![]() |
शुक्ल यजुर्वेद विनियोग - नवव्या अध्यायांत वाजपेय व राजसूयसंबंधीं कांहीं कर्म सांगितलें. दहाव्या अध्यायांत राजसूयांतील अवशिष्ट कर्म व चरक सौत्रामणी सांगतात. 'अपो देवाः' या मंत्रभागानें सरस्वतीनदीचें जल ग्रहण करावें. अ॒पो दे॒वा मधु॑मतीरगृभ्ण॒न्नुर्ज॑स्वती राज॒स्व्श्चिता॑नाः । याभि॑र्मि॒त्रावरु॑णाव॒भ्याषि॑ञ्च॒न्याभि॒रिन्द्र॒मन॑य॒न्नत्यरा॑तीः ॥ १ ॥ अर्थ - इंद्रादिक देवांनीं मधुरस्वाद व अन्नरस यांनीं युक्त, नृपोत्पादक, (विशिष्टज्ञानयुक्त अशा जलाचें ग्रहण केलें. त्या पाण्यांनीं देवांनीं मित्रावरुणांना) अभिषेक केला व त्यांनीं त्याच जलानें इंद्राकडून शत्रुजय करविला. अशा सरस्वती जलाचें मी ग्रहण करतों. ॥१॥ विनियोग - 'वृष्णः ऊर्मिः' इत्यादि मंत्रांनीं आज्याहुतींचा होम करावा. वृष्ण॑ ऊ॒र्मिर॑सि राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ देहि स्वहा॒ वृष्ण॑ ऊ॒र्मिर॑सि राष्ट्र॒दा रा॑ष्ट्रम॒मुषमै॑ देहि वृषसे॒नो॒ऽसि राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ देहि॒ स्वहा॑ वृषसे॒नो॒ऽसि राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ देहि ॥ २ ॥ अर्थ - हे कल्लोला, तूं वीर्यसेक करणार्या पशूचा कल्लोल आहेस. तूं स्वभावतःच राष्ट्र देणारा आहेस म्हणून आम्हांला राष्ट्र दे. हें हवि सुहुत असो. तसेंच तूं या यजमानाला राष्ट्र दे. त्याप्रमाणेंच ज्याची सेना सेचनसमर्थ आहे व राष्ट्र देणारा असा तूं आहेस म्हणून मला व या यजमानाला राष्ट्र दे. ॥२॥ विनियोग - प्रवाहांतील जलग्रहण करावें. अ॒र्थेत॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ दत्त॒ स्वाहा॒ ऽर्थेत॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ मे द॒त्तौज॑स्वति स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ दत्त॒ स्वाहौज॑स्वती स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ द॒त्तपः॑ परिवा॒हिणी॑ स्थ ताष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ दत्त॒ स्वाहा पः॑ परिवा॒हिणी॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ दत्त॒पां पति॑रसि राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ देहि॒ स्वहा॒ ऽपः पति॑रसि राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ दे॒ह्यपां गर्भो॑ऽसि राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ देहि॒ स्वहा॒ ऽपां गर्भो॑ऽसि राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रममुष्मै॑ देहि॒ ॥ ३ ॥ अर्थ - यज्ञकर्माच्या उद्देशानें प्रवाहापासून यज्ञमण्डपाकडे येणार्या जलांनो, तुम्ही स्वभावतःच राष्ट्र देणार्या आहां म्हणून मला राष्ट्र द्या. हें हवि सुहुत असो व या अमुक नांवाच्या यजमानालाही राष्ट्र द्या. हे जलांनो, तुम्ही तेजोयुक्त व सर्वत्र वाहणार्या आहां. हे समुद्रा, तूं जलांचा अधिपति आहेस. हे भोंवर्या, तूं जलांचा गर्भ आहेस. तुम्ही सर्व स्वभावतःच राष्ट्र देणारे आहांत म्हणून मला व या अमुक नांवाच्या यजमानाला राष्ट्र द्या. विनियोग - सू॑र्यत्वचस स्थ राष्ट्र॒दा रष्ट्रं॒ मे॑ दत्त॒ स्वहा॒ सूर्य॑त्वचस स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॑मुषमि॑ दत्त॒ सूर्य॑वर्चस स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॒ दत्त॒ स्वहा॒ सूर्य॑वर्चस स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ दत्त॒ मान्दा॒ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ दत्त॒ स्वहा॒ मान्दा॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ दत्त व्रज॒क्षित॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ दत्त॒ स्वहा॒ व्रज॒क्षित॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ दत्त॒ वाशा॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ दत्त॒ स्वहा॒ वाशा॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ दत्त॒ शवि॑ष्ठा स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ दत्त॒ स्वहा॒ शवि॑ष्ठा स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ दत्त॒ शक्व॑री स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ दत्त॒ स्वहा॒ शक्व॑री स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ दत्त जन॒भृत॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ दत्त॒ स्वहा॑ जन॒भृत॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ द॒त्त विश्व॒भ्हुत॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रं मे॑ दत्त॒ स्वहा॑ विश्व॒भृत॑ स्थ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ द॒त्तपः॑ राष्ट्र॒दा रा॒ष्ट्रम॒मुष्मै॑ दत्त । मधु॑मती॒र्मधु॑मतीभिः पृच्यन्तां॒ महि॑ क्ष॒त्रं क्ष॒त्रिया॑य वन्वा॒ना अना॑धृष्टाः सीदत स॒हौज॑सो॒ महि॑ क्ष॒त्रं क्ष॒त्रिया॑य॒ दध॑तीः ॥ ४ ॥ अर्थ - हे जलांनो, तुमची त्वचा सूर्यासारखी आहे. तुम्ही स्वभावतः राष्ट्र देणार्या आहांत म्हणून मला राष्ट्र द्या. हें हवि सुहुत असो. या अमुक नांवाच्या यजमानालाही राष्ट्र द्या. हे जलांनो, तुम्ही सूर्यासारख्या तेजस्वी आहां व प्राण्यांना आनंद देणार्या, कूपांत आणि मेघांत राहणार्या, सर्वांना स्पृहणीय, मधुरूपी, बलिष्ठ, जगदुद्धारसमर्थ, लोकांचें धारण करणार्या, सर्व विश्वधारण करणार्या व स्वयंशोभामान अशा आहां म्हणून मला व अमुक नांवाच्या या यजमानाला राष्ट्र द्या. हे मधुर जलांनो, तुम्ही यजमानाला पुष्कळ बल देणारीं आहां, या मधुरसयुक्त जलाशीं युक्त व्हा. हे जलांनो, तुम्ही राक्षसांकडून अजिंक्य, बलयुक्त व क्षत्रियाला मोठें बल देणारीं अशीं आहां. या स्थानीं तुम्ही रहा. ॥४॥ विनियोग - 'सोमस्य त्विषिः' या मंत्रानें वाघाचें चर्म आंथरावें. 'अग्नये स्वाहा' वगैरे सहा आहुति द्याव्या व पुढें 'इन्द्राय स्वाहा' वगैरे सहा आहुति द्याव्या. सोम॑स्य॒ त्विषि॑रसि॒ तवे॑व मे॒ त्विषि॑र्भूयात् । अ॒ग्नये॒ स्वाहा॒ सोमा॑य॒ स्वाहा॑ सवि॒त्रे स्वाहा॒ सर॑स्वत्यै॒ स्वहा॒ पू॒ष्णे स्वाहा बृह॒स्पत॑ये॒ स्वाहेन्द्रा॑य॒ स्वाहा घोषा॑य॒ स्वाहा॒ श्लोका॑य॒ स्वाहा ऽँशा॑य॒ स्वाहा॒ भगा॑य॒ स्वाहा॑ ऽर्य॒म्णे स्वाहा॑ ॥ ५ ॥ अर्थ - हे चर्मा, तूं सोमाची कांति आहेस म्हणून तुझ्याप्रमाणें माझी कांति होवो. अग्नि, सोम, सविता, सरस्वती, पूषा, बृहस्पति, इंद्र, घोष (शब्द करणारा) श्लोक (लोकांकडून स्तुति केलेला), अंश (पुण्यपापांचा विभाग करणारा), भाग (सर्व सेव्य), व अर्यमा यांना हें हवि सुहुत असो. ॥५॥ विनियोग - 'पवित्रे स्थः' या मंत्रभागानें पवित्रांत सुवर्ण बांधावें. 'सवितुर्वः' या मंत्रानें वर जल फेकावें. प॒वित्रे॑ स्थो वैष्ण॒व्यौ॒ सवि॒तुर्वः॑ प्रस॒व उत्पु॑ना॒म्यच्छि॑द्रेण प॒वित्रे॑ण॒ सूर्य॑स्य र॒श्मिभिः॑ । अनि॑भृष्टमसि व॒चो बन्धु॑स्तपो॒जाः सोम॑स्य दा॒त्रम॑सि॒ स्वाहा॑ राज॒स्वः॒ ॥ ६ ॥ अर्थ - हे कुशपवित्रांनो, तुम्ही यज्ञसंबंधी आहां. सर्वप्रेरक परमेश्वराच्या आज्ञेनें मी छिद्ररहित व उत्तम अशा पवित्रानें व सूर्याच्या किरणांनीं हें जल वर फेकतों. हे जलांनो, तुम्ही राक्षसांकडून पराजित न होणारीं व वाणीचे मित्रभूत अशीं आहां व अग्नीपासून उत्पन्न होणारीं व सोमाचें दान करणारीं आहां. तुम्ही स्वाहाकारानें पवित्र होऊन लोकांना राज देणारीं आहां. ॥६॥ विनियोग - अभिषेकाचें पाणी पालाशादि पात्रांत चार भाग करून ओतावें. स॒ध॒मादो॑ द्यु॒म्निनी॒राप॑ ए॒ता अना॑धृष्टा अप॒स्यो वसा॑नाः । प॒स्त्या॒सु चक्रे॒ वरु॑णः स॒धस्थ॑म॒पाँ शिशु॑र्मा॒तृत॑मास्व॒न्तः ॥ ७ ॥ अर्थ - हीं जलें एका पात्रांत आनन्द पावणारीं, वीर्ययुक्त, राक्षसांकडून अपराजेय, यज्ञकर्मार्ह, पात्रांचीं आच्छादक अशीं आहेत. त्या गृहस्वरूपी व अतिशयें करून जगन्निर्माण करणार्या जलांत वरुणानें एकत्र स्थान मिळविलें. तो वरुण जलांचा बालक आहे. ॥७॥ विनियोग - 'क्षत्रस्य' इत्यादि मंत्रांनीं रेशमी वस्त्र वगैरे धारण करावें. 'दृवासि' इत्यादि मंत्रभागांनीं तीन वाण घ्यावें. क्ष॒त्रस्योल्ब॑मसि क्ष॒त्रस्य॑ ज॒राय्व॑सि क्ष॒त्रस्य॒ योनि॑रसि क्ष॒त्रस्य॒ नाभि॑र॒सीन्द्र॑स्य॒ वार्त्र॑घ्नमसि मि॒त्रस्या॑सि॒ वरु॑णस्यासि॒ त्वया॒ऽयं वृ॒त्रं व॑धेत् । दृ॒बाऽसि॑ रु॒जाऽसि॑ क्षु॒माऽसि॑ । पा॒तैनं॒ प्राञ्चं॑ पा॒तैनं॑ ति॒र्यञ्चं॑ पा॑त ॥ ८ ॥ अर्थ - हे क्षौमवस्त्रा, तूं यजमानाचें उल्ब (गर्भोदक) आहेस. हे रक्तकंबला, तूं गर्भवेष्टनचर्म आहेस. हे कंचुका, तूं गर्भसंभवस्थान आहेस. हे पागोटया, तूं गर्भाचें नाळ आहेस. हे धनुष्या, तूं इंद्राचें वृत्रनाशक धनुष्य आहेस. हे धनुष्याच्या उजवेकडील अग्रा, तूं मित्रसंबंधी आहेस. हे डावेकडील अग्रा, तूं वरुणसंबंधी आहेस. हे धनुष्या, हा यजमान तुझ्या साह्यानें शत्रूचा वध करो. हे प्रथम बाणा, तूं शत्रुनाशक, हे द्वितीय बाणा, तूं शत्रुभञ्जक, हे तृतीय बाणा, तूं शत्रूंस कापविणारा आहेस. हे बाणांनो, पूर्व व पश्चिम दिशांकडे अगर निरनिराळ्या भागांत असणार्या या यजमानाचें तुम्ही पालन करा, व इतर दिशांत असतांनाही या यजमानाचें तुम्ही पालन करा. ॥८॥ विनियोग - 'आविर्मर्या' इत्यादि सात मंत्र यजमानाकडून म्हणवावें. आ॒विर्म॑र्या॒ आवि॑त्तो अ॒ग्निर्गृ॒हप॑ति॒रावि॑त्त॒ इन्द्रो॑ वृ॒द्धश्र॑वा॒ आवि॑त्तौ मि॒त्राव॑रुणौ धृ॒तव्र॑ता॒वावि॑त्तः पू॒षा वि॒श्ववे॑दा॒ आवि॑त्ते॒ द्यावा॑पृथि॒वी वि॒श्वश॑म्भुवा॒ववि॒त्तदि॑तिरु॒रुश॑र्मा ॥ ९ ॥ अर्थ - हे ऋत्विजांनो, तुमच्या समक्ष सांगतो कीं, गृहपालक अग्नीकारणें, कीर्तिमान् अशा इंद्राकारणें, कर्म संपादन करणार्या मित्रावरुणांकारणें, सर्वज्ञ पूष्याकारणें, सर्वांचें कल्याण करणार्या द्यावापृथिवीकारणें व बहु सुखयुक्त अदितीकारणें या यजमानाचें ज्ञापन केलें. म्हणजे हा यजमान त्या त्या देवतांचा याग करणारे आहे असें त्या त्या देवतांस सांगितलें. ॥९॥ विनियोग - सदःस्थानसमीप असलेल्या दीर्घकेशयुक्त पुरुषाच्या तोंडांत ताम्र घालावें. यजमानाला प्रत्येक दिशेकडे चालवीत 'प्राचीमारोह' वगैरे मंत्र म्हणावें. अवे॑ष्टा दन्द॒शूकाः॒ प्राची॒मा रो॑ह गाय॒त्री त्वा॑ऽवतु रथन्त॒रँ साम॑ त्रि॒वृत्स्तोमो॑ वस॒न्त ऋ॒तुर्ब्रह्म॒ द्रवि॑णम् ॥ १० ॥ अर्थ - अत्यंत दंश करणारे सर्पासारखे यज्ञविघ्नकारी जे राक्षस त्यांचा नाश झाला. हे यजमाना, तूं पूर्वदिशेकडील जागेवर आरोहण कर. तेथें छन्दांपैकीं गायत्रीछन्द तुझें रक्षण करो. तसेंच सामांपैकीं रथन्तरसाम, स्तोमांपैकीं त्रिवृत्सोम, ऋतूंपैकीं वसंत व धनरूपा ब्राह्मणजाति तुझें रक्षण करो. ॥१०॥ विनियोग - दक्षि॑णा॒मा रो॑ह त्रि॒ष्टुप त्वा॑ऽवतु बृ॒हत्साम॑ पञ्चद॒श स्तोमो॑ ग्री॒ष्म ऋ॒तुः क्ष॒त्रं द्रवि॑णम्॥ ११ ॥ अर्थ - हे यजमाना, दक्षिण दिशेस आरोहण कर. तेथें त्रिष्टुप् छन्द, बृहत्साम, पञ्चदश स्तोम, ग्रीष्म ऋतु व धनभूत क्षत्रियजाति तुझें रक्षण करो. ॥११॥ विनियोग - प्र॒तीची॒मा रो॑ह॒ जग॑ती त्वाऽवतु वैरू॒पँ साम॑ सप्त॒दश स्तोमो॑ व॒र्षा ऋ॒तुर्विड् द्रवि॑णम् ॥ १२ ॥ अर्थ - हे यजमाना, तूं पश्चिम दिशेकडे आरोहण कर, तेथें जगती छन्द, वैरूप साम, सप्तदश स्तोम, वर्षाऋतु व द्रव्यरूपी वैश्यजाति तुझें रक्षण करो. ॥१२॥ विनियोग - उदी॑ची॒मा रो॑हानु॒ष्टुप् त्वा॑ऽवतु वैरा॒जँ सामै॑कविँ॒श स्तोमः॑ श॒रदृ॒तुः फलं॒ द्रवि॑णम् ॥ १३ ॥ अर्थ - हे यजमाना, उत्तरदिशेकडे आरोहण कर. तेथें अनुष्टुप् छन्द, वैराज साम, एकविंश स्तोम, शरदऋतु, व यज्ञफलात्मक द्रव्य तुझें रक्षण करो. ॥१३॥ विनियोग - 'प्रत्यस्ताम्' या मंत्रानें सिसें फेकावें. ऊ॒र्ध्वामा रो॑ह प॒ङ्क्तिस्त्वा॑ऽवतु साक्वररैव्॒अते साम॑नी त्रिवत्रयस्त्रिँ॒शौ स्तोमौ॑ हेमन्तशिशि॒रावृ॒तू वर्चो॒ द्रविणं॒ प्रत्य॑स्तं॒ नमु॑चेः॒ शिरः॑ ॥ १४ ॥ अर्थ - हे यजमाना, तूं ऊर्ध्वदिशेकडे आरोहण कर. तेथें पंक्ति छन्द, शाक्वर व रैवत साम, त्रिणव व त्रयस्रिंश स्तोम, हेमंत व शिशिर ऋतु, व धनरूपी ब्रह्मतेज तुझें रक्षण करो. ॥१४॥ विनियोग - 'सोमस्य त्विषिः' या मंत्रानें यजमानास व्याघ्रचर्मावर बसवावें. व 'मृत्योः' या मंत्रभागानें त्याचे पायाखालीं सोनें ठेवावें. व 'ओजोऽसि' या मंत्रभागानें नवच्छिद्र सुवर्णालंकार त्याचे डोक्यावर ठेवावा. सोम॑स्य॒ त्विषि॑रसि॒ तवे॑व मे॒ त्विषि॑र्भूयात् । मृ॒त्योः पा॒ह्योजो॑ऽसि॒ सहो॑ऽस्य॒मृत॑मसि ॥ १५ ॥ अर्थ - तूं सोमाची कांति आहेस. तुझ्यासारखी माझी कांति होवो. हे सुवर्णा, मृत्यूपासून माझें रक्षण कर. तूं निश्चयात्मक मनःसामर्थ्यरूपी, शरीरसामर्थ्यरूपी व अविनाशी आहेस. ॥१५॥ विनियोग - 'हिरण्यरूपा' या मंत्रानें यजमानाचे बाहू वर करावें. हिर॑ण्यरूपा उ॒षसो॑ विरो॒क उ॒भावि॑न्द्रा॒ उदि॑थः॒ सूर्य॑श्च । आ रो॑हतं वरुण मित्र॒ गर्त्तं॒ तत॑श्चक्षाथा॒मदि॑तिं॒ दितिं॑ च मि॒त्रो॒ऽसि॒ वरु॑णोऽसि ॥ १६ ॥ अर्थ - हे शत्रुनिवारक दक्षिण बाहो, व मित्रभूता वामबाहो, तुम्ही दोघे या यजमानावर आरोहण करा. तुम्ही सुवर्णाप्रमाणें प्रकाशमान, रात्रि संपल्यावर सूर्योदयीं आपआपल्या कार्यांत प्रवृत्त होणारे व इन्द्राप्रमाणें बलवान् आहांत. तुमचें कार्यसिद्ध करण्याकरितां सूर्य उदयास येतो. तुम्ही आपली सेना अखण्डित असलेली व शत्रुसेना खण्डित झालेली पहा. ॥१६॥ विनियोग - सुवर्णयुक्त व्याघ्रचर्मावर बसलेल्या राजावर पुरोहितादिकांनीं अभिषेक करावा. सोम॑स्य त्वा द्यु॒म्नेना॒भि षि॑ञ्चाम्य॒ग्नेर्भ्राज॑सा॒ सूर्य॑स्य॒ वर्च॒सिन्द्र॑स्येन्द्रि॒येण॑ । क्ष॒त्राणां॑ क्ष॒त्रप॑तिरे॒ध्यति॑ दि॒द्यून् पा॑हि ॥ १७ ॥ अर्थ - हे यजमाना, सोमाच्या यशानें, अग्नीच्या दीप्तीनें, सूर्याच्या तेजानें व इंद्राच्या इंद्रियसामर्थ्यानें मी तुजवर अभिषेक करतों. तूं क्षत्रियांचा अधिपति हो. हे सोमा, शत्रूंनीं टाकलेले बाण दूर करून या यजमानाचें रक्षण कर. ॥१७॥ विनियोग - इ॒मं दे॑वा असप॒त्नँ सु॑वध्वं मह॒ते क्ष॑त्राय मह॒ते ज्यैष्ठा॑य मह॒ते जान॑राज्या॒येन्द्र॑स्येन्द्रि॒याय॑ । इ॒माम॒मुष्य॑ पुत्रम॒मुष्यै॑ पुत्रम॒स्यै वि॒श ए॒ष वो॑ऽमी॒ राजा॒ सोमो॒ऽस्माकं॑ ब्राह्म॒णानाँ॒ राजा ॥ १८ ॥ अर्थ - हे सवित्रादि देवांनो, या अमुक नांवाच्या यजमानाला शत्रुरहित करा. त्यायोगें तो मोठें क्षत्रियत्व, ज्येष्ठत्व, लोकांचें आधिपत्य व आत्मज्ञानसामर्थ्य मिळवील. हा यजमान अमुक पुरुषाचा व अमुक बाईचा मुलगा आहे. (या ठिकाणीं जातीचें व देशाचें नांव घ्यावें) जसें हे कुरुपाञ्चालदेशीय प्रजांनो, हा खदिरवर्मा तुमचा राजा असो. आम्ही ब्राह्मण असल्यानें वल्लीरूपी हा सोम आमचा राजा असो. ॥१८॥ विनियोग - 'प्र पर्वतस्य' या मंत्रानें यजमानानें अंगावर पडलेलें अभिषेकोदक सर्व अंगाला चोळावें. अध्वर्यूनें यजमानास तीन मंत्रांनीं तीन वेळां व्याघ्रचर्मावर पाय आदळावयास लावावा. प्र पर्व॑तस्य वृष॒भस्य॑ पृ॒ष्ठान्नव॑श्चरन्ति स्व॒सिच॑ इया॒नाः । ता आऽव॑वृत्र्न्नध॒रागुद॑क्ता॒ अहिं॑ बु॒ध्यमनु॒ रीय॑माणाः । विष्णो॑र्वि॒क्रम॑णमसि॒ विष्णो॒र्विक्रा॑न्तमसि॒ विष्णोः॑ क्रा॒न्तम॑सि ॥ १९ ॥ अर्थ - पौर्णमास्यादि पर्वविशिष्ट व कामनांची वृष्टि करणार्या अग्नीच्या पाठीवरून निघून आलेलीं, सर्व विश्व भिजविणारीं, प्राप्त होणारीं व आहुति परिणामभूत अशीं हीं जलें, आदित्यमण्डलाप्रत जातात व वर गेलेल्या त्या तेथून आकाशांतील मेघाकडे जातात. हे माझ्या प्रथम पावला, तूं त्रिविक्रमावतार धारण करणार्या विष्णूचें प्रथम आक्रमण आहेस व त्यायोगें जिंकलेल्या पृथ्वीस्वरूपी आहेस. हे द्वितीय पावला, तूं विष्णूनें द्वितीय पावलानें जिंकलेल्या आन्तरिक्षरूपी आहेस. हे तृतीय पावला, तूं विष्णूनें तृतीय पावलानें जिंकलेल्या त्रिविशिष्टरूपी आहेस. ॥१९॥ विनियोग - नंतर सदोमण्डपांतून होमशाळेंत आल्यावर 'प्रजापते' या मंत्रानें होम करावा. प्रजा॑पते॒ न त्वदे॒तान्य॒न्यो विश्वा॑ रू॒पाणि॒ परि॒ ता ब॑भूव । यत्का॑मास्ते जुहु॒मस्तन्नो॑ अस्त्व॒यम॒म्मुष्य॑ पि॒तासाव॒स्य॑ पि॒ता व॒यँ स्या॑म॒ पत॑यो रयी॒णां स्वहा॑ । रुद्र॒ यत्ते॒ क्रिवि॒ परं॒ नाम॒ तस्मि॑न्हु॒तम॑स्यमे॒ष्टम॑सि॒ स्वाहा॑ ॥ २० ॥ अर्थ - हे प्रजापते, तुझ्याहून अन्य कोणीही देव या सर्व विविध रूपांची उत्पत्ति व नाश करण्यास समर्थ झाला नाहीं. म्हणून आम्ही ज्या फलाच्या इच्छेनें तुझा होम करतों ते फल आम्हांस मिळो. हा पुत्र यजमानाचा पिता आहे व हा यजमान या पुत्राचा पिता आहे. सपुत्र असे आम्ही या द्रव्यांचे स्वामी होऊं. हे रुद्रा, तुझें नांव कार्यकारी आहे. हे हविर्द्रव्या, त्या रुद्राच्या नांवांत तुझा होम केला. तूं माझ्या घरांत इष्ट असें द्रव्य स्थापन केलेंस. हें हवि सुहुत असो. ॥२०॥ विनियोग - 'इन्द्रस्य वज्रोऽसि' या मंत्रानें रथ त्याचे घरांतून बाहेर काढावा व वाजपेयाप्रमाणेंच त्याला घोडे जुंपावे. 'अव्यथायै' या मंत्रभागानें रथावर आरोहण करावें. 'मरुतां' या मंत्रभागानें सारथ्यानें उजवेकडील घोडयाला चाबूक मारावा. 'आपाम' या मंत्रभागानें गाईंमध्यें रथ उभा करावा. व 'समिन्द्रियेण' या मंत्रभागानें धनुष्याच्या अग्रानें गाईला स्पर्श करावा. इन्द्र॑स्य॒ वज्रो॑ऽसो मि॒त्रावरु॑णयोस्त्वा प्रशा॒स्त्रोः प्र॒शिषा॑ युनज्मि । अव्य॑थायै त्वा स्व॒धायै॒ त्वाऽरि॑ष्टो॒ अर्जु॑नो म॒रुतां॑ प्रस॒वेन॑ ज॒यापा॑म॒ मन॑सा॒ समि॑न्द्रि॒येण॑ ॥ २१ ॥ अर्थ - हे रथा, तूं इंद्राच्या वज्रासारखा आहेस. तुला मी आज्ञा करणार्या मित्रावरुणांच्या आज्ञेनें घोडे जोडतों. हे रथा, पीडा होऊं नये व अन्नरस प्राप्त व्हावा म्हणून मी तुजवर आरोहण करतों. हे अश्वा, देवांच्या आज्ञेनें शत्रुजय कर. आम्हीं आरंभलेलें कर्म मनानें प्राप्त केलें. आम्ही इंद्रियसामर्थ्यानें युक्त झालों. ॥२१॥ विनियोग - 'मा ते' या मंत्रभागानें 'अन्तःपात्य' देशांत रथ उभा करावा. मा ते॑ इन्द्र ते व॒यं तु॑राषा॒डयु॑क्तासो अब्र॒ह्मता॒ विद॑साम । तिष्ठा॒ र॑थमधि॒ यं व॑ज्रह॒स्ता र॒श्मीन् दे॑व यमसे॒ स्वश्वा॑न् ॥ २२ ॥ अर्थ - हे वज्र हातांत धरणार्या प्रकाशमान इंद्रा, ज्या रथांत तूं बसतोस त्याच्या उत्तम घोडयाचे लगाम हातांत धरतोस. हे शत्रुपराजय करणार्या इंद्रा, त्या रथाला जोडलेले व तुझे संबंधी असलेले आम्ही त्या रथापासून ब्रह्मज्ञानाहून इतर वस्तूप्रमाणें नष्ट न होऊं म्हणजे तेवढें अविनाशी आहे व तदितर वस्तु नष्ट होणारी आहे तसा आमचा नाश न होवो. ॥२२॥ विनियोग - रथविमोचनीयसंज्ञक चार आहुति 'अग्नये गृहपतये' वगैरे मंत्रांनीं होमाव्या. 'पृथिवि मातः' या मंत्रभागानें यजमानानें रथावरूनच भूमीकडे पहावें. अ॒ग्नये॑ गृ॒अहप॑तये॒ स्वाहा॒ सोमा॑य॒ वन॒स्प॑तये॒ स्वाहा॒ । म॒रुता॒मोज॑से॒ स्वाहेन्द्र॑स्येन्द्र्॒इयाय॒ स्वाहा॑ । पृथि॑वि मात॒र्मा मा॑ हिँसी॒र्मो अ॒हं त्वाम् ॥ २३ ॥ अर्थ - गृहपालक अग्नीला, वनस्पतिरूपी सोमाला, इन्द्रसंबंधी इंद्रियाला व मरुत्संबंधी बलाला हें हवि सुहुत असो. हे जगन्निर्मात्रि पृथ्वी, तूं माझी हिंसा करूं नकोस व मीहि तुझी हिंसा करणार नाहीं. ॥२३॥ विनियोग - 'हँ॒सः' या मंत्रानें यजमानानें रथावरून खालीं उतरावें. हँ॒सः शु॑चि॒षद्वसु॑रन्तरिक्ष॒सद्धोत॑ वेदि॒षदति॑थिर्दुरोण॒सत् । नृ॒षद्व॑र॒सदृ॑त॒सद्व्यो॑म॒सद॒ब्जा गो॒जा ऋ॑त॒जा अ॑द्रि॒जा ऋ॒तं बृ॒हत् ॥ २४ ॥ अर्थ - हे रथा, तूं पुढील विशेषणांनीं युक्त अशा सूर्याप्रमाणें आहेस. तुजवरून मी खालीं उतरतों. तो सूर्य अंधकाराचा नाशक, प्रकाशमान, सत्कर्मांत मनुष्यांची प्रेरणा करणारा, वायुरूपानें अंतरिक्षांत राहणारा, देवांना बोलावणारा, अग्निरूपानें वेदीवर राहणारा, अतिथीप्रमाणें सर्वपूज्य, यज्ञगृहांत राहणारा, मनुष्यांत, उत्कृष्ट स्थानांत व यज्ञांत राहणारा आणि मंडलरूपानें आकाशांत राहणारा आहे. तसेंच तूं जलांत मत्स्यरूपानें, पृथ्वीवर जारज, अण्डज, स्वेदज व उद्भिज्ज स्वरूपानें, सत्यांत, मेघांत जलरूपानें अगर पाषाणांत अग्निरूपानें राहणारा असून सर्वव्यापी व महत् अशा परब्रह्मरूपी आहेस. ॥२४॥ विनियोग - नंतर रथाच्या उजव्या चाकांवर असलेल्या दोन सोन्याच्या मण्यांना 'इयदसि' या मंत्रभागानें यजमानानें स्पर्श करावा. ते ब्रह्मदेवाला समर्पण करावें. नंतर 'ऊर्गसि' या मंत्रभागानें उंबराच्या शाखेला स्पर्श करावा. नंतर 'इन्द्रस्य वाम्' या मंत्रभागानें यजत्र भागानें अध्वर्यूनें यजमानाचे बाहु खालीं करावें. इय॑द॒स्यायु॑र॒स्यायु॒र्मयि॑ धेहि॒ युङ्ङ्अ॑सि॒ वर्चो॑ऽसि॒ वर्चो॒ मयि॑ धे॒ह्यूर्ग॒स्यूर्जं॒ मयि॑ धेहि । इन्द्र॑स्य वां वीर्य॒कृतो॑ बा॒हू अ॑भ्यु॒पाव॑हरामि ॥ २५ ॥ अर्थ - हे सुवर्णा, तूं शंभर रतीभार व आयुष्यरुपी आहेस म्हणून आम्हाला शंभर वर्षांचे आयुष्य दें. तसेंच तूं यज्ञसंभारानें युक्त व तेजस्वी आहेस म्हणून मला तेज दे. हे औदुंबरशाखे, तूं अन्नरसरूपी आहेस म्हणून मला अन्न दे. ऐश्वर्ययुक्त यजमानाच्या वीर्यसंपन्न बाहूंनो, तुम्हाला मी खालीं करतों. ॥२५॥ विनियोग - खैराची घडवंची व्याघ्रचर्माजवळ 'स्योनासि' या मंत्रभागानें ठेवावी. 'क्षत्रस्य योनिः' या मंत्रभागानें घडवंचीवर वस्त्र पसरावें. 'स्योनामासीद' या मंत्रानें घडवंचीवर यजमानाला बसवावें. स्यो॒नाऽसि॑ सु॒षदा॑ऽसि क्ष॒त्रस्य॒ योनि॑रसि । स्यो॒नामा सी॑द सु॒षदा॒मा सी॑द क्ष॒त्रस्य॒ योनि॒मा सी॑द ॥ २६ ॥ अर्थ - हे आसन्दि, तूं सुखकारक व वर बसणार्यास सुख देणारी आहेस. हे वस्त्रा, तूं क्षत्रियाचे पोषक आहेस. हे यजमाना, सुखकर, बसणार्याला सुख देणार्या व क्षत्रिय पोषक अशा घडवंचीवर बैस. ॥२६॥ विनियोग - 'निषस्साद' या मंत्रानें अध्वर्यूनें यजमानाच्या हृदयाला स्पर्श करावा. नि ष॑साद धृ॒तव्र॑तो॒ वरु॑णः प॒स्त्यास्वा । साम्रा॑ज्याय सु॒क्रतुः॑ ॥ २७ ॥ अर्थ - हा यज्ञकर्म करणारा, अनिष्ट निवारक व बुद्धिमान् असा यजमान स्वामित्वानें साम्राज्य भोगण्याकरितां बसला. ॥२७॥ विनियोग - 'अभिभूः' या मंत्रानें अध्वर्यूनें यजमानाच्या हातांत पांच फासे द्यावे. नंतर यजमानानें ब्रह्म्याला बोलवावें. नंतर अध्वर्यूनें यजमानाकडून सुमंगल नांवाच्या पुरुषाला बोलवावें. नंतर यजमानाला 'इन्द्रस्य वज्रः' या मंत्रानें अध्वर्यूनें 'स्फ्य' संज्ञक काष्ठवस्त्र द्यावें. अ॒भि॒भूर॑स्ये॒तास्ते॒ पञ्च॒ दिशः॑ कल्पन्तां॒ ब्रह्मँ॒स्त्वं ब्र॒ह्माऽसि॑ सवि॒ताऽसि॑ सतप्र॑सवो॒ वरु॑णोऽसि स॒त्यौजा॒ इन्द्रो॑.सि॒ विशौ॑जा रु॒द्रो॒ऽसि सु॒शेवः॑ । बहु॑कार॒ श्रेय॑स्कर॒ भूय॑स्क॒रन्द्र॑स्य॒ वज्रो॑ऽसि॒ तेन॑ मे रध्य ॥ २८ ॥ अर्थ - हे यजमाना, तूं पराजय करणारा आहेस. या पूर्वादि पांच दिशा तुझें कार्य करण्यास समर्थ होवोत. यानंतर ब्रह्म्याची व यजमानाचीं उत्तर-प्रत्युत्तरें आहेत. हे ब्रह्म्या, असें यजमानानें म्हणावें. हे यजमाना, तूं मोठा व प्रेरक आहेस आणि तुझी प्रेरणा अमोघ आहे असें ब्रह्म्यानें म्हणावें. यजमान - हे ब्रह्मन. ब्रह्मा - तूं अनिष्ट निवारक असून सत्य तेजानें युक्त आहेस. यजमान - हे ब्रह्मन्. ब्रह्मा - तूं ऐश्वर्यसंपन्न असून प्रजेंत तुझें अतिशय तेज आहे. यजमान - हे ब्रह्मन्. ब्रह्मा - तूं शत्रूंना रडविणारा व सुखकारक आहेस. यजमान - हे ब्रह्मन्. ब्रह्मा - तूं मोठा व प्रेरक आहेस आणि तुझी प्रेरणा अमोघ आहे. हे बहुमंगलकार्यकर्त्या, तुला मी बोलावतों. हे स्फ्या, तूं वज्ररूपी आहेस म्हणून माझ्या द्यूतभूमीवर रेघा ओढण्याचें कार्य कर. ॥२८॥ विनियोग - नंतर द्यूतभूमीवर सुवर्ण ठेऊन त्यावर 'अग्निः पृथुः' या मंत्रभागानें आज्याचा होम करावा. नंतर 'स्वाहाकृताः' या मंत्रभागानें पांच फासे जमिनीवर ठेवावे. अ॒ग्निः पृ॒थुर्धर्म॑ण॒स्पति॑र्जुषा॒णो अ॑ग्निः पृ॒थुर्धर्म॑ण॒स्पति॒राज्य॑स्य वेतु॒ स्वाहा॒ स्वाहा॑कृताः॒ सूर्य॑स्य र॒श्मिभि॑र्यत्ध्वँ सजा॒तानां॑ मध्य॒मेष्ठ्या॑य ॥ २९ ॥ अर्थ - अग्नीनें घृतपान करावें. तो अग्नि विशाल, जगाचा पालक व स्नेह करणारा असा आहे. आदर दाखविण्याकरितां मंत्रांत तेच शब्द पुनः आले. हें हवि सुहुत असो. हे अक्षांनो, तुम्ही स्वाहापूर्वक आहुतींनीं संतुष्ट होऊन सूर्यकिरणांबरोबर स्पर्धा करा व हा यजमान आपल्या बंधुवर्गांत मध्यभागीं बसण्यास योग्य (सर्व क्षत्रियश्रेष्ठ) होईल असा यत्न करा. ॥२९॥ विनियोग - 'सवित्राः' हा मंत्र म्हणून ऋत्विजांनीं सदोमण्डपांत गमन करावें. स॒वि॒त्रा प्र॑सवि॒त्रा सर॑स्वत्या वा॒चा त्वष्ट्रा॑ रू॒पैः पू॒ष्णा प॑शुभि॒रिन्द्रे॑णा॒स्मे बृह॒स्पति॑ना॒ ब्रह्म॑णा॒ वरु॑णे॒नौज॑सा॒ऽग्निना॒ तेज॑सा॒ सोमे॑न॒ राज्ञा॒ विष्णु॑ना दश॒म्या दे॒वत॑या॒ प्रसू॑तः॒ प्र स॑र्पामि ॥ ३० ॥ अर्थ - पुढील दहा देवतांच्या आज्ञेवरून मी गमन करतों. त्या दहा देवता ह्या. १. प्रेरक सविता २. वाग्रूपी सरस्वती ३. रूपवान् त्वष्टा ४. पशुयुक्त पूषा ५. हा इंद्र ६. देवयागांत ब्रह्मत्व करणारा बृहस्पति ७. ओजस्वी वरुण ८. तेजस्वी अग्नि ९. प्रकाशमान सोम व १०. दहावा यज्ञाधिष्ठाता विष्णु ॥३०॥ (येथें राजसूय यज्ञ संपला.) विनियोग - राजसूयाच्या शेवटीं असलेल्या सौत्रामणीयागाला चरकसौत्रामणी म्हणतात. तत्संबंधी मंत्र यापुढें सांगितलें आहेत. कोंब आलेले व कोंब न आलेले व्रीहि रेशमीवस्त्रांत बांधले आहेत. पैकीं कोंब न आलेल्यांचा भात शिजवावा. व त्यांत कोंब आलेले व्रीहि चुरून 'अश्विभ्यां पच्यस्व' या मंत्रानें मिसळावें. नंतर पशुवपामार्जनापर्यंत कर्म झाल्यावर दर्भांनीं 'वायुः पूतः' या मंत्रभागानें सुरेंतील कचरा दूर करावा. अ॒श्विभ्यां॑ पच्यस्व॒ सर॑स्वत्यै पच्य॒स्वेन्द्रा॑य सु॒त्राम्णे॑ पच्यस्व । वा॒युः पू॒तः प॒वित्रे॑ण प्र॒त्यङ्कसोमो॒ अति॑स्रुतः । इन्द्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥ ३१ ॥ अर्थ - हे सुरे, अश्विनीकुमार, सरस्वती देवी व चांगलें रक्षण करणारा इंद्र यांचेकरितां तूं परिपक्व हो. वायूनें शुद्ध केलेला सोम दर्भमय पवित्रानें पवित्र होऊन अधोमुख होऊन गमन करता झाला. तो इन्द्राचा संगति करणारा मित्र आहे. ॥३१॥ विनियोग - 'कुविदङ्ग' इत्यादि मंत्रांनीं तीन सुराग्रहांचें ग्रहण करावें. कु॒विद॒ङ्ग यव॑मन्तो॒ यवं॑ चि॒द्यथा॒ दान्त्य॑नुपू॒र्वं वि॒यूय॑ । इ॒हेहै॑षा कृणुहि॒ भोज॑नानि॒ ये ब॒हिषो॒ नम॑ उक्तिं॒ यज॑न्ति । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्य॒श्विभ्यां॑ त्वा॒ सर॑स्वत्यै॒ त्वेन्द्रा॑य त्वा सुत्राम्णे॑ ॥ ३२ ॥ अर्थ - हे सोमा, ज्याप्रमाणें पुष्कळ धान्याचें स्वामी असे शेतकरी आपलें पुष्कळ धान्य वेगळें करून शीघ्र कापतात त्याप्रमाणें या यजमानाचे ठायीं जे यजमान दर्भावर बसून हविर्भागात्मक अन्नाचा याग करितात, अशा इतर यजमानांच्या उपभोग्य वस्तु स्थापन कर. तात्पर्य - यज्ञ करणार्या इतरांचीं सर्व फलें या यजमानास मिळोत. हे सोमा, तूं उपयामानें गृहीत आहेस. अश्विनीकुमारांकरितां, सरस्वतीकरितां, व रक्षक इन्द्राकरितां तुझें मी ग्रहण करतों. ॥३२॥ विनियोग - 'युवाँसुराणाम्' ही सुराग्रहाची याज्या आहे व 'पुत्रमिव' ही पुरोऽनुवाक्या आहे. यु॒वँ सु॒राम॑मश्विना॒ नमु॑चावासु॒रे सचा॑ । वि॒पि॒पा॒ना शु॑भस्पती॒ इन्द्रं॒ कर्म॑स्वावतम् ॥ ३३ ॥ अर्थ - हे अश्विनीकुमारांनो, तुम्ही कर्म करण्यांकरितां या इंद्राचें पालन करा. तुम्ही नमुचिराक्षसांत असलेल्या अत्यंत रमणीय सोमाला एकत्र होऊन विशेषेकरून पिणारे असे, व शुभकर्माचे अधिपति आहां. ॥३३॥ विनियोग - पुत्रमि॑व पि॒तरा॑व॒श्विनो॒भेन्द्रा॒वथुः॒ काव्यै॑र्दँ॒सना॑भिः । यत्सु॒रामं॒ व्यापि॑ब॒ सची॑भिः॒ सर॑स्वती त्वा मघवन्नभिष्णक् ॥ ३४ ॥ अर्थ - हे इंद्रा, आईबाप मुलांचें रक्षण करितात त्याप्रमाणें दोघांही अश्विनीकुमारांनीं मंत्रांनीं व कर्मांनीं तुझें रक्षण केलें. कारण कीं हे इंद्रा, तूं नमुचिराक्षसवधादि कर्मांनीं अत्यंत रमणीय असा सोम विशेषेंकरून प्यालास. आणखी दुसरें कारण असें कीं, सरस्वती देवी तुझी सेवा करते. म्हणजे तूं सोमपान केलेंस म्हणून व सरस्वती तुझी सेवा करते म्हणून अश्विनीकुमारांनीं तुझें रक्षण केलें. ॥३४॥ ॥ दशमोऽध्यायः ॥ |