श्रीहरिवंशपुराण विष्णुपर्व एकविंशोऽध्यायः
वृषभासुरवधः
वैशंपायन उवाच
प्रदोषार्द्धे कदाचित्तु कृष्णे रतिपरायणे ।
त्रासयन् समदो गोष्ठमरिष्टः प्रत्यदृश्यत ॥ १ ॥
निर्वाणाङ्गारमेघाभस्तीक्ष्णशृङ्गोऽर्कलोचनः ।
क्षुरतीक्ष्णाग्रचरणः कालः काल इवापरः ॥ २ ॥
लेलिहानः सनिष्पेषं जिह्वयोष्ठौ पुनः पुनः ।
गर्विताविद्धलाङ्गूलः कठिनस्कन्धबन्धनः ॥ ३ ॥
ककुदोदग्रनिर्माणः प्रमाणाद् दुरतिक्रमः ।
शकृन्मूत्रोपलिप्ताङ्गो गवामुद्वेजनो भृशम् ॥ ४ ॥
महाकटिः स्थूलमुखो दृढजानुर्महोदरः ।
विषाणावल्गितगतिर्लम्बता कण्ठचर्मणा ॥ ५ ॥
गवारोहेषु चपलस्तरुघाताङ्किताननः ।
युद्धसज्जविषाणाग्रो द्विषद्वृषभसूदनः ॥ ६ ॥
अरिष्टो नाम हि गवामरिष्टो दारुणाकृतिः ।
दैत्यो वृषभरूपेण गोष्ठान्विपरिधावति ॥ ७ ॥
पातयानो गवां गर्भान् दृप्तो गच्छत्यनार्तवम् ।
भ्रजमानश्च चपलो गृष्टीः संप्रचचार ह ॥ ८ ॥
शृङ्गप्रहरणो रौद्रः प्रहरन्गोषु दुर्मदः ।
गोष्ठेषु न रतिं लेभे विना युद्धेन गोवृषः ॥ ९ ॥
कस्यचित् त्वथ कालस्य स वृषः केशवाग्रतः ।
आजगाम बलोदग्रो वैवस्वतवशे स्थितः ॥ १० ॥
स तत्र गास्तु प्रसभं बाधमानो मदोत्कटः ।
चकार निर्वृषं गोष्ठं निर्वत्सशिशुपुङ्गवम् ॥ ११ ॥
एतस्मिन्नेव काले तु गावः कृष्णसमीपगाः ।
त्रासयामास दुष्टात्मा वैवस्वतवशे स्थितः ॥ १२ ॥
सेन्द्राशनिरिवाम्भोदो नर्दमानो महासुरः ।
तालशब्देन तं कृष्णं सिंहनादैश्च मोहयन् ॥ १३ ॥
अभ्यधावत गोविन्दो दैत्यं वृषभरूपिणम् ।
स कृष्णं गोवृषो दृष्ट्वा हृष्टलाङ्गूललोचनः ॥ १४ ॥
रोषितस्तालशब्देन युद्धाकाङ्क्षी ननर्द ह ।
तमापतन्तं दुर्वृत्तं दृष्ट्वा वृषभरूपिणम् ।
तस्मात् स्थानान्न व्यचलत् कृष्णो गिरिरिवाचलः ॥ १५ ॥
स कुक्षौ वृषभो दृष्टिं प्रणिधाय धृताननः ।
कृष्णस्य निधनाकाङ्क्षी तूर्णमभ्युत्पपात ह ॥ १६ ॥
तमापतन्तं प्रमुखे प्रतिजग्राह दुर्द्धरम् ।
कृष्णः कृष्णाञ्जननिभो वृषं प्रति वृषोपमः ॥ १७ ॥
स संसक्तस्तु कृष्णो वै वृषेणेव महावृषः ।
मुमोच वक्त्रजं फेनं नस्तश्चाथ सशब्दवत् ॥ १८ ॥
तावन्योन्यावरुद्धाङ्गौ युद्धे कृष्णवृषावुभौ ।
रेजतुर्मेघसमये संसक्ताविव तोयदौ ॥ १९ ॥
तस्य दर्पबलं हत्वा कृत्वा शृङ्गान्तरे पदम् ।
आपीडयदरिष्टस्य कण्ठं क्लिन्नमिवांबरम् ॥ २० ॥
शृङ्गं चास्य पुनः सव्यमुत्पाट्य यमदण्डवत् ।
तेनैव प्राहरद् वक्त्रे स ममार भृशं हतः ॥ २१ ॥
स भिन्नशृङ्गो भग्नास्यो भग्नस्कन्धश्च दानवः ।
पपात रुधिरोद्गारी साम्बुधार इवाम्बुदः ॥ २२ ॥
गोविन्देन हतं दृष्ट्वा दृप्तं वृषभदानवम् ।
साधु साध्विति भूतानि तत्कर्मास्याभितुष्टुवुः ॥ २३ ॥
स चोपेन्द्रो वृषं हत्वा कान्तचन्द्रे निशामुखे ।
अरविन्दाभनयनः पुनरेव ररास ह ॥ २४ ॥
तेऽपि गोवृत्तयः सर्वे कृष्णं कमललोचनम् ।
उपासाञ्चक्रिरे हृष्टाः सर्वे शक्रमिवामराः ॥ २५ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
विष्णुपर्वणि वृषभासुरवधे एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥
वृषभासुराचा वध. -
वैशंपायन सांगतातः-वरील प्रकारे क्रीडेमध्ये कृष्णाची कालक्रमणा चालली असतां एके दिवशी अवशीचे सुमारास एकाएकी अरिष्ट नामक मदोन्मत्त राक्षस बनामध्ये येऊन धडकला. तेव्हा सर्व लोकांना अत्यंत भीति वाटली. त्याने वृषभाचे रूप धारण केले होते. त्याचा वर्ण मेघाप्रमाणे व विझविलेल्या निखायाप्रमाणे असून त्याची शिंगें तीक्ष्ण होती. डोळे सूर्यासारखे तेजस्वी होते. त्याचे पुढच्या पायांचे खर तरवारीच्या धारेसारखे होते. तो अत्यंत काळा होता. त्याच्या एकंदर आविभर्भावावरून तो दुसरा कृतांत काळच आहे असे वाटले. तो जिव्हेने आपले ओठ वारंवार जोराने चाटीत होता. आणि शेपूट ऐटीने खाली वर हालवीत होता, त्याचे वशिंड अतिशय कठीण असून त्याच्या तडाक्याने तो प्रासादादि वस्तू जमीनदोस्त करून टाकीत होता. त्याचे शरीर साधारण मानापेक्षां बरेंच भरभक्कम असल्यामुळे त्याला अडवण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती. त्याचे अंग शेणामुताने भरलेलें होते. त्याला पाहून गाईची फारच त्रेधा उडाली. त्याची कंबर मोठी असून मुख विशाल होते. तसेच गुडघे जोमदार असून पोटही भले मोठे होते. त्याचे गळ्याखाली लोंबणाऱ्या भक्कम पोळीचे झोंकाने त्याची शिंगें कांहींशी हालत किंवा पुढे झुकत होती. गाईवर चढाव करण्यांत तो अत्यंत चपळ होता. त्याचे तोंडावर वृक्षादिकांच्या फांद्या लागून ओरखाडे निघाले होते. त्याने झुंझ खेळण्यासाठी तयारीने आपली शिंगें टवकारली होती. त्याच्याशी कोणताहि बैल झोंबी घेता तरी त्याला मारून टाकण्यास तो समर्थ होता. अशा प्रकारचे वृषभाचे रूप घेऊन अरिष्ट नामक महा भयंकर दैत्य गाईच्या गोठ्यांतून, इकडे तिकडे यथेच्छ वावरू लागली; तेव्हां गाईवर मोठे थोरले अरिष्टच कोसळले. त्याच्या भीतीने कित्येक गाईचे गर्भ गळून पडले. तो अत्यंत मत्त झालेला असल्यामुळे ऋतुकालावांचूनच ( कालवडींशी ) गमन करूं लागला. मोठ्याने जांभया देत देत त्याने नुकत्याच व्यालेल्या गाईशी संभोग करण्यास सोडले नाही. त्या भयंकर व दुर्मद वृषभाने आपल्या शिंगांचे तडाखे गोठ्यांतील गाईवर एकसारखे लगावण्यास सुरवात केली. त्याला तेथे मस्ती केल्याशिवाय गोडच वाटेना. याप्रमाणे कांहीं वेळपर्यंत मदोन्मत्त बैलाचा धुमाकूळ झाल्यानंतर त्याची शंभर वर्षे पुरी भरली असल्यामुळे धांवतां धांवतां तो कृष्णाच्या पुढे येऊन उभा राहिला. त्याला अत्यंत मस्ती आलेली असल्यामुळे मोठ्या जोराजोराने तो गाईस अत्यंत पीडा देत होता, थोड्या वेळांत, गोठ्यांतील सर्व गुरे त्याने पार नाहींशी केली. एक वासरूं देखील शिल्लक ठेविलें नाही. असे करता करतां, मृत्यु समीप आल्याकारणाने कृ, ष्णाच्या जवळ असलेल्या गाईंना त्रास देण्याची त्या दुरात्म्यास दुर्बुद्धि झाली. आणि इंद्राच्या वज्राने युक्त असलेल्या मेघाप्रमाणे तो महादैत्य मोठ्याने गर्जना करूं लागला. तेव्हां कृष्णाने टाळी वाजवून सिंहनाद केला व त्या योगाने अरिष्टासुराला भुरळ पाडली. व त्या बैलाच्या पाठीमागें तो गोविंद धांवत सुटला. वृषभालाही कृष्ण दृष्टीस पडतांच मोठा हर्ष होऊन त्याने आपले नेत्र व पुच्छ ही फुरफुरवली, कृष्णाच्या टाळीच्या शब्दाने त्याला फार राग येऊन त्याच्याशी झुंज करण्याची त्याला अनिवार इच्छा झाल्यामुळे त्याने मोठ्याने आरोळी दिली. वृषभाचे रूप घेतलेला तो दुवृत्त राक्षस आपल्या अंगावर वांवून येत आहे असे पाहून कृष्ण कांहीं आपल्या जागेवरून हालला नाही. तो जागच्या जागी अचल पर्वतासारखा स्थिर उभा होता. वृषभाने मान वर करून कृष्णाच्या कारखांवर दृष्टि लावली व त्याचा प्राण घेण्याच्या बद्धीने प्रेरित होऊन त्याने कृष्णाचे अंगावर धाडकन् उडी घातली. कृष्णांजनासारख्या काळ्या व वृषभाप्रमाणे पराक्रमी कृष्णाने तो दुर्घर दैत्य आपल्याकडे चाल करून येत आहे असे पाहून त्याची मान धरली आणि त्याच्याशी झुंज केली. तेव्हां त्या बैलाच्या मुखावाटें फेंस व फांफू असा आवाज निबूं लागला: ओंबी खेळतांना कृष्ण व वृषभासुर यांची शरीरे एकमेकांच्या शरीरांवर आदळत होती; त्या . कारणाने, पावसाळ्यांत एकमेकांवर आदळणाऱ्या मेघांसारखे ते दिसत होते.
लढता लढतां कृष्णाने त्याच्या दोन शिंगांमध्ये पाय देऊन त्याचा गर्व व सामर्थ्य ही पार जिरवून टाकली आणि आर्द्र वस्त्राप्रमाणे त्याचा कंठ ( पोळी ) दाबून पिळून काढला. नंतर यमदंडासारखे असलेले त्या बैलाचे उजवें शिंग उपटून काढून त्याचाच एक तडाखा कृष्णाने त्या वृषभासुराच्या तोंडावर लगावला. तो जोराचा तडाखा बसतांच अरिष्टासुर मरण पावला. आणि तोंड, वशिंड व शिंग ही सर्वे छिन्नविच्छिन्न होऊन तो दानव जलस्रावी मेघाप्रमाणे रक्त ओकत जमिनीवर पडला. मत्त झालेल्या बैलाचा गोविंदाने विध्वंस केला असें पहातांच, " शाबास, शावास " असे शब्द भूतमात्रांच्या तोंडून बाहेर पडले व प्रत्येकानें या अद्भुत करणीबद्दल कृष्णाची स्तुति आरंभिली.
याप्रमाणे वृषाभाची वाट लावल्यानंतर पुनरपि कमललोचन कृष्णाने रमणीय चांदण्यातील पूर्वरात्री. आपले खेळ खेळावयास सुरवात केली. सर्व गोपाळांनाही भयनाशमामुळे आनंद झाला आणि देव जशी इंद्राची सेवा करितात, त्याप्रमाणे ते कमलेक्षण कृष्णाची उपासना करूं लागले.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि वृषभासुरवधे एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥
अध्याय एकविसावा समाप्त
GO TOP
|