श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
चतुर्विंशोऽध्यायः


केशिवधः

वैशंपायन उवाच
अन्धकस्य वचः श्रुत्वा कंसः संरक्तलोचनः ।
न किंचिदब्रवीत् क्रोधाद् विवेश स्वं निकेतनम् ॥ १ ॥
ते च सर्वे यथावेश्म यादवाः श्रुतविस्तराः ।
जग्मुर्विगतसङ्‌‌‍कल्पाः कंसवैकृतशंसिनः ॥ २ ॥
अक्रूरोऽपि यथाऽऽज्ञप्तः कृष्णादर्शनलालसः ।
जगाम रथमुख्येन मनसा तुल्यगामिना ॥ ३ ॥
कृष्णस्यापि निमित्तानि शुभान्यङ्‌‌‍गगतानि वै ।
पितृतुल्येन शंसन्ति बान्धवेन समागमम् ॥ ४ ॥
प्रागेव च नरेन्द्रेण माथुरेणोग्रसेनिना ।
केशिनः प्रेषितो दूतो वधायोपेन्द्रकारणात् ॥ ५ ॥
स च दूतवचः श्रुत्वा केशी केशकरो नृणाम् ।
वृन्दावनगतो गोपान् बाधते स्म दुरासदः ॥ ६ ॥
मानुषं मांसमश्नानः क्रुद्धो दुष्टपराक्रमः ।
दुर्दान्तो वाजिदैत्योऽसावकरोत्कदनं महत् ॥ ७ ॥
निघ्नन्गा वै सगोपालान् गवां पिशितभोजनः ।
दुर्मदः कामचारी च स केशी निरवग्रहः ॥ ८ ॥
तदरण्यं श्मशानाभं नृणां मांसास्थिभिर्वृतम् ।
यत्रास्ते स हि दुष्टात्मा केशी तुरगदानवः ॥ ९ ॥
खुरैर्दारयते भूमिं वेगेनारुजते द्रुमान् ।
हेषितैः स्पर्द्धते वायुं प्लुतैर्लंघयते नभः ॥ १० ॥
अतिप्रवृद्धो मत्तश्च दुष्टोऽश्वो वनगोचरः ।
आकम्पितसटो रौद्रः कंसस्य चरितानुगः ॥ ११ ॥
ईरिणं तद्वनं सर्वं तेनासीत् पापकर्मणा ।
कृतं तुरगदैत्येन सर्वान् गोपाञ्जिघांसता ॥ १२ ॥
तेन दुष्टप्रचारेणा दूषितं तद् वनं महत् ।
न नृभिर्गोधनैर्वापि सेव्यते वनवृत्तिभिः ॥ १३ ॥
निःसम्पातः कृतः पन्थास्तेन तद्विषयाश्रयः ।
मदाच्चलितवृत्तेन नृमांसान्यश्नता भृशम् ॥ १४ ॥
नृशब्दानुसरः क्रुद्धः स कदाचिद् वनागमे ।
जगाम घोषसंवासं चोदितः कालधर्मणा ॥ १५ ॥
तं दृष्ट्‍वा दुद्रुवुर्गोपाः स्त्रियश्च शिशुभिः सह ।
क्रन्दमाना जगन्नाथं कृष्णं नाथमुपाश्रिताः ॥ १६ ॥
तासां रुदितशब्देन गोपानां क्रन्दितेन च ।
दत्त्वाभयं तु कृष्णो वै केशिनं सोऽभिदुद्रुवे ॥ १७ ॥
केशी चाप्युन्नतग्रीवः प्रकाशदशनेक्षणः ।
हेषमाणो जवोदग्रो गोविन्दाभिमुखो ययौ ॥ १८ ॥
तमापतन्तं संप्रेक्ष्य केशिनं हयदानवम् ।
प्रत्युज्जगाम गोविन्दस्तोयदः शशिनं यथा ॥ १९ ॥
केशिनस्तु तमभ्याशे दृष्ट्‍वा कृष्णमवस्थितम् ।
मनुष्यबुद्धयो गोपाः कृष्णमूचुर्हितैषिणः ॥ २० ॥
कृष्ण तात न खल्वेष सहसा ते हयाधमः ।
उपसर्प्यो भवान् बालः पापश्चैष दुरासदः ॥ २१ ॥
एष कंसस्य सहजः प्राणस्तात बहिश्चरः ।
उत्तमश्च हयेन्द्राणां दानवोऽप्रतिमो युधि ॥ २२ ॥
त्रासनः सर्वभूतानां तुरगाणां महाबलः ।
अवध्यः सर्वभूतानां प्रथमः पापकर्मणाम् ॥ २३ ॥
गोपानां तद् वचः श्रुत्वा वदतां मधुसूदनः ।
केशिना सह युद्धाय मतिं चक्रेऽरिसूदनः ॥ २४ ॥
ततः सव्यं दक्षिणं च मण्डलं स परिभ्रमन् ।
पद्भ्यामुभाभ्यां स हयः क्रोधेनारुजते द्रुमान् ॥ २५ ॥
मुखे लम्बसटे चास्य स्कन्धे केशघनावृते ।
बलयोऽभ्रतरङ्‌‌‍गाभाः सुस्त्रुवुः क्रोधजं जलम् ॥ २६ ॥
स फेनं वक्त्रजं चैव ववर्ष रजसावृतम् ।
हिमकाले यथा व्योम्नि नीहारमिव चन्द्रमाः ॥ २७ ॥
गोविन्दमरविन्दाक्षं हेषितोद्‌गारशीकरैः ।
स फेनैर्वक्त्रनिर्गीर्णैः प्रोक्षयामास भारत ॥ २८ ॥
खुरोद्धूतावसिक्तेन मधुकक्षोदपाण्डुना ।
रजसा स हयः कृष्णं चकारारुणमूर्धजम् ॥ २९ ॥
प्लुतवल्गितपादस्तु तक्षमाणो धरां खुरैः ।
दन्तान् निर्दशमानस्तु केशी कृष्णामुपाद्रवत् ॥ ३० ॥
स संसक्तस्तु कृष्णेन केशी तुरगसत्तमः ।
पूर्वाभ्यां चरणाभ्यां वै कृष्णं वक्षस्यताडयत् ॥ ३१ ॥
पुनः पुनः स च बली प्राहिणोत् पार्श्वतः खुरान् ।
कृष्णस्य दानवो घोरं प्रहारममितौजसः ॥ ३२ ॥
वक्त्रेण चास्य घोरेण तीक्ष्णदंष्ट्रायुधेन वै ।
अदशद् बाहुशिखरं कृष्णस्य रुषितो हयः ॥ ३३ ॥
स लम्बकेसरसटः कृष्णेन सह सङ्‌‌‍गतः ।
रराज केशी मेघेन संसक्तः ख इवांशुमान् ॥ ३४ ॥
उरस्तस्योरसा हन्तुमियेष बलवान् हयः ।
वेगेन वासुदेवस्य क्रोधाद् द्विगुणविक्रमः ॥ ३५ ॥
तस्योत्सिक्तस्य बलवान् कृष्णोऽप्यमितविक्रमः ।
बाहुमाभोगिनं कृत्वा मुखे क्रुद्धः समादधत् ॥ ३६ ॥
स तं बाहुमशक्तो वै खादितुं भोक्तुमेव च ।
दशनैर्मूलनिर्मुक्तैः सफेनं रुधिरं वमन् ॥ ३७ ॥
विपाटिताभ्यामोष्ठाभ्यां कटाभ्यां विदलीकृतः ।
अक्षिणी विवृते चक्रे विसृते मुक्तबन्धने ॥ ३८ ॥
निरस्तहनुराविष्टः शोणिताक्तविलोचनः ।
उत्कर्णो नष्टचेतास्तु स केशी बह्वचेष्टत ॥ ३९ ॥
उत्पतन्नसकृत्पादैः शकृन्मूत्रं समुत्सृजन् ।
खिन्नाङ्‌‌‍गरोमा श्रान्तस्तु निर्यत्‍नचरणोऽभवत् ॥ ४० ॥
केशिवक्त्रविलग्नस्तु कृष्णबाहुरशोभत ।
व्याभुग्न इव घर्मान्ते चन्द्रार्धकिरणैर्घनः ॥ ४१ ॥
केशी च कृष्णासंसक्तः शान्तगात्रो व्यरोचत ।
प्रभातावनतश्चन्द्रः श्रान्तो मेरुमिवाश्रितः ॥ ४२ ॥
तस्य कृष्णभुजोद्धूताः केशिनो दशना मुखात् ।
पेतुः शरदि निस्तोयाः सिताभ्रावयवा इव ॥ ४३ ॥
स तु केशी भृशं शान्तः कृष्णेनाक्लिष्टकर्मणा ।
स्वभुजं स्वायतं कृत्वा पाटितो बलवत् तदा ॥ ४४ ॥
स पाटितो भुजेनाजौ कृष्णेन विकृताननः ।
केशी नदन्महानादं दानवो व्यथितस्तदा ॥ ४५ ॥
विघूर्णमानस्त्रस्ताङ्‌‌‍गो मुखाद् रुधिरमुद्वमन् ।
भृशं व्यङ्‌‌‍गीकृतवपुर्निकृत्तार्द्ध इवाचलः ॥ ४६ ॥
व्यादितास्यो महारौद्रः सोऽसुरः कृष्णबाहुना ।
निपपात यथा कृत्तो नागो हि द्विदलीकृतः ॥ ४७ ॥
बाहुना कृत्तदेहस्य केशिनो रूपमाबभौ ।
पशोरिव महाघोरं निहतस्य पिनाकिना ॥ ४८ ॥
द्विपादपृष्ठपुच्छार्द्धे श्रवणैकाक्षिनासिके ।
केशिनस्तद्विधाभूते द्वे चार्धे रेजतुः क्षितौ ॥ ४९ ॥
केशिदन्तक्षतस्यापि कृष्णस्य शुशुभे भुजः ।
वृद्धः साल इवारण्ये गजेन्द्रदशनाङ्‌‌‍कितः ॥ ५० ॥
तं हत्वा केशिनं युद्धे कल्पयित्वा च भागशः ।
कृष्णः पद्मपलाशाक्षो हसंस्तत्रैव तस्थिवान् ॥ ५१ ॥
तं हतं केशिनं दृष्ट्‍वा गोपा गोपस्त्रियस्तथा ।
बभूवुर्मुदिताः सर्वे हतविघ्ना गतक्लमाः ॥ ५२ ॥
दामोदरं तु श्रीमन्तं यथास्थानं यथावयः ।
अभ्यनन्दन् प्रियैर्वाक्यैः पूजयन्तः पुनः पुनः ॥ ५३ ॥
गोपा ऊचुः
अहो तात कृतं कर्म हतोऽयं लोककण्टकः ।
दैत्यः क्षितिचरः कृष्ण हयरूपं समास्थितः ॥ ५४ ॥
कृतं वृन्दावनं क्षेमं सेव्यं नृमृगपक्षिणाम् ।
घ्नता पापमिमं तात केशिनं हयदानवम् ॥ ५५ ॥
हता नो बहवो गोपा गावो वत्सेषु वत्सलाः ।
नैके चान्ये जनपदा हतानेन दुरात्मना ॥ ५६ ॥
एष संवर्तकं कर्तुमुद्यतः खलु पापकृत् ।
नृलोकं निर्नरं कृत्वा चर्तुकामो यथासुखम् ॥ ५७ ॥
नैतस्य प्रमुखे स्थातुं कश्चिच्छक्तो जिजीविषुः ।
अपि देवसमूहेषु किं पुनः पृथिवीतले ॥ ५८ ॥
वैशंपायन उवाच
अथाहान्तर्हितो विप्रो नारदः खगमो मुनिः ।
प्रीतोऽस्मि विष्णो देवेश कृष्ण कृष्णेति चाब्रवीत् ॥ ५९ ॥
नारद उवाच
यदिदं दुष्करं कर्म कृतं केशिजिघांसया ।
त्वय्येव केवलं युक्तं त्रिदिवे त्र्यम्बकस्य वा ॥ ६० ॥
अहं युद्धोत्सुकस्तात त्वद्‌गतेनान्तरात्मना ।
इदं नरहयं युद्धं द्रष्टुं स्वर्गादिहागतः ॥ ६१ ॥
पूतनानिधनादीनि कर्माणि तव दृष्टवान् ।
अहं त्वनेन गोविन्द कर्मणा परितोषितः ॥ ६२ ॥
हयादस्मान्महेन्द्रोऽपि बिभेति बलसूदन ।
कुर्वाणाच्च वपुर्घोरं केशिनो दुष्टचेतसः ॥ ६३ ॥
यत्त्वया पाटितो देहो भुजेनायतपर्वणा ।
एषोऽस्य मृत्युरन्ताय विहितो विश्वयोनिना ॥ ६४ ॥
यस्मात्त्वया हतः केशी तस्मान्मच्छासनं शृणु ।
केशवो नाम नाम्ना त्वं ख्यातो लोके भविष्यसि ॥ ६५ ॥
स्वस्त्यस्तु भवतो लोके साधु याम्यहमाशुगः ।
कृत्यशेषम् च ते कार्यं शक्तस्त्वमसि मा चिरम् ॥ ६६ ॥
त्वयि कार्यान्तरगते नरा इव दिवौकसः ।
विडम्बयन्तः क्रीडन्ति लीलां त्वद्बलमाश्रिताः ॥ ६७ ॥
अभ्याशे वर्तते कालो भारतस्याहवोदधेः ।
हस्तप्राप्तानि युद्धानि राज्ञां त्रिदिवगामिनाम् ॥ ६८ ॥
पन्थानः शोधिता व्योम्नि विमानारोहणोर्ध्वगाः ।
अवकाशा विभज्यन्ते शक्रलोके महीक्षिताम् ॥ ६९ ॥
उग्रसेनसुते शान्ते पदस्थे त्वयि केशव ।
अभितस्तन्महद् युद्धं भविष्यति महीक्षिताम् ॥ ७० ॥
त्वां चाप्रतिमकर्माणं संश्रयिष्यन्ति पाण्डवाः ।
भेदकाले नरेन्द्राणां पक्षग्राहो भविष्यसि ॥ ७१ ॥
त्वयि राजासनस्थे हि राजश्रियमनुत्तमाम् ।
शुभां त्यक्ष्यन्ति राजानस्त्वत्प्रभावान्न संशयः ॥ ७२ ॥
एष मे कृष्ण संदेशः श्रुतिभिः ख्यातिमेष्यति ।
देवतानां दिविस्थानां जगतश्च जगत्पते ॥ ७३ ॥
दृष्टं मे भवतः कर्म दृष्टश्चासि मया प्रभो ।
कंसे भूयः समेष्यामि साधिते साधु याम्यहम् ॥ ७४ ॥
एवमुक्त्वा स तु तदा नारदः खं जगाम ह ।
नारदस्य वचः श्रुत्वा देवसङ्‌‌‍गीतयोनिनः ॥ ७५ ॥
तथेति स समाभाष्य पुनर्गोपान् समासदत् ।
गोपाः कृष्णं समासाद्य विविव्शुर्व्रजमेव ह ॥ ७६ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
विष्णुपर्वणि केशिवधे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥


केशिवध -

वैशंपायन सांगतातः-अंधकाचे भाषण ऐकून कंसाचे नेत्र क्रोधाने खदिरांगारासारखे लाल झाले, व एक शब्दही न बोलतां तो आपल्या अंतःपुराकडे रागारागाने निघून गेला. बाकीच्या यादव सभासदांनी सर्व वृत्तांत समक्ष अवलोकन केला होताच. तेही 'कंसाने केले हे चांगलें केलें नाही' असे पुटपुटत आपआपल्या घरोघर चालते झाले. यादवांचा मूळचा बेत अंधकाच्या भाषणाने जागच्याजागी जिरून गेला.

इकडे कंसाच्या आज्ञानुसार मनोवेगाने चालणाऱ्या एका चांगल्या रथांत बसून अक्रूर गोकुळाकडे चालला होता. त्याला श्रीकृष्णाचें · दर्शन केव्हां घेईन असे झाले होते.

उलटपक्षी, कृष्णाला शुभ शकून होत होते. त्याची व त्याच्या पित्यासारख्या बांधवांची लवकरच भेट होणार असें त्याच्या शरीरावर होणारी चिन्हें सूचवीत होती. . अक्रूराला धाडण्यापूर्वी, कृष्णाचा वध करविण्याचे हेतूनें मथुरेश्वराने योजनापूर्वक एका दूताला केशीकडे पाठवून दिले होते. दृताने सांगितलेला निरोप ऐकून, लोकांना नित्य पीडा देणारा दुर्निवार केशी दैत्य वृंदावनामध्ये जाऊन गोपांना त्रास देऊ लागला. तो अश्वरूपी दैत्य मोठा रागीट व दुष्ट असून त्याचे दमन करणे म्हणजे मोठे कठीण काम होते. मनुष्याचे मांस खाऊन त्याने गोकुळामध्ये मोठा गोंधळ उडवून दिला होता. त्याने गाईचा व गोपाळांचा संहार करण्यास आरंभ केला होता. तो दुर्मद केशी गाईंचे मांस भक्षण करी व निरंकशपणे वाटेल तिकडे फिरे. अश्वरूपी दुष्टात्मा केशी दैत्याच्या या अघोर करणीने गोकुळभर अस्थि व मांस यांचा सडा पडून सर्व वृंदावन स्मशानाप्रमाणे भासू लागले होते. तो आपल्या खुरांनी जमीन खरडून काढी वक्षणाधीत सपाट्यासरसे वृक्ष उन्मळून टाकी. तसेच आपल्या खिंकाळण्याने तो वायूशी स्पर्धा करी व एकदम आकाशात उडी मारी. तो दुष्ट व माजलेला. अश्व वनामध्ये हिंडूं लागला म्हणजे त्याच्या मानेवरचे केस एकसारखे हलत. आपल्या करणीने तो भयंकर व अत्यंत पुष्ट दैत्य जणूं काय त्या वनांत कंसाच्या चरित्राचे अनुकरण करीत होता. त्या दुराल्न्या अधाने सर्व गोपांना मारून तेथील अरण्य शून्यवत् करून टाकले. त्या अमार्गगामी राक्षसाने ते अरण्य व्यापून टाकले असल्या कारणाने, माणूस किंवा गाई कोणीही तेथे फिरकेनासे झाले. एकसारखा नरांतावर चरणान्या त्या मदोन्मत्त केशीने वृंदावनभर धुमाकूळ घातला होता. असे होता होता त्याचा मृत्यु समीप आला तेव्हां आपोआप कोणे एके समयीं तो क्रुद्ध झालेला केशी वनांत फिरत असतां, माणसाच्या शब्दाच्या अनुरोधानें गवळीधाज्याजवळ प्राप्त झाला. प्रत्यक्ष यमराजाकडूनच त्याला तेथे येण्याची बुद्धि झाली असे पटले पाहिजे. त्याला पहातांच बायका, मुलें व पुरुष इत्यादि सर्व जगदीश जो श्रीकृष्ण त्याच्या नावाने आरोळ्या ठोकीत धुम त्याकडे पळू लागली. बायकामुलांचा रुदनस्वर व गोपाळांची आरोळी ऐकून कृष्णाने त्यांना अभय दिले व तो एकदम केशीचे अंगावर धावन गेला. त्याबरोबर केशी देखील मान उंच करून दांत बाहेर काढून व डोळे वटासून मोठ्याने सिंकाळत सपाट्याने कृष्णाच्या समोर येऊन उभा राहिला. अश्वश्रेष्ठ आपल्या कडेच चाल करून येत आहे असे अवलोकन करून मेघ जसा चंद्रावर जातो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्याचे अंगावर धावून गेला. कृष्ण केशी दैल्याच्या जवळ जाऊन उभा राहिला आहे असें पाहून त्याला काही अपाय होऊ 'नये अशी इच्छा करणारे मनुष्यबुद्धीचे गोप ल्याला म्हणू लागले, "बाबारे, तूं अविचाराने या अधम अवाजवळ नाऊँ नको. तूं यःकश्चित् बालक असून हा पापी राक्षस दुर्जेय आहे. कृष्णा, हा कंसाबरोबरच जन्माला आलेला असून त्याचा शरीराबाहेर फिरणार जीव की प्राण आहे. सर्व अश्वांमध्ये हा अत्यंत श्रेष्ठ असून युद्धामध्ये याला सामनेवाला कोणीही या भूतलावर नाही. हा महासमर्थ अश्व सर्व पापिष्ठांमध्ये अग्रणी असून भूतमात्रांना याने त्रासवून सोडले आहे. कोणीही याला मारूं शकणार नाही."

गोपाळांचे ते भाषण ऐकून वक्तश्रेष्ठ मधुसूदनाची केशीशी लढण्याची इच्छा दुणावली, इतक्यांत, उजवीकड़न व डावीकड़न मंडळाकार गरगर फिरून रागानें केशी दैत्य दोन पायांनी वृक्ष मोडूं लागला. त्या वेळी त्याच्या लांब लांब सटा त्याच्या तोंडावर लोबत होत्या. स्कंध केसांनी झांकृत गेला होता. त्याच्या कपाळावरील आंठ्या मेघतरंगांप्रमाणे दिसत असून त्या केशीला अत्यंत क्रोध आल्यामुळे त्याच्या कपाळांतून घाम निघत होता. ज्याप्रमाणे थंडीच्या दिवसांत आकाशांतून चंद्रमा दवाची वृष्टि करतो, त्याप्रमाणे धुळीने माखलेल्या केशीच्या तोंडातून सारखा फेंस निवत होता. भारता ! खिंकाळतांना मुखावाटे बाहेर उडणाऱ्या फेनबिंदूंचे योगाने त्या अश्वानें कमलनयन गोविंदाच्या अंगावर सडा घातला. तो अश्व खुराने जमीन खरडीत असल्यामुळे ज्येठमधाप्रमाणे पिंगट रंगाची धूळ वर उडत होती. स्या धुळीने कृष्णाचे मस्तकावरील केस माखून जाऊन त्यांना देखील पिंगट रंग चढला. पाय उंच करून तो केशी दैत्य उड्या मारूं लागला व खरांनी जमीन खरडून दांत कड'कडां चावं लागला. अशा रीतीने चाल करण्यापूर्वीची तयारी करून केशीने कृष्णाचे अंगावर उडी घातली. कृष्णाच्या अंगाशी भिडतांच, त्या तुरगश्रेष्ठाने पुढच्या पायांनी कृष्णाच्या वक्षस्थळावर लाथा झाडल्या. इतके करूनही तो बलिष्ठ दानव थांबला नाही. त्याने अतुल सामथ्योच्या कृष्णावर आपल्या मागच्या तंगड्यांनी मधून मधून तडाके लगावण्याची सुरवात केली. त्या क्रोधवश झालेल्या हयाने आपल्या तीक्ष्ण दाटेनें व भयंकर वाने कृष्णाच्या खांद्याचा चावा घेतला. त्याचे केंस खाली लोंबत होते, अशा स्थितीत जेव्हां तो घोडा कृष्णाच्या अंगाशी मिडला त्यावेळी मेघयुक्त सूर्याप्रमाणे त्याची शोभा दिसं लागली. क्रोधामुळे ज्याच्या अंगांत दुप्पट सामर्थ्य आले होते, असा तो बलवान् केशी आपल्या उराने वासुदेवाच्या वक्षस्थळावर प्रहार करण्याचा विचार करीत होता. इतक्यांत अतुलपराक्रमी व महासमर्थ कृष्णाने रागावून आपला दंड फुगवला आणि आपल्याशी भिडलेल्या अश्वाच्या मुखांत तो कोंबला.श्रीकृष्णाच्या बाहचा चावा घेण्याची किंवा त्याला अन्य रीतीने प्रतिबंध करण्याची त्या अश्वाची प्राज्ञा झाली नाही. उलट, त्याचे सगळे दांत मुळासकट उखळले जाऊन त्याच्या तोंडातून फेंसाबरोबर रक्त बाहेर येऊ लागले. ओठ फाटून त्याच्या जबड्याचे दोन भाग झाले. अर्थात्, त्याचे डोळे फिरून सर्व सांधे खिळखिळे झाले व हनुवटी फुटून तो मटकन् खाली बसला. त्याचे नेत्र रक्तबंबाळ झाले. त्याचे कर्णहि ताठ उभे राहून त्याचा वात्रटपणा बंद पडला आणि तो गरगर फिरूं लागला. पुनः पुनः तो उभा राहून उडी मारण्याचा प्रयत्न करी; परंतु त्याचा काही उपयोग न होता तो खाली पडे. विष्ठा व मूत्र यांचा उत्सर्ग झाला. आणि तो अत्यंत दमून गेल्यामुळे त्याचे अंगावरील सर्व केस घामाने भिजून गेले. पायांची धडपड बंद पडली, केशी दैत्याच्या मुखांत कोंबलेला श्रीकृष्णाचा बाहु, ग्रीष्मऋतूच्या शेवटी, अर्धचंद्राच्या किरणांनी वेष्टिलेल्या मेघाप्रमाणे शोभत होता. रात्रभर आकाशसंचार करून श्रमलेला चंद्र प्रभातकाळी निस्तेज होऊन मेरु पर्वताचा आश्रय करून रहातो, तेव्हां जसा देखावा दृष्टीस पडतो, तसा देखावा सर्व अवयव थंड पडून तो केशी श्रीकृष्णाचे समीप मृतप्राय होऊन पडला असतांना दिसत होता. कृष्णाच्या बाहूच्या तडाक्याने, केशीच्या तोंडांतील दांत शरदऋतूतील जलशून्य शुन मेघांप्रमाणे एकामागून एक गळून पडले. : . याप्रमाणे आधीच जर्जर झालेल्या केशीला, शुद्ध कृत्ये करणार्‍या कृष्णाने आपली भुजा 'आणखी फुगवून अधिक घायाळ केले. युद्धामध्ये श्रीकृष्णाने नुसत्या बाहूचा उपयोग करून केशीला जेरीस आणल्याबरोबर त्याचे मुख छिन्नविछिन्न होऊन त्या दानवाला अत्यंत पीडा झाली व तो मोठमोठ्याने ओरडूं लागला. त्याने आपले अंग जमीनीवर टाकून एकसारखी तडफड' चालवली होती. तोंडावाटे रक्तस्त्राव चालूच होता. मध्येच तोडलेल्या पर्वताप्रमाणे त्याचे शरीर फाटले असल्या कारणानें तो विद्रूप दिसत होता. कृष्णाच्या बाहूनें तोंड दुभंगल्यामुळे तो अत्यंत भयंकर राक्षस तोंड चिरलेल्या सर्पाप्रमाणे खाली पडलेला होता. कृष्णाने केशीचा देह छिन्नविच्छिन्न केल्याकारणाने शंकराने महिषासुराला मारून टाकल्यानंतर त्याचे धिप्पाड शरीर जसे भयंकर दिसत होते, त्याप्रमाणे त्या केशीचेही| स्वरूप उन दिसू लागले. प्रत्येकांत दोन पाय, अर्धी पाठ, अर्धे पुच्छ, एक कान, एक डोळा व एक नाकपुडी इतके अवयव अललेली त्या प्राण्याची दोन शकले निरनिराळी होऊन भूमीवर पडली होती, तेव्हां त्यांची मोठी मौज दिसली. . उलटपक्षी केशीच्या दातांचा तडाका कृष्णाच्या बाहवर बसून त्या जागी व्रण उमटले होते, त्यामुळे श्रीकृष्णाचा बाहु अरण्यांत हत्तीने आपल्या दांताने ओरबाडलेल्या सालवृक्षाप्रमाणे दिसत होता. एवंच युद्धामध्ये केशीला मारून त्याचे दोन तुकडे केल्यावर तो कमललोचन कृष्ण तेथेच हसत उभा राहिला. केशी मरून पडला आहे असे पहातांच गोप व गोपी यांना मोठा हर्ष झाला. आपले विघ्न टळून हाल चुकले या कल्पनेने त्यांची मुखें प्रफुल्ल झाली. श्रियायुक्त दामोदराची पुनःपुनः पूजा करीत आपआपल्या वयाच्या व पदवीच्या अधिकाराप्रमाणे सर्वांनी गोड गोड भाषणांनी त्याचे अभिनंदन केले. गोप म्हणाले:-"कृष्णारे, तूं आज केवढे अलौकिक कृत्य केलेंस! घोडयाचे रूप घेऊन भूमीवर संचार करून याने मोठा धुमाकूळ उडविला होता; परंतु याला मारून तूं लोकांच्या सौख्यमार्गातील एक कांटाच नाहींसा केलास यांत संशय नाही. बाबारे, या पापी अश्वासुराला मारून वृंदावनाला तू सुखासमा. धानाची जोड करून दिलीस. कृष्णा, आतां या वनामध्ये पशुपक्षी व माणसे सुखार्ने संचार करतील. आमचे बरेच गोप व वत्सांवर अत्यंत प्रेम करणाऱ्या गाई या दुरात्म्याने मारल्या; एवढेच नाही तर दूरदूरच्या दुसऱ्या देशांतही याने असाच उच्छाद दिला होता. या जगतांतील सर्व माणसे मारून आपल्याला यथेच्छ संचार करता यावा एतदर्थ जणू काय, या पापिष्ठाने जगत्प्रळय करण्याचा उद्योग आरंभला होता. जीवाची आशा ठेवून देवांपैकी देखील कोणाचीही याचेसमोर उभे राहण्याची प्राज्ञा नव्हती. मग पृथ्वीवरील यःकश्चित् माणसांचा पाड' काय? । - इतक्यांत आकाशांत देखील संचार करण्यास समर्थ असलेले नारद मुनि गुप्त राहूनच कोणासही न दिसतां ह्मणाले " हे विष्णो, हे देवाधिदेवा कृष्णा, मी तुजवर प्रसन्न झालों आहे."

नारद पुढे म्हणतात:----केशीला मारण्याचे में दुष्कर कृत्य तूं आज केलेंस ते एक तूंच अगर स्वर्गातील शंकरच करूं जाणे ! बाबारे, तुझ्या ठिकाणी माझे चित्ताचा लय लागलेला असल्याकारणानें, तुझें व केशीचें युद्ध पहाण्यासाठी मी स्वर्गाहून येथे आलो. पूतनावधादिक तुझी . यापूर्वीची सर्व अलौकिक कृत्ये मी प्रत्यक्ष पाहिलींच आहेत. परंतु गोविंदा, तुझे हे आजचे कर्म पाहून मला अत्यंत संतोष झाला आहे. प्रसंगी आपले शरीर अत्यंत भयंकर करूं शकणाऱ्या दुष्ट केशीपुढे बलीला मारणारा महासमर्थ इंद्र देखील चळचळां कांपे. ज्याचें पेर अतिशय दांडगें अशा बाहूच्या बळाने तं केशीला फाडलेंस, याच रीतीने त्याचा मृत्यु घडून यावा अशी ब्रह्मदेवाची योजना होती. ज्या अर्थी तूं केशीचा वध केलास, त्या अर्थी मी आज्ञा करतो ती ऐक. केशव या नांवानें तूं यापुढे जगतामध्ये प्रख्यात होशील. तुझे कल्याण असो ! त्वरित गमन करणारा मी आता जातो. तुझ्या अवतारकृत्यांपैकीं बाकी राहिलेली कार्य करण्यास तुं पूर्णपणे समर्थ आहेस. तरी आणखी उशीर न लावतां ती करण्याच्या मार्गालाही तूं लाग. तुं दुसऱ्या कार्यात गुंतल्याकारणाने तुझ्या बलाचा आश्रय करून राहिलेले देव, मनुष्य. रूपाने बाललीला करून तुझें अनुकरण करीत आहेत. भारतीययुद्धाची वेळ नजीक आली आहे. स्वर्गाला जावयाच्या राजांची युद्धे होण्याचा काळ हातांत आल्यासारखा जवळ ठेपला आहे. विमानांत बसून स्वर्गाला जाणाऱ्या लोकांसाठी आकाशांतील रस्ते झाडून स्वच्छ केले आहेत. इंद्रलोकामध्ये, राजांसाठी पृथक् पृथक् जागा तयार करण्याचे काम चालू आहे. उग्रसेनाचा पुत्र जो कंस त्याचा तुझ्याहातून वध झाल्यावर, केशवा, तुला राज्यपदाचा अभिषेक होईल. नंतर राजे लोकांचे मोठे युद्ध होईल. तुझे सामर्थ्य अलौकिक असल्यामुळे, पांडव तुझा आश्रय करून रहातील. राजांची फूट होण्याची वेळ आली म्हणजे तूं पांडवांचा पक्ष घेशील. तूं राजासनावर बसलास ह्मणजे, बाकीचे राजे आपआपल्या राज्यलक्ष्मीचा तुझ्या प्रभावामुळे त्याग करतील यात शंका नाही. जगदीशा कृष्णा, या निरोप श्रुतीमध्ये पूर्वीच प्रथित होता. तो मी प्रकटपणे तुला सांगितला. यामुळे तो आतां सर्व जगभर व स्वर्गलाकी देवांमध्ये प्रसिद्ध होईल. हे प्रभो, मी तुझें अलौकिक सामर्थ्य आतांच प्रत्यक्ष पाहिले. तसेंच तुझें दर्शनही मला झाले. मी आतां जातो. कंसाला तूं मारलेस ह्मणजे मी पुन्हां येईन. इतके बोलून, नारद आकाशमार्गाने निधून गेले. देवांच्या संगीताचा जनक जो नारद त्याचे वरील भाषण श्रवण करून 'तथास्तु, असे कृष्णाने झटले; व पुनरपि तो गोपांमध्ये येऊन मिळाला. कृष्ण परत येऊन पोचतांच सर्व गोप व्रजामध्ये शिरले.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
विष्णुपर्वणि केशिवधे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
अध्याय चोविसावा समाप्त

GO TOP