श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व द्वादशोऽध्यायः
गालवोत्पत्तिः -
वैशम्पायन उवाच
तस्य पुत्रास्त्रयः शिष्टा दृढाश्वो ज्येष्ठ उच्यते ।
चन्द्राश्वकपिलाश्वौ तु कुमारौ द्वौ कनीयसौ ॥ १ ॥
धौन्धुमारिर्दृढाश्वस्तु हर्यश्वस्तस्य चात्मजः ।
हर्यश्वस्य निकुम्भोऽभूत् क्षत्रधर्मरतः सदा ॥ २ ॥
संहताश्वो निकुम्भस्य पुत्रो रणविशारदः ।
अकृशाश्वः कृशाश्वश्च संहताश्वसुतौ नृप ॥ ३ ॥
तस्य हैमवती कन्या सतां माता दृषद्वती ।
विख्याता त्रिषु लोकेषु पुत्रश्चास्याः प्रसेनजित् ॥ ४ ॥
लेभे प्रसेनजिद् भार्यां गौरीं नाम पतिव्रतां ।
अभिशप्ता तु सा भर्त्रा नदी वै बाहुदाभवत् ॥ ५ ॥
तस्याः पुत्रो महानासीद् युवनाश्वो महीपतिः ।
मान्धाता युवनाश्वस्य त्रिलोकविजयी सुतः ॥ ६ ॥
तस्य चैत्ररथी भार्या शशबिन्दोः सुताभवत् ।
साध्वी बिन्दुमती नाम रूपेणासदृशी भुवि ॥ ७ ॥
पतिव्रता च ज्येष्ठा च भ्रातृणामयुतस्य सा ।
तस्यामुत्पादयामास मान्धाता द्वौ सुतौ नृप ॥ ८ ॥
पुरुकुत्सं तु धर्मज्ञं मुचुकुन्दं च धार्मिकम् ।
पुरुकुत्ससुतस्त्वासीत् त्रसद्दस्युर्महीपतिः ॥ ९ ॥
नर्मदायामथोत्पन्नः सम्भूतस्तस्य चात्मजः ।
सम्भूतस्य तु दायादः सुधन्वा नाम पार्थिवः ॥ १० ॥
सुधन्वनः सुतश्चासीत् त्रिधन्वा रिपुमर्दनः ।
राज्ञस्त्रिधन्वनस्त्वासीद् विद्वांस्त्रय्यारुणः सुतः ॥ ११ ॥
तस्य सत्यव्रतो नाम कुमारोऽभून्महाबलः ।
पाणिग्रहणमन्त्राणां विघ्नं चक्रे सुदुर्मतिः ॥ १२ ॥
येन भार्याहृता पूर्वं ककृतोद्वाहा परस्य वै ।
बाल्यात् कामाच्च मोहाच्च संहर्षाच्चापलेन च ॥ १३ ॥
जहार कन्यां कामात् सः कस्यचित् पुरवासिनः ।
अधर्मशङ्कुना तेन राजा त्रय्यारुणोऽत्यजत् ॥ १४ ॥
अपध्वंसेति बहुशो वदन् क्रोधसमन्वितः ।
पितरं सोऽब्रवित् त्यक्तः क्व गच्छामीति वै मुहुः । १५ ॥
पिता त्वेनमथोवाच श्वपाकैः सह वर्तय ।
नाहं पुत्रेण पुत्रार्थी त्वयाद्य कुलपांसन ॥ १६ ॥
इत्युक्तः स निराक्रामन्नगराद् वचनात् पितुः ।
न च तं वारयामास वसिष्ठो भगवानृषिः ॥ १७ ॥
स तु सत्यव्रतस्तात श्वपाकावसथान्तिके ।
पित्रा त्यक्तोऽवसद् धीरः पिता तस्य वनं ययौ ॥ १८ ॥
ततस्तस्मिंस्तु विषये नावर्षत् पाकशासनः ।
समा द्वादश राजेन्द्र तेनाधर्मेण वै तदा ॥ १९ ॥
दारांस्तु तस्य विषये विश्वामित्रो महातपाः ।
संन्यस्य सागरानूपे चचार विपुलं तपः ॥ २० ॥
तस्य पत्नी गले बद्ध्वा मध्यमं पुत्रमौरसम् ।
शेषस्य भरणार्थाय व्यक्रीणाद् गोशतेन वै ॥ २१ ॥
तं तु बद्धं गले दृष्ट्वा विक्रीयन्तं नृपात्मजः ।
महर्षिपुत्रं धर्मात्मा मोक्षयामास भारत ॥ २२ ॥
सत्यव्रतो महाबाहुर्भरणं तस्य चाकरोत् ।
विश्वामित्रस्य तुष्ट्यर्थ्यमनुकम्पार्थमेव च ॥ २३ ॥
सोऽभवद् गालवो नाम गलबन्धान्महातपाः ।
महर्षिः कौशिकस्तात तेन वीरेण मोक्षितः ॥ २४ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
गालवोत्पत्तौ द्वादशोऽध्यायः
गालवोत्पत्तिवर्णन -
वैशंपायन सांगतात - राक्षसानें मारून कुवलाश्वाचे जे तीन पुत्र उरले त्यांतील दृढाश्व हा ज्येष्ठ होता, असें सांगतात; व चंद्राश्व आणि कपिलाश्व हे दोघे कुमार त्याचे धाकटे भाऊ होते. धुंधुमाराचा जो हा दृढाश्वपुत्र त्याचा पुत्र हर्यश्व म्हणून झाला. या हर्यश्वाला निकुंभ नांवाचा पुत्र झाला. याला लढाईची फार आवड असे. या निकुंभालाही संहताश्व नांवाचा मोठा संग्रामशूर पुत्र झाला. या संहताश्वाचे अकृशाश्व व कृशाश्व असे दोन मुलगे झाले; या संहताश्वाची साधूंना मान्य व त्रैलोक्यांत विख्यात अशी दृषती नांवाची हिमवत् कन्या स्त्री होती. तिजपासून याला प्रसेनजित् नांवाचा पुत्र झाला. या प्रसेनजिताला गौरी नांवाची पतिनिष्ठ स्त्री मिळाली. परंतु पुढें भर्त्याच्या शापानें ही बाहुदा नांवानें प्रसिद्ध असणारी नदी झाली. या गौरीपासून प्रसेनजिताला युवनाश्व नांवाचा एक प्रतापी पुत्र झाला. या युवनाश्चाचे पोटीं त्रैलोक्यांत ज्याचा जयजयकार आहे असा मांधाता नामक प्रसिद्ध राजर्षि जन्मास आला. शशीबिंदूची कन्या चैत्ररथी ती या मांधात्याची स्त्री होती. तिलाच बिंदुमती असेंही नांव असे. ही अत्यंत पतिनिष्ठ असून मोठी सुशील होती व हिच्या रूपाची सर तर त्रिभुवनांत दुसर्या कोणत्याही स्त्रीला नव्हती. असल्या स्त्रीचे ठिकाणीं मांधात्यानें दोन पुत्र निर्माण केले. दोघेही मोठे धार्मिक असून एकाचें नांव पुरुकुत्स व दुसर्याचें मुचुकुंद असें होतें. या पुरुकुत्साला, राजा, त्रसद्दस्यु हा पुत्र झाला. या त्रसद्दस्यूला नर्मदा नामक स्त्रीचे ठिकाणीं संभूत नामक पुत्र झाला व संभूताचा पुत्र सुधन्वा नामक राजा. या सुधन्व्याला शत्रूंचे मर्दन करणारा असा त्रिधन्वा नामक पुत्र झाला. त्या त्रिधन्व्याला त्रय्यारुण नांवाचा पुत्र झाला. या त्रय्यारुणाला सत्यव्रत नांवाचा एक पुत्र झाला. हा सत्यव्रत मोठा दुष्ट बुद्धीचा असून हा एकदां लग्नांतील पाणिग्रहणमंत्रांच्या आड आला. यापूर्वी यानें दुसर्याची लग्न लाविलेली बायको उपटून आणिली. हा मोठा पोरकट, हूड, कामी, मूर्ख व रंगेल होता; व याने कामाधीन होऊन शहरांतील कोणा एका गृहस्थाची मुलगी हाताखालीं घातली होती. असला हा अधर्मी कारटा-नव्हे कांटाच- आपले पोटीं आला असें वाटून त्रय्यारुणाला फार दुःख झाले; व रागाचे झटक्यांत "कारट्या मर, चालता हो" म्हणून त्यानें त्याला वारंवार सांगितलें. तेव्हां बापाला तो पुन्हा पुन्हा विचारूं लागला कीं, 'तुम्ही मला टाकतां तर मीं जावें कोठें?' बापानें उत्तर केलें "जा, चांडाळांत जाऊन रहा. तुझ्यासारख्या कुलांगार कारटयाला पुत्र म्हणावें किंवा असला पुत्र मला असावा असली मुळीं इच्छा नाहीं." बापाने असें जेव्हां निक्षून सांगितलें तेव्हां तो शहर सोडून चालता झाला. त्यावेळीं कुलगुरु भगवान् वसिष्ठही त्याच्या आड आले नाहींत. तो सत्यव्रत मोठा छातीचा बेरड होता. तो न डगतां चांडाळांत जाऊन राहिला. इकडे त्याचा बाप त्रय्यारुणही उठून रानांत चालता झाला. सत्यव्रताच्या या अनाचारामुळें त्या देशांत बारा वर्षेपर्यंत पाऊस पडला नाही. त्या दुष्काळाच्या तडाक्यांत महातपस्वी विश्वामित्र आपले स्त्रीपुत्र त्या मुलखांत टाकून आपण समुद्रतीरीं तपश्चर्येकरितां गेला. पश्चात् त्याचे स्त्रीनें पोटाला अन्न नाहीं म्हणून आपल्या तीन पुत्रांपैकी एक पुत्र गळ्याला दोरी लावून बाजारांत उभा केला व शंभर गाई मोल घेऊन विकावयास काढला. इतक्यामध्यें महर्षि विश्वामित्राचा पुत्र गळ्याला दोरी बांधन पशूप्रमाणें विकला जात आहे असें पाहून बलाढ्य व दयाशील जो सत्यव्रत त्या विश्वामित्राचा संतोष व्हावा म्हणून व दयेस्तवही त्याला विकू न देता आपण त्याचें पोषण केलें. हा सोडविलेला मुलगा पुढें गालव नांवानें प्रसिद्ध असा कौशिक कुलांतला मोठा महा महर्षी झाला. याला गालव नांव पडण्याचे कारण गळ्याला बांधला होता हें.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि गालवोत्पत्तौ द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
अध्याय बारावा समाप्त
GO TOP
|