श्रीहरिवंशपुराण विष्णुपर्व प्रथमोऽध्यायः
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥
वैशम्पायन उवाच
ज्ञात्वा विष्णुं क्षितिगतं भागांश्च त्रिदिवौकसाम् ।
विनाशशंसी कंसस्य नारदो मथुरां ययौ ॥ १ ॥
त्रिविष्टपादापतितो मथुरोपवने स्थितः ।
प्रेषयामास कंसस्य दूतं स मुनिपुङ्गवः ॥ २ ॥
स दूतः कथयामास मुनेरागमनं वने ।
स नारदस्यागमनं श्रुत्वा त्वरितविक्रमः ॥ ३ ॥
निर्जगामासुरः कंसः स्वपुर्या पद्मलोचनः ।
स ददर्शातिथिं श्लाघ्यं देवर्षिं वीतकल्मषम् ॥ ४ ॥
तेजसा ज्वलनाकारं वपुषा सूर्यवर्चसम् ।
सोऽभिवाद्यर्षये तस्मै पूजां चक्रे यथाविधि ॥ ५ ॥
आसनं चाग्निवर्णाभं विसृज्योपजहार सः ।
निषसादासने तस्मिन् स वै शक्रसखो मुनिः ॥ ६ ॥
उवाच चोग्रसेनस्य सुतं परमकोपनम् ।
पूजितोऽहं त्वया वीर विधिदृष्टेन कर्मणा ॥ ७ ॥
गते त्वेवं मम वचः श्रूयतां गृह्यतां त्वया ।
अनुसृत्य दिवोलोकानहं ब्रह्मपुरोगमान् ॥ ८ ॥
गतः सूर्यसखं तात विपुलं मेरुपर्वतम् ।
सनन्दवनं चैव दृष्ट्वा चैत्ररथं वनम् ॥ ९ ॥
आप्लुतं सर्वतीर्थेषु सरित्सु सह दैवतैः ।
दिव्या त्रिधारा दृष्टा मे पुण्या त्रिपथगा नदी ॥ १० ॥
स्मरणादेव सर्वेषामंहसां या विभेदिनी ।
उपस्पृष्टं च तीर्थेषु दिव्येषु च यथाक्रमम् ॥ ११ ॥
दृष्टं मे ब्रह्मसदनं ब्रह्मर्षिगणसेवितम् ।
देवगन्धर्वनिर्घोषैरप्सरोभिश्च नादितम् ॥ १२ ॥
सोऽहं कदाचित् देवानां समाजे मेरुमूर्धनि ।
संगृह्य वीणा संसक्तामगच्छं ब्रह्मणः सभाम् ॥ १३ ॥
सोऽहं तत्रसितोष्णीषान् नानारत्नविभूषितान् ।
दिव्यासनगतान् देवानपश्यं सपितामहान् ॥ १४ ॥
तत्र मन्त्रयतामेवं देवतानां मया श्रुतः ।
भवतः सानुगस्यैव वधोपायः सुदारुणः ॥ १५ ॥
तत्रैषा देवकी या ते मथुरायां लघुस्वसा ।
योऽस्यां गर्भोऽष्टमः कंस स ते मृत्युर्भविष्यति ॥ १६ ॥
देवानां स तु सर्वस्वं त्रिदिवस्य गतिश्च सः ।
परं रहस्यं देवानां स ते मृत्युर्भविष्यति ॥ १७ ॥
परश्चैवापरस्तेषां स्वयम्भूश्च दिवौकसाम् ।
ततस्ते तन्महद्भूतं दिव्यं च कथयाम्यहम् ॥ १८ ॥
श्लाघ्यश्च स हि ते मृत्युर्भूतपूर्वश्च तं स्मर ।
यत्नश्च क्रियतां कंस एवक्या गर्भकृन्तने ॥ १९ ॥
एषा मे द्वद्गता प्रीतिर्यदर्थं चाहमागतः ।
भुज्यन्तां सर्वकामार्थाः स्वस्ति तेऽस्तु व्रजाम्यहम् ॥ २० ॥
इत्युक्त्वा नारदे याते तस्य वाक्यं विचिन्तयन् ।
जहासोच्चैस्ततः कंसः प्रकाशदशनश्चिरम् ॥ २१ ॥
प्रोवाच सस्मितं चैव भृत्वानामग्रतः स्थितः ।
हास्यः खलु स सर्वेषु नारदो न विशारदः ॥ २२ ॥
नाहं भीषयितुं शक्यो देवैरपि सवासवैः ।
आसनस्य शयानो वा प्रमत्तो मत्त एव च ॥ २३ ॥
योऽहं दोर्भ्यामुदाराभ्यां क्षोभयेयं धरामिमाम् ।
कोऽस्ति मां मानुषे लोके यः क्षोभयितुमुत्सहेत् ॥ २४ ॥
अद्यप्रभृति देवानामेष देवानुवर्तिनाम् ।
नृपक्षिपशुसंघानां करोमि कदनं महत् ॥ २५ ॥
आज्ञाप्यतां हयः केशी प्रलम्बो धेनुकस्तथा ।
अरिष्टो वृषभश्चैव पूतना कालियस्तथा ॥ २६ ॥
अटध्वं पृथिवीं कृत्स्नां यथेष्टं कामरूपिणः ।
प्रहरध्वं च सर्वेषु येऽस्माकं पक्षदूषकाः ॥ २७ ॥
गर्भस्थानामपि गतिर्विज्ञेया चैव देहिनाम् ।
नारदेन हि गर्भेभ्यो भय नः समुदाहृतम् ॥ २८ ॥
भवन्तो हि यथाकामं मोदन्तां विगतज्वराः ।
मां च वो नाथमाश्रित्य नास्ति देवकृतं भयम् ॥ २९ ॥
स तु केलिकिलो विप्रो भेदशीलश्च नारदः ।
सुश्लिष्टानपि लोकेऽस्मिन् भेदयँल्लभते रतिम् ॥ ३० ॥
कण्डूयमानः सततं लोकानटति चञ्चलः ।
घटमानो नरेन्द्राणां तन्त्रैवराणि चैव हि ॥ ३१ ॥
एवं स विलपन्नेव वाङ्मात्रेणैव केवलम् ।
विवेश कंसो भवनं दह्यमानेन चेतसा ॥ ३२ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि
नारदागमने कंसवाक्ये प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
नारदाचें आगमन -
मंगलाचरण -
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।
देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ॥ १ ॥
वैशंपायन सांगतात : - भगवान् विष्णु व इतर देवांचे अंश हे अवतार धरून मृत्युलोकीं गेले. हें समजतांच कंसाला त्याचे भावी मृत्यूविषयीं बातमी देण्याच्या हेतूनें नारदमुनि स्वर्गातून मथुरानगरीच्या बाहेरील बागांत उतरले; व तेथून त्यांनीं उग्रसेनाचा पुत्र कंस याजकडे दूत पाठविला. त्यानें नारदमुनि उपवनांत उतरले आहेत म्हणून कंसाला सांगितलें. नारदागमनाची वार्ता ऐकतांच तो विशाल नेत्रांचा असुर कंस जलद पावलानें आपल्या नगरींतून बाहेर पडला. उपवनांत येतांच, स्वरूपानें अग्नीप्रमाणें, कांतीनें सूर्य, असे निष्कलंक व सर्वास श्र्लाघ्य, ते देवर्षि नारद त्याचे दृष्टीस पडले. त्यांस पाहातांच वंदन व यथाविधी पूजन करून त्यांस बसण्याकरितां अग्नितुल्य उज्ज्वल असें आसन त्यानें दिलें. नंतर इंद्रमित्र नारद त्या आसनावर बसले व उग्रसेनाच्या त्या परमकोपिष्ट पुत्रास म्हणाले, "हे वीरा, माझें यथाविधी पूजन करून तूं मला संतुष्ट केलें आहेस, त्या अर्थी तुझे हिताची गोष्ट मला सांगणे आलें. करितां ती गोष्ट ऐकून तूं मनांत बाळग."
" या वेळी मीं ब्रह्मलोक व प्रमुख स्वर्गातील बहुतेक सर्व लोक फिरत फिरत इंद्राचे नंदनवन तसेंच कुबेराचें चित्ररथवन पाहात सूर्याचा प्रिय मित्र जो विशाल मेरुपर्वत त्याप्रत प्राप्त झालों. वाटेंत ज्या ज्या नद्या व तीर्थें लागलीं त्यांत इतर देवतांसह मीं स्नानें केली. वाटेत, स्मरणानेंच सर्व पातकांचा उच्छेद करणारी व तीन धारांनीं वाहणारी पवित्र गंगानदी मला लागली; तिचें व अन्य तीर्थांचेंही क्रमाक्रमानें उपस्पर्शन करीत करीत मी ब्रह्मलोकीं आलों. तेथें ब्रह्मर्षींचे थवेचे थवे असन गंधर्वांचीं सुस्वर गायनें, व अप्सरांची नर्तनें सर्वत्र चालू होतीं. मेरु पर्वतावर असतांना मी एक दिवस माझी वीणा नीट सुरावर लावून देवांचा समाज जमला होता तेथें गेलों. तेथें दिव्यासनावर बसलेले, नानारत्नांनीं भूषित व पांढरी शुभ्र पागोटीं घातलेले असे देवगण ब्रह्मदेवासह जमलेले दृष्टीस पडले. हळूच ऐकतों तों त्यांचीं खलबतें चाललीं होतीं, व त्यांचा मतलब तुझ्या अनुचरांसह तुझा वध मोठ्या जहाल उपायांनीं करावयाचा असा होता. त्यांतला मुख्य भाग म्हटला म्हणजे तुझी देवकी जी धाकटी बहीण मथुरेंत आहे तिचे पोटीं जो आठवा गर्भ निपजेल तो तुझा काळ होणार. कारण, हा आठवा गर्भ' म्हणजे सामान्य नव्हे. तो सर्व देवांचें मुख्य निधान, स्वर्गाचा आधार, सर्व वेदांचें गुह्य, देवांस स्वर्ग किंवा मोक्ष वाटेल तें देणारा, व केवळ आपले आपणच उत्पन्न होणारा, असा आहे. असो, आतां मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगतों. ती अशी कीं, असल्या पुरुषाचे हातून तूं मरणे ही गोष्ट एका अर्थी तुला भूषणावहच आहे. हेंही ठरून चुकलें आहे. तथापि, 'श्वास तो आस’म्हणून म्हण आहे. त्याप्रमाणें स्वरक्षणाचा प्रयत्न केलाच पाहिजे. तर माझे मतें तूं देवकीचे गर्भ छाटण्याचा यत्न सुरू ठेव. म्हणजे कदाचित् अरिष्ट टळेलही. मी इतके दूर तंगड्यातोड करीत आलों याला केवळ कारण म्हणजे तुजवरील माझें प्रेमच होय. करितां सावध रहा, आणि आनंदाने यथेच्छ सुखविलास भोग. असो; तुझे कल्याण असो; आतां मी जातो."
याप्रमाणें सांगून नारदमुनि गेल्यावर त्यांचे शब्दांचा विचार करीत असतांना तो कंसासुर दांताड्या बाहेर काढून कोण वेळचा मोठमोठ्यानें हसतच सुटला. नंतर आपल्या नोकरांच्या पुढें उभा राहून व किंचित् स्मित करून म्हणाला, "अरे, हा नारद म्हणजे कांहीं अट्टलांतला नव्हे. सर्व देवांचें खेळणें आहे; ते मौजेखातर त्याला कांहीं तरी थाप देतात, आणि हें वेडें ती खरी समजून घाबरून जातें. त्याला बापड्याला काय ठाऊक कीं, हा कंस आपल्या या दोन विशाल बाहुंचे बलानें ही सर्व पृथ्वी हालवून सोडील; व निजला असो, बसला असो, शुद्धीवर असो किंवा गाफिल असो, कोणत्याही स्थितींत इंद्रासह सर्व देव येऊन पडले तरी डरणार नाहीं. या मृत्युलोकांत तर माझे वाटेस जाण्याची कोणाची छाती नाहींच. शिवाय म्हणावे आजपासून आतां हीच प्रतिज्ञा कीं देव, तसेंच त्यांचे अनुयायी, मग ते मनुष्य, पशु, पक्षी, कोणीही असोत, सर्वांचें काण्डात काढितों. बरें आहे. दूतहो, आपले केशी, प्रलंब, धेनुक, अरिष्ट, वृषभ, पूतना, कालियप्रभृति मंडळीला माझी आज्ञा सांगा कीं, वाटेल तशी रूपें घेऊन तुम्ही सर्व पृथ्वीभर यथेच्छ भ्रमण करा; वर आमचे जे म्हणून प्रतिपक्षी आढळतील त्यांस हाणून पाडा. शिवाय नारदानें गर्भापासून मला भय सांगितलें असल्यानें स्त्रियांचे गर्भाचीही तपासणी ठेवीत चला. मी तुमचा मालक असल्यावर देवांचें देखील तुम्हांला भय नाहीं. करितां तुम्ही निश्चिंत चैन उडवा, व वाटेल तशी दंगल चालूं द्या. मला त्या नारदाचे कांहीं खरें वाटत नाहीं. तो बेटा नसेल तेथें खाजवून खरूज काढील; त्याला चैनच पडत नाहीं. कोणी किती दाट गट्टीचे मित्र असतना, या बेट्याला चहाड्या करून त्यांच्यांत वैर पाडल्याशिवाय जेवणच गोड लागत नाहीं, असला हा कलहप्रिय ब्राह्मण आहे. मोठा हूड, वारा मुलूख पालथे घालून राजे लोकांत नसती कळ लावून तंटे उभे करील. हा स्वभावच याचा. तेव्हां त्याचें बोलणे विशेष जमा धरण्यासारखें कोणी समजू नये; व निर्भय असावें."
याप्रमाणे अंतर्यामीं संतापानें लाल होऊन जाऊन व बाह्यतः वरीलप्रमाणें तोंडाची वटवट करीत करीत तो कंस आपले मंदिरांत गेला.
इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि नारदागमनं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
अध्याय पहिला समाप्त
GO TOP
|