श्रीहरिवंशपुराण विष्णुपर्व त्रयोविंशोऽध्यायः
अन्धकवचनम्
वैशंपायन उवाच
क्षिप्तं यदुवृषं दृष्ट्वा सर्वे ते यदुपुङ्गवाः ।
निपीड्य श्रवणान् हस्तैर्मेनिरे तं गतायुषम् ॥ १ ॥
अन्धकोऽनुद्विग्नमना धैर्यादविकृतं वचः ।
प्रोवाच वदतां श्रेष्ठः समाजे कंसमोजसा ॥ २ ॥
अश्लाघ्यो मे मतः पुत्र तवायं वाक्परिश्रमः ।
अयुक्तो गर्हितः सद्भिर्बान्धवेशु विशेषतः ॥ ३ ॥
अयादवो यदि भवाञ्छृणु तावद्यदुच्यते ।
न हि त्वां यादवं वीर बलात् कुर्वन्ति यादवाः ॥ ४ ॥
अश्लाघ्या वृष्णयः पुत्र येषां त्वमनुशासिता ।
इक्ष्वाकुवंशजो राजा विनिवृत्तः स्वयं सकृत् ॥ ५ ॥
भोजो वा यादवो वासि कंसो वासि यथा तथा ।
सहजं ते शिरस्तात जटी मुण्डोऽपि वा भव ॥ ६ ॥
उग्रसेनस्त्वयं शोच्यो योऽस्माकं कुलपांसनः ।
दुर्जातीयेन येन त्वमीदृशो जनितः सुतः ॥ ७ ॥
न चात्मनो गुणांस्तात प्रवदन्ति मनीषिणाः ।
परेणोक्ता गुना गौण्यं यान्ति वेदार्थसंमिताः ॥ ८ ॥
पृथिव्यां यदुवंशोऽयं निन्दनीयो महीक्षिताम् ।
बालः कुलान्तकृन्मूढो येषां त्वमनुशासिता ॥ ९ ॥
असाधुमद्भिर्वाक्यैश्च त्वया साध्विति भाषितैः ।
न चाप्यासादितं कार्यमात्मा च विवृतः कृतः ॥ १० ॥
गुरोरनवलिप्तस्य मान्यस्य महतामपि ।
क्षेपणं कः शुभं मन्ये द्विजस्येव वधे कृते ॥ ११ ॥
मान्याश्चैवाभिगम्याश्च वृद्धास्तात यथाग्नयः ।
क्रोधो हि तेषां प्रदहेल्लोकानन्तर्गतानपि ॥ १२ ॥
बुधेन तात दान्तेन नित्यमभ्युच्छ्रितात्मना ।
धर्मस्य गतिरन्वेष्या मत्स्यस्य गतिरप्स्विव ॥ १३ ॥
केवलं त्वं तु दर्पेण वृद्धानग्निसमानिह ।
वाचा तुदसि मर्मघ्न्या अमन्त्रोक्ता यथाऽऽहुतिः ॥ १४ ॥
वसुदेवं च पुत्रार्थे यदिमं परिगर्हसि ।
तत्र मिथ्या प्रलापं ते निन्दामि कृपणं वचः ॥ १५ ॥
दारुणे च पिता पुत्रे नैव दारुणतां व्रजेत् ।
पुत्रार्थे ह्यापदः कष्टाः पितरः प्राप्नुवन्ति हि ॥ १६ ॥
छादितो वसुदेवेन यदि पुत्रः शिशुस्तदा ।
मन्यसे यद्यकर्तव्यं तत् पृच्छ पितरम् स्वकम् ॥ १७ ॥
गर्हता वसुदेवं च यदुवंशं च निन्दता ।
त्वया यादवपुत्राणां वैरजं विषमर्जितम् ॥ १८॥
अकर्तव्यं यदि कृतं वसुदेवेन पुत्रजम् ।
किमर्थमुग्रसेनेन शिशुस्त्वं न विनाशितः ॥ १९ ॥
पुन्नाम्नो नरकात्पुत्रो यस्मात् त्राता पितॄंस्तदा ।
तस्माद् ब्रुवन्ति पुत्रेति पुत्रं धर्मविदो जनाः ॥ २० ॥
जात्यां हि यादवः कृष्णः स च सङ्कर्षणो युवा ।
त्वं चापि विधृतस्ताभ्यां जातवैरेण चेतसा ॥ २१ ॥
उद्भूतानीह सर्वेषां यदूनां हृदयानि वै ।
वसुदेवे त्वयाऽऽक्षिप्ते वासुदेवे च कोपिते ॥ २२ ॥
कृष्णे च भवतो द्वेष्ये वसुदेवविगर्हणात् ।
शंसन्ति चेमानि भयं निमित्तान्यशुभानि ते ॥ २३ ॥
सर्पाणां दर्शनं तीव्रं दुःस्वप्नानां निशाक्षये ।
पुर्या वैधव्यशंसीनि कारणैरनुमीमहे ॥ २४ ॥
एष घोरो ग्रहः स्वातीमुल्लिखन् खे गभस्तिभिः ।
वक्रमङ्गारकश्चक्रे चित्रायां घोरदर्शनः ॥ २५ ॥
बुधेन पश्चिमा सन्ध्या व्याप्ता घोरेण तेजसा ।
वैश्वानरपथे शुक्रो ह्यतिचारं चचार ह ॥ २६ ॥
केतुना धूमकेतोस्तु नक्षत्राणि त्रयोदश ।
भरण्यादीनि भिन्नानि नानुयान्ति निशाकरम् ॥ २७ ॥
प्राक्संध्या परिघग्रस्ता भाभिर्बाधति भास्करम् ।
प्रतिलोमं च यान्त्येव व्याहरन्तो मृगद्विजाः ॥ २८ ॥
शिवा श्मशानान्निष्क्रम्य निःश्वासाङ्गारवर्षिणी ।
उभे सन्ध्ये पुरीं घोरा पर्येति बहु वाशती ॥ २९ ॥
उल्का निर्घातनादेन पपात धरणीतले ।
चलत्यपर्वणि मही गिरीणां शिखराणि च ॥ ३० ॥
ग्रस्तः स्वर्भानुना सूर्यो दिवा नक्तमजायत ।
धूमोत्पातैर्दिशो व्याप्ताः शुष्काशनिसमाहताः ॥ ३१ ॥
प्रस्रवन्ति घना रक्तं साशनिस्तनयित्नवः ।
चलिता देवताः स्थानात् त्यजन्ति विहगा नगान् ॥ ३२ ॥
यानि राजविनाशाय दैवज्ञाः कथयन्ति ह ।
तानि सर्वाणि पश्यामो निमित्तान्यशुभानि वै ॥ ३३ ॥
त्वं चापि स्वजनद्वेषी राजधर्मपराङ्मुखः ।
अनिमित्तागतक्रोधः सन्निकृष्टभयो ह्यसि ॥ ३४ ॥
यस्त्वं देवोपमं वृद्धं वसुदेवं वसूपमम् ।
मोहात् क्षिपसि दुर्बुद्धे कुतस्ते शान्तिरात्मनः ॥ ३५ ॥
त्वद्गतो यो हि नः स्नेहस्तं त्यजामोऽद्य वै वयम् ।
अहितं स्वस्य वंशस्य न त्वां क्षणमुपास्महे ॥ ३६ ॥
स हि दानपतिर्धन्यो यो द्रक्ष्यति वने गतम् ।
पुण्डरीकविशालाक्षं कृष्णमक्लिष्टकारिणम् ॥ ३७ ॥
छिन्नमूलो ह्ययं वंशो यदूनां त्वत्कृते कृतः ।
कृष्णो ज्ञातीन् समानाय्य स सन्धानं करिष्यति ॥ ३८ ॥
क्षान्तमेव तवानेन वसुदेवेन धीमता ।
कालसम्यक्परिज्ञानो ब्रूहि त्वं यद्यदिच्छसि ॥ ३९ ॥
मह्यं तु रोचते कंस वसुदेवसहायवान् ।
गच्छ कृष्णस्य निलयं सन्धिस्तेन च रोचताम् ॥ ४० ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
विष्णुपर्वणि अन्धकवचने त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥
अंधकाचे भाषण -
वैशंपायन सांगतात:---कंसाने वसुदेवाची लालवलेली निर्भर्सना पाहून सर्व यादव श्रेष्ठ सभासदांनी कानांत बोटे घातली. याची शंभर वर्षे पूर्ण भरली असेही त्यांना वाटलें. इतक्यांत त्या भर समाजामध्ये कंसाला मोठ्या धैर्याने व करारीपणाने खडखडीत प्रत्युत्तर देणारा अंधक नावाचा एक तेजस्वी यादव उठला. तो उत्तम वक्ता कंसाला मणाला. बाबारे मला वाटते, तूं हा आपले वाणीला वथा शीण दिलास. हे तुझे बोलणे निंद्य व अयोग्य आहे. भले कधीही असें मर्मभेदक भाषण करीत नाहीत. विशेषतः आपल्या बांधवांसंबंधी अशी भाषा सज्जनांच्या तोंडांतन केव्हाही बाहेर पडावयाची नाही. तुला जर यादवकुलांत जन्म झाल्याबद्दल लाज वाटत असेल तर मी सांगतों इकडे लक्ष दे. वीरा, तुझ्या इच्छेविरुद्धः तुला यादव म्हणण्याचा जुलूम करण्यास यादव तयार नाहीत. तूं आम्हां यादवांचा आपणास राजा म्हणवितोस. परंतु तुझ्या दुष्टपणामळे आम्ही सर्व यादव मात्र लोकनिंदेस पात्र झालो आहो. मला वाटते की, इक्ष्वाकु वंशांतील दुष्ट असमंज राजा, आमच्या वंशाचा उच्छेद करध्याकरितां तुझ्या रूपाने पुन्हां जन्मास आला आहे. असो; तूं, भोज, यादव किंवा कंस, कोणीहि अप्स. तूं मुंडण कर, जटा राख किंवा आहे तसेच तुझें मस्तक राहूं दे. पण ज्या कमअस्सलाने तुझ्यासारखा . कुलांगार पुत्र उत्पन्न केला, त्या कुलकलंक उग्रसेनाची मात्र कीव केली पाहिजे. बाबारे, शहाणे लोक स्वमुखाने आपले गुणाची महती कधीही सांगत नाहीत. दुसऱ्यांनी आपल्या गुणांची वाहवा केली म्हणजेच त्या गुणांना वेदार्थाप्रमाणे महत्व येऊन त्यांचे साफल्य होते. यदुवंशाला तुझ्यासारखा, पोरकट कुलनाशक व मूर्ख राजा मिळाल्याकारणाने पृथ्वीचे सर्व राजे यादवांची छी थू करीत आहेत. तुझ्या मुखांतून जी मुक्ताफळे आतां बाहेर पडली, त्यांचे योगाने तुला मोठी धन्यता वाटत असेल. परंतु तुझ्या मर्मभेदी भाषणाने तुझें कांहीं चांगले तर झालें नाहींच; पण तुझें अंतःकरण मात्र कसे आहे ते लोकांच्या उत्तम निदर्शनास आले. भल्यानांही मान्य झालेल्या निगर्वी गुरूची निर्भर्त्सना म्हणजे दुसरी ब्रह्महत्याच. ती कोणाला आवडणार आहे ? बाबारे, अग्नीप्रमाणे, वृद्ध माणसांची पूजा करून त्यांचा सन्मान केला पाहिजे. ते जर का रागावले तर आपण योगबलाने कमाविलेल्या लोकांचाही नाश होईल. बाबारे, उदकामध्ये मत्स्य ज्याप्रमाणे आपला मार्ग शोधून काढतो, त्याप्रमाणे, शहाणी सुरती, संयमी व उदार अंतःकरणाची माणसें नेहमी धर्माचा मार्ग शोधून त्या मार्गाने जातात. पण तुझे पहावें तो, अग्नी. सारख्या तेजस्वी थोर वृद्ध पुरुषांना, तूं गर्वाने फुगून जाऊन मर्मभेदक शब्दांनी ताडण करून मंत्रावांचून दिलेल्या आहुतीप्रमाणे दुःख देत असतोस. तुला न कळवितां वसुदेवाने आपल्या पुत्रांचे रक्षण केल्यामुळे तूं त्याची निर्भर्त्सना चालविली आहेस. पण मी तुझ्या या खोडसाळ प्रलापांचा व अनुदार भाषेचा उघडपणे निषेध करतो. पुत्र जरी दुष्टबुद्धीचा निपजला तरी बापाने तसेंच बनतां कामा नये. पुत्रासाठी मातापितरांना अत्यंत कष्ट सोसावे लागतात. आपल्या लहान मुलाला वसुदेवाने लपवून ठेविलें, हा त्याने मोठा कृतघ्नपणा केला, असे जर तुझे म्हणणे असेल तर ही गोष्ट तूं आपल्या पित्यालाच विचार. वसुदेवाची, किंबहुना सर्व यादववंशाची निर्भत्सना करून तूं सर्व यादवांचे वैर मात्र संपादन केले आहेस. वसुदेवाने कृष्णाचे तुला न कळत रक्षण केलें ही जर त्याची चूक असेल, तर मग मी असे विचारतों की, उपजतांच उग्रसेनाने तुला मारून टाकलें नाहीं ही त्याची चूक नव्हे काय? पुत् नामक नरकापासून मुलगा पितरांची मुक्तता करितो म्हणून मुलाला पुत्र अशी संज्ञा धर्मवेत्त्या लोकांनी देऊन ठेविलेली आहे. कृष्ण व बलराम यांच्याविषयीं तूं आरंभापासून वैर चालविलें आहेस, त्यामुळे त्यांच्याही मनांत तुजविषयीं जन्मापासून हाडवैर बाणलेले आहे. वसुदेवाचा भर सभेत धिक्कार करून तूं वासुदेवाचा कोप आपणांवर ओढवून घेतला आहेस व त्यामुळे सर्व यादवांची अंतःकरणे देखील तुझ्याविषयी खवळून गेली आहेत. वसुदेवाच्या निर्भर्सनेमुळे कृष्ण तुझा वैरी झाला आहे." सांप्रत होत असलेली अशुभ चिन्हें तुल्ट्रा भय सुचवीत आहेत. पहाटेस दुःस्वमें पडून सोचे अशुभ दर्शन होते, या गोष्टीवरून लवकरच या मथुरेला वैधव्य प्राप्त होणार असे आमचे अनुमान आहे. हा घोर ग्रह राहु आकाशामध्ये स्वाति नक्षत्रांत प्राप्त झाला असून त्या ठिकाणी आपल्या किरणांनी चमकत आहे, तसेच मंगळ नामक पापग्रह वक्री होऊन चित्रानक्षत्रांत आला आहे. बध ग्रह आपल्या भयंकर तेजाने पश्चिम दिशा व्यापून बसला आहे. आणि शुक्राने सूर्याच्या मार्गाचे उल्लंघन केले आहे. भरणीपासून तेरा नक्षत्रे ही घूमकेतूच्या पुच्छानें विद्ध झाली असल्याकारणाने त्यापैकी कोणत्याहि शुभ नक्षत्रांत चंद्र असला तरी तो उत्तम फल देऊ शकत नाही. सयोला सळे पडले आहे. पशु व पक्षी कर्कश ध्वनि करून इकडून तिकडे उलट दिशेने जातात, दुष्ट भालु स्मशानांतून निघून निःश्वासाबरोबर निखारे टाकीत, सकाळसंध्याकाळ आरडत, या आपल्या नगरीच्या सभोवार पळत जाते. मोटाले गडगडाट होऊन उल्का जमिनीवर पडतात. एकाएकी भूकंप होतो व गिरिशिखरें हालावयास लागतात. नुकताच राहूनें सूर्याचा ग्रास केला असतां दिवसास काळोख पडून रात्र झाली की काय असे वाटूं लागले. शक दगडांचा वर्षाव होऊन सर्व दिशा धुक्याने धुंद होतात. मेवांची कडाक्याची गर्जना होऊन रक्ताचा पाऊस पडतो. पक्षी हे वृक्षांवर बसत नाहीसे झाले आहेत. मला वाटते की, देवतांनी आपआपले स्थान सोडले आहे. कारण ज्योतिषी लोकांनी राजाच्या नाशाची सूचक म्हणून जी जी अशुभ लक्षणे सांगितलेली आहेत ती सर्व सांप्रत आपल्या प्रत्ययास येत आहेत. तूंहीं स्वजनांचा द्वेष करतोस, राजधर्म पाळीत नाहीस व विनाकारण क्रोधाच्चा तडानन्यांत सांपडतोस; म्हणून तुझा मृत्यु समीप आला आहे असे मला वाटते. अरे मुखों, वसूप्रमाणे पूज्य असलेल्या वृद्ध वसुदेवाला, मोहाने तू हवे तसे टाकन बोलतो आहेस, त्या तुला मनाची शांति कोठून मिळणार? तुझ्यावर जो आमचा स्नेह होता तो इतःपर आम्हीं काढून घेतला आहे. तूं आपल्याच वंशावर उलटला आहेस. याकरितां यापुढे क्षणभर देखील तुझी चाकरी करण्याची आमची इच्छा नाही. अकराला गोकुळानजीकच्या धनामध्ये आज शुद्धाचरणी कमललोचनश्रीकृष्णाने पुण्यकारक दर्शन होणार. तो मात्र खरोखर धन्य होय. तुझ्यामुळे सर्व यादववंशाची दाणादाण होईल, परंतु आपल्या ज्ञातीचे सर्व लोक एकत्र जमवून श्रीकृष्ण पुनः यादववंशाची व्यवस्था लावील. वसुदेन शहाणा असल्याकारणाने काळवेळ ओळखून त्याने तुझे बोलणे मुकाट्याने सहन करून घेतले आहे. आणखी तुला वाटेल ते त्याला बोलण्याला तूं मुखत्यार आहेत. परंतु कंसा, वसुदेवाशी सख्य जोडून तूं कृष्णाच्या घरी जावेस व त्याशी स्नेह संपादन करावास हें मला योग्य वाटते.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि अन्धकवचने त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥
अध्याय तेविसावा समाप्त
GO TOP
|