|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ७ वा - अन्वयार्थ
भगवंतांच्या लीलावतारांच्या कथा - अनंतः - भगवान - सकलयज्ञमयीं - सगळ्या यज्ञांनी युक्त असे - क्रौडीं तनुं बिभ्रत् - वराहाचे शरीर धारण करणारा - यत्र - ज्या काळी - क्षितितलोद्धरणाय उदयतः - पृथ्वीतलाला वर काढावयास सिद्ध झाला - अंतर्महार्णवे - महासागराच्या आत - उपागतं तम् आदिदैत्यं - गेलेला आदिदैत्य जो हिरण्याक्ष त्याला - वज्रधरः अद्रिं इव - इंद्राने पर्वताला फोडिले त्याप्रमाणे - दंष्ट्रया ददार - दाढेने फाडून टाकिता झाला. ॥१॥ अथ - नंतर - रुचेः - रुचि नावाच्या ऋषीपासून - जातः - उत्पन्न झालेला - आकूतिसूनुः - आकूतीचा पुत्र - सुयज्ञः - सुयज्ञ - दक्षिणायां - दक्षिणा नावाच्या पत्नीचे ठिकाणी - सुयमान् - सुयम नावाच्या - अमरान् - देवांना - अजनयत् - उत्पन्न करता झाला - यत् - ज्याअर्थी - लोकत्रयस्य - त्रैलोक्याच्या - महतीं - मोठया - आर्तिं - पीडेला - अहरत् - दूर करता झाला - स्वायंभुवेन - स्वायंभुव नावाच्या - मनुना - मनूने - हरिः - हरि - इति - याप्रमाणे - अनूक्तः - संबोधिला गेला. ॥२॥ व्दिज - हे नारदा - कर्दमगृहे - कर्दम ऋषीच्या घरी - देवहूत्यां - देवहूतीचे ठिकाणी - नवभिः - नऊ - स्त्रीभिः समं - स्त्रीरूप भावंडांसह - जज्ञे - उत्पन्न झाला. - च - आणि - स्वमात्रे - आपल्या आईस - आत्मगतिं - आत्मज्ञानाच्या मार्गाला - ऊचे - सांगता झाला. - यया - ज्या ज्ञानमार्गाने - आत्मशमलं - आत्म्यावरील अज्ञानरूपी आवरणाला - गुणसङ्गपङ्क - व त्रिगुणोत्पन्न विषयांवर आसक्ति ठेवल्यामुळे उत्पन्न झालेल्या दोषाला - अस्मिन् - ह्या जगातच - विधूय - साफ धुवून काढून - कपिलस्य - कपिल महामुनीच्या - गतिं - ज्ञानमार्गाला म्हणजे मोक्षाला - प्रपेदे - प्राप्त झाली. ॥३॥ यत् - ज्याअर्थी - तुष्टः - संतुष्ट झालेला - भगवान् - परमेश्वर - अपत्यं - पुत्राला - अभिकाङ्क्षतः - इच्छिणार्या - अत्रेः - अत्रि ऋषीला - मया - माझ्याकडून - अहं - मी स्वतः - दत्तः - दिला गेलो आहे - इति - असे - आह - बोलला - सः - तो - दत्तः - दत्त या नावाने प्रसिद्ध आहे. - यत्पादपङकजपरागपवित्रदेहाः - ज्याच्या पादकमलांच्या धुळीने ज्यांचे देह पवित्र झाले आहेत असे - यदुहैहयादयाः - यदु, हैहय वगैरे राजे - उभयीं - दोन्ही प्रकारच्या - योगर्धिं - ऐश्र्वर्याच्या समृद्धीला - आपुः - मिळविते झाले. ॥४॥ आदौ - प्रथम - विविधलोकसिसृक्षया - अनेक लोक उत्पन्न करण्याच्या इच्छेने - मे - माझ्याकडून - तपः - तपश्चर्या - तप्तं - अनुष्ठिली गेली - सनात् स्वतपसः - स्वतःच्या घोर तपश्चर्येपासून - सचतुःसनः - चार सनशब्दासह - अभूत् - अवतीर्ण झाला - इह - येथे - सम्यक् - चांगल्या तर्हेने - प्राक्कल्पसंप्लवविनष्टम् - पूर्वीच्या कल्पातील प्रलयात नष्ट झालेल्या - आत्मतत्त्वं - आत्मज्ञानाला - जगाद - सांगता झाला. - यत् - ज्या ज्ञानाला - मुनयः - ऋषि - आत्मन् - आत्म्याच्याच ठिकाणी - अचक्षत - अनुभविते झाले. ॥५॥ धर्मस्य - धर्माच्या - दक्षदुहितरि - दक्षकन्या अशा - मूर्त्यां - मूर्तिनामक भार्येचे ठिकाणी - नारायणः - नारायण - च - आणि - नरः - नर - स्वतपःप्रभावः - तपश्चर्या हाच प्रभाव आहे ज्याचा असा - इति - अशा तर्हेचा - अजनिष्ट - उत्पन्न झाला. - अनंगपृतनाः - मदनाचे सैन्य अशा - देव्यः - अप्सरा - तु - तर - भगवतः - नारायणाच्या सन्निध - आत्मनः - स्वतःची प्रतिबिंबे - दृष्ट्वा - पाहून - नियमावलोपं - तपोभंगाला - घटितुं - करण्याला - न शेकुः - समर्थ झाल्या नाहीत. ॥६॥ ननु - खरोखर - कृतिनः - पुण्यवान पुरुष - रोषदृष्टया - क्रोधदृष्टीने - कामं - मदनाला - दहन्ति - जाळतात - उत - परंतु - ते - तेच पुण्यवान पुरुष - दहन्तं - स्वतःला जाळणार्या - असह्यं - दुःसह अशा - रोषं - क्रोधाला - न दहन्ति - जाळीत नाहीत - सः - तो - अयं - हा - यदन्तरं - ज्याच्या अंतःकरणात - प्रविशन् - प्रविष्ट होणारा - अलं - अत्यंत - बिभेति - भितो - पुनः - फिरून - कामः - मदन - अस्य - ह्याच्या - मनः - मनाला - नु - खरोखर - कथं - कसा - श्रयेत - आश्रय करून राहिला. ॥७॥ राज्ञः - उत्तानपाद राजाच्या - अंति - समक्ष - सपन्युदितपत्रिभि - सावत्र आईने उच्चारिलेल्या वाग्बाणांनी - विद्धः - ताडिलेला - बालः - लहान - अपि - सुद्धा - सन् - असतानाच - तपसे - तप करण्याकरिता - वनानि - अरण्याप्रत - उपगतः - गेला - प्रसन्नः - प्रसन्न झालेला परमेश्र्वर - गृणते - स्तुति करणार्या - तस्मै - त्या बाळाला - ध्रुवगतिं - अविनाशी अशा अढळपदाला - अदात् - देता झाला - यत् - ज्याची - उपरि - वर राहणारे - अधस्तात् - व खाली राहणारे - दिव्याः - दैदिप्यमान - मुनयः - ऋषि - स्तुवन्ति - स्तुति करितात. ॥८॥ यत् - ज्यामुळे - अर्थितः - प्रार्थिलेला - उत्पथगतं - कुमार्गाने चालणार्या - व्दिजवाक्यवज्रविप्लुष्टपौरुषभगं - ब्राह्मणांच्या वाग्वज्राने ज्याचे ऐश्र्वर्य व सामर्थ्य नष्ट झाले आहे अशा - निरये - नरकांत - पतन्तं - पडणार्या - वेनं - वेन नावाच्या राजाला - त्रात्वा - रक्षून - जगति - जगात - पुत्रपदं - पुत्र नावाला - लेभे - प्राप्त झाला - च - आणि - येन - ज्याने - वसुधा - पृथ्वीपासून - सकलानि संपूर्ण - वसूनि - पदार्थ - दुग्धा - दोहन केले. ॥९॥ असौ - हा - नाभेः - नाभिराजापासून - सुदेविसूनुः - सुदेविनामक पत्नीच्या ठिकाणी झालेला पुत्र असा - समदृक् - समदृष्टि असा - प्रशान्तकरणः - जितेन्द्रिय - परिमुक्तसङगः - सर्वसंगपरित्याग केलेला - स्वस्थः - आत्म्यामध्येच रममाण होणारा - ऋषभः - ऋषभयोगी - आस - असता झाला - यः - जो - वै - खरोखर - जडयोगचर्यां - जडासारख्या योगसमाधीला - चचार - आचरिता झाला - ऋषयः - ऋषी - यत् - ज्या - पारमहंस्यं - परमहंस जे साधु त्यांना प्राप्त होणार्या अशा - पदं - स्थानाला - आमनन्ति - मानतात. ॥१०॥ अथो - नंतर - मम - माझ्या - सत्रे - यज्ञात - सः - तो - साक्षात् - प्रत्यक्ष - भगवान् - सर्वैश्र्वर्यसंपन्न - यज्ञपुरुषः - यज्ञस्वरूपी पुरुष - तपनीयवर्णः - सुवर्णाप्रमाणे अंगकांति असणारा - छन्दोमयः - वेदस्वरूपी - मखभयः - यज्ञस्वरूपी - अखिलदेवतात्मा - संपूर्ण देवतांमध्ये आत्मस्वरूपाने राहिलेला असा - हयशीरषा - हयग्रीव नावाचा अवतार - आस - उत्पन्न झाला - श्र्वसतः - श्र्वासोच्छ्वास टाकणार्या - अस्य - ह्या हयग्रीवाच्या - नस्तः - नाकातून - उशतीः - सुंदर - वाचः - वेदवाणी - बभूवुः - उत्पन्न झाल्या. ॥११॥ युगान्तसमये - युग संपण्याचे वेळी - मनुना - वैवस्वत मनूने - उपलब्धः - पाहिलेला - क्षोणीमयः - पृथ्वीरूपी - निखिलजीवनिकायकेतः - सर्व जीवसमुदायांचा आश्रय असा - मत्स्यः - मत्स्यावतार - मे - माझ्या - मुखात् - तोंडातून - विस्रंसितान् - बाहेर पडलेल्या - वेदमार्गान् - वेद मार्गांना - आदाय - घेऊन - तत्र - त्या - उरुभये - फारच भयंकर अशा - सलिले - उदकात - ह - खरोखर - विजहार - क्रीडा करिता झाला. ॥१२॥ अमरदानवयूथपानां - देवांचे व दैत्यांचे जे इन्द्रादि अधिपति ते - क्षीरोदधौ - क्षीरसमुद्रात - अमृतलब्धये - अमृत मिळविण्याकरिता - उन्मथ्नतां - मंथन करीत असत - निद्राक्षणः - निद्रेला योग्य वेळ असलेला - अद्रिपरिवर्तकषाणकण्डूः - पर्वताच्या घर्षणामुळे ज्याची कंडू नाहीशी झाली आहे असा - आदिदेवः - सर्वांचा आदि असणारा देव - कच्छपवपुः - कासवाचे शरीर धारण करणारा असा - पृष्ठेन - पाठीने - गोत्रं - पर्वताला - विदधार - धरिता झाला. ॥१३॥ त्रैविष्टपोरुभयहा - त्रैलोक्याच्या मोठया भयाला नष्ट करणारा - सः - तो - भ्रमद्भ्रुकुटिः - ज्याच्या भ्रुकुटीसभोवार फिरत आहेत असे - दंष्ट्रकरालवक्रं - ज्याचे मुख भयंकर दाढांनी युक्त दिसत आहे असे - नृसिंहरूपं - नृसिंहाचे स्वरूप - कृत्वा - धारण करून - गदया - गदेने - स्फुरितं - स्फुरण पावणार्या - आरात् - जवळ - अभिपतन्तं - येणार्या - दैत्येन्द्रं - दैत्याधिपति हिरण्यकशिपूला - ऊरौ - मांडीवर - निपात्य - पाडून - आशु - तत्काळ - नखैः - नखांनी - विददार - फाडता झाला. ॥१४॥ अन्तःसरसि - सरोवराच्या आत - उरुबलेन - बलिष्ठ अशा - ग्राहेण - नक्राने - पदे - पायामध्ये - गृहीतः - धरलेला - आर्तः - अत्यंत पीडित झालेला - यूथपतिः - हत्तीच्या कळपांचा स्वामी - अम्बुजहस्तः - हातात कमळ घेतलेला असा - आदिपुरुषः - सर्वांचा आदि असणार्या हे परमेश्र्वरा ! - अखिललोकनाथ - हे लोकांच्या अधिपते - तीर्थश्रवः - हे पुण्यकीर्ते ! - श्रवणमङगलनामधेय - श्रवण करणार्यांना ज्यांचे नाव मंगलकारक आहे अशा हे विष्णो - इदं - अशा रीतीने - आहे - स्तुति करू लागला. ॥१५॥ अप्रमेयः - निरुपम - भगवान् - सर्वगुणसंपन्न - हरिः - परमात्मा - श्रुत्वा - गजेंद्राचे भाषण ऐकून - चक्रायुधः - हातात सुदर्शनचक्र धारण केलेला - पतगराजभुजाधिरूढः - गरुडारूढ झालेला - चक्रेण - सुदर्शन चक्राने - नक्रवदनं - नक्राच्या मुखाला - विनिपाटय - विदारण करून - तस्मात् - त्यायोगे - अरणार्थिनं - शरण आलेल्या - तं - त्या गजेन्द्राला - हस्ते - सोंडेशी - प्रगृह्य - धरून - कृपया - कृपेने - उज्जहार - वर काढिता झाला. ॥१६॥ अदितेः - अदितीच्या - सुतानां - मुलांमध्ये - अवरजः - सर्वांत धाकटा - अपि - असून सुद्धा - गुणैः - गुणांनी - ज्यायान् - श्रेष्ठ - यत् - ज्यामुळे - अधियज्ञः - यज्ञश्रेष्ठ असे म्हणतात - अथ - नंतर - इमान् - ह्या - लोकान् - लोकांना - विचक्रमे - व्यापून टाकता आला - प्रभुभिः - समर्थांनी - पथि - धर्ममार्गाने - चरन् - वागणारा - याञ्चां ऋते - याचना केल्याशिवाय - न चाल्यः - चलित करू नये - वामनेन - वामनावताराने - त्रिपदच्छलेन - तीन पावले भूमि मागण्याच्या मिषाने - क्ष्मां - पृथ्वीला - जगृहे - घेतले. ॥१७॥ उरुक्रमपादशौचं - वामनाचे पाय धुवून पवित्र झालेले - आपः - उदक - शिखा - मस्तकावर - धृतवतः - धारण करणार्या - बलेः - बलीचा - विबुधाधिपत्यं - देवांचे आधिपत्य - अयं अर्थः न - हा काही महत्त्वाचा अर्थ नव्हता - अंग - हे नारदा - यः - जो - प्रतिश्रुतं - प्रतिज्ञा केलेल्या - ऋते - शिवाय - अन्यत् - दुसरे - न - नाही - चिकीर्षत् - करू इच्छिणारा - शिरसा - मस्तकाने - आत्मानं - स्वतःला - हरये - हरीप्रीत्यर्थ - वै - खरोखर - अभिमेने - मानता झाला. ॥१८॥ नारद - हे नारदा - च - आणि - भृशं - अत्यंत - विवृद्धभावेन - वाढलेल्या भक्तीने - परितुष्टः - संतुष्ट झालेला - भगवान् - परमेश्र्वर - तुभ्यं - तुला - योगं - भक्तियोगविषयक ज्ञान - च - आणि - आत्मसतत्त्वदीपं - आत्मतत्त्वाला प्रकाशित करणार्या - भागवतं - भगवंतासंबंधी - ज्ञानं - ज्ञानाला - साधु - चांगल्या रीतीने - उवाच - बोलला - वासुदेवशरणाः एव - भगवंताला शरण गेलेले भगवद्भक्त सुद्धा - अञ्जसा - तत्काळ - यत् - ज्याला - विदुः - जाणतात. ॥१९॥ च - आणि - मनुवंशधरः - मनुवंशाला धारण करणारा - मन्वन्तरेषु - अनेक मन्वंतरांच्या काळात - दशसु - दहाहि - दिक्षु - दिशांमध्ये - अविहृतं - अकुंठित - स्वतेजः - स्वसामर्थ्यानेच चकाकणार्या - चक्रं - चक्राला - बिभर्ति - धारण करतो म्हणजे सत्ता गाजवितो - चरित्रैः - आपल्या आचरणांनी - उशतीं - सुंदर - स्वकीर्तिं - स्वतःच्या यशाला - त्रिपृष्ठे - त्रैलोक्याचा पृष्ठभाग अशा - सत्ये - सत्यलोकात - प्रथयन् - प्रसिद्धीला नेणारा - दुष्टेषु - दुराचारी - राजसु - राजांचे ठिकाणी - दमं - दंडाला - व्यदधात् - करिता झाला. ॥२०॥ स्वयम् एव - स्वतःच - कीर्ति - कीर्तिरूप असा - भगवान् - परमेश्र्वर - धन्वन्तरिः - धन्वन्तरी नावाचा - पुरुरुजां - फारच रोगग्रस्त अशा - नृणां - मनुष्यांच्या - रुजः - रोगांना - नाम्ना - नामस्मरणाने - आशु - तत्काळ - हन्ति - नष्ट करितो - च - आणि - अमृतायुः - ज्यापासून आयुष्यांतील मृत्यू दूर होतो असा - यज्ञे - यज्ञात - अव - बंद केलेल्या - भागं - हविर्भागाला - अवरुन्धे - मिळवितो - च - आणि - लोके - मृत्यूलोकात - अवतीर्य - अवतार घेऊन - आयुः वेदं - आयुर्वेदाला म्हणजे वैदयशास्त्राला - अनुशास्ति - प्रवृत्त करतो. ॥२१॥ उग्रवीर्यः - अत्यंत पराक्रमी - महात्मा - मोठया मनाचा - असौ - हा - उज्झितपथं - सोडला आहे सन्मार्ग ज्याने अशा - ब्रह्मध्रुक् - ब्राह्मणांचा व्देष करणार्या - नरकार्तिलिप्सु - नरकाच्या पीडांची इच्छा करणार्या - अवनिकण्टकं - पृथ्वीवर काटयाप्रमाणे दुःख देणार्या - विधिना - दैवाने - क्षयाय - नाशाकरिता - उपभृतं - साठविलेल्या - क्षत्रं - क्षत्रियाच्या समूहाला - उरुधारपरश्र्वधेन - तीक्ष्ण धारेच्या कुर्हाडीने - त्रिःसप्तकृत्वः - एकवीस वेळा - उद्धन्ति - समूळ मारून टाकतो. ॥२२॥ कलेशः - षोडश कलांचा अधिपति असा परमेश्र्वर - अस्मत्प्रसादसुमुखः - आमच्यावर प्रसाद करण्यास उदयुक्त झालेला असा होत्साता - कलया - अंशाने - इक्ष्वाकुवंशे - इक्ष्वाकुवंशात - अवतीर्य - अवतार घेऊन - गुरोः - पित्याच्या - निददे - आज्ञेत - तिष्ठन् - राहणारा - सदयितानुजः - पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांसह - वनं - अरण्याला - आविवेश - गेला - दशकन्धरः - दहा तोंडाचा रावण - यस्मिन् - जेथे - विरुद्ध्य - विरोध करून - आर्तिं - पीडेला - आर्च्छत् - मिळविता झाला. ॥२३॥ हरवत् - शङ्कराप्रमाणे - अरिपुरं - शत्रुनगरीला - दिधक्षोः - जाळून टाकण्याची इच्छा करणार्यापासून - ऊढभयाङ्गवेपः - मोठया भीतीमुळे प्राप्त झाला आहे शरीरकंप ज्याला असा - दूरेसुहृन्मथितरोषसुशोणदृष्टया - प्रिय वस्तु दूर राहिल्यामुळे वाढलेल्या क्रोधाने लाल झालेल्या दृष्टीने - तातप्यमानमकरोरगनक्रचक्रः - संतप्त झाले आहेत मगर, सर्प, नक्र वगैरे जलचरांचे समूह ज्यात असा - उदधिः - समुद्र - सपदि - तत्काळ - यस्मै - ज्याला - मार्गं - मार्ग - अदात् - देता झाला. ॥२४॥ धनुषः - धनुष्याच्या - विस्फूर्जितैः - टणत्कारांनी - अधिसैन्ये - उभय सैन्यामध्ये - उच्चरतः - वेगाने चालणार्या - दारहर्तुः - स्त्रीला हरण करणार्या रावणाच्या - वक्षःस्थलस्पर्शरुग्णमहेन्द्रवाहदन्तैः - वक्षःस्थलाला स्पर्श झाल्यामुळे भग्न झालेल्या ऐरावताच्या दातांनी - विडम्बितककुब्जयरूढहासम् - अनुकरण केले आहे ज्याचे अशा आपल्या दिग्विजयामुळे उत्पन्न झालेल्या हास्याला - असुभिः सह - प्राणांसह - सदयः - तत्काळ - विनेष्यति - दूर करील. ॥२५॥ सुरेतरवरूथविमर्दितायाः - दैत्यसमूहांनी पीडिलेल्या - भूमेः - पृथ्वीचे - क्लेशव्ययाय - क्लेश दूर करण्याकरिता - सितकृष्णकेशः - पांढरे व काळे आहेत केस ज्याचे असा ईश्र्वर - कलया - अंशासह - जातः - झाला - च - आणि - जनानुपलक्ष्यमार्गः - लोकांना न समजणारा आहे मार्ग ज्याचा असा - आत्ममहिमोपनिबन्धनानि - आपले माहात्म्य स्पष्ट करणारी - कर्माणि - कर्मे - करिष्यति - करील. ॥२६॥ तोकेन - लहान असताना - यत् - जे - उलूकिकायाः - पूतनेचे - जीवहरणं - प्राणहरण केले - च - आणि - त्रैमासिकस्य - तीन महिन्याचा असताना - पदा - पायाने - शकटः - गाडा - अपवृत्तः - उलटा केला - वा - अथवा - रिंगता - रांगत असताना - दिविस्पृशोः - आकाशापर्यंत उंच गेलेल्या - अर्जुनयोः - यमलार्जुनांच्या - अंतरगतेन - मध्येच जाऊन - यत् - जे - उन्मूलनं - त्यांना उपटून टाकिले - इतरथा - अन्य कल्पनेने म्हणजे तो ईश्र्वरी अंश नसेल तर - न भाव्यं - संभवनीय नाही. ॥२७॥ यत् - जे - व्रजे - गोकुळात - अनुग्रहदृष्टिवृष्टया - कृपायुक्त अशा कटाक्षाच्या वर्षावाने - विषतोयपीथान् - विषजलांचे प्राशन करणार्या - व्रजपशून् - गोकुळातील गाई, बैल इत्यादिकांना - पालान् - गोपाळांना - तु - तर - वै - खरोखर - अजीवयत् - जिवंत करिता झाला - च - आणि - यत् - ज्यामुळे - हृदिन्यां - यमुनानदीत - तच्छुद्धये - तिच्या शुद्धीकरिता - विहरन् - क्रीडा करणारा - अतिविषवीर्यविलोलजिव्हं - तीव्र विषाच्या तेजाने ज्याची जीभ सारखी हलत आहे अशा - उरगं - कालियानामक सर्पाला - उच्चाटयिष्यत् - घालवून देईल. ॥२८॥ यत् - जे - अनधिगम्यवीर्यः - अगम्य आहे पराक्रम ज्याचा असा - सबलः - बलरामासह श्रीकृष्ण - शुचि वने दावाग्निना परिदह्यमाने - उन्हाळ्यात सुकून गेलेले अरण्य वणव्याने दग्ध होत असता - निशि - रात्री - निःशयानं - झोपलेल्या - अतः - म्हणून - अवसितान्तकालं - ज्यांचा अंतकाळ जवळ आला आहे अशा - व्रजं - गोकुळाला - नेत्रे - डोळे - पिधाय्य - मिटायला लावून - उन्नेष्यति - बाहेर नेईल - तत् - ते - कर्म - कार्य - दिव्यम् इव - अलौकिकच होय. ॥२९॥ अमुष्य - ह्या श्रीकृष्णाची - माता - आई यशोदा - यत् यत् - ज्या ज्या - उपबन्धं - बंधन करण्याजोग्या - शुल्बं - दोरीला - गृह्णीत - घेईल - तत् तत् - ती ती - अमुष्य - ह्या - सुतस्य - पुत्र जो श्रीकृष्ण त्याच्या - तु - तर - न माति - परिमाणाला पुरेशी होणार नाही - यत् - ज्यावेळी - गोपी - नंदपत्नी यशोदा - जृम्भृतः - जांभई देणार्या - अस्य - ह्याच्या - वदने - मुखात - भुवनानि - चौदा भुवनाना - संवीक्ष्य - पाहून - शङ्कितमनाः - साशंक अशा अंतःकरणाची होत्साती - प्रबोधिता - ज्ञानसंपन्न अशी - आसीत् - झाली. ॥३०॥ च - आणखी - वरुणस्य - वरुणाच्या - पाशात् - पाशापासून उत्पन्न झालेल्या - भयात् - भीतीपासून - नन्दं - नन्दाला - च - आणि - मयसूनुनां - मयासुराचा पुत्र जो व्योमासुर त्याने - बिलेषु - गुहेत - पिहितान् - कोंडून ठेवलेल्या - गोपान् - गोपांना - मोक्ष्यति - मुक्त करील - च - आणि - अन्हि - दिवसा - आपृतं - स्वकार्यात गढून गेलेल्या - अतिश्रमेण - फारच थकून गेल्यामुळे - निशि - रात्री - शयानं - झोपी गेलेल्या - गोकुलं - गोकुळाला - विकुण्ठे - विष्णूच्या - लोके - लोकात - उपनेष्यति स्म - नेईल. ॥३१॥ अनघ - हे निष्पाप नारदा - गोपैः - गोपांनी - मखे प्रतिहते - यज्ञ बंद पाडला असता - व्रजविप्लवाय - गोकुळाला बुडवून टाकण्याकरिता - देवे अभिवर्षति - इंद्र पुष्कळ पाऊस पाडीत असता - कृपया - दयाळूपणाने - पशून् - गाईना - रिरक्षुः - राखण्यास इच्छणारा - सप्तवर्षः - सात वर्षांचा श्रीकृष्ण - सप्त दिनानि - सात दिवस - महीध्रं - गोवर्धन पर्वताला - एककरे - एकाच हातावर - उच्छिलीन्ध्रम् इव - छत्रीसारख्या अलबेंनामक वनस्पतीप्रमाणे - सलीलं - सहज श्रमाशिवाय - धर्ता - धरील. ॥३२॥ निशाकररश्मिगौर्यां - चंद्राच्या किरणांनी शुभ्रवर्ण दिसणार्या - निशि - रात्री - वने - कुंजवनात - क्रीडन् - खेळणारा - रासोन्मुखः - रासक्रीडा करण्यास उत्सुक झालेला श्रीकृष्ण - कलपदायतमूर्च्छितेन - मधुर स्वर, तान, मूर्छना इत्यादि प्रकारांनी - उद्दीपितस्मररुजां - वाढली आहे कामपीडा ज्यांची अशा - व्रजभृव्दधूनां - गोपस्त्रियांचे - हर्तुः - हरण करणार्या - धनदानुगस्य - कुबेरसेवक जो शंखचूड यक्ष त्याच्या - शिरः - मस्तकाला - हरिष्यति - हरण करील. ॥३३॥ च - आणि - ये - जे - प्रलम्बखरदर्दुरकेश्यरिष्टमल्लेभकंसयवनाः - प्रलंब, खर, दर्दुर, केशी, अरिष्ट, मोठमोठे मल्ल, मत्तगज, कंस, व कालयवन हे सर्व - कुजपौंण्ड्रकादयाः - भौमासुर, पौंड्रक, आदिकरून - च - आणि - अन्ये - दुसरे - शाल्वकपिबल्वदन्तवक्रसप्तोक्षशम्बरविदूरथरुक्मिमुख्याः - शाल्व, व्दिविद, वानर, बल्वल, वक्रदंत, सात बैल, शम्बर, विदूरथ, व रुक्मि हे आहेत मुख्य ज्यात असे - वा - किंवा - ये - जे - शमितिशालिनः - युद्धकुशल - मृधे - युद्धात - आत्तचापाः - धनुर्धारी - काम्बोजमत्स्यकुरुकैकसृञ्जयादयाः - काम्बोज, मत्स्य, कुरु, कैकय, व सृञ्जय इत्यादी - बलभीमपार्थव्याजाव्हयेन - बलराम, भीमसेन, अर्जुन अशा स्वरूपाने अनेक नावे धारण करणार्या - हरिणा - कृष्णावतारी परमेश्र्वराकडून - अलं - अत्यंत - अदर्शनं - नाशाला - तदीयं - श्रीकृष्णाच्या वैकुंठसंज्ञक - निलयं - स्थानाला - यास्यन्ति - जातील. ॥३४-३५॥ अनुयुगं - प्रत्येक युगात - कालेन - कालाने - मीलितधियां - संकुचित बुद्धीच्या - स्तोकायुषां - अल्पायु अशा - नृणां - मनुष्यांस - स्वनिगमः - आपला हा वेदराशि - बत - खरोखर - दूरपारः - दुर्बोध - अवमृश्य - असा विचार करून - सः - तो - तु - तर - सत्यवतां - सत्यवतीचे ठिकाणी - आविर्हितः - प्रगट झाला - वेदद्रुमं - वेदवृक्षाचे - विटपशः - शाखाभेदाने - हि - निःसंशय - विभजिष्यति स्म - विभाग करील. ॥३६॥ निगमवर्त्मनि - वेदमार्गात - निष्ठितानां - राहणार्या - मयेन - मयासुराने - विहिताभिः - केलेल्या - अदृश्यतूर्भिः - अदृश्य गति असणार्या - पूर्भिः - नगरांनी - लोकान् - लोकांना - घ्नतां - मारणार्या - देवव्दिषां - दैत्यांच्या - मतिविमोहमतिप्रलोभं - बुद्धीला मोह व लोभ दर्शविणार्या - वेषं - वेषाला - विधाय - घेऊन - औपधर्म्यं - पाखंडधर्माला - बहु - पुष्कळ - भाष्यते - सांगेल. ॥३७॥ यर्हि - जर - सतां - साधूंच्या - अपि - सुद्धा - आलयेषु - घरात - हरेः - परमेश्र्वराच्या - कथाः - कथा - न स्युः - होणार नाहीत - व्दिजजनाः - व्दिज लोक - पाखण्डिनः - पाखंड मताचे होतील - वृषलाः - शूद्र - नृदेवाः - राजे होतील - यत्र - त्या काळी - स्वाहा - स्वाहाकार - स्वधा - स्वधाकार - वषट् - वषट्कार - इति - याप्रमाणे - गिरः - वाणीचे उच्चार - न स्म - होणार नाहीत - युगान्ते - युगाच्या शेवटी - भगवान् - परमेश्र्वर - कलेः - कलीचा - शास्ता - शासनकर्ता - भविष्यति - होईल. ॥३८॥ सर्गे - उत्पत्तिकार्यात - तपः - तपश्चर्या - ऋषयः - ऋषी - अहं - मी - ये - जे - नव - नऊ - प्रजेशाः - प्रजापति - च - आणि - स्थाने - रक्षणकार्यात - धर्ममखमन्वमरावनीशाः - धर्म, यज्ञरूपी विष्णु, चौदा मनु, देव व राजे - च - आणि - अन्ते - संहारकार्यात - तु - तर - अधर्महरमन्युवशासुरादयाः - अधर्म, शंकर, क्रोधाधीन क्रूर प्राणी, दैत्य इत्यादी - इमाः - ह्या - पुरुशक्तिभाजः - पुष्कळ शक्ति असणार्या - मायाविभूतयः - मायेच्या विभूति होत. ॥३९॥ यः - जो - इह - येथे - पार्थिवानि - पृथ्वीसंबंधी - अपि - सुद्धा - रजांसि - रजःकणांना - विममे - मापता झाला - कतमः - कोणता - नु - खरोखर - कविः - विव्दान् पुरुष - विष्णोः - विष्णूच्या - वीर्यगणनां - पराक्रमांची गणती - अर्हति - करू शकतो - यः - जो विष्णु - अस्खलता - अढळ अशा - स्वरंहसा - आपल्या वेगाने - यस्मात् - ज्याअर्थी - त्रिसाम्यसदनात् - त्रिगुणांचे साम्य जीत आहे अशा प्रकृतिरूप आधारासह - उरु - पुष्कळ - कंपयानं - कांपणार्या - त्रिपृष्ठं - सत्यलोकाला - चस्कंभ - सावरून धरिता झाला. ॥४०॥ अहं - मी - मायाबलस्य - प्रकृतीवर सत्ता गाजविणार्या - पुरुषस्य - परमेश्वराच्या - अंतं - अंताला - न विदामि - जाणत नाही - अमी - हे - ते - तुझे - अग्रजाः - ज्येष्ठ बंधु - मुनयः - मरिच्यादि ऋषि - न - जाणत नाहीत - ये - ते - अपरे - दुसरे - कुतः - कसे जाणणार - गुणान् - गुणांना - गायन् - गाणारा - आदिदेवः - सर्वांच्या आदि असणारा - दशशताननः - हजार तोंडांचा - शेषः - शेष - अधुना - अजून - अपि - सुद्धा - अस्य - ह्याच्या - पारं - अंताला - न समवस्यति - प्राप्त होत नाही. ॥४१॥ यदि - जर - निर्व्यलीकं - निष्कपटपणाने - सर्वात्मना - सर्वप्रकारे - आश्रितपदः - आश्रययोग्य आहेत पाय ज्याचे असा - सः - तो - एषः - हा - भगवान् - सर्वगुणसंपन्न - अनन्तः - ज्याचा अंत नाही असा परमेश्वर - येषां - ज्यांच्यावर - दययेत् - दया करील - ते - ते - दुस्तरां - तरण्यास कठीण अशा - देवमायां - परमेश्वराच्या मायेला - अतितरन्ति - तरून जातात - च - आणि - एषां - ह्यांची - श्वशृगालभक्ष्ये - कुत्रे, कोल्ही ह्यांनी भक्षण करण्यालायक अशा देहादिकावर - अहं मम इति - मी माझे अशी - धीः - बुद्धी - न - राहात नाही. ॥४२॥ अङग - हे नारदा ! - हि - खरोखर - परमस्य - परमेश्वराच्या - योगमायां - योगमायेला - अहं - मी - वेद - जाणतो - यूयं - तुम्ही - च - आणि - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न - भवः - शंकर - अथ - नंतर - दैत्यवर्यः - दैत्यश्रेष्ठ प्रल्हाद - सः - तो - मनुः - स्वायंभुव मनु - मनोः - स्वायंभुव मनूची - पत्नी - स्त्री शतरूपा - च - आणि - तदात्मजाः - त्याचे पुत्र प्रियव्रतादि - च - आणि - प्राचीनबर्हिः - प्राचीनबर्हि - ऋभुः - ऋभु - अंग - अंग - उत - आणि - ध्रुवः - ध्रुव - ऐलमुचुकुन्दविदेहगाधिरघ्वंबरीषसगराः - ऐल, मुचुकुंद, जनक, गाधि, रघु, अंबरीष, सगर - गयनाहुषादयाः - गय, ययाति वगैरे - इक्ष्वाकुः - इक्ष्वाकु - मांधात्रलर्कशतधन्वनुरंतिदेवाः - मांधाता, अलर्क, शतधनु, अनु, रंतिदेव - देवव्रतः - भीष्म - बलिः - बलिराजा - अमूर्तरयः - अमूर्तरय - दिलीपः - दिलीप - सौभर्युतङकशिबिदेवल - सौभरी, उतंक, शिबि, देवल, - पिप्पलादसारस्वतोद्धवपराशरभूरिषेणाः - पिप्पलाद, सारस्वत, उद्धव, पराशर व भूरिषेण - ये - जे - अन्ये - दुसरे - बिभीषणहनूमदुपेन्द्रदत्त - बिभीषण, हनुमान, विष्णु, दत्त, - पार्थार्ष्टिषेणाविदुरश्रुतदेववर्याः - अर्जुन, आर्ष्टिषेण, विदुर, श्रुतदेव व दुसरेही श्रेष्ठ पुरुष. ॥४३-४५॥ ते - ते - वै - खरोखर - देवमायां - ईश्वराच्या मायेला - विदन्ति - जाणतात - च - आणि - अतितरन्ति - उल्लंघितात - यदि - जरी - पापजीवाः - पापकर्मावर उपजीविका करणारे - अपि - सुद्धा - स्त्रीशूद्रहूणशबराः - स्त्रिया, शूद्र, हूण व शबर - अद्भुतक्रम - अद्भुत पराक्रमी अशा - परायणशीलशिक्षाः - परमेश्वराच्या भक्तांचा स्वभाव ज्यांना प्राप्त होण्याचे शिक्षण मिळाले आहे असे - च - आणि - तिर्यग्जनाः - पशु वगैरे - अपि - सुद्धा - ये - जे - श्रुतधारणाः - शास्त्रांचे आकलन करणारे पुरुष - किमु - तरून जातील यात काय संशय ? ॥४६॥ यत् - ज्याला - ब्रह्म - ब्रह्म - इति - असे - विदुः - जाणतात - तत् - ते - वै - खरोखर - भगवतः - सर्वगुणसंपन्न अशा - परमस्य - श्रेष्ठ - पुंसः - पुरुषाचे - पदं - चरणकमल होय. - शश्वत् - नेहमी टिकणारे - प्रशान्तं - शान्त - अजस्रसुखं - सुखाने परिपूर्ण भरलेले - विशोकं - शोकरहित - अभयं - निर्भय - समं - भेदभावरहित - शुद्धं - शुद्ध - प्रतिबोधमात्रं - ज्ञानरूप - सदसतः - व्यक्ताहून व अव्यक्ताहून - परं - भिन्न - आत्मतत्त्वं - आत्मतत्त्वाने युक्त असे ब्रह्म आहे - यत्र - जेथे - शब्दः - शब्द - न - नाही - पुरुकारकवान - पुष्कळ साधनांनी युक्त - क्रियार्थः - कार्याचे फळ - न - नाही - माया - प्रकृति - अभिमुखे - परमेश्वरासमोर उभे राहण्यास - विलज्जमाना - लाजणारी अशी - परैति - परत फिरते - स्वराट् - स्वर्गाधिपति - इंद्रः - इंद्र - निपानखनित्रम् इव - विहीर खणण्याच्या साधनाप्रमाणे - यतयः - साधु - यं - ज्यासाठी - सघ्र्यङ् - मन - नियम्य - नियमित करून - अकर्तहेतिं - भेदनिरासार्थ शस्त्राला - जह्युः - सोडते झाले. ॥४७-४८॥ सः - तो - भगवान् - परमेश्वर - श्रेयसां - आत्यंतिक कल्याणाचा - विभुः - दाता - अपि - असे असल्यामुळे - यतः - ज्यापासून - भावस्वभावविहितस्य - वर्णाश्रम व शमदमादि यांनी युक्त - अस्य - ह्या - सतः - शुभकार्याची - प्रसिद्धिः - उत्पत्ति होते - स्वधातुविगमे - शरीराला कारणीभूत पंचमहाभूते नष्ट झाली आहेत ज्याची असा - देहे - देह - अनुविशीर्यमाणे - एकामागून एक विस्कळीत झाला असता - तत्र - तेथे - व्योम इव - आकाशाप्रमाणे - अजः - जन्मरहित - पुरुषः - पुरुष - न विशीर्यते - नाश पावत नाही. ॥४९॥ तात - बा नारदा ! - सः - तो - अयं - हा - विश्वभावनः - जगद्रक्षणकर्ता - भगवान् - परमेश्वर - ते - तुला - समासेन - संक्षेपाने - अभिहितः - सांगितला आहे - यत् - जे - सत् - कारण - च - आणि - असत् - कार्य - अन्यस्मात् - कार्यकारणव्यतिरिक्त अशा - हरेः - परमेश्वराहून - अन्यत् - निराळे - न - नाही. ॥५०॥ यत् - जे - भगवता - परमेश्वराने - मे - मला - उदितं - सांगितले - इदं - ते हे - भागवतं नाम - भागवतनामक होय. - अयं - हा - विभूतीनां - विभूतींचा - संग्रहः - संग्रह - त्वं - तू - एतत् - ह्याला - विपुलीकुरु - विस्तृत कर. ॥५१॥ सर्वात्मनि - सर्वत्र आत्मस्वरूपाने राहणार्या - अखिलाधारे - सर्वाला आधारभूत अशा - भगवति - षड्गुणैश्वर्यसंपन्न - हरौ - परमेश्वराच्या ठिकाणी - यथा - ज्या योगे - नृणां - मनुष्यांस - भक्तिः - भक्ति - भविष्यति - प्राप्त होईल - इति - अशा रीतीने - संकल्प्य - मनाशी ठरवून - वर्णय - वर्णन कर. ॥५२॥ अमुष्य - ह्या - ईश्वरस्य - परमेश्वराच्या - मायां - मायेला - वर्णयतः - वर्णन करणार्याचे - अनुमोदतः - व अनुमोदन देणार्याचे - श्रद्धया - आणि श्रद्धेने - नित्यं - नेहमी - शृण्वतः - श्रवण करणार्याचे - आत्मा - मन - मायया - मायेने - न मुह्यति - मोहित होत नाही. ॥५३॥ स्कंध दुसरा - अध्याय सातवा समाप्त |