श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व त्रयस्त्रिंशोऽध्यायः
यदुवंशवर्णनं कार्तवीर्योत्पत्तिश्च
वैशम्पायन उवाच
बभूवुस्तु यदोः पुत्राः पञ्च देवसुतोपमाः ।
सहस्रदः पयोदश्च क्रोष्टा नीलोऽञ्जिकस्तथा ॥ १ ॥
सहस्रदस्य दायादास्त्रयः परमधार्मिकाः ।
हैहयश्च हयश्चैव राजन् वेणुहयस्तथा ॥ २ ॥
हैहस्याभवत् पुत्रो धर्मनेत्र इति स्मृतः ।
धर्मनेत्रस्य कार्तस्तु साहञ्जस्तस्य चात्मजः ॥ ३ ॥
साहञ्जनी नाम पुरी येन राज्ञा निवेशिता ।
साहञ्जस्य तु दायादो महिष्मान्नाम पार्थिवः ॥ ४ ॥
माहिष्मती नाम पुरी येन राज्ञा निवेशिता ।
आसीन्माहिष्मतः पुत्रो भद्रश्रेण्यः प्रतापवान् ॥ ५ ॥
वाराणस्यधिपो राजा कतिथः पूर्वमेव तु ।
भद्रश्रेण्यस्य पुत्रस्तु दुर्दमो नाम विश्रुतः ॥ ६ ॥
दुर्दमस्य सुतो धीमान्कनको नाम वीर्यवान् ।
कनकस्य तु दायादाश्चत्वारो लोकविश्रुताः ॥ ७ ॥
कृतवीर्यः कृतौजाश्च कृतवर्मा तथैव च ।
कृताग्निस्तु चतुर्थोऽभूत् कृतवीर्यात् तथार्जुनः ॥ ८ ॥
यस्तु बाहुसहस्रेण सप्तद्वीपेश्वरोऽभवत् ।
जिगाय पृथिवीमेको रथेनादित्यवर्चसा ॥ ९ ॥
स हि वर्षायुतं तप्त्वा तपः परमदुश्चरम् ।
दत्तमाराधयामास कार्तवीर्योऽत्रिसम्भवम् ॥ १० ॥
तस्मै दत्तो वरान् प्रादाच्चतुरो भूरितेजसः ।
पूर्वं बाहुसहस्रं तु प्रार्थितं सुमहद्वरम् ॥ ११ ॥
अधर्मे वर्तमानस्य सद्भिस्तत्र निवारणम् ।
उग्रेण पृथिवीं जित्वा स्वधर्मेणानुरञ्जनम् ॥ १२ ॥
संग्रामान् सुबहून् कृत्वा हत्वा चारीन् सहस्रशः ।
संग्रामे वर्तमानस्य वधं चाप्यधिकाद् रणे ॥ १३ ॥
तस्य बाहुसहस्रं तु युध्यतः किल भारत ।
योगाद् योगेश्वरस्यैव प्रादुर्भवति मायया ॥ १४ ॥
तेनेयं पृथिवी सर्वा सप्तद्वीपा सपत्तना ।
ससमुद्रा सनगरा उग्रेण विधिना जिता ॥ १५ ॥
तेन सप्तसु द्वीपेषु सप्त यज्ञशतानि वै ।
प्राप्तानि विधिना राज्ञा श्रूयन्ते जनमेजय ॥ १६ ॥
सर्वे यज्ञा महाबाहोस्तस्यासन् भूरिदक्षिणाः ।
सर्वे काञ्चनयूपाश्च सर्वे काञ्चनवेदयः ॥ १७ ॥
सर्वैर्देवैर्महाराजा विमानस्थैरलङ्कृताः ।
गन्धर्वैरप्सरोभिश्च नित्यमेवोपशोभिताः ॥ १८ ॥
यस्य यज्ञे जगौ गाथां गन्धर्वो नारदस्तथा ।
वरीदासात्मजो विद्वान् महिम्ना तस्य विस्मितः ॥ १९ ॥
नारद उवाच
न नूनं कार्तवीर्यस्य गतिं यास्यान्ति पार्थिवाः ।
यज्ञैर्दानैस्तपोभिर्वा विक्रमेण श्रुतेन च ॥ २० ॥
स हि सप्तसु द्वीपेषु खड्गी चर्मी शरासनी ।
रथी द्वीपाननुचरन् योगी संदृश्यते नृभिः ॥ २१ ॥
अनष्टद्रव्यता चैव न शोको न च विभ्रमः ।
प्रभावेण महाराज्ञः प्रजा धर्मेण रक्षतः ॥ २२ ॥
पञ्चाशीतिसहस्राणि वर्षाणां वै नराधिपः ।
स सर्वरत्नभाक् सम्राट् चक्रवर्ती बभूव ह ॥ २३ ॥
स एव यज्ञपालोऽभूत् क्षेत्रपालः स एव च ।
स एव वृष्ट्यां पर्जन्यो योगित्वादर्जुनोऽभवत् ॥ २४ ॥
स वै बाहुसहस्रेण ज्याघातकठिनत्वचा ।
भाति रश्मिसहस्रेण शरदीव दिवाकरः ॥ २५ ॥
स हि नागान् मनुष्येषु माहिष्मत्यां महाद्युतिः ।
कर्कोटकसुताञ्जित्वा पुर्यां तस्यां न्यवेशयत् ॥ २६ ॥
स वै वेगं समुद्रस्य प्रावृट्कालेऽम्बुजेक्षणः ।
क्रीडन्निव भुजोद्भिन्नं प्रतिस्रोतश्चकार ह ॥ २७ ॥
लुण्ठिता क्रीडिता तेन फेनस्रग्दाममालिनी ।
चलदूर्मिसहस्रेण शङ्किताभ्येति नर्मदा ॥ २८ ॥
तस्य बाहुसहस्रेण क्षुभ्यमाणे महोदधौ ।
भयान्निलीना निश्चेष्टाः पातालस्था महासुराः ॥ २९ ॥
चूर्णीकृतमहावीचिं चलमीनमहातिमिम् ।
मारुताविद्धफेनौघमावर्तक्षोभदुःसहम् ॥ ३० ॥
प्रावर्तयत् तदा राजा सहस्रेण च बाहुना ।
देवासुरसमाक्षिप्तः क्षीरोदमिव मन्दरः ॥ ३१ ॥
मन्दरक्षोभचकिता अमृतोद्भवशङ्किताः ।
सहसोत्पतिता भीता भीमं दृष्ट्वा नृपोत्तमम् ॥ ३२ ॥
नता निश्चलमूर्धानो बभूवुस्ते महोरगाः ।
सायाह्ने कदलीखण्डैः कम्पितास्तस्य वायुना ॥ ३३ ॥
स वै बद्ध्वा धनुर्ज्याभिरुत्सिक्तं पञ्चभिः शरैः ।
लङ्केशं मोहयित्वा तु सबलं रावणं बलात् ।
निर्जित्यैव समानीय माहिष्मत्यां बबन्ध तम् ॥ ३४ ॥
श्रुत्वा तु बद्धं पौलस्त्यं रावणं त्वर्जुनेन तु ।
ततो गत्वा पुलस्त्यस्तमर्जुनं ददृशे स्वयम् ।
मुमोच रक्षः पौलस्त्यं पुलस्त्येनानुयाचितः ॥ ३५ ॥
यस्य बाहुसहस्रस्य बभूव ज्यातलस्वनः ।
युगान्ते त्वम्बुदस्येव स्फुटतो ह्यशनेरिव ॥ ३६ ॥
अहो बत मृधे वीर्यं भार्गवस्य यदच्छिनत् ।
राज्ञो बाहुसहस्रं तु हैमं तालवनं यथा ॥ ३७ ॥
तृषितेन कदाचित् स भिक्षितश्चित्रभानुना ।
स भिक्षामददाद् वीरः सप्तद्वीपान्विभावसोः ॥ ३८ ॥
पुराणि ग्रामघोषांश्च विषयांश्चैव सर्वशः ।
जज्वाल तस्य सर्वाणि चित्रभानुर्दिधक्षया ॥ ३९ ॥
स तस्य पुरुषेन्द्रस्य प्रभावेन महात्मनः ।
ददाह कार्तवीर्यस्य शैलांश्चैव वनानि च ॥ ४० ॥
स शून्यमाश्रमं रम्यं वरुणस्यात्मजस्य वै ।
ददाह वनवद् भीतश्चित्रभानुः सहैहयः ॥ ४१ ॥
यं लेभे वरुणः पुत्रं पुरा भास्वन्तमुत्तमम् ।
वसिष्ठं नाम स मुनिः ख्यात आपव इत्युत ॥ ४२ ॥
यत्रापवस्तु तं क्रोधाच्छप्तवानर्जुनं विभुः ।
यस्मान्न वर्जितमिदं वनं ते मम हैहय ॥ ४३ ॥
तस्मात् ते दुष्करं कर्म कृतमन्यो हनिष्यति ।
रामो नाम महाबाहुर्जामदग्न्यः प्रतापवान् ॥ ४४ ॥
छित्त्वा बहुसहस्रं ते प्रमथ्य तरसा बली ।
तपस्वी ब्राह्मणश्च त्वां वधिष्यति स भार्गवः ॥ ४५ ॥
वैशम्पायन उवाच
अनष्टद्रव्यता यस्य बभूवामित्रकर्शन ।
प्रभावेण नरेन्द्रस्य प्रजा धर्मेण रक्षतः ॥ ४६ ॥
रामात् ततोऽस्य मृत्युर्वै तस्य शापान्मुनेर्नृप ।
वरश्चैव हि कौरव्य स्वयमेव वृतः पुरा ॥ ४७ ॥
तस्य पुत्रशतस्यासन्पञ्च शेषा महात्मनः ।
कृतास्त्रा बलिनः शूरा धर्मात्मानो यशस्विनः ॥ ४८ ॥
शूरसेनश्च शूरश्च धृष्टोक्तः कृष्ण एव च ।
जयध्वजश्च नाम्नाऽऽसीदावन्त्यो नृपतिर्महान् ॥ ४९ ॥
कार्तवीर्यस्य तनया वीर्यवन्तो महारथाः ।
जयध्वजस्य पुत्रस्तु तालजङ्घो महाबलः ॥ ५० ॥
तस्य पुत्राः शतं ख्यातास्तालजङ्घा इति श्रुताः ।
तेषां कुले महाराज हैहयानां महात्मनाम् ॥ ५१ ॥
वीतिहोत्राः सुजाताश्च भोजाश्चावन्तयः स्मृताः ।
तौण्डिकेरा इति ख्यातास्तालजङ्घास्तथैव च ॥ ५२ ॥
भरताश्च सुता जाता बहुत्वान्नानुकीर्तिताः ।
वृषप्रभृतयो राजन् यादवाः पूर्णकर्मिणः ॥ ५३ ॥
वृषो वंशधरस्तत्र तस्य पुत्रोऽभवन्मधुः ।
मधोः पुत्रशतं त्वासीद् वृषणस्तस्य वंशभाक् ॥ ५४ ॥
वृषणाद् वृष्णयः सर्वे मधोस्तु माधवाः स्मृताः ।
यादवा यदुना चाग्रे निरुच्यन्ते च हैहयाः ॥ ५५ ॥
न तस्य वित्तनाशोऽस्ति नष्टं प्रतिलभेच्च सः ।
कार्तवीर्यस्य यो जन्म कीर्तयेदिह नित्यशः ॥ ५६ ॥
एते ययातिपुत्राणां पञ्च वंशा विशाम्पते ।
कीर्तिता लोकवीराणां ये लोकान् धारयन्ति वै ॥ ५७ ॥
भूतानीव महाराज पञ्च स्थावरजङ्गमान् ।
श्रुत्वा पञ्चविसर्गं तु राजा धर्मार्थकोविदः ॥ ५८ ॥
वशी भवति पञ्चानामात्मजानां तथेश्वरः ।
लभेत्पञ्च वरांश्चैव दुर्लभानिह लौकिकान् ॥ ५९ ॥
आयुः कीर्तिं तथा पुत्रानैश्वर्यं भूमिमेव च ।
धारणाच्छ्रवणाच्चैव पञ्चवर्गस्य भारत ॥ ६० ॥
क्रोष्टोस्तु शृणु राजेन्द्र वंशमुत्तमपौरुषम् ।
यदोर्वंशधरस्याथ यज्वनः पुण्यकर्मणः ॥ ६१ ॥
क्रोष्टुर्हि वंशं श्रुत्वेमं सर्वपापैः प्रमुच्यते ।
यस्यान्ववायजो विष्णुर्हरिर्वृष्णिकुलोद्वहः ॥ ६२ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
हरिवंशपर्वणि त्रयस्त्रिंशोऽध्यायः
यदुवंश व कार्तवीर्यार्जुनोत्पत्ति -
वैशंपायन सांगतात - या यदूला देवकुमारांसारखे असे पांच पुत्र झाले. त्यांचीं नांवे - सहस्रद, पयोद, क्रोष्टा, नील व अंजिक. पैकीं सहस्रदाला परम धार्मिक असे तीन पुत्र झाले. त्यांचीं नांवें - हैहय, हय व वेणुहय. पैंकीं हैहयाला धर्मनेत्र हा पुत्र झाला; त्याला पुढें कार्त झाला; कार्ताला पुढें साहञ्ज पुत्र झाला. या राजानें साहञ्चनी नांवाची नगरी वसविली. या साहंज्याचा पुत्र राजा महिष्मान यानें जी पुरी वसविली तिला माहिष्मती असें म्हणतात. या महिष्मानाला भद्रश्रेण्य नांवाचा प्रतापी पुत्र झाला, व तो वाराणशीचा राजा होता, हें पूर्वींच सांगितलें आहे. या भद्रश्रेण्याला दुर्दम नामक विख्यात पुत्र होता. दुर्दमाला पुढें मोठा वीर्यशाली व बुद्धिवान कनक हा पुत्र झाला. या कनकाला लोकविख्यात असें चार पुत्र होते. त्यांचीं नांवें - कृतवीर्य, कृतौजा, कृतवर्मा व कृताग्नि हा चवथा. पैकीं कृतवीर्याला अर्जुन नामक पुत्र झाला; याला सहस्त्र बाहू होते. त्यांच्या बळावर त्यानें एकट्यानें सूर्यतुल्य तेजस्वी अशा रथांत बसून सप्तद्वीप पृथ्वी जिंकून तिची मालकी पटकाविली. या अर्जुनानें प्रथम अत्रिपुत्र जे दत्तात्रय त्यांचे आराधनानिमित्त अयुत वर्षेपर्यंत परम दुश्चर असें तप केलें. तेव्हां दत्तांनीं प्रसन्न होऊन अत्यंत तेजस्वी असे चार वर दिले. त्यांपैकीं पहिल्या प्रथम आपणास सहस्त्र बाहू असावेत, हें त्यानें मागितलें. दुसर्या वरानें आपण अधर्माकडे वळूं लागल्यास सज्जनांनी आपलें निवारण करावें असें मागितलें. तिसर्यानें प्रथम उग्र क्षत्रिय तेजानें सर्व पृथ्वी जिंकून मग मी पालक या नात्यानें प्रजेला राजीखुषींत ठेवावें असें मागितलें, व चवथ्यानें, मीं शेंकडों लढाया कराव्या, हजारों योद्धे मारावें व अखेर लढतां लढतांच रणभूमीवर कोणातरी वरिष्ठ योद्ध्याच्या हातून मला मृत्यू यावा, असें मागून घेतलें. हे राजा, याच्या सहस्त्र बाहूंची गंमत अशी होती कीं, तो लढाईस उभा राहिला, म्हणजे एखाद्या निष्णात योग्याप्रमाणें नुसत्या संकल्पबलानेंच त्याला सहस्त्र बाहू उत्पन्न होत. यामुळें ही एवढी सप्तद्वीप पृथ्वी, परंतु, तीवरील सर्व नगरें, शहरें, समुद्र यांसह ती त्यानें आपल्या उग्र तेजानें तेव्हांच जिंकिली. हे राजा, आम्ही असें ऐकतों कीं, त्यानें सात द्वीपांत मिळून यथाविधि सातशें यज्ञ केले; व या सर्व यज्ञांमध्यें रेलचेल दक्षणा दिली. या सर्व यज्ञांत कांचनाचे यज्ञस्तंभ होते, व यज्ञवेदीही कांचनमयच होत्या. तो सोहाळा पाहाण्यासाठी सर्व देव विमानांत बसून येत. गंधर्व आणि अप्सरा या सदासर्वदा त्या समारंभास शोभा आणीत. फार काय सांगावे, या यज्ञाचा थाट पाहून वरीदास नामक गंधर्वाचा पुत्र अगदीं चकित होऊन गेला. त्यानें व नारदऋषि यांनी मिळून त्या यज्ञाची प्रशंसा श्लोकांनी गाईली.
नारद म्हणाला - कोणी ही राजे झाले, तरी त्यांना यज्ञांत, दानांत, तपांत, पराक्रमांत किंवा विद्येंत, या कार्तवीर्यार्जुनाची बरोबरी येणारच नाहीं. याचें योगबल असें विलक्षण आहे कीं, हा एकाच वेळीं सातही द्वीपांत खड्ग, चर्म व धनुष्य घेऊन रथांत बसून चालला आहे, असें लोकांनीं पाहिले आहे. शिवाय हा यथान्याय प्रजापालन करीत असतां याच्या प्रभावानें प्रजेला कधीं भूल पडली नाहीं, कधीं दुःख झालें नाहीं किंवा कधीं पैशाची तूट पडली नाहीं. पंचायशी हजार वर्षेपर्यंत हा या पृथ्वीवरील सर्व जातींच्या रत्नांचा मालक असून सम्राट चक्रवर्ति होता. यज्ञादिकांत यजमानही तोच होता, व पृथ्वीचा पालकही तोच होता. अंगांत योगसामर्थ्य असल्यानें तो आपणच होऊन पर्जन्याच्या रूपानें वृष्टि करी. धनुष्याच्या दोरीच्या छेडण्यानें ज्यांची त्वचा कठीण झाली आहे अशा आपल्या सहस्त्र बाहूंच्या योगानें तो आकाशांतील शरदऋतूंतील सहस्रकर सूर्यासारखा शोभत होता. त्यानें कर्कोटकनागाचे पुत्र जे सर्व नाग त्यांस जिंकून त्यांच्या माहिष्मती नामक नगरींत आपली मनुष्यांची वस्ती करविली. त्या कमलनेत्र अर्जुनानें वर्षाकाळीं समुद्रांत क्रीडा करीत असतां आपल्या सहस्त्र भुजांच्या योगानें समुद्राचा ओघ भेदून त्याचे एक हजार निरनिराळे ओघ केले. त्याचप्रमाणें तो नर्मदेमध्यें खेळत असतां व अवगाहन करीत असतां नर्मदा नदी एखाद्या भ्यालेल्या मनुष्याप्रमाणें हजारों तरंगांनीं (पक्षीं विचारांनी) युक्त होत्साती त्याचा सत्कार करण्यासाठीं आपल्या फेनाची (फेसाची) शुभ्र मालिका याच्या कंठांत घालीत असे. तो समुद्रांत उतरून आपल्या हजार बाहूंनीं समुद्र ढवळूं लागला, म्हणजे पाताळांतील मोठमोठाले असुर भयानें निचेष्ट होऊन दडून राहात. ज्याप्रमाणें मंथनकालीं देव व असुर यांनी मंदर नामक पर्वत हा मंथनदंड कल्पून समुद्रांत घातला असतां क्षीरसमुद्राची दशा झाली, त्याचप्रमाणें हा सहस्रार्जुन आपल्या हजार बाहूंच्या योगानें त्या समुद्राची दशा करून सोडी. ती अशी - समुद्रांत उठणार्या पर्वतप्राय लाटा तो आपल्या हाताच्या तडाक्यांनीं चुरडून टाकी. तिमिंगलादिक जलचरांची धांवपळ उडवून देई, व समुद्राच्या फेसाचे पुंजके हवेंत वार्याप्रमाणें फेंकून देई, आणि हजारों हजार भोंवरे उत्पन्न करून त्या समुद्राचा वेग दुःसह करून सोडी. त्या भयप्रद नृपश्रेष्ठ सहस्त्रबाहूला पाहून मोठमोठाले सर्प हा अमृत निर्माण करण्यासाठीं मंदराचलच समुद्राचें घुसळण करीत आहे कीं काय अशी शंका येऊन एकाएकीं पाण्यांतून चमकून उठत, व त्याजपुढें नम्र होऊन खालीं फणा टेकून निश्चल पडत; आणि सायंकालच्या वेळीं एखाद्या कदलीवनांत वायु उसळला असतां त्या वनाची जशी वाताहत होते, त्याप्रमाणें त्या सर्पांची दशा उडून जाई. लंकेचा राजा रावण याला आपल्या शक्तीबद्दल मोठाच गर्व झाला. हें ऐकून सहस्रार्जुनानें त्याला पांच बाणांनीं जिंकून व मूर्च्छागत करून आपल्या धनुष्याच्या दोर्यांनी आंवळून सैन्यासह आपल्या माहिष्मती राजधानींत आणून कैदेंत ठेविलें.
आपला पुत्र रावण यास सहस्रार्जुनानें बंदींत टाकले ही वार्ता कानी येतांच पुलस्त्यमुनींनीं स्वतः सहस्रार्जुनाकडे जाऊन त्याची भेट घेऊन आपल्या पुत्राबद्दल रदबदली केली; तेव्हां त्या अर्जुनानें रावणाला मोकळें सोडून दिलें. तो सहस्रार्जुन ज्या वेळीं आपल्या सहस्रही बाहूंनीं अनेक धनुष्यांच्या दोर्या एकाच कालीं ओढी, त्या वेळीं त्याचा होणारा टणत्कार प्रलयकाळींच्या मेघांच्या कडकडाटाचाच भास उत्पन्न करी; इतका पराक्रमी सहस्रार्जुन होता, पण भृगुकुलोत्पन्न परशुरामाने युद्धांत त्याचें तें सुवर्णालंकारांनी युक्त असें सहस्त्र बाहूंचे वन एखाद्या तालवनाप्रमाणें खडाखड खडसून टाकिलें. तेव्हां असल्या परशुरामाचे शौर्याची सहस्रबाहूंपेक्षांही धन्य म्हटली पाहिजे.
एकाकालीं अग्नीला भूक लागल्यामुळे आपणांस काही पोटास द्यावें म्हणून त्यानें सहस्रार्जुनाजवळ याचना केली. त्या वेळीं त्या वीरानें अग्नीला सातहीं द्वीपें बक्षीस दिली; मग अग्नीनें वखवखून जाऊन त्या अर्जुनाच्या राज्यांतल्या चारी मुलखांतील नगरें, गांवें, खेडीं, वगैरे जाळून फस्त केलीं. शिवाय, अर्जुनासारख्याचें पाठबळ असल्यामुळें पर्वत व अरण्येंही जाळून टाकिलीं. हा जाळण्याचा तडाका चालला असतां ज्याला आपव असेंही दुसरें नांव असे, असा जो तेजस्वी व प्रख्यात वरुणपुत्र वसिष्ठ महामुनि त्याचा रमणीय आश्रम खालीं पाहून अग्नि व अर्जुन या दोघांनीं भीत भीत संगनमत करून एखाद्या वनाप्रमाणें जाळून टाकिला. तो प्रकार पाहून समर्थ वसिष्ठ मुनीनें क्रोधानें सहस्रार्जुनाला शाप दिला कीं, हे हैहया, ज्या अर्थीं तूं मजसारख्याचें तपोवनही जाळल्यांवाचून ठेविलें नाहीस त्या अर्थीं तूं इतकेंही अचाट कर्म केलें आहेस. तथापि दुसराच कोणी उठून या तुझ्या सर्व कृतीवर पाणी पाडील. हा दुसरा कोण म्हणशील तर भृगुकुलोत्पन्न जमदग्नीच्या पोटीं आलेला राम नांवाचा एक मोठा दीर्घबाहू, प्रतापी, तपस्वी ब्राह्मण आहे. हा वीर तुला तडाक्यास पालथा घालून तुझे हे हजारही बाहू छाटून तुला यमसदनाची वाट दाखवील.
वैशंपायन सांगतात - हे शत्रुमर्दना, जो राजा धर्मानें प्रजापालन करीत असतां ज्याच्या पराक्रमाचा इतका दरारा होता कीं, त्याच्या प्रजाजनांपैकींही कोणाच्या सुतळीच्या तोड्याचा कोणी अपहार करूं पावत नव्हता. असल्या वीर्यशाली राजाला वसिष्ठ मुनीच्या शापसामर्थ्यानें भार्गवरामाच्या हातून मृत्यू आला. शिवाय या प्रकारचा मृत्यु यावा असा वर सहस्रार्जुनानें आपण होऊनच दत्ताजवळ मागितलाही होता, तो पुरा झाला. या सहस्रार्जुनाला शंभर पुत्र होते. पैकीं त्याच्या पश्चात पांचच शिल्लक राहिले. हे सर्वही अस्त्रपटु, बलाढय, शूर, धर्मात्मे व यशस्वी होते.
यांची नांवें - शूरसेन, शूर, धृष्ट, कृष्ण आणि अवंतीचा राजा जयध्वज. हे सर्वही वीर्यशाली असून महारथीही होते. पुढें जयध्वजाला तालजंघ नांवाचा एक शक्तिमान मुलगा झाला. याला पुढें शंभर पुत्र झाले. या सर्वांनाही तालजंघच म्हणत. हे महाराजा, एकंदरींत या हैहयांच्या वंशांत भिन्न शाखा मिळून वीतिहोत्र, सुजात, भोज, आवंत्य, तौंडिकेर, तसेंच तालजंघ व भरत इत्यादि अनेक कुलें झाली; परंतु, त्या कुलांचा विस्तार बाहुल्यभयास्तव सांगत नाहीं. असो, याप्रमाणें यदूचा प्रथम पुत्र सहस्त्रद याच्या वंशाचें वृत्त येथवर सांगितले. आतां त्याचा दुसरा पुत्र जो पयोद त्याची संतति सांगतो.
या पयोदालाच वृष म्हणत. याच्या वंशांतील जे यादव ते सर्वही मोठे पुण्यकर्मी होते. या सर्वांचा मुख्य पुरुष हा वृष. या वृषाला पुढें मधु नामक पुत्र झाला. मधूला शंभर पुत्र झाले. त्यांपैकीं वृषण नामक जो पुत्र झाला तो वंश चालविणारा निघाला. या वृषणापासून झालेल्या पुढील संततीला वृष्णि म्हणत; किंवा वृषणाच्या बापाचें नांव मधु असल्यामुळें या सर्वांना माधव असेंही म्हणत. तसेंच याचा यदु हा पूर्वज असल्यानें यादव असेंही म्हणत; याखेरीज शूर, शूरवीर आणि शूरसेन या सर्वांचाही हैहय या नांवांत सामान्यत्वानें अंतर्भाव होतो. या सहस्रार्जुनाच्या देशाला शूरसेनच म्हणत. या कार्तवीर्याचें जन्म जो नित्य कीर्तन करील त्याची घे म्हटल्या वस्तु हरवावयाचीच नाही. व हरवलीच तर पुन्हा सांपडेल.
हे राजा, याप्रमाणें यदूच्या या पांचही लोकमान्य वीरपुत्रांचे वंश तुला सांगितले. हे पांचही वंश आकाशादि पंचमहाभूतांप्रमाणें सर्व स्थावरजंगम सृष्टीचें धारण (पालन) करणारे आहेत. जो कोणी धर्मार्थवेत्ता राजा या पांचही यदुपुत्रांची उत्पत्ति व संतति यांचें श्रवण करील किंवा चित्ताचे ठायीं धारण करील त्याची इंद्रियें त्याच्या ताब्यांत रहातील. शिवाय इहलोकांत अत्यंत आवश्यक पण दुर्लभ अशा ज्या आयुष्य, कीर्ति, पुत्रसंतति, ऐश्वर्य व भूमि या पांचही गोष्टी त्या त्याला प्राप्त होतील. हे राजेंद्रा, यदूचा वंश पुढें चालविणारा क्रोष्टु नामक जो पुण्यशील, यज्ञकर्ता व उत्तम वीर्यशाली पुत्र झाला, त्याचें वंशवर्णन तूं आतां ऐक. कारण, वृष्णिकुलधुरंधर जो परमात्मा श्रीविष्णु म्हणजे श्रीकृष्ण तो याच वंशांत जन्मला असल्यामुळें याच्या श्रवणानें श्रोता सर्व पापांपासून मुक्त होतो.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि यदुवंशवर्णनं कार्तवीर्योत्पत्तिश्च नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः ॥ ३३ ॥
अध्याय तेहतिसावा समाप्त
GO TOP
|