![]() |
शुक्ल यजुर्वेद विनियोग - चार ते आठ या पांच अध्यायांत अग्निष्टोमसंबंधी व इतरही प्रासंगिक मंत्र सांगितले. नवव्या अध्यायांत ३४ व्या मंत्रापर्यंत वाजपेयाचे मंत्र आहेत. ('देव सवितः' या मंत्रानें आज्याचा होम करावा.) देव॑ सवितः॒ प्रसु॑व य॒ज्ञं स्प्रसु॑व य॒ज्ञपतिं॒ भगा॑य । दि॒व्यो ग॑न्ध॒र्वः के॑त॒पूः केतं॑ नः पुनातु वा॒चस्पति॒र्वाजं॑ नः स्वदतु॒ स्वाहा॑ ॥ १ ॥ अर्थ - हे प्रकाशमान सर्वप्रेरक सवित्या, वाजपेययाग या यजमानाकडून ऐश्वर्यप्राप्तीकरितां करून घे. तुझ्या प्रसादानें आकाशांत असलेला, रश्मीचें धारण करणारा व अन्नपावक सूर्यमण्डलरूपी देव आमचें अन्न शुद्ध करो. तसेंच तुझ्या कृपेनें प्रजापति आमचें हवि भक्षण करो. हें सुहुत असो. ॥१॥ विनियोग - प्रातःसवनांत आग्रयणानंतर तीन अतिग्राह्यांचें व षोडशीचें ग्रहण करून प्रत्येक मंत्रानें पांच इंद्रदेवत्य ग्रहांचें ग्रहण करावें. ध्रुव॒सदं॑ त्वा नृ॒षदं॑ मनःसदमुपया॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा॒ जुष्तं॑ गृह्णाम्ये॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा॒ जुष्ट॑तमम् । अ॒प्सु॒षदं॑ त्वा घृत॒सदं॑ व्योम॒सद॑मुपया॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा॒ जुष्तं॑ गृह्णाम्ये॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा॒ जुष्ट॑तमम् । पृ॒थि॒वि॒सदं॑ त्वाऽन्तरिक्ष॒सदं॑ दिवि॒सदं॑ देव॒सदं॑ नाक॒सदौपया॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा॒ जुष्तं॑ गृह्णाम्ये॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा॒ जुष्ट॑तमम् ॥ २ ॥ अर्थ - हे सोमा, स्थिर लोकांत, मनुष्यांत व मनांत राहणार्या व इंद्रप्रिय अशा तुझें मी उपयामसंज्ञक पात्रांत ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. यावर इंद्रास अत्यंत प्रिय अशा तुझें मी इंद्राकरितां स्थापन करतों. हे सोमा, उदकांत, घृतांत व आकाशांत राहणार्या व इंद्रप्रिय अशा तुझें मी उपयामसंज्ञक पात्रांत ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे यावर इंद्रास अत्यंत प्रिय अशा तुझें मी ग्रहण करतों. हे सोमा, पृथिवीवर, अन्तरिक्षांत, द्युलोकांत, देवांत व स्वर्गांत राहणार्या व इंद्रप्रिय अशा तुझें मीं उपयामपात्रांत ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. यावर इंद्रास अत्यंत प्रिय अशा तुझें मी इंद्राकरितां स्थापन करतों. ॥२॥ विनियोग - अ॒पाँ रस॒मुद्व॑यसँ॒ सूर्ये॒ सन्तँ॑ स॒माहि॑तम् । अ॒पाँ रस॑स्य॒ यो रस॒तं वो॑ गृह्णाम्युत्त॒ममुपया॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा॒ जुष्तं॑ गृह्णाम्ये॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा॒ जुष्ट॑तमम् ॥ ३ ॥ अर्थ - सूर्यांत स्थापन केलेला जलाचा रस जो वायु त्याचें मी ग्रहण करतों. तो वायु अन्नोत्पादक आहे. जलरस वायूचा सारभूत जो उत्तम प्रजापति त्याचेंही मी तुमच्याकरितां ग्रहण करतों. हे सोमा, इंद्रप्रिय अशा तुझें मीं उपयामसंज्ञक पात्रांत ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. यावर इंद्रास अत्यंत प्रिय अशा तुझें मी इंद्राकरितां स्थापन करतों. ॥३॥ विनियोग - ग्रहा॑ ऊर्जाहुतयो॒ व्यन्तो॒ विप्रा॑य म॒तिम् । तेषां॒ विशि॑प्रियाणां वो॒ऽहमिष॒मूर्जँ॒ सम॑ग्रभौपया॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा॒ जुष्तं॑ गृह्णाम्ये॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा॒ जुष्ट॑तमम् स॒म्पृचौ॑ स्थः॒ सं मा॑ भ॒द्रेण॑ पृङ्क्तं वि॒पृचौ॑ स्थो॒ वि मा॑ पा॒प्मना॑ पृङ्क्तम् ॥ ४ ॥ अर्थ - अन्नरसाचें आव्हान करणार्या व इंद्राची सद्बुद्धि प्राप्त करून देणार्या ग्रहांनो, ज्यांत हनवटीचा व्यापार करावा लागत नाहीं म्हणजे तो चावावा लागत नाहीं. कारण कीं तो उत्तम रीतीनें कांडलेला आहे, अशा तुमच्यांतील अन्नभूत रसाचें मी ग्रहण करतों. हे सोमा, इंद्रप्रिय अशा तुझें मी उपयामसंज्ञक पात्रांत ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. यावर इंद्रास अत्यंत प्रिय अशा तुझें मी इंद्राकरितां स्थापन करतों. हे सोमसुराग्रहांनो, तुम्ही एकत्र राहणारे आहां म्हणून मला कल्याणयुक्त करा. ('वितृची' या मंत्रभागानें अध्वर्यु व नेष्टयांने आपले ग्रह (पात्रें) आपल्या जवळ आणावीं.) हे ग्रहांनो, तुम्ही वियुक्त आहां म्हणून मला पापापासून वियुक्त करा. ॥४॥ विनियोग - 'इन्द्रस्य वज्रः' या मंत्रभागानें शकटावरून रथ खालीं उतरावा. नंतर रथाचें जोकड धरून तो वेदीवर ठेवावा. इन्द्र॑स्य॒ वज्रो॑ऽसि वाज॒सास्त्वया॒यं वाजँ॑ सेत् । वाज॑स्य॒ नु प्र॑स॒वे मा॒तरं॑ म॒हीमदि॑तीं॒ नाम॒ वच॑सा करामहि । यस्या॑मि॒दं विश्वं॒ भुव॑नमावि॒वेश॒ तस्यां॑ नो दे॒वः स॑वि॒ता धर्म॑ साविषत् ॥ ५ ॥ अर्थ - हे रथा, तूं इंद्राचें वज्र आहेस व अन्न देणारा आहेस. तुझ्या साहाय्यानें या यजमानाला अन्न मिळो. अन्नाच्या आज्ञेंतच राहणारे आम्ही ज्या जगन्निर्माण करणार्या, मोठया व अखण्डित अशा पृथिवीला या वेदवाक्यांने अनुकूल करून घेतों व जिच्यांत हें सर्व जग प्रविष्ट झालें त्या पृथिवीवरच राहण्याची प्रकाशमान सवित्यानें आम्हांस प्रेरणा करावीं. ॥५॥ विनियोग - स्नानाकरितां नेत असतां 'अप्स्वन्तः' व 'देवीरापः' या दोन मंत्रांनीं घोडयांवर पाणी शिंपावें. अ॑प्स्वन्तर॒मृत॑म॒प्सु भे॑ष॒जम॒पामु॒त प्रश॑स्ति॒ष्वश्वा॒ भव॑त वा॒जिनः॑ । देवी॑रापो॒ यो व॒ ऊ॒र्मिः प्रतू॑र्तिः क॒कुन्मा॑न् वाज॒सास्तेना॒यं वाजँ॑ सेत् ॥ ६ ॥ अर्थ - हे घोडयांनो, जलांत अमृत व औषध आहे त्यामुळें तुम्ही अन्नवान् व्हा व त्यांतील उत्तम जागीं तुम्ही असा. हे प्रकाशमान जलांनो, तुमची जी वेगवान्, जलौघयुक्त व अन्नदात्री लाट(तरंग) आहे तिच्या योगें भिजलेला हा घोडा यजमानाला अन्न देवो. ॥६॥ विनियोग - 'वातो वा' या मंत्रभागानें घोडा उजवे बाजूकडे जुंपावा. वातो॑ वा॒ मनो॑ वा गन्ध॒र्वाः स॒प्तविँ॑शतिः । ते अग्रेऽश्व॑मयुञ्जँ॒स्ते अ॑स्मिञ्ज॒वमा द॑धुः ॥ ७ ॥ अर्थ - वायु, मन, सत्तावीस नक्षत्रें हे सर्व पृथ्वीधारक आहेत. त्यांनीं प्रथम रथाला घोडा जुंपला व त्यांनींच त्याला वेग दिला. ॥७॥ विनियोग - 'वातारँहा' या मंत्रभागानें उत्तरेकडील घोडा जुंपावा. वात॑रँहा भव वाजिन्यु॒ज्यमा॑न॒ इन्द्र॑स्येव॒ दक्षि॑णः श्रि॒यैधि॑ । यु॒ञ्जन्तु॑ वा म॒रुतो॑ वि॒श्ववे॑दस॒ आ ते॒ त्वष्टा॑ प॒त्सु ज॒वं द॑धातु ॥ ८ ॥ अर्थ - हे वेगवान् अश्वा, रथांत जोडला जाणारा तूं वायूप्रमाणें वेगवान् हो. हे उजवेकडील घोडया, तूं इंद्राच्या घोडयाप्रमाणें सुशोभित हो. हे अश्वा, सर्वज्ञदेव तुला रथाला जोडोत व प्रकाशमान त्वष्टा तुझ्यां पायांत वेग उत्पन्न करो. ॥८॥ विनियोग - 'जवो यस्ते' या मंत्रभागानें तिसरा घोडा जुंपावा. 'वाजिनः' या मंत्रभागानें बार्हस्पत्य चरु घोडयांना हुंगवावा. ज॒वो यस्ते॑ वाजि॒न्निहि॑तो॒ गुहा॒ यः श्ये॒ने परी॑त्तो॒ अच॑रच्च॒ वाते॑ । तेन॑ नो वाजि॒न् बल॑वा॒न् बले॑न वाज॒जिच्च॒ भव॒ सम॑ने च पारयि॒ष्णुः । वाजि॑नो वाजजितो॒ वाजँ॑ सरि॒ष्यन्तो॒ बृह॒स्पते॑र्भा॒वमव॑जिघ्रत ॥ ९ ॥ अर्थ - हे अश्वा, जो तुझा वेग हृदयांत ठेवलेला आहे व तूंच दिलेला जो वेग श्येन पक्ष्यांत व वायूंत संचार करतो त्या तीन प्रकारच्या वेगरूपी बळानें युक्त होऊन आम्हांला अन्न मिळवून देणारा व संग्रामांत जय मिळवून देणारा हो. अन्न जिंकणार्या व अन्नाकडे जाणार्या घोडयांनो, तुम्ही बृहस्पतिभाग जो चरु त्याचें अवघ्राण करा. ॥९॥ विनियोग - 'देवस्याहम्' हा मंत्रभाग म्हणून ब्रह्म्यानें रथचक्रावर आरोहण करावें. नंतर पुढील 'देवस्याहम्' हा मंत्रभाग म्हणून ब्रह्म्यानें रथचक्रावरून खालीं उतरावें. दे॒वस्या॒हँ स॑वि॒तुः स॒वे स॒त्यस॑वसो इन्द्र॑स्योत्त॒मं नाकँ॑ रुहेयम् । दे॒वस्या॒हँ स॑वि॒तुः स॒वे स॒त्यस॑वसो बृह॒स्पतेरुत्त॒मं नाकँ॑ रुहेयम् । दे॒वस्या॒हँ स॑वि॒तुः स॒वे स॒त्यस॑वसो बृह॒स्पतेरुत्त॒मं नाकँ॑ नाक॑मरुहम् । दे॒वस्या॒हँ स॑वि॒तुः स॒वे स॒त्यस॑वसो इन्द्र॑स्योत्त॒मं नाकँ॑ रुहेयम् ॥ १० ॥ अर्थ - अनुज्ञा खरी असलेल्या सवितृदेवाच्या आज्ञेनें मी बृहस्पतीसंबंधीं व उत्तम अशा स्वर्गावर आरोहण करतों. (क्षत्रिय यजमानानें यज्ञ केला असल्यास) इंद्रसंबंधीं व उत्तम स्वर्गावर आरोहण करतों असें म्हणावें. अनुज्ञा उत्कृष्ट व खरी असलेल्या सवितृदेवाच्या आज्ञेनें मी बृहस्पतीसंबंधीं व उत्तम अशा स्वर्गावर आरोहण केलें. (पूर्वीप्रमाणेंच क्षत्रिय यजमानानें यज्ञ केला असल्यास इंद्रसंबंधीं व उत्तम अशा स्वर्गावर आरोहण केलें असें म्हणावें.) ॥१०॥ विनियोग - वेदीजवळ असलेल्या सतरा नगार्यांपैकीं एक 'बृहस्पते वाजम्' या मंत्रानें वाजवावा, बाकीचे वाजवितांना मंत्र म्हणूं नये. 'बृहस्पते वाजं' हा मंत्र ब्राह्मणानें केलेल्या यागाकरितां आहे व 'इन्द्र वाजं' हा मंत्र क्षत्रियानें केलेल्या यागाकरितां आहे. बृह॑स्पते॒ वाजं॑ जय॒ बृह॒स्पत॑ये॒ वाचं॑ वदत॒ बृह॒स्पतिं॒ वाजं॑ जापयत । इन्द्र॒ वाजं॑ ज॒येन्द्रा॑य॒ वाचं॑ वद॒तेन्द्रं॒ वाजं॑ जापयत ॥ ११ ॥ अर्थ - हे दुन्दुभींनो, तुम्ही बृहस्पतीला जाऊन सांगा कीं, हे बृहस्पते, तूं अन्न जिंकून आण. आणखी हे दुन्दुभींनो, तुम्ही बृहस्पतीकडून अन्नाचा जय करवा. हे दुन्दुभींनो, तुम्ही इंद्राला जाऊन सांगा कीं, हे इंद्रा, तूं अन्न जिंकून आण व हे दुन्दुभींनो, तुम्ही इंद्राकडून अन्नजय करवा. ॥११॥ विनियोग - समंत्रक वाजविलेला नगारा 'एषा वः' या मंत्रभागानें खालीं उतरावा व बाकीचे अमंत्रकच खालीं उतरावे. दुसरा 'एषा वः' हा मंत्र क्षत्रियानें केलेल्या यागाकरितां आहे. ए॒षा वः॒ सा स॒त्या सं॒वाग॑भू॒द्यया॒ बृह॒स्पतिं॒ वाज॒मजी॑जप॒ताजी॑जपत॒ बृह॒स्पतिं॒ वाजं॒ वन॑स्पतयो॒ विमु॑च्यध्वम् । ए॒षा वः॒ सा स॒त्या सं॒वाग॑भूद्ययेन्द्रं॒ वाज॒मजी॑जप॒ताजी॑जप॒तेन्द्रं॒ वाजं॒ वन॑स्पतयो॒ विमु॑च्यध्वम् ॥ १२ ॥ अर्थ - हे दुन्दुभींनो, ज्या वाणीनें तुम्हीं बृहस्पतीकडून अन्नजय करविला ती वाणी फारच खरी ठरली. हे वनस्पतीपासून बनलेल्या दुन्दुभींनो, तुमचें काम संपलें. आतां तुम्ही बन्धनापासून मुक्त व्हा. (क्षत्रिययज्ञांतील मंत्राचा अर्थ) हे दुन्दुभींनो, ज्या वाणीनें तुम्हीं इंद्राकडून अन्नजय करविला ती वाणी फारच खरी ठरली. हे वनस्पतीपासून बनलेल्या दुन्दुभींनो, तुमचें काम संपलें. आतां तुम्ही बंधनापासून मुक्त व्हा. ॥१२॥ विनियोग - 'देवस्याहम्' हा मंत्र म्हणून यजमानानें जोडलेल्या रथावर आरोहण करावें. 'वाजिनः' हा मंत्रभाग यजमानाकडून म्हणवावा. दे॒वस्या॒हँ स॑वि॒तुः स॒वे स॒त्यप्र॑सवसो॒ बृ॒हस्पते॑र्वाज॒जितो॒ वाजं॑ जेषम् । वाजि॑नो वाजजि॒तोऽध्व॑न स्कभ्नु॒वन्तो॒ योज॑ना॒ मिमा॑नाः॒ काष्ठां॑ गच्छत ॥ १३ ॥ अर्थ - अनुज्ञा खरी असलेल्या सवितृदेवाच्या आज्ञेनें मी अन्न जिंकणार्या बृहस्पतीच्या संबंधीं अन्न जिंकेन. अन्न जिंकणार्या, मार्ग अडविणार्या, व शीघ्रगमनानें योजनें मोजणार्या हे अश्वांनो, मार्गाच्या शेवटपर्यंत जा. ॥१३॥ विनियोग - 'एष स्य वाजी' इत्यादि दोन मंत्रांनीं आज्यहोम करावा. ए॒ष स्य वा॒जि क्षि॑प॒णिं तु॑रण्यति ग्री॒वायां॑ ब॒द्धो अ॑पिक॒क्ष आ॒सनि॑ । क्रतुं॑ दधि॒क्रा अनु॑ सँ॒सनि॑ष्यदत्प॒थामङ्काँ॒स्यन्व॒अपनी॑फण॒त् स्वाहा॑ ॥ १४ ॥ अर्थ - हा घोडा चाबूक मारल्यावर शीघ्र गमन करतो. या घोडयाचें मान, काखा व मुख या ठिकाणीं निरनिराळ्या रज्जूंनीं बंधन केलें आहे. हा घोडा मार्गांत आडव्या येणार्या पाषाणादिकांना ओलांडणारा, बसणार्याच्या इच्छेप्रमाणें चालणारा व मार्गांतील उंचनीच जागीं शीघ्र गमन करणारा आहे. हे हवि सुहुत असो. ॥१४॥ विनियोग - उ॒त स्मा॑स्य॒ द्रव॑तस्तुरण्य॒तः प॒र्णं न वेरनु॑वाति प्रग॒र्धिनः॑ । श्ये॒नस्ये॑व॒ ध्रज॑तो अङ्क॒सं परि॑ दधि॒क्राव्णः॑ स॒होर्जा तरि॑त्रतः॒ स्वहा॑ ॥ १५ ॥ अर्थ - आणखी, उडणार्या पक्ष्याच्या पंखाप्रमाणें या घोडयाचे सर्व अंगावर असलेली झूल तो शीघ्र धांवत असतां वर उचलून जातांना दिसते. तो घोडा आपलें पोंचण्याचें स्थान शीघ्र येवो म्हणून इच्छा करतो. तसेंच श्येनपक्ष्याप्रमाणें शीघ्रवेगानें धावणार्या व मार्गांतील पाषाणादिकांचें उल्लंघन करणार्या, जोरानें मार्ग आक्रमण करणार्या या घोडयाची झूल स्पष्ट दिसते. हें हवि सुहुत असो. ॥१५॥ विनियोग - 'शं नो' इत्यादि तीन मंत्रांनीं आज्यहोम करावा. शं नो॑ भवन्तु वा॒जिनो॒ हवे॑षु दे॒वता॑ता मि॒तद्र॑वः स्व॒र्काः । ज॒म्भय॒न्तोऽहिं॒ वृकँ॒ रक्षाँ॑सि॒ सने॑म्य॒स्मद्यु॑यव॒न्नमी॑वः ॥ १६ ॥ अर्थ - यज्ञकर्मांत बोलावणी आलीं असतां घोडे आम्हांला सुखकर होवोत. ते घोडे परिमित गमन करणारे, उत्तम कांतिमान् व राक्षसांचा नाश करणारे असे आहेत. तसेंच ते आमच्या व्याधींना शीघ्र दूर करोत. ॥१६॥ विनियोग - ते नो॒ अर्वन्तो हवन॒श्रुतो॒ हवं॒ विश्वे॑ शृण्वन्तु वा॒जिनो॑ मि॒तद्र॑वः । स॒हस्र॒धा मे॒धसा॑ता सनि॒ष्यवो॑ म॒हो ये धनँ॑ समि॒थेषु॑ जभ्रि॒रे ॥ १७ ॥ अर्थ - ज्यांनीं संग्रामातून पुष्कळ द्रव्य आणलें ते सर्व घोडे आमचें आव्हान ऐकोत. ते बोलावणें ऐकणारे, यजमानाच्या इच्छेनें परिमित गमन करणारे, हजारों लोकांना संतुष्ट करणारें, अन्नराशि देणारे, व यज्ञशाला पूर्ण करणारे आहेत. ॥१७॥ विनियोग - वाजे॑-वाजेऽवत वाजिनो नो॒ धने॑षु विप्रा अमृता ऋतज्ञाः । अ॑स्य मध्वः॑ पिबतः मा॒दय॑ध्वं तृ॒प्ता या॑त प॒थिभि॑र्देव॒यानैः॑ ॥ १८ ॥ अर्थ - हे अश्वांनो, सर्व अन्ने व धनें प्राप्त झालीं असतां आमचें रक्षण करा. तुम्ही बुद्धिमान्, अविनाशी व यज्ञ जाणणारे आहां. हें गोड नीवारादि तृण खा व संतुष्ट व्हा व नंतर देव जातात त्या मार्गांनीं गमन करा. ॥१८॥ विनियोग - यजमानानें रथावरून उतरून 'आ मा वाजस्य' या मंत्रानें निवारचरूला स्पर्श करावा. नंतर घोडयाकडून त्या चरूचें अवघ्राण करवावें. आ मा॒ वाज॑स्य प्रस॒वो जगम्या॒देमे द्यावा॑पृथि॒वी विश्व॑रूपे । आ मा॑ गन्ता पि॒तरा॑ मा॒तरा॒ चा मा॒ सोमो॑ अमृत॒त्त्वेन॑ गम्यात् । वाजि॑नो वाजजितो॒ वाजँ॑ ससृ॒वा@ंसो॒ बृह॒स्पते॑र्भा॒गमव॑जिघ्रत निमृजा॒नाः ॥ १९ ॥ अर्थ - अन्नाची उत्पत्ति, सर्वव्यापी द्युलोक व पितृलोक, आमचे आई, बाप आणि सोम हे मला देवजन्म प्राप्त करून देण्याकरितां मजकडे येवोत. हे अश्वांनो, तुम्ही बृहस्पतीसंबंधीं हविर्भागाचें अवघ्राण करा. तुम्ही अन्न जिंकणारे, तें जिंकण्याकरितां जाणारे व यजमानाला पवित्र करणारे आहांत. ॥१९॥ विनियोग - 'आपये स्वाहा' वगैरे मंत्रांनीं स्रुव्यानें बारा आहुतींचा होम करावा. आ॒पये॒ स्वाहा॑ स्वा॒पये॒ स्वाहा॑ ऽपि॒जाय॒ स्वाहा॑ कत॑वे॒ स्वाहा॑ वस॑वे॒ स्वाहा॑ ऽह॒र्पत॑ये॒ स्वाहा॑ऽ न्हे॑ मु॒घ्धाय॒ स्वाहा॑ मु॒ग्ध्याय॑ वैनँशि॒न्याय॒ स्वाहा॑ विनयँ॒शिन॑ आन्त्याय॒नाय॒ स्वाहा॑ ऽन्त्या॑य भौव॒नाय॒ स्वाहा॑ भुव॑नस्य॒ पत॑ये॒ स्वाहा॑ ऽधि॑पतये॒ स्वाहा॑ ॥ २० ॥ अर्थ - प्राप्त करणारा, उत्तम रीतीनें प्राप्त करणारा, पुनः पुनः उत्पन्न होणारा, यज्ञरूपी, निवासाला कारण असलेला, दिवसांचा स्वामी, मोहक दिवस, विनाशकांत असणारा, मोहकस्वरूपी, अंत्यस्थानावरील विनाशशील, शेवटचा भुवनस्थ, जगत्पालक व सर्व लोकांचा अधिपति जो प्रजापति त्याला हें हवि सुहुत असो. ॥२०॥ विनियोग - 'आयुर्वज्ञेन' वगैरे सहा मंत्रभाग यजमानाकडून म्हणवावे. पत्नीनें व यजमानानें यूपारोहण करावें. 'स्वः' या मंत्रभागानें यजमानानें चषालाला स्पर्श करावा. व 'अमृताः' या मंत्रभागानें त्यानें आपलें डोकें यूपाचे वर करावें. आयु॑र्य॒ज्ञेन॑ कल्पतां प्रा॒णो य॒द्न्येन॑ कल्पतां॒ चक्षु॑र्य॒ज्ञेन॑ कल्पताँ॒ श्रोत्रं॑ य॒ज्ञेन॑ कल्पतां पृ॒ष्ठं य॒ज्ञेन॑ कल्पतां य॒ज्ञो य॒ज्ञेन॑ कल्पतां प्र॒जाप॑तेः प्र॒जा अ॑भूम॒ स्व॒र्देवा अगन्मा॒मृता॑ अभूम ॥ २१ ॥ अर्थ - माझें आयुष्य, पंचप्राण, चक्षु, श्रोत्र, पृष्ठभाग व माझा यज्ञ हीं वाजपेय यज्ञानें चांगलीं सामर्थ्ययुक्त बनोत. हे देवांनो, आम्ही प्रजापतीची प्रजा बनलों. हे देवांनो, आम्ही स्वर्गाप्रत प्राप्त झालों व आम्ही मरणरहित बनलों. ॥२१॥ विनियोग - यूपारोहण करून यजमानानें 'अस्मे' या मंत्रभागानें सर्व दिशांकडे पहावें. नंतर 'नमो मात्रे' या भागानें भूमीकडे पहावें. घडवंचीवर पशूचें चर्म आंथरावें. नंतर 'यन्तासि' या मंत्रभागानें यजमानाला घडवंचीवर बसवावें. अ॒स्मे वो॑ अस्त्विन्द्रि॒यम॒स्मे नृ॒म्णमु॒त क्रतु॑र॒स्मे वर्चाँसि सन्तु वः । नमो॑ मा॒त्रे पृ॑थि॒व्यै नमो॑ मा॒त्रे पृ॑थि॒व्या इ॒यं ते॒ राड् य॒न्तासि॒ यम॑नो ध्रु॒वो॒ऽसि ध॒रुणः॑ । कृ॒ष्यै त्वा॒ क्षेमा॑य त्वा र॒य्यै त्वा॒ पोषा॑य त्वा ॥ २२ ॥ अर्थ - हे दिशांनो, तुमचें वीर्य, द्रव्य, कर्म, तेज हीं सर्व आमचे ठायीं असोत. मातृरूप पृथ्वीला पुष्कळ नमस्कार असोत. हे आसन्दि (घडवंची), हें तुझें राज्य आहे. हे यजमाना, तूं नियमन करणारा, आत्मनिग्रह करणारा, स्थिर व धारक असा आहेस. शेती, क्षेम (मिळालेल्या द्रव्याचें रक्षण) द्रव्य व पशुपुत्रादिकांच्या वृद्धीकरितां तुला मी या ठिकाणीं बसवितों. ॥२२॥ विनियोग - 'वाजस्येमम्' इत्यादि मंत्रभागानीं साह आहुतींचा स्रुव्यानें होम करावा. वाज॑स्ये॒मं प्र॑स॒वः सु॑षु॒वेऽग्रे॒ सोमँ॒ राजा॑न॒मोष॑धीष्व॒प्सु । ता अ॒स्मभ्यं॒ मधु॑मतिर्भवन्तु व॒यँ रा॒श्ट्रे जा॑गृयाम पु॒रोहि॑तः॒ स्वाहा॑ ॥ २३ ॥ अर्थ - अन्नोत्पादक प्रजापतीनें सृष्टीच्या आरंभीं औषधींत व जलांत असलेल्या प्रकाशयुक्त अशा सोमवल्ली रसाला उत्पन्न केलें. त्या सोमोत्पादक औषधि व तीं जलें आमच्याकरितां माधुर्ययुक्त होवोत म्हणजे त्या आम्हांला गोड लागोत. त्यांनीं अभिषिक्त केलेले आम्ही आपल्या राज्यांत सावधान राहूं व यागादि करण्यांत अग्रेसर होऊं. हें हवि सुहुत असो. ॥२३॥ विनियोग - वाज॑स्ये॒मं प्र॑स॒वः शि॑श्रिये॒ दिव॑मि॒मा च॒ विश्वा॒ भुव॑नानि स॒म्राट् । अदि॑त्सन्तं दापयति प्रजा॒नन्त्स नो॑ र॒यिँ सर्व॑वीरं॒ नि य॑॑च्छतु॒ स्वाहा॑ ॥ २४ ॥ अर्थ - अन्नोत्पादक ईश्वर ही पृथ्वी, द्युलोक, सर्व भुवनें व सर्व प्राणी यांना आश्रित करून राहिला. सर्व भुवनांचा राजा असा तो मला हविर्दानाची इच्छा नाहीं असें जाणून मला सद्बुद्धि देऊन हविर्भाग देववितो. तो आम्हांला सर्व पुत्रभृत्यादिकांसह द्रव्य देवो. ॥२४॥ विनियोग - वाज॑स्य॒ नु प्र॑स॒व आ ब॑भूवे॒मा च॒ विश्वा॒ भुव॑नानि स॒र्वतः॑ । सने॑मि॒ राजा॒ परि॑ याति वि॒द्वान् प्र॒जां पुष्टिं॑ व॒र्धय॑मानो अ॒स्मे स्वहा॑ ॥ २५ ॥ अर्थ - अन्नाचा उत्पादक प्रजापति सर्वत्र सर्व भुवनांना निर्माण करता झाला. चिरन्तन असा तो राजा प्रकाशित होऊन सर्वत्र गमन करतो. तो आपला अधिकार जाणणारा व आमच्यांत पुत्रादिसंतति व द्रव्यवृद्धि करणारा आहे. हें हवि सुहुत असो. ॥२५॥ विनियोग - सोम॒ङ् राज॑न॒मव॑से॒ऽग्निम॒न्वार॑भामहे । आ॒दि॒त्यान्विष्णुँ॒ सूर्यं॑ ब्र॒ह्माणं॑ च॒ बृह॒स्पतिं॒ स्वाहा॑ ॥ २६ ॥ अर्थ - संरक्षणाकरितां सोमराजा, अग्नि, आदित्य, विष्णु, सूर्य, ब्रह्मा व बृहस्पति यांचें आव्हान करतो. हें हवि सुहुत असो. ॥२६॥ विनियोग - अ॒र्यमणं॒ बृह॒स्पति॒मिन्द्रं॒ दाना॑य चोदय । चाचं॒ विष्णुं॒ सर॑स्वतिं सवि॒तारं च वा॒जिनं॒ स्वाहा॑ ॥ २७ ॥ अर्थ - हे ईश्वरा, तूं अर्यमा, बृहस्पति, इन्द्र, वागधिष्ठात्री सरस्वती, विष्णु व अन्नवान् सविता यांस मला धन देण्याची प्रेरणा कर. हें हवि सुहुत असो. ॥२७॥ विनियोग - अग्ने॒ अच्छा॑ वदे॒ह नः॒ प्रति॑ नः सु॒मना॑ भव । प्र नो॑ यच्छ सहस्रजि॒त्त्वँ हि ध॑न॒दा असि॒ स्वाहा॑ ॥ २८ ॥ अर्थ - हे अग्ने, या कर्मांत (आमच्याकडे ये) आम्हांस हितकारक असें बोल. व आमच्यावर दया करणारा हो. हे बहु द्रव्य जिंकणार्या तूं स्वभावतःच धन देणारा आहेस म्हणून आम्हांला द्रव्य दे. हें हवि सुहुत असो. ॥२८॥ विनियोग - प्र नो॑ य च्छत्वर्य॒मा प्र पूषा प्र भ्रुह॒स्पतिः॑ । प्र वाग्दे॒वी द॑दातु॒ नः॒ स्वाहा॑ ॥ २९ ॥ अर्थ - अर्यमा, पूषा, बृहस्पति व सरस्वती देवी आम्हांला अभीष्ट देवो. हें हवि सुहुत असो. ॥२९॥ विनियोग - 'देवस्य त्वा' या मंत्रभागानें होमद्रव्याच्या अवशिष्ट भागानें यजमानास अभिषेक करावा. दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पूष्णो हस्ता॑भ्याम् । सर॑स्वत्यै वा॒चो य॒न्तुर्य॒न्त्रिये॑ दधामि॒ बृह॒स्पते॑ष्ट्वा॒ साम्रा॑ज्येना॒भि षि॑ञ्चाम्यसौ ॥ ३० ॥ अर्थ - सर्व प्रेरक सवित्याच्या प्रेरणेनें अश्विनीकुमारांच्या बाहूंनीं व पूष्याच्या हातांनीं नियमन करणार्या सरस्वतीच्या नियमनरूपी ऐश्वर्यांत स्थापन करतों. या ठिकाणीं यजमानाचें नांव घ्यावें. हे अमुकसंज्ञक यजमाना, बृहस्पतीच्या साम्राज्यानें मी तुजवर अभिषेक करतों. ॥३०॥ विनियोग - 'अग्निरेकाक्षरेण' या अनुवाकाला उज्जितिसंज्ञक मंत्र म्हणतात. ते यजमानाकडून बोलवावें. अ॒ग्निरेका॑क्षरेण प्रा॒णमुद॑जय॒त्तमुज्जे॑षम॒श्विनौ॒ द्व्य॒क्षरेण द्वि॒पदो॑ मनु॒ष्यानुद॑जयतां॒ तानुज्जे॑षं॒विष्णु॒स्त्र्य॒क्षरेण॒ त्रीँल्लो॒कद॑जय॒त्तनुज्जे॑षँ॒ सोम॒श्चतु॑रक्षरेण॒ चतु॑ष्पदः प॒शूनुद॑जय॒त्तनुज्जे॑षम् ॥ ३१ ॥ विनियोग - पू॒षा पञ्चा॑क्षरेण॒ पञ्च॒ दिश॒ उद॑जय॒त्त उज्जे॑षँ स्वि॒ता षड॑क्षरेण॒ षडृ॒तूनुद॑जय॒त्तनुज्जे॑षं म॒रुतः॑ स॒प्ता॒क्ष॑रेण स॒प्त ग्रा॒म्यान् प॒शूनुद॑जयँ॒त्तनुज्जे॑षं॒ बृह॒स्पति॑र॒ष्टाक्ष्॑अरेण गाय॒त्रीमुद॑जय॒त्तनुज्जे॑षम् ॥ ३२ ॥ अर्थ - पूष्यानें पञ्चाक्षर छन्दानें पूर्वादि चार व एक अवान्तर दिशा अशा पांच दिशांचा, सवित्यानें षडक्षरी छन्दानें सहा ऋतूंचा, मरुत देवांनीं सप्ताक्षरी छन्दानें सात गांवठी पशूंचा व बृहस्पतीनें अष्टाक्षरी छन्दानें गायत्री छन्दोभिमानी देवतेचा जय केला म्हणून मीहि त्या त्या छन्दांनीं त्या त्या पूर्वोक्त पदार्थांचा जय करीन. ॥३२॥ विनियोग - 'ये देवाः' या पांच मंत्रांनीं होम करावा. ये दे॒वा अ॒ग्निने॑त्राः पुरः॒सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वा य॒मने॑त्रा दक्षिणा॒सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वा वि॒श्वदे॑वनेत्राः पश्चा॒त्सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वा मित्रा॒वरु॑णनेत्रा वा म॒रुन्ने॑त्रा वोर्ररा॒सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वाः सोम॑नेत्रा उपरि॒सदो॒ दुव॑स्वन्त॒स्तेभ्यः॒ स्वाहा॑ ॥ ३६ ॥ अर्थ - क्रमेंकरून पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर व ऊर्ध्वदिशांकडे जे अग्नि, यम, विश्वेदेव, मित्रावरुण अथवा मरुत्प्रमुख आणि परिचर्यावान् सोमप्रमुख देव आहेत त्यांना हें हवि सुहुत असो. ॥३६॥ विनियोग - वस॑व॒स्त्रयो॑दशाक्षरेण त्रयोद॒शँ स्तोम॒मुद॑जयँ॒स्तमुज्जे॑षँ रु॒द्राश्चतु॑र्दशाक्षरेण चतुर्द॒शँ स्तोम॒मुद॑जयँ॒स्तमुज्जे॑षमादि॒त्या पञ्च॒दशाक्षरेण पञ्चद॒शँ स्तोम॒मुद॑जयँ॒स्तमुज्जे॑ष॒मदि॑तिः॒ षोड॑शाक्षरेण षोड॒शँ स्तोम॑मुद॒जय॒त्तमुज्जे॑षं प्र॒जाप॑तिः स॒प्तद॑शाक्षरेण सप्तद॒शँ स्तोम॒मुद॑जय॒त्तमुज्जे॑षम् ॥ ३४ ॥ अर्थ - वसूंनीं तेरा अक्षरी छन्दानें त्रयोदश स्तोमाचा, रुद्रदेवांनीं चतुर्दशाक्षरी छन्दानें चतुर्दश स्तोमाचा, आदित्यदेवांनीं पञ्चदशाक्षरी छन्दानें पञ्चदश स्तोमाचा, देवमाता अदितीनें षोडशाक्षरी छन्दानें षोडशस्तोमाचा व प्रजापतीनें सप्तदशाक्षरी छन्दानें सप्तदशस्तोमाचा जय केला म्हणून मीहि त्या त्या छन्दानें त्या त्या पूर्वोक्त वस्तूंचा जय करीन. ॥३४॥ विनियोग - 'एष ते निर्ऋते' या मंत्रभागानें उषरावर उल्मुकाग्नीचें स्थापन करून त्यांत तण्डुलपिष्टरूपी हविर्द्रव्याचा होम करावा. 'अग्निनेत्रेभ्यः' इत्यादि मंत्रांनीं पांचही अग्नींत होम करावा. ए॒ष ते॑ निरृते भा॒गस्तं जु॑षस्व॒ स्वाहा॒ ऽग्निने॑त्रेभ्यो दे॒वेभ्यः॑ पुरः॒सद्भ्यः॒ स्वाहा॑ य॒मने॑त्रेभ्यो दे॒वेभ्यो॑ दक्षिणा॒सद्भ्यः॑ स्वाहा॑ वि॒श्वदे॑वनेत्रेभ्यो दे॒वेभ्यः॑ पश्चा॒त्सद्भ्यः॒ स्वाहा॑ मि॒त्रावरु॑णनेत्रेभ्यो वा म॒रुन्ने॑त्रेभ्यो वा दे॒वेभ्य॑ उत्तरा॒सद्भ्यः॒ स्वाहा॒ सोम॑नेत्रेभ्यो दे॒वेभ्य॑ उपरि॒सद्ब्यो॒ दुव॑स्वद्भ्यः॒ स्वहा॑ ॥ ३५ ॥ अर्थ - हे निर्ऋते, पृथिवी हा पिष्टरूपी तुझा भाग आहे, त्याचें तूं ग्रहण कर. हें हवि सुहुत असो. पूर्वेकडे ज्या अग्निप्रमुख देवता आहेत, त्यांना हें हवि सुहुत असो. दक्षिणेकडे ज्या यमप्रमुख देवता आहेत त्यांना हें हवि सुहुत असो. पश्चिमेकडे ज्या विश्वेदेवप्रमुख देवता आहेत त्यांना हें हवि सुहुत असो. उत्तरेकडे ज्या मित्रावरूणप्रमुख अथवा मरुत्प्रमुख देवता आहेत त्यांना हें हवि सुहुत असो. तसेंच ऊर्ध्वभागीं ज्या परिचर्यायुक्त अशा सोमप्रमुख देवता आहेत त्यांस हें हवि सुहुत असो. ॥३५॥ विनियोग - 'ये देवाः' या पांच मंत्रांनीं होम करावा. ये दे॒वा अ॒ग्निने॑त्राः पुरः॒सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वा य॒मने॑त्रा दक्षिणा॒सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वा वि॒श्वदे॑वनेत्राः पश्चा॒त्सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वा मित्रा॒वरु॑णनेत्रा वा म॒रुन्ने॑त्रा वोर्ररा॒सद॒स्तेभ्यः॒ स्वाहा॒ ये दे॒वाः सोम॑नेत्रा उपरि॒सदो॒ दुव॑स्वन्त॒स्तेभ्यः॒ स्वाहा॑ ॥ ३६ ॥ अर्थ - क्रमेंकरून पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर व ऊर्ध्वदिशांकडे जे अग्नि, यम, विश्वेदेव, मित्रावरुण अथवा मरुत्प्रमुख आणि परिचर्यावान् सोमप्रमुख देव आहेत त्यांना हें हवि सुहुत असो. ॥३६॥ विनियोग - 'अग्ने सहस्व' या मंत्रभागानें अपामार्गतंदुलहोमाकरितां दक्षिणाग्नींतून उल्मुकग्रहण करावें. अग्ने॒ सह॑स्व॒ पृत॑ना अ॒भिमा॑ती॒रपा॑स्य । दुष्टर॒स्तर॒न्नुरा॑ती॒र्वर्चो॑ धा य॒ज्ञवा॑हसि ॥ ३७ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं शत्रुसेनांना सहन कर व शत्रूंना दूर कर. शत्रुनाश करणारा व कोणाकडूनही ज्याचा तिरस्कार होत नाहीं असा तूं आहेस. तूं यज्ञ करणार्या या यजमानास अन्न दे. ॥३७॥ विनियोग - 'देवस्य त्वा' या मंत्रभागानें स्रुव्यानें अपामार्गतण्डुलांचा होम करावा. 'रक्षसां त्वा' या मंत्रभागानें त्या त्या दिशेकडे स्रुवा झटकावा. 'अवधिष्म' हा मंत्रभाग म्हणून अध्वर्युप्रभृतींनीं मागें न पहातां देवयजनांत यावें. दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम् । उ॒पाँ॒शोर्वी॒र्ये॒ण जुहोमि ह॒तँ रक्षः॒ स्वाहा॒ रक्ष॑सां त्वा व॒धायाव॑धिष्म॒ रक्षोऽव॑धिष्मा॒मुम॒सौ ह॒तः ॥ ३८ ॥ अर्थ - सर्वप्रेरक सवित्याच्या प्रेरणेनें अश्विनीकुमारांच्या बाहूंनीं व पूष्याच्या हातांनीं उपांशुनामक प्रथम ग्रह आहे त्याचे वीर्यानें मी होम करतों. त्यायोगें राक्षसाचा नाश झाला. हें हवि सुहुत असो. राक्षसांच्या नाशाकरितां मी तुला झटकतों. राक्षसजातीला आम्हीं मारलें. या अमुक नांवाच्या शत्रूला मीं मारलें, हा अमुक नांवाचा शत्रु मजकडून मारला गेला. ॥३८॥ विनियोग - यजमानाचा उजवा बाहु हातांत घेऊन 'सविता त्वा' या मंत्राचा जप करावा. स॒वि॒ता त्वा॑ स॒वानाँ॑ सुवताम॑ग्निर्गृ॒हप॑तीनां॒ सोमो॒ वन॒स्पती॑नाम् । बृ॒ह॒स्पतिर्वा॒च इन्द्रो॒ ज्यैष्ठा॑य रु॒द्रः प॒शुभ्यो॑ मि॒त्रः स॒त्यो वरु॑णो॒ धर्म॑पतीनाम् ॥ ३९ ॥ अर्थ - हे यजमाना, सविता तुला सर्वांना आज्ञा देण्याचा अधिकार देवो. अग्नि तुला घरांतील सर्व मंडळींचें आधिपत्य, सोम वनस्पतींचें स्वामित्व, बृहस्पति पांडित्य, इंद्र ज्येष्ठत्व, रुद्र, पशु, मित्र सत्यभाषण, व वरुण धर्मशीलांचें आधिपत्य देवो. ॥३९॥ विनियोग - इ॒मं दे॑वा असप॒त्नँ सु॑वध्वं मह॒ते क्ष॒त्राय॑ मह॒ते ज्यैष्ट्या॑य मह॒ते जान॑राज्या॒येन्द्र॑स्येन्द्रि॒याय॑ । इ॒मम॒मुष्य॑ पु॒त्रम॒मुष्यै॑ पु॒त्रम॑स्यै वि॒श ए॒ष वो॑म्ऽमी॒ राजा॒ सोमो॒ऽस्माकं॑ ब्राह्म॒णानाँ॒ राजा॑ ॥ ४० ॥ अर्थ - हे सवित्रादि देवांनो, या अमुक नांवाच्या यजमानाला शत्रुरहित करा. त्यायोगें तो मोठें क्षत्रियत्व, ज्येष्ठत्व, लोकांचें आधिपत्य, व आत्मज्ञानसामर्थ्य मिळवील. हा यजमान अमुक पुरुषाचा व अमुक बाईचा मुलगा आहे (येथें यजमानाच्या पित्याचें व मातेचें नांव घ्यावें) (या ठिकाणीं जातीचें व देशाचें नांव घ्यावें) जसें हे कुरुपञ्चालदेशीय प्रजांनो, हा खदिरवर्मा तुमचा राजा असो. आम्ही ब्राह्मण असल्यानें वल्लीरूपी हा सोम आमचा राजा असो. ॥४०॥ ॥ नवमोऽध्यायः ॥ |