॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. ३ रा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोक : ३ रा - स एव संसरेत्कर्मवशाल्लोकद्वये सदा ॥ ३ ॥ (पूर्वार्ध)
अर्थ : असा कर्तृत्वबुद्धी घेतलेला माणूस त्या मानीव कर्माच्या योगाने नेहमी जन्ममरणरूप दोन लोकामध्ये येरझारा करतो. । । ३ । । (पूर्वार्ध)

ऐसा जो चिदाभास जीव । जेणे मीपणाचा घेतला भाव ।
तोचि जन्ममरणा पावे स्वयमेव । अध कीं उर्द्धलोकी ॥ २९ ॥
असा जो चिदाभासरूपी जीव त्याने मीपणाचा भाव घेतल्यामुळे (मीपणाच्या कल्पनेला धरून बसल्यामुळे) तो अधोलोकात (पाप केले असेल तर) अथवा ऊर्ध्व लोकात (पुण्य केले असेल तर) जन्म घेतो. (३२९)

मीपणध्यासें येक देह सोडी । येक देहा पावे परडी ।
सदा फिरतचि असे आवडी । कर्मफलाचि धोनी ॥ ३० ॥
त्या मीपणाच्या ध्यासाच्या योगाने एक देह सोडतो, त्याच क्रमाने दुसरा देह प्राप्त करतो. अशा तऱ्हेने कर्मफलाची आवड मनात ठेवून तो नेहमी फिरतच राहतो. (३३०)

जेव्हां पुण्यकर्माचा उदय । तेव्हां स्वर्गस्थ होय स्वये ।
पाप उद्धवतां अधोगती जाय । नाना नीच योनी ॥ ३१ ॥
जेव्हा हातून पुण्यकर्म घडते, तेव्हा स्वाभाविकच तो स्वर्गात जातो; जेव्हा पापकर्म घडते, तेव्हा तो अधोगतीला म्हणजे निरनिराळ्या हलक्या योनींमध्ये जन्म घेतो. (३३१)

अंतकाळीं जे आठवण । तैसा देह पुढे होणें ।
ऐसा कर्मवशे कडून । धुन: धुन: जन्मे मरे ॥ ३२ ॥
अंतकाळी जसे स्मरण असेल, त्याप्रमाणे त्याला पुढचा देह प्राप्त होतो. अशा रीतीने कर्माच्या स्वरूपानुसार तो पुन्हा पुन्हा जन्मतो आणि मरतो. (३३२)

जन्ममरणा नाम ससूति । हें भ्रमण न धुके कल्पांतीं ।
मा असो अधम कीं उत्तम गति । परी भोगी अचुक ॥ ३३ ॥
जन्ममरणाच्या या भ्रमणालाच संसृती अथवा संसार अथवा संसरण असे म्हणतात. हे भ्रमण कल्याचा अंत झाला तरी चुकत नाही. मग ती उत्तम गती असो अथवा अधम, तो जीव ती न चुकता भोगतोच. (३३३)

उत्तमामागे अधम । कीं अधमामागे उत्तम ।
हा कांहीं न संभवे नेम । कर्मा ऐसें होय ॥ ३४ ॥
उत्तमाच्यानंतर अधम जन्म प्राप्त होतो की अधम जन्मानंतर उत्तम जन्म असा काही क्रम ठरलेला नाही. जसे कर्म असेल त्यानुसार जन्म प्राप्त होईल. (३३४)

उत्तमाचा उत्तमची । कीं अधमाचा अधमची ।
हा नेम न संभवे काहीची । परी जन्मे कर्मवशे ॥ ३५ ॥
उत्तमाचा उत्तम योनीतच जन्म असेल, अथवा अधमाचा जन्म अधम योनीतच असेल असा काही नियम संभवत नाही. पण कर्मानुसारच जन्म मिळतो हे निश्चित. (३३५)

मनुष्यापासून कीटकान्स । वृक्षादि हे अधम समस्त ।
तैसाचि मानवापासोन देवान्त । उत्तम योनी ॥ ३६ ॥
मनुष्यांपासून ते कीटकांपर्यंत, तसेच वृक्ष इत्यादी हे सर्व अधम जन्मच होत. त्याचप्रमाणे मानवापासून ते देवांपर्यंत हे सर्व उत्तम योनीचे जन्म होत. (३३६)

यास्तव मानवदेह हा मध्यम । येथें पुण्य पाप असे सम ।
यातळीं ते सर्व अधम । उत्तम ते ऊर्ध ॥ ३७ ॥
म्हणून मानवदेह हा मध्यस्थानी समजावा. या जन्मासाठी पाप आणि पुण्य ही समान असली पाहिजेत. या मानवयोनीच्या खालचे ते सर्व अधम योनीचे जन्म होत. आणि मानवयोनीच्या वरचे ते सर्व जन्म उत्तम योनीचे होत. (३३७)

देव गंधर्व यक्ष स्वर्गवासी । तेधून जरी सत्यलोकवासी ।
हे उत्तम गति असे जीवासी । परी ससूति न चुके ॥ ३८ ॥
देव, गंधर्व, यक्ष हे स्वर्गवासी व त्यापुढचे सगळे सत्यलोकवासी. या लोकातील जन्म ही जीवाची उत्तम गती होय. पण ती प्राप्त झाली तरी त्याची जन्ममरणरूप संसृती चुकत नाही. (३३८)

सलोकता समीपता । तिसरी ते मुक्ति स्वरूपता ।
चौथी सगुण ही सायुज्यता । परी भ्रमणें न चुके ॥ ३९ ॥
सलोकता (परमेश्वर ज्या लोकात राहतो त्या लोकात राहायला मिळणे), समीपता (परमेश्वराच्या सान्निध्यात राहायला मिळणे), तिसरी मुक्ती म्हणजे स्वरूपता (खरा शब्द सरूपता, म्हणजे परमेश्वराची काही खास चिन्हे उदा. कौस्तुभमणी, श्रीवत्सलांछन ही विष्णूची चिन्हे आहेत, ती वगळता परमेश्वराचेच रूप प्राप्त होणे) आणि चौथी सगुण सायुज्यता (परमेश्वराच्या सगुण रूपात विलीन होऊन राहाणे) अशा चार मुक्ती आहेत. त्या ग्रास झाल्या तरी जन्ममरणाच्या येरझारा टळत नाहीत. (३३९)

सायुज्यान्त जे ऊर्ध्व गति । तया ही खणावी ससूति ।
मा अधमत्वे जे मरती जन्मती । तेथें बोलणें नको ॥ ४० ॥
सायुज्यापर्यंतच्या ज्या ऊर्द्ध गती आहेत, त्यांनाही संसृती असेच म्हणतात. मग अधम योनीत जे मरतात, जन्मतात, त्याबाबतीत बोलायलाच नको. (३४०)

जोवरी अज्ञान न फिटे । जैव स्वरूपज्ञान नव्हे गोमटे ।
तोवरी सवृति न पालटे । जन्ममरणरूप ॥ ४१ ॥
जोपर्यंत अज्ञान नष्ट होत नाही, जोपर्यंत सर्वश्रेष्ठ असे स्वरूपज्ञान होत नाही, तोपर्यंत जन्ममरणरूप संसरण संसृती बदलणार नाही, चुकणार नाही. (३४१)

जन्मता साकार प्रगटावा । मरता वासनेत गुप्त असावा ।
ऐसा लोकही हा फिरावा । सदा जीव ॥ ४२ ॥
जीव जन्मताना देहाकृती घेऊन प्रगट होतो, मरताना वासनेमध्ये गुप असतो. अशा या दोन लोकांमध्ये (देह आणि वासना) जीव नेहमी फिरत असतो. (३४२)

देह प्रगटतां सत्रा प्रकार । प्रगटती करिती व्यवहार ।
तेथें ही स्वप्न किंवा जागर । फिरे या लोकद्वयी ॥ ४३ ॥
देह प्रगट होताच त्याबरोबर सत्रा तत्त्वे (मन, बुद्धी, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेन्हिये, पहा ओ. १२१ ते १३५) प्रगट होतात. आणि ती व्यवहार करू लागतात. त्यातही तो जीव स्वप्न आणि जागृती या दोन्ही लोकांमध्ये फिरत असतो. (३४३)

मग असो देव कीं मानव । अथवा कीटक गो अश्व ।
परी स्वप्न जागरी दोन्ही ठाव । असे भ्रमणे ॥ ४४ ॥
मग तो देव, मानव, कीटक, गाय, घोडा इत्यादी कोणत्याही योनीत असो, त्याला स्वप्न आणि जागृती या दोन अवस्थारूपी लोकांमध्ये भ्रमण करावेच लागते. (३४४)

जन्ममरण हे संसूति । कीं फिरणे स्वप्नी जागती ।
एव भ्रमणें जें जीवाप्रती । धुके ना कीं ॥ ४५ ॥
जन्म आणि मरण या प्रकारचे संसरण असो किंवा जागृती आणि स्वप्न या अवस्थांमधील भ्रमण असो, जीवाला अशा प्रकारचे भ्रमण टाळता येत नाही. (३४५)

अथवा सवृति हा संसार । ह्मणजे देहहुयाचा व्यापार ।
केव्हां स्वप्न केव्हां जागर । या लोकही संचरे ॥ ४६ ॥
किंवा संसृती म्हणजेच हा संसार म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहांचा व्यापार आहे. त्यामध्ये कधी स्वप्न, कधी जागृती अशा दोन लोकांमध्ये तो जीव संचार करतो. (३४६)

तया व्यापाराचे पांच प्रकार । होत असती सविस्तर ।
त्यांत येकेक व्यापारी साचार । पांच पांच तत्त्वें ॥ ४७ ॥
त्या व्यापाराचे पाच प्रकार होतात. त्यात एकेका व्यापारामध्ये पाच पाच तत्त्वे आहेत. (३४७)

तेचि व्यापार कैसे कैसे । बोलिजेत असती अल्पसे ।
मुमुक्षे अवधरितां मानसे । विवेचन घडे ॥ ४८ ॥
ते व्यापार कसे कसे आहेत हे थोडेसे स्पष्ट करू. मुमुक्षूंनी ते सावध मनाने ऐकले तर विवेचन करता येईल. (३४८)

पूर्वी अपंचीकृत उद्भवली । तेचि तत्त्वें पंचीकृत जाली ।
एकेकांत पांच पांच राहिली । पुढे प्रवेशलीं देही ॥ ४९ ॥
पूर्वी मूळमायेपासून अपंचीकृत अशी तत्त्वे निर्माण झाली. त्यांचेच पुढे पंचीकरण झाले. एकेका तत्त्वामध्ये पाचही तत्त्वे मिसळली. अशी पंचीकृत तत्त्वे देहामध्ये प्रवेश करून राहिली. (३४९)

व्यापार जेधवां होत । तेव्हां येकेकांतून येकेक निघत ।
पांचांचे पांच जेव्हां मिळत । तेव्हा व्यापार येक होय ॥ ५० ॥
देहामधले व्यापार जेव्हा होऊ लागतात तेव्हा एकेका तत्त्वामधून प्रत्येकी एकेक तत्त्व निघते. आणि पाचही तत्त्वांचे पाच अंश जेव्हा मिळतात तेव्हा देहाचा एक व्यापार होतो. (३५०)

गगन तत्त्वाचा व्यापार होणें । मुख्य आकाशाचें अंतःकरण ।
वाणूंतून निघे व्यान । तेजांतून श्रोत्र ॥ ५१ ॥
गगन या तत्त्वाचा व्यापार जेव्हा व्हायचा असतो तेव्हा मुख्य आकाशाचे अंतःकरण, वाघूतून निघालेले व्यान हे तत्त्व, तेजातून निघालेले श्रोत्र, (३५१)

वाचा जापाचे कमीद्रय । युद्धीचा शब्द विषय ।
या पाचातत्त्वे व्यापार । होय ऐकणे बोलणें ॥ ५२ ॥
आपतत्त्वाचे वाचा हे कर्मेन्हिय, पृथ्वीचा शब्द हा विषय अशी पाच तत्त्वे म्हणजे अंत: करण, व्यान (प्राण), श्रोत्र (ज्ञानेंद्रिय), वाचा (कर्मेन्द्रिय) आणि शब्द (विषय) एकत्र आली म्हणजे ऐकणे आणि बोलणे हे आकाशतत्त्वाचे दोन व्यापार घडतात. (३५२)

ऐकणे श्रोत्र ज्ञानेंद्रियाचे । बोलणें वाचा कर्मेंद्रियाचे ।
दोहींसी काज शब्दाचे । असे व्यापारा ॥ ५३ ॥
त्यापैकी ऐकणे हा ज्ञानरूप व्यापार असून तो श्रोत्र या ज्ञानेंद्रियामुळे घडतो. बोलणे हा क्रियारूप व्यापार असून तो वाचा या कर्मेंद्रियाने घडतो. या दोहोंना शब्द या विषयाची गरज असते. (३५३)

दोहींशी आधार चळणासी । व्यान वायू निश्चर्येसी ।
जाण तें तत्त्व निवडावयासी । अंतःकरण ॥ ५४ ॥
या दोन्ही व्यापारात जे चलन होते ते व्यान या वायुतत्त्वामुळे घडते आणि या व्यापारासाठी जी जाण लागते ती अंतःकरण या तत्त्वामुळे निवडता येते. अशातऱ्हेने अंतःकरण (जाण), व्यान (चलन), शब्द (विषय), वाचा (कर्मेन्द्रिय) आणि श्रोत्र (ज्ञानेंद्रिय) अशा पाच तत्त्वांच्या मिळणीने आकाशतत्त्वापासून ऐकणे-बोलणे या स्वरूपाचा व्यापार निष्पन्न होतो. (३५४)

आतां वायुतत्त्वाचा व्यापार होता । गगनांतून मन निघे तत्त्वतां ।
समानवायु हा आपण स्वता । त्वचा तेजाची ॥ ५५ ॥
आपाचे पाणी कमीद्रय । पृथ्वीचा स्पर्श हा विषय ।
एव पाच मिळता व्यापारच । स्पर्श देणे घेणे ॥ ५६ ॥
आता वायुतत्त्वाचा व्यापार जेव्हा होतो तेव्हा आकाशातून मन निघते, वायूमधून समान येतो, तेजातून त्वचा येते, आपाचे पाणि (हात) हे कर्मेन्द्रिय येते आणि पृथ्वीपासून स्पर्श हा विषय येतो अशा पाच तत्त्वांचा मेळ होताच स्पर्श आणि देणे घेणे हे दोन व्यापार होतात. (३५५ - ३५६)

त्वचा ज्ञानेंद्रियाचें स्थर्शणे । पाणी कमीद्रयाचे देणे घेणे ।
समानवापूचें चळण होणें । मन जाणते तत्त्व ॥ ५७ ॥
त्यामध्ये त्वचा या ज्ञानेंद्रियाचा स्पर्शणे हा व्यापार असून हात या कर्मेन्द्रियाचा देणे-घेणे हा व्यापार होतो. या व्यापारातील चलन समान वायूमुळे होते, मन हे जाणते तत्त्व आहे. (३५७)

ज्ञानेंद्रियद्वारा जाणा । कमेद्रियहारा करावें ।
दोहींचा स्पर्श विषय व्हावे । व्यापार दोन ॥ ५८ ॥
ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने जाणावे, कर्मेन्हियाच्या द्वारा करावे, या दोहोंचा स्पर्श हा विषय असून त्यातून घेणे देणे हे दोन व्यापार होतात. (३५८)

होतां तेजतत्त्वाचा व्यापार । बुद्धि आकाशाची साचार ।
उदानवाणूंतून अपार । स्वये तेजाचा चढ ॥ ५९ ॥
तेजतत्त्वाचा व्यापार होत असता आकाशाची बुद्धी, वायुतत्त्वातील उदान, स्वत: तेजाचा चक्षू (३५९)

जापांतून घेतला पाद । वृद्धींतून रूप विशद ।
हे पांच मिळून व्यापारभेद । पहाणे चालणें दोन ॥ ६० ॥
आपतत्त्वातून याद आणि वृद्धीतून रूप असे पाच घटक एकत्र मिळाल्यावर पाहणे आणि चालणे असे दोन व्यापार होतात. (३६०)

चक्षज्ञानेंद्रिर्ये पाहणे । पादकमीद्रये चालणें ।
दोहींचा विषय रूप होणें । भोग्यरूप ॥ ६१ ॥
चक्षू या ज्ञानेंद्रियामुळे पाहणे घडते, पाद (पाय) या कर्मेन्द्रियामुळे चालणे घडते. या दोहोंचा विषय रूप हा असून तो भोग्य विषय होतो. (३६१)

उदानवाधू चळणा आधार । जाणते तत्त्व बुद्धि सुंदर ।
एव हा जाला विस्तार । तेज तत्त्वाचा ॥ ६२ ॥
उदान वायूचा चलनक्रियेला आधार असून या व्यापाराचे जाणते तत्त्व बुद्धी हे आहे, अशा प्रकारे तेज तत्त्वाच्या व्यापाराचा हा विस्तार झाला. (३६२)

आपतत्त्वाचा व्यापार होत । आकाशांतून घेतसे चित्त ।
प्राणवाणूंतून निघत । जिव्हा तेजाची ॥ ६३ ॥
आपतत्त्वाचा व्यापार होत असता आकाशातून चित्त घेतले जाते, वायुतत्त्वातून प्राणतत्त्व येऊन मिळते, तेजातून जिव्हा हा घटक घेतला जातो. (३६३)

आपाचे उपस्थ सुरस । पृथ्वीतून विषय रस ।
हे पांच मिळून होती बहुवस । अशनरती ॥ ६४ ॥
आपतत्त्वाचे उपस्थ हे कर्मेन्हिय आणि वृद्धीतत्त्वातून रस हा विषय घेतला जातो. हे पाच घटक मिळून खाणे आणि रतिसुख घेणे हे दोन व्यापार घडतात. (३६४)

जिव्हा ज्ञानेंद्रियें रस घेणे । उपस्थकमीद्रये भोगणें ।
दोहींचा विषय रस होणें । ग्रहणरूप ॥ ६५ ॥
जिव्हा या ज्ञानेंद्रियाने रसास्वाद घेणे, उपस्थ शिस्त) या कर्मेन्द्रियाने इंद्रियसुख भोगणे या क्रिया शक्य होतात. या दोहोंचा विषय रस हा असून तो ग्रहणरूपाने भोग्य होतो. (३६५)

दोहींस आधार चळणा प्राण । जाणावया चित्त संपन्न ।
एव व्यापार पांचाचे होती दोन । आपतत्त्वाचे ॥ ६६ ॥
या दोन्ही व्यापारांस चलनाधार प्राण हे तत्त्व असून, चित्त हे जाणते तत्त्व आहे. अशा प्रकारे या पाच तत्त्वाचे मिळून आपतत्त्वाचे दोन व्यापार होतात. (३६६)

पृथ्वीतत्त्वाचा व्यापार । आकाशाचा अहंकार ।
अपानवायुचा निर्धार । तेजाचे घाण ॥ ६७ ॥
वृद्धीतत्त्वाचा व्यापार होताना आकाशाचा अहंकार, वायुतत्त्वाचा अपानवाणू तेजतत्वाचे घ्राण (३६७)

गुद तें जापांतून निघाले । गंधासी पृथ्वीतून काढिलें ।
या पाचायोगे व्यापार जाले । गंधग्रहण विसर्ग ॥ ६८ ॥
आपतत्त्वातून निघालेले गुद (मलविसर्जन द्वार) हे कर्मेन्हिय आणि वृद्धीतत्त्वातून आलेला गंध हा विषय असे पाच घटक एकत्र येतात आणि त्यांच्या पासून गंधग्रहण आणि मलविसर्जन हे दोन व्यापार होतात. (३६८)

घाणज्ञानेंद्रिये गंधग्रहण । गुदकमीद्रये विसर्ग करणें ।
मुख्य विषय दोहींचा होणे । गंध हा भोग्य ॥ ६९ ॥
घ्राण या ज्ञानेंद्रियाने गंधग्रहण होते, गुद या कर्मेन्द्रियाने मलविसर्जन होते. या दोहोंचा विषय गंध हा असून तो भोग्य होतो. (३६९)

दोहींसी आधार चळणा जपान । जाणते तत्त्व अहंकरण ।
एव व्यापार जे होती दोन । पृथ्वीतत्त्वाचे ॥ ७० ॥
या दोहोंच्या चलनाचा आधार अपानवायू हा असून अहंकार हे त्याचे जाणते तत्त्व आहे. अशा तऱ्हेने वृद्धीतत्त्वाचे दोन व्यापार होतात. (३७०)

ऐसे हे पांच तत्त्वांचे । व्यापार होती पांचाचे ।
या पाचांत अधिष्ठान त्रिगुणांचे । तिही शक्तिरूपे ॥ ७१ ॥
अशा तऱ्हेने या पाच तत्त्वांचे व्यापार होतात. या पाचही तत्त्वांना सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे शक्तिरूपाने अधिष्ठान असते. (३७१)

अंतःकरण पंचक सत्त्वगुण । हे ज्ञानशक्ति संपूर्ण ।
बरें कीं वाईट निवडणे । यास्तव भोक्ता ॥ ७२ ॥
त्यातील अंतःकरणपंचकाला सत्त्वगुणाचे अधिष्ठान आहे. तो ज्ञानशक्तियुक्त आहे. त्यामध्ये बऱ्या वाईटाची निवड होते म्हणून त्याला भोक्ता असे म्हटले आहे. (३७२)

ज्ञानेंद्रियें सत्त्वगुण असतां । परी हे निर्गम द्वार तत्त्वता ।
म्हणोनि यासी क्रियारूपता । साधन भोक्त्याचे ॥ ७३ ॥
ज्ञानेंद्रिये सत्त्वगुणरूप आहेत. पण त्यांचे ज्ञान निर्गमद्वाराने म्हणजे बाहेर जाणारे आहे. म्हणून ती क्रियारूप आहेत. त्यामुळे भोक्त्याची ती साधने ठरतात. (३७३)

तस्मात् ज्ञानेंद्रियपंचक । दुजे कर्मी क्रियारूपक ।
प्राणपंचक मिळोनि येक । क्रियाशक्ति बोलिजे ॥ ७४ ॥
म्हणून ज्ञानेंद्रिय पंचक, दुसरे क्रियारूपक कमेंद्रियपंचक आणि प्राणपंचक या सर्वांना मिळून क्रियाशक्ती असे म्हणतात. (३७४)

एव त्रिपंचकें रजोगुण । हें क्रियाशक्तीचे लक्षण ।
भोग्या घ्यावयाची साधनें । उपकर भोक्तियाची ॥ ७५ ॥
ही तीन पचके त्यामुळे रजोगुणात्मक आहेत. रजोगुण हे क्रियाशक्तीचे लक्षण आहे. त्यामुळे भोक्त्याला भोग्य विषय मिळवण्याची ती साधने आहेत. ती भोक्त्याची उपकरणे आहेत. (३७५)

पंच विषय तमोगुण । हे द्रव्यशक्ति भोग्य संपूर्ण ।
एव त्रिपुटीने होय ग्रहण । मुखदुःख जीवा ॥ ७६ ॥
पाच विषय तमोगुणात्मक आहेत. ती द्रव्यशक्ती होय. ते सर्व विषय भोग्य स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्रिपुटीने ग्रहण करू शकतो. त्या त्रिपुटीमुळे जीवाला सुख अथवा दुःख प्राप्त होते. (३७६)

जयाविषयीं नुसता शब्द । तो श्रोत्रद्वारा होय वेद्य ।
जेथें शब्द स्पर्श द्विविध । तें वेद्य श्रोत्रत्वाचे ॥ ७७ ॥
जेथे केवळ शब्दच आहे (उदा. आकाश) तो केवळ श्रोत्रेद्रियाने कळतो. जेथे शब्द आणि स्पर्श हेच केवळ आहेत (उदा. वाफ तो श्रोत्रेद्रिय आणि त्वगिंद्रिय (त्वचा) यांनी जाणण्याचा विषय ठरतो. (३७७)

जेथें शब्द स्पर्श रूप तीन । तें श्रोत्र त्वचा चक्षसि ग्रहण ।
शब्द स्पर्श रूप रस चतुर्गण । तें श्रोत्र त्वचा लक्ष जिव्हेसी ॥ ७८ ॥
ज्या ठिकाणी शब्द, स्पर्श आणि रूप हे तीन आहेत (उदा. अग्नी) तो श्रोत्र, त्वचा आणि चक्षू यांनी जाणण्याचा विषय आहे. आणि जेथे शब्द, स्पर्श, रूप आणि रस असे चारी विषय एकत्र येतात (उदा. आपतत्त्व) ते श्रोत्र, त्वचा, चक्षू आणि जिव्हा या ज्ञानेंद्रियांनी ग्राह्य होते. (३७८)

शब्द स्पर्श फटप रस । जेथें गंधादि पांच सुरस ।
तें श्रोत्र त्वकू लक्ष जिव्हा प्राणास । विषय वेद्य होय ॥ ७९ ॥
ज्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे पाचही विषय एकवटतात (वृद्धीतत्त्व) त्या वृद्धीतत्त्वाचे श्रोत्र (कान), त्वचा, चक्षू (डोळे), जिव्हा आणि घ्राण (नाक) या पाच ज्ञानेंद्रियांनी ग्रहण होते. (३७९)

एव भोग्य तमोगुणद्रव्यशक्ति । त्रिपंचके रजक्रियाशक्ति ।
अंतःकरण सत्वज्ञानशक्ति । हे भोग्य भोगणें भोक्ता ॥ ८० ॥
अशा प्रकारे सर्व भोग्य विषय हे तमोगुणात्मक द्रव्यशक्तीची रूपे होत. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि पंच प्राण ही तीन पचके रजोगुणात्मक क्रियाशक्तीची रूपे होत. आणि अंतःकरण (पंचक) हे सत्त्वगुणात्मक ज्ञानशक्तीचे रूप आहे. द्रव्यशक्तीची रूपे विषय हे भोग्य असून क्रियाशक्तीची रूपे ही भोगणे म्हणजे भोगसाधने असून, ज्ञानशक्तीचे प्रकार (अंतःकरण पंचक) हे भोक्ते होत. (३८०)

प्रत्यक्ष विषय स्थूलासी । भोग जो घडे निश्चयेसी ।
हे जागति अवस्था जीवासी । घडे साभिमानें ॥ ८१ ॥
स्थूल देहाला प्रत्यक्ष विषयांचा जेव्हा भोग घडतो, त्या देहाचा अभिमान घेऊन जीव जेव्हा सुखदुःखे भोगतो त्या अवस्थेला जागृती अवस्था म्हणतात. (३८१)

विषय इंद्रियांवांचून । कल्पने विषय कल्पून ।
सुख दुःख भोगी अभिमान । ते स्वप्नअवस्था ॥ ८२ ॥
विषय आणि इंद्रियांच्या अभावी कल्पनेने विषय कल्पून त्या देहाचा अभिमान घेऊन जीव जेव्हा सुखदुःखे भोगतो, त्या अवस्थेला स्वप्नावस्था म्हणतात. (३८२)

एव जागति स्वप्न स्थानीं दोहीं । जीव संचरे द लोकीं पाही ।
सुपुप्तींत मात्र संचार नाहीं । परी नेणिवेंत गुप्त ॥ ८३ ॥
अशा प्रकारे जीव जागृती आणि स्वप्न या दोन ठिकाणी संचार करतो. हेही दोन लोकातलेच भ्रमण होय. सुषुप्तीच्या अवस्थेत जीवाचा संचार नसतो. त्यावेळी तो नेणिवेत गुप्त असतो. (३८३)

ऐसा एक देह पावत असतां । तो काल देहहुयी संचरतां ।
प्राणवियोर्गे मृत्य पावतां । उत्तमाधम योनी ॥ ८४ ॥
याप्रमाणे एक देह प्राप्त झाला असता त्या काळात जीव दोन देहांमध्ये संचार करत असतो. मरण पावत्यानंतरही उत्तम आणि अधम या दोन योनीत त्याचे संचरण असते. (३८४)

ह्या लोकहुयी संचरे जीव । अनंत कर्मफल भोगास्तव ।
हें भ्रमण धुके ऐसा उपाव । त्रिपुवनी नाहीं ॥ ८५ ॥
या दोन लोकात जीव अनंत कर्मफलाचा भोग घेण्यासाठी संचार करत असतो. हे श्रमण चुकेल असा उपाय सबंध त्रिभुवनात आढळणार नाही. (३८५)

जैसा प्रवाही कीटक पडे । तया आवर्तीहून आवर्ती जाणें पडे ।
विसावा क्षणभरी आतुडे । ऐसा काळ नाहीं ॥ ८६ ॥
ज्याप्रमाणे एक कीटक प्रवाहात पडत्यावर तो एका भोवऱ्यात गोते खातो, त्यातून बाहेर पडला तर दुसऱ्या भोवऱ्यात सापडतो अशा तऱ्हेने सारखा गोते खात राहतो, त्यातून एक क्षणभराचा विसावा घेण्यापुरतासुद्धा अवसर त्याला मिळत नाही. (३८६)

तैसा एक देह जरी त्यागावा । तो दुजा तेव्हांच अवलंबावा ।
तोही क्षय धावता धरावा । तिजा उत्तम कीं अधम ॥ ८७ ॥
त्याप्रमाणे या जीवालाही वेळ मिळत नाही, त्यानं एका देहाचा त्याग करायचा ठरविले तरी त्याला लगेच दुसऱ्या देहाचा स्वीकार करावा लागतो. तो देह नष्ट झाल्यानंतरही तिसऱ्या उत्तम योनीतील अथवा अधम योनीतील देहाचा स्वीकार त्याला करणे भाग पडते. (३८७)

जेधवां अज्ञाने भिन्न पडिला । जीव हा मी मागून बैसला ।
तेव्हांपासून प्रवाही सापडला । जन्ममृत्यूच्या ॥ ८८ ॥
जीव अज्ञानामुळे स्वरूपापासून भिन्न पडतो आणि आपण स्वरूप नसून जीवच आहोत असे मालू लागतो, तेव्हापासून तो जन्ममृत्यूच्या प्रवाहात सापडतो. (३८८)

निमिष्य एक विसावा घेतां । सुखा मागें दुःख होय भोक्ता ।
कीं दुःखा मागें सुख मागुता । समे कटिबनपरी ॥ ८९ ॥
एखादा निमिषभर विसावा घेतो न घेतो तोच सुखाच्या मागून दुःख आणि पुन्हा दुःखामागून सुख अशा दुष्टचक्रात तो त्या नदीत पडलेल्या कीटकाप्रमाणे सापडतो आणि भ्रमण करत राहतो. (३८९)

दैवे जरी किडा नदीतीरा । येतां कोणी देखिला नेत्रा ।
तेणें काढिला वोडून त्वरा । दयाळूपणें जरी ॥ ९० ॥
दैवयोगाने तो किडा नदीच्या काठाशी आला असता कोणी त्याला डोळ्यांनी पाहिले, आणि त्याने दयाळूपणाने त्यास बाहेर ओढून काढले. (३९०)

तरी तो वृक्षछाये तळवटीं । कीटक विश्रामे उठाउठी ।
ऐसीच सहुरूची होय भेटी । या जीवासी जरी ॥ ९१ ॥
तर त्या किड्याला वृक्षच्छायेमध्ये सहज विश्रांती मिळू शकते, अन्यथा नाही. त्याप्रमाणे त्या जन्ममृत्यूच्या दोन जगतात येरझाऱ्या करणाऱ्या जीवाला जर दैववशात सद्‌गुरूंशी गाठ पडली. (३९१)

परी तो हदयशुद्धीचे कडे । आला पाहिजे कोडे ।
त्याचेचि बोधद्वारा साकडे । फेडिती गुरु ॥ ९२ ॥
तर प्रथम तो हदयशुद्धीच्या कडेला लागला पाहिजे (प्रथम त्याची हदयशुद्धी झाली पाहिजे) तेव्हाच त्याला उपदेश करून सद्‌गुरू त्याचे साकडे फेडू शकतील. (३९२)

जन्ममृत्यूच्या प्रवाहांतून । काढिती तया बोधून ज्ञान ।
सुखे विश्रामें स्वरूपाभिन्न । कीं पुन्हा सुखदुःखा नातळे ॥ ९३ ॥
त्याला ज्ञानाचा उपदेश करून सद्‌गुरू त्याला जन्ममृत्यूच्या प्रवाहातून बाहेर काढतात. तेव्हा कोठे तो स्वरूपाशी अभिन्नत्वाने एकरूप होऊन सुखाने विश्रांती घेतो. त्याला पुन्हा सुखदुःखे भोगावी लागत नाहीत. (३९३)

येन्हवी गुरुराज न भेटता । अभिन्न ज्ञान न होतां ।
अन्य कोटि साधनें करितां । हा प्रवाह न निमे ॥ ९४ ॥
येन्हवी सदुरूराज जर त्याला भेटले नाहीत आणि अभिन्नतेचे म्हणजे अद्वैताचे ज्ञान त्याला झाले नाही तर त्याने इतर कोट्यवधी साधने केली तरीही जन्ममृत्यूचा हा प्रवाह कधी थांबणार नाही. (३९४)

रविदत्ता हे सत्य वचन । कदां नोव्हें अप्रमाण ।
ऐसी गुरुवाणी ऐकोन । येऊ साष्टांग घाली ॥ ९५ ॥
रविदत्ता, मी सांगतो ते सत्य आहे. ते केव्हाही अप्रमाण होणार नाही. असे गुरूंचे बोलणे ऐकताच त्याने (रविदत्ताने) साष्टांग नमस्कार घातला. (३९५)

वारंवार प्रदक्षिणा । वारंवार बंदी चरणा ।
कंठ दाटला अधुनयना । फुटेना शब्द ॥ ९६ ॥
त्याने सहुरूंना वारंवार प्रदक्षिणा घातल्या. तो वारंवार त्यांच्या पाया पडू लागला. त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू उभे राहिले, तोंडातून शब्द फुटेना. (३९६)

तैसाच गद्रद वाणी करून । त्राहि त्राहि बोले वचन ।
सोडवी सोडवी भवापासून । अन्य मी प्रार्थ नेणें ॥ ९७ ॥
अशा अवस्थेतच सदगद् वाणीने तो म्हणाला, ' 'गुरू महाराज मला वाचवा. माझे रक्षण करा. मला संसारातून सोडवा. यापेक्षा अधिक काय मागायचे ते मला माहीत नाही. '' (३९७)

जय गुरु जयजय गुरु । कृपाघन करुणासागर ।
मज दीनाचा करी अंगीकारू । न करी उपेक्षा ॥ ९८ ॥
' 'गुरू महाराज, आपला त्रिवार जयजयकार ! आपण कृपाळू मेघासारखे आहात. करुणेचे सागर आहात. दीन अशा माझा स्वीकार करा. माझी उपेक्षा करू नका ! '' (३९८)

मी काया वाचा मनेसी । शरण शरण श्रीचरणासी ।
दयाळा संरधून ब्रीदासी । उचित तें करा ॥ ९९ ॥
' 'मी कायावाचामनाने आपल्या पायाशी शरण आलो आहे. दयाळू गुरुमहाराज, आपले ब्रीद सांभाळून जे योग्य वाटेल ते करा ! '' (३९९)

मागुर्ती करून साष्टांग । चरणी पडला दृढ अभंग ।
मग शंकरे उठवून लगबग । गाढ आलिंगिला ॥ ४०० ॥
नंतर पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार करून तो गुरूंच्या पाया पडला. त्याने त्यांचे पाय घट्ट पकडले. तेव्हा गुरू शंकराचार्यांनी लगेच लगबग करून त्याला उठविले आणि त्याला त्यांनी गाढ आलिंगन दिले. (४००)

नाभि नाभि हे रविदत्ता । तुझा भव हा सार परता ।
तूं कोण असी तया आतां । भेटवू ज्ञाने ॥ १ ॥
आणि म्हटले, ' 'हे रविदत्ता, तू भिऊ नकोस. आता आपण तुझा हा भवसागर नाहीसा करू आणि तुला ज्ञान देऊन तू मूळ जो कोणी आहेस त्याची आणि तुझी भेट घालून देऊ. '' (४०१)

नदीमाजीं कीटक पडिला । ऐसा जो कां दृष्टांत दिधला ।
तैसाचि जीव हा प्रवाही सापडला । तो सत्य भाविला तुवा ॥ २ ॥
अरे, 'नदीमध्ये कीटक पडला' असा जो आम्ही दृष्टांत दिला, त्याप्रमाणे हा जीव प्रवाहात सापडला आहे, हे तू खरेच मानलेस ! (४०२)

हा खराच जरी वाहवता । तरी ज्ञानाच्या बापे न निघता ।
तस्मात् जाणे हा विचारे पुरता । समे वाहवला दिसे ॥ ३ ॥
हा जर खराच वाहवला असता, तर शानाच्या बापालाही तो बाहेर काढता आला नसता. तेव्हा नीट पूर्ण विचार करून हे जाणून घे, की तो भ्रमामुळे वाहवलेला दिसतो. (४०३)

भ्रमें वाहवला असे कैसा । तो बोलू सावध हो मानसा ।
यासी साम्य दृष्टांत असे जैसा । तो अवधारीं ॥ ४ ॥
तो भ्रमामुळे कसा वाहवला असे दिसते, हे आता सांगतो. तू मनाने सावध होऊन ऐक. याला साम्य असणारा आणखी एक दृष्टांत आहे, तो तू लक्षपूर्वक ऐक. (४०४)

एक महानदी सखोल वाहत । थोर वृक्ष येक असें तीत ।
त्यावरी पुरुष येक निवांत । बैसला असे ॥ ५ ॥
एक मोठी खोल अशी नदी वाहत होती. तिच्या काठावर एक मोठा वृक्ष होता. त्यावर एक पुरुष निवांत बसला होता. (४०५)

तो सुखरूप असतां बैसला । सहज अधोमुखें पाहता झाला ।
यया या वृक्षासहित आपणाला । देखे पडिलों प्रवाही ॥ ६ ॥
तो सुखरूप बसला असताना जेव्हा सहज खाली तोंड करून पाहू लागला. तेव्हा त्याला असे दिसले की, त्या वृक्षासहित आपण त्या प्रवाहात पडलो आहोत. (४०६)

आपण जो वृक्षासहित अचळ । तया स्वकीयत्वा विसरला सकळ ।
प्रवाही प्रतिबिंब कापें चळवळ । तोचि मी भाविलें ॥ ७ ॥
वास्तविक पाहता तो वृक्षही काठावर स्थिर होता आणि हा त्यावर बसलेला पुरुषही स्थिर होता. पण त्याला आपल्या सुखरूप स्थैर्याचा पूर्ण विसर पडला आणि त्या प्रवाहात पडलेले त्याचे प्रतिबिंब सारखे कंपित होत होते, तेच खरे असून आपणच ते आहोत असे त्याला वाटले. (४०७)

मी पडिलों बोंबलत । कोणी काढारे काढा त्वरित ।
वाहूनि चाललो काय न देखत । कृपेसहित कोणी ॥ ८ ॥
' 'मी पडलो' ', ' 'मी पडलो' ' असे तो ओरडू लागला. ' 'कोणीतरी मला काढा ३, मी वाहून चाललोय, अरे कोणाही दयाळू माणसाला हे दिसत नाही का ३ ? '' (४०८)

तैसा कूटस्थ निर्विकार । जो कां आपण ब्रह्मपर ।
या विकाराहून अति दूर । यातचि असोनी ॥ ९ ॥
या दृष्टान्तातल्या वृक्षस्थ पुरुषाप्रमाणे कूटस्थ मुळात निर्विकार आहे. तो स्वतः ब्रह्मच आहे. तो देहात असला तरी देहाच्या विकारांपासून अलिप्त आहे. (४०९)

वृत्ती-पासोनि तत्त्वें सत्रा । हें पाणी देखे द्रष्टा नेत्रा ।
त्यांत बिंबला तया अन्यत्रा । जीवा मी कल्पिले ॥ १० ॥
पण त्याने वृत्ती इ. सतरा तत्त्वे हेच पाणी आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि त्यात अन्यत्र पडलेले स्वतःचे प्रतिबिंब म्हणजे जो जीव त्यालाच मी असे मानले. (४१०)

हाचि मी जीव प्रवाही पडिलों । जन्ममरण रूप वाहवला ।
येधून केवी जाय सुटला । कवण्या साधनें ॥ ११ ॥
हाच मी जीव असून जन्ममरणरूप प्रवाहात पडलो आहे आणि वाहवत चाललो आहे. आता त्यातून मी कसा सुटेन ? कोणत्या साधनामुळे मी त्यातून मुक्त होईन ? (४११)

कैवारी देव कोणी असे । तोचि तारील कृपेसरिसे' ।
ह्मणून अट्टहास्थे पाहतसे । कर्म हेंचि बोंबलणें ॥ १२ ॥
माझा कैवार कोणता देव घेईल ? कृपा केल्याबरोबर तो मला लागलीच कसा तारील ? असा अट्टाहास करून तो कर्मकांडाचा आश्रय करतो. देवाच्या नावाने मोड्याने हाका मारू लागतो. (४१२)

तो जरी खरा प्रवाही पडता । तरी देवासीही काढितां येता ।
जैसे जन ऐकोनि होती हेळसिता । तेवीं उपेक्षी देव ॥ १३ ॥
तो जर खरोखरच प्रवाहात पडला असता, तर देवाला त्याला बाहेर काढणे शक्य झाले असते. परंतु आता तो प्रवाहात पडला नसताही विनाकारणच ओरडतो आहे, असे म्हणून इतर लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याप्रमाणेच देवही त्याची उपेक्षा करतो, कारण मुळात तो संकटात सापडलेलाच नाही. (४१३)

कोणी हांसोनि नदीत गळ । टाकोनि धुंडित पात्र सकळ ।
तेवीं वेदवाणी साधनें पुष्कळ । बोले जीव उद्धारा ॥ १४ ॥
त्या लोकांमध्ये कोणी त्याच्या ओरडण्याला हसतात. पण त्याच्या समाधानासाठी नदीत गळ टाकून सर्व पात्रभर शोध घेतात, त्याप्रमाणे या जीवासाठीही वेद त्याच्या उद्धारासाठी निरनिराळी साधने सांगतात. (४१४)

ऐसी साधनें कल्पकोटी । केली जरी कल्पूनि मोठी ।
तरी कां जीव हा उठाउठी । ज्ञानेंवीण मुक्त होय ॥ १५ ॥
अशी अनेक प्रकारची साधने या जीवाचा उद्धार करतील अशी कल्पना मनाशी धरून काम्यबुद्धीने कोट्यवधी कल्पेपर्यंत केली तरी तो जीव ज्ञानावाचून सहजासहजी मुक्त होईल काय ? (४१५)

खरा जरी पडिला असता । कांहीं तरी उपाय चालता ।
येथें समे मानिलें तया सोडविता । ज्ञानेंविण कवण ॥ १६ ॥
तो जर खरोखरच पडला असता तर त्याला वर काढण्यासाठी काहीतरी उपाय चालला असता. पण येथे भ्रमामुळे, आपण पडलो आहोत, असे त्याने मानल्यामुळे त्याला वस्तुस्थितीचे ज्ञान करून दिल्याशिवाय त्याला कोणी सोडवू शकेल काय ? (४१६)

ऐसें ज्ञान गुरुविण कवण । बोधील बापुडा जरी देव येऊन ।
तस्मात् नाथिलिया दुःखातून । काढिता सद्‌गुरु ॥ १७ ॥
असे ज्ञान सहुरूवाचून त्याला कोण सांगणार आहे ? बिचारा देव जरी आला तरी तो हे ज्ञान देण्यास असमर्थ आहे. तेव्हा नसलेल्या दुःखातून त्याला बाहेर काढण्यास एकटे ज्ञानदाते सहुरूच समर्थ आहेत. (४१७)

परी जयासी तया विवेक असिला । तरीच बोधे जाय सुटला ।
नाहीं तरी गुरूही अनधिकारियाला । उपेसून जाती ॥ १८ ॥
परंतु त्याच्या ठिकाणी मुळात विवेक असेल तरच सहुरूंनी केलेल्या ज्ञानोपदेशाने त्याची सुटका होऊ शकेल. नाहीतर अनधिकारी शिष्याची सहुरूही उपेक्षा करून जातात. (४१८)

तो विवेक कोणता ह्मणसी । तरी अवधारीं निश्चयेसी ।
व्या केलें जितुकें मागा सायासीं । त्याचें फळ काय ग्रास ॥ १९ ॥
तो विवेक कोणता म्हणशील तर निश्चयपूर्वक लक्ष देऊन ऐक. त्याने असा विचार केला पाहिजे की, यापूर्वी आपण जेवढे कष्ट घेतले त्यांचे मला काय फळ मिळाले ? (४१९)

नदीत धुंडिती ते आपण पाहे । परी येकही पडिला न लाहे ।
तैशी साधनें करितां लवलाहें । मी सुटलो न वाटे ॥ २० ॥
लोक नदीत शोधत होते ते आपण पाहिले आहे. त्यांना नदीत पडलेला एकही माणूस सापडला नाही. त्याप्रमाणे मी इतकी साधने मोठ्या तत्परतेने केली, तरी मी सुटलो असे मला वाटले नाही. (४२०)

आणि मी बोंबले हाका मारी । परी कोणी धावेना कैवारी ।
तैसा मी दिननिशीं भजन करी । परी देव कां न भेटे ॥ २१ ॥
मी पुष्कळ ओरडलो, हाका मारल्या, पण एक देखील माणूस मला सोडवण्यासाठी धावला नाही. त्याप्रमाणे मी दिवसरात्र भजन करत होतो, तरी देव का बरे मला भेटला नाही ? (४२१)

जरी मी खरा वाहवतों । तरी केवीं रडतो बोंबलत ।
केवीं तारी तारी उच्चारित । मी अज्ञान जरी ॥ २२ ॥
मी खरोखरच वाहून गेलो असतो तर मी रडू शकलो असतो काय ? मी ओरडू शकलो असतो काय ? त्याप्रमाणे मी खरोखरच अज्ञानी असतो तर ' 'माझा उद्धार करा, माझा उद्धार करा, '' असे उद्‌गार मी कसे काढू शकलो असतो ? (४२२)

आणि पडला पडिलिया न दिसे । हें तो मज सार दिसे ।
दिसे तरी मी पडिलों नसे । या नांव विवेक ॥ २३ ॥
'' आणि पडणाऱ्या माणसाला प्रत्यक्ष पडलेला माणूस दिसत नाही. इथे तर तो पडलेला संपूर्ण माणूस मला दिसत आहे ! ज्याअर्थी मला तो पडलेला दिसतो आहे. त्याअर्थी मी पडलेलो नाही. '' असा तो पडणारा माणूस. विचार करतो. याला विवेक म्हणतात. (४२३)

तैसा मी अंतःकरणापासून । देहापर्यंत जितुकें संपूर्ण ।
जाणतसें सर्वांलागून । तरी मी वाहवे केवीं ॥ २४ ॥
त्याप्रमाणे मी अंतःकरणापासून ते देहापर्यंत सर्व तत्त्वांना जाणतो, तर मग मी वाहून गेलो हे कसे शक्य आहे ? (४२४)

जरी प्रवृत्तींत वाहवतों । तरी मी आपआपणा न पाहतों ।
मनादि विषयास्त अवलोकित । तरी मी हा नव्हे ॥ २५ ॥
जर मी प्रवृत्तीत वाहून गेलो असतो तर स्वतःच स्वतःला कसा पाहू शकलो असतो ? मनापासून विषयांपर्यंत सर्व तत्त्वांना मी पाहात असेन तर वाहून जाणारा मी नव्हे. (४२५)

जरी मीच आपआपणा । अमुक अमुकसा दिसेना ।
तरी मज कृपाळू गुरुराणा । दावील अपरोक्ष ॥ २६ ॥
जर मीच स्वतःला अमुक अमुक म्हणून दिसत नसेन, तर मग श्रीसदुरूच आता मला तसा तो प्रत्यक्ष दाखवतील. (४२६)

ऐसा रविदत्ता विवेक जयासी । असेल अंतरीं निश्चर्येसी ।
तयासीच सद्‌गुरु उपदेशी । येरां उपेक्षी ॥ २७ ॥
रविदत्ता, अशा प्रकारचा विवेक ज्याच्या मनात पक्का झाला असेल, त्यालाच सहुरू उपदेश करतात. इतरांची ते उपेक्षाच करतात. (४२७)

वृद्धी बैसोनि पडिलो मानी । तयासी खरेपणे सांगे कोणी ।
कीं तूं न पडता स्वस्थानी । असी वृक्षी ॥ २८ ॥
वृक्षावर बसला असून आपण पडलो आहोत, असे जो मानतो त्याला कोणी खरी वस्तुस्थिती सांगितली, की 'तू पडलेला नाहीस. तू वृक्षावर स्वतःच्या जागी सुखाने बसलेला आहेस. ' (४२८)

परी त्यासी सत्य वाटतें । पडिलों निर्दय न काढी मातें ।
तैसाचि मी देह वाटे जयातें । जन्मतो मरतो खरा ॥ २९ ॥
तर ते त्याला पटत नाही. त्याला खरोखरच वाटत असते की ' आपण पडलोच आहोत आणि हा निर्दय माणूस आपल्याला बाहेर काढत नाही आहे. ' त्याप्रमाणे ' आपण देह आहोत, ' असे ज्याला वाटते तो खरोखरच मानतो की आपण जन्म घेतो, आपण मृत्यू पावतो. (४२९)

तयासी शास्त्र आणि गुरु सांगती । कीं देह नव्हेसी तूं आत्या चिऱ्यर्ति ।
परी तो सत्य न मानी मूढमती । तया उपाय काय ॥ ३० ॥
अशा माणसाला शास्त्रे आणि सद्‌गुरू सांगतात की, ' अरे, तू देह नाहीस, तू चिद्र्रप आत्मा आहेस' पण त्या मूर्खाला ते खरे वाटत नाही, यावर उपाय काय ? (४३०)

तयाची उपेक्षाचि गुरु करी । कारण कीं योग्य नव्हे अधिकारी ।
रविदत्ता ऐसें मानिसी अंतरीं । कीं गुरु निर्दय ॥ ३१ ॥
सद्‌गुरू त्याची उपेक्षाच करतात. कारण तो उपदेशाला योग्य असा अधिकारीच नाही. रविदत्ता, यावर तू मानशील की, 'सद्‌गुरूच निर्दय आहेत. ' (४३१)

बुडतिया पाहून काढीना । भवव्याघे धरिलें सोडवीना ।
तरी निर्दया माजी काय उणा । येविषयीं ऐके ॥ ३२ ॥
'तो माणूस बुडत असताना पाहूनसुद्धा ते त्याला बाहेर काढत नाही आहेत ! संसारूपी वाघाने त्याला पकडले असूनसुद्धा ते त्याला त्याच्या तावडीतून सोडवत नाही आहेत ! मग निर्दय माणसापेक्षा ते कोणत्या बाबतीत कमी आहेत ? ' तर या संदर्भात आता ऐक. (४३२)

प्रवाही जरी खरा पडता । निर्दय ह्मणावा त्या उपेक्षिता ।
बैसला पाहून वृक्षावकता । त्यागितां दोष नाहीं ॥ ३३ ॥
तो खरोखरच प्रवाहात पडला असता, आणि सद्‌गुरूनी त्याची उपेक्षा केली असती, तर त्यांना निर्दय म्हणणे योग्य ठरले असते. पण त्याला वृक्षावर स्वस्थ बसलेला पाहिल्यानंतर त्यांनी त्याची उपेक्षा करून ते पुढे निघून गेले, तर या त्याग करण्यात त्यांच्याकडे काही दोष येत नाही. (४३३)

तैसा आत्मा सर्वगत असोनी । परिपूर्ण असंग भिन्नपणी ।
कदा न स्पर्शे जन्ममरणी । सुखदुःखे नातळे ॥ ३४ ॥
त्याप्रमाणे आत्मा सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. तो परिपूर्ण आहे. तो असंग आहे, तो सर्व सुष्ट पदार्थापेक्षा भिन्न आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू त्याला स्पर्श करत नाहीत, त्यामुळे सुखे आणि दु: खे त्याच्यापर्यंत कधीच पोहोचत नाहीत, हे सद्‌गुरू जाणतात. (४३४)

येणे मात्र समे मानिलें । कीं जन्ममरण मज लागलें ।
परी सद्‌गुरु जाणती आपुले । ठाई आपण ॥ ३५ ॥
पण हा मात्र श्रमाने मानत असतो की, 'माझ्यामागे जन्म आणि मरण ही लागलेली आहेत. ' पण सद्‌गुरू मात्र हे जाणून असतात की, कोणासच जन्ममरण नाहीत. आत्मा अविकृतपणे आपल्या जागी सुखरूप असतो. (४३५)

खरें बुडती तरी तारावे । खरें बांधिलें तरी सोडवावे ।
ऐसिये निश्चर्ये पाहोनि जावे । तया उपेक्षनी ॥ ३६ ॥
खरोखरच बुडत असतील त्यांना तारणे योग्य आहे. ते बंधनात पडले असतील तर त्यांना सोडवणे आवश्यक आहे. असा त्यांचा निश्चय असत्यामुळे ते या भ्रमाने संसारचक्रात सापडलेल्या माणसाला उपेधून जातात. (४३६)

कोणासींच नाहीं बंधन । कवणा नाहीं जन्ममरण ।
उगेचि मानिती पामर जन । त्या उपेक्षितां बाथ काय ॥ ३७ ॥
खरे तर कोणालाच बंधन नाही. कोणालाही जन्ममरण नाही. पण हे करंटे लोक उगीचच तसे मानतात. तेव्हा त्यांची उपेक्षा करण्याने काय बिघडणार आहे ? (४३७)

ऐसियासी ब उपेक्षितां । गुरूली न संभवे निर्दयता ।
तस्मात् ऐक बापा रविदत्ता । सत्य वचन आमुचे ॥ ३८ ॥
अशा व्यक्तीची निर्धाराने उपेक्षा केली तर त्या सद्‌गुरूवर निर्दयतेचा आरोप करता येणार नाही. म्हणून हे रविदत्ता, आमचे बोलणे सत्य आहे. (४३८)

विवेकी यासी उपदेश करूं । अविवेकिया हातीं न धरू ।
मागूनिही हाचि निर्धाक । चालत आला ॥ ३९ ॥
जो विवेकी असेल तर त्याला आम्ही उपदेश करू. अविवेकी पुरुषाला आम्ही हाताशी धरणार नाही. अशाच प्रकारचा दंडक पूर्वीपासून चालत आलेला आहे. (४३९)

आणि वर्तमानीं पुढें होणार । पीर ज्ञात्याचा हाचि निर्धार ।
अंगीकारावें जया अधिकार । येरां उपेक्षावें ॥ ४० ॥
तोच वर्तमानकाळात चालू आहे, आणि पुढेही चालू राहणार आहे. ज्यांना अधिकार (पात्रता) आहे त्यांचा स्वीकार करावा आणि इतरांची उपेक्षा करावी. (४४०)

आणिकही मानिसी तूं ऐसें । कीं अन्य साधन सांगावे त्या ऐसें ।
तरी अवधारावें मानसे । दृष्टान्सासहित ॥ ४१ ॥
तुला असेही वाटत असेल की, सद्‌गुरूनी अशा भान माणसाला शक्य होईल असे दुसरे एखादे साधन सांगावे. तर नीट लक्ष देऊन ऐक. तुला दृष्टान्ताच्या साहाय्याने स्पष्ट करून सांगतो. (४४१)

पडलियासी टाकून गळ । प्रवाही धुंडिती जन बरळ ।
परि जे सम नसती बाष्कळ । ते अनुमोदन देती ॥ ४२ ॥
मूर्ख माणसे पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाला वर काढण्यासाठी त्या प्रवाहात गळ टाकून शोधत राहतात. परंतु जे त्यांच्यासारखे मूर्ख नसतात पण चावट असतात, ते त्यांना प्रोत्साहन देतात. (४४२)

तैशी व्रतें तपें अनुष्टानें । दाने तीर्थाटनें पारणे ।
यज्ञ याग पुरसरणे । इत्यादि क्रिया ॥ ४३ ॥
त्याप्रमाणे व्रते, तपे, अनुष्ठाने, दाने, तीर्थाटने, पारणी, यज्ञयाग, पुरश्चरणे इत्यादी क्रिया म्हणजे उगाच गळ टाकण्याच्या क्रिया होत. (४४३)

अर्चन प्रतिमादिकाचें । अथवा भजन आवडत्या देवाचे ।
ऐसें साधन नाना परीचे । मोक्षा अनुपयोगी ॥ ४४ ॥
त्याचप्रमाणे प्रतिमा इत्यादीच्या पूजा, अथवा आवडत्या देवाचे भजन, याप्रकारची निरनिराळी साधने मोक्षाला निरुपयोगी असतात. (४४४)

हेंचि नानाशास्त्रे प्रतिष्ठिती । पुराणेंही गलबला करिती ।
बहु कासया वेदही गाती । परी तो अर्थवाद ॥ ४५ ॥
परंतु निरनिराळी शास्त्रे हेच करायला सांगून त्यांची प्रतिष्ठा वाढवत असतात. पुतणेही तसाच गलबला करतात. जास्त कशाला ? वेददेखील त्यांचा महिमा गात असतात. पण तो सगळा अर्थवाद (तथ्य नसलेली स्तुती) असतो. (४४५)

येणे जीव हा बंधांतून । न सुटे हें सत्य सत्य प्रमाण ।
ऐसें ज्ञाते जाणती पूर्ण । कीं हे निरर्थक ॥ ४६ ॥
या प्रकारांनी जीव हा बंधनातून सुटत नाही, हे अनेकवार सत्य आहे. खरे ज्ञाते हे पूर्णपणे जाणतात की, हा सर्व प्रकार निरर्थक आहे. (४४६)

तस्मात ज्ञाते अन्य साधना । कदां न सांगती मुमुक्षु जना ।
मुमुक्षु नसतो येरां ही प्रेरणा । सहसा न करिती ॥ ४७ ॥
त्यामुळे ज्ञाते पुरुष मुमुक्षू लोकांना अशा प्रकारची भलती साधने केव्हाही सांगत नाहीत. जे मुमुक्षू नाहीत, त्यांनाही अशा प्रकारची साधने करण्यास प्रेरणा देत नाहीत. (४४७)

ते तो करितची असती सर्वे । तेंचि कासया प्रयोजावें ।
इतुकियापासून जें पस्तावे । हदयशूद्धि होऊनि ॥ ४८ ॥
कारण असली साधने सर्वजण करतच असतात. त्यांच्यासाठी वेगळे उद्युक्त करण्याची गरज काय ? वास्तविक पाहता या सर्व कर्मकांडापासून हदयशुद्धी होताच परत फिरावे. म्हणजे या क्रियाकलापातून काही निष्पन्न होत नाही, हे लक्षात येणे ही त्यांची हदयशुद्धी होय. (४४८)

जे सर्व कर्मांपासून परतले । तेचि अंतर शुद्धीतें पावले ।
पुढे सहली शरण गेले । करूं लागले श्रवण ॥ ४९ ॥
जे सगळ्या कर्मकांडापासून माघारे परत फिरले त्यांचेच अंतःकरण शुद्ध झाले, असे समजावे. मग ते सदगुरूंना शरण जाऊन श्रवणादी योग्य साधने करू लागतात. (४४९)

श्रवणा परतें साधन कांही । अज्ञाननिरासा दुजे नाहीं ।
तेंही श्रवण वेदान्ताचे पाही । जेथें ब्रह्माल्पा ऐक्य ॥ ५० ॥
अज्ञानाचा निरास करण्यासाठी श्रवणासारखे दुसरे साधन नाही. ते श्रवण सुद्धा जेथे ब्रह्म आणि आत्मा यांचे ऐक्य प्रतिपादन केलेले असते, अशा अद्वैत वेदांताचेच श्रवण असले पाहिजे. (४५०)

वृक्षाग्राचिया पुरुषाली । अन्य वाक्यें न येती उपयोगासी ।
एकचि वाक्य कीं प्रवाही न घडसी । असी वृक्षी स्वस्थ ॥ ५१ ॥
झाडाच्या अग्रभागी बसून उगीचच 'मी पडलो, मी पडलो' असे ओरडणाऱ्या पुरुषाला इतर वाक्ये उपयोगास येत नाहीत. त्याला एकच वाक्य उपयोगी ठरते ते म्हणजे, '' अरे बाबा, तू प्रवाहात पडलेला नाहीस, वृक्षावर सुखरूप बसला आहेस. '' (४५१)

तैसें परोक्षही सच्चिदानंद । ब्रह्म एक आहे विशुद्ध ।
तेणें वाक्यें नव्हे बोध । अधिकारी जरी ॥ ५२ ॥
त्याप्रमाणे 'ब्रह्म हे सच्चिदानंद आहे, ते विशुद्ध, निर्मळ आहे' अशा प्रकारचे परोक्ष वाक्य (अनुभवरहित पोकळ वाक्य) हे देखील तेथे उपयोगाचे नाही. तो मनुष्य अधिकारी असला तरी अशा पोकळ वाक्यांनी त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. (४५२)

तूचि प्रत्यक्ष ब्रह्म असी । वेदाची वाक्यें जी ऐशी ।
तींच गुरु बाणविती शिष्यासी । विवेचनद्वारा ॥ ५३ ॥
वेदातील 'तूच प्रत्यक्ष ब्रह्म आहेस' अशा प्रकारची जी वचने आहेत, त्या वचनांचे विवेचन करून सद्‌गुरू शिष्याच्या अंगी बाणवतात. (४५३)

ऐसें हें जे वाक्य अपरोक्ष । तेणेंचि ज्ञान होय प्रत्यक्ष ।
तेव्हांचि अधिकारिया होय मोक्ष । अज्ञान नासोनी ॥ ५४ ॥
असे जे प्रत्यक्ष अनुभव देणारे वचन असते त्यानेच त्या शिष्याला प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते. तेच अपरोक्ष ज्ञान होय. त्या वचनाने त्या अधिकारी शिष्याचे अज्ञान नष्ट होऊन त्याच वेळी त्याला मोक्ष प्राप्त होतो. (४५४)

ऐसेंही वाक्य जरी बोधिलें । आणि शिष्याप्रतिही विश्वासले ।
परी विवेचन न होतां व्यर्थ गेलें । जाले पाषांडी ॥ ५५ ॥
कधीकधी असेही होते की, अशा प्रकारच्या अद्वैत प्रतिपादक वाक्याचा शिष्याला उपदेश केला, आणि त्याचाही त्यावर विश्वास बसला; पण त्याचे विवेचन झाले नाही तर ते वाक्य व्यर्थ होते आणि तो शिष्य पाखंडी होतो. (४५५)

गुरूनेंचि ब्रह्म खणता । देहादिकांसी मानिली जात्यता ।
तस्मात् पाखाडी ययापरता । हुजा कोण असे ॥ ५६ ॥
सदगुरूंनी तू ब्रह्म आहेस असे म्हटले, आणि शिष्याने देहादिकांस आत्मा मानले तर त्याच्यासारखा दुसरा पाखंडी कोणी असेल काय ? (४५६)

हें ज्ञान नव्हे अधिक अज्ञान । वाढलें दृढ जाले बंधन ।
ऐसा पाखाडी कोटि कल्पेकरून । न सुटे कदां ॥ ५७ ॥
हे खरे ज्ञान नव्हे, उलट अज्ञानच अधिक वाढले असे म्हणावयाचे. त्यामुळे बंधन अधिकच पक्के होते. अशा प्रकारचा पाखंडी कोट्यवधी कत्ये उलटली तरी कधी सुटणार नाही (मुक्त होणार नाही). (४५७)

तस्मात् खरें जयासी तरणें । तेणें विवेचन सांग करणें ।
सर्व आभासाहून ओळख । यथार्थ आत्यत्व ॥ ५८ ॥
तेव्हा ज्याला खरेच मुक्त व्हायचे आहे, त्याने गुरुवाक्याचे संपूर्ण विवेचन केले पाहिजे. इतर सर्व आभासिक गोष्टींमधून स्वतःचे खरे आत्मस्वरूप ओळखावे. (४५८)

आतां तेचि विवेचन कैसे । बोलिजे तें सावधान मानसे ।
अगा हे रविदत्ता ग्रहण करी तैसें । विवेचून य ॥ ५९ ॥
आता तेच विवेचन कसे करायचे ते सागू रविदत्ता ते सावधान मनाने प्रयत्नपूर्वक विवेचन करून (त्याचे मनन, निदिध्यास करून) ग्रहण कर. (४५९)

श्लोक - बोधाभासाच्छद्धबोधो विविच्येदतियत्नत : ॥ ३ ॥ (उत्तरार्ध)
अर्थ : अत्यंत कठोर परिश्रम करून चिदाभासापासून शुद्ध चैतन्य कसे वेगळे आहे, हे विवेचनपूर्वक समजून घ्यावे. । । ३ । । (उत्तरार्ध)

बोधाभासाहून शुद्ध बोध । विवेचून घेइजे प्रसिद्ध ।
तोचि आत्या ब्रह्म विशुद्ध । बोधाभास अनात्मा ॥ ६० ॥
बोधाभासाहून शुद्ध बोध विवेचनपूर्वक वेगळा काढून समजून ध्यावा. शुद्ध बोध म्हणजेच आत्मा आहे. तोच विशुद्ध ब्रह्म आहे, आणि बोधाभास म्हणजे जीव होय. तो अनात्मा आहे. (४६०)

एकदां विवेचनें नाहीं कळले । परी वारंवार पाहिजे विवेचिले ।
यास्तव अति प्रय झणितले । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ६१ ॥
एकदा विवेचन (विचारपूर्वक स्पष्टीकरण) केल्यानंतर जर कळले नाही तर ते पुन: पुन: केले पाहिजे. यासाठीच मूळ श्लोकात कठोर परिश्रम करून असे म्हटले आहे. ते त्रिवार सत्य आहे. (४६१)

वृक्षी बैसला तो मुख्य बिंब । प्रवाही दिसे तो प्रतिबिंब ।
हे दोन परी असती स्वयंभ । एक सत्य एक मिथ्या ॥ ६२ ॥
वृक्षावर जो बसला आहे तो मूळ बिंब आहे. नदीच्या प्रवाहात जो पडलेला दिसत आहे, ते त्याचे प्रतिबिंब होय. हे दोन आहेत, पण ते दोघेही स्वतंत्र आहेत त्यातला एक सत्य आहे आणि दुसरा मिथ्या आहे. (४६२)

जें दिसे तें सत्य नाहीं । उगेंच पडिले वाटे प्रवाही ।
न दिसे जे पाहे सर्वांही । तें प्रवाहावेगळें ॥ ६३ ॥
जे दिसते (प्रतिबिंब) ते सत्य नाही, खोटे आहे. वृक्षावर बसलेल्यास उगीचच आपण प्रवाहात पडलो असे वाटते. त्या वृक्षस्थाला आपण वृक्षावरच आहोत हे दिसत नाही पण तो सर्वांना पाहात असतो. तो प्रवाहातील प्रतिबिंबाहून वेगळा आहे. (४६३)

तेवींच स्फूर्तीपासून देहान्स । जितुकी तत्त्वें ही समस्त ।
तितुकींही जाणतिया दिसत । परी तीं असत्य सर्व ॥ ६४ ॥
त्या दृष्टांताप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी होणाऱ्या मूलस्फुरपणापासून ते देहापर्यंत जेवढी तत्त्वे आहेत ती सगळी जाणत्या पुरुषाला दिसतात. पण ती सर्व असत्य म्हणजे खोटी आहेत. (४६४)

जो सर्वत्रांसी स्वप्रकाश । साधनेंविण जाणतसे ।
परी तो कळेना कवणा अल्पसें । आणि आपणा न देखे ॥ ६५ ॥
जो या सर्व तत्त्वांना प्रकाशित करतो, म्हणजे अन्य साधनावाचून जाणतो, परंतु तो कोणालाही थोडादेखील दिसत नाही, अगदी त्याला स्वत : लाही दिसत नाही. (४६५)

तोचि आत्या ब्रह्म निश्चयेसी । विलक्षण असे या सर्वांसी ।
जन्ममरणा पापपुण्यासी । देहकृता नातळे ॥ ६६ ॥
तोच आत्मा किंवा ब्रह्म आहे हे निश्चयपूर्वक जाणावे; तो या सर्व तत्त्वांपेक्षा वेगळा आहे त्याला जन्म किंवा मृत्यू देहाकडून घडणारी पापे किंवा पुण्ये स्पर्श करू शकत नाहीत. (४६६)

जो प्रतिबिंबरूप आभास । जो मागें बोलिला बहुवस ।
आणि पुढेही बोलिजे तयास । तोचि कर्ता भोक्ता ॥ ६७ ॥
पण जो प्रतिबिंबरूप आभास आहे, ज्याच्याबद्दल अगोदर खूप सांगून झालेले आहे, आणि पुढेही बोलावे लागणार आहे तोच खरा त्या पापपुण्याचा कर्ता आहे, आणि त्या जन्ममरणांचा भोक्ताही आहे. (४६७)

ऐसा आभास जो मिथ्या दिसे । तो तिही काळीही सत्य नसे ।
जो देखणा तो तिही काळी असें । तोचि आत्या आपण ॥ ६८ ॥
असा जो खोटा आभास दिसतो तो भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळात सत्य ठरत नाही. पण त्याला पाहणारा जो असतो तो तिन्ही काळात असतो. तोच स्वत: आत्मा आहे. (४६८)

आत्या ह्यणिजे आपणा ह्मणावें । येर सर्व तें आपण नव्हे ।
ऐसें जाणोन अंगें व्हावें । देह असतां ब्रह्मरूप ॥ ६९ ॥
हा आत्मा जो आहे तो आपणच आहोत. बाकीचे सर्व पदार्थ आपल्यापेक्षा वेगळे आहेत. आत्मस्वरूप नाहीत. हे ओळखून आपणच स्वत: देह असताच ब्रह्मरूप व्हावे (४६९)

आल्याचि कैसा ब्रह्मरूप । ऐसा असे जरी आक्षेप ।
तरी सावधान असावें साक्षेप । उभयाची लक्षणें बोलू ॥ ७० ॥
आत्मा हाच ब्रह्मरूप कसा असेल, असा जर कोणी आक्षेप घेतला तर प्रयत्नपूर्वक लक्ष द्या. आता दोघांचीही लक्षणे सांगतो. (४७०)

जगउत्यत्ति स्थितिलय । मायेस्तव होत जाय ।
पीर तिही काळी जे अद्वय । अबाधित तें सडूप ॥ ७१ ॥
जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही मायेमुळे होत असतात. परंतु भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळात जे अद्वैतरूपाने अबाधित असते, निर्विकार असते, ते सत्. रूप आहे. (४७१)

सृष्टीपूर्वी सद्‌रूप होतें । यास्तव अधिष्ठान या समाते ।
सत्यावीण अन्यथा भासातें । दिसणें न घडे ॥ ७२ ॥
हे त्याचे सद्‌रूप सुष्टीपूर्वी होते. त्यामुळे ते श्रमरूप दृश्य सुष्टीचे अधिष्ठान आहे. कारण सत्याच्या अधिष्ठानाशिवाय भास दिसूच शकत नाही. (४७२)

एव सूष्टिपूर्वी आहेच आहे । सृष्टि होतां माजी राहे ।
ह्मणोनि सर्वा आहेपणा लाहे । घटीं मृत्तिका जेवी ॥ ७३ ॥
त्यामुळे हे सदूप सुष्टीपूर्वी आहेच आहे. सृष्टी निर्माण झाल्यानंतर ते त्या सुष्टीला व्यापून राहतेच. म्हणून सर्व सुष्ट पदार्थांना अस्तित्व प्राप्त होते. घटापूर्वी मृतिका असतेच; घटामध्येही ती असतेच. तसेच सद्रपाचे आहे. (४७३)

पुढे नाक्ती जातां सर्व । उरे तें सडूप स्वयमेव ।
जेवी घट भंगतां रूप नांव । मृत्तिका उरे ॥ ७४ ॥
त्यानंतर सर्व सुष्ट विश्वाचा नाश झाल्यानंतरही जे उरते ते सदूप असते. घटाचा भंग झाल्यानंतर त्याचे रूप नाव नष्ट होते आणि खाली उरते ती मृत्तिकाच असते. (४७४)

एव सुष्टीच्या आदि अती उरे । मध्येंही असे निर्विकारें ।
तेंचि सडूप ब्रह्म साचारें । अविनाश सदा ॥ ७५ ॥
अशा प्रकारे सुष्टीच्या आरंभी आणि अंती जे असते, मध्यकाळातही जे निर्विकार राहून असते. तेच खरोखर सदूप ब्रह्म होय. ते सर्वकाळी अविनाशी असते. (४७५)

जेवीं तिही काळी सत् न नासे । तेवीं सदोदित ज्ञानही असे ।
तेंचि चिमूप निर्विशेर्षे । शून्य देखणे ॥ ७६ ॥
ज्याप्रमाणे सधूप तिन्ही काळी नष्ट होत नाही, त्याप्रमाणे ज्ञानही सर्वकाळ अविनाशी असते. तेच चिद्रप असते. ते चिद्र्रप सामान्यत्वाने शून्यासही पाहात असते. (४७६)

माया असतां प्रकाशावी । माया निमतां अवलोकावी ।
तया नाहीपणाची प्रतीति घ्यावी । तेचि ज्ञप्ति चिदूप ॥ ७७ ॥
माया जोपर्यंत असेल तोपर्यंत तिला प्रकाशित करावे (म्हणजे ती जाणावी), ती नाहीशी होत असता तिचे अवलोकन करावे, तिच्या नसलेपणाचाही अनुभव ध्यावा. हेच या चिद्‌रूप ज्ञप्तीचे (ज्ञानाचे) स्वरूप आहे. (४७७)

एव सत् चित्र लक्षणें दोन । तेवींच तिसरे आनंदघन ।
सर्वथा सुखदुःखविहीन । आनंदरूप ॥ ७८ ॥
अशा प्रकारे ब्रह्माची सदूप आणि चिदूप लक्षणे स्पष्ट झाली. त्याचप्रमाणे त्याचे ठोस आनंदरूप हे त्याचे तिसरे लक्षणही असते. ते पूर्णपणे सुखदु: खरहित असून सदैव निर्भेळ आनंदरूप असते. (४७८)

स्कृरणापासून आलीकडे । दिसती सुखदुःखाचे साकडे ।
यास्तव आनंदरूपता न जोडे । सुखदुःखाभावी सिद्ध ॥ ७९ ॥
हे सुखदुःखाचे संकट ब्रह्माच्या ठिकाणी झालेल्या मूलस्फुरणानंतरच सुरू होते. त्यामुळे ती आनंदरूपता लक्षात येत नाही. ती सुखदुःखे नसताना सिद्धच असते. (४७९)

ऐसें सच्चिदानंद ब्रह्म । तिही लक्षणीं सर्वदा सम ।
तोचि हा कूटस्थ आत्माराम । निर्विकाररूप ॥ ८० ॥
असे ब्रह्म सच्चिदानंदस्वरूप असून या तीन लक्षणांनी सर्वकाळ समान आहे. तोच हा निर्विकाररूप कूटस्थ आत्माराम आहे. (४८०)

तेचि लक्षणें जात्यत्वीऐ असती । यास्तव ब्रह्मचि आत्मा चिऱ्यर्ति ।
श्रुति युक्ति आणि अनुभूति । तिही प्रतीती सिद्ध ॥ ८१ ॥
जी ब्रह्माची लक्षणे आहेत तीच लक्षणे आत्म्याच्या ठिकाणी आहेत. म्हणून चिन्मूर्ती असलेला आत्मा ब्रह्मच आहे. धुती, युक्ती आणि अनुभव या तिन्ही प्रमाणांनी हे सिद्ध आहे. (४८१)

हेंचि लक्षण जात्यत्वीऐ कैसे । प्रस्तुत बोलिजे असे तैसें ।
तें लक्षण असतां विश्वासे । मन हें साधकाचे ॥ ८२ ॥
ब्रह्माची सच्चिदानंद ही लक्षणे आत्म्याच्या ठिकाणी कशी आहेत, ते आता स्पष्ट करतो. ती लक्षणे ऐकत्यानंतर साधकाच्या मनात विश्वास निर्माण होईल. (४८२)

सच्चिदानंद ब्रह्म बोलिले । तेंचि जात्यत्वीऐ असे पहिलें ।
जें कां अस्ति भाति प्रिय ह्यणितलें । अपर पर्याये ॥ ८३ ॥
ब्रह्माच्या ठिकाणी जी सत् चित आनंद ही लक्षणे सांगितली जातात, तीच आत्म्याच्या ठिकाणी प्रथमपासूनच आहेत. हीच लक्षणे पर्यायाने अस्ति, भाति आणि प्रिय म्हणून अनुक्रमे ओळखली जातात. (४८३)

अस्ति ह्मणजे आहेपणा । तोचि सदूप पूर्णपणा ।
भाति ह्मणजे चिमूप देखणा । प्रिय रूप आनंद ॥ ८४ ॥
अस्ति म्हणजे आहेपणा अथवा सत्ता. हा आहेपणा म्हणजेच पूर्णपणे सद्‌रूप आहे. भाति म्हणजे चिद्र्रप अथवा देखणेपणा (पाहाण्याची क्षमता) आणि प्रिय म्हणजेच आनंद होय. (४८४)

एव अस्ति भाति प्रियरूप आल्या । तोचि सच्चिदानंद परमात्मा ।
येथें भेद नाहीं येक नामा । वाचून कांहीं ॥ ८५ ॥
अशा प्रकारे आत्मा हा अस्ति भाति प्रियरूप असून तोच सच्चिदानंद परमात्मा आहे. येथे नामभिन्नतेखेरीज काहीही भेद नाही. (४८५)

सूर्य भातू नामे दोन । पीर द्विधा नव्हे सहसकिरण ।
तैसाचि आल्या ब्रह्म पूर्ण । नामभेदे एकरूप ॥ ८६ ॥
सूर्य, भातू अशी दोन नावे असली तरी त्यामुळे सूर्य काही दोन प्रकारचा होत नाही. त्याप्रमाणे आत्मा आणि ब्रह्म ही केवळ नावे भिन्न असली तरी ती दोन्ही पूर्णपणे एकरूपच आहेत. (४८६)

असो अस्ति भाति आणि प्रिय । याचा पिडी कैसा प्रत्यय ।
तेचि बोलिजे यथान्वय । दृष्टान्सासहित ॥ ८७ ॥
आता अस्ति, भाति आणि प्रिय या आत्म्याच्या लक्षणांचा पिंडामध्ये कसा अनुभव येतो, तेच आता प्रसंगानुसार दृष्टान्तासहित सांगण्यात येईल. (४८७)

मी आहें जो सर्व जनांसी । आहेच आहे दिवा कीं निशी ।
मी नाहीं हा संशय कोणासी । कधीही नव्हे ॥ ८८ ॥
'मी आहे' असा सर्वच लोकांचा प्रत्यय (अनुभव) असतो. तो रात्र असो की दिवस, सर्वकाळी नेहमीच असतो. 'मी नाही' असा संशयसुद्धा कोणालाही कधीही येत नाही (४८८)

सर्वत्रांसी धुसोनि पहावे । कीं सखया अससी कीं नव्हे ।
तरी तो ह्मणे हें काय बोलावे । नलगे असतां ॥ ८९ ॥
सर्वाना हे विचारून पाहावे की, 'मित्रा, तू आहेस की नाहीस ? ' तर तो म्हणेल की, 'मी प्रत्यक्ष असताना काही बोलण्याची गरजच नाही. ' (४८९)

जरी मी नाहीं उगेंच बोलतां । लाज वाटे तयाचे चित्ता ।
आणि अहाचि वाटे समस्तां । हसून भाविती सम ॥ ९० ॥
जरी 'मी नाही' असे तो सहज म्हणून गेला, तर त्याच्या मनाला लाज वाटते. आणि बाकीच्या लोकांना ते खोटेच वाटते. ते त्यावर हसून ' असे म्हणणे हा भ्रम आहे' असे म्हणतात. (४९०)

ऐसा आहेपणा जो आपुला । सर्वत्रीं असे संचला ।
येथें संशय नाहीं कोणाला । हा अस्ति आत्या ॥ ९१ ॥
असा आपला आहेपणा सगळ्यांच्या मनात व्यापून राहिलेला असतो. याचा अर्थ असा की आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल कोणाच्याही मनात संशय नसतो. (४९१)

हा आहेपणा जागतींत असे । स्वप्नीही भास देही वसे ।
बहु बोलणें कासया अपैसें । आहे झोपेमाजी ॥ ९२ ॥
आहेपणा जागृतीत असतो स्वप्नामध्ये आहेपणाचा भास मनात असतोच. जास्त काय बोलावे तो झोपेमध्येही सहजपणे असतो. (४९२)

झोपी गेला परी मी नाहीं । ऐसा प्रत्यय नसे कवणाही ।
मी निजेलों होतों निःसंदेहीं । या रीती आहे हा प्रत्यय ॥ ९३ ॥
झोपी गेला तरी 'मी नाही' असा अनुभव कोणालाही नसतो. मी 'निश्चितपणे झोपलो होतो' अशा प्रकारचा हा अनुभव आहे. (४९३)

एव आहेपणा सांगितला ऐसा । आतां चिडूप भातित्वे असे कैसा ।
तोही बोलिजे सावध असा । निरूपणासी ॥ ९४ ॥
अशा प्रकारे ' आहेपणाचे स्पष्टीकरण केले. आता चिद्र्रप ' भातिरूपाने कसे असते, तेही सांगतो. सावध राहून ते निरूपण ऐका. (४९४)

कर्णी शब्द हा जाणतसे । त्वची स्पर्शातें ओळखीतसे ।
शब्द स्पर्श हे दोन्ही भिन्नसे । परी ज्ञान दोहींचें येक ॥ ९५ ॥
कानाने शब्दाचे ज्ञान होते. त्वचेने स्पर्शाची ओळख पटते. शब्द आणि स्पर्श दोन्ही भिन्न वाटले तरी या दोहोंचे ज्ञान एकरूपच असते. (४९५)

शब्द स्पर्श जाणिले जया ज्ञाने । तेणेंचि रूपार्ते अनुभवणे ।
रस गंधातेंही ओळखणे । ज्ञाने याची ॥ ९६ ॥
ज्या ज्ञानाने शब्द आणि स्पर्श जाणले, त्याच शानाने रूपाचाही अनुभव येतो. याच ज्ञानाने रस आणि गंध यांचीही ओळख पटते. (४९६)

श्रोत्र ऐके पीर देखेना । डोळा देखे पीर ऐकेना ।
एव इंद्रियांचे धर्म घेववतीना । येकाचे येकासी ॥ ९७ ॥
कान ऐकू शकतो पण तो पाहू शकत नाही. डोळा पाहतो, पण तो ऐकू शकत नाही. अशा प्रकारे इंद्रियाचे धर्म एकाचे दुसऱ्याला घेता येत नाहीत. (४९७)

पीर पांचांर्ते जाणें येकले । तें कधींही न जाय लोपले ।
जरी ते विषय वेगळाले । परी ज्ञान येक ॥ ९८ ॥
परंतु या पाचही इंद्रियांचे ज्ञान एकच असते. ते कधीही लोपत नाही. जरी त्यांचे विषय वेगळेवेगळे असले तरी त्यांचे ज्ञान एकच आहे. (४९८)

हे असो कर्मीद्रयांची क्रिया । जाणणेंचि होय ज्ञाना या ।
अथवा जड पंचविषयां । जाणें तेचि ज्ञान ॥ ९९ ॥
याच शानाने कर्मेंद्रियांच्या क्रियाही जाणत्या जातात. पंचविषय जड असले तरी हेच ज्ञान त्यांना जड म्हणून जाणते. (४९९)

एव जागतीचे जितुके व्यापार । बहुधा परी पाचची प्रकार ।
तितुकेही जाणें सविस्तर । स्वप्रभे ज्ञान ॥ ५०० ॥
अशा प्रकारे जागृतीचे व्यापार पुष्कळ असले तरी त्या सर्वांचे पाचच प्रकार होतात. ते सर्व प्रकार हे एक शानच स्वतःच्या प्रभेने सविस्तर जाणू शकते. (५००)

अनेकधा व्यापार असतां । येकचि ज्ञान जाणें समस्तां ।
अंधार कीं प्रकाश न ह्मणतां । जाणें देहक्रिया ॥ १ ॥
अनेक प्रकारचे व्यापार असले तरी एकच ज्ञान त्या सर्वांना जाणू शकते. अंधार असो की प्रकाश काहीही असो ते सर्व देहाच्या क्रिया जाणते. (५०१)

ऐसें सर्व जागतींत जाणें । स्वप्नही ओळखावे तेणें ।
तें दुजे जरी मानिजे कोणे । तरी जागरीं नाठवी ॥ २ ॥
ते जागृतीतील सर्व क्रिया जाणते तसेच स्वप्नातील घडामोडीही तेच ज्ञान ओळखते. स्वप्नातल्या घडामोडी जाणणारे तत्त्व दुसरेच काहीतरी आहे, असे कोणी मानले, तरी जागे झाल्यानंतर त्या पुरुषाला ते स्वप्न आठवले नसते. (५०२)

स्वप्नीही विषय भासती । प्रत्यक्षाविण बुद्धीच कल्पिती ।
ते ते भासरूपे उमटती । परी विषय पांच ॥ ३ ॥
स्वप्नामध्येही विषय दिसतात. प्रत्यक्षात काहीच नसताना बुद्धीच एकटी त्यांची कल्पना करते. ते भासरूपाने आपल्याला दिसतात. पण बुद्धीने कितीही कल्पना केल्या तरी त्या विषयांचे प्रकार पाचच होतात. (५०३)

तेथें आपणही आहे येक । येर अन्य सुखदुःखदायक ।
त्या उभयांसीही प्रकाशक । येकले ज्ञान ॥ ४ ॥
तेथे आपण एक असतोच. बाकीचे सर्व विषय सुख दु ख देणारे असतात. या दोहोंनाही एकच ज्ञान प्रकाशित करते. (५०४)

याचि रीती स्वप्न जागर । जाणिले ज्या ज्ञाने सविस्तर ।
तेंचि ज्ञान निर्विकार । जाणें सुसीतें ॥ ५ ॥
याच प्रकारे ज्या ज्ञानाने जागृती आणि स्वप्न सविस्तर जाणले जातात, त्याच ज्ञानाने निर्विकार सुप्तावस्थाही जाणली जाते. (५०५)

सुझीत जाणणेचि नाहीं । ऐसें न कल्पावें कोणीं कांहीं ।
हें बोलणें पुढे सर्वही । कळे अनुक्रमें ॥ ६ ॥
सुप्तावस्थेत काहीच जाणणे नसते, असे कोणी मानू नये. त्यासंबंधीचा विचार पुढे यथाक्रम कळणारच आहे. (५०६)

प्रस्तुत दोनी अवस्था जेणे । जाणल्या असती ज्ञाने ।
तेणेंच सुझी अनुभव । बोलली येकरूपता ॥ ७ ॥
प्रस्तुत प्रसंगी जागृतावस्था आणि स्वप्नावस्था ज्या ज्ञानाने जाणत्या त्याच ज्ञानाने सुसावस्थाही अनुभवली जाते. यामुळे या तिन्ही अवस्थातील ज्ञानाची एकरूपता स्पष्ट केली आहे. (५०७)

ऐसिया नित्य अवस्था तीन । होत असती जीवालागून ।
परी तें येकलेंचि जाणें ज्ञान । आपुल्या प्रकाशे ॥ ८ ॥
अशा जीवाच्या नित्य अनुभवाच्या तीन अवस्था असतात. तरी पण एकच ज्ञान त्या तीनही अवस्थांना आपल्या प्रकाशाने जाणते. (५०८)

नैमित्तिक मुला समाधि । होय जरी केव्हां कधीं ।
परी तयासीही ज्ञान आधीं । जाणतचि असे ॥ ९ ॥
काही कारणाने मूर्च्छितावस्था अथवा समाधी अवस्था कधी कधी उद्‌भवतात, पण त्यांनाही हेच ज्ञान अगोदरच जाणून असते. (५०९)

अमुक ज्ञाना कळल्याविण । किंचित्कार्य नव्हे आन ।
होयसें नायको न देख पूर्ण । तिही ही लोकीं ॥ १० ॥
ज्ञानाला अगोदर कळल्याशिवाय कोणतेही अन्य कार्य होऊ शकते, असे पूर्ण तिन्ही लोकांतही कधी ऐकले नाही, वा पाहिले नाही. (५१०)

दिवसा ज्या ज्ञाने जाणिलें । प्रकाशामार्जी अनुभविले ।
त्याचि ज्ञाने निशीर्ते ओळखिलें । सूर्याभावीं ॥ ११ ॥
दिवसा ज्या ज्ञानाने प्रकाश असताना जाणले आणि अनुभवले त्याच ज्ञानाने रात्रीच्या वेळी सूर्य नसतानाही त्या विषयांना ओळखले. (५११)

जेणे आजि जाणिलें सर्वे । तो उद्या जाणेल स्वयमेर्वे ।
कालीचे शि आजींचे नवे । नव्हे सहसा ॥ १२ ॥
ज्याने आज सर्व जाणले, तो उद्याही आपण होऊन स्वाभाविकपणे जाणेल. कालचे ज्ञान शिळे होते किंवा आजचे ज्ञान नवे ठरते, असे सहसा काही होत नाही. (५१२)

रविवारीं ते मंदवारी । बीज पौर्णिमा येकसरी ।
शुक्ल कृष्ण पक्षा भेद परी । ज्ञान तें येक ॥ १३ ॥
जे रविवारी तेच शनिवारीही होते. द्वितीयेला जे ज्ञान होते तेच पौर्णिमेलाही एकसारखेच होते. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष यात भेद असतो पण त्या दोन्हींमध्ये होणारे ज्ञान मात्र एकच असते. (५१३)

बारा मास वर्षें साठी । वाउगी नामाची परिपाठी ।
परंतु दात वर्षांही शेवटीं । येकले ज्ञान जाणें ॥ १४ ॥
बारा महिने, साठ संवत्सर यांची वेगवेगळी नावे असतात. हा क्रम चालत आलेला आहे. परंतु अशा प्रकारे शंभर वर्षे उलटली तरी त्या सर्वांना एकटे ज्ञानच जाणत असते. (५१४)

गर्भी जाणे जाचणीसी । तेंच ओळखीतसे जन्मासी ।
बाळ तारुण्य वृद्धपणासी । येकलें ज्ञान जाणे ॥ १५ ॥
जे गर्भातील जाच जाणते, तेच ज्ञान जन्मकाळासही जाणते; एकटे ज्ञानच बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या सर्व अवस्थांस जाणते. (५१५)

एव मरणान्स एक देह जाणिला । दुजिया होतांच पाहूं लागला ।
मध्ये संधीही ओळखिला । एकले ज्ञाने ॥ १६ ॥
अशा प्रकारे मरणकाळपर्यंत एकच देह होता, हे त्याच ज्ञानाने जाणले, दुसरा देह प्राप्त होताच त्यालाही जाणतो. दोन देहांमधल्या (म्हणजे मरण आणि नवीन जन्म यांमधील) संधिकाळालाही ते एकच ज्ञान जाणते. (५१६)

ऐसे अनंत देह होऊन गेले । बहुधा चतुर्युगही लोटले ।
ऐसे कल्पही उदंड जाले । परि ते जाणिले ज्ञाने ॥ १७ ॥
असे अनंत देह होऊन गेले. बहुतेक करून चार युगेही लोटली असतील, त्याचप्रमाणे हजारो युगांचे कल्पकाळही झाले असतील, पण ते सर्व त्याच ज्ञानाने जाणले आहेत. (५१७)

नित्य कल्प नित्य कल्पाचा संधी । जाणत असे ज्ञान निरवधी ।
महाकल्पाचे लाही कधीं । जाणिल्याविण न राहे ॥ १८ ॥
नित्य कल्प, नित्य कल्पाच्या संधी, हे सर्व तेच अखंड ज्ञान जाणत असते. एवढेच काय पण महाकल्पांचे लयही जाणल्यावाचून ते राहात नाही. (५१८)

ऐसें ज्ञान जें सदोदीत । उपकरणाविण प्रकाशित ।
तिही काळी जे अबाधित । चिमूप येक ॥ १९ ॥
असे सदैव असणारे जे ज्ञान इतर कोणत्याही प्रकाशक पदार्थाचे साहाय्य न घेता सगळ्यांना प्रकाशित करते, जे भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांना अबाधितपणे प्रकाशित करते ते ज्ञान म्हणजेच चिद्र्रप होय. (५१९)

कधींही नाश नाहीं जयासी । तरी चितूपचि कीं अविनाशी ।
तोचि सडूप या दो लक्षणांसी । भेद सहसा नाहीं ॥ २० ॥
ज्याला कधी नाश नाही तरी ते चिद्र्रप असून अविनाशी आहे तेच सद्र्रपही आहे. तेव्हा चिद्र्रप आणि सद्र्रप या दोन लक्षणांमध्ये भेद मानण्याचे कारण नाही. (५२०)

एव सहूप तें चिमूप । तयासि अस्ति भाति हे जत्य ।
आतां तिसरे जें कां आनंदरूप । प्रियताही बोलिजे ॥ २१ ॥
अशा प्रकारे जे सद्‌रूप आहे, तेच चिद्र्रपही आहे. या दोन्ही लक्षणांनाच अस्ति आणि भाति अशी नावे आहेत. आता तिसरे जे आनंदरूप लक्षण आहे त्यालाच प्रियता असे म्हणावे. (५२१)

हेंही स्वरूपलक्षण तिसरे । जें सर्वांचे अनुभावानुकारें ।
तेचि बोलिजे रविदत्ता अरे । अल्प संकेर्ते ॥ २२ ॥
हेही स्वरूपाचेच लक्षण आहे. ते सर्वांच्या अनुभवाचे आहे. रविदत्ता, त्याचेच आता थोड्या शब्दात स्पष्टीकरण करू. (५२२)

सर्वांसी सर्व प्रिय असती । ते कवणाचे निमित्त आवडती ।
ते विवेकें पाहतां कळी येती । कीं आपणा प्रीत्यर्थ ॥ २३ ॥
सर्वांनाच सर्वच प्रिय असतात. ते कोणासाठी आवडत असतात ? नीट विचार करून पाहिले असता ते कळून येते. ते सर्व आपल्यासाठीच प्रिय असतात. (५२३)

ते ते जरी आवडती खरे । तरी क्षणक्षणां न विटती सारे ।
आपणा उबग येतां येरे । भोग्यजाता उपेक्षी ॥ २४ ॥
आपल्याखेरीज इतर पदार्थ जर खरोखर आवडत असते तर सर्व लोक क्षणाक्षणाला त्यांना विटून गेले नसते. आपल्याला कंटाळा आला की ते सर्व भोग्य विषयांची उपेक्षा करतात. (५२४)

पति स्वियेची आवडी धरी । क्षणां विटून परती सारी ।
तिने प्रार्थितांही चाड न धरी । छळितां अधिक तासे ॥ २५ ॥
पतीला पत्नी आवडते. परंतु काही क्षणात तिचा कंटाळा येऊन तो तिला दूर करतो. तिने जरी त्याला विनंती केली तरी त्याला तिची पर्वा वाटत नाही. ती फारच छळायला लागली तर तो अधिकच त्रासतो. (५२५)

स्त्रियेसी भोगइच्छा नसता । बळात्कारें भोगही घडता ।
आवडी उपजे कदां चित्ता । इच्छी तरी प्रिय वाटे ॥ २६ ॥
स्त्रीला भोगेच्या नसताना बळजबरीने तिचा भोग घेतला तर तिच्या चित्तात त्या भोगाची आवड निर्माण होत नाही. तिने भोगाची इच्छा केली तर मात्र तिला तो भोग प्रिय वाटतो. (५२६)

पुत्र प्रिय मातापितरां । यास्तव बुबिती त्या लेंकुरा ।
त्यांचे प्रीतीस्तव तरी तें अवसरा । कंटाळून रडे ॥ २७ ॥
आईबापांना पुत्र आवडतो. म्हणून त्या बालकाची चुंबने घेतात. ते आपल्या आवडीसाठी हे करतात. पण ते मूल मात्र कंटाळून रडायला लागते. (५२७)

मायबापै आपणा रक्षिती । ह्मणून आपणा निमित्त आवडती ।
आपणासि जे उपेक्षिती । त्यांची आवडी कोणा ॥ २८ ॥
आईवडील आपले रक्षण करतात, म्हणून ते आयत्यासाठीच आपल्याला आवडत असतात. आपली जे उपेक्षा करतात त्या व्यक्तींबद्दल कोणाला आवड असते ? (५२८)

ऐसेचि साता मित्र स्वजन । पशु वृत्ति राज्यादि धन ।
आपणासाठी भोग संपूर्ण । आवडते होती ॥ २९ ॥
याच प्रकारे भाऊ, मित्र, नातेवाईक, पशु व्यवसाय, राज्य, धन इत्यादी सर्व यांचा उपभोग केवळ स्वतःसाठी म्हणून आवडत असतो. (५२९)

दुर्ब्राह्मण्य आपुले जावे । यास्तव वेद शास्त्र पढावें ।
अ ति प्रेमे देवासी भजावे । परी सुखी व्हावें आपण ॥ ३० ॥
आपल्याला वाईट ब्राह्मण म्हणून ओळखतात ते वाईटपण जावे म्हणून वेदशास्त्रांचे अध्ययन करावे, अतिशय प्रेमाने देवाची भक्ती करावी हे सर्व ठीक आहे, पण ते सर्व आपण सुखी व्हावे म्हणूनच असते. (५३०)

मोक्षप्रासि आपणा व्हाती । यास्तव गुरुपदीं आवडी धरावी ।
श्रवणादि साधनेही करावी । आधुलिया हेतु ॥ ३१ ॥
आपल्याला मोक्षसुख मिळावे म्हणून सद्‌गुरूंच्या चरणांची आवड बाळगावी, श्रवण, मनन इत्यादी साधनेही करावीत. पण तो सर्व खटाटोप आपल्या स्वतःसाठीच असतो. (५३१)

ऐसे जागृती आदि मोक्षावरी । आपणा निमित्त आवडी सारी ।
तस्मात् ते ते प्रियताचि नव्हे खरी । उगी वरी वरी धरियेली ॥ ३२ ॥
अशा प्रकारे जागृतीपासून मोक्षापर्यंत सर्व काही आपल्या स्वतःसाठीच आवडत असते. म्हणून त्या त्या पदार्थाची प्रियता खरी नव्हे. तो उगीच स्वीकारलेला वरवरचा भाव आहे. (५३२)

आपुले कार्य जोवरी होणें । तोवरी अन्यासी प्रीति करणें ।
तूं मज आवडता जीवेंप्राणें । परी ते उपरोधिक ॥ ३३ ॥
आपले कार्य होईपर्यंत दुसऱ्यावर प्रेम करावे. 'तू मला जिवाप्राणापेक्षा अधिक आवडतोस' असे म्हणावे, पण ते सर्व वरवरचे, उपरोधिक असते. (५३३)

उपरोधिका ह्मणावे खोटे । खोटे तें कधीं जाय पालटे ।
ऐशी आपुली आवडी कोठे । अन्या निमित्त ॥ ३४ ॥
उपरोधिक म्हणजेच खोटे होय. जे खोटे असते ते कधी पालटते याचा नेम नाही. अशा प्रकारे आपली आवड ही दुसऱ्यासाठी कधीच नसते. ज्यावेळी ती असते त्यावेळी ती एखाद्या निमित्तापुरतीच असते. (५३४)

निमित्तावांचून सहज आवडी । आपुली आपणा असे गाढी ।
स्कूर्तिही न होतां धडफुडी । आहे तैशी आहे ॥ ३५ ॥
निमित्तावाचून सहज अकृत्रिम आवड अथवा प्रेम हे फक्त आपले आपल्यावरच असते आणि तेही अगदी गाढ स्वरूपाचे असते. ते तसे आहे याचे स्फुरणही आपल्याला नसते इतके ते दृढ, पक्के असते. (५३५)

स्कूर्ति लणजे मी किती आवडता । ऐसा भाव उत्पन्न न होतां ।
निरिच्छ आवडी असे तत्त्वतां । अकृत्रिमपणे ॥ ३६ ॥
स्फुरण म्हणजे मीपणा आपल्याला किती आवडतो याचे भानही आपल्याला जाणवत नाही. ते भानही उत्पन्न न होता अगदी निरिच्छ, अकृत्रिम असे ते प्रेम असते. (५३६)

भाव उठे जया प्रीतीसी । अकृत्रिम न ह्यणा तिसी ।
अन्यत्वीं उमटे ते आपैसी । नाशही पावे ॥ ३७ ॥
ज्या प्रेमाचे भान निर्माण होते, त्याला अकृत्रिम प्रेम म्हणत नाहीत. जे प्रेम आपल्याला भिन्नत्वाने जाणवते ते आपोआप नष्ट होणारे असते. (५३७)

उठे जे स्त्रियादिकांचे ठाई । त्या प्रीतीसी राग नाम पाही ।
अप्राप्त वस्तूचे समुदायी । इच्छा शब्दे बोलिजे ॥ ३८ ॥
स्त्रिया इ. साठी जे प्रेम निर्माण होते त्या प्रेमाला राग किंवा अनुराग असे म्हणतात. ज्या वस्तू आपल्याला ग्रास झालेल्या नसतात, त्या वस्तूंबद्दलच्या प्रेमाला इच्छा हा शब्द लावला जातो. (५३८)

यागादि कर्मी ते श्रद्धा । त्या आवडीसी नांव सुबुद्धा ।
गुरुदेवाचे चरणी जे मेधा । प्रीति ते भक्ति ॥ ३९ ॥
यज्ञयागादी कृत्यांबद्दल जी आवड असते तिला हे सुबुद्ध (विचक्षण) रविदत्ता, श्रद्धा असे नाव आहे. सद्‌गुरूंच्या चरणांबद्दल अथवा देवांबद्दल जी आपली प्रेमाची बुद्धी अथवा भावना असते, तिला भक्ती असे म्हणतात. (५३९)

ऐशी उठिल्या प्रीतीसी नांवे । चारीही भिन्न भिन्न अपूर्वे ।
ही असती सहेतुक सर्वे 1 ह्मणून कृत्रिमरूप ॥ ४० ॥
अशा प्रकारे जे प्रेम उत्पन्न होते त्याचे चार प्रकार असून त्यांची भिन्न भिन्न नावे आहेत हे चारही प्रकार सहेतुक असतात म्हणून ते कृत्रिम स्वरूपाचे प्रेम होय. (५४०)

तैशी आवडी आपुली नसे । अभावी भावी सारखी असे ।
तस्मात् आत्मप्रियता ते वसे । अकृत्रिमपणे ॥ ४१ ॥
तसे आपले आपल्यावरचे प्रेम कृत्रिम नसते. ते भाव किंवा अभाव यात (स्मरण किंवा विस्मरण यात) सारखेच असते म्हणून आत्म्याबद्दलचे आपले प्रेम अकृत्रिम असते. (५४१)

उत्पन्न होय तें नाश पावे । ह्यणोनि उद्धवे तें प्रीति नव्हे ।
उत्पन्न न होतां जें स्वभावें । तेचि प्रिय निर्हेतुक ॥ ४२ ॥
जे उत्पन्न होते ते नाश पावते. म्हणून उत्पन्न होणारे ते प्रेम नव्हे, जे उत्पन्न न होता स्वाभाविकपणे असते ते खरे निर्हेतुक प्रेम होय. (५४२)

ऐशी प्रियता आत्करूपाहनी । तुजी नाहीं नाहीं सत्य सत्य वाणी ।
जरी देहान्स वृत्तीपासोनी । आवडी परी आल्यार्थ ॥ ४३ ॥
अशा प्रकारचे प्रेम आत्म्याखेरीज अन्य कोणत्याही पदार्थाबद्दल अथवा व्यक्तीबद्दल कधीच नसते. हे वचन अगदी सत्य आहे. ते प्रेम आत्मरूपाहून वेगळे नाही. जरी वृत्तीपासून ते देहापर्यंत सर्व तत्त्वांबद्दल आपल्याला आवड वाटते, तरी ते आत्म्यामुळेच होय. (५४३)

देहादिकांचीही जे प्रीति । वाउगीच ते पुढें बोलिजेती ।
प्रस्तुत येथें ममत्व रीती । निषेधिली पुत्रादिकांची ॥ ४४ ॥
देह इ. बद्दल जे प्रेम वाटते तेही खोटेच असते, हे पुढे सांगण्यात येईल. सध्याच्या प्रसंगी पुत्र इ. वरील वाटत असलेल्या ममतेच्या प्रकाराचा निषेध केला आहे. (५४४)

असो आपुली जे जात्यप्रियता । जे निर्हेतुक अकृत्रिमता ।
हाचि आनंद असे तत्त्वतां । लक्षण तिचें ॥ ४५ ॥
असो, आपले आत्म्याबद्दल जे प्रेम असते, ते निर्हेतुक आणि अकृत्रिम असते. हाच वास्तविक पाहता आनंद होय. ती निर्हेतुक अकृत्रिमता हेच त्या प्रेमाचे लक्षण आहे. (५४५)

आनंदलक्षणही कल्यानी । अविनाश पूर्ण सहज गती ।
तस्मात् हेंचि समूप निश्चिती । चिदूपही तेचि ॥ ४६ ॥
आनंदाचे लक्षण देखील कल्पान्तानंतरही स्वाभाविकपणे अविनाशी, पूर्ण स्वरूपात आहे. त्यामुळे तेच सद्‌रूप आहे आणि तेच चिद्‌रूपही आहे. (५४६)

एव अस्ति भाति प्रियरूप आत्या । हाचि सच्चिदानंद परमात्मा ।
याहून भिन्न त्या त्या रूप नामा । सम हा बोलिजे ॥ ४७ ॥
अशा प्रकारे आत्मा अस्ति, भाति आणि प्रियरूप आहे. हाच सच्चिदानंद परमात्मा आहे. याहून जे भिन्न असेल त्या रूप आणि नावाला भ्रम असे म्हणतात. (५४७)

जैसा वृक्षी बैसला तो आहे खरा । तोचि पहातसे पडिलिया नीरा ।
तोचि आवडता सहज सारा । अकृत्रिमपणे ॥ ४८ ॥
ज्याप्रमाणे वृक्षावर जो बसला आहे तोच खरा आहे. तोच पाण्यात पडलेल्या पुरुषाला पाहातो. तोच अकृत्रिमपणे आणि स्वाभाविकपणे त्याला (वृक्षस्थाला) आवडतो. (५४८)

पडिला तो दिसे परी नाहीं । पाहेसा वाटे परी व्यर्थ तेंही ।
मजला काढा ऐशी प्रीति कांहीं । आभासा नसे ॥ ४९ ॥
जो पडलेला आहे तो दिसतो पण तो नसतोच. तो पाहातोसा वाटतो खरा, पण तेही व्यर्थ आहे, खोटे आहे. 'मला काढा, मला काढा' असे प्रेम आभासासाठी नसते. ते प्रेम वृक्षस्थाचे स्वतःबद्दलचे प्रेम असते. (५४९)

वृक्षी बैसल्याचा आहेपणा । त्यास्तव त्यासम दिसे जाणा ।
नेत्र उघडून जाला देखणा । परी तो वृक्षस्थास्तव ॥ ५० ॥
वृक्षावर बसण्यामुळे त्याच्या ठिकाणी खरा आहेपणा आहे. त्याच्या अस्तित्वामुळेच पडलेल्याच्या ठिकाणी त्याच्यासारख्या क्रिया दिसतात. तो डोळे उघडून पहाणारा होतो खरा. पण ते सर्व वृक्षस्थाच्या अस्तित्वामुळे असते. (५५०)

तैसाचि आत्मा सहजगति । सच्चिदानंद चिऱ्यर्ति ।
त्याचें प्रतिबिंब पडिलें वृत्ती । तो हा जीव आभास ॥ ५१ ॥
त्याप्रमाणेच आत्मा स्वाभाविकपणे सच्चिदात किमूर्ती आहे. त्याचे प्रतिबिंब (बुद्धी) वृत्तीत पडते. त्यालाच चिदाभास अथवा जीव म्हणतात. (५५१)

आल्पत्वाच्या आहेपणे । जीव आहेसा केला मने ।
जें आल्य्याचे चिडूप देखणे । तेणें होय जाणता ॥ ५२ ॥
आत्म्याच्या आहेपणामुळेच जीव आहेसा मनाला वाटतो. आत्म्याचा चिद्‌रूप देखणेपणा आहे. त्यामुळे जीवही जाणता आहेसा दिसतो. (५५२)

न कळून आपुली प्रियता । मीपणे मानी आभास स्कृरता ।
एव वाउगी उमटली आत्यता । नोळखोनि आत्या ॥ ५३ ॥
आत्म्याला आपली प्रियता कळत नाही. पण मीपणाने स्फुरणाऱ्या आभासाला (जीवाला) मात्र ती जाणवते. अशा प्रकारे आत्म्याचे स्वरूप न ओळखून त्याचे गुणधर्म जीवाच्या ठिकाणी उमटल्यासारखे वाटतात. पण ते खोटे असतात. (५५३)

तस्मात् येथें मुमुसूने । स्वानुभवें विवेचन करणें ।
वास्तविक आत्मा तो अंगें होणें । येर त्यागावा आभास ॥ ५४ ॥
त्यामुळे या ठिकाणी मुमुसूने स्वतःच्या अनुभवाने विचार करावा. जो वास्तविक आत्मा आहे. तोच आपण स्वत: व्हावे, आणि जीवपणाचा त्याग करावा. (५५४)

हा मी जीवासह वृत्तीली । जाणतसें उद्धवलयासी ।
उद्धव आणि लय जयासी । तो मी नव्हे सहसा ॥ ५५ ॥
हा मी आत्मा असून जीवासह वृत्तीला जाणतो. त्यांची उत्पत्ती आणि लय यांना जाणतो. उत्पत्ती आणि लय ज्यांना आहे ती मी मुळीच नाही, असा विचार त्याने करावा, (५५५)

जैसा पडिला पडिलियानें । मी नव्हे ऐसें जाणावे मने ।
हा मी वृक्षी बैसून पाहे नयने । पडिलियासी ॥ ५६ ॥
ज्याप्रमाणे पाण्यात आपण पडलो असे वृक्षस्थाला वाटते, त्याने ' पडलेला जो आहे तो मी नाही असे मनाने जाणून घ्यावे. मी वृक्षावर बसलेला असून पडलेल्या प्रतिबिंबाला डोळ्यांनी पाहात आहे' असे लक्षात ध्यावे. (५५६)

यासी प्रयत्न इजा नसे । अज्ञाने जाले तें ज्ञाने नासे ।
येथें विचारीचे पाहिजे मानसे । दृष्टान्त- दार्ष्टान्सी ॥ ५७ ॥
या बाबतीत स्वतःचा विचार हेच मुख्य साधन असून त्यावेगळे दुसरे साधन नाही. जो भ्रम अज्ञानामुळे झाला होता, तो ज्ञानानेच नष्ट होणार. म्हणून येथे दृष्टांत आणि दार्ष्टांतिक या दोन्ही ठिकाणी मनाचा विचारच पाहिजे. (५५७)

पाहणे नको गळ घालून । तेवीं न लगती नाना साधनें ।
येक विचार पाहिजे परिपूर्ण । अंतर्वृत्तीचा ॥ ५८ ॥
त्यासाठी गळ टाकून पाहण्याची गरज नाही. तसेच इतर वेगळ्यावेगळ्या साधनांचीही आवश्यकता नाही. एक आतील वृत्तीचा म्हणजे अंतःकरणाचा पक्का विचारच पाहिजे. (५५८)

एकदां विचारे कळेना । तरी विवेचन करावें धुन: पुन्हा ।
आणि गुरुमुखे श्रवण मना । ज्ञान होय तो करावें ॥ ५९ ॥
एकदा विचार करून कळले नाही, तर विवेचन पुन्हा पुन्हा करावे. आणि गुरुमुखाने श्रवण करून खरे ज्ञान होईपर्यंत त्याचे मनन करावे. (५५९)

सत् शास्त्र आणि सद्‌गुरु । आणि पाहिजे सद्विधारू ।
ही तिन्हीही मिळता वारंवारू । पाहिजे विवेचन ॥ ६० ॥
सच्छास्त्र, सद्‌गुरू आणि सद्‌विचार हे तिन्हीही एकत्र आत्यानंतर त्यावर पुन्हा पुन्हा विवेचन झाले पाहिजे. (५६०)

अति प्रयत्ने जे लणितले । तें इतुक्याच हेतु पाहिजे कळले ।
येकदा न कळता तरी पाहिलें । पाहिजे वारंवार ॥ ६१ ॥
मूळ श्लोकात प्रयत्नपूर्वक असे म्हटले आहे ते याच हेतूने होते, हे कळले पाहिजे. एकदा विवेचन करून कळले नाही, तर वारंवार विवेचन करायलाच पाहिजे. (५६१)

अधिकार नसता ब आणावा । अचाट बुद्धीनें विचार करावा ।
सद्‌गुरु धुंडून ठाई पाडावा । बोधक स्वानुभर्वी ॥ ६२ ॥
स्वत:च्या ठिकाणी अधिकार नसला तरी तो बळेच आणावा. अचाट बुद्धी वापरून विचार करावा. स्वानुभवसंपन्न आणि प्रबोधनकुशल सदगुरूंचा शोध घेऊन त्याच्याकडून स्वानुभव प्राप्त करून ध्यावा. (५६२)

पूर्ण अधिकार मुमुसूसी । सद्‌गुरु मिळे पूर्ण बोधासी ।
तरीही सत् शास्त्रेवीण अन्यासी । भेदशास्त्रा काज नसे ॥ ६३ ॥
पूर्ण अधिकारी मुमुसूला पूर्ण बोधसंपन्न असा सद्‌गुरू भेटत्यानंतर मग सच्छास्त्र जोडीला पाहिजे. त्याशिवाय अन्य भेद उत्पन्न करणाऱ्या शास्त्रांशी काही कर्तव्य उरत नाही. (५६३)

जें कां अभेद प्रतिपादक । जेथे आल्या परमात्मा एक ।
तेंचि सत् शास्त्र निश्चयात्मक । श्रवण करावें ॥ ६४ ॥
जेथे अद्वैताचे प्रतिपादन केलेले असते, जेथे आत्मा आणि परमात्मा एकच होत, असे प्रतिपादन केलेले असते, तेच खरे निश्चयस्वरूप सच्छास्त्र होय. त्याचेच श्रवण करावे. (५६४)

एव सदगुरुमुखे सह शास्त्रश्रवण । स्वता विचारे विवेचन ।
वारंवार करणें वा नांव प्रयत्न । अतिशर्ये करावें ॥ ६५ ॥
अशा प्रकारे सद्‌गुरूंच्या मुखाने सत्. शास्त्राचे श्रवण करावे. त्यावर स्वत: विचाराने विवेचन वारंवार करणे यालाच प्रयत्न म्हणावे. ते खूप करावेत. (५६५)

असो तें विवेचन केवीं करावें । तरी रविदत्ता सावध असावें ।
मुख्य आणि आभास निवडावे । सप्रतीतीनें ॥ ६६ ॥
असो, ते विवेचन कसे करावे ? तर रविदत्ता, सावध होऊन ऐक. मुख्य बिंब आणि आभासरूप प्रतिबिंब यांना स्वानुभवाने वेगळे काढावे. (५६६)

आभास हा मिथ्या दिसे । बोधाला न दिसे परी असे ।
हा दृष्टांतद्वारा केला असे । कळे ऐसा संवाद ॥ ६७ ॥
आभास हा खोटा दिसतो. बोधात्मा दिसत नसला तरी तो असतो. हा संवाद तुला कळेल असा दृष्टांताच्या साहाय्याने स्पष्ट केला. (५६७)

येणे उपदेश मुख्य अधिकारी । खुणेसि पावे तीव्रप्रज्ञ जरी ।
तथापि मंद जो मध्यम प्रकारी । तया प्रतीति न बाणे ॥ ६८ ॥
या उपदेशाने उत्तम अधिकारी पुरुष जर तीव्रप्रज्ञ असेल तर त्याला त्याचे इप्सित साध्य होईल. तो जर मध्यम प्रतीचा मंदप्रज्ञ अधिकारी असेल तर त्याला हा अनुभव येणार नाही. (५६८)

तरी तयासी निरूपण । वारंवार पाहिजे श्रवण ।
तेवींच अंतरीं विवेचन । सर्वदा व्हावें ॥ ६९ ॥
तर त्याला हे सांगणे आहे की, त्याने वारंवार श्रवण केले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये त्याचे विवेचन नेहमी केले पाहिजे. (५६९)

विवेचन ह्मणजे मुख्य आभास । निवडावे भिन्न उभयांस ।
मुख्य आत्मा आपण निश्चयास । सदृढ यावा ॥ ७० ॥
विवेचन म्हणजे निरनिराळ्या उपायांनी मुख्य बिबरूप आत्मा आणि प्रतिबिंबरूप आभास (जीव) यांना वेगळे करावे. आणि त्यातील मुख्य जो आत्मा, तो आपणच आहोत, असा पक्का अनुभव यावा. (५७०)

आभास तो मिथ्या त्यागावा । त्याचा मीपणा किंचितू न ध्यावा ।
तरी तोचि संवाद ऐकावा । एकाग्र होऊनी ॥ ७१ ॥
आभास मिथ्या समजून त्याचा त्याग करावा. त्याच्या ठिकाणी असलेला मीपणा थोडासुद्धा आपण घेऊ नये. तेव्हा त्या संबंधीचा संवाद एकाग्र होऊन ऐकावा. (५७१)

हा आभास कोठून कोठवरी । असे तो बोलिजे निर्धारीं ।
हें ऐकून तयाचा करी । त्याग मिथ्या ॥ ७२ ॥
हा आभास कोठे सुरू होतो आणि तो कोठपर्यंत असतो ते आता निश्चयपूर्वक सांगण्यात येईल. ते ऐकून त्याचा मिथ्या म्हणून त्याग करावा. (५७२)

GO TOP