श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय ८ वा - अन्वयार्थ

राजा परीक्षिताचे विविध प्रश्न -

ब्रह्मन् - शुकाचार्य - अगुणस्य - निर्गुण परमेश्वराच्या - गुणाख्याने - गुणकथनाविषयी - ब्रह्मणा - ब्रह्मदेवाने - चोदितः - प्रेरणा केलेला - देवदर्शनः - देवाप्रमाणे ज्याचे दर्शन आहे असा - नारदः - नारद - यस्मै यस्मै - ज्याला ज्याला - यथा - जसे - प्राह - बोलला. - वेदविदां वर - हे वेदवेत्त्यांत श्रेष्ठ - एतत् - ह्या - तत्त्वं - तत्त्वाला - वेदितुं - जाणण्यास - इच्छामि - इच्छितो - अद्‌भुतवीर्यस्य - आश्चर्यकारक पराक्रम करणार्‍या - हरेः - परमेश्वराच्या - कथाः - कथा - लोकसुमङ्गलाः - लोकांचे मोठे कल्याण करणार्‍या आहेत. ॥१-२॥

महाभाग - मोठे भाग्य आहे ज्याचे अशा मुने - अहं - मी - यथा - ज्या योगे - अखिलात्मनि कृष्णे - सर्वांच्या अंतर्यामी वास करणार्‍या श्रीकृष्णाच्या ठिकाणी - निःसङ्गं - आसक्तिरहित - मनः - अंतःकरणाला - निवेश्य - ठेवून - कलेवरं - शरीराला - त्यक्ष्ये - टाकीन - कथयस्व - असे सांगा. ॥३॥

भगवान् - परमेश्वर - स्वचेष्टितं - आपल्या लीलांना - श्रद्धया - श्रद्धेने - नित्यं - नेहमी - शृण्वतः - ऐकणार्‍या - च - आणि - गृणतः - वर्णन करणार्‍या भक्ताच्या - हृदि - हृदयात - नातिदीर्घेण - फार दूर नव्हे अशा - कालेन - कालाने - विशते - शिरतो. ॥४॥

कृष्णः - श्रीकृष्ण - कर्णरन्ध्रेण - कानाच्या छिद्राने - स्वानां - आपल्या भक्तांच्या - भावसरोरुहं - हृदयकमळात - प्रविष्टः - शिरलेला - यथा - ज्याप्रमाणे - शरत् - शरदृतु - सलिलस्य - उदकाच्या - शमलं - गढूळपणाला - धुनोति - नष्ट करितो. ॥५॥

यथा - ज्याप्रमाणे - पान्थः - प्रवास करून परत घरी आलेला - स्वशरणं - आपल्या घराला - धौतात्मा - पवित्र अंतःकरणाचा - मुक्तसर्वपरिक्लेशः - ज्याचे सर्व क्लेश नष्ट झाले आहेत असा - पुरुषः - मनुष्य - कृष्णपादमूलं - श्रीकृष्णाच्या चरणकमलाला - न मुञ्चति - सोडीत नाही. ॥६॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्या ! - अधातुमतः - पञ्चमहाभूतांशी संबंध नसणार्‍या - अस्य - ह्या जीवाचा - धातुभिः - महाभूतांच्या योगे - देहारंभः - शरीराची उत्पत्ति - यत् - हे जे विरुद्ध कार्य - यदृच्छया - सहजगत्या - वा - किंवा - हेतुना - कारणाने - भवन्तः - आपण - यथा - जसेच्या तसे - जानते - जाणत आहा. ॥७॥

यदुदरात् - ज्याच्या उदरापासून - लोकसंस्थानलक्षणं - लोकव्यवस्था हेच ज्याचे लक्षण आहे असे - पद्मं - कमळ - आसीत् - उत्पन्न झाले - असौ - हा - इयत्तावयवैः - मर्यादित अवयवांनी - पृथक् - निरनिराळा आहे - अयं - हा - पुरुषः - पुरुष - यावान् - जितक्या परिमाणाचा - तावान् - तितक्याच परिमाणाचा - संस्थावयववान् इव - जगद्रचनेच्या अवयवांनी युक्त अशाप्रमाणे - वै - खरोखर - इति - असा - प्रोक्तः - शास्त्रांत सांगितला आहे. ॥८॥

नाभिपद्मसमुद्‌भवः - नाभिकमळापासून उत्पन्न झालेला - भूतात्मा - भूतांना उत्पन्न करणारा - अजः - ब्रह्मदेव - यदनुग्रहात् - ज्याच्या अनुग्रहाने - भूतानि - प्राण्यांना - सृजति - उत्पन्न करितो - येन - ज्यायोगे - तद्रूपं - त्याच्या स्वरूपाला - ददृशे - पाहता झाला - विश्वस्थित्युद्‌भवाप्ययः - जगाचे रक्षण, उत्पत्ति व नाश करणारा - च - आणि - सर्वगुहाशयः - सर्वांच्या हृदयात वास करणारा - मायेशः - प्रकृतीचा स्वामी - सः - तो - पुरुषः - परमेश्वर - अपि - सुद्धा - आत्ममायां - स्वतःच्या मायेला - मुक्त्वा - सोडून - यत्र - जेथे - शेते - शयन करितो. ॥९-१०॥

सपालाः - लोकपालांसह - लोकाः - लोक - पुरुषावयवैः - परमेश्वराच्या अवयवांनी - पूर्वकल्पिताः - पूर्वीच कल्पिले आहेत - अमुष्य - ह्याचे - अवयवाः - अवयव - सपालैः - लोकपालांसह अशा - लोकेः - लोकांनी - कल्पितः - कल्पिले आहेत. - इति - असे - शुश्रुम - आम्ही ऐकिले आहे. ॥११॥

यावान् - जितक्या प्रमाणाचा - कल्पः - महाकल्प - वा अथवा - यथाकालः - जेवढया कालावधीचा - विकल्पः - दैनंदिन साधारण कल्प - च - आणि - भूतभव्यभवच्छब्दः - भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानकाळ अशी शब्दयोजना - यत् - जसे - सतः - व्यक्तसृष्टीचे - आयुर्मानं - आयुष्यप्रमाण - अनुमीयते - ठरविले जाते. ॥१२॥

व्दिजसत्तम - हे ब्रह्मश्रेष्ठा - या - जी - तू - तर - कालस्य - कालाची - अनुगतिः - प्रवृत्ति - अण्वी - सूक्ष्म - वा - किंवा - बृहती - स्थूल - अपि - सुद्धा - लक्ष्यते - दिसते - कर्मगतयाः - कर्माच्या गती - यावत्यः - जितक्या प्रकारच्या - यादृशीः - जशा ते सांगा - चैव - तसेच आणखी - गुणानां - गुणांच्या - परिणामं - कार्यरूपी फळाला - अभीप्सताम् - इच्छिणार्‍या - गुणिनां - गुणवान जीवांमध्ये - यस्मिन् - जेथे - कर्मसमावायः - कर्माचा संग्रह - यथा - ज्याप्रमाणे - येन - ज्या रीतीने - उपगृह्यते - संग्रहित केला जातो. - भूपातालककुब्व्योमग्रहनक्षत्रभूभृतां - पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्रे, पर्वत यांची - च - आणि - सरित्समुद्रव्दीपानां - नदया, समुद्र व व्दीपे यांची - एतदोकसां - या सर्व ठिकाणी राहणार्‍यांची - संभवः - उत्पत्ति ॥१३-१५॥

बाह्याभ्यन्तरभेदतः - बाहेरील व आतील अशा भेदांनी - अण्डकोशस्य - ब्रह्माण्डाच्या कोशाचा - प्रमाणं - विस्तार - च - आणि - महतां - पुरुषांचे - अनुचरितं - आचरण - वर्णाश्रमविनिश्चयः - वर्ण व आश्रम यांचा निश्चय - हरेः - परमेश्वराचे - यत् - जे - आश्चर्यतमं - फारच आश्चर्यकारक - अवतारानुचरितं - अवतारांतील चरित्र - च - आणि - युगानि - युगे - युगमानं - युगांचे प्रमाण - च - आणि - युगेयुगे - प्रत्येक युगातील - यः - जो - धर्मः - धर्म - नृणां - मनुष्यांचा - साधारणः - सर्वसामान्य - सविशेषः - विशिष्टगोष्टींसह - धर्मः - धर्म - यादृशः - जसा - च - आणि - श्रेणीनां - निरनिराळ्या उदयोगाने निर्वाह करणार्‍यांचा - च - आणि - राजर्षीणां - सच्छील राजांचा - कृच्छ्रेषु - संकटांमध्ये - जीवतां - उपजीविका करणार्‍यांचे - धर्माः - धर्म. ॥१६-१८॥

तत्त्वानां - महत्तत्त्वादि तत्त्वांचे - परिसंख्यानं - मोजमाप - लक्षणं - त्यांचे लक्षण - हेतुलक्षणम् - उत्पत्तीच्या हेतूंची लक्षणे - पुरुषाराधनविधिः - परमेश्वराच्या उपासनेचा शास्त्राने सांगितलेला मार्ग - च - आणि - योगस्य - योगाचा प्रकार - आध्यात्मिकस्य - आत्मविषयक ज्ञानमार्गाचा विधी - योगेश्वरैश्वर्यगतिः - श्रेष्ठ श्रेष्ठ योग्यांची ईश्वरविषयक गति - योगिनां - योग्यांच्या - लिङगभङगः - लिङगदेहाचा नाश - तु - आणखीही - वेदोपवेदधर्माणां - वेद, उपवेद व धर्म ह्यांचे स्वरूप - इतिहसापुराणयोः - इतिहास व पुराण यांचे स्वरूप - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांची - संप्लवः - उत्पत्ति - विक्रमः - उत्कर्ष, स्थिती - च - आणि - प्रतिसंक्रमः - नाश - इष्टापूर्तस्य - अग्निहोत्रादि आणि धर्मशाळा स्थापनादि धर्मकृत्यांचा - काम्यानां - सकाम कर्मांचा - त्रिवर्गस्य - धर्म, अर्थ व काम ह्या तीन पुरुषार्थांचा - यः - जो - विधिः - विधी ॥१९-२१॥

च - आणि - यः - जी - अनुशायिनां - मागून लीन होणार्‍या प्राण्यांची - सर्गः - उत्पत्ति - च - आणि - पाखण्डस्य - नास्तिकांची - सम्भवः - उत्पत्ति - आत्मनः - आत्म्याचा - बन्धमोक्षौ - बंध व मोक्ष - च - आणि - स्वरूपतः - आत्मरूपाने - व्यवस्थानं - राहणे - विभुः - सर्वव्यापी - आत्मतंत्रः - स्वतंत्र - भगवान् - परमेश्वर - आत्ममायया - स्वतःच्या मायेच्या योगाने - यथा - जसा - विक्रीडति - खेळतो - वा - किंवा - मायां - मायेला - विसृज्य - सोडून देऊन - साक्षिवत् - तटस्थ या नात्याने - यथा जसा - उदास्ते - उदासीनपणाने राहतो. ॥२२-२३॥

भगवन् - सर्वगुणसंपन्न - महामुने - हे महर्षे - प्रपन्नाय - शरण आलेल्या - पृच्छ्ते - प्रश्न करणार्‍या - मे - मला - अनुपूर्वशः - अनुक्रमाने - तत्त्वतः - यथार्थ रीतीने - सर्वं - संपूर्ण - एतत् - हे - च - आणखीही - उदाहर्तुं - सांगण्यास - अर्हसि - योग्य आहेस. - हि - कारण - यथा - जसा - आत्मभूः - स्वयंभू - परमेष्ठी - ब्रह्मदेव - अत्र - ह्या विषयांत - भवान् - आपण - प्रमाणं - प्रमाणरूप आहां - च - आणि - इह - येथे - परे - इतर लोक - पूर्वेषां - वाडवडिलांच्या - पूर्वजैः - वाडवडिलांनी - कृतं - केलेले - अनुतिष्ठन्ति - आचरण करितात. ॥२४-२५॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्या - अच्युतपीयूषं - भगवत्कथामृताला - पिबतः - पिणार्‍या - मे - माझे - अमी - हे - असवः - प्राण - अनशनात् - उपवासामुळे - कुपितात् - रागावलेल्या - व्दिजात् - ब्राह्मणाहून - अन्यत्र - दुसर्‍या ठिकाणी - न परायन्ति - पीडित होत नाहीत. ॥२६॥

विष्णुरातेन राज्ञा - परीक्षित राजाने - संसदि - सभेत - इति - याप्रमाणे - सत्पतेः - साधूंचा कैवारी जो परमेश्वर त्याच्या - कथायां - चरित्र सांगण्यासाठी - उपामन्त्रितः - आमंत्रण दिलेला - सः - तो - ब्रह्मरातः - शुकाचार्य - भृशं - फारच - प्रीतः - आनंदित झाला. - ब्रह्मकल्पे उपागते - ब्रह्म नावाचा कल्प प्राप्त झाला असता - ब्रह्मणे - ब्रह्मदेवाला - भगवत्प्रोक्तं - भगवंताने सांगितलेले - ब्रह्मसंमितं - वेदतुल्य - भागवतं नाम - भागवत नावाचे - पुराणं - पुराण - प्राह - सांगता झाला. ॥२७-२८॥

पाण्डूनां - पाण्डूंमध्ये - ऋषभः - श्रेष्ठ अशा - परीक्षित् - परीक्षित राजाने - यत् यत् - जे जे - अनुपृच्छति - अनुक्रमाने विचारिले - तत् - ते - सर्वं - सगळे - आनुपूर्व्येण - क्रमाक्रमाने - आख्यातुं - सांगण्यास - उपचक्रमे - प्रारंभ करिता झाला. ॥२९॥

स्कंध दुसरा - अध्याय आठवा समाप्त

GO TOP