शुक्ल यजुर्वेद
अष्टमोऽध्यायः



विनियोग - सातव्या अध्यायांत उपांशुग्रहादि सवनद्वयाचे मंत्र दक्षिणादानापर्यंतचे सांगितले. आठव्या अध्यायांत तृतीयसवनांतील आदित्यग्रहादि मंत्र सांगतात. 'उपयामगृहीतोऽसि' या मंत्रभागानें प्रतिप्रस्थात्यानें द्रोणकलशांतून आदित्यग्रहपात्रानें सोमाचें ग्रहण करावें. द्विदेवत्य होम झाल्यावर 'आदित्येभ्यस्त्वा' या मंत्रभागानें हुतशेष आदित्यस्थालींत टाकावें. नंतर 'उरूगाय' या मंत्रभागानें आदित्यपात्रानें स्थाली झांकावी.


उ॒प॒या॒गृ॑हीतोऽस्यादि॒त्येभ्य॑स्त्वा । विष्ण॑ उरुगायै॒ष ते॒ सोम॒स्तँ र॑क्षस्व॒ मा त्वा॒ दभन् ॥ १ ॥


अर्थ - हे सोमा, मी उपयामपात्रानें तुझें ग्रहण केलें आहे. आदित्य देवांकरितां तुझें मी सिंचन करतों. हे बाहुस्तुत यज्ञपुरुषा, हा सोम तुला समर्पण केला आहे, याचें रक्षण कर. हे सोमा, रक्षण करीत असतां राक्षस तुझी हिंसा न करोत. ॥१॥





विनियोग - 'कदाचन' इत्यादि मंत्रभागानें होमशेषांतून आदित्यग्रहाचें ग्रहण करावें.


क॒द च॒न स्त॒रीर॑सि॒ नेन्द्र॑ सश्चसि दा॒शुषे॑ । उपो॒पेन्नु म॑घव॒न् भूय॒ इन्नु ते॒ दानं॑ दे॒वस्य॑ पृच्यत आदि॒त्येभ्य॑स्त्वा ॥ २ ॥


अर्थ - हे इंद्रा, तूं केव्हांही हिंसा करणारा नाहींस तर हवि देणार्‍या यजमानाचे जवळ जाऊन त्याचें हविर्द्रव्य भक्षण करतोस. हे धनवान् इंद्रा, पुनः हविर्द्रव्याचा व प्रकाशक अशा तुझा मी संयोग करतों. यजमानानें दिलेलें हविर्द्रव्य तूं ग्रहण करावेंस. हे ग्रहा, आदित्य देवतांकरितां मी तुझें ग्रहण करतों. ॥२॥





विनियोग - 'कदाचन' इत्यादि मंत्रभागानें द्वितीय आदित्यग्रहाचे ग्रहण करावें.


क॒दा च॒न प्र यु॑च्छस्यु॒भे नि पा॑सि॒ जन्म॑नी । तुरी॑यादित्य॒ सव॑नं त इन्द्रि॒यमात॑स्थाव॒मृतं॑ दि॒व्या॒दि॒त्येभ्य॑स्त्वा ॥ ३ ॥


अर्थ - हे आदित्या, तूं कधीतरी प्रमाद अगर आळस करशील काय ? अर्थात् नाहींच करावयाचा. तूं देव व मनुष्य दोघांचेंही पालन करतोस. तुझें चतुर्थ मायातीत जगत्प्रेरक, अविनाशि व विज्ञानानन्दस्वरूपी जें वीर्य तें द्युलोकांमध्यें सन्मुख स्थित आहे. हे आदित्यग्रहा, आदित्यदेवतांकरितां मी तुझें ग्रहण करतों. ॥३॥





विनियोग - 'यज्ञो देवानाम्' या मंत्रभागानें आदित्यग्रहांत दहीं मिसळावें.


य॒ज्ञो दे॒वानां॒ प्रत्ये॑ति सु॒म्नमादि॑त्यासो॒ भव॑ता मृड॒यन्तः॑ । आ वो॒ऽर्वाची॑ सुम॒तिर्व॑वृत्यादँ॒होश्चि॒द्या व॑रिवो॒वित्त॒रास॑दादि॒त्येभ्य॑स्त्वा ॥ ४ ॥


अर्थ - यज्ञ आदित्यदेवांना सुख देण्याकरितां येतो. म्हणून हे आदित्यांनो, तुम्ही आम्हांला सुख देण्याकरितां या. तुमची अनुग्रह करणारी बुद्धि आमच्याकडे वळो व पापी पुरुषांचीही धन प्राप्त करणारी बुद्धि आम्हांकडे वळो. हे सोम, आदित्यदेवतांकरितां मी तुझ्यांत दहीं मिसळतों. ॥४॥





विनियोग - 'विवस्वन्नादित्य' या मंत्रभागानें उपांशुसवनानें दधि व सोम मिसळावे व 'श्रदस्मै' या मंत्रभागानें यजमानपत्‍नीनें पूतभृताकडे पहावें.


विव॑स्वन्नादित्यै॒ष ते॑ सोमपी॒थस्तस्मि॑न् मत्स्व । शद॑स्मै नरो॒ वर्च॑से दधातन॒ यदा॑शी॒र्दा दम्प॑ती वा॒मम॑श्नुतः । पुमा॑न् पु॒त्रो जा॑यते वि॒न्दते॒ वस्वधा॑ वि॒श्वाहा॑र॒प ए॑धते गृहे ॥ ५ ॥


अर्थ - हे आदित्या, हा पात्रांतील सोम तुला पिण्यांकरितां आहे. त्यायोगें तूं तृप्त हो. हे ऋत्विजांनो, आशीर्वाद देणार्‍या अशा तुम्ही आशीर्वचनावर श्रद्धा ठेवा. श्रद्धापूर्वक आशीर्वाद द्या. तो आशीर्वाद असा कीं, पत्‍नी व यजमानांना उत्तम यज्ञफल मिळो. त्यांस पुत्र होवो व त्या पुत्राला धन मिळो व तो सर्वदा शत्रुरहित होऊन आपले घरांत वाढो. ॥५॥





विनियोग - 'वाममद्य' इत्यादि मंत्रांनीं सावित्रग्रहाचें ग्रहण करावें.


वा॒मम॒द्य स॑वितर्वा॒ममु॒ श्वो दि॒वे दि॑वे वा॒मम॒स्मभ्यँ॑ सावीः । वा॒मस्य॒ हि क्षय॑स्य देव॒ भुरे॑र॒या धि॒या वा॑म॒भाजः॑ स्याम ॥ ६ ॥


अर्थ - हे सर्वप्रेरका सवितृदेवा, आज व उद्यांही आमच्याकरितां चांगलें कर्मफल पाठव. आम्ही बुद्धीनें उत्तम स्वर्गांत चिरकाल निवासाकरितां चांगलें यज्ञकर्म प्रत्येक दिवशीं करूं. हे देवा, तूं द्रव्यपूर्ण स्वर्गांत निवास दे. या सोमकर्माच्या योगानें आम्ही इष्ट फल भोगूं. ॥६॥





विनियोग -


उ॒प॒या॒गृ॑हीतोऽसि सावि॒त्रो॒ऽसि चनो॒धाश्च॑नो॒धा अ॑सि॒ चनो॒ मयि॑ धेहि जिन्व॑ य॒ज्ञं जिन्व॑ य॒ज्ञपतिं॒ भगा॑य दे॒वाय॑ त्वा सवि॒त्रे ॥ ७ ॥


अर्थ - हे सोमा, तूं उपयामपात्रांत गृहीत आहेस. हे ग्रहा, सविता तुझी देवता आहे व तूं अन्नाचा धारण करणारा आहेस. तूं उत्तम प्रकारे करून अन्नधारण करणारा आहेस म्हणून मला अन्न दे. या यज्ञाचें व यजमानाचें रक्षण कर. ऐश्वर्ययुक्त व सर्व प्राणिप्रेरक अशा सवितृदेवांकरितां मी तुझें ग्रहण करतों. ॥७॥





विनियोग - 'उपयामगृहीतोऽसि' या मंत्रानें महावैश्वदेवाचें ग्रहण करावें.


उ॒प॒या॒गृ॑हीतोऽसि सु॒शर्मा॑ऽसि सुप्रतिष्ठा॒नो बृ॒हदु॑क्षाय॒ नमः॑ । विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्य॑ ए॒ष ते॒ योनि॒र्विश्वे॑ब्यस्त्वा दे॒वेध्यः॑ ॥ ८ ॥


अर्थ - हे वैश्वदेवग्रहा, तूं उपयामसंज्ञक पात्रांत गृहीत आहेस. तूं उत्तम प्रकारच्या सुखाचा आश्रय असून चांगल्या पात्रांत तुझी स्थिती आहे. असा आहेस म्हणून जगदुत्पादक अशा प्रजापतीकारणें तूं अन्न हो. विश्वेदेवांकरितां तुझें मी ग्रहण करतों. हें तुझें स्थान आहे, त्यावर विश्वेदेवांकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥८॥





विनियोग - प्रतिप्रस्थात्यानें 'उपयामगृहीतो असि' या मंत्रभागानें पात्‍नीव्रत ग्रहाचें ग्रहण करावें. 'अहं पुरस्तात्' या मंत्रभागानें प्रचरणींत अवशिष्ट घृत त्यांत मिसळावें.


उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ बृह॒स्पति॑सुतस्य देव सोम त॒ इन्द्रो॑रिन्द्रि॒याव॑तः॒ पत्नी॑वतो॒ ग्रहाँ॑२ ऋध्यासम् । अहं प॒रस्ता॑द॒हम्॒अवस्ता॒द्यद॒न्तरि॑क्षं॒ तदु॑ मे पिताऽभू॑त् । अ॒हँ सूर्य॑मुभ॒यतो॑ ददर्शा॒हं देवानां॑ पर॒मं गुहा॒ यत् ॥ ९ ॥


अर्थ - हे प्रकाशमान सोमा, तुझें मीं उपयामपात्रांत ग्रहण केलें आहे. म्हणून या यज्ञाच्या अधिपतीनें (यजमानानें) काण्डलेल्या अशा, रसरूपी, इंद्रियशक्तिवर्धक आणि पत्‍नींसंयुक्त अशा तुझ्यासंबंधी दुसरे जे उपांशुपभृति ग्रह त्यांस मी सिद्ध करितो. मी सर्वव्यापी परमात्मस्वरूपी असल्यानें वर द्युलोकांत व अधोभागीं भूलोकांत राहतो. सव्यवर्ति अन्तरिक्ष लोक पित्याप्रमाणें माझें पालन करतों. मी सर्वव्यापी होऊन वर व खालीं सूर्याला पहातों. अत्यंत गुप्त अशा हृदयामध्यें जें इंद्रादिकांचें श्रेष्ठ स्थान आहे तेंच मी आहे. ॥९॥





विनियोग - 'अग्नाइ पत्‍नीवन्' या मंत्रभागानें पात्‍नीवत ग्रहाचा होम करावा. नेष्टयानें यजमानपत्‍नीला उद्गात्याकडे पाहण्यास सांगावें व तिनें 'प्रजापतिः' या मंत्रभागानें त्याजकडे पहावें.


अग्ना३इ पत्नी॑वन्त्स॒जूर्दे॒वेन॒ त्वष्ट्रा सोमं॑ पिब॒ स्वाहा॑ । प्र॒जाप॑ति॒र्वृषा॑ऽसि रेतो॒धा रेतो॒ मयि॑ धेहि प्र॒जाप॑तेस्ते॒ वृष्णो॑ रेतो॒धसो॑ रेतो॒धाम॑शीय ॥ १० ॥


अर्थ - हे पत्‍नीयुक्त अग्ने, त्वष्टृदेवाचा स्नेही होऊन तूं सोमपान कर. तुला हें हवि सुहुत असो. हे उद्गात्या, तूं प्रजापालक, रेतःसिञ्चन व रेतोधारण करणारा आहेस म्हणून माझे ठायीं रेतःस्थापन कर. नंतर वीर्यसिञ्चक वीर्यधारण करणार्‍या प्रजापालक अशा तुझ्या अनुग्रहानें वीर्यवान् असा मुलगा मला प्राप्त होवो. ॥१०॥





विनियोग - 'उपयामगृहीतोऽसि' इत्यादि मंत्रानें हारियोजनग्रहाचें ग्रहण करावें. 'हर्योर्धानाः' या मंत्रभागानें हारियोजनग्रहांत भाजलेले जव घालावें.


उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ हरि॑रसि हारियोज॒नो हरि॑भ्यां त्वा । हर्यो॑र्धा॒ना स्थ॑ स॒हसो॑मा॒ इन्द्रा॑य ॥ ११ ॥


अर्थ - हे हारियोजनग्रहा, तूं हरितवर्णाचा आहेस. तुझें मी उपयामपात्रांत ग्रहण केलें आहे. अश्वसंयोजक इंद्रसंबंधीं अशा तुझें मी ऋक्सामाकरितां ग्रहण करतों. हे भाजलेल्या यवांनो, सोमसहित असे तुम्ही इंद्राचे जे हिरव्या वर्णाचे घोडे तद्रूपी आहां. ॥११॥





विनियोग - सर्व ऋत्विजांनीं भाजलेले जव घेऊन 'यस्ते अश्वसनिः' या मंत्रभागानें आवघ्राण करून ते उत्तरवेदीवर टाकावे.


यस्ते॑ अश्व॒सनि॑र्भ॒क्षो यो गो॒सनि॒स्तस्य॑ त इ॒ष्टय॑जुष स्तु॒तस्तो॑मस्य श॒स्तोक्थ॒स्योप॑हूत॒स्योप॑हूतो भक्षयामि ॥ १२ ॥


अर्थ - हे धानासहित सोमद्रव्या, तुझें भक्षण अश्व देणारे आहे. जें तुझें भक्षण पशु देतें अशा, ज्याच्याकरितां यजुर्वेदानें होम केला आहे, स्तोत्रांनीं स्तुति केली आहे, होत्यांनीं ज्यांत शस्त्रें म्हटलीं आहेत अशा व ज्याचेविषयीं आज्ञा झाली आहे अशा हे सोमा, आज्ञप्त होऊन तुझें मी भक्षण करतों. ॥१२॥





विनियोग - 'देवकृतस्य' इत्यादि सहा मंत्रांनीं सहा यूपशकलांचा अग्नींत होम करावा.


दे॒वकृ॑त॒स्यैन॑सोऽव॒यज॑नमसि मनु॒ष्य॒कृत॒स्यैन॑सोऽव॒यज॑नमसि पि॒तृकृ॑त॒स्यैन॑सोऽव॒यज॑नमस्या॒त्मकृत॒स्यैन॑सोऽव॒यज॑नम॒स्येन॑स एनसोऽव॒यज॑नमसि । यच्चा॒हमेनो॑ वि॒द्वाँश्च॒कार॒ यच्चवि॑द्वाँ॒स्तस्य॒ सर्व॒सयिन॑सोऽव॒यज॑नमसि ॥ १३ ॥


अर्थ - हे शकला, देवांचा याग न केल्यानें, मनुष्यांचा द्रोह केल्यानें, पितरांचें श्राद्ध न केल्यानें व आत्मनिन्दा केल्यानें उत्पन्न झालेलें पाप व इतरही जीं सर्व पापें उत्पन्न झालीं त्यांचा नाश करणारे तूं आहेस. तसेंच बुद्धिपूर्वक व अबुद्धिपूर्वक जें मी पाप केलें त्या सर्व पापांचा तूं नाश करणारे आहेस. ॥१३॥





विनियोग - जलपूर्ण चमरावर ओले दर्भ ठेवून 'संवर्चसा' या मंत्रभागानें त्या पात्रांना स्पर्श करावा.


सं वर्च॑सा॒ पय॑सा॒ सं त॒नूभि॒रग॑न्महि॒ मन॑सा॒ सँ शि॒वेन॑ । त्वष्टा॑ सु॒दत्रो॒ वि द॑धातु॒ रायोऽनु॑मार्ष्टु त॒न्वो यद्विलि॑ष्टम् ॥ १४ ॥


अर्थ - आम्ही ब्रह्मतेजानें, क्षीरादिरसानें, अनुष्ठानसमर्थ शरीरावयवांनीं व उत्तम अशा कर्मश्रद्धायुक्त मनानें संयुक्त होऊं. व उत्तम दान करणारा त्वष्टा देव आम्हांला द्रव्यें देवो व तो शरीराची हीनता दूर करो. ॥१४॥





विनियोग - 'समिन्द्रण' इत्यादि नऊ मंत्रांनीं समिष्टयजुःसंज्ञक नऊ आहुतींचा होम करावा.


समि॑न्द्रो णो॒ मन॑सा नेषि॒ गोभिः॒ सँ सू॒रिभि॑र्मघव॒न्सँ स्व॒स्त्या । सं ब्रह्म॑णा दे॒व्कृ॑तं॒ यदस्ति॒ सं दे॒वानाँ॑ सुम॒तौ य॒ज्ञिया॑नाँ॒ स्वाहा॑ ॥ १५ ॥


अर्थ - हे धनवान् इंद्रा, तूं आम्हांला अनुग्रहयुक्त मनानें, गाईंनीं, पण्डित अशा होत्रादिकांनीं व अर्थज्ञानसहित वेदानें युक्त करतोस. व देवांकरितां केलेल्या कर्मानें युक्त करून आमचे विषयीं यज्ञसंबंधीं देवांची सद्‍बुद्धि उत्पन्न कर. पूर्वोक्तगुणविशिष्ट अशा तुला हें हवि सुहुत असो. ॥१५॥





विनियोग -


सं वर्च॑सा॒ पय॑सा॒ सं त॒नूभि॒रग॑न्महि॒ मन॑सा॒ सँ शि॒वेन॑ त्वष्टा॑ सु॒दत्रो॒ वि द॑धातु॒ रायोऽनु॑मार्ष्टु त॒न्वो यद्विलि॑ष्टम् ॥ १६ ॥


अर्थ - आम्हीं ब्रह्मतेजानें, क्षीरादिरसानें, अनुष्ठानसमर्थ शरीरावयवांनीं, व उत्तम अशा कर्मश्रद्धायुक्त मनानें संयुक्त होऊं व उत्तम दान करणारा त्वष्टा देव आम्हांला द्रव्यें देवो व तो शरीराची हीनता दूर करो. ॥१६॥





विनियोग -


धा॒ता रा॒तिः स॑वि॒तेदं जु॑षन्तां प्र॒जाप॑तिर्निधि॒पा दे॒वो अ॒ग्निः । त्वष्टा॒ विष्णुः॑ प्र॒जया॑ सँररा॒णा यज॑मानाय॒ द्रवि॑णं दधात॒ स्वाहा॑ ॥ १७ ॥


अर्थ - दान देणारा धाता, सविता, निधिपालक प्रजापति, प्रकाशमान अग्नि, त्वष्टा व विष्णु हे सहा देव आमचें हविर्द्रव्य सेवन करोत. हे सहा देव, यजमानाच्या प्रजेंत रममाण होऊन त्यांस धन देवोत. यांना हें हवि सुहुत असो. ॥१७॥





विनियोग -


सु॒गा वो॑ देवाः॒ सद॑ना अकर्म॒ य आ॑ज॒ग्मेदँ सव॑नं जुषा॒णाः । भर॑माणा॒ वह॑माना ह॒वीँष्य॒स्मे ध॑त्त वसवो॒ वसू॑नि॒ स्वहा॑ ॥ १८ ॥


अर्थ - हे देवांनो, तुम्ही या यज्ञाचें सेवन करण्याकरितां आलां आहां. आम्ही तुमचीं स्थानें जाण्यास सुलभ अशीं करून ठेवली आहेत व निवास करणार्‍या, पोषण करणार्‍या व रथांत हविर्भाग नेणार्‍या हे देवांनो, आमच्यामध्यें द्रव्य स्थापन करा. तुम्हांला हें हवि सुहुत असो. ॥१८॥





विनियोग -


याङ्‍ आऽव॑ह उश॒तो दे॑व दे॒वाँस्तान् प्रेर॑य॒ स्वे अ॑ग्ने स॒धस्थे॑ । ज॒क्षि॒वाँसः॑ पपि॒वाँस॑श्च॒ विश्वेऽसुं॑ घ॒र्मँ स्व॒राति॑ष्ठ॒तानु॒ स्वाहा॑ ॥ १९ ॥


अर्थ - हे प्रकाशमान अग्ने, हविर्द्रव्येच्छु अशा ज्या देवांना तूं बोलवून आणलेंस त्यांना आपल्या निवासस्थानाकडे पाठव व त्यांना सांग कीं, हे देवांनो, तुम्हीं पुरोडाशादि हवि भक्षण केलें तसेंच सोमपान केलें. आतां तुम्ही सर्वजण वायुमण्डल, सूर्यमण्डल व द्युलोकांत जेथें तुमची जागा असेल तेथें जा. हे देवांनो, हें हवि तुम्हांला सुहुत असो. ॥१९॥





विनियोग -


व॒यँ हि त्वा॑ प्रय॒ति य॒ज्ञे अ॒स्मिन्नग्ने॒ होता॑र॒मवृ॑णीमही॒ह । ऋध॑गया॒ ऋध॑गु॒ताश॑मिष्ठाः प्रजा॒नन् य॒ज्ञमुप॑ याहि वि॒द्वान्स्त्वाहा॑ ॥ २० ॥


अर्थ - हे अग्ने, यज्ञ चालू असतां या स्थानीं तुला देवांना बोलावणारा म्हणून आम्हीं नेमलें म्हणून तूं यज्ञ संपन्न करून आमच्याकडून याग करविलास व समृद्ध होऊन तूं यज्ञविघ्न नाहीसें केलेंस म्हणून स्वाधिकारज्ञानसंपन्न असा तूं, यज्ञ संपला असें समजून आपल्या स्थानाप्रत जा. तुला हें हवि सुहुत असो. ॥२०॥





विनियोग -


देवा॑ गारुविदो गा॒तुं वि॒त्त्वा गा॒तुमि॑त । मन॑सस्पत इ॒मं दे॑व य॒ज्ञँ स्वाहा॒ वाते॑ धाः ॥ २१ ॥


अर्थ - हे यज्ञ जाणणार्‍या देवांनो, आमचा यज्ञ संपला असें जाणून आपल्या मार्गानें जा. यागाकरितां आमच्या मानाच्या प्रेरका देवा, हा यज्ञ मी तुझ्या हातांत देतों. तूं त्याला वायूदेवाचे ठिकाणीं स्थापन कर. ॥२१॥





विनियोग -


यज्ञ॑ य॒ज्ञं ग॑च्छ य॒ज्ञप॑तिं गच्छ॒ स्वां योनिं गच्छ॒ स्वाहा॑ । ए॒ष ते॑ य॒ज्ञो य॑ज्ञपते स॒हसू॑क्तवाकः॒ सर्व॑वीर॒स्तं जु॑षस्व॒ स्वाहा॑ ॥ २२ ॥


अर्थ - हे यज्ञा, तूं विष्णूकडे जा व यजमानाकडे जाऊन त्याला फल समर्पण कर. व तुझें उत्पत्तिस्थान असा जो वायु त्याकडे जा. तुला हें हवि सुहुत असो. हे यजमान, हा यज्ञ तुझा आहे. तसेंच सूक्तवाक् व पशुपुरोडाशसहित जो यज्ञ त्याचें तूं फल भोग, हें हवि तुला सुहुत असो. ॥२२॥





विनियोग - 'माहिर्भूः' या मंत्रभागानें कृष्णमृगाचे शृंग व मेखला चात्वालांत टाकावी. अध्वर्यूनें 'उ॒रुँ हि राजा॒' हा मंत्र यजमानाकडून म्हणवावा. नंतर अवभृथ स्नानाकरितां पाण्यांत उतरून अध्वर्यूनें 'नमो वरुणाय' हा मंत्र यजमानाकडून म्हणवावा.


माहि॑र्भु॒र्मा पृदा॑कुः । उ॒रुँ हि राजा॒ वरु॑णश्च॒कार॒ सूर्या॑य॒ पन्था॒मन्वे॑त॒वा उ॑ । अ॒पदे॒ पादा॒ प्रति॑धातवेऽकरु॒ताप॑व॒क्ता हृ॑दया॒विध॑श्चित् । नमो॒ व॑रुणाया॒भिष्ठि॑तो॒ वरु॑णस्य॒ पाशः॑ ॥ २३ ॥


अर्थ - हे रज्जो, तूं सर्प व अजगर होऊं नकोस. वरुणानेंच सूर्याला प्रतिदिवशीं जाण्याकरितां आकाशांत मार्ग निर्माण करून दिला म्हणून त्यानेंच निराधार अशा आकाशांत आम्हांला स्वर्गांत जाण्याचा मार्ग करून द्यावा. तो वरुण हृदयमर्मभेदक अशा चुगलखोराचाही तिरस्कार करणारा आहे. असा वरुण आम्हांला अवभृथ स्नानाला मार्ग देवो. वरुणाचा पाश आक्रांत झाला, आतां तो आम्हांला बांधण्यास समर्थ नाहीं अशा वरुणाला नमस्कार असो. ॥२३॥





विनियोग - जलांत समिधा टाकून 'अग्नेरनीकम्' या मंत्रानें घृताचा होम करावा.


अ॒ग्नेरनी॑कम॒प आ वि॑वेशा॒पां नपा॑त् प्रति॒रक्ष॑न्नसू॒र्य॒म् । दमे॑दमे स॒मिधं॑ यक्ष्यग्ने॒ प्रति॑ ते जि॒ह्वा घृतमुच्च॑रण्य॒त् स्वाहा॑ ॥ २४ ॥


अर्थ - हे गमनशील, ज्या तुझें अपांनपात् संज्ञक मुख उदकांत प्रविष्ट झालें तो तूं यज्ञाचें घरोघर राक्षसांनीं केलेलें यज्ञविघ्न दूर करून प्रदीपक तुपाशीं युक्त हो. नंतर तुझीं ज्वाला घृताकरितां उद्युक्त असो. तुला हें हवि सुहुत असो. ॥२४॥





विनियोग - सोमाचा कुच्चा ज्यांत भरला आहे असा कुंभ जलांत टाकावा.


स॒मुद्रे ते॒ हृद॑यम॒प्स्वन्तः सं त्वा॑ विश॒न्त्वोष॑धीरु॒तापः॑ । य॒ज्ञस्य॑ त्वा यज्ञपते सूक्तोक्तौ॑ नमोवा॒के वि॑धेम॒ यत् स्वाहा॑ ॥ २५ ॥


अर्थ - हे सोमा, जें तुझें हृदय समुद्रासारख्या पाण्यांत आहे तेथें तुला मी पोंचवितों. तेथें तुझ्याकडे ओषधि व जलें येवोत. हे यज्ञपालका सोमा, उत्तमवाक्योच्चारणांत व नमस्कारवचनांत आम्ही तुझें स्थापन करतों म्हणजे तुझी स्तुति करतों व तुला नमस्कार करतों. हें हवि तुला सुहुत असो. ॥२५॥





विनियोग - 'देवीरापः' या मंत्रभागानें उपस्थान करावें.


देवी॑राप ए॒ष वो॒ गर्भ॒स्तँ सुप्री॑तँ॒ सुभृ॑तं बिभ्ह्रुत । देव॑ सोमै॒ष ते॑ लो॒कस्तस्मि॒ञ्छं च॒ वक्ष्व॒ परि॑ च वक्ष्व ॥ २६ ॥


अर्थ - हे प्रकाशक जलांनो, हा सोम तुमच्या गर्भस्थानीं आहे व सुप्रसन्न व सुपुष्ट अशा त्याचें धारण करा. हे प्रकाशमान सोमा, या जललोकांत राहून तूं आम्हांला सुख दे व आमच्या पीडा दूर कर. ॥२६॥





विनियोग - 'अवभृथ' हा मंत्र म्हणून जलकुंभ पाण्यांत बुडवावा. स्नानानंतर आहवनीयांत समिधेचा होम करावा. ज्या यज्ञांत पालथीं करून यज्ञपात्रें पाण्यानें भरलीं जातात त्या यज्ञाला अवभृथ म्हणतात.


अव॑भृथ निचुम्पुण निचे॒रुर॑सि निचुम्पु॒णः । अव॑ दे॒वैर्दे॒वकृ॑त॒मेनो॑ऽयासिष॒मव॒ मत्र्यै॒र्मर्त्य॑कृतं पुरु॒राव्णो॑ देव रि॒षस्पा॑हि । दे॒वानाँ॑ स॒मिद॑सि ॥ २७ ॥


अर्थ - हे अवभृथसंज्ञक यज्ञा, तूं अतिशय गतिमान् आहेस. तथापि आतां अत्यंत मन्द गमन कर. कारण की, आमच्या इंद्रियांनीं हविःस्वामी देवांविषयीं जें पाप केलें तें मीं या पाण्यांत टाकलें. तसेंच आमच्या ऋत्विजांनीं यज्ञ पहाण्याकरितां आलेल्या लोकांचा अपमान करून जें पाप केलें तें या पाण्यांत टाकलें. हे प्रकाशक यज्ञा, विरुद्ध फल देणार्‍या वधापासून आमचें रक्षण कर. म्हणजे तुझ्या प्रसादानें आम्हाला विरुद्ध फल न मिळो. हे समिधे, तूं देवांचें इन्धन आहेस. ॥२७॥





विनियोग - अनुबन्ध्य गर्भिणी असेल तर 'एजतु' इत्यादि मंत्रभागानें गर्भाचें अभिमंत्रण करावें.


एज॑तु॒ दश॑मास्यो॒ गर्भो॑ ज॒रायु॑णा स॒ह । यथा॒ऽयं व॒युरेज॑ति॒ यथा॑ समुद्र एज॑ति । ए॒वायं दश्॑अमास्यो॒ अस्र॑ज्ज॒रायु॑णा स॒ह ॥ २८ ॥


अर्थ - गर्भ दहा महिन्यांचा झाला असावा त्याप्रमाणें गर्भवेष्टनासह चलित होवो. वायु व समुद्र कंपित होतो त्याप्रमाणें हा गर्भ दहा महिन्यांच्या गर्भाप्रमाणें सर्वावयवांनीं युक्त होऊन गर्भवेष्टनासह कंपित होवो. ॥२८॥





विनियोग - वशावदान्नांचा होम करून 'यस्मै ते' या मंत्रभागानें गर्भरक्ताचा होम करावा.


यस्यै॑ ते य॒ज्ञियो॒ गर्भो॒ यस्यै॒ योनि॑र्हिरण्ययी॑ । अङ्‍गा॒न्यह्रु॑ता॒ यस्य॒ तं मा॒त्रा सम॑जीगमँ॒ स्वाहा॑ ॥ २९ ॥


अर्थ - हे वशे, ज्या तुझा गर्भ यज्ञार्ह आहे व योनि रत्‍नमय आहे त्या तुझा व गर्भाचा मी संगम करतों व अखण्डित अवयवांचा गर्भ मी त्याच्या आईशीं एकत्र करतों. हें हवि सुहुत असो. ॥२९॥





विनियोग - स्विष्टकृत् होमानंतर प्रतिप्रस्थात्यानें 'पुरुदस्मे' या मंत्रभागानें सर्व गर्भरसाचा होम करावा.


पुरु॒द॒स्मो विषु॑रूप॒ इन्दु॑र॒न्तर्म॑हि॒मान॑मानञ्ज॒ धीरः॑ । एक॑पदिं द्वि॒पदिं॑ त्रि॒पदीं॒ चतु॒ष्पदीम॒ष्टाप॑दीं॒ भ्व॒नानु॑ प्रथन्ताँ॒ स्वहा॑ ॥ ३० ॥


अर्थ - सोमासारखा पातळ गर्भरस मोठेपणाला व्यक्त करो. तो गर्भरस बहुदानयुक्त, बहुरूपी, पोटांत असणारा व बुद्धिमान् आहे. अशा माहात्म्यानें युक्त गर्भाच्या आईला भुवनांतील सर्व प्राणी प्रसिद्ध करोत. ती गर्भमाता वशा वसारूपानें एक पायांची, वपा व अंगांनीं दोन पायांची, उपयट् होमांनी तीन पायांची, व स्वतः चार पायांची, गर्भाचे चार व तिचे चार मिळून आठ पायांची अशी आहे. हें हवि सुहुत असो. ॥३०॥





विनियोग - शामित्र अग्नीमध्येंच 'मरुतो यस्य' या मंत्रानें उष्णीपवेष्टित गर्भाचा होम करावा.


मरु॑तो॒ यस्य॒ हि क्षये॑ पा॒था दि॒वो वि॑महस्ः । स सु॑गो॒पात॑मो॒ जनः॑ ॥ ३१ ॥


0


विनियोग - शामित्रांत ठेवलेला गर्भ निखार्‍यांनीं झाकावा.


म॒ही द्यौः पृ॑थि॒वी च॑ न इ॒मं य॒ज्ञं मि॑मिक्षताम् । पि॒पृ॒तां नो॒ भरी॑मभिः ॥ ३२ ॥


अर्थ - महान् अशा द्युलोक व पृथ्वीलोकांनीं आमचा यज्ञ आपल्या भागांनीं पूर्ण करावा व त्यांनीं आमचें घर हिरण्यपशुधान्यादिरूपी आपल्या भागांनीं पूर्ण करावें. ॥३२॥





विनियोग - 'यस्मान्न जातः' या मंत्रानें षोडशिग्रहाचें उपस्थान करावें.


यस्मा॒न्न जा॒तः परो॑ अ॒न्यो अस्ति॒ य आ॑वि॒वेश॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ । प्र॒जापतिः॑ प्र॒जया॑ सँररा॒णस्त्रीणि॒ ज्योतीँ॑शि सचते॒ स षो॑ड॒शी ॥ ३६ ॥


अर्थ - षोडशीग्रहाची परब्रह्मरूपानें स्तुति करतात. ज्याहून दुसरा कोणी मोठा जन्मला नाहीं व सर्व भुवनांत ज्यानें प्रवेश केला आहे, तो प्रजारूपानें रममाण होणारा व षोडशकलात्मक लिङ्गशरीरोपाधींनीं विशिष्ट प्रजापति, अग्नि, वायु, सूर्यरूपी तेजांचे सेवन करतो. ॥३६॥





विनियोग -


यु॒क्ष्वा हि के॒शिना॒ हरी॒ वृष॑णा कक्ष्य॒प्रा । अथा॑ न इन्द्र सोमपा गि॒रीमुप॑श्रुतिं चर । उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा षोड॒शिन । ए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा षोड॒शिने॑ ॥ ३४ ॥


अर्थ - हे इंद्रा, हरितवर्णाचे, लांब केसाचे, वीर्यसिंचन करणारे, अश्वबन्धनरज्जूला भरून टाकणारे म्हणजे स्थूल अवयवांचे तुझे घोडे जरूर रथाला जोड. हे इंद्रा, सोमपान करून ऋग्यजुःसामरूपी आमचें वाक्य श्रवण कर व आमचे घरीं ये. हे ग्रहा, षोडशीस्तोत्रविशिष्ट अशा इंद्राकरितां उपयामपात्रांत तुझें ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. यावर षोडशस्तोत्रविशिष्ट इंद्राकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥३४॥





विनियोग - षोडशिग्रहाचा तिसरा वैकल्पिक मंत्र.


इन्द्र॒मिद्धरी॑ वह॒तोऽप्र॑तिधृष्टशवसम् । ऋषी॑णां च स्तु॒तीरुप॑ य॒ज्ञं च॒ मानु॑षाणाम् । उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा षोड॒शिन॑ । ए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा षोड॒शिने॑ ॥ ३५ ॥


अर्थ - हरितवर्णाचे घोडे इंद्रालाच ऋषींच्या व वसिष्ठादि मुनींच्या स्तुतिसमीप नेतात. तसेंच त्याला मनुष्ययज्ञाचे समीपही नेतात. त्या इंद्राचें बलाचा कोणाला पराजय करतां येत नाही. हे ग्रहा, षोडशिस्तोत्रविशिष्ट अशा इंद्राकरितां उपयामपात्रांत तुझें ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. यावर षोडशस्तोत्रविशिष्ट इंद्राकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥३५॥





विनियोग - 'यस्मान्न जातः' या मंत्रानें षोडशिग्रहाचें उपस्थान करावें.


यस्मा॒न्न जा॒तः परो॑ अ॒न्यो अस्ति॒ य आ॑वि॒वेश॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ । प्र॒जापतिः॑ प्र॒जया॑ सँररा॒णस्त्रीणि॒ ज्योतीँ॑शि सचते॒ स षो॑ड॒शी ॥ ३६ ॥


अर्थ - षोडशीग्रहाची परब्रह्मरूपानें स्तुति करतात. ज्याहून दुसरा कोणी मोठा जन्मला नाहीं व सर्व भुवनांत ज्यानें प्रवेश केला आहे, तो प्रजारूपानें रममाण होणारा व षोडशकलात्मक लिङ्गशरीरोपाधींनीं विशिष्ट प्रजापति, अग्नि, वायु, सूर्यरूपी तेजांचे सेवन करतो. ॥३६॥





विनियोग - 'इन्द्रश्च सम्राट्' या मंत्रानें षोडशिग्रहाचें भक्षण करावें.


इन्द्र॑श्च स॒म्राड् वरु॑णश्च॒ राजा॒ तौ ते॑ भ॒क्षं च॑क्रतु॒रग्र॑ ए॒तम् । तयो॑र॒हमनु॑ भ॒क्षं भ॑क्षयामि॒ वाग्दे॒वी जु॑षा॒णा सोम॑स्य तृप्ततु स॒ह प्रा॒णेन॒ स्वाहा॑ ॥ ३७ ॥


अर्थ - हे षोडशिग्रहा, वाजपेययाजी इंद्र व राजसूययाजी वरुण हे दोघे प्रथम तुझ्या या सोमाचें भक्षण करते झाले. त्यांच्यानंतर मी हा सोमभक्षण करतों. माझ्या भक्षणाचें सेवन करणारी सरस्वती प्राणदेवतेसह सोमानें संतुष्ट होवो. हें हवि सुहुत असो. ॥३७॥





विनियोग - पृष्ठयसंज्ञक षडहयज्ञाचें अनुष्ठान सहा दिवस चालतें. त्यांपैकीं पहिले तीन दिवशी 'अग्ने पवस्व' वगैरे मंत्रांनीं अतिग्राह्य ग्रहांचें ग्रहण करावें व नंतर 'अग्ने वर्चस्विन्' या मंत्रांनीं त्या त्या ग्रहांच्या शेषाचें भक्षण करावें.


अग्ने॒ पव॑स्व॒ स्वपा॑ अ॒स्मे वर्चः॑ सु॒वीर्य॑म् । दध॑द्र॒यिं मयि॒ पोष॑म् । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्य॒ग्नये॑ त्वा॒ वर्च॑स ए॒ष ते॒ योनि॑र॒ग्नये॑ त्वा॒ वर्च॑सि । अग्ने॒ वर्चस्वि॒न्वर्च॑स्वाँ॒स्त्वं दे॒वेष्वसि॒ वर्च॑स्वान॒हं म॑नु॒ष्ये॒षु भयासम् ॥ ३८ ॥


अर्थ - हे शोभनकर्मविशिष्ट अग्ने, तूं चांगले व वीर्यवत् असें ब्रह्मवर्चस आम्हांला दे. यजमान अशा माझ्या ठायीं द्रव्य स्थापन करून माझ्या पुत्रादिकांची वृद्धि कर. हे सोमा, उपयामपात्रांत तुझें ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, तेजस्वि अग्नीकरितां तुझें मी ग्रहण करतों. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे, त्यावर तुझें मी स्थापन करतों. हे विशिष्टतेजोयुक्त अग्ने, तूं देवांत अत्यंत दीप्तिमान् आहेस म्हणून तुझ्या कृपेनें मीहि मनुष्यांमध्यें ब्रह्मवर्चस्वी होईन. ॥३८॥





विनियोग -


उ॒त्तिष्ठ॒न्नोज॑सा स॒ह पी॒त्वी शिप्रे॑ अवेपयः । सोम॑मिन्द्र च॒मू सु॒तम् । उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य॒ त्वौज॑स ए॒ष ते॒ योनि॑रिन्द्रा॑य॒ त्वौज॑से । इन्द्रौ॑जि॒ष्ठौजि॑ष्ठ॒स्त्वं दे॒वेष्वस्योजि॑ष्ठो॒ऽहं म॑नु॒ष्ये॒षु भूयासम् ॥ ३९ ॥


अर्थ - हे इंद्रा, मोठया उत्साहानें उठून अधिषव चर्मावर कांडलेला सोम पिऊन आनंदानें तूं आपली हनवटी हालविलीस, (मिटक्या मारल्यास) हे ग्रहा, बलवान् इंद्राकरितां उपयामपात्रांत मीं तुझें ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. यावर बलवान् इंद्राकरितां तुझें मी स्थापन करतों. हे अत्यंत बलवान् इंद्रा, ज्याप्रमाणें तूं देवांत अत्यंत बलवान् आहेस त्याप्रमाणें मी मनुष्यांत बलवान् होईन. ॥३९॥





विनियोग -


अदृ॑श्रमस्य के॒तवो॒ वि र॒श्मयो॒ जनाँ॒२ अनु॑ । भ्राज॑न्तो अ॒ग्नयो॑ यथा । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ सूर्या॑य त्वा भ्रा॒जायैष ते॒ योनिः॒ सूर्या॑य त्वा भ्रा॒जाय॑ । सूर्य॑ भ्राजिष्ठ॒ भ्राजि॑ष्ठ॒स्त्वं दे॒वेष्वसि॒ भ्राजि॑ष्ठो॒ऽहं म॑नुष्ये॒षु भूयासम् ॥ ४० ॥


अर्थ - प्रज्वलित अग्नींप्रमाणें सर्व पदार्थांचें ज्ञान करून देणारे या सूर्याचे किरण सर्व जनांत व्याप्त होऊन राहिलेले दिसतात. हे ग्रहा, प्रकाशमान सूर्याकरितां उपयामपात्रांत तुझें ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. त्यावर प्रकाशमान सूर्याकरितां तुझें मी स्थापन करतों. हे अत्यंत दीप्तिमान् सूर्या, ज्याप्रमाणें तूं देवांत अत्यंत दीप्तिमान् आहेस त्याप्रमाणें मी मनुष्यांत होईन. ॥४०॥





विनियोग - 'उदुत्यम्' या मंत्रानें अतिग्राह्य ग्रहाचें ग्रहण करावें.


उदु॒ त्यं जा॒तवे॑दसं दे॒वं व॑हन्ति के॒तवः॑ । दृ॒शे विश्वा॑य॒ सूर्य॑म् । उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ सूर्य॑य त्वा भ्रा॒जायै॒ष ते॒ योनिः॒ सूर्या॑य त्वा भ्रा॒जाय॑ ॥ ४१ ॥


अर्थ - किरणें प्रसिद्ध अशा ज्ञानी सूर्यदेवाला विश्वाच्या अवलोकनाकरितां धारण करतात. हे ग्रहा, दीप्तिमान् सूर्याकरितां उपयामपात्रांत मीं तुझें ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. त्यावर दीप्तिमान् सूर्याकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥४१॥





विनियोग - अहीन त्रिसुत्यसंज्ञक यज्ञांत हजार गाई दक्षिणा आहे. त्यांत हजाराव्या लाल गाईला हविर्धान व अग्नीध्रांच्या मध्यभागीं उभी करून तिच्याकडून द्रोणकलशाचा वास घेववावा.


आ जि॑घ्र क॒लशं॑ म॒ह्या त्वा॑ विश॒न्त्विन्द॑वः । पुन॑रू॒र्जा नि व॑तस्व॒ सा नः॑ स॒हस्रं॑ धुक्ष्वो॒रुधा॑रा॒ पय॑स्वती॒ पुन॒र्मा वि॑शताद्र॒यी ॥ ४२ ॥


अर्थ - हे धेनो, तूं द्रोणकलशाचा सर्व बाजूंनीं वास घे. हे धेनो, द्रोणकलशांतले सोम तुझ्यांत प्रविष्ट होवोत व तुझ्या दुग्धरूपी रसासह तूं आमचेकडे परत ये. अशा रीतीनें स्तुति केलेली तूं आम्हांला सहस्र धेनु दे. तसेंच पुष्कळ दुग्धयुक्त धेनु व द्रव्यही मजकडे पुनः येवो. ॥४२॥





विनियोग - यजमानानें गाईच्या उजव्या कानांत 'इडे रन्ते' या मंत्राचा जप करावा.


इडे॒ रन्ते॒ हव्ये॒ काम्ये॒ चन्द्रे॒ ह्योतेऽदि॑ते॒ सर॑स्वति॒ महि॒ विश्रु॑ति । ए॒ता ते॑ अघ्न्ये॒ नामा॑नि दे॒वेभ्यो॑ मा सु॒कृतं॑ ब्रूतात् ॥ ४३ ॥


अर्थ - स्तुत्य, आनन्द देणारी, सर्वांकडून बोलावली जाणारी, आवडती, प्रकाशमान, अखण्डित, पुष्कळ दुग्धानें युक्त, मोठी, कीर्तिसंपन्न व अवध्य अशा हे धेनो, वरील नांवांनीं तुझी मी स्तुति करतों. हा यजमान पुण्यकर्मे करणार आहे असें देवांना जाऊन सांग. ॥४३॥





विनियोग - 'विन इन्द्र' या मंत्रानें महाव्रतीय ऐन्द्रग्रहाचें ग्रहण करावें.


वि न॑ इन्द्र॒ मृधो॑ जहि नी॒चा य॑च्छ पृतन्य॒तः । यो अ॒स्माँ२ अ॑भि॒दास॒त्यध॑रं गमया॒ तमः॑ । उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा वि॒मृध॑ ए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा वि॒मृधे॑ ॥ ४४ ॥


अर्थ - हे इन्द्रा, आमच्या संग्रामांचा नाश कर व आमच्या शत्रूंना युद्धापासून परावृत्त कर. तसेंच जो आमचा क्षय करतो अशा शत्रूला अधोभागीं नरकांत पाठव. हे ग्रहा, विशिष्ट तर्‍हेनें संग्राम करणार्‍या इंद्राकरितां उपयामपात्रांत तुझें ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. त्यावर विशिष्ट तर्‍हेनें संग्राम करणार्‍या इंद्राकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥४४॥





विनियोग -


वाचस्पतिं॑ वि॒श्वक॑र्माणिमू॒तये मनो॒जुवं॒ वाजे॑ अ॒ध्या हु॒वेम । स नो॒ विश्वा॑नि॒ हव॑नानि जोषद्वि॒श्वश॑म्भू॒रव॑से सा॒धुक॑र्मा । उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा वि॒श्वक॑र्मण ए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा वि॒श्वक॑र्मणे ॥ ४५ ॥


अर्थ - आज मी महाव्रतीय अन्न खाऊन रक्षण करण्याकरितां इंद्राला बोलावतों. तो इंद्र वाणीचा अधिपति, जगदुत्पत्त्यादि सर्व कर्मे करणारा व मनाप्रमाणें वेगवान् आहे. त्या जगत्कल्याणकारी उत्तम कर्म करणार्‍या इंद्रानें आमचीं सर्व बोलावणीं अन्नवृद्धीकरितां प्रीतीनें स्वीकारावीं. हे ग्रहा, सर्वकर्मकर्त्या इंद्राकरितां उपयामपात्रांत तुझें मी ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. त्यावर सर्वकर्मकर्त्या इंद्राकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥४५॥





विनियोग -


विश्व॑कर्मन् ह॒विषा॒ वर्ध॑नेन त्रा॒तामिन्द्र॑मकृणोरव॒ध्यम् । तस्मै॒ विशः॒ सम॑नमन्त पू॒र्वीर॒यमु॒ग्रो वि॒हव्यो॒ यथाऽस॑त् । उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा वि॒श्वक॑र्मण ए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा वि॒श्वक॑र्मणे ॥ ४६ ॥


अर्थ - हे विश्वकर्म्या, वृद्धि करणार्‍या हविर्द्रव्यानें तूं जगाच्या रक्षण करणार्‍या इंद्राला अवध्य केलेंस. त्या इंद्राला पूर्वींच्या प्रजांनीं व वसिष्ठादिकांनीं नमन केलें. कारण कीं, हा इंद्र उग्र असून विविधकार्यांत बोलाविला जातो. हे ग्रहा, सर्वकर्मकर्त्या इंद्राकरितां उपयामपात्रांत तुझें ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, हें तुझें स्थान आहे. त्यावर सर्वकर्मकर्त्या इंद्राकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥४६॥





विनियोग - 'अग्नये त्वा' इत्यादि मंत्रांनीं अदाभ्यग्रहाचें ग्रहण करावें.


उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽस्य॒ग्नये॑ त्वा गाय॒त्रछ॑न्दसं गृह्णा॒मीन्द्रा॑य त्वा त्रि॒ष्टुप्छ॑न्दसं गृह्णामि॒ विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्यो॒ जग॑च्छन्दसं गृह्णाम्यनु॒ष्टुप्ते॑ऽभिग॒रः ॥ ४७ ॥


अर्थ - हे सोमा, उपयामपात्रांत तुझें ग्रहण केलें आहे. हे ग्रहा, गायत्रछन्दोविशिष्ट अशा तुझें मी अग्नीच्या संतोषाकरितां ग्रहण करतों. त्रिष्टुप् छन्दोविशिष्ट अशा तुझें इन्द्राकरितां व जगतीच्छन्दोविशिष्ट अशा तुझें विश्वेदेवांकरितां मी ग्रहण करतों. हे ग्रहा, अनुष्टुपछन्द तुझी स्तुति आहे. ॥४७॥





विनियोग - 'व्रेशीनां त्वा' या मंत्रभागानें अदाभ्यग्रहांतील पाणी हालवावें.


व्रेशी॑नां त्वा॒ पत्म॒न्ना धू॑नोमि कुकू॒नना॑नां त्वा॒ पत्म॒न्ना धू॑नोमि भ॒न्दना॑नां त्वा॒ पत्म॒न्ना धू॑नोमि म॒दिन्त॑मानां त्वा॒ पत्म॒न्ना धू॑नोमि म॒धुन्त॑मानां त्वा॒ पत्म॒न्ना धू॑नोमि शु॒क्रं त्वा॑ शु॒क्र धू॑नो॒म्यह्नो॑ रू॒पे सूर्य॑स्य र॒श्मिषु॑ ॥ ४८ ॥


अर्थ - हे सोमा, मेघांच्या उदरांत असलेल्या पाण्यांच्या वृष्टीकरितां मी तुला हालवितों. तें मेघोदरस्थ जल शब्द करीत खालीं येणारे, कल्याणकारक, अत्यंत मदोत्पादक, मधुररसविशिष्ट आहे. आणि हे सोमा, शुद्ध अशा तुला निग्राभ्यासंज्ञक जलांत व सूर्यकिरणांत कंपित करतों. ॥४८॥





विनियोग -


ककु॒भँ रू॒पं वृ॑ष॒भस्य॑ रोचते बृ॒हच्छु॒क्रः शु॒क्रस्य॑ पुरो॒गाः सोमः॒ सोम॑स्य पुरो॒गाः । यत्ते॑ सो॒मादा॑भ्यं॒ नाम॒ जागृ॑वि॒ तस्मै॑ त्वा गृह्णामि॒ तस्मै॑ ते सोम॒ सोमा॑य॒ स्वाहा॑ ॥ ४९ ॥


अर्थ - हे सोमा, श्रेष्ठ अशा तुझें मोठें आदित्यात्मक रूप प्रकाश पावतें. मोठा व शुद्ध असा आदित्य शुद्ध अशा तुझ्या पुढें जाण्यास योग्य आहे. हे सोमा, तुझें नांव अनुपहिंसित (कोणाकडून न तोडला जाणारे) व जागरणशील आहे, अशा तुझें मी ग्रहण करतों. हे सोमा, पूर्वोक्तगुणविशिष्ट अशा तुला हें हवि सुहुत असो. ॥४९॥





विनियोग - उखळांतील सोमभाग 'उशिक्त्वं' या मंत्रभागानें पूर्वोक्त सोमांत घालावें.


उ॒शिक् त्वं दे॑व सोमा॒ग्नेः प्रि॒यं पाथोऽस्]पी॑हि व॒शी त्वं दे॑व सो॒मेन्द्र॑स्य प्रि॒यं पाथूऽपी॑ह्य॒स्मत्स॑खा॒ त्वं दे॑व सोम॒ विश्वे॑षां दे॒वानां॑ प्रि॒यं पाथोऽपी॑हि ॥ ५० ॥


अर्थ - हे प्रकाशमान सोमा, आम्हांस प्रिय असा तूं अग्नीचें प्रिय अन्न भक्षण कर. तसेंच हे प्रिय सोमा, इंद्राच्या आवडत्या अन्नास प्राप्त हो. हे सोमा, तूं आमचा मित्र आहेस. सर्व देवांना प्रिय असें अन्न मिळव. ॥५०॥





विनियोग - आतांच्या गार्हपत्यांत 'इह रतिः' या मंत्रभागानें घृताचा होम करावा.


इ॒ह रति॑रि॒ह र॑मध्वमि॒ह धिति॑रि॒ह स्वधृ॑तिः॒ स्वाहा॑ । उ॒प॒सृ॒जन् ध॒रुणं॑ मा॒त्रे धरुणो॑ मा॒र्तरं॒ धय॑न् । रा॒यस्पोष॑म॒स्मासु॑ दीधर॒त् स्वाहा॑ ॥ ५१ ॥


अर्थ - हे गाईंनो, तुम्ही या यजमानांतच रममाण व्हा. यांतच तुम्हाला संतोष होवो. हें हवि सुहुत असो. धारण करणारा अग्नि आमच्या धनादिकांची वृद्धि करो. तो अग्नि पृथ्वीचा धारण करणारा व पृथ्वीवरील हविर्द्रव्ये भक्षण करणारा आहे. त्याला हें हवि सुहुत असो. ॥५१॥





विनियोग - सर्व ऋत्विज् वगैरेंनीं सत्रधिं सामाचें गायन करावें.


स॒त्रस्य॒ ऋद्धि॑र॒स्यग॑न्म॒ ज्योति॑र॒मृता॑ अभूम । दिवं॑ पृथि॒व्या अध्याऽरु॑हा॒मावि॑दाम दे॒वान्त्स्व॒र्ज्योतिः॑ ॥ ५२ ॥


अर्थ - हे सोमा, तूं सत्राची समृद्धि आहेस म्हणून आम्ही यजमान आदित्यरूपी तेजाला प्राप्त होऊन अमर झालों. आम्ही पृथ्वीवरून द्युलोकांत गेलों व तेथें देवांना पहाते झालों व ज्योतिर्मयस्वर्गाला प्राप्त झालों. ॥५२॥





विनियोग - सर्वांनीं पूर्वेकडे तोंड करून बाहेर पडावें व 'भूर्भुवः' हा मंत्र म्हणून मौन सोडावें.


यु॒वं॑ तमि॑म्द्रापर्वता पु॒रो॒युधा॒ यो नः॑ पृत॒न्यादप॒ तं-त॒मिद्ध॑तं॒ वज्रे॑ण॒ तं- त॒मिद्ध॑तं । दू॒रे च॒त्तय॑ छन्त्स॒द्‍गह॑नं॒ यदिन॑क्षत् । अ॒स्माकँ॒ शत्रु॒उन्परि॑ शूर वि॒श्वतो॑ द॒र्मा द॑र्षीष्ट वि॒श्वतः॑ । भूर्भुवः॒ स्वः॒ सुप्र॒जाः प्र॒जाभिः स्याम सुवीरा॑ वी॒राइः सुपोषा॒ पोषैः॑ ॥ ५३ ॥


अर्थ - सन्मुख उभे राहून शत्रूंशीं युद्ध करणार्‍या इंद्रपर्वतांनो, तुम्ही आमच्याशीं युद्ध करणार्‍या सर्व शत्रूंचा नाश करा व त्या त्या शत्रूचा वज्रानें नाश कराच. हे शूर इन्द्रा, रानांत दूर गेलेल्या शत्रूला मारण्याची तुझी इच्छा असल्यास तुझें वज्र तेथेंही त्याला प्राप्त करील. तदनंतर विदारण करणारें वज्र सर्वत्र असलेल्या आमच्या शत्रूंचा नाश करो. हे अग्निवायुसूर्यांनो, आम्ही प्रजा, पुत्र व धनांनी वृद्धिंगत होऊं. ॥५३॥





विनियोग - यानंतर चौतीस आहुतींचा होम सांगितला आहे.


प॒र॒मे॒ष्ठ्यभिधी॑तः प्र॒जाप॑तिर्वा॒चि व्याहृ॑ताया॒मन्धो॒ अच्छे॑तः । सवि॒ता स॒न्यां वि॒श्वक॑र्मा दी॒क्षायां॑ पू॒षा सो॑म॒क्रय॑ण्या॒म् ॥ ५४ ॥


अर्थ - मनानें ध्यान केल्यावर सोम प्राप्त न झाल्यास परिमेष्ठिने स्वाहा ही आहुति द्यावी. सोमयाग करीन असे शब्द उच्चारल्यावर प्रायश्चित्ताचा प्रसंग आल्यास 'प्रजापतये स्वाहा' ही आहुति द्यावी. सोमाजवळ गेल्यावर प्रायश्चित्तप्रसंग आल्यास 'अन्धसे स्वाहा' ही आहुति द्यावी. सोमविभागाचे वेळीं प्रायश्चित्तप्रसंग आल्यास 'सवित्रे स्वाहा' असा होम करावा. दीक्षा झाल्यावर प्रायश्चित्त प्रसंग आल्यास 'विश्वकर्मणे स्वाहा' या आहुतीचा होम करावा. सोमक्रयणी गाय आणल्यानंतर प्रायश्चित्तप्रसंग आल्यास 'पूष्णे स्वाहा' या आहुतीचा होम करावा. कारण त्या त्या वेळीं त्या त्या संज्ञा प्राप्त होतात. ॥५४॥





विनियोग -


इन्द्र॑श्च म॒रुत॑श्च क्र॒यायो॒पोत्थि॒तो ऽसु॑रः प॒ण्यमा॑नो मि॒त्रः क्री॒तो विष्णुः॑ शिपिवि॒ष्ट उ॒रावास॑न्नो॒ विष्णु॑र्न॒रन्धि॑षः ॥ ५५ ॥


अर्थ - सोम पुढें ठेवल्यावर 'इन्द्राय मरुद्भ्यश्च स्वाहा', सोम विकत घेत असतां 'असुराय स्वाहा', सोम विकत घेतल्यावर 'मित्राय स्वाहा', सोम मांडीवर घेतल्यावर 'विष्णवे शिपिविष्ठाय स्वाहा', सोम गाडींत घालून नेत असतां 'विष्णवे नरन्धिषाय स्वाहा' ही प्रायश्चित्ताहुति आहे. कारण त्या त्या वेळीं त्यास त्या त्या संज्ञा प्राप्त होतात. ॥५५॥





विनियोग -


प्रो॒ह्यमा॑णः॒ सोम॒ आग॑तो॒ वरु॑ण आस॒न्द्यामास॑न्नो॒ ऽग्निराग्नी॑ध्र॒ इन्द्रो॑ हवि॒र्धाने ऽथ॑र्वोपावह्रियमा॑णः॒ ॥ ५६ ॥


अर्थ - सोम गाडींतून खालीं काढल्यावर 'सोमाय स्वाहा', सोम घडवंचीवर ठेवल्यावर 'वरुणाय स्वाहा', सोम अग्नीध्र स्थानांत आल्यानंतर 'अग्नये स्वाहा', सोम हविर्धान मण्डपांत आल्यानंतर 'इंद्राय स्वाहा', व सोम कांडण्याकरितां नेत असतां 'अथर्वणे स्वाहा' ही प्रायश्चित्ताहुति आहे. कारण त्या त्या वेळीं त्यास त्या त्या संज्ञा प्राप्त होतात. ॥५६॥





विनियोग -


विश्वे॑ दे॒व अँ॒सुषु॒ न्युप्तो॒ विष्णु॑राप्रीत॒पा आ॑प्या॒य्यमा॒नो य॒मः सूयमा॑नो॒ विष्णुः॑ सम्भ्रि॒यमा॑णो वा॒युः पूयमा॑नः सु॒क्रः पू॒तः शु॒क्रः क्षी॑र॒श्रीर्म॒न्थी स॑क्तु॒श्रीः ॥ ५७ ॥


अर्थ - सोम त्याच्या तुकडयांवर ठेवल्यानंतर 'विश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा', सोम वृद्धिंगत झाल्यावर 'विष्णवे आप्रीतपाय स्वाहा', सोमाचें कण्डन होत असतां 'यमाय स्वाहा', त्याची वृद्धि होत असतां 'विष्णवे स्वाहा', दशापवित्रानें तो गाळीत असतां 'वायवे स्वाहा', तो गाळल्यानंतर 'शुक्राय स्वाहा', त्यांत दूध मिसळल्यानंतर 'शुक्राय स्वाहा', त्यांत सातू मिसळल्यानंतर 'मंथिने स्वाहा', ही प्रायश्चित्ताहुति आहे. कारण त्या त्या वेळीं त्यास त्या त्या संज्ञा प्राप्त होतात. ॥५७॥





विनियोग -


विश्वे॑ दे॒वाश्च॑म॒सेषून्नि॒तो ऽसुहोमा॒योद्य॑तो रु॒द्रो हूयमा॑नो॒ वातो॒ऽभ्यावृ॑त्तो नृ॒चक्षाः॒ प्रति॑ख्यातो भ॒क्षो भ॒क्ष्यमा॑णः पि॒तरो॑ नाराशँ॒साः ॥ ५८ ॥


अर्थ - सोम चमसांत घेतल्यावर 'विश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा', होमाची तयारी झाल्यावर 'असवे स्वाहा', होमाचे वेळीं 'रुद्राय स्वाहा', सदोमण्डपांत भक्षणाकरितां आणल्यावर 'वाताय स्वाहा', भक्षणाची आज्ञा विचारल्यावर 'नृचक्षसे स्वाहा', त्याचें पान करीत असतां 'भक्षाय स्वाहा', भक्षण करून खालीं ठेवल्यावर 'पितृभ्यो नाराशंसेभ्यः स्वाहा' ही प्रायश्चित्ताहुति द्यावी. कारण त्या त्या वेळीं त्यास त्या त्या संज्ञा प्राप्त होतात. ॥५८॥





विनियोग -


स॒न्नः सिन्धु॑रवभृ॒थायोद्य॑तः समु॒द्रो॒ऽभ्यवह्रियमा॑णः सलि॒लः प्र्प्लु॑तो॒ ययो॒रोज॑सा स्कभि॒ता रजाँ॑सि वी॒र्ये॒भिर्वी॒रत॑मा॒ शवि॑ष्ठा । यापत्ये॑ते॒ अप्र॑तीता॒ सहो॑भि॒र्विष्णू॑ अग॒न्वरु॑णा पू॒र्वहू॑तौ ॥ ५९ ॥


अर्थ - अवभृथाची तयारी झाल्यावर 'सिन्धवे स्वाहा', अवभृथाकरितां जलाकडे नेत असतां 'समुद्राय स्वाहा', पाण्यांत बुडविल्यावर 'सलिलाय स्वाहा', ही प्रायश्चित्ताहुति द्यावी. कारण त्या त्या वेळीं त्यास त्या त्या संज्ञा प्राप्त होतात. ह्या आहुतींनीं सर्व देवांशीं यज्ञ जोडला जातो. ('ययोरोजसा' या मंत्रभागानें खाली सांडलेल्या सोमावर पाणी शिंपडावें) ज्यांच्या बलानें हे सर्व लोक आडवून धरले जातात त्या विष्णु व वरुणाकडे हें गळालेलें हविर्द्रव्य प्रधान हवीचा होम होत असतां, गेलें. जे विष्णु वरुण जगांचे स्वामी, बलानें अत्यंत वीर्यसंपन्न, बलांत ज्यांची कोणी बरोबरी करणार नाही असे व अविज्ञात असे आहेत. ॥५९॥





विनियोग - सांडलेल्या सोमाला 'देवान् दिवम्' या मंत्रभागानें स्पर्श करावा.


दे॒वन्दिव॑मगन्य॒ज्ञस्ततो॑ मा॒ द्रवि॑णमष्टु मनु॒ष्या॒न॒न्तरि॑क्षमगन्य॒॒ज्ञस्ततो॑ मा॒ द्रवि॑णमष्टु पितॄन्पृथिवीमगन्यज्ञस्ततो मा द्रविणमष्टु यं कं च लोकमगन्यज्ञस्ततो मे भद्रमभूत् ॥ ६० ॥


अर्थ - हा यज्ञ वाय्वादि देवांना प्राप्त होऊन द्युलोकाप्रत गेला. त्या द्युलोकस्थ यज्ञाचें फल मला मिळो. (हा वर जाण्याचा क्रम सांगितला. आतां खाली उतरण्याचा क्रम सांगतात.) यज्ञ द्युलोकांतून खालीं येतांना अन्तरिक्षलोकाला गेला. तेथें असलेलें यज्ञफल मला मिळो. (दक्षिणायनांतलें जाणें येणें सांगतात) हा यज्ञ धूमादिमार्गानें पितृलोकाला जाऊन खालीं पृथ्वीवर आला. पितृलोकांतील यज्ञफल मला मिळो. विशेष काय सांगावें. ज्या ज्या लोकांत हा यज्ञ गेला तेथील फल मला मिळो. ॥६०॥





विनियोग -


चतु॑स्त्रीँश॒त्तन्त॑वो॒ ये वि॑तत्नि॒रे य इ॒मं य॒ज्ञँ स्व॒धया॒ दद॑न्ते । तेषां॑ छि॒न्नँ सम्वे॒तद्द॑धामि॒ स्वाहा॑ घ॒र्मो अप्ये॑तु दे॒वान् ॥ ६१ ॥


अर्थ - यूप दूर करून यज्ञविस्तार करणारे जे ३४ देव माझ्या यज्ञाचा विस्तार करतात व यज्ञ धारण करतात, त्या देवांचें जें कमी झालें तें मी पूर्ण करतों. हें हवि सुहुत असो. धर्म महावीर सविता होऊन देवांप्रत गमन करो. ॥६१॥





विनियोग - 'यज्ञस्य दोहः' हा मंत्र यजमानाकडून म्हणवावा.


य॒ज्ञस्य॒ दोहो॒ वित॑तः पुरु॒त्रा सो अ॑ष्ट॒धा दिव॑म॒न्वात॑तान । स य॑ज्ञ धूक्ष्व॒ महि॑ मे प्र॒जायाँ॑ रा॒यस्पोषं॒ विश्व॒मायु॑रशीय॒ स्वाहा॑ ॥ ६२ ॥


अर्थ - याच्या आहुतींचा परिणाम म्हणजे फल पुष्कळ विस्तृत होऊन अष्टदिग्भेदानें द्युलोकाला व्याप्त करतें झालें. अशा हे यज्ञा, माझ्या संततीला ऐश्वर्य दे व तुझ्या प्रसादानें माझ्या द्रव्याची व संपूर्ण आयुष्याची वृद्धि होवो. ॥६२॥





विनियोग - पशु अगर सोमावर कावळा बसला असतां उद्गात्यानें 'आपवस्व' या मंत्रानें यूपहोम करावा.


आ प॑वस्व॒ हिर॑ण्यव॒दश्व॑वस्तोम वी॒रव॑त् । वाजं॒ गोम॑न्त॒मा भ॑र॒ स्वाह॑ ॥ ६३ ॥


अर्थ - हे सोमा, तूं सुवर्ण, अश्व व वीर बरोबर घेऊन ये. व अन्न आणि गाई आम्हाला दे. हें हवि सुहुत असो. ॥६३॥





॥ अष्टमोऽध्यायः ॥
ॐ तत् सत्


GO TOP