![]() |
शुक्ल यजुर्वेद विनियोग - अकराव्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत अग्निचयनाचे मंत्र आहेत. 'युञ्जानः प्रथमम्' इत्यादि आठ मंत्रांनीं आज्याचा होम करावा. युन्ञ्जानः प्र॑थ॒मं मन॑स्त॒त्त्वाय॑ सवि॒ता धियः॑ । अ॒ग्नेर्ज्योति॑नि॒चाय्य॑ पृथि॒व्या अध्याऽभ॑रत् ॥ १ ॥ अर्थ - सर्वप्रेरक व प्रथम मनाची एकाग्रता करणारा प्रजापतिरूपी चयनअग्नीचें तेज पंचपशूंमध्यें प्रविष्ट झालें असें समजून व इष्टकादि विषयक ज्ञानें मनांत आणून व बुद्धीनें त्यांचा निश्चय करून तें चयनाग्नींचें तेज पृथ्वींतून बाहेर एकत्र करिता झाला म्हणजे इष्टक (विटा) करून त्यानें अग्निचयन केलें. ॥१॥ विनियोग - यु॒क्तेन॒ मन॑सा व॒यं दे॒वस्य॑ सवि॒तुः स॒वे । स्व॒र्ग्या॒य॒ शक्त्या॑ ॥ २ ॥ अर्थ - प्रेरक अशा प्रजापति देवाच्या आज्ञेनें आम्ही एकाग्र अंतःकरणानें स्वर्गोपादककर्म आपल्या शक्तीप्रमाणें करण्याचा प्रयत्न करितों. ॥२॥ विनियोग - यु॒क्त्वाय॑ सवि॒ता दे॒वान्स्त्स्व॑र्य॒तो धि॒या दिव॑म् । बृ॒हज्ज्योतिः॑ करिष्य॒तः स॑वि॒ता प्रसु॑वाति॒ तान् ॥ ३ ॥ अर्थ - प्रेरक अशा सविता तेजानें प्रकाशणार्या, स्वर्गाप्रत जाणार्या व मोठें असें आदित्यतेज आपलेसें करणार्या देवांना अग्निकर्मांत युक्त करून प्रेरणा करितो म्हणजे त्यांचेकडून अग्निकर्म करवितों. ॥३॥ विनियोग - यु॒ञ्जते॒ मन॑ऽ उ॒त यु॑ञ्जते॒ धियो॒ विप्रा॒ विप्र॑स्य बृह॒तो वि॑प॒श्चितः॑ । वि होत्रा॑ दधे वयुना॒विदेक॒ऽ इन्म॒ही दे॒वस्य॑ सवि॒तुः परि॑ष्टुतिः ॥ ४ ॥ अर्थ - मोठया वेदवेत्त्या यजमानाचे होम करणारे ऋत्विज आपल्या मनाची व इंद्रियांची स्थापना लौकिक विषयांतून काढून यज्ञकर्मांतच करितात. हे ऋत्विज व यजमान एका सर्वसाक्षी परमात्म्यानेंच केले. कारण त्या अंतर्यामी ईश्वराची सर्वदा बोलली जाणारी ही मोठी स्तुति आहे. ॥४॥ विनियोग - यु॒जे वां॒ ब्रह्म॑ पू॒र्व्यं नमो॑भि॒र्वि श्लोक॑ऽ एतु प॒थ्ये॒व सू॒रेः । शृ॒ण्वन्तु॒ विश्वे॑ऽ अ॒मृत॑स्य पु॒त्राऽ आ ये धामा॑नि दि॒व्यानि॑ त॒स्थुः ॥ ५ ॥ अर्थ - हे पत्नीयजमानांनो, मी तुमच्याकरितां वृताहुतियुक्त अन्नानें व पूर्वमहर्षींनीं आचरलेलें अग्निचयनाख्य कर्म करितों. यज्ञांतील आहुति उभय लोकांना व्याप्त करिते त्याप्रमाणें या यजमानाची कीर्ति उभयलोकांत गमन करो. अमर अशा प्रजापतीचे दिव्य लोकांत गेलेले पुत्र या यजमानाची कीर्ति श्रवण करोत. ॥५॥ विनियोग - यस्य॑ प्र॒याण॒मन्व॒न्यऽ इद्य॒युर्देवा॒ दे॒वस्य॑ म॒हिमान॒मोज॑सा । यः पार्थि॑वानि विम॒मे सऽ एत॑शो॒ रजाँ॑सि दे॒वः स॑वि॒ता म॑हित्व॒ना ॥ ६ ॥ अर्थ - बाकीचे देव ज्यांचें प्रयाण झालें असतां अवश्य अनुगमन करितात व तेजानें ज्याच्या मोठेपणाचें अनुसरण करते झाले व जो पृथिव्यादि लोकांची गणना करितो तो सविता देव आपल्या मोठेपणानें हें स्थावर जंगमात्मक जग व्याप्त करितो. ॥६॥ विनियोग - देव॑ सवितः॒ प्रसु॑व य॒ज्ञं प्रसु॑व य॒ज्ञप॑तिं॒ भगा॑य । दि॒व्यो ग॑न्ध॒र्वः के॑त॒पूः केतं॑ नः पुनातु वा॒चस्पति॒र्वाचं॑ नः स्वदतु ॥ ७ ॥ अर्थ - हे प्रकाशमान सर्वप्रेरक सवित्या, या यजमानाकडून ऐश्वर्यप्राप्तीकरितां चयनयाग करून घे. तुझ्या प्रसादानें आकाशांत असलेला दुसर्याच्या मनांतील हेतु ओळखणारा व वाणीचा पालक सूर्यमंडलस्थ देव आमचे चित्तांतील ज्ञान शुद्ध करो. तसेंच त्यास आमची वाणी आवडो. ॥७॥ विनियोग - इ॒मं नो॑ देव सवितर्य॒ज्ञं प्रण॑य देवा॒व्यँ॒ सखि॒विदँ॑ सत्रा॒जितं॑ धन॒जितँ॑ स्व॒र्जित॑म् । ऋ॒चा स्तोमँ॒ सम॑र्धय गाय॒त्रेण॑ रथन्त॒रं बृ॒हद्गा॑य॒त्रव॑र्त्तनि॒ स्वाहा॑ ॥ ८ ॥ अर्थ - हे सवितृ देवा, आमचा यज्ञ स्वर्गलोकाला पोंचव. तो यज्ञ देवांचा संतोष करणारा, या यजमानाला मित्र समजणारा, द्वादशाहादि सत्रांना वश करितात असा, गोधन हें ज्याचे फल आहे व जो स्वर्ग प्राप्त करून देतो असा आहे आणि हे सवित्या, तूं साम ज्यावर अधिष्ठित आहे अशा ऋग्वेदासह त्रिवृदादिक सोमाला वाढीव. तसेंच गायत्र सामासह रथंतर साम आणि गायत्र सामच ज्याचा मार्ग आहे असें बृहत्साम वाढव. ॥८॥ विनियोग - 'देवस्यत्वा' इत्यादि दोन ऋचांनी अग्नि हातांत घेऊन 'हस्त आधाय' या अकराव्या मंत्रानें तिचें अभिमंत्रण करावें. दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम् । आद॑दे गाय॒त्रेण॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वत्पृ॑थि॒व्याः स॒धस्था॑द॒ग्निं पु॑री॒ष्यमङ्गिर॒स्वदा भर॒ त्रैष्टुभेन॒ छन्दसाऽङ्गिर॒स्वत् ॥ ९ ॥ अर्थ - हे अभ्रे, पूर्वी अंगिरा ऋषीनें तुझें ग्रहण केलें त्याप्रमाणें सवितृदेवाच्या प्रेरणेनें गायत्रछन्दयुक्त होऊन मी अश्विनीकुमारांच्या बाहूंनीं व पूष्याच्या हातांनीं तुझें ग्रहण करतों. तूं अंगिरा ऋषीप्रमाणेंच पृथ्वीच्या उत्संगावरून त्रिष्टुप् छन्दानें अग्नि आण. तो अग्नि पशूंचें हित करणारा आहे. ॥९॥ विनियोग - अभ्रि॑रसि॒ नार्य॑सि॒ त्वया॑ व॒यम॒ग्निँ श॑केम॒ खनि॑तुँ स॒धस्थ॒ आ । जाग॑तेन॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वत् ॥ १० ॥ अर्थ - तूं उखासाधनभूत अभ्रि आहेस. तुला शत्रू नाहीं म्हणजे खणत असतां दगड वगैरे तुला अडवीत नाहीं. तुझ्या साहाय्यानें अंगिरा ऋषीप्रमाणें आम्ही पृथिवीच्या उत्संगांत असलेल्या अग्नीचें जागत छन्दानें खनन करण्यास समर्थ होऊं. ॥१०॥ विनियोग - हस्त॑ऽ आ॒धाय॑ सवि॒ता बिभ्र॒दभ्रिँ॑ हिर॒ण्ययी॑म् । अ॒ग्नेर्ज्योति॑र्नि॒चाय्य॑ पृथि॒व्या अध्याऽभ॑र॒दानु॑ष्टुभेन॒ छन्द॑साऽङ्ग्निर॒स्वत् ॥ ११ ॥ अर्थ - सविता अंगिरा ऋषीप्रमाणें सोन्याची अभ्रि हातांत घेऊन तिच्या साहाय्यानें अग्नीचें तेज निश्चयानें पाहून अनुष्टुभ छन्दानें पृथ्वींतून काढता झाला. ॥११॥ विनियोग - 'प्रतूर्तं' इत्यादि तीन ऋचांनीं अश्व, गर्दभ व अजा यांचें अभिमंत्रण करावें. प्रतू॑र्तं वाजि॒न्ना द्र॑व॒ वरि॑ष्ठा॒मनु॑ सं॒वत॑म् । दि॒वि ते॒ जन्म॑ पर॒मम॒न्तरि॑क्षे॒ तव॒ नाभिः॑ पृथि॒व्यामधि॒ योनि॒रित् ॥ १२ ॥ अर्थ - हे शीघ्रगामी अश्वा, उत्कृष्ट अशा या भूमीवर शीघ्र ये. येथें येणार्या अश्वरूपी तुझा आदित्यरूपानें द्युलोकांत जन्म होईल. अन्तरिक्षांत तुझें उदर व भूलोकावर तुझे पायच आहेत. ॥१२॥ विनियोग - यु॒ञ्जाथाँ॒ रास॑भं यु॒वम॒स्मिन् यामे॑ वृषण्वसू । अ॒ग्निं भर॑न्तमस्म॒युम् ॥ १३ ॥ अर्थ - ज्यांचें द्रव्य फलप्रद आहे अशा हे अध्वर्युयजमानांनो, या यज्ञकर्मांत तुम्ही गर्दभाला बांधा. तो गर्दभ अग्निधारण करण्य़ास समर्थ व आमचा हितेच्छु आहे. ॥१३॥ विनियोग - योगे॑-योगे त॒वस्त॑रं॒ वाजे॑-वाजे हवामहे । सखा॑य॒ इन्द्र॑मू॒र्तये॑ ॥ १४ ॥ अर्थ - परस्परस्नेही बनलेले ऋत्विग् व यजमान असे आम्ही इंद्रियसामर्थ्य देणार्या अजाला आमचें रक्षण करण्याकरितां देवमनुष्यांस निरनिराळी अन्नें देण्याकरितां बोलावितों. तो अज निरनिराळ्या सर्वकर्मांत अतिशय बलिष्ठ आहे. ॥१४॥ विनियोग - 'प्रतूर्वन्' इत्यादि तीन मंत्रांनीं अश्वादिकांना स्पर्श न करतां भय दाखवून पूर्वेकडे घालवावें. प्र॒तूर्व॒न्नेह्य॑व॒क्राम॒न्नश॑स्ती रु॒द्रस्य॒ गाण॑पत्यं मयो॒भूरेहि॑ । उ॒र्वन्तरि॑क्षं॒ वी॒हि स्व॒स्तिग॑व्यूति॒रभ॑यानि कृ॒ण्वन् पू॒ष्णा स॒युजा॑ स॒ह ॥ १५ ॥ अर्थ - हे अश्वा, तूं शत्रूंचा नाश करणारा व अपकीर्ति निवारण करणारा असा होत्साता येथें ये व येथें आम्हाला सुख देऊन रुद्राच्या गणांचें आधिपत्य प्राप्त कर. हे गर्दभा, ऋत्विग्यजमानांना अभय देणारा असा युक्त होणार्या पृथ्वीसह विस्तीर्ण अशा अन्तरिक्षांत गमन कर. ज्याचा मार्ग कल्याणकारक आहे असा तूं हो. ॥१५॥ विनियोग - तीनही अग्नि प्रदीप्त झाल्यावर ब्रह्मा, यजमान व अध्वर्यु यांनीं 'अग्निम् पुरीष्यम्' हा मंत्र म्हणून श्वभ्रस्थ मृत्तिकापिंडाजवळ जावें. दुसर्या 'अग्निं पुरीष्यम्' या मंत्रानें अग्नीकडे पहावें. पृ॒थि॒व्याः स॒धस्था॑द॒ग्निं पु॑री॒ष्य॒मङ्गिर॒स्वदाभ॑रा॒ग्निं पु॑री॒ष्य॒मङ्गिर॒स्वदच्छे॑मो॒ऽग्निं पु॑री॒ष्य॒मङ्गिर॒स्वद्भ॑रिष्यामः ॥ १६ ॥ अर्थ - हे अभ्रे, अंगिरा ऋषीप्रमाणें पृथिवीच्या उत्संगावरून पशूंना हितकर असा अग्नि आण. अंगिरा ऋषीप्रमाणें आम्ही पशूंना हितकारक अशा अग्नीच्या सन्मुख जातों व अंगिरा ऋषीप्रमाणें आम्ही पशुहितकारी अशा अग्नीचें संपादन करतों. ॥१६॥ विनियोग - 'अन्वग्निः' या मंत्रभागानें मृत्तिकेच्या गोळ्याकडे पहावें. अन्व॒ग्निरु॒षसा॒मग्र॑मख्य॒दन्वहा॑नि प्रथ॒मो जा॒तवे॑दाः । अनु॒ सूर्य॑स्य पुरु॒त्रा च॑ र॒श्मीननु॒ ध्यावा॑पृथि॒वी आ त॑तन्थ ॥ १७ ॥ अर्थ - अग्नि उषःकालांना प्रकाशित करता झाला. उत्पन्न झालेल्या प्रत्येक वस्तूचें ज्याला ज्ञान आहे असा तो अग्नि मुख्य होऊन दिवसांना प्रकाशित करता झाला, तसेंच तो सूर्याच्या किरणांना पुष्कळ प्रकारें प्रकाशित करता झाला व त्यानें द्यावापृथिवींना क्रमेंकरून व्याप्त केलें. असा जो सर्वप्रकाशक अग्नि त्यास आम्ही पहातों. ॥१७॥ विनियोग - 'आगत्य' इत्यादि मंत्रभागानें अश्वाचें अभिमंत्रण करावें. आ॒गत्य॑ वा॒ज्यध्वा॑नँ॒ सर्वा॒ मृधो॒ वि धू॑नुते । अ॒ग्निँ स॒धस्थे॑ मह॒ति चक्षु॑षा॒ नि चिकी॑षते ॥ १८ ॥ अर्थ - वेगवान् हा घोडा मार्गांत येऊन सर्व संग्राम व श्रम दूर करतो. नंतर श्रमरहित होऊन उत्कृष्ट अशा जवळच पृथ्वीवरील अग्न्युत्पत्तिस्थानाकडे पहातो. ॥१८॥ विनियोग - 'आक्रम्य' या मंत्रानें घोडयाचा डावा पाय मातीच्या गोळ्यावर ठेववावा. आ॒क्रम्य॑ वाजिन् पृथि॒वीम॒ग्निमि॑च्छ रु॒चा त्वम् । भूम्या॑ वृ॒त्वाय॑ नो ब्रूहि॒ यतः॒ खने॑म॒ तं व॒यम् ॥ १९ ॥ अर्थ - हे शीघ्रगामी अश्वा, पायानें पृथ्वीला स्पर्श करून दीप्तीनें अग्न्युत्पादक मृत्तिकेचा शोध कर. व तसा स्पर्श करून हा प्रदेश अग्न्युत्पादक मृत्तिकेस योग्य आहे असें आम्हास सांग म्हणजे आम्ही तेथें खणून अग्निसंपादन करूं. ॥१९॥ विनियोग - अश्वपृष्ठावर हात ठेवून अध्वर्यूनें 'द्यौस्ते' हा मंत्र म्हणावा. द्यौस्ते॑ पृ॒ष्ठं पृ॑थि॒वी स॒ध॑स्थमा॒त्माऽन्तरि॑क्षँ समु॒द्रो योनिः॑ । वि॒ख्याय॒ चक्षु॑षा॒ त्वम॒भि ति॑ष्ठ पृतन्य॒तः ॥ २० ॥ अर्थ - हे अश्वा, द्युलोक तुझें पृष्ठ आहे, पृथ्वीलोक पाय आहेत व अन्तरिक्षलोक तुझा आत्मा आहे व उदक तुझें उत्पत्तिस्थान आहे. अशा रीतीनें ज्याची स्तुति होते असा तूं उखायोग्य मृत्तिका आपल्या डोळ्याने पहा व संग्रामेच्छु व मृत्तिकेंत लपून बसलेल्या राक्षसादिक शत्रूंवर पाय देऊन त्यांचा नाश कर. ॥२०॥ विनियोग - 'उत्क्राम' या मंत्रानें मृत्तिकापिंडावरून अश्वाला बाजूला करावा. उत्क्रा॑म मह॒ते सौभ॑गाया॒स्मादा॒स्थाना॑द् द्रविणो॒दा वा॑जिन् । व॒यँ स्या॑म सुम॒तौ पृ॑थि॒व्याऽ अ॒ग्निं खन॑न्तऽ उ॒पस्थे॑ऽ अस्याः ॥ २१ ॥ अर्थ - हे वेगवान् अश्वा, माझी भाग्यवृद्धि व्हावी म्हणून या खनन प्रदेशावरून बाजूला हो. तूं द्रव्य देणारा आहेस. या पृथ्वीनें आमच्याविषयी सद्बुद्धि धारण करावी; कारण तिच्या वरच्या भागची माती आम्ही खणतों. ॥२१॥ विनियोग - 'उदक्रमीत्' या मंत्रानें खालीं उतरलेल्या अश्वाचें अभिमंत्रण करावें. उद॑क्रमीद् द्रविणो॒दा वा॒ज्यर्वाकः॒ सुलो॒कँ सुकृ॑तं पृथि॒व्याम् । ततः॑ खनेम सु॒प्रती॑कम॒ग्निँ स्वो॒ रुहा॑णा॒ अधि॒ नाक॑मुत्त॒मम् ॥ २२ ॥ अर्थ - वेगवान् व द्रव्यदाता घोडा ज्या प्रदेशांतून उतरला त्या पृथिवीवरील चांगल्या स्थानाला त्यानें पुण्यवान् केलें. त्या प्रदेशांतून आम्ही उत्तममुख अशा अग्नीस हेतुभूत मृत्तिका खणतों व दुःखरहित आणि उत्तम अशा स्वर्गाच्या इच्छेनें आम्हीं हें कर्म करतों. ॥२२॥ विनियोग - 'आत्वा जिघर्मि' या मंत्रानें घोडयाच्या पावलाचे जागीं घृताचा होम करावा. ॑आ त्वा जिघर्मि॒ मन॑सा घृ॒तेन॑ प्रतिक्षि॒यन्तं॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ । पृ॒थुं ति॑र॒श्चा वय॑सा बृ॒हन्तं॒ व्यचि॑ष्ठ॒मन्नै॑ रभ॒सं दृशा॑नम् ॥ २३ ॥ अर्थ - हे अग्नि, मी श्रद्धायुक्त अंतःकरणानें तुझ्यांत घृताचा होम करून तुला प्रदीप्त करतों. तूं सर्व भूतांत निवास करणारा, तिर्यग्गमन करणार्या तेजानें विस्तृत, धूरानें विस्तीर्ण, पुष्कळ जागा व्याप्त करणारा, घृतादिक अन्नांनीं उत्साहयुक्त व प्रत्यक्ष दृश्य असा आहेस. ॥२३॥ विनियोग - आ वि॒श्वतः॑ प्र॒त्यञ्चं॑ जिघर्म्यर॒क्षसा॒ मन॑सा॒ तज्जुषेत । मर्य॑श्री स्पृह॒यद्व॑र्णो अ॒ग्निर्नाभि॒मृशे॑ त॒न्वा जर्भु॑राणः ॥ २४ ॥ अर्थ - मी प्रत्यगात्मभूत अशा अग्नीला सर्व बाजूंनी प्रदीप्त करतों. त्या अग्नीनें क्रूरतारहित अशा अंतःकरणानें घृताचें सेवन करावें. तो अग्नि मनुष्यांना सेव्य, स्पृहणीय रूपाचा व स्पर्श करण्यास कठीण अशा ज्वालात्मक शरीराने सर्व बाजूंना गमन करणारा असा आहे. ॥२४॥ विनियोग - 'परि वाजपतिः' या मंत्रानें अभ्रीनें मृत्तिकापिंडावर तीन रेघा ओढाव्या. परि॒ वाज॑पतिः क॒विर॒ग्निर्ह॒व्यान्य॑क्रमीत् । दध॒द्रत्ना॑नि दा॒शुषे॑ ॥ २५ ॥ अर्थ - हा अग्नि निरनिराळीं हविर्द्रव्यें भक्षणाकरितां स्वीकारता झाला. तो अग्नि अन्नांचा स्वामी, भूतवस्तूंचे दर्शन करणारा व हविर्भाग देणार्या यजमानाला धनें देणारा असा आहे. ॥२५॥ विनियोग - परि॑ त्वाऽग्ने॒ पुरं॑ व॒यं विप्रँ॑ सहस्य धीमहि । धृ॒षद्व॑र्णं दि॒वे-दि॑वे ह॒न्तारं॑ भङ्गु॒राव॑ताम् ॥ २६ ॥ अर्थ - मंथनापासून बलानें उत्पन्न होणार्या हे अग्ने, आम्ही सर्व तर्हेनें तुझें ध्यान करतों. तूं आग्नेय्यादि नगरांचा रक्षक, बुद्धिमान्, असह्यरूपी व प्रत्येक दिवशीं राक्षसांचा नाशक असा आहेस. ॥२६॥ विनियोग - त्वम॑ग्ने॒ द्युभि॒स्त्वमा॑शुशु॒क्षणि॒स्त्वमद्भ्यस्त्वम्॒अश्म॑न॒स्परि॑ । त्वं वने॑भ्य॒स्त्वमोष॑धीभ्य॒स्त्वं नृ॒णां नृ॑पते जायसे॒ शुचिः॑ ॥ २७ ॥ अर्थ - हे मनुष्यपालका अग्ने, तूं प्रत्येक दिवशीं मंथनानें उत्पन्न होतोस व शीघ्र तमाचा नाशक आहेस. तसेंच वर्षधारांपासून विजेच्या रूपानें, पाषाणांत, अरणिकाष्ठांत, बांबूंच्या संघटनांत व यजमानांचे घरीं उत्पन्न होतोस आणि शुद्धिकारक आहेस. ॥२७॥ विनियोग - अभ्रीनें मातीचा गोळा फोडावा. दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पूष्णो हस्ता॑भ्याम् । पृ॒थि॒व्याः स॒धस्था॑द॒ग्निं पु॑री॒ष्य॒मङ्गिर॒स्वत् ख॑नामि । ज्योति॑ष्मन्तं त्वाऽग्ने सु॒प्रती॑क॒मज॑स्रेण भा॒नुना॒ दीद्य॑तम् । शि॒वं प्र॒जाभ्योऽहिँ॑सन्तं पृथि॒व्याः स॒धस्था॑द॒ग्निं पु॑री॒ष्य॒मङ्गिर॒स्वत्ख॑नामः ॥ २८ ॥ अर्थ - अंगिरा ऋषीप्रमाणें मी सवितृ देवाच्या प्रेरणेनें अश्विनीकुमारांच्या बाहूंनीं व पूष्याच्या हातांनीं पृथिवीच्या वरील प्रदेशावरून पशूंना हितकारक व ज्वालायुक्त अशा अग्नीचें खनन करतों. हे अग्ने, अंगिरा ऋषीप्रमाणें मी पुनः पृथ्वीच्यावरील प्रदेशावरून तुझें खनन करतों. तूं शोभनमुखाचा, निरंतर प्रकाशानें युक्त असा आहेस. हे अग्ने, अंगिरा ऋषीप्रमाणें पृथ्वीच्यावरील प्रदेशावरून पशूंना हितकारक अशा तुझें खनन करतों. तूं प्रजांचें कल्याण करणारा व हिंसा न करणारा असा आहेस. ॥२८॥ विनियोग - मृत्पिण्डाचे उत्तरभागीं कृष्णाजिन पसरावें. त्यावर 'अपां पृष्ठं' या मंत्रभागानें कमलिनीपात्राचें आच्छादन करावें. 'दिवः' या मंत्रानें कमलिनी पात्र पसरावें. अ॒पां पृष्ठम॑सि॒ योनि॑र॒ग्नेः स॑मु॒द्रम॒भितः॒ पिन्व॑मानम् । वर्ध॑मानो म॒हाँ२ऽ आ च॒ पुष्क॑रे दि॒वो मात्र॑या वरि॒म्णा प्र॑थस्व ॥ २९ ॥ अर्थ - हे पुष्करपर्णा, तूं जलाचें पृष्ठ आहेस व या अग्नीकरितां असणार्या मृत्तिकापिंडाचें कारण आहेस. तसेंच सर्व बाजूंनीं वाहणार्या या जलाची प्रीति करणारें आहेस व या जलांत पुष्कळ प्रकारें तूं वृद्धिंगत होतोस. हे पुष्करपर्णा, द्युलोकाच्या प्रमाणानें व मोठेपणानें तूं विस्तृत हो. ॥२९॥ विनियोग - 'शर्मच' इत्यादि मंत्रानें कृष्णाजिन व पुष्करपर्ण या दोघांना स्पर्श करावा. शर्म॑ च॒ स्थो वर्म॑ च॒ स्थोऽछिद्रे बहु॒ले उ॒भे । व्यच॑स्वती॒ सं व॑साथां भृ॒तम॒ग्निं पु॑री॒ष्य॒म् ॥ ३० ॥ अर्थ - हे कृष्णाजिनपुष्करपर्णांनो, तुम्ही अग्नीला सुखकारक आहांत व कवचाप्रमाणें त्याचें रक्षण करतां. तुम्ही दोघे छिद्ररहित, सर्वावयवविशिष्ट व अवकाशयुक्त आहां. तुम्ही पशूंना हितकारक अग्नीचें चांगलें आच्छादन करा व त्याचें धारण करा. ॥३०॥ विनियोग - सं व॑साथाँ स्व॒र्विदा॑ स॒मीची॒ उर॑सा॒ त्मना॑ । अ॒ग्निम॒न्तर्भरि॒ष्यन्ती॒ ज्योति॑ष्मन्त॒मज॑स्र॒मित् ॥ ३१ ॥ अर्थ - हे कृष्णाजिनपुष्करपर्णांनो, तेजस्वी अग्नीचे निरंतर उदरांत धारण करणार्या तुम्ही विस्तृत अशा आपल्या शरीरानें अग्नीचें आच्छादन करा. तुम्ही स्वर्गलाभाचें साधन यज्ञ, सूर्य, देव अहर्वाच्य असून एकचित्तानें वागणारें आहां. ॥३१॥ विनियोग - 'पुरीष्योऽसि' या मंत्रानें मृत्तिकापिण्डाला स्पर्श करावा व तो 'त्वामग्ने' या मंत्रानें पुष्करपर्णावर ठेवावा. पु॒री॒ष्यो॒ऽसि वि॒श्वभ॑रा॒ अथ॑र्वा त्वा प्रथ॒मो निर॑मन्थदग्ने । त्वाम॑ग्ने॒ पुष्क॑रा॒दध्यथ॑र्वा॒ निर॑मन्थत । मू॒र्ध्नो विश्व॑स्य वा॒घतः॑ ॥ ३२ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं पशूंचें हित करणारा व सर्व जगाचा पोषक आहेस. हे अग्ने, सर्वांत पूर्वी उत्पन्न झालेल्या अथर्व ऋषीनें मंथन केलें. हे अग्ने, अथर्व ऋषीनें उदकापासून तुझें मंथन केलें व सर्व जगांतील ऋत्विजांनीं अरणीच्या शीर्षांतून तुझें मंथन केलें. ॥३२॥ विनियोग - तमु॑ त्वा द॒ध्यङ्ङ्रुषिः॑ पु॒त्र ई॑धे॒ अथ॑र्वणः । वृत्र॒हणं॑ पुरन्द॒रम् ॥ ३३ ॥ अर्थ - हे अग्ने, अथर्व ऋषीच्या दध्यङ् नामक पुत्रानें पूर्वोक्त गुणविशिष्ट अशाच तुला प्रज्वलित केलें. तूं वृत्रासुराचा व राक्षसांच्या नगरांचा नाशक आहेस. ॥३३॥ विनियोग - तमु॑ त्वा पा॒थ्यो वृषा॒ समी॑धे दस्यु॒हन्त॑मम् । ध॒न॒ञ्ज॒यँ रणे॑-रणे ॥ ३४ ॥ अर्थ - हे अग्ने, सन्मार्गवर्ती व वीर्यसेचक मन तुला प्रदीप्त करतें. तूं अतिशयें करून शत्रुनाशक व प्रत्येक संग्रामांत धन जिंकणारा असा आहेस. ॥३४॥ विनियोग - सीद॑ होतः॒ स्व उ॑ लो॒के चि॑कि॒त्वान्त्सा॒दया॑ य॒ज्ञँ सु॑कृ॒तस्य॒ योनौ॑ । दे॒वा॒वीर्दे॒वान्ह॒विषा॑ यजा॒स्यग्ने॑ बृ॒हद्यज॑माने॒ वयो॑ धाः ॥ ३५ ॥ अर्थ - हे देवांना बोलावणार्या अग्ने, स्वतःचा अधिकार जाणणारा तूं आपल्याच कृष्णाजिनरूपी स्थानावर बैस व तूं चांगल्या केलेल्या यज्ञाच्या कृष्णाजिनरूपी स्थानावर यज्ञाचें स्थापन कर. हे अग्ने, तूं देवांना संतुष्ट करणारा व हविर्द्रव्यानें त्याचें यजन करणारा आहेस म्हणून या यजमानाला पुष्कळ अन्न दे. ॥३५॥ विनियोग - नि होता॑ होतृ॒षद॑ने॒ विदा॑नस्त्वे॒षो दी॑दि॒वाँ२ऽ अ॑सदत्सु॒दक्षः॑ । अद॑ब्धव्रतप्रमति॒र्वसि॑ष्ठ: सहस्रम्भ॒रः शुचि॑जिह्वोऽ अ॒ग्निः ॥ ३६ ॥ अर्थ - होता बसतो त्या स्थानाला होतृषदन म्हणतात. देवांचें आव्हान करणारा अग्नि होतृसदनावर बसला. तो स्वतःचा अधिकार जाणणारा, दीप्तिमान्, होतृस्थानांत गेलेला शीघ्रकार्यकर्ता, अहिंस्यव्रत व सद्बुद्धि धारण करणारा, अतिशयेंकरून स्वस्थानांत राहणारा, हजारों लोकांचा पोषक व ज्याची ज्वालारूपी जिव्हा शुद्ध आहे असा (तात्पर्य निरनिराळ्या देवांचीं हविर्द्रव्यें अग्नीच्या मुखांत उच्छिष्ट होत नाहींत) आहेस. ॥३६॥ विनियोग - सँसी॑दस्व म॒हाँ२ऽ अ॑सि॒ शोच॑स्व देव॒वीत॑मः वि धू॒मम॑ग्ने अरु॒षं मि॑येध्य सृ॒ज प्र॑शस्त दर्श॒नम् ॥ ३७ ॥ अर्थ - हे यज्ञार्ह व प्रशस्त अग्ने, तूं या कमलपत्रावर चांगला बैस. तूं मोठा आहेस याकरितां प्रकाशित हो. तसेंच तूं देवांना अतिशयेंकरून संतुष्ट करणारा आहेस. तूं दिसण्यांत उत्तम व अप्रकाशमान असा धूर सोड. ॥३७॥ विनियोग - 'अपो देवीः' या मंत्रानें मातीच्या गोळ्यांत खडडा करून त्यांत पाणी ओतांवें. अ॒पो दे॒वीरुप॑ सृज॒ मधु॑मतीरय॒क्ष्माय॑ प्र॒जाभ्यः॑ । तासा॑मा॒स्थाना॒दुज्जि॑हता॒मोष॑धयः सुपिप्प॒लाः ॥ ३८ ॥ अर्थ - हे अग्ने, या खनन प्रदेशावर प्रकाशमान, मधुररसयुक्त व आरोग्य देणारीं जलें प्रजांच्या आरोग्याकरितां शिंपड. या सिंचित स्थानांतून उत्तम व फलयुक्त औषधि उत्पन्न होवोत. ॥३८॥ विनियोग - 'सं ते' या मंत्रानें वारा घालावा. सं ते॑ वा॒युर्मात॒रिश्वा॑ दधातूत्ता॒नाया॒ हृद॑यं॒ यद्विक॑स्तम् । यो दे॒वानां॒ चर॑सि प्रा॒णथे॑न॒ कस्मै॑ देव॒ वष॑डस्तु॒ तुभ्य॑म् ॥ ३९ ॥ अर्थ - हे पृथिवी, ऊर्ध्वमुख असलेल्या अशा तुझें हृदयासारखें जें खननस्थान पिण्डगर्तरूपानें विकसित झालें त्या स्थानाप्रत आकाशांत संचार करणारा वायु जल टाकून पूर्वीप्रमाणें करो. हे प्रकाशयुक्त वायो, तूं देवांच्या प्राणस्वरूपानें संचार करतोस अशा प्रजापतिस्वरूपी तुला ही पृथिवी सुहुत असो. ॥३९॥ विनियोग - 'सुजातः' या मंत्रानें पसरलेल्या कृष्णाजिन व पुष्करपर्णांचे अग्रभाग वर करावें. 'वासो अग्ने' या मंत्रभागानें कृष्णाजिन व पुष्करपर्णांचे अग्रभाग मुंजाच्या दोरीनें बांधावें. सुजा॑तो॒ ज्योति॑षा स॒ह शर्म॒ वरू॑थ॒माऽस॑द॒त्स्वः॒ । वासो॑ अग्ने वि॒श्वरू॑पँ॒ सं व्य॑वस्व विभावसो ॥ ४० ॥ अर्थ - चांगला उत्पन्न झालेला हा अग्नि आपल्या तेजासह स्वर्गासारख्या स्पृहणीय गृह अशा या कृष्णाजिनरूपी स्थानावर सुखानें बसो. हे प्रकाशमान अग्ने, चित्रविचित्र असें कृष्णाजिनरूपी वस्त्र चांगल्या रीतीनें धारण कर. ॥४०॥ विनियोग - 'उदु तिष्ठ' या मंत्रभागानें उठावें. उदु॑ तिष्ठ स्वध्व॒रावा॑ नो दे॒व्या धि॒या । दृ॒शे च॑ भा॒सा बृ॑ह॒ता सु॑शु॒क्वनि॒राग्ने॑ याहि सुश॒स्तिभिः॑ ॥ ४१ ॥ अर्थ - हे यागसंपादक अग्ने, ऊठ व क्रीडापर अशा बुद्धीनें आमचें रक्षण कर. हे अग्ने, किरणांना पसरणारा असा तूं चांगल्या घोडयावर बसून प्रौढ दीप्तीनें सर्व प्राण्यांना पहाण्याकरितां ये. ॥४१॥ विनियोग - 'ऊर्ध्व ऊषुणः' या मंत्रभागानें हात लांब करून पूर्वेकडील गोळा उचलावा. ऊ॒र्ध्वऽ ऊ॒ षु ण॑ऽ ऊ॒तये॒ तिष्ठा॑ दे॒वो न स॑वि॒ता । ऊ॒र्ध्वो वाज॑स्य॒ सनि॑ता॒ यद॒ञ्जिभि॑र्वा॒घद्भि॑र्वि॒ह्वया॑महे ॥ ४२ ॥ अर्थ - हे अग्ने, सवितृदेवांप्रमाणें वर चांगले प्रकारें उभा राहूनच आमचें रक्षण कर व आम्हाला अन्न दे. कारण कीं, मंत्राभिव्य??? व हविर्धारण करणार्या ऋत्विजासह तुला आम्हीं बोलावतों. ॥४२॥ विनियोग - 'स जात' इत्यादि तीन मंत्रांनीं अश्व, गर्दभ व अज यांचें अभिमंत्रण करावें. स जा॒तो गर्भो॑ असि॒ रोद॑स्यो॒रग्ने॒ चारु॒र्विभृ॑त॒ ओष॑धीषु । चि॒त्रः शिशुः॒ परि॒ तमाँ॑स्य॒क्तून्प्र मा॒तृभ्यो॒ऽ अधि॒ कनि॑क्रदग्दाः ॥ ४३ ॥ अर्थ - हे अग्ने, द्यावापृथिवींचा गर्भ होऊन तो तूं जन्माला आलास. तूं पूज्य, पुरोडाशादि सर्व औषधींत भरलेला, विचित्र स्वरूपाचा व स्तुत्य असा आहेस. तूं रात्रीचा अंधकार दूर करून मोठा शब्द करीत औषधि-वनस्पतीपासून लवकर जा. ॥४३॥ विनियोग - स्थि॒रो भ॑व वी॒ड्व॒ङ्गऽ आ॒शुर्भ॑व वा॒ज्य॒र्वन् । पृ॒थुर्भ॑व सु॒षद॒स्त्वम॒ग्नेः पु॑रीष॒वाह॑णः ॥ ४४ ॥ अर्थ - हे गमनकुशल रासभा, तूं स्थिर व दृढ शरीराचा हो, तूं वेगवान् होऊन अन्न देणारा हो व विस्तीर्ण होऊन अग्नीला सुखानें बसतां येईल असा हो. तूं मृत्तिका अथवा तृण धारण करणारा आहेस. ॥४४॥ विनियोग - शि॒वो भ॑व प्र॒जाभ्यो॒ मानु॑षीभ्य॒स्त्वम॑ङ्गिरः । मा द्यावा॑पृथि॒वीऽ अ॒भि शो॑ची॒र्मांऽतरि॑क्षं॒ मा वन॒स्पती॑न् ॥ ४५ ॥ अर्थ - हे अग्निरूपी अजा, तूं मनूपासून उत्पन्न झालेल्या प्रजांचें कल्याण कर. व द्यावापृथिवी, अन्तरिक्ष आणि वनस्पतींना ताप देऊं नकोस. ॥४५॥ विनियोग - अश्वादिकांवर पिण्ड ठेवून त्यांना स्पर्श न करतां 'प्रैतु वाजी' वगैरे मंत्र म्हणावे. नंतर 'अग्न आयहि' हा मंत्र म्हणून रासभावरून पिण्ड काढून अजावर ठेवावा. प्रैतु॑ वा॒जी कनि॑क्रद॒न्नान॑द॒द्रास॑भः॒ पत्वा॑ । भर॑न्न॒ग्निं पु॑री॒ष्यं मा पा॒द्यायु॑षः पु॒रा । वृषा॒ग्निं वृष॑णं॒ भर॑न्न॒पां गर्भँ॑ समु॒द्रिय॑म् । अग्न॒ऽ आया॑हि वी॒तये॑ ॥ ४६ ॥ अर्थ - घोडा खिंकाळत गमन करो. तसेंच धावण्याचा स्वभाव ज्याचा आहे असा गर्दभ ओरडतच मृत्तिका, तृण आणण्याकरितां गमन करो. हा घोडा पशूंना हितकर अशा अग्नीला धारण करून कर्मसमाप्तीच्या पूर्वी न मरो. तसेंच वीर्यसिंचन करणारा हा रासभ अग्नीचें धारण करून गमन करो. तो अग्नि फलवृष्टि करणारा, जलांचा गर्भ म्हणजे वीजरूपी व समुद्रांत वडवाग्निरूपानें उत्पन्न झालेला असा आहे. हे अग्ने, हविर्द्रव्याचें भक्षण करण्यास ये. ॥४६॥ विनियोग - अग्नि प्रज्वलित झाल्यावर अध्वर्यूनें 'अग्निं पुरीष्यम्' हा मंत्र म्हणून नास्तिक पुरुषाचें अवलोकन करावें. नंतर आहवनीयाच्या उत्तरभागीं पूर्वीच तयार केलेल्या आच्छादित व वाळू पसरलेल्या जागीं पिण्ड स्थापन करावें. ऋ॒तँ स॒त्यमृ॒तँ स॒त्यम॒ग्निं पु॑री॒ष्य॒मङ्गिर॒स्वद्भ॑रामः । ओष॑धयः॒ प्रति॑मोदध्वम॒ग्निमे॒तँ शि॒वमा॒यन्त॑म॒भ्यत्र॑ यु॒ष्माः । व्यस्य॒न् विश्वा॒ऽ अनि॑रा॒ऽ अमी॑वा नि॒षीद॑न्नो॒ऽ अप॑ दुर्म॒तिं ज॑हि ॥ ४७ ॥ अर्थ - मी मोठया आदरानें ऋत व सत्यस्वरूपी अग्नीचें आनयन करतों. अंगिरा ऋषीप्रमाणें आम्ही पशुहितकर अशा अग्नीला आणतों, हे औषधींनो, अभ्युत्थान वगैरेंनीं या अग्नीला तुम्ही आनंदित करा. तो अग्नि शांत व तुमच्या सन्मुख येणारा असा आहे. हे अग्ने, तूं येथें बसून आमच्या सर्व अनावृष्टयादि पीडा व रोगांना दूर करून आमच्या दुर्बुद्धीचा नाश कर. ॥४७॥ विनियोग - ओष॑धयः॒ प्रति॑गृभ्णीत॒ पुष्प॑वतीः सुपिप्प॒लाः । अ॒यं वो॒ गर्भ॑ ऋ॒त्वियः॑ प्र॒त्नँ स॒धस्थ्॒अमाऽस॑दत् ॥ ४८ ॥ अर्थ - हे औषधींनो, प्रशस्त पुष्पें व फलें धारण करणार्या तुम्ही या अग्नीचा स्वीकार करा. हा अग्नि ऋतुकालीं तुमचा गर्भ होऊन तुमच्या पुरातन अशा गर्भस्थानाला प्राप्त होतो. ॥४८॥ विनियोग - 'विपाजसा' इत्यादि मंत्रभागानें कृष्णाजिनांतील पिंड मोकळा करून छागाचे केश ग्रहण करून अश्वादिकांना ईशान्य दिशेकडे घालवावें. वि पाज॑सा पृ॒थुना॒ शोशु॑चानो॒ बाध॑स्व द्वि॒षो र॒क्षसो॒ अमी॑वाः । सु॒शर्म॑णो बृह॒तः शर्म॑णि स्याम॒ग्नेर॒हँ सु॒हव॑स्य॒ प्रणी॑तौ ॥ ४९ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं शत्रु, राक्षस व व्याधि यांचा निरास कर. तूं विस्तीर्ण अशा सामर्थ्यानें प्रदीप्त होणारा आहेस. अग्नीची सेवा केली असतां मीं सुखी व्हावें. तो अग्नि चांगला सुखकर, प्रौढ व बोलावण्यास सुलभ असा आहे. ॥४९॥ विनियोग - पळसाच्या सालीच्या काढयांत उकळलेले पाणी 'आपो हिष्ठा' इत्यादि तीन ऋचांनीं पिंडावर घालावें. आपो॒ हि ष्ठा म॑यो॒भुव॒स्ता न॑ ऊ॒र्जे द॑धातन । म॒हे रणा॑य॒ चक्ष॑से ॥ ५० ॥ अर्थ - हे जलांनो, तुम्ही सुखकारक आहां म्हणून आम्हांला तुमचा रस उपभोगूं द्या व आम्हांला रमणीय ब्रह्माच्या साक्षात्काराला योग्य करा. ॥५०॥ विनियोग - यो वः॑ शि॒वत॑मो॒ रस॒स्तस्य॑ भाजयते॒ह नः॑ । उ॒श॒तीरि॑व मा॒तरः॑ ॥ ५१ ॥ अर्थ - हे जलांनो, तुमचा जो अत्यंत कल्याणकारक रस आहे तो या लोकांत राहणार्या आम्हांला प्रेमी आयांप्रमाणें मिळवून द्या. ॥५१॥ विनियोग - तस्मा॒ अरं॑ गमाम वो॒ यस्य॒ क्षया॑य॒ जिन्व॑थ । आपो॑ ज॒नय॑था च नः ॥ ५२ ॥ अर्थ - हे जलांनो, तुमच्या रसानें आमची तृप्ति होवो. तुम्ही त्या रसाचे अंशानें जगाला संतुष्ट करतां. आणखी हे जलांनो, आम्हांला त्या रसाचे भोक्ते करा. ॥५२॥ विनियोग - 'मित्रः सँसृज्य' या मंत्रानें अजादिलोम पिण्डांत मिसळावे. मि॒त्रः सँ॒सृज्य॑ पृथि॒वीं भूमीं॑ च॒ ज्योति॑षा स॒ह । सुजा॑तं जा॒तवे॑दसमय॒क्ष्माय॑ त्वा॒ सँ सृ॑जामि प्र॒जाभ्यः॑ ॥ ५३ ॥ अर्थ - आदित्य द्युलोकाला व या मृत्पिण्डरूपी पृथिवीला अजलोमांत मिसळून मी जो अध्वर्यु त्याकारणें देवो व मीहि चांगल्या रीतीनें उत्पन्न झालेल्या व प्रज्ञानयुक्त अजलोमाख्य अशा अग्निरूपी तुला प्रजा निरोगी व्हावी म्हणून पिण्डांत मिसळतों. ॥५३॥ विनियोग - रुद्राः सँ॒सृज्य॑ पृथि॒वीं बृ॒हज्ज्योतिः॒ समी॑धिरे । तेषां भा॒नुरज॑स्र॒ऽ इच्छु॒को दे॒वेषु॑ रोचते ॥ ५४ ॥ अर्थ - जे रुद्र मृत्पिण्डाला रेती वगैरे पदार्थांनीं मिसळून अत्यंत प्रकाशमान अग्नीला प्रदीप्त करते झाले त्या रुद्रांची शुद्ध कांति क्षीण न होतांच देवांमध्यें प्रकाश पावते. ॥५४॥ विनियोग - 'सँसृष्टाम्' या तीन मंत्रभागांनीं मृत्तिकापिण्डांत सिनीवाली वगैरेंचें मिश्रण करावें. सँसृ॑ष्टां॒ वसु॑भी रु॒द्रैर्धीरैः॑ कर्म॒ण्यां मृद॑म् । हस्ता॑भ्यां मृ॒द्वीं कृ॒त्वा सि॑नीवा॒ली कृ॑णोतु॒ ताम् ॥ ५५ ॥ अर्थ - चन्द्रकलायुक्त अमावस्येला सिनीवाली म्हणतात. त्या सिनीवालीची देवता हातांनीं मृत्तिकेला मऊ करून पुनः यज्ञकर्माला योग्य करो. ती मृत्तिका बुद्धिमान् अशा वसु व रुद्रांनीं सेवन केलेली अशी आहे. ॥५५॥ विनियोग - सि॒नी॒वा॒ली सु॑कप॒र्दा सु॑कुरी॒रा स्वौ॑प॒शा । सा तुभ्य॑मदिते म॒ह्योखां द॑धातु॒ हस्त॑योः ॥ ५६ ॥ अर्थ - हे देवमाते, व हे महति, वरच्या मंत्रांत सांगितलेली सिनीवाली तुमच्या हातांत उखा स्थापन करो. ती सिनीवाली उत्तम वेणी व मुकुट धारण करणारी आणि विलासांत चतुर अशा उत्तम अवयवांनीं युक्त आहे. ॥५६॥ विनियोग - 'मखस्य शिरः' या मंत्रभागानें यजमानानें स्वतः पिण्डांतील मृत्तिकेची उखा करावी. उ॒खां कृ॑णोतु॒ शक्त्या॑ बा॒हुभ्या॒मदि॑तिर्धि॒या । मा॒ता पु॒त्रं यथो॒पस्थे॒ साऽग्निं बि॑भर्त्तु॒ गर्भ॒ऽ आ । म॒खस्य॒ शिरो॑ऽसि ॥ ५७ ॥ अर्थ - देवमाता अदिति, सामर्थ्यानें, बुद्धीनें व हस्तांनीं उखेचें निर्माण करो. अशा रीतीनें निर्मिलेली उखा आई गर्भाचें धारण करते त्याप्रमाणें अग्नीचें धारण करो. हे मृत्पिण्डा, तूं यज्ञाचें शिर आहेस. ॥५७॥ विनियोग - नंतर 'वसवस्त्वा' या मंत्रानें मातीचा गोळा मोठा करावा. नंतर त्याचे कांठ उंच करून त्यांत पहिला मातीचा गोळा 'रुद्रास्त्वा' या मंत्रभागानें मिसळावा. तदनंतर 'आदित्यास्त्वा' या मंत्रानें दुसरा गोळा मिसळावा. नंतर 'विश्वेत्वा' या मंत्रानें सारखी करावीं. वस॑वस्त्वा कृण्वन्तु गाय॒त्रेण॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वद्ध्रु॒वाऽसि॑ पृथि॒व्य॒सि धा॒रया॒ मयि॑ प्र॒जाँ रा॒यस्पोषं॑ गौप॒त्यं सु॒वीर्यँ॑ सजा॒तान्यज॑मानाय रु॒द्रास्त्वा॑ कृण्वन्तु॒ त्रिष्टु॑भेन॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वद्ध्रु॒वाऽस्य॒न्तरि॑क्षमसि धा॒रया॒ मयि॑ प्र॒जाँ रा॒यस्पोषं॑ गौप॒त्यं सु॒वीर्यँ॑ सजा॒तान्यज॑मानायादि॒त्यास्त्वा॑ कृण्वन्तु॒ जाग॑तेन॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वद्ध्रु॒वाऽसि॒ द्यौर॑सि धा॒रया॒ मयि॑ प्र॒जाँ रा॒यस्पोषं॑ गौप॒त्यं सु॒वीर्यँ॑ सजा॒तान्यज॑मानाय॒ विश्वे॑ त्वा देवा वै॑श्वान॒राः कृ॑ण॒वन्त्वानु॑ष्टुभेन॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वद्ध्रु॒वाऽसि॒ दिशो॑ऽसि धा॒रया॒ मयि॑ प्र॒जाँ रा॒यस्पोषं॑ गौप॒त्यं सु॒वीर्यँ॑ सजा॒तान्यज॑मानाय ॥ ५८ ॥ अर्थ - हे उखे, वसुसंज्ञक देव अंगिरा ऋषीप्रमाणें गायत्रीछन्दानें तुझें निर्माण करोत. अशा रीतीनें निर्मित झालेलीं तूं स्थिर व पृथ्वीरूपी आहेस म्हणून तूं यजमान अशा माझे ठायीं पुत्रादिक प्रजा, धनाचें पोषण, गाईंचे आधिपत्य, उत्तम पराक्रम आणि सोदरभ्राते स्थापन कर म्हणजे हें सर्व मला दे. तसेंच हे उखे, रुद्र त्रैष्टुभ छन्दानें, आदित्य जागत छन्दानें व वैश्वानर आनुष्टुभ छन्दानें तुला निर्माण करते झाले; अशी तूं क्रमेंकरून अन्तरिक्षरूपी, द्युरूपी व दिग्रूपी आहेस म्हणून माझें ठायीं पुत्रादिक सर्व पूर्वोक्त पदार्थ स्थापन कर. ॥५८॥ विनियोग - 'अदित्यै रास्नासि' या मंत्रभागानें उखेच्या तिसर्या भागावरील रेघेवर मृत्तिकामेखला स्थापन करावी. नंतर उखेच्या मुखाला 'अदितिष्टे' या मंत्रानें स्पर्श करावा. नंतर ती 'कृत्वाय' या मंत्रभागानें भूमीवर ठेवावी. अदि॑त्यै॒ रस्ना॒स्यदि॑तिष्टे॒ बिलं॑ गृभ्णातु । कृत्वाय॒ सा म॒हीमु॒खां मृ॒न्मयीं॒ योनि॑म॒ग्नये॑ । पु॒त्रेभ्यः॒ प्राय॑च्छ॒ददि॑तिः श्र॒पया॒निति॑ ॥ ५९ ॥ अर्थ - हे रेखे, तूं अदितिरूपी उखेची रास्ना म्हणजे कंबरपटटा आहेस. हे उखे, देवमाता तुझ्या मध्याचें ग्रहण करो. ती देवमाता मोठी, मृत्तिकानिर्मित व अग्नीचें स्थानभूत अशा उखेचें निर्माण करून तिचे पुत्र जे देव त्यांना 'हे पुत्रांनो, या उखेचें श्रवण करा. (उखा शिजवा)' असें म्हणाली व नंतर तिनें त्या देवांना ती उखा दिली. ॥५९॥ विनियोग - घोडयाचे सात वाळलेल्या लीदेचे गोळे घेऊन 'वसवस्त्वा' इत्यादि सात मंत्रांनीं उखा प्रदीप्त करावी. वस॑वस्त्वा धूपयन्तु गाय॒त्रेण॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वद्रुद्रास्त्वा॑ धूपयन्तु॒ त्रैष्टु॑भेन॒ छन्द॑साङ्ऽगिर॒स्वदा॑दि॒त्यास्त्वा॑ धूपयन्तु॒ जाग॑तेन॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वद्विश्वे॑ त्वा दे॒वा वै॑श्वान॒रा धू॑पय॒न्त्वानु॑ष्टुभेन॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वदिन्द्र॑स्त्वा धूपयतु॒ वरु॑णस्त्वा धूपयतु॒ विष्णु॑स्त्वा धूपयतु ॥ ६० ॥ अर्थ - हे उखे, अंगिरा ऋषीप्रमाणें आठ वसु गायत्रीछन्दानें, एकादश रुद्र त्रैष्टुभ छन्दानें, द्वादश आदित्य जागत छन्दानें, सर्व मनुष्यांना हितकर असे विश्वदेव आनुष्टुभ छन्दानें तुला प्रदीप्त करो, तसेंच इंद्र, वरुण व विष्णु तुला प्रदीप्त करोत. ॥६०॥ विनियोग - 'अदितिष्टवा' या मंत्रभागानें अभ्रीनें चतुष्कोण खडडयांचें खनन करावें. नंतर 'देवानां त्वा' या मंत्रानें खडडयांत उखा पालथी घालावी. तदनंतर 'धिषणास्त्वा' या मंत्रानें उखा दक्षिणाग्नींतील वन्हीनें प्रदीप्त करावी. नंतर उखेकडे पहात 'वरुत्रीष्टवा' या तीन मंत्रांचा जप करावा. अदि॑तिष्ट्वा दे॒वी वि॒श्वदे॑व्यावती पृथि॒व्याः स॒धस्थे॑ऽ अङ्गिर॒स्वत् ख॑नत्ववट दे॒वानां॑ त्वा॒ पत्नी॑र्दे॒वीर्वि॒श्वदे॑व्यावतीः पृथि॒व्याः स॒धस्थे॑ऽ अङ्गिर॒स्वद्द॑धतूखे धि॒षणा॑स्त्वा देवीर्वि॒श्वदे॑व्यावतीः पृथि॒व्याः स॒धस्थे॑ऽ अङ्गिर॒स्वद॒भी॒न्धतामुखे वरू॑त्रीष्ट्वा दे॒वीर्वि॒श्वदे॑व्यावतीः पृथि॒व्याः स॒धस्थे॑ऽ अङ्गिर॒स्वच्छ्र॑पयन्तूखे॒ ग्नास्त्वा॑ दे॒वीर्वि॒श्वदे॑व्यावतीः पृथि॒व्याः स॒धस्थे॑ऽ अङ्गिर॒स्वत्प॑चन्तूखे॒ जन॑य॒स्त्वाछि॑न्नपत्रा दे॒वीर्वि॒श्वदे॑व्यावतीः पृथि॒व्याः स॒धस्थे॑ऽ अङ्गिर॒स्वत्प॑चन्तूखे ॥ ६१ ॥ अर्थ - हे गर्ता (खड्डया), अंगिरा ऋषीप्रमाणें अदितिदेवी तुझें खनन करो. ती अदिति सर्व देवयुक्त आहे. हे उखे, विश्वेदेवांसह वर्तमान असलेल्या देवपत्नी म्हणजे औषधि अंगिरा ऋषीप्रमाणें पृथ्वीच्या ऊर्ध्वभागावर तुझें स्थापन करोत. हे उखे, अंगिरा ऋषीप्रमाणें विश्वेदेवांसह वर्तमान वागभिमानिनी देवता तुला सर्व बाजूंनीं प्रदीप्त करोत. हे उखे, अंगिरा ऋषीप्रमाणें विश्वेदेवांसह अहोरात्राभिमानिनी देवता तुला पृथ्वीच्या ऊर्ध्वभागावर शिजण्याच्या दशेला प्राप्त करोत. हे उखे, अंगिरा ऋषीप्रमाणें विश्वेदेवांसह छन्दोऽभिमानिनी देवता पृथ्वीच्या ऊर्ध्वभागावर तुला पूर्ण रीतीनें शिजवोत. तसेंच हे उखे, अंगिरा ऋषीप्रमाणें विश्वेदेवांसह सर्वदा गमन करणार्या नक्षत्रपंक्ति पृथ्वीच्या वरील भागावर तुला शिजवोत. ॥६१॥ विनियोग - 'मित्रस्य त्वा' या मंत्रभागानें शिजलेलें अन्न पात्रांतून काढावें. मि॒त्रस्य॑ चर्षणी॒धृतोऽवो॑ दे॒वस्य॑ सान॒सि । द्यु॒म्नं चि॒त्रश्र॑वस्तमम् ॥ ६२ ॥ अर्थ - मनुष्यांचें धारण करणारा प्रकाशक जो आदित्य त्याच्या सनातन अशा रक्षणाची व चित्रविचित्र अशा अन्नाची आम्ही स्तुति करतो. ॥६२॥ विनियोग - 'देवस्त्वा' या मंत्रभागानें उखेंतील जळका भाग बाजूला करावा. 'अव्यथमाना' या मंत्रभागानें उखेला ऊर्ध्वमुख करावें. दे॒वस्त्वा॑ सवि॒तोद्व॑पतु सुपा॒णिः स्व॑ङ्गु॒रिः सु॑बा॒हुरु॒त शक्त्या॑ । अव्य॑थमाना पृथि॒व्यामाशा॒ दिश॒ आऽ पृ॑ण ॥ ६३ ॥ अर्थ - हे उखे, चांगले हात, अंगुलि व बाहु असलेला सविता देव आपल्या सामर्थ्यानें व चांगल्या बुद्धीनेंही तुला प्रकाशित करो. हे उखे, सवितृप्रकाशित अशी तूं न ढळतां पृथ्वीवर राहून पृथिव्यादिदिशा व आग्नेयादि विदिशांना आहुतिरसानें पूर्ण कर. ॥६३॥ विनियोग - 'उत्थाय' या मंत्रभागानें उखा हातांत धरून अवटाबाहेर काढावी. 'मित्रैतां' या मंत्रभागानें उखा उत्तरेकडील पात्रांत ठेवावी. उ॒त्थाय॑ ब्रुह॒ती भ॒वोदु॑ तिष्ठ ध्रु॒वा त्वम् । मित्रै॒तां त॑ऽ उ॒खां परि॑ददा॒म्यभि॑त्याऽ ए॒षा मा भे॑दि ॥ ६४ ॥ अर्थ - हे उखे, तूं या अवटांतून उठून बाहेर ये; नंतर स्वकर्मांत प्रवृत्त हो. कारण हीं स्वभावतः स्थिर आहेत. हे सर्वप्राणिहित करणार्या मित्रदेवा, हिचें रक्षण व्हावें व ही फुटूं नये म्हणून ही उखा तुला मी देतों. ॥६४॥ विनियोग - 'वसवस्त्वा' वगैरे चार मंत्रांनीं अजादुग्ध ओतावें. वस॑व॒स्त्वाऽऽछृ॑न्दन्तु गाय॒त्रेण॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वद्रु॒द्रास्त्वाऽऽछृ॑न्दन्तु॒ त्रैष्टु॑भेन॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वदा॑दित्यास्त्वाऽऽछृ॑न्दन्तु॒ जाग॑तेन॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वद्विश्वे॑ त्वा दे॒वा वै॑श्वान॒रा आछृ॑न्द॒न्त्वानु॑ष्टुभेन॒ छन्द॑साऽङ्गिर॒स्वत् ॥ ६५ ॥ अर्थ - हे उखे, अंगिरो ऋषीप्रमाणें वसु गायत्री छन्दानें, रुद्र त्रैष्टुभ् छन्दानें, आदित्य जागत छन्दानें व सर्वजनहित विश्वेदेव आनुष्टुभ छन्दानें तुझ्यावर सर्व बाजूंनीं सिंचन करोत. ॥६५॥ विनियोग - प्रकृतिभूत सोमयागाप्रमाणें पांच औद्ग्रभण होम करून 'आकूतिम्' इत्यादि सात मंत्रांनां सात औद्ग्रभण होम करावें. ॥६५॥ आकू॑तिम॒ग्निं प्र॒युजँ॒ स्वाहा॒ मनो॑ मे॒धाम॒ग्निं प्र॒युजँ॒ स्वाहा॑ चि॒त्तं विज्ञा॑तम॒ग्निं प्र॒युजँ॒ स्वाहा॑ वा॒चो विधृ॑तिम॒ग्निं प्र॒युजँ॒ स्वाहा॑ प्र॒जाप॑तये॒ मन॑वे॒ स्वाहा॒ऽग्नये॑ वैश्वान॒राय॒ स्वाहा॑ ॥ ६६ ॥ अर्थ - प्रेरक असा जो चयनसंकल्प तद्रूपी अग्नीला हें सुहुत असो. तसेंच मेधा व मन यांची, ज्ञानसाधन चित्त व तज्जन्य अनुष्ठान यांची, मंत्रपाठशक्ति व धारणाशक्ति यांची, प्रेरणा करणार्या अग्नीला हें हवि सुहुत असो. त्याचप्रमाणें प्रजापति मनु आणि सर्वलोकानुग्राहक अग्नीला हें हवि सुहुत असो. ॥६६॥ विनियोग - विश्वो॑ दे॒वस्य॑ ने॒तुर्मतो॑ वुरीत स॒ख्यम् । विश्वो॑ रा॒य इ॑षुध्यति द्यु॒म्नं वृ॑णीत पु॒ष्यसे॒ स्वाहा॑ ॥ ६७ ॥ अर्थ - सगळे लोक फलदायी व प्रकाशक अशा सवित्याच्या मैत्रीची इच्छा करतात. व ते धन आणि स्वप्रजापालनोपयोगी अन्न यांकरितां ज्याची प्रार्थना करितात अशा त्या प्रेरक सूर्याला हें हवि सुहुत असो. ॥६७॥ विनियोग - 'मा सु भित्था' या दोन मंत्रांनीं उभें राहून यजमानानें अगर अध्वर्यूनें प्रदीप्त अशा आहवनीयावर उखा ठेवावी. मा सु भि॑त्था॒ मा सु रि॒षोऽम्ब॑ धृ॒ष्णु वी॒रय॑स्व॒ सु । अ॒ग्निश्चे॒दं क॑रिष्यथः ॥ ६८ ॥ अर्थ - हे मातः उखे, तुझा थोडा भाग अगर सर्व भाग फुटूं नयें. म्हणजे तुला तडे येऊं नयेत व तूं दुभंग होऊं नयेस. तसेंच तूं प्रौढ असें अग्निधारणात्मक वीरकृत्य कर. अग्नि व तूं या दोघांनीं माझें अग्निकार्य समाप्तीपर्यंत चालवावें. ॥६८॥ विनियोग - दृँह॑स्व देवि पृथिवि स्व॒स्तय॑ऽ आसु॒री मा॒या स्व॒धया॑ कृ॒ताऽसि॑ । जुष्टं॑ दे॒वेभ्य॑ इ॒दम॑स्तु ह॒व्यमरि॑ष्टा॒ त्वमुदि॑हि य॒ज्ञेऽ अ॒स्मिन् ॥ ६९ ॥ अर्थ - उखा पृथ्वीचें कार्य आहे तरी लक्षणेनें उखेलाच पृथ्वी म्हणून वर्णन केलें आहे. हे पृथिवीस्वरूपिणी देवी उखे, तूं या यजमानाचें कल्याण करण्याकरितां दृढ हो. कारण आसुरी मायेप्रमाणे अन्नासाठी तूंही स्तनादिविशिष्ट होऊन विचित्र अशी बनविली गेलीस. हें हविर्द्रव्य देवांना प्रिय असो. हा यज्ञ चालू असतां तूंही अखंडित होऊन वर ये. ॥६९॥ विनियोग - 'द्रव॑न्नः' इत्यादि मंत्रांनीं तेरा समिधांचा होम करावा. द्रव॑न्नः स॒र्पिरा॑सुतिः प्र॒त्नो होता॒ वरे॑ण्यः । सह॑सस्पु॒त्रो अद्भु॑तः ॥ ७० ॥ अर्थ - वृक्ष हेंच ज्याचें अन्न आहे, व घृत ज्याचें मद्य आहे, असा, पुरातन, देवांना बोलावणारा, श्रेष्ठ, सामर्थ्यानें मंथनांतून उत्पन्न होणारा व आश्चर्यरूपी असा अग्नि समिधेचें भक्षण करो. ॥७०॥ विनियोग - 'परस्याः' इत्यादि मंत्रभागानें विकंकत वृक्षाच्या समिधेचा होम करावा. पर॑स्या॒ऽ अधि॑ सं॒वतोऽव॑राँ२ऽ अ॒भ्यात॑र । यत्रा॒हमस्मि॒ ताँ२ऽ अ॑व ॥ ७१ ॥ अर्थ - शत्रुसंबंधी संग्रामाच्या दुःखांतून आमच्या लोकांना तार. मी ज्या देशांत राहतों त्यालाही तार. ॥७१॥ विनियोग - 'परमस्याः' या मंत्रभागानें उंबराच्या समिधेचें ग्रहण करावें. प॒र॒मस्याः॑ परा॒वतो॑ रो॒हिद॑श्व इ॒हाग॑हि । पु॒री॒ष्यः॒ पुरुप्रि॒योऽग्ने॒ त्वं त॑रा॒ मृधः॑ ॥ ७२ ॥ अर्थ - हे अग्ने, या यज्ञांत अत्यंत दूर देशांतून तूं येथें ये व आमच्या शत्रूंचा नाश कर. तूं रोहित्संज्ञक घोडयांचा स्वामी, पशूंना हितकर व बहुजनप्रिय असा आहेस. ॥७२॥ विनियोग - न तोडतां वायूनें वगैरे सहज पडलेल्या झाडाची समिधा 'यदग्ने' या मंत्रानें होमावी. यद॑ग्ने॒ कानि॒ कानि॑ चि॒दा ते॒ दारु॑णि द॒ध्मसि॑ । सर्वं॒ तद॑स्तु ते घृ॒तं तज्जु॑षस्व यविष्ठ्य ॥ ७३ ॥ अर्थ - हे अत्यंत तरुण अग्ने, ज्या कोणत्या काष्ठांचा तुझ्याकरितां मी होम करतों तीं सर्व काष्ठें तुला घृताप्रमाणें प्रिय असोत. त्यांचें तूं सेवन कर. ॥७३॥ विनियोग - 'यदत्ति' या मंत्रानें भूमीवर पडलेल्या समिधेचा होम करावा. यदत्त्यु॑प॒जिह्वि॑का॒ यद्व॒म्रो अ॑ति॒सर्प॑ति । सर्वं॒ तद॑स्तु ते घृतं तज्जु॑षस्व यविष्ठ्य ॥ ७४ ॥ अर्थ - हे तरुण अग्ने, मुंगीसारखा बारीक उपदीपिका नांवाचा प्राणी (उधाई) ज्याला खातो व वारुळांतील कीटक ज्याला व्याप्त करतो; तें काष्ठ तुला घृताप्रमाणें प्रिय असो. त्याचें सेवन कर. ॥७४॥ विनियोग - 'अहरहः' इत्यादि आठ मंत्रांनीं पळसाच्या आठ समिधांचा होम करावा. अह॑रह॒रप्र॑यावं॒ भर॒न्तोऽश्वा॑येव॒ तिष्ठ॑ते घा॒सम॑स्मै । रायस्पोषे॑ण॒ समि॒षा मद॒न्तोऽग्ने॒ मा ते॒ प्रति॑वेशा रिषाम ॥ ७५ ॥ अर्थ - हे अग्ने, तुझ्या समीप राहणार्या आमचा नाश होऊं नये. कारण कीं घोडशाळेतील अश्वाला न चुकतां गवत घालतात, त्याप्रमाणें रोज न चुकतां तुला समिद्रूपी अन्न देतों आणि धनाच्या पुष्टीनें व अन्नानें तुला हर्षित करतों. ॥७५॥ विनियोग - नाभा॑ पृथि॒व्याः स॑मिधा॒ने अ॒ग्नौ रा॒यस्पोषा॑य बृह॒ते ह॑वामहे । इ॒र॒म्म॒दं बृ॒हदु॑क्थं॒ यज॑त्रं॒ जेता॑रम॒ग्निं पूत॑नासु सास॒हिम् ॥ ७६ ॥ अर्थ - पृथ्वीरूपी उखेंत प्रदीप्त असलेल्या आहवनीयांत आम्ही द्रव्यवृद्धीकरितां अग्निदेवाला बोलावतो. तो अग्नि अन्नानें तृप्त होणारा, मोठया उक्थस्तुतींनीं संपन्न, पूजनीय, संग्रामजयी व शत्रूंचा पराजय करणारा असा आहे. ॥७६॥ विनियोग - याः सेना॑ऽ अ॒भीत्व॑रीराव्या॒धिनी॒रुग॑णाऽ उ॒त । ये स्ते॒ना ये च॒ तस्क॑रा॒स्ताँस्ते॑ऽ अ॒ग्नेऽपि॑दधाम्या॒स्ये॒ ॥ ७७ ॥ अर्थ - हे अग्ने, ज्या सेना आमच्यावर चाल करून येतात व ज्या सर्व बाजूंनीं आमचें ताडन करतात व ज्यांतील योद्धे आयुधें सज्ज करून उभे आहेत व जे चोर गुप्तरीतीने व उघड चोरी करतात त्या सर्वांना मी तुझ्या मुखांत घालतों, त्यांचें भक्षण कर. ॥७७॥ विनियोग - दँष्ट्रा॑भ्यां म॒लिम्लू॒ञ्जम्भै॒स्तस्क॑राँ२ऽ उ॒त । हनु॑भ्याँ स्ते॒नान् भ॑गव॒स्ताँस्त्वं खा॑द॒ सुखा॑दितान् ॥ ७८ ॥ अर्थ - हे भगवन् अग्ने, मार्गांत चोरी करून पळून जाणारे व दरोडे घालणारे जे चोर त्या दुष्टांना दाढेंत दाबून तस्करांना बाहेर आलेल्या दातांनीं दाबून नाहींसे करून व स्तेनांना हनवटीत घालून खाऊन गिळून टाक. ॥७८॥ विनियोग - ये जने॑षु म॒लिम्ल॑व स्ते॒नास॒स्तस्क॑रा॒ वने॑ । ये कक्षे॑ष्वघा॒यव॒स्ताँस्ते॑ दधामि॒ जम्भ॑योः ॥ ७९ ॥ अर्थ - हे अग्ने, गांवात, रानांत उघड व गुप्त चोरी करणारे व नदी वगैरे स्थलीं लोकांचा घात करण्याचीं इच्छा करणारे या सर्वांना तूं खावें म्हणून मी तुझ्या दाढेखाली घालतों. ॥७९॥ विनियोग - यो अ॒स्मभ्य॑मराती॒याद्यश्च॑ नो॒ द्वेष॑ते॒ जनः॑ । निन्दा॒द्यो अ॒स्मान्धिप्सा॑च्च॒ सर्वं॒ तं म॑स्म॒सा कु॑रु ॥ ८० ॥ अर्थ - शत्रूंचे चार प्रकार आहेत. १. देणें असलेलें द्रव्य न देणारा २. कार्यविघात करणारा ३. निन्दा करणारा ४. ठार मारण्याची इच्छा करणारा. हे अग्ने, या चारही प्रकारच्या शत्रूंना चावून गिळून टाक. ॥८०॥ विनियोग - सँशि॑तं मे॒ ब्रह्म॒ सँशि॑तं वी॒र्यं बल॑म् । सँशि॑तं क्ष॒त्रं जि॒ष्णु यस्या॒हमस्मि॑ पु॒रोहि॑तः ॥ ८१ ॥ अर्थ - माझें ब्राह्मण्य शास्त्रीय झालें, इंद्रियसामर्थ्य व शरीरसामर्थ्य हीं दोन्हीं तीक्ष्ण झालीं. तसेंच मी ज्या क्षत्रियांचा पुरोहित आहें ते क्षत्रिय जयशील होतील तसें मी केलें. ॥८१॥ विनियोग - उदे॑षां बा॒हू अ॑तिर॒मुद्वर्चो॒ अथो बल॑म् । क्षि॒णोमि॒ ब्रह्म॑णा॒ऽमित्रा॒नुन्न॑यामि॒ स्वाँ२ऽ अ॒हम् ॥ ८२ ॥ अर्थ - या माझ्या ब्राह्मणक्षत्रियांचें हात मीं पराक्रमानें सर्वांपेक्षा उंच केलें. तसेंच ब्राह्मतेज व क्षात्रबळ उंच केलें. तसेंच मंत्रसामर्थ्यानें मी शत्रूंचा नाश करतों व स्वकीयांचा उत्कर्ष करतों. ॥८२॥ विनियोग - यजमानानें उखेंतील अग्नींत समिधेचा होम करावा. अन्न॑प॒तेऽन्न॑स्य नो देह्यनमी॒वस्य॑ शु॒ष्मिणः॑ । प्र-प्र॑ दा॒तारं॑ तारिष॒ ऊर्जं॑ नो धेहि द्वि॒पदे॒ चतु॑ष्पदे ॥ ८३ ॥ अर्थ - हे अन्नपालका अग्ने, आम्हांला रोगनाशक व बलप्रद असे अन्न दे. आमच्या अन्नदात्याची अतिशयेंकरून वृद्धि कर. आमच्या पुत्रादि मनुष्यांना व गाई वगैरे पशूंनाही अन्नरस दे. ॥८३॥ ॥ एकादशोऽध्यायः ॥ |