श्रीहरिवंशपुराण विष्णुपर्व द्वाविंशोऽध्यायः
अक्रूरप्रस्थानम्
वैशंपायन उवाच
कृष्णं व्रजगतं श्रुत्वा वर्धमानमिवानलम् ।
उद्वेगमगमत् कंसः शङ्कमानस्ततो भयम् ॥ १ ॥
पूतनायां हतायां च कालिये च पराजिते ।
धेनुके प्रलयं नीते प्रलम्बे च निपातिते ॥ २ ॥
धृते गोवर्धने शैले विफले शक्रशासने ।
गोषु त्रातासु च तथा स्पृहणीयेन कर्मणा ॥ ३ ॥
ककुद्मिनि हतेऽरिष्टे गोपेषु मुदितेषु च ।
दृश्यमाने विनाशे च संनिकृष्टे महाभये ॥ ४ ॥
कर्षणे वृक्षयोश्चैव शकटस्य तथैव च ।
अचिन्त्यं कर्म तच्छ्रुत्वा वर्धमानेषु शत्रुषु ॥ ५ ॥
प्राप्तारिष्टामिवात्मानं मेने स मथुरेश्वरः ।
विसंज्ञेन्द्रियभूतात्मा गतासुप्रतिमो बभौ ॥ ६ ॥
ततो ज्ञातीन्समानाय्य पितरं चोग्रशासनः ।
निशि स्तिमितमूकायां मथुरायां जनाधिपः ॥ ७ ॥
वसुदेवं च देवाभं कङ्कं चाहूय यादवम् ।
सत्यकं दारुकं चैव कङ्कावरजमेव च ॥ ८ ॥
भोजं वैतरणं चैव विकद्रुं च महाबलम् ।
भयशङ्खं च धर्मज्ञं विपृथुं च पृथुश्रियम् ॥ ९ ॥
बभ्रुं दानपतिं चैव कृतवर्माणमेव च ।
भूरितेजसमक्षोभ्यं भूरिश्रवसमेव च ॥ १० ॥
एतान् स यादवान् सर्वानाभाष्य शृणुतेति च ।
उग्रसेनसुतो राजा प्रोवाच मथुरेश्वरः ॥ ११ ॥
भवन्तः सर्वकार्यज्ञा वेदेषु परिनिष्ठिताः ।
न्यायवृत्तान्तकुशलास्त्रिवर्गस्य प्रवर्तकाः ॥ १२ ॥
कर्तव्यानां च कर्तारो लोकस्य विबुधोपमाः ।
तस्थिवांसो महावृत्ते निष्कम्पा इव पर्वताः ॥ १३ ॥
अदम्भवृत्तयः सर्वे सर्वे गुरुकुलोषिताः ।
राजमन्त्रधराः सर्वे सर्वे धनुषि पारगाः ॥ १४ ॥
यशःप्रदीपा लोकानां वेदार्थानां विवक्षवः ।
आश्रमाणां निसर्गज्ञा वर्णानां क्रमपारगाः ॥ १५ ॥
प्रवक्तारः सुनियतां नेतारो नयदर्शिनाम् ।
भेत्तारः परराष्ट्राणां त्रातारः शरणार्थिनाम् ॥ १६ ॥
एवमक्षतचारित्रैः श्रीमद्भिरुदितोदितैः ।
द्यौरप्यनुगृहीता स्याद् भवद्भिः किं पुनर्मही ॥ १७ ॥
ऋषीणामिव वो वृत्तं प्रभावो मरुतामिव ।
रुद्राणामिव वः क्रोधो दीप्तिरङ्गिरसामिव ॥ १८ ॥
व्यावर्तमानं सुमहद् भवद्भिः ख्यातकीर्तिभिः ।
धृतं यदुकुलं वीरैर्भूतलं पर्वतैरिव ॥ १९ ॥
एवं भवत्सु युक्तेषु मम चित्तानुवर्तिषु ।
वर्धमानो ममानर्थो भवद्भिः किमुपेक्षितः ॥ २० ॥
एष कृष्ण इति ख्यातो नन्दगोपसुतो व्रजे ।
वर्धमान इवाम्भोधिर्मूलं नः परिकृन्तति ॥ २१ ॥
अनमात्यस्य शून्यस्य चारान्धस्य ममैव तु ।
कारणान्नन्दगोपस्य स सुतो गोपितो गृहे ॥ २२ ॥
उपेक्षित इव व्याधिः पूर्यमाण इवाम्बुदः ।
नदन्मेघ इवोष्णान्ते स दुरात्मा विवर्धते ॥ २३ ॥
तस्य नाहं गतिं जाने न योगं न पराक्रमम् ।
नन्दगोपस्य भवने जातस्याद्भुतकर्मणः ॥ २४ ॥
किं तद्भूतं समुद्भूतं देवापत्यं न विद्महे ।
अतिदेवैरमानुष्यैः कर्मभिः सोऽनुमीयते ॥ २५ ॥
पूतना शकुनी बाल्ये शिशुनोत्तानशायिना ।
स्तनपानेप्सुना पीता प्राणैः सह दुरासदा ॥ २६ ॥
यमुनाया ह्रदे नागः कालियो दमितस्तथा ।
रसातलचरो नीतः क्षणेनादर्शनं ह्रदात् ॥ २७ ॥
नन्दगोपसुतो योगं कृत्वा स पुनरुत्थितः ।
धेनुकस्तालशिखरात् पातितो जीवितं विना ॥ २८ ॥
प्रलम्बं यं मृधे देवा न शेकुरतिवर्तितुम् ।
बालेन मुष्टिनैकेन स हतः प्राकृतो यथा ॥ २९ ॥
वासवस्योत्सवं भङ्क्त्वा वर्षं वासवरोषजम् ।
निर्जित्य गोगृहार्थाय धृतो गोवर्धनो गिरिः ॥ ३० ॥
हतस्त्वरिष्टो बलवान् निःशृङ्गश्च कृतो व्रजे ।
अबालो बाल्यमास्थाय रमते शिशुलीलया ॥ ३१ ॥
प्रबन्धः कर्मणामेवं तस्य गोव्रजवासिनः ।
सन्निकृष्टं भयं चैव केशिनो मम च ध्रुवम् ॥ ३२ ॥
भूतपूर्वश्च मे मृत्युः सततं पूर्वदैहिकः ।
युद्धाकाङ्क्षी च स यथा तिष्ठतीह ममाग्रतः ॥ ३३ ॥
क्व च गोपत्वमशुभं मानुष्यं मृत्युदुर्बलम् ।
क्व च देवप्रभावेण क्रीडितव्यं व्रजे मया ॥ ३४ ॥
अहो नीचेन वपुषाच्छादयित्वाऽऽत्मनो वपुः ।
कोऽप्येष रमते देवः श्मशानस्य इवानलः ॥ ३५ ॥
श्रूयते हि पुरा विष्णुः सुराणां कारणान्तरे ।
वामनेन तु रूपेण जहार पृथिवीमिमाम् ॥ ३६ ॥
कृत्वा केसरिणो रूपं विष्णुना प्रभविष्णुना ।
हतो हिरण्यकशिपुर्दानवानां पितामहः ॥ ३७ ॥
अचिन्त्यरूपमास्थाय श्वेतशैलस्य मूर्धनि ।
भवेन च्याविता दैत्याः पुरा तत्त्रिपुरं घ्नता ॥ ३८ ॥
चालितो गुरुपुत्रेण भार्गवोऽङ्गिरसेन वै ।
प्रविश्य दार्दुरीं मायामनावृष्टिं चकार ह ॥ ३९ ॥
अनन्तः शाश्वतो देवः सहस्रशिरसोऽव्ययः ।
वाराहं रूपमास्थाय प्रोज्जहारार्णवान्महीम् ॥ ४० ॥
अमृते निर्मिते पूर्वं विष्णुः स्त्रीरूपमास्थितः ।
सुराणामसुराणां च युद्धं चक्रे सुदारुणम् ॥ ४१ ॥
अमृतार्थे पुरा चापि देवदैत्यसमागमे ।
दधार मन्दरं विष्णुरकूपार इति श्रुतिः ॥ ४२ ॥
वपुर्वामनमास्थाय नन्दनीयं पुरा बलेः ।
त्रिभिः क्रमैस्तु त्रीँल्लोकाञ्जहार त्रिदिवालयम् ॥ ४३ ॥
चतुर्धा तेजसो भागं कृत्वा दाशरथे गृहे ।
स एव रामसंज्ञो वै रावणं व्यनशत् तदा ॥ ४४ ॥
एवमेष निकृत्या वै तत्तद्रूपमुपागतः ।
साधयत्यात्मनः कार्यं सुराणामर्थसिद्धये ॥ ४५ ॥
तदेष नूनं विष्णुर्वा शक्रो वा मरुतां पतिः ।
मत्साधनेच्छया प्राप्तो नारदो मां यदुक्तवान् ॥ ४६ ॥
अत्र मे शङ्कते बुद्धिर्वसुदेवं प्रति ध्रुवा ।
अस्य बुद्धिविशेषेण वयं कातरतां गताः ॥ ४७ ॥
अहं हि खट्वाङ्गवने नारदेन समागतः ।
द्वितीयं स हि मां विप्रः पुनरेवाब्रवीद्वचः ॥ ४८ ॥
यस्त्वया हि कृतो यत्नः कंस गर्भकृते महान् ।
वसुदेवेन ते रात्रौ तत्कर्म विफलीकृतम् ॥ ४९ ॥
दारिका या त्वया रात्रौ शिलायां कंस पातिता ।
तां यशोदासुतां विद्धि कृष्णं च वसुदेवजम् ॥ ५० ॥
रात्रौ व्यावर्तितावेतौ गर्भौ तव वधाय वै ।
वसुदेवेन संधाय मित्ररूपेण शत्रुणा ॥ ५१ ॥
सा तु कन्या यशोदाया विन्ध्ये पर्वतसत्तमे ।
हत्वा शुम्भनिशुम्भौ द्वौ दानवौ नगचारिणौ ॥ ५२ ॥
कृताभिषेका वरदा भूतसङ्घनिषेविता ।
अर्च्यते दस्युभिर्घोरैर्महाबलिपशुप्रिया ॥ ५३ ॥
सुरापिशितपूर्णाभ्यां कुम्भाभ्यामुपशोभिता ।
मयुराङ्गदचित्रैश्च बर्हभारैर्विभूषिता ॥ ५४ ॥
हृष्टकुक्कुटसंनादं वनं वायसनादितम् ।
मृगसङ्घैश्च संपूर्णमविरुद्धैश्च पक्षिभिः ॥ ५५ ॥
सिम्हव्याघ्रवराहाणां नादेन प्रतिनादितम् ।
वृक्षगम्भीरनिबिडं कान्तारैः सर्वतो वृतम् ॥ ५६ ॥
दिव्यभृङ्गारुचमरैरादर्शैरुपशोभितम् ॥
देवतूर्यनिनादैश्च शतशः प्रतिनादितम् ॥ ५७ ॥
स्थानं तस्या नगे विन्ध्ये निर्मितं स्वेन तेजसा ।
रिपूणां त्रासजननी नित्यं तत्र मनोरमे ॥ ५८ ॥
वसते परमप्रीता देवतैरपि पूजिता ।
यस्त्वयं नन्दगोपस्य कृष्ण इत्युच्यते सुतः ॥ ५९ ॥
अत्र मे नारदः प्राह सुमहत्कर्मकारणम् ।
द्वितीयो वसुदेवाद् वै वासुदेवो भविष्यति ॥ ६० ॥
स हि ते सहजो मृत्युर्बान्धवश्च भविष्यति ।
सएव वासुदेवो वै वसुदेवसुतो बली ।
बान्धवो धर्मतो मह्यं हृदयेनान्तको रिपुः ॥ ६१ ॥
यथा हि वायसो मूर्ध्नि पद्भ्यां यस्यावतिष्ठति ।
नेत्रे तुदति तस्यैव वक्त्रेणामिषगृद्धिना ॥ ६२ ॥
वसुदेवस्तथैवायं सपुत्रज्ञातिबान्धवः ।
छिनत्ति मम मूलाणि भुङ्क्ते च मम पार्श्वतः ॥ ६३ ॥
भ्रूणहत्यापि संतार्या गोवधः स्त्रीवधोऽपि वा ।
न कृतघ्नस्य लोकोऽस्ति बान्धवस्य विशेषतः ॥ ६४ ॥
पतितानुगतं मार्गं निषेवत्यचिरेण सः ।
यः कृतघ्नोऽनुबन्धेन प्रीतिं वहति दारुणाम् ॥ ६५ ॥
नरकाध्युषितः पन्था गन्तव्यस्तेन दारुणः ।
अपापे पापहृदयो यः पापमनुतिष्ठति ॥ ६६ ॥
अहं वा स्वजनः श्लाघ्यः स वा श्लाघ्यतरः सुतः ।
नियमैर्गुणवृत्तेन त्वया बान्धवकाम्यया ॥ ६७ ॥
हस्तिनां कलहे घोरे वधमृच्छन्ति वीरुधः ।
युद्धव्युपरमे ते तु सहाश्नन्ति महावने ॥ ६८ ॥
बान्धवानामपि तथा भेदकाले समुत्थिते ।
बध्यते योऽन्तरप्रेप्सुः स्वजनो यदि वेतरः ॥ ६९ ॥
कालस्त्वं हि विनाशाय मया पुष्टो विजानता ।
वसुदेवकुलस्यास्य यद् विरोधयसे भृशम् ॥ ७० ॥
अमर्षी वैरशीलश्च सदा पापमतिः शठः ।
स्थाने यदुकुलं मूढ शोचनीयं त्वया कृतम् ॥ ७१ ॥
वसुदेव वृथा वृद्ध यन्मया त्वं पुरस्कृतः ।
श्वेतेन शिरसा वृद्धो नैव वर्षशतैर्भवेत् ॥ ७२ ॥
यस्यबुद्धिः परिणता स वै वृद्धतरो नृणाम् ॥ ७३ ॥
त्वं च कर्कशशीलश्च बुद्ध्या च न बहुश्रुतः ।
केवलं वयसा वृद्धो यथा शरदि तोयदः ॥ ७४ ॥
किं च त्वं साधु जानीषे वसुदेव वृथामते ।
मृते कंसे मम सुतो मथुरां पालयिष्यति ॥ ७५ ॥
छिन्नाशस्त्वं वृथा वृद्धो मिथ्या त्वेवं विचारितम् ।
जिजीविषुर्न सोऽप्यस्ति योऽवतिष्ठेन्ममाग्रतः॥ ७६ ॥
प्रहर्तुकामो विश्वस्ते यस्त्वं दुष्टेन चेतसा ।
तत्ते प्रतिकरिष्येऽहं पुत्रयोस्तव पश्यतः ॥ ७७ ॥
न मे वृद्धवधः कश्चिद् द्विजस्त्रीवध एव च ।
कृतपूर्वः करिष्ये वा विशेषेण तु बान्धवे ॥ ७८ ॥
इह त्वं जातसंवृद्धो मम पित्रा विवर्धितः ।
पितृष्वसुश्च मे भर्ता यदूनां प्रथमो गुरुः ॥ ७९ ॥
कुले महति विख्यातः प्रथिते चक्रवर्तिनाम् ।
गुर्वर्थं पूजितः सद्भिर्महद्भिर्धर्मबुद्धिभिः ॥ ८० ॥
किं करिष्यामहे सर्वे सत्सु वक्तव्यतां गताः ।
यदूनां यूथमुख्यस्य यस्य ते वृत्तमीदृशम् ॥ ८१ ॥
मद्वधो वा जयो वाथ वसुदेवस्य दुर्नयैः ।
सत्सु यास्यन्ति पुरुषा यदूनामवगुण्ठिताः ॥ ८२ ॥
त्वया हि मद्वधोपायं तर्कमाणेन वै मृधे ।
अविश्वास्यं कृतं कर्म वाच्याश्च यदवः कृताः ॥ ८३ ॥
अशाम्यं वैरमुत्पन्नं मम कृष्णस्य चोभयोः ।
शान्तिमेकतरे शान्तिं गते यास्यन्ति यादवाः ॥ ८४ ॥
गच्छ दानपते क्षिप्रं ताविहानयितुं व्रजात् ।
नन्दगोपं च गोपांश्च करदान् मम शासनात् ॥ ८५ ॥
वाच्यश्च नन्दगोपो वै करमादाय वार्षिकम् ।
शीघ्रमागच्छ नगरं गोपैः सह समन्वितः ॥ ८६ ॥
कृष्णसङ्कर्षणौ चैव वसुदेवसुतावुभौ ।
द्रष्टुमिच्छति वै कंसः सभृत्यः सपुरोहितः ॥ ८७ ॥
एतौ युद्धविदौ रङ्गे कालनिर्माणयोधिनौ ।
दृढौ च कृतिनौ चैव शृणोमि व्यायतोद्यमौ ॥ ८८ ॥
अस्माकमपि मल्लौ द्वौ सज्जौ युद्धकृतोत्सवौ ।
ताभ्यां सह नियोत्स्येते तौ युद्धकुशलावुभौ ॥ ८९ ॥
द्रष्टव्यौ च मयावश्यं बालौ तावमरोपमौ ।
पितृष्वसुः सुतौ मुख्यौ व्रजवासौ वनेचरौ ॥ ९० ॥
वक्तव्यं च व्रजे तस्मिन् समीपे व्रजवासिनाम् ।
राजा धनुर्मखं नाम कारयिष्यति वै सुखी ॥ ९१ ॥
सन्निकृष्टं वने ते तु निवसन्तु यथासुखम् ।
जनस्यामन्त्रितस्यार्थे यथ स्यात्सर्वमव्ययम् ॥ ९२ ॥
पयसः सर्पिषश्चैव दध्नो दध्युत्तरस्य च ।
यथाकामप्रदानाय भोज्याधिश्रयणाय च ॥ ९३ ॥
अक्रूर गच्छ शीघ्रं त्वं तावानय ममाज्ञया ।
संकर्षणं च कृष्णं च द्रष्टुं कौतूहलं हि मे ॥ ९४ ॥
तयोरागमने प्रीतिः परमा मत्कृता भवेत् ।
दृष्ट्वा तु तौ महावीर्यौ तद्विधास्यामि यद्धितम् ॥ ९५ ॥
शासनं यदि वा श्रुत्वा मम तौ परिभाषितम् ।
नागच्छेतां यथाकालं निग्राह्यावपि तौ मम ॥ ९६ ॥
सान्त्वमेव तु बालेषु प्रधानं प्रथमो नयः ।
मधुरेणैव तौ मन्दौ स्वयमेवानयाशु वै ॥ ९७ ॥
अक्रूर कुरु मे प्रीतिमेतां परमदुर्लभाम् ।
यदि वा नोपजप्तोऽसि वसुदेवेन सुव्रत ।
तथा कर्तव्यमेतद्धि यथा तावागमिष्यतः ॥ ९८ ॥
एवमाक्षिप्यमाणोऽपि वसुदेवो वसूपमः ।
सागराकारमात्मानं निष्प्रकम्पमधारयत् ॥ ९९ ॥
वाक्छल्यैस्ताड्यमानस्तु कंसेनादीर्घदर्शिना ।
क्षमां मनसि संधाय नोत्तरं प्रत्यभाषत ॥ १०० ॥
ये तु तं ददृशुस्तत्र क्षिप्यमाणमनेकधा ।
धिग्धिगित्यसकृत् ते वै शनैरूचुरवाङ्मुखाः ॥ १०१ ॥
अक्रूरस्तु महातेजा जानन् दिव्येन चक्षुषा ।
जलं दृष्ट्वेव तृषितः प्रेषितः प्रीतिमानभूत् ॥ १०२ ॥
तस्मिन्नेव मुहूर्ते तु मथुरायाः स निर्ययौ ।
प्रीतिमान्पुण्डरीकाक्षं द्रष्टुं दानपतिः स्वयम् ॥ १०३ ॥
इति श्रीमहाभारते खिलेभागे हरिवंशे
विष्णुपर्वणि अक्रूरप्रस्थाने द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥
रासक्रीडा -
वैशंपायन सांगतात:-~- कृष्णापासून आपल्याला भीति आहे हे ठाऊक असल्यामुळे कृष्ण गोकुळांत जाऊन अग्नीप्रमाणे वृद्धिंगत होत आहे, हे वर्तमान कंसाच्या कानीं जातांच त्याला अत्यंत उद्वेग उत्पन्न झाला. कृष्णाने पूतनेचा वध केला, कालियाचे दमन केले, धेनुकाला ठार मारले, प्रलंबाला लोळविलें, गोवर्धन पर्वत उचलून धरून इंद्राची आज्ञा विफल केली आणि अलौकिक करणी करून गाईचे रक्षण केले. तसेच वृषभरूपी अरिष्टासुराची वाट लावून गोपांची भीति घालवली, इत्यादि अद्भुत गोष्टी ऐकून आपला विनाशकाल समीप आला असें कंसाला स्पष्ट दिसू लागले. त्याचप्रमाणे आपला शत्रु प्रचंड अर्जुनवृक्ष उन्मळून पाडून भला मोठा गाडा उलटवण्यासारखी अघाट कृत्य करून दिवसेंदिवस गोकुळांत वाढत आहे, ही कल्पना मनांत येऊन आपल्यावर खास अरिष्ट कोसळले आहे अशी त्या मथुराधिपाची खात्री झाली. त्यामुळे त्याची सर्व इंद्रियें व मन यांचे भान नाहींसें झाले आणि त्याच्यावर प्रेतकळा दिसू लागली. त्यानंतर एके दिवशी रात्री सर्व लोक निद्रावश झाल्यामुळे मथुरा नगरीत जिकडे तिकडे सामसूम असतांना, जुलमी कंसराजाने आपल्या ज्ञातीच्या लोकांस व पित्यास बोलावून आणले. त्यांतच देवासारखा निर्दोष वसुदेव, यादवश्रेष्ठ कंक, सत्यक, दारुक, कंकानुज, भोज, वैतरण, महाबल विकद्रु, धर्मज्ञ भयशंख श्रीमंत विपृथु, दानाध्यक्ष (: हाच अक्रूर होय ), कृतवर्मा आणि अतितेजस्वी व कधीही क्षुब्ध न होणारा भूरिश्रवा इतक्या लोकांस त्याने विशेषेकरून पाचारण केले होते. सर्व यादवमंडळी जमल्यानंतर, उग्रसेनाचा पुत्र व मथुरेचा राजा कंस त्यांना उद्देशून म्हणाला, “ मी बोलतों इकडे कृपेने अवधान असू द्या. आपली वेदांवर अत्यंत श्रद्धा असून कोणते समयी कसे वागावे हे आपणांला चांगले समजते. तसेंच न्याय-नीति इत्यादिकांचे आचार आपल्याला पूर्णपणे अवगत असून , धर्म-अर्थकाम या तीन पुरुषार्थांचे आपण प्रवर्तक आहां. आपआपली कर्तव्ये करण्याचे कामी आपण निरंतर अत्यंत दक्ष असल्यामुळे देवांचीच उपमा आपणांस योग्य आहे. महत्वाचे कार्य करावयाचे असले तरी न डगमगतां आपण पर्वतासारखे अचल रहातां. दंभ कसा तो आपणांस मुळींच माहीत नाही. आपण सर्वांनी शास्त्राक्षेप्रमाणे गुरुगृहीं वास करून सर्व विद्यांचे ज्ञान संपादन केले आहे. धनुर्वियंत कोणालाही तुमचा हात धरता येणार नाही. | राजाला योग्य सल्लामसलत देण्याचे कामांत तुम्ही फार चतुर आहां. अखिल सृष्टीमध्ये तुमचा यशोदीप चमकत असून वेदांचे खरे रहस्य तुम्हांला कळलेले आहे. वर्णाश्रमधर्माचें साद्यंत ज्ञान तुम्ही मिळविलेले आहे. सदाचा| राचे नियम तुम्हीच घालून दिले असून स्मृतिकारांमध्ये देखील तुम्ही अग्रगण्य आहां. परराष्ट्र जिंकून घेणे म्हणजे तुम्हांला कापदार्थ आहे. तथापि, शरणागताचे रक्षण करण्यास तुम्ही चुकत नाही. याप्रकारे तुमचे शील अत्यंत निर्दोष असून वाद किंवा संभाषण करण्याचे कामी तुमची बरोबरी कोणाच्यानेही व्हावयाची नाही. तुमच्या वैभवाची कीर्ति दूरवर पसरलेली आहे. तुमच्यासारख्या थोर पुरुषांच्या वास्तव्याने स्वर्गलोकची देखील थोरवी वाढेल, मग या पृथ्वीची कथा काय ? आपले आचरण ऋषींप्रमाणे आहे. मरुद्गणासारखे तुम्ही पराक्रमी आहां. रुद्राप्रमाणे तुमचा राग असून तेज अग्नीसारखे आहे. आपली कीर्ति सर्वत्र विश्रुत आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीला पर्वतांचा आधार आहे, त्याप्रमाणे अवनतीस चाललेल्या या थोर यदुकुलाला तुम्हांसारख्या विभूतींनी सांप्रतकाळी सांवरून धरले आहे. असे असून, माझ्या मनाप्रमाणे वागून माझे रक्षण करण्याकरितां तुम्ही नित्य तत्पर असतांनाही माझा शत्रु दिवसेंदिवस बळावत चालला आहे या गोष्टीची तुम्ही उपेक्षा करितां याचा अर्थ काय ? गोकुळामध्ये कृष्ण नांवाचा नंदाचा पुत्र आहे. तो दिवसेंदिवस सागराप्रमाणे वाढत असून त्याने आमच्या मुळावर घाव घालण्याची वेळ आणली आहे. माझें हृदय ठिकाणावर नाही, मला कर्तृत्ववान् सचिव नाहीत व मी गुप्त हेर ठेवले नसल्याकारणाने अंधळ्यासारखा झाली आहे. यामुळेच नंदाचा पुत्र अद्याप आपल्या घरी सुखाने नांदत आहे. उपेक्षा केलेल्या व्याधीप्रमाणे, अंवसेपौर्णिमेच्या समुद्राच्या उधानाप्रमाणे, किंवा उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी गडगडणा-या मेघाप्रमाणे, तो दुरात्मा कृष्ण माझा शत्रु रोजच्या रोज अधिकच बळावत चालला आहे. नंदाच्या घरी जन्मास आलेल्या व एकापेक्षा एक अलौकिक कृत्ये करणाऱ्या माझ्या शत्रूचे निर्दळण करण्याचा मार्ग मला सुचत नाही. किंबहुना त्याचे खरे स्वरूप व त्याचा पराक्रम यांचाच मला ठाव लागत नाही. मी अगदी मूढ बनलो आहे. तो नंदपुत्र म्हणजे पंचमहाभूतांपैकी एखाद्या महाभूताचा अवतार आहे की काय कोण जाणे! एकदा असे वाटते की, तो देवाचा पुत्र असावा; परंतु, नक्की काहीच कळत नाही. त्याच्या अलौकिक व दैवी कृत्यांवरून तो कोण असावा याचे अनुमान करावयाचे आहे. अगदी तान्हा असतांना त्या दुर्जय मुलानें उताणें निजून पूतना नामक पक्षिणीचे स्तनपान करण्यास आरंभ केला व क्षणार्धात स्तनमार्गाने तिचे प्राण शोषन घेतले. पुढे त्याने यमुना नदीच्या डोहामध्ये वास्तव्य करणाऱ्या कालिया सर्पाचें दमन करून, अल्पावकाशांत तो डोह सोडून पातालांत रहावयास जाण्याचे त्याला भाग पाडले आणि नागपाशबंध तोडून पुनः पूर्ववत् वर आला; तसेंच त्याने तालवृक्षाच्या शेंड्यावरून धेनुक नामक राक्षसास खाली लोटून देऊन गतप्राण केले. प्रलंब राक्षस म्हणजे युद्धांत देवांना देखील अजिंक्य; परंतु या प्रतापी बालकाने एकाच मुष्टिप्रहाराने सामान्य माणसाप्रमाणे त्याला यमलोकची वाट दाखविली. नंतर, त्याने इंद्राचा उत्सव बंद केला, यामुळे चिडून जाऊन इंद्राने मुसळधार वृष्टि सुरू केली. परंतु, गाईचे वृष्टीपासून रक्षण करण्याकरिता त्याने गोवर्धन पर्वत छत्रीसारखा वर उचलून धरला व इंद्राचे पारिपत्य केलें, अगदी अलीकडे, बलवान् अरिष्ट नामक राक्षस बैलाच्या रूपाने जामध्ये गेला असतांना, त्याची शिंगें उपटून कृष्णाने त्याला ठार मारले. मला वाटते की, तो दिसतो तसा लहान मुलगा नाहीं; तो कोणी तरी महासमर्थ वीर बालकाचे रूप घेऊन आपली बाललीलेची हौस पुरवीत असला पाहिजे. गोकुळामध्ये राहून तो कृष्ण अशा प्रकारचे अद्भुत चमत्कार करीत आहे, त्यावरून माझें व केशी दैत्याचे मरण निःसंशय समीप आले असे मला वाटते. मागल्या जन्मीं मला याचेपासूनच मृत्यु आला; किंबहुना, प्रत्येक जन्मांत यानेच मला मारले आणि आतां तोच मजशी युद्ध करून मला ठार करण्यासाठी. माझ्या डोळ्यांसमोर गोकुळांत नांदत आहे. वरवर पाहिले तर अमंगल गोपकुलामध्ये मरणशील अशा माणसाचे रूप याने घेतले आहे असे दिसून येते; परंतु याची करणी पहावी तर ती मात्र एखाद्या दैवी अवताराप्रमाणे अद्भुत व अलौकिक दिसते, यावरून मला तर असे वाटते की, हा कोणी तरी देव बाह्यतः गोपासारख्या क्षुल्लक वेषाने आपले खरे स्वरूप गुप्त ठेवून स्मशानांतील अग्नीप्रमाणे भलत्याच ठिकाणी नांदत आहे. मी म्हणतो या गोष्टीला पुराणांतरी देखील पुष्कळ दाखले असल्याचे आपल्या ऐकिवांत आहे. प्राचीन काळी विष्णूने देवांचे काही एक संकट निवारण्याकरितां, वामनरूप धारण करून · बळीपासून पृथ्वीची मुक्तता केली. त्याहीपूर्वी पृथ्वीवर दैत्यांचा सुळसुळाट झाला असतां, सर्वशक्तिमान् विष्णूनें सिंहाचे रूप घेऊन दानवांचा मूळपुरुष जो हिरण्यकशिपु राक्षस त्याचा वध केला. तसेंच श्वेतपर्वताच्या शिखरावर त्रिपुरासुर शंकराने कल्पनातीत रूप धारण करून दैत्यांचा विध्वंस केला. आंगिरस बृहस्पतीचा पुत्र जो कच त्याला(बेडकाप्रमाणे) प्राणत्याग करावयास लावून व पुनःपुनः जिवंत करून ( म्हणजे दार्दुरी मायेचा आश्रय करावयास लावून ) त्याचेकडून त्याच विष्णूने शुक्राच्या संजीविनी मंत्राचे सामर्थ्य नाहींसें केले व कचाच्या हत्येच्या पापाकरितां दैत्यवस्तीमध्ये दुष्काळ पाडला. पुराणांतरी आपण आणखी असेंही ऐकले आहे की, त्या सहस्त्र मुखी, अव्यय, अनंत व सनातन प्रभूनें वराहरूपाने सागरांत बुडून गेलेली पृथ्वी वर काढली व मोहिनीरूप घेऊन अमृताकरितां देवदैत्यांचे भयंकर युद्ध माजविलें. अमृत घुसळून काढण्याकरितां, देव व दैत्य यांनी मिळून जेव्हां मंदुरपर्वताने समुद्र मंथन करण्यास आरंभ केला तेव्हां कूर्मरूपाने श्रीविष्णूनेच मंदरपर्वताला आधार दिला होता, अशी श्रुति आहे. एकदा सुंदर वामनरूप घेऊन त्यानेच आपल्या तीन पावलांनी तिन्ही लोक व्यापून टाकले व त्रैलोक्याची बळीचे त्रासांतून सुटका केली. आपल्या तेजाचे चार भाग करून दशरथाच्या घरी चार देहांनी अवतार घेतला आणि त्यापैकी रामनामक (विष्णूच्या ) अंशाने रावणाचा नाश केला.
याप्रमाणे आपल्या मायेने निमित्तपरत्वे नाना प्रकारची रूपे घेऊन श्रीविष्णु आपलें व देवांचे कार्य साधीत असतो. सांप्रत मला मारण्याच्या उद्देशाने विष्णु, इंद्र किंवा मरुत्पति यांपैकी कोणीतरी गोकुळामध्ये नंदाच्या घरी कृष्णरूप घेतले असावे असे मला तर खास वाटते. नारदाने देखील मला असेंच. सांगितले होतें.
या कामी मला वसुदेवाबद्दल मोठी शंका येत आहे. याच्याच कारवाईमुळे आपल्याला भय उत्पन्न झाले आहे यांत मला तरी संदेह वाटत नाही. खटांगवनामध्ये पुनः एकदां नारद ऋषी मला भेटले होते. त्या प्रसंगी फिरून त्यांनी मला बजावले की " कंसा, ( अष्टम) गर्भाबद्दल जो तूं मोठा अट्टाहास केलास तो एका रात्रीत वसुदेवाने फुकट घालवला. देवकी प्रसूत झाली त्या रात्री मुलगी ह्मणून जिला तुं शिलवर आपटून मारलीस ती यशोदेची मुलगी होती व तिचा ह्मणून गोकुळांत नांदत असलेला कृष्ण हा वसुदेवाचा आठवा पुत्र आहे. हे पुनः एकवार सांगतों ध्यानात ठेव. तुझा वध करण्याकरितां तुझ्या हितशत्रूने (वसुदेवानें ) तुझ्याशी कपट करून त्याच रात्री गर्भाची अदलाबदल करून तुझ्या शत्रूला ( कृष्णाला) जिवंत राखिले आहे. तूं आपटलेली यशोदेची मुलगी विध्यनामक पर्वतश्रेष्ठावर संचार करणाऱ्या शुंभनिशुभ नामक दोघां राक्षसांस मारून सुखरूप राहिली आहे. त्या वरदात्या देवीला अभिषेक होऊन तिची सर्व भूतसंघ सेवा करीत असतात. मोठमोठे धान्याचे व पशंचे बळी तिला फार आवडतात व भयंकर दरवडेखोर तिचे पूजन करतात. सुरा व मांस यांनी भरलेले दोन घट तिच्या समीप ठेवलेले असल्याकारणाने ती फार सुंदर दिसते. मोरांच्या चित्रविचित्र पिसाऱ्यांची भूषणे तिने अंगावर धारण केलेली आहेत. कावळे व आनंदित झालेले कोंबडे यांच्या ओरडण्याने, ती देवी जेथें वास करिते तें वन गजबजून गेले आहे. त्याचप्रमाणे त्या अरण्यांत मृगांचे कळप व परस्परांशी गुण्यागोविं. दाने राहणारे पक्षी सर्वत्र संचार करतांना दृष्टीस पडतात. सिंह, वाघ व डुक्कर यांनी तेथें आरोळी ठोकली की लागलीच मोठा प्रतिध्वनी उमटतो. जिकडे तिकडे प्रचंड वृक्षांची गर्दी झाली असून सभोवार राने माजून राहिली आहेत. दिव्य सुवर्णपात्रे, चंवऱ्या व आरसे यांनी त्या देवीचे देऊळ भरून गेले आहे. देवांच्या वाद्यांच्या गजराच्या नादाचा नेहमी त्या ठिकाणी दुमदुमाट चाललेला असतो. तिने आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने विंध्याचलावर वसतिस्थान निर्माण केले असून त्या मनोरम जागी शत्रुना त्रासवून सोडणारी व देवांना वंद्य असणारी ती देवी मोठ्या संतोपाने वास्तव्य करीत आहे आणि हा जो नंद गवळ्याचा कृष्ण नामक पुत्र आहे तो वसुदेवाचा दुसरा मुलगा असून त्याचीच ही पूतनावधादिक अद्भुत कृत्ये आहेत व तोच तुझा बांधव तुला मारील असें नारदाने मला सांगितले आहे." वसुदेवाचा महासमर्थ पुत्र वासुदेव हा धर्मशास्त्राप्रमाणे माझा नातेवाईक (बांधव) खरा, परंतु त्याचेच हातून माझा नाश व्हावयाचा आहे. कावळा ज्याच्या मस्तकावर पाय ठेवून बसतो त्याच्याच डोळ्यामध्ये मांस खाण्याच्या लालसेने आपली चोंच खुपसतो; तद्वत्च हा वसुदेव आपल्या पुत्रादिक बांधवांसहवर्तमान माझेपाशी अन्न खाऊन माझ्याच प्राणांवर उठलेला आहे. भ्रूणहत्या, गोवध व स्त्रीवध इत्यादि पापांना प्रायश्चित्ताने शुद्धि आहे परंतु कृतघ्न मनुष्याला-विशेषेकरून आपल्या नातलगांशी कृतघ्नपणा करणाराला-कधीच स्वर्गप्राप्ति होत नाहीं, जो कृतघ्न मनुष्य कपटाने स्वार्थ साधण्याकरितां, वरून स्नेह दाखवून आंतून गळा कापतो त्याला लौकरच पतित ज्या मार्गाने जातात, त्या मार्गाने जावे लागते (म्हणजे त्याचा निःपात होऊन त्याला नरकवास भोगावा लागतो). जो पापी अंतःकरणाचा पुरुष निष्पाप मनाच्या मनुष्याशी कपट करतो त्याला भयंकर नरकवासाचीच वाट धरली पाहिजे. वसुदेवा, तूं मोठा सदाचरणी असून माझ्याशी आजपर्यंत मित्रत्वाने वागत आलास व तूं माझेंच अन्न खात आहेस असे असतां सदाचाराच्या नियमांस अनुसरून तुला मी तुझा स्वजन-प्रिय वाटावा की तुझा मुलगा तुला अधिक व्हावा, सांग पाहूं? रानामध्ये हत्तींची झुंज सुरू झाली म्हणजे लतावेलींचा चुराडा होतो, परंतु भांडण मिटतांच सर्व हत्ती मिळूनच त्या लतावेलींचा फडशा उडवतात. त्याचप्रमाणे बांधवांच्या अंतःकलहाला आरंभ झाला म्हणजे कपटाने वागणाऱ्या माणसांचा नाश होतो, हे मात्र लक्षात ठेव. मग तो मनुष्य स्वपक्षाचा असो की परपक्षाचा असो. अरेरे! वसुदेवा, ज्या अर्थी तूं माझ्या कुळाचा घात करावयास उद्युक्त झाला आहेस त्या अर्थी मला वाटते तुला पोसून नकळत माझ्या नाशासाठी मी आपल्या मृत्यूलाच कीरे वाढवले. तूं असहिष्णु व पापबुद्धीचा असून अत्यंत शठ आहेस. अरे मूर्खा, माझ्याशी वैर करून तूं आज यदुकुलाला मोठ्या फिकिरीत पाडले आहेस. तूं केलेस हे तुझ्या शीलाला योग्यच आहे. वसुदेवा, मी तुझा परामर्ष घेऊन तुला वाढवला ते सर्व निष्फळ झाले. शहाणपण वयावर किंवा पांढऱ्या केसांवर अवलंबून नसते. ज्याची बुद्धि परिपक्क तोच खरा शहाणा; केंस पिकले म्हणजे शहाणपण आले असे नाही. तूं कलहप्रिय आहेस पण तुझें ज्ञान फार नाही. तूं वयाने मोठा आहेस परंतु शरतूंतील मेघांप्रमाणे तुइयांत कांहीं जीव नाही. अरे मूर्ता वसुदेवा, तुला वाटत आहे की कंसाचा नाश झाला म्हणजे माझा पुत्र मथुरेचा राजा होईल. परंतु तुझें हे वाटणे अगदी चुकीचे आहे. तूं थेरडा झाल्याकारणाने तुझी तर आतां काहीएक आशा राहिलेली नाही. तुझ्या सर्व आकांक्षा निष्फळ झालेल्या आहेत. उगीच एरंडासारखा मोठा झाला आहेस एवडेंच. अरे, जिवंत रहाण्याची आशा ठेवून माझ्यापुढे उभे रहाण्याची कोणाची तरी प्राज्ञा आहे काय ? अरे मी तुजवर विश्वासून असतां दुष्ट बुद्धीने माझे एक घाव दोन तुकडे करण्यासाठी तूं टपून बसलेला आहेस. परंतु तुझ्या डोळ्यांदेखत तुझ्या उभयतां पुत्रांची मी उलट वाट लावून टाकतों पहा. मी आजपावेतों कोणाही वृद्ध मनुष्याचा, ब्राह्मणाचा किंवा स्त्रीचा वध केलेला नाही व पुढे करणार नाही. त्यांतलेत्यांत विशेषेकरून मी आपल्या नातलगाची हत्या तर नाहीच करणार. आमच्या येथे तुझा जन्म झाला असून आम्हीच तुला वाढविले आहे. माझ्या पित्याने तुला लहानाचा मोठा केला. तूं माझ्या पितृभगिनीचा पति असून यादवांचा मूळपुरुष आहेस. चक्रवर्ति राजांच्या महाविख्यात कुलामध्ये तुझी मोठी कीर्ति होती. धर्मबुद्धीचे महात्मे व सज्जन तुला गुरूचे ठिकाणी मानीत. परंतु यादवकुलाच्या आधारस्तंभाची असली नीच कृति पाहून सर्व भले लोकांमध्ये आमची छी थू चालली आहे. आम्हांला वर मान करण्याची सोय राहिली नाही. अरे, मला मृत्यु आला काय किंवा माझा जय झाला काय, दोन्ही गोष्टींची मला मोठी किंमत नाही. परंतु वसुदेवाच्या अनीतीमुळे यदुकुलांतील पुरुपांना भल्यांच्या समाजामध्ये तोंडाला पदर लावून तोडे खाली करण्याचा प्रसंग आल्याकारणाने मला अत्यंत वाईट वाटत आहे. युद्धामध्ये माझा नाश कसा होईल याविषयी उपाय-चिंतन करून, तूं माझा विश्वासघात केला आहेस आणि सर्व यादवांच्या तोंडाला काळे फासलें आहेस. मी व कृष्ण यांच्यामध्ये कधीही विझणार नाही असा वैराग्नि आतां चेतला असून आमच्यापैकी एकाची प्राणाहुति पडल्याशिवाय, यादवकुलाला शांति मिळावयाची नाही." "हे दानपते अकरा मी तुला आज्ञा देतों की, उभयतां वसुदेवपुत्रांना व मला कर देणाऱ्या नंदादिक गोपांना वनांतून इकडे आणण्यासाठी विलंब न करितां गोकुळामध्ये जा आणि नंदाला सांग की सर्व गोपांसहवर्तमान वार्षिक कराची रक्कम घेऊन त्वरित मथुरेला ये. त्याला असेंही सांग की वसुदेवाच्या मुलांना--रामकृष्णांना-- पहाण्याची कंसाला फार इच्छा झाली आहे. मथुराधिपाचे सेवक व पुरोहित हे देखील त्यांचे दर्शन घेण्यासाठी उत्कंठित झाले आहेत. राम व कृष्ण हे दोवे सुदृढ, सुंदर, प्रसंगावधानी, कल्पक व सावध असून आखाड्यांत कुस्ती करण्याचे कामी मोठे कुशल आहेत असें ऐकतो. आमच्यापाशी देखील चाणूर व मुष्टिक हे दोन चांगले मल्ल असून कुस्ती करण्यासाठी त्यांचे बाहू फुरफुरत आहेत. युद्धकलेमध्ये निपुण असलेल्या या रामकृष्णांचा त्यांच्याशी सामना लावून देऊ. म्हणजे त्या देवावतारी बालकांचे सामर्थ्य माझे दृष्टीस पडेल. नाहीं तरी मला माझ्या आतेभावांना भेटावयाचे होतेच. बिचारे भिकारड्या गोकुळांत रहात असून अरण्यामध्ये गुरे राखीत फिरत असतात. त्यांचा मला शोधसमाचार घेणे अवश्य आहेच.
त्या गोकुल-वासी जनांना तूं आणखी असें सांग की, राज्यसुखें उपभोगीत असलेला राजा कंस धनुर्मख नांवाचा यज्ञ करविणार आहे.
आणि यज्ञासाठी बोलाविलेल्या लोकांची उत्तम व बिनचूक व्यवस्था रहावी एतदर्थ या मथुरेजवळ असलेल्या वनामध्येच त्यांना रहावयाला सांग. त्यांच्या सर्व सोई आपण लावून देऊ. गवळीवाडा संनिध असला ह्मणजे ताकपाणी, दही, दूध व तूप इत्यादिकांची वाण न पडतां आपल्याला ते ते पदार्थ नानाप्रकारच्या भोज्य वस्तू तयार करण्याकरितां, वाटेल तेव्हां व वाटेल तितके, अनायासाने घेतां येतील. झणून अक्रूरा, तूं ताबडतोब जा व माझ्या आज्ञेवरून त्या दोघां रामकृष्णांना घेऊन ये. त्यांना केव्हां पाहीन असे मला झाले आहे. ते येथे आले ह्मणजे मला मोठा संतोष होईल. त्या महापराक्रमी वीरांना डोळे भरून पाहिल्यावर, मला जे हिताचे दिसेल ते करण्यास ठीक पडेल. माझी आज्ञा व निरोप ऐकून ते जर बऱ्या बोलाने इकडे आले नाहीत, तर मी त्यांस शासन करीन. बालकांशी वागावयाचें तें सौम्यपणाने वागले पाहिजे असा नीतीचा पहिला नियम-सिद्धांत-आहे. ह्मणून होता होईल तो गोड बोलून त्या जडबुद्धींना तूं सत्वर माझ्या समोर घेऊन ये. हे सुशील अक्रूरा, वसुदेवाने जर तुला आपल्या पक्षाला ओढून घेतले नसेल, तर तूं माझें एवढें काम कर. ह्मणजे मी तुझ्यावर अत्यंत लोभ ठेवीन.सारांश, बाबारे, ते वसुदेवाचे पुत्र मथुरेला येतील असे कर." याप्रकारें कंसाने सारखी निर्भर्त्सना चालविलेली असतां देखील, वसूसारख्या स्थिरबुद्धीच्या वसुदेवाने आपले स्वास्थ्य ढळू दिले नाही.
सागराप्रमाणे तो निष्कंप बसला होता. अदूरदशी कंस वरीलप्रमाणे वसुदेवावर वाक्प्रहार करीत होता तरी क्षमाशील वृत्ति स्वीकारून, वसुदेवाने तोडांतून उत्तरादाखल ब्रही काढला नाही. शिव्यांची लाखोली चालली असता मनाची शांति त्याने ढळू दिली नाही, हे ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले त्यांनी खाली माना घातल्या आणि — विकार धिक्कार ' असे शब्द अनेक वेळा त्यांचे तोंडातुन हलल्या स्वरांत सहजी बाहेर पडले. महातेजस्वी अक्रूराला दिव्य दृष्टि असल्या. म. सर्व काही कळत होते. त्या कारणाने, माशाला ज्याग्नमाणे उदक दृष्टीस पडतांच अत्यानंद होतो, त्याप्रमाणे, अकराला मोठा आल्हाद वाटला. कमललोचन श्रीकृष्णाचे दर्शन केव्हां घेईन असे त्याला होऊन गेल्यामुळे, दानपति अक्रूर तत्क्षणीं गोकुळास जाण्याकरितां मथुरेच्या बाहेर पडला.
इति श्रीमहाभारते खिलेभागे हरिवंशे विष्णुपर्वणि अक्रूरप्रस्थाने द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥
अध्याय बाविसावा समाप्त
GO TOP
|