशक्तिभिः - चार, सोळा व पाच अशा म्हणजे पंचवीस तत्त्वरूपी शक्तींनी - वृतं - वेष्टिलेला - च - आणि - इतरत्र - इतर ठिकाणी - अध्रुवैः - क्षणिक - स्वैः - आपल्या - भगैः - ऐश्वर्यांनी - युक्तं - युक्त - स्वे - स्वतःच्या - धामन् - तेजामध्ये - रममाणं - रमून जाणार्या - ईश्वरं - परमेश्वराला ॥१६॥ यत् - जे स्थान - पारमहंस्येन - परमहंसानी स्वीकारलेल्या - पथा - मार्गाने - अधिगम्यते - मिळविता येते - तद्दर्शनाल्हादपरिप्लुतान्तरः - त्याच्या दर्शनाच्या आनंदाने तल्लीन झाले आहे चित्त ज्याचे असा - हृष्यत्तनुः - रोमांचित आहे शरीर ज्याचे असा - प्रेमभराश्रुलोचनः - प्रेमातिरेकाने अश्रुयुक्त झाले आहेत नेत्र ज्याचे असा - विश्वसृक् - ब्रह्मदेव - अस्य - ह्याच्या - पादाम्बुजं - चरणकमलाला - ननाम - नमस्कार करिता झाला. ॥१७॥ प्रियः - सर्वांना प्रिय असा - प्रीतमनाः - प्रसन्न आहे मन ज्याचे असा भगवान - प्रियं - आवडत्या - प्रीयमाणं - प्रीति संपादन करणार्या - समुपस्थितं - व जवळ आलेल्या - प्रजाविसर्गे - प्रजा उत्पन्न करण्याच्या कार्यात - निजशासनार्हणम् - आपल्या उपदेशाला सत्पात्र अशा - तं - त्या ब्रह्मदेवाला - करे स्पृशन् - हस्तस्पर्श करणारा - तदा - तेव्हा - ईषत्स्मितशोचिषा - मंदहास्याने शोभणार्या - गिरा - वाणीने - बभाषे - बोलला. ॥१८॥ वेदगर्भ - वेद आहेत उदरात ज्याच्या अशा हे ब्रह्मदेवा - कूटयोगिनां - सकाम भक्तावर - दुस्तोषः - संतुष्ट होण्यास कठीण असा - अहं - मी - त्वया - तुझ्याकडून - सिसृक्षया - सृष्टि उत्पन्न करण्याच्या इच्छेने - चिरं - पुष्कळ काळपर्यंत - भृतेन - अनुष्ठिलेल्या - तपसा - तपाने - सम्यक् - चांगल्या प्रकारे - तोषितः - संतुष्ट केला गेलो आहे. ॥१९॥ ब्रह्मन् - हे ब्रह्मदेवा - वरेशं - वर देण्यास समर्थ अशा - मा - माझ्याजवळून - अभिवाञ्छितं - इष्ट अशा - वरं - वराला - वरय - मागून घे - ते - तुझे - भद्रं - कल्याण असो - पुंसः - मनुष्याचा - श्रेयःपरिश्रामः - कल्याणासाठी करावयाचा परिश्रम - मद्दर्शनावधिः - माझे दर्शन हीच आहे मर्यादा ज्याची असा ॥२०॥ लोकावलोकनं - माझ्या लोकाचे दर्शन - अयं - हा - मम - माझ्या - मनीषितानुभावः - इच्छेचा प्रभावच - रहसि - एकांतात - यत् - जे - उपश्रुत्य - ऐकून - परमं - श्रेष्ठ अशा - तपः - तपाला - चकर्थ - केलेस. ॥२१॥ अनघ - हे निष्पाप ब्रह्मदेवा - त्वयि-कर्मविमोहिते - तुला स्वकर्माविषयी मोह पडला असता - तत्र - त्याबद्दल - मया - माझ्याकडून - प्रत्यादिष्टं - उपदेशिलेले - तपः - तप - साक्षात् - प्रत्यक्ष - मे - माझे - हृदयं - हृदयच - अहं - मी - तपसः - तपाचा - आत्मा - आत्मा ॥२२॥ तपसा एव - तपानेच - इदं - ह्या - विश्वं - जगाला - सृजामि - उत्पन्न करितो - पुनः - फिरून - तपसा - तपाने - ग्रसामि - संहार करितो - तपसा - तपाने - बिभर्मि - पोषितो - तपः - तप - मे - माझे - दुश्चरं - अविनाशी - वीर्यं - सामर्थ्य होय. ॥२३॥ भगवन् - हे परमेश्वरा - सर्वभूतानां - सर्व प्राणिमात्रांमध्ये - अध्यक्षः - प्रमुखपणे राहणारा - गुहां - हृदयाकशाला - अवस्थितः - व्यापून राहिलेला तू - अप्रतिरुद्धेन - अकुंठित अशा - प्रज्ञानेन - विशिष्ट ज्ञानाने - चिकीर्षितं - इच्छिलेल्या कार्याला - हि - खरोखर - वेद - जाणत आहेस. - नाथ - हे संरक्षक परमेश्वरा - तथापि - तरी सुद्धा - नाथमानस्य - याचना करणार्या अशा माझ्या - नाथितं - इच्छित मनोरथाला - नाथय - पूर्ण कर - यथा - जेणेकरून - अरूपिणः - निराकार अशा - ते - तुझी - परावरे - पर व अपर अशी - रूपे - दोन रूपे - तु - तर - जानीयाम् - मी जाणू शकेन. ॥२४-२५॥ माधव - हे लक्ष्मीपते - यथा - ज्याप्रमाणे - उर्णनाभिः - कोळी - ऊर्णुते - सुताच्या जाळ्याने स्वतःला आच्छादितो - यथा - ज्याप्रमाणे - आत्म मायायोगेन - स्वतःच्या प्रकृतीच्या साहाय्याने - नानाशक्त्युपबृंहितं - अनेक शक्तीने वाढलेल्या विश्वाला - विसृजन् - उत्पन्न करणारा - गृह्णन् - रक्षण करणारा - विलुम्पन् - संहार करणारा - आत्मना - आत्म्याच्या योगे - आत्मानं - आत्म्याला - बिभ्रत् - धारण करणारा - अमोघसंकल्पः - व्यर्थ न होणारा आहे संकल्प ज्याचा असा - क्रीडसि - खेळतोस - तथा - त्याप्रमाणेच - तव्दिषयां - त्या गोष्टी आहेत विषय जिचा अशी - मनीषां - बुद्धि - मयि - माझ्या ठिकाणी - धेही - ठेव. ॥२६-२७॥ अहं - मी - अतन्द्रितः - आळसाला टाकून देणारा असा - हि - खरोखर - भगवच्छिक्षितं - आपल्या शिकवणीचे - करवाणि - आचरण करीन - यदनुग्रहात् - ज्याच्या कृपेने - प्रजासर्गं - सृष्टीच्या उत्पत्तीला - ईहमानः - इच्छिणारा - न बध्येयम् - बद्ध होणार नाही.॥२८॥ भो ईश - हे परमेश्वरा - सखा - मित्र - सख्युः - मित्राचा - इव - त्याप्रमाणे - ते - तुझा - कृतः - मी केला गेलो - प्रजाविसर्गे - प्रजोत्पादनरूपी - ते - तुझ्या - परिकर्मणि - सेवाकर्मांत - स्थितः - राहिलेला - अविक्लवः - न डगमगणारा - यावत् - जोपर्यंत - जनम् - लोकाला - विभजामि - निरनिराळ्या प्रकारे विभक्त करीन - अजमानिनः - स्वतःला जन्मरहित समजणार्या - मे - माझा - समुन्नद्धमदः - वाढलेला गर्व - मा भूत् - न होवो. ॥२९॥ मे - माझे - यत् - जे - परमगुह्यं - अत्यंत गुप्त - विज्ञानसमन्वितं - अनुभविक ज्ञानाने युक्त - सरहस्यं - भक्तियोगासह - ज्ञानं - ज्ञान - च - आणि - तदङंग - त्याचे अंग - मया - माझ्याकडून - गदितं - सांगितलेले - गृहाण - घे - अहं - मी - यावान् - जितका - यथाभावः - जशी सत्ता असणारा - यद्रूपगुणकर्मकः - जशा स्वरूपाचा गुणांचा व कर्मे करणारा - तथैव - तशा प्रकारचेच - तत्त्वविज्ञानं - यथार्थ ज्ञान - ते - तुला - मदनुग्रहात् - माझ्या कृपेने - अस्तु - असो. ॥३०-३१॥ अग्रे - प्रथम - एव - सुद्धा - अहम् एव - मीच - आसम् - होतो - यत् - जे - सदसत्परं - अव्यक्त व व्यक्त यांच्या पलीकडचे - अन्यत् - मव्दयतिरिक्त - न - नाही - पश्चात् - मागाहून - च - आणि - यत् - जे - एतत् - हे - अहं - मीच - यः - जो - अवशिष्येत - शेष राहील - सः - तो - अहं - मी - अस्मि - आहे.॥३२॥ यत् - जे - अर्थम् ऋते - वस्तुस्थितीशिवायच - आत्मनि - आत्म्यावर - यथा भासः - जसा भ्रम तसे - प्रतीयेत - अनुभवास येते - यथा च तमः - आणि जसा राहू तसे - न प्रतीयेत - अनुभवास येत नाही - तत् - ते - आत्मनः - आत्म्याची - मायां विदयात् - माया असे जाणावे. ॥३३॥ यथा - जशी - महान्ति भूतानि - महाभूते - उच्चावचेषु भूतेषु - लहान मोठया प्राण्यांमध्ये - अनुप्रविष्टानि - शिरलेली - अप्रविष्टानि - न शिरल्याप्रमाणेच होत - तथा - त्याप्रमाणे - अहं - मी - तेषु - त्यांमध्ये - न - नाही. ॥३४॥ यत् - जे - अन्वयव्यतिरेकाभ्यां - अनुयोगी व प्रतियोगीसंबंधाने - सर्वत्र - सर्व ठिकाणी - सर्वदा - नेहमी - स्यात् - होईल. - एतावत् एव - एवढेच - आत्मनः - आत्मसंबंधी - तत्त्वजिज्ञासुना - तत्त्वज्ञानाची इच्छा करणार्याने - जिज्ञास्यं - जाणण्याजोगे आहे. ॥३५॥ परमेण - श्रेष्ठ अशा - समाधिना - समाधियोगाने - एतत् - ह्या - मतं - मताला - समातिष्ठ - लक्षात घेऊन वा - कल्पविकल्पेषु - महाप्रलय व दैनंदिनप्रलय ह्या दोन्ही प्रलयात - कर्हिचित् - कधीही - भवान् - आपण - न विमुह्यति - मोहयुक्त होत नाही. ॥३६॥ अजनः - जन्मरहित - हरिः - परमेश्वर - जनानां - लोकांचा - परमेष्ठिनं - उत्पादक अशा ब्रह्मदेवाला - एवं - ह्याप्रमाणे - संप्रदिश्य - सांगून - तस्य पश्यतः - त्याच्या समक्ष - आत्मनः - स्वतःच्या - तत् - त्या - रूपं - स्वरूपाला - न्यरुणत् - अदृश्य करिता झाला. ॥३७॥ अन्तर्हितेन्द्रियार्थाय - अदृश्य केले आहे इंद्रियगम्य स्वरूप ज्याने अशा - हरये - परमेश्वराला - विहिताञ्जलिः - जोडले आहेत हात ज्याने असा - सर्व भूतमयः - सर्व भूते ज्यात वास्तव्य करितात असा - सः - तो ब्रह्मदेव - इदं - ह्या - विश्वं - जगाला - पूर्ववत् - पूर्वीप्रमाणे - ससर्ज - उत्पन्न करिता झाला. ॥३८॥ प्रजापतिः - सृष्टिकर्ता किंवा प्रजारक्षक - धर्मपतिः - आणि धर्मसंरक्षक ब्रह्मदेव - प्रजानां - लोकांच्या - भद्रं - कल्याणाला - अन्विच्छन् - इच्छिणारा - स्वार्थकाम्यया - स्वकार्य करण्याच्या इच्छेने - एकदा - एके वेळी - नियमान् - नियमांना - च - आणि - यमान् - यमांना - आतिष्ठत् - अनुष्ठिता झाला. ॥३९॥ राजन् - हे परीक्षित राजा - रिक्थादानां - पुत्रांमध्ये - प्रियतमः - फारच आवडता असा - अनुव्रतः - व्रतानुष्ठानात दक्ष - शुश्रूषमाणः - सेवा करण्यास इच्छिणारा किंवा भगवद्गुणानुवाद ऐकण्याची इच्छा करणारा - महामुनिः - मोठा मननशील - महाभागवतः - मोठा भगवद्भक्त - नारदः - नारदमुनि - मायेशस्य - प्रकृतीचा चालक अशा - विष्णोः - विष्णूच्या - मायां - मायेला - विविदिषन् - जाणण्याची इच्छा करणारा - तं - त्या - पितरं - पिता जो ब्रह्मदेव त्याला - प्रश्रयेण - नम्रपणाने - शीलेन - सुस्वभावाने - च - आणि - दमेन - इंद्रियनिग्रहाने - पर्यतोषयत् - संतुष्ट करिता झाला. ॥४०-४१॥ देवर्षिः - नारदमुनि - लोकानां प्रपितामहं - सर्व लोकांच्या पणजोबाला - पितरं - आपल्या पित्याला - तुष्टं - संतुष्ट - निशाम्य - पाहून - भवान् - आपण - मा - मला - यत् - जे - अनुपृच्छति - विचारिता - परिपप्रच्छ - तेच विचारिता झाला. ॥४२॥ प्रीतः - प्रसन्न झालेला - भूतकृत् - सृष्टिकर्ता ब्रह्मदेव - तस्मै पुत्राय - त्या पुत्राला - इदं - हे - भगवता - भगवंताने - प्रोक्तं - सांगितलेले - दशलक्षणं - दहा लक्षणांनी युक्त असे - भागवतं - भागवतनामक - पुराणं - पुराण - प्राह - सांगता झाला. ॥४३॥ नृप - हे परीक्षित राजा ! - नारदः - नारदमुनि - सरस्वत्याःतटे - सरस्वती नदीच्या काठी - परमं - श्रेष्ठ - ब्रह्म - ब्रह्माला - ध्यायते - चिंतणार्या - अमिततेजसे - अत्यंत तेजस्वी - व्यासाय मुनये - व्यास ऋषी - प्राह - सांगता झाला. ॥४४॥ उत - आणि - वैराजात् - विराट्संज्ञक - पुरुषात् - पुरुषापासून - इदं - हे - यथा - जसे - आसीत् - उत्पन्न झाले - यत् - ज्याप्रकारे - त्वया - तुझ्याकडून - अहं - मी - पृष्टः - विचारला गेलो - तत् - त्याप्रकारे - च - आणखीही - अन्यान् - दुसर्या - प्रश्नान् - प्रश्नांना - कृत्स्रशः - संपूर्ण रीतीने - उपाख्यास्ये - सांगतो. ॥४५॥ स्कंध दुसरा - अध्याय नववा समाप्त |