॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. २ रा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोक : अज्ञानं कारणं साक्षि बोधस्तेषां विभासक: ।
बोधाभासो बुद्धिगतः कर्ता स्थालूण्यपापयो: ॥ २ ॥

श्लोकार्थ : अज्ञान हेच तिसरे कारणशरीर होय. या सर्वांना जे प्रकाशित करते ते ज्ञान हेच त्यांचा साक्षी आहे. बुद्धीच्या ठिकाणी असणारा प्रतिबिंबरूप चिदाभास (भासरूप जीव) हा पापपुण्यांचा कर्ता आहे. । । २ । ।

अज्ञान हेंचि कारण शरीर । यासी आत्मा साक्षी भासकर ।
बुद्धि प्रतिबिंबरूप विकार । तो बोधाभास जीव ॥ ६४ ॥
अज्ञान हेच कारणशरीर आहे. या सर्व समूहास प्रकाशित करण्याचे कार्य आत्मा करतो. तो मात्र स्वतः साक्षिरूप आहे. आत्मा हा ज्ञानरूप आहे. बुद्धीमध्ये आत्म्याचे जे प्रतिबिंब पडते ते खरे ज्ञान नसून ते ज्ञानाचे आभासरूप असते. त्यालाच जीव म्हणतात. (१६४)

तोचि पुण्यपापाचा कर्ता । सुखदुःख भोगी तत्वतां ।
एक माथा घेऊन अहंता । देहबुद्धीची ॥ ६५ ॥
जीवच खरा पापपुण्यांचा कर्ता असतो. तोच स्वतःच्या माथ्यावर देहबुद्धीची अहंता घेऊन सुखदुःखे भोगतो. (१६५)

पद - अज्ञानं कारणं ।
पदार्थ : अज्ञान हेच कारण शरीर आहे

देहद्वय जाले जें निर्माण । कांहीं निमित्तास्तव होय दर्शन ।
तेचि कारण शरीर अज्ञान । कल्पावें लागे ॥ ६६ ॥
स्थूल आणि रूम हे दोन देह निर्माण झाले ते काही निमित्तानेच निर्माण झाले असणार हे निमित्त म्हणजेच अज्ञान अथवा कारणशरीर होय. दोन देहांच्या निर्मितीमागचे कारण म्हणूनच कारणशरीराची कल्पना करावी लागते. (१६६)

जेवीं अंधारी सर्प दिसे । हा कासयानें जाला असे ।
तया कल्या लागे अपैसें । बोरीचे न कळणे ॥ ६७ ॥
ज्याप्रमाणे अधारात आपल्याला सर्प दिसतो. हा सर्प कसा आला असा विचार करू लागताच आपोआपच दोरी न कळल्यामुळे म्हणजे दोरीच्या अज्ञानामुळे सर्पाच्या अस्तित्वाची कल्पना करणे भाग पडले. (१६७)

सर्पावरून न कळणे भावावें । परी तयासी रूप नोव्हे ।
तेवींच अज्ञान आहेसे कत्यावे । देहहुय दिसतो ॥ ६८ ॥
सर्पाच्या आभासामुळे दोरीच्या न कळण्याची कल्पना करावी लागते. पण त्या न कळण्याला काही रूप नसते. त्याप्रमाणे दोन देह दिसताच त्यांचे कारण म्हणून अज्ञानाची कल्पना करावी लागते. त्या अज्ञानालाही काही रूप नसते. (१६८)

अज्ञान ह्मणजे न कळणे । निजरूपाचें विस्मरण ।
हें आधीं जालियाविण । देहहुय भासतीना ॥ ६९ ॥
अज्ञान म्हणजे आपल्या मूळ रूपाचे (निजरूपाचे) न कळणे म्हणजे आपल्या मूळ रूपाचे विस्मरण होय. ते अर्थातच अगोदर निर्माण होत असते आणि त्यानंतरच मग दोन देहांचा भास होतो. एरवी ते शक्य नाही. (१६९)

हें अज्ञान लणसी कोणा । तरी नव्हे आल्य्या आपणा ।
जेवीं दोरीचिये अज्ञाना । दोरीसि नाहीं ॥ ७० ॥
हे अज्ञान कोणाला होते असे म्हणशील तर ते स्वत: आत्म्याच्या ठिकाणी मुळीच नसते. दोरीचे अज्ञान दोरीला जसे नसते त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान नसते. (१७०)

दोरीहून बोरीस पाहणार । जयासी होय मंदांधकार ।
न कळणियाचा विकार । तयासी जाला ॥ ७१ ॥
दोरीपेक्षा दोरीस पाहणारा वेगळा असतो. त्याला मंद अंधकारामुळे न कळण्याची बाधा होते. (१७१)

तेवीं स्वस्वरूप जें असंग । पहिलें स्वतःसिद्ध अभंग ।
तेथें स्फूर्ति हें माया सोंग । न होऊन जाली ॥ ७२ ॥
त्याप्रमाणे स्वस्वरूप जे ब्रह्म ते स्वभावतःच असग आणि अभंग (म्हणजे निर्विकारी) असते. त्याच्या ठिकाणी ' अहं ब्रह्मास्मि' असे स्फुरणरूपी सोंग काही न होता झाले. तीच माया होय. (१७२)

जाले तें जरी सत्य असतें । तरी मायानामें कां उच्चारितें ।
तस्मात् जालेच नसता तयातें । जालेंसें कल्पिले ॥ ७३ ॥
जे निर्माण झाले ते वास्तव (सत्य) असते तर त्याचा माया या नावाने कोणीही निर्देश केला नसता, त्यामुळे जे झालेच नाही त्याला झाले असे कल्पिण्यात आले. (१७३)

स्फूर्ति ह्मणजे अहब्रह्म-स्कृरण । उगीच आपआपली आठवण ।
जेवी वायुची झुळूक उत्पन्न । गगना नातळतां उठे ॥ ७४ ॥
स्मृती म्हणजे ' अह ब्रह्मास्मि' (मी ब्रह्म आहे) असे स्फुरण. म्हणजे उगीचच स्वतःच्या अस्तित्वाची आठवण. आकाशात वाऱ्याची झुळूक आकाशाला स्पर्श न करता उठते (निर्माण होते) (१७४)

तेवी स्वरूपाची स्फूर्ति । उठे परी स्वरूपा आरती ।
असो तया स्फुरणी असती । ज्ञानाज्ञानें ॥ ७५ ॥
त्याप्रमाणे स्वरूपाचे स्कृरण जे निर्माण होते ते स्वरूपाला स्पर्श न करता त्याच्या अलीकडे (आरती) निर्माण होते. असो. त्याच स्फुरणाच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही असतात. (१७५)

स्मृतींत स्मृतीचे कळणे । त्यासी नाम ठेविलें ज्ञान ।
येर स्वरूप जें चिदघन । विस्मरण जें तया ॥ ७६ ॥
त्या स्फूर्तीमध्ये त्या स्फूर्तीची ओळख (भान असणे) पटणे म्हणजे ज्ञान होय. स्वरूप हे चिदघन आहे. त्या स्वरूपाचे विस्मरण होते, (१७६)

त्या विस्मरणा अज्ञान नांव । तस्मात स्फुरणासि आली नेणीव ।
आणि ज्ञानही तेथेंचि आठव । रूप जाले असे ॥ ७७ ॥
तेव्हा त्या विस्मरणाला अज्ञान असे म्हणतात. त्यामुळे स्फुरणाकडे नेणीवही येते आणि जाणीव म्हणजे स्मरणरूप ज्ञानही तेथेच येते. स्वरूपाचे विस्मरण ते अज्ञान आणि स्वरूपाचे स्मरण ते शान. (१७७)

स्वरूपी वृत्तीच असेना । विस्मरण कैचे जें आठवीना ।
यास्तव अतीत तें ज्ञानाज्ञाना । असे तैसें आहे ॥ ७८ ॥
स्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीच नसते. त्याच्या ठिकाणी स्मरणच नसेल तर विस्मरण तरी कसे असेल ? म्हणून ते ज्ञान अज्ञान यांच्या पलीकडचे आहे. ते जसे आहे तसे आहे. (१७८)

स्फुरण होतांच तेथें उठले । ज्ञानाज्ञान उत्पन्न जाले ।
तें ज्ञान परि न जाय कल्पिले । चिदूपासम ॥ ७९ ॥
स्फुरण होताच तेथे ज्ञान आणि अज्ञान निर्माण झाले. त्या उत्पन्न झालेल्या जाणिवेला ज्ञान म्हणतात, पण ते चिद्र्रपासारखे आहे अशी कल्पना करता येत नाही. (१७९)

पाणियामाजी सूर्यबिंबला । तेथें प्रकाशही दिसो लागला ।
परी तो सूर्याचा नोव्हे भास जाला । मिथ्या उपाधीस्तव ॥ ८० ॥
पाण्यामध्ये सूर्याचे बिंब पडले. त्या ठिकाणी प्रकाशही दिसू लागला. पण तो प्रकाश सूर्याचा नसतो. तो खोटा, उपाधीमुळे जाणवलेला भास होय. (१८०)

तेवींच चिडूपता अनंताची । स्फुरणी प्रति भासली मिध्याची ।
ते मानिजेना स्वस्वरूपाची । कवणेही काळी ॥ ८१ ॥
त्याप्रमाणे अनंत अशा ब्रह्माची चैतन्यरूपता स्फुरणामध्ये प्रतिबिंब रूपाने दिसली, तरी ती स्वरूपाची चिद्‌रूपता आहे, असे कधीही म्हणता कामा नये. (१८१)

तस्मात् ज्ञानही असेना जेथें । तरी केवीं कल्पावें अज्ञान तेथें ।
हें विचारते जाणावे समर्थे । व्यर्थाचे येरां ॥ ८२ ॥
त्यामुळे ज्या (ब्रह्माच्या ठिकाणी) ज्ञानाचाही अभाव आहे तेथे अज्ञानाची कल्पना तरी कशी करता येईल ? अधिकारी विचारवंतांनी हे नीट जाणून ध्यावे. इतरांना हा विचार व्यर्थ वाटेल. (१८२)

असो स्कृरणी जें ज्ञानाज्ञान । तीच विद्या अविद्या ह्या दोन ।
आवरणशक्ति अविद्या ह्मणून । विक्षेपशक्ति विद्या ॥ ८३ ॥
असो. स्फुरणामध्ये जी ज्ञान आणि अज्ञान आढळतात, त्याच विद्या आणि अविद्या या दोन शक्ती होत. अविद्या ही आवरणशक्ती असून विद्या ही विक्षेपशक्ती होय. (१८३)

दोरीचे जें आवरक । तें आवरण शक्तीचे रूपक ।
सर्पाचे जें उत्पादक । ते विक्षेपशक्ति ॥ ८४ ॥
मुळात दोरी असताना जिच्यामुळे ती झाकली जाते, ते आवरण शक्तीचे रूप होय. आणि त्या दोरीच्या जागी जी सर्पाला उत्पन्न करते ते विक्षेपशक्तीचे रूप आहे. (१८४)

तेवींच स्वरूपाचें आच्छादन । तें आवरण शक्तीचे लक्षण ।
जगाचें जें उत्पादन । ते विक्षेप शक्ति ॥ ८५ ॥
त्याप्रमाणे स्वस्वरूपाला झाकून टाकणे हे आवरण शक्तीचे लक्षण होय आणि ब्रह्माच्या जागी जगाची उत्पत्ती करणे हे विक्षेपशक्तीचे लक्षण होय. (१८५)

असो विद्येत जें प्रतिबिंबत । चिता ऐसा भास दिसत ।
तो ईश्वर कर्ता सर्व जगांत । नाम ठेविलें ॥ ८६ ॥
असो. विद्येमध्ये जे चैतन्याचे प्रतिबिंब पडते आणि जे मूळ चैतन्य तत्त्वासारखे दिसते तोच ईश्वर होय. तोच जगाचा कर्ता होय. (१८६)

अविद्या प्रतिबिंबित जीव । चिदाभास उमटला स्वभाव ।
हाचि भोक्ता जाला सर्व । सुखदुःखाचा ॥ ८७ ॥
अविद्येत चैतन्याचे जे प्रतिबिंब पडते आणि जे चैतन्यासारखेच भासते तोच जीव अथवा चिदाभास होय. तो सर्व सुखदुःखांचा भोक्ता असतो. (१८७)

परी हा देहद्वय न होतां । अज्ञानगर्भी जाला राहता ।
गुप्त असून जगा समस्ता । उपादान-कारण असे ॥ ८८ ॥
पण दोन्ही देह निर्माण होण्यापूर्वी जीव गुप्तरूपाने अज्ञानगर्भात (म्हणजे कारणशरीरात) राहात होता. तो गुप्त असला तरी सर्व जगाच्या उत्पत्तीचे उपादान कारण आहे. (१८८)

प्रतिबिंबयुक्त अविद्या माया । उपादान कारण जगा या ।
तेवींच निमित्तकारण शिष्यराया । विद्यासह ईश ॥ ८९ ॥
अशा प्रकारे प्रतिर्बिंबयुक्त अविद्या ! माया या जगाच्या उत्पत्तीचे उपादान कारण आहे. त्याचप्रमाणे हे शिष्या, ईश्वराच्या प्रतिबिंबाने युक्त अशी विद्या, या जगाच्या उत्पत्तीचे निमित्त कारण आहे. (१८९)

नेणिवेचा जो जडपणा । आणि विद्यारूप विक्षेप जाणा ।
या उभयतांस्तव जाली रचना । चंचळ जडाची ॥ ९० ॥
नेणीव अथवा अज्ञान यांच्या ठिकाणी जडपणा असतो. विद्यारूप विक्षेपाच्या ठिकाणी चंचलपण असते. अज्ञानामध्ये जडत्व असते आणि ज्ञानात चंचलत्व असते. जड आणि चंचल यांची निर्मिती या अज्ञान आणि ज्ञान यांच्यामुळे होते. (१९०)

तेचि ऐकावे कैसे कैसे । उत्पन्न जाले असे जैसे ।
मुळीं स्कृरण तो येकचि असे । ज्ञानाज्ञान रूप ॥ ९१ ॥
तेच कसे कसे झाले हे आता ऐका. मुळात स्फुरण तर एकच होते. त्याच्या ठिकाणीच ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही होती. (१९१)

ज्ञानाचा जाला सत्त्वगुण । अज्ञानाचा तमोगुण ।
उभयाल्पके रजोगुण । जाला असे ॥ ९२ ॥
ज्ञानाचा झाला सत्त्वगुण आणि अज्ञानाचा झाला तमोगुण. सत्त्वगुण आणि तमोगुण मिळून रजोगुण झाला. (१९२)

स्फुरणीच जें छिद्र पडिलें । ह्मणजे चिडून असतां स्कृरण जाले ।
तया अवकाशा नाम ठेविलें । आकाश ऐसें ॥ ९३ ॥
मुळातल्या चिरून अशा ब्रह्माच्या ठिकाणी जे स्फुरण झाले ते त्या चिदघनाच्या ठिकाणी पडलेल्या छिद्राप्रमाणे होय. त्या छिद्राच्या योगाने जो अवकाश निर्माण झाला त्याला आकाश असे नाव ठेवले. (१९३)

स्फुरणाचा जो चचळपणा । तो वायूचे पावला अभिधाना ।
भासले स्फुरण तें वचना । तेज बोलिजे ॥ ९४ ॥
स्फुरणाच्या ठिकाणी जो चंचलपणा होता त्याला वायू असे नाव दिले आणि त्या स्फुरणाचे भासणे अथवा प्रकाशित होणे याला तेज नावाने ओळखले जाते. (१९४)

मृदु स्फुरण तेंचि आप । कठिण अज्ञान पृथ्वीचे रूप ।
एव हे अष्टा सूक्ष्मत्वे अल्प । स्फुरणीच असे ॥ ९५ ॥
स्फुरणाचे मृदुत्व म्हणजेच आपतत्त्व होय. आणि कठीण आणि अज्ञानरूप हे पृथ्वीचे रूप होय. अशा प्रकारे तीन गुण आणि पंच महाभूते अशी ही अष्टधा प्रकृती सूक्ष्मरूपाने स्फुरणातच असते. (१९५)

पुढें तमोगुणापासून । स्थष्टत्वा जाली भूतें संपूर्ण ।
एकेक भूत भिन्न भिन्न । दिसूं लागलें ॥ ९६ ॥
पुढे तमोगुणापासून सर्व भूते स्पष्ट होऊन निरनिराळी दिसू लागली. (१९६)

शब्दामुळे आकाश जाले । कीं अवकाशीं शब्दा स्फुरणत्व आलें ।
तेंचि आकाश नाम पावलें । शब्दविषय तन्मात्रा ॥ ९७ ॥
शब्दामुळे आकाश झाले किंवा आकाशात शब्द स्फुरण पावला. तेच शब्दविषय तन्मात्रा आकाश होय. (१९७)

स्पर्शामुळे वायु जाला । वाणूमुळे स्पर्श उठिला ।
यास्तव वायु हा नाम पावला । स्पर्शविषय तन्मात्रा ॥ ९८ ॥
स्पर्शामुळे वायू निर्माण झाला किंवा वायूमुळे स्पर्श निर्माण झाला. त्यालाच वायू असे नाव प्राप्त झाले. तोच स्पर्शविषय (मात्रा वायू होय. (१९८)

रूपामुळे तेज जाले । रूपही भासकत्वे उठिले ।
यास्तव तेज नाम त्या ठेविलें । रूपविषय तन्मात्रा ॥ ९९ ॥
रूपामुळे तेज झाले किंवा रूपही भासकत्वामुळे निर्माण झाले, म्हणून त्याला तेज असे म्हटले. तेच रूपविषय तन्मात्रा होय. (१९९)

रसामुळे जाले आप । आपास्तव रसासी रूप ।
तस्मात्. आप हा तयासी जल्प । रसविषय तन्मात्रा ॥ २०० ॥
रसामुळे आप निर्माण झाले अथवा आपामुळे रसास रूप आले, तेच रसविषय (मात्रा आप होय. (२००)

गंधामुळे पृथ्वी जाली । पृथ्वीत गंधता उमटली ।
यास्तव पृथ्वी हें नाम पावली । गंधविषय तन्मात्रा ॥ १ ॥
गंधामुळे वृद्धी निर्माण झाली किंवा वृद्धीमध्ये गंधाची उत्पत्ती झाली. म्हणून तिला पृथ्वी असे नाव प्राप्त झाले. तीच गंधविषय तन्मात्रा होय. (२०१)

आकाशी अवकाश धर्म । सच्छिद्रता असे कर्म ।
शब्दगुण हा असे नेम । त्यापासून वायु ॥ २ ॥
आकाशाचा अवकाश हा धर्म असून सच्छिद्रता (छिद्रे असणे) हे त्याचे कर्म आहे आणि शब्द हा त्याचा गुण आहे. त्यापासून वायूची उत्पत्ती झाली. (२०२)

शब्द स्पर्श वायु द्विगुण । धर्म जयाचा चंचळपण ।
कर्म हेंचि सर्वत्रीं विहरण । त्यापासाव तेज ॥ ३ ॥
वायूचा धर्म चंचलता हा आहे. त्याचे कर्म म्हणजे सर्व ठिकाणी विहार हे होय आणि त्याचे गुण आकाशाच्या गुणांच्या दुप्पट आहेत. ते म्हणजे शब्द आणि स्पर्श असे आहेत. त्यापासून तेजाची निर्मिती झाली. (२०३)

शब्द स्पर्श रूप त्रिगुण तेज । दहन-कर्म हा सतेज ।
पचन-कर्म हें असे सहज । त्यापासून आप ॥ ४ ॥
तेजाचा दहन आणि तेजयुक्तता हा धर्म असून पचन हे त्याचे कर्म आहे. त्याचे गुण शब्द, स्पर्श आणि रूप असे तीन आहेत. त्यापासून आपाची (जलाची) निर्मिती झाली. (२०४)

शब्द स्पर्श रूप रस गुण । द्रवत्व धर्म आपी संपूर्ण ।
क्लेदनत्व कर्म हें गहन । त्यापासाव पृथ्वी ॥ ५ ॥
आप अथवा जलाचा द्रवरूपता हा धर्म असून इतर पदार्थांस भिजविणे हे त्याचे कर्म आहे. त्याच्या ठिकाणी पूर्वीच्या भूतांचे गुण आणि स्वतःचा रस हा अधिकचा गुण असे मिळून चार गुण आहेत. शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे त्याचे गुण आहेत. त्यापासून वृद्धीचा जन्म झाला. (२०५)

शब्द स्पर्श रूप रस गंध । हे पांचही पृथ्वीत प्रसिद्ध ।
कठिण धर्म हा विशुद्ध । धारणा कर्म ॥ ६ ॥
कठिण असणे हा वृद्धीचा धर्म असून धारणा हे तिचे कर्म होय. तिच्यामध्ये पूर्वीच्या भूतांचे चार अधिक स्वतःचा व्यवच्छेदक असा गंध गुण मिळून पाच गुण आहेत. ते शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे आहेत. (२०६)

एव तन्मात्रासहित भूतें । तमोगुण द्रव्यशक्ति जे ते ।
हेचि स्थळ रहाव्या चराचरातें । त्रिमुबनाल्पक जाले ॥ ७ ॥
अशा प्रकारे तन्मात्रासहित सर्व भूते ही तमोगुण द्रव्यशक्ती होय. या शक्तीचाच त्रिपुवनात्मक जग हा आविष्कार होय. सर्व चराचरांना राहण्यासाठी त्याच्या रूपाने योग्य ठिकाण प्राप्त झाले. (२०७)

ऐसी हे भूततमाची उत्पत्ति । सांगितली अल्प रीती ।
भूत रजसत्वाची जी जी होती । ती सांगितली मागा ॥ ८ ॥
अशा प्रकारची भूततमोगुणापासून झालेली ही निर्मिती सांगितली. भूतरजसत्वापासून झालेल्या उत्पत्तीचे मागे वर्णन केलेलेच आहे. (२०८)

जो लिंगदेह सत्रा कळांचा । मागें विस्तार बोलिला त्याचा ।
तेवी प्रकार पंचीकरणाचा । बोलिला असे ॥ ९ ॥
सतरा तत्त्वांचा जो लिंगदेह आहे, त्याचे सविस्तर वर्णन मागे सांगितलेच आहे. त्याचप्रमाणे पंचीकरणाचा प्रकारही मागे सांगितला आहे. (ओवी क्र. १४२ ते १५५ पहा) (२०९)

पंचीकृत स्थूळदेहाची । उभवणी केली चौखाणीची ।
त्यांत लिंगदेह प्रवेशतांची । चळण होतें जाले ॥ १० ॥
तसेच चारी खाणीतील स्थलदेहांची पंचीकरणाने केलेली उभारणीही सांगितली आहे. या स्थलदेहात लिंगदेहाचा प्रवेश होताच त्या देहाचे चलनवलन सुरू झाले. (२१०)

परी इतुकें जें उत्पन्न जाले । तितुकियासी दोन कारणें आथिलें ।
नेणीव तादाल्प चैतन्य बोलिलें । तें उपादान कारण ॥ ११ ॥
आता एवढे जे सगळे उत्पन्न झाले आहे, त्या सगळ्या उत्पत्तीची दोन कारणे आहेत. नेणिवेशी म्हणजे अज्ञानाशी तादात्म्य पावलेले चैतन्य म्हणजे जो जीव तो येथे उपादान कारण आहे. (२११)

उपादान ह्मणजे त्याचेंच जाले । होऊन त्यामध्येंच वर्तले ।
शेवटीं अज्ञानी ल्या गेलें । रख सर्पापरी ॥ १२ ॥
उपादान म्हणजे मूलद्रव्याचेच ते बनलेले असते. उत्पन्न झाल्यानंतर त्या द्रव्यातच ते राहते आणि शेवटी त्यातच ते लयाला जाते. उदा. दोरीपासून सर्प अज्ञानामुळे निर्माण झाला. त्या अज्ञानामध्येच त्या सर्पाचे अस्तित्व राहिले आणि अज्ञानातच तो नष्ट झाला (मारला गेला). त्या रड्युसर्पाच्या दृष्टान्ताप्रमाणे जीवाच्या अज्ञानामुळे जगाची उत्पत्ती होते. त्यातच त्याचे अस्तित्व असते आणि त्यातच ते नाश पावत असते. म्हणून अज्ञानयुक्त जीव हेच जगाचे उपादान कारण होय. (२१२)

कोणी ह्मणेल ब्रह्मचि कारण । तरी तें शुद्ध, विकारी नव्हे पूर्ण ।
तेथेंचि वाउगे उठे जें अज्ञान । त्यासह कारण बोलिजे ॥ १३ ॥
यावर कोणी म्हणेल की, ब्रह्म हेच जगाचे उपादान कारण आहे, तर त्यावर उत्तर असे की, ब्रह्म शुद्ध असून त्यामध्ये विकार होत नाहीत. पण त्याच्या संदर्भात जे अज्ञान निर्माण झाले आहे त्या अज्ञानाशी संयुक्त झालेले ब्रह्म हे मात्र उपादान कारण होऊ शकते. (जीव हा ब्रह्मच आहे पण तो अज्ञानाने वेढला असत्यामुळे त्यास जीवत्व प्राप्त झाले आहे. असा अज्ञानग्रस्त जीवच जगाचे उपादान कारण आहे) (२१३)

जेवी रनच येकटी सर्पासी । कारण नव्हे निश्चयेसी ।
न कळणे मिळता तयासी । प्रयोजन सपा ॥ १४ ॥
ज्याप्रमाणे दोरी हे सर्पाच्या निर्मितीचे कारण असली तरी केवळ दोरी सर्पाचे कारण होऊ शकत नाही. त्या रव्हला न कळणे म्हणजे अज्ञानाची जोड मिळाल्याबरोबर ती सर्पनिर्मितीचे कारण होऊ शकते. (२१४)

तैसेंचि अज्ञान सहअधिष्ठान । जगाली उपादान कारण ।
आणि विद्येसहित आभास ईशान । निमित्त कारण असे ॥ १५ ॥
त्याप्रमाणे अज्ञानासह अधिष्ठान (ब्रह्म) हे जगाचे उपादान कारण आहे आणि विद्येसह जोडला गेलेला ब्रह्माचा आभास जो ईश्वर तो जगाचे निमित्त कारण आहे. (२१५)

निमित्त ह्यणजे मात्र ईक्षण । इलक्षेसदि होय निर्माण ।
एव गुणादि देहान्स जें उत्पन्न । ईश केलें ॥ १६ ॥
निमित्त म्हणजे येथे फक्त ईक्षणाची कृती म्हणजेच ईश्वराची सुष्टिनिर्मितीची इच्छा. त्याने इच्छा करताच जग निर्माण होते. अशा प्रकारे गुणांपासून (त्रिगुणांपासून) ते देहापर्यंत जे जे काही उत्पन्न झाले आहे ते सर्व ईश्वरानेच निर्माण केले आहे. (२१६) मागे (पहा ओ. १८६, १८७)

विद्या अविद्या प्रतिबिंब दोन । जें मागें सांगितलें लक्षण ।
परी प्रवेश नसता भिन्न भिन्न । नसती किंचित ॥ १७ ॥
ब्रह्माचे विद्येत पडलेले प्रतिबिंब म्हणजे ईश्वर आणि त्याचे अविद्येत पडलेले प्रतिबिंब म्हणजे जीव हे सांगितले. परंतु जोपर्यंत सतरा तत्त्वांच्या लिंगदेहाचा स्थूल देहात प्रवेश नव्हता तोपर्यंत जीव आणि ईश्वर ही तत्त्वे भिन्न भिन्न नव्हती. (२१७)

ऐसे उभयतांही आभासपणी । येकत्रचि असतां दोन्ही ।
प्रवेशकाळी अज्ञान घेऊनी । प्रवेशला पिडी ॥ १८ ॥
दोघेही आभासरूपाने एकत्रच असताना एका आभासाने लिंगदेहाच्या स्थूल देहात प्रवेशाच्या वेळी जीवरूपाने अज्ञान घेऊन पिंडात प्रवेश केला. (२१८)

एव ईक्षणादि प्रवेश अती । इतुकी ईशे केली उत्पत्ति ।
प्रवेशानंतर जीवकृति । होती जाली ॥ १९ ॥
अशा प्रकारे ईक्षणापासून (परब्रह्माच्या सुष्टिरचनेच्या संकल्पापासून) ते जीवाच्या पिंडात प्रवेश करण्यापर्यंत सर्व गोष्टी ईश्वराने उत्पन्न केल्या आहेत. जीवाने पिंडात प्रवेश केल्यानंतरच जीवसृष्टीची सुरुवात झाली. (२१९)

स्थूळदेह हाचि घट । लिंगदेह पाणी हें दाट ।
त्या त जीव प्रतिबिंब अवीट । लिंगदेह जोवरी ॥ २० ॥
स्थूलदेह हा एका घटाप्रमाणे असून लिंगदेह हा त्यात भरलेल्या पाण्याप्रमाणे आहे. त्या पाण्यात (लिंगदेहात) जीवरूप प्रतिबिंब अभंगपणे (अवीट) पडलेले असते. ते लिंगदेह (पाणी) असेपर्यंत कायम असते. (२२०)

अज्ञानसहित जीव आभास । देहांत याचा प्रवेश ।
हाच पिंड- तादात्म्य सावकाश । घेऊन बैसला ॥ २१ ॥
अज्ञानयुक्त जीव हाच तो आभास असून त्याचा दोन देहात (स्थूल आणि सूक्ष्म) प्रवेश होतो आणि तोच त्या पिंडाशी तदात्म होऊन राहतो. (२२१)

मुळीं अहंब्रह्म जे स्कूर्ति । ज्ञानाज्ञानाल्पक होती ।
ते स्पष्ट जाली प्रवेशांती । देहामाजी ॥ २२ ॥
मुळात परब्रह्माच्या ठिकाणी ' अहं ब्रह्मास्मिचे जे स्फुरण होते त्यात ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही भाग असतात. जीवाने देहात प्रवेश केल्यानंतर ते स्फुरण स्पष्ट होते. (२२२)

ते स्फूर्ति निजरूपा विसरली । पुढें जाले तें पाहा लागली ।
तेचि विक्षेपशक्ति बोलिली । वासनाल्पक ॥ २३ ॥
ते स्फुरण स्वतःच्या वास्तव मूळ रूपाला विसरते. आणि पुढे जे जे निर्माण होईल ते ते पाहू लागते. त्यालाच वासनात्मक विक्षेपशक्ती असे म्हणतात. (२२३)

त्या वासनेचे सत्रा प्रकार । पूर्वी सांगितला विस्तार ।
तया लिंगदेहाचें बिढार । तो स्थूल मांसमय ॥ २४ ॥
त्या वासनेचे सतरा प्रकार आहेत. त्यांचा विस्तार मागे सांगितला आहे. त्या लिंगदेहाचे स्थूल मांसमय देह हे निवासस्थान असते. (२२४)

एव वासनेत जें प्रतिबिंबले । चैतन्य जें त्यास जीव नाम आलें ।
तें देहतुयासी पाहा लागलें । परी विसरलें निजला ॥ २५ ॥
अशा प्रकारे वासनेत चैतन्याचे जे प्रतिबिंब पडते त्यास जीव असे नाव प्राप्त होते. ते प्रतिबिंब (जीव) स्थल आणि रूम या दोन्ही देहास पाहू लागते, पण आपल्या मूळ रूपाला विसरून जाते. (२२५)

सर्प जेवीं भाविला असतां । रस्तूचे न कळणे जाले चित्ता ।
तेवी देहहूय स्फुरू लागता । अज्ञान जालेंसें कल्पावें ॥ २६ ॥
मनात सर्पाची कल्पना आत्याबरोबर दोरीचे अज्ञान (न कळणे) मनाला घेरते. त्याप्रमाणे दोन देहांचे स्फुरण होऊ लागताच अज्ञान उत्पन्न झाले अशी कल्पना करावी लागते. (२२६)

यासि कार्यानुमेय ह्मणावे । कीं कार्य देहहुयास्तव कल्पावें ।
येन्हवी अज्ञाना रूप नव्हे । अमुकसें ह्मणून ॥ २७ ॥
म्हणून अज्ञान हे कार्यानुमेय (म्हणजे प्रत्यक्ष कार्यावरून अनुमान करता येण्याजोगे) आहे. प्रत्यक्षात अज्ञानाला रूप नाही. अमुक पदार्थाप्रमाणे ते आहे, असे सांगता येत नाही. त्यांचे कार्य जे दोन देह, त्यावरून त्याचे अनुमान होते. (२२७)

तें सह म्हणो तरी ज्ञाने नासे । असत् तरी कार्य दिसे ।
असो अनिर्वचनीय जें ऐसें । तें कारण शरीर ॥ २८ ॥
अज्ञान सत् (अस्तित्व असणारे) म्हणावे, तर ते ज्ञानाने नष्ट होते. असत् (अस्तित्व नसणारे) म्हणावे, तर त्याचे (दोन देहरूपी) कार्य दिसते. तेव्हा ते अनिर्वचनीय (ज्याचे वर्णन करता येत नाही असे) आहे. अज्ञान हेच कारणशरीर होय. (२२८)

दैहहुयाचे उत्पत्तिस्थान । या हेतु ह्मणावे कारण ।
नाश पावत असे ह्मणोन । शरीर बोलिजे ॥ २९ ॥
दोन देहांच्या उत्पत्तीचे ते स्थान आहे. म्हणून त्यास कारण असे म्हणतात. आणि नाश पावते म्हणून त्यास शरीर (शीर्यते नाश पावणारे) असे म्हणतात. (२२९)

परी हा देह कल्प नये । देह पाहतां असती हूय ।
स्थूळदेह हा बिढार होय । सूक्ष्म व्यवहारात्यक ॥ ३० ॥
पण त्याला देह मागू नये. देह पाहिले तर दोनच आहेत. स्थूलदेह हा निवासस्थानासारखा असून सूक्ष्म देह हा व्यवहार करणारा आहे. (२३०)

एव स्थल सूक्ष्म कारण । जीवासहित हे तीन ।
निजरूपी उपाधी उत्पन्न । जाहली असे ॥ ३१ ॥
अशा प्रकारे स्थल. रूम आणि कारण ही तीन शरीरे जीवांबरोबर असतात. ही तीन शरीरे आणि जीव ह्या निजरूपाच्या (मूळ रूपाच्या) ठिकाणी निर्माण झालेल्या उपाधी होत. (२३१)

रविदत्ता तूं ह्मणसी ऐसें । जे हे उपाधि जाली असे ।
यांत मुख्य निजरूप नसे । तरी अवधारीं ॥ ३२ ॥
रविदत्ता, कदाचित् तू असे म्हणशील की, या ज्या उपाधी निर्माण झाल्या आहेत, त्यामध्ये मुख्य निजरूपच नाही, तर नीट लक्ष देऊन ऐक. (२३२)

घट गाडगे जें जें निर्माण । तें ते व्यापून असे गगन ।
तैसें स्फुरणादि देहान्त संपूर्ण । व्यापून ब्रह्म असे ॥ ३३ ॥
घट, गाडगे अशा ज्या ज्या वस्तू निर्माण होतात त्या सर्वांना आकाश व्यापून असते, त्याप्रमाणे स्फुरणापासून ते देहापर्यंतच्या सर्व पदार्थांना ब्रह्म (निज वस्तू व्यापून असते. (२३३)

पद ' साक्षिबोधस्तेषां विभासक: ।

पदाचा अर्थ दिलेला नाही

सच्चिदानंद ब्रह्मघन । तेचि अस्ति भाति प्रिय पूर्ण ।
ऐसी तिन्ही जी लक्षणें । येथें प्रगट असती ॥ ३४ ॥
सर्वव्यापक अशा ब्रह्माची सत्, चित आणि आनंद अथवा अस्ति, भाति आणि प्रिय ही तीनही लक्षणे या स्फुरणापासून ते देहापर्यंतच्या सर्व पदार्थांमध्ये प्रकटपणे आहेत. (२३४)

अस्तित्व मायेनें लोपवावें । तरी कासयावरी प्रगटावें ।
चिडूप जरी आच्छादावें । तरी व्यवहारावें कैसे ॥ ३५ ॥
मायेने अस्तित्व हा गुणधर्म लोपवला असे म्हणावे, तर तिने कशावर प्रकट व्हावे ? (मायेची सर्व निर्मिती अस्तित्वाच्या अधिष्ठानावरच उभी असते) ब्रह्माची चिद्‌रूपता हा जो गुणधर्म आहे तो माया आच्छादून टाकते असे म्हणशील तर मायेचा सर्व व्यवहार कसा होईल ? (२३५)

सुखमात्र आच्छादिल्या ऐसें । वाटे परी तेंही आच्छादिले नसे ।
जरी आच्छादिलेंच तरी होतसे । आवडीचें भान केवीं ॥ ३६ ॥
एक सुख तेवढे आच्छादल्यासारखे वाटते, पण तेही खरे पाहता आच्छादले जात नाही. जरी ते आच्छादलेच जाते असे वाटत असले तरी आपल्याला आवडीचे (प्रियत्वाचे) भान कसे झाले असते ? (२३६)

घटीं जेवीं आकाश व्यापले । तेवीं पिंडी ब्रह्म पूर्ण दाटलें ।
जयावरी सर्व हें कल्पिले । तें अस्तित्वरूप ॥ ३७ ॥
घटामध्ये ज्याप्रमाणे आकाश व्यापून असते, त्याप्रमाणे पिंडाच्या ठिकाणी पूर्ण ब्रह्म दाटलेले असते. ज्यावर ह्या सर्वांची कल्पना केली जाते, तेच त्याच्या अस्तित्वाचे रूप होय. (२३७)

जयाचिया भासा भासती । तोचि आत्मा साक्षी चिऱ्यर्ति ।
निर्विकार असंग स्थिती । उपाधिमाजी असे ॥ ३८ ॥
मुंडकादी उपनिषदांमध्ये 'यस्य भासा सर्वमिदं विभाति' म्हणजे ' आत्म्याच्या तेजाने सर्व विश्व प्रकाशित झाले आहे' असे म्हटले आहे. (मुडक २. २. १०, कठ ५. १५, श्वेताश्वतर ६. १४) ज्याच्या तेजाने विश्वातील सर्व पदार्थ उजळून निघतात तोच मूर्तिमंत चिद्र्रूप सर्व साक्षी आत्मा होय. तो निर्विकार असल्यामुळे संगरहित आहे. तोच सर्व उपाधींमध्ये स्वत: उदासीन राहून वास्तव्य करीत असतो. त्याच्या अस्तित्वामुळे सर्व विश्व चैतन्यरूप आहे, ज्ञानाचा विषय होते. (२३८)

सर्व प्रियता जयासाठीं । तेचि सुखरूपता गोमटी ।
एवं तिन्ही लक्षणें उठाउठी । अस्ति भाति प्रियता ॥ ३९ ॥
ज्याच्यामुळे विश्वातील सर्व पदार्थ प्रिय वाटायला लागतात, ती त्या ब्रह्माची हवीशी वाटणारी सुखरूपता आहे. अशा प्रकारे ब्रह्माची अस्ति, भाति, प्रिय (म्हणजेच सत्, चित, आनंद) ही लक्षणे सर्व विश्वाला व्यापून आहेत. (२३९)

यांत सहप आनंदरूप दोन । याचे. पुढें असे विवेचन ।
प्रस्तुत आतां चिडूप पूर्ण । बोलिजे अल्प रीती ॥ ४० ॥
त्यापैकी सदूप आणि आनंदरूप या दोन लक्षणांचे विवेचन नंतर करावयाचेच आहे. प्रस्तुत प्रसंगी हे सर्व विश्व ब्रह्मच्या विद्र्रपाने कसे व्यापून राहिलेले आहे, याचे थोडक्यात निरूपण करावयाचे आहे. (२४०)

मुळीं अहंब्रह्म जें स्फुरण । विद्याविद्यात्मक शक्ती दोन ।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥ ४१ ॥
मुळात ' अहं ब्रह्म' (मी ब्रह्म आहे) असे जे स्फुरण ब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झाले, आणि त्याच्याबरोबरच विद्या आणि अविद्या अशा दोन शक्ती निर्माण झाल्या. त्या ज्याच्या तेजाने प्रकाशित झाल्या आहेत, (ज्याच्या चैतन्यरूप अस्तित्वामुळे भासमान आहेत, म्हणजे आपल्याला जाणवतात) ते त्या ज्ञानरूप आणि सर्वसाक्षिभूत आत्म्याचेच स्वरूप आहे. (२४१)

जयेसी वासना हें अभिधान । जयेतें वृत्ति नाम अंतःकरण ।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥ ४२ ॥
जिला वासना असे नाव आहे, जिला वृत्ती असेही नाव आहे, आणि जी आपल्या देहातील अंत: करण म्हणजे अंतरिव्हिय आहे ३ ती ज्याच्या अस्तित्वामुळे प्रकाशमान होते, जाणवते ते त्या ज्ञानरूप आणि सर्वसाक्षिभूत आत्म्याचेच स्वरूप आहे. (२४२)

मन बुद्धि चित्त अहंकरण । आणि तेथें उमटले त्रिगुण।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥ ४३ ॥
मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे अंत: करणचतुष्टय आहे; आणि सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण जेथे प्रकट होतात; हे सर्व ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात ते त्या ज्ञानरूप आणि सर्वसाक्षिभूत आत्म्याचेच स्वरूप आहे. (२४३)

श्रोत्र त्वचा लक्ष जिव्हा घाण वाचादि क्रिया आदिकरोन ।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥ ४४ ॥
श्रोत्र (कर्णेन्हिय), त्वचा, चघ, जिव्हा, घ्राण (नाक) ही पाच ज्ञानेन्द्रिये, वाचा इ. पाच कर्मेन्द्रिये ही सर्व ज्याच्या चिद्र्रपामुळे भासमान होतात ते त्या बोधरूप आणि साक्षिभूत आत्म्याचेच स्वरूप आहे. (२४४)

हस्तपादादि मस्तक संपूर्ण । गोलकादि नख शिख निर्माण ।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥ ४५ ॥
हात, पाय, मस्तक इ. सर्व शरीरातील इंद्रियसमूह पायाच्या नखापासून ते डोक्यावरील शेंडीपर्यंतचे जे जे निर्माण झालेले शरीराचे भाग ते सर्व ज्याच्या चिद्र्रपामुळे भासमान होतात ते त्या बोधरूप आणि साक्षिभूत आत्म्याचेच स्वरूप आहे. (२४५)

हा इतुका समुदाय उत्पन्न । जितुका जड चंचळ संपूर्ण ।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥ ४६ ॥
हा एवढा सगळा उत्पन्न झालेला जड आणि चंचल संपूर्ण समुदाय हे ज्याच्या चिद्‌रूपामुळे भासमान होतो ते त्या बोधरूप आणि साक्षिभूत आत्म्याचेच स्वरूप आहे. (२४६)

इतुकियांची क्रिया जे जे होणें । आणि पंचविषय तमोगुण ।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥ ४७ ॥
या सर्व समुदायाकडून ज्या ज्या क्रिया होतात; पाच ज्ञानेंद्रिये आणि त्याचे पाच विषय, तमोगुण द्रव्यशक्ती इ. सर्व ज्याच्या प्रकाशाने भासतात; ते त्या बोधरूप आणि साक्षिभूत आत्म्याचेच स्वरूप आहे. (२४७)

विषयास्त स्फुरणापासोन । उत्पत्ति स्थिति लय होणें ।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥ ४८ ॥
स्फुरणापासून विषयांपर्यंत जे उत्पत्ती, स्थिती आणि लय विकार होत असतात, ते सर्व ज्याच्या चिद्र्रपामुळे भासमान होतात ते त्या बोधरूप आणि साक्षिभूत आत्म्याचेच स्वरूप आहे. (२४८)

लयही जो सर्वांचा पाहे । ऐसी देखणी दशा आहे ।
द्रष्ट्याचे दृष्टीचा नाश नव्हे । कवणेही काळी ॥ ४९ ॥
तो सर्व सुष्ट पदार्थांचा लय पाहू शकतो, अशी त्याची नित्य देखणी दशा आहे, त्या द्रष्ट्याच्या या देखण्या दशेचा नाश कोणत्याही काळी होत नाही, अशी ती अखंड आहे. (२४९)

सामान्य सर्वा प्रकाशित । उत्पत्ति स्थिति जो भासवित ।
आणि लय जाणोनि तिष्ठत । जैसा तैसा ॥ ५० ॥
तो सर्वांना सामान्यत्वाने प्रकाशित करतो, त्यांच्या उत्पत्ती आणि स्थिती या अवस्थांवरही तो प्रकाश टाकतो. तसाच त्यांचा लयही जाणतो आणि एवढे सर्व करूनही तो जसाच्या तसा अखंडपणे निर्विकार राहतो. (२५०)

ऐसिया देखणे दयोसी । नामे तीन ओळखिसी ।
जो कां जाणतसे दृश्यासी । तोचि द्रष्टा ॥ ५१ ॥
अशी जी त्याची देखणी दशा आहे तिची ओळख पटण्यासाठी तिला तीन नावे दिली आहेत. जो दृश्याला जाणतो, तो द्रष्टा होय. (२५१)

चंचळ भासासि जो जाणे । तया साक्षी नांव ही वचनें ।
जो कां लयसाक्षी पूर्णपणे । त्या नांव ज्ञप्ति ॥ ५२ ॥
जो चंचल दृश्यरूप भासाला जाणतो त्याला साक्षी असे नाव आहे. जो लग्नाचाही पूर्ण ज्ञाता असतो, त्याला लसी असे म्हणतात. (२५२)

एव ती प्रकारें जाणणें एक । तें कधीं नव्हे न्यूनाधिक ।
तेंचि चिडूप निश्चयात्मक । मुख्य रूपाचे ॥ ५३ ॥
त्याची अशी तीन प्रकारची नावे (द्रष्टा, साक्षी आणि ज्ञप्ती) असली तरी त्यांचे हे जाणणे एकच आहे. ते कधीही कमी-जास्त होत नाही. तेच मुख्य स्वरूपाचे चिद्‌रूप लक्षण आहे. (२५३)

मुख्य स्वरूप देही व्यापले । जेवीं घटीं आकाश संचलें ।
निर्विकारें पूर्ण दाटलें । तया संकेत कूटस्थ ॥ ५४ ॥
घटामध्ये ज्याप्रमाणे आकाश व्यापून राहिलेले असते, त्याप्रमाणे देहामध्ये मुख्य स्वरूप व्यापून राहिलेले असते. ते तेथे संपूर्णपणे निर्विकारपणे व्यापून राहिले असते, त्याला कूटस्थ असे नाव (संकेत) आहे. (२५४)

उपाधीत जो सधन । पीर उपाधीहून विलक्षण ।
तया प्रत्यगात्मा अभिधान । परब्रह्मासी ॥ ५५ ॥
जो उपाधींमध्ये अंतर्बाह्य दाटून राहतो, पण त्या उपाधीपासून अगदी भिन्न असतो, त्या परब्रह्माला प्रत्यगात्मा असे नाव (अभिधान) आहे. (२५५)

अगा रविदत्ता तो कवण लणसी । तरी तूचि कीं गा निश्चर्येसी ।
सामान्य सर्वा प्रकाशी । सूर्य जेर्वी जगा ॥ ५६ ॥
अरे रविदत्ता, हा प्रत्यगात्मा म्हणजे कोण, असे विचारशील तर तो तूच स्वत: आहेस, हे निश्चित. सूर्य ज्याप्रमाणे सामान्यत्वाने सर्व जगाला प्रकाश देतो, तसा तूही सर्व जगाला सामान्यत्वाने जाणतोस. (२५६)

आकाशी जैसा सूर्य असे । सहज सर्वा प्रकाशितसे ।
ऊर्णतंतु तो ही भासे । आणि जडरूप भिंतीही ॥ ५७ ॥
सूर्य आकाशात असतो. तो सहजच सर्व जगाला प्रकाशित करतो; त्याच्या प्रकाशाने कोळ्याच्या (कीटकाच्या) जाळ्याचा धागाही दिसतो, तशा जड असलेल्या भिंतीही दिसतात. (२५७)

जागणे माड्या परवरें । बळदे खोल्या तळघरे ।
एकदांचि प्रकाशित सारे । तेवीं कूटस्थ भासवी ॥ ५८ ॥
स्थूलरूप जड भिंती । सूक्ष्मादि तळघरे असती ।
हें असो मुख्य जे कां स्फूर्ति । ऊर्णतंतूचे परी ॥ ५९ ॥
आंगणे, माड्या, जोती (ओसऱ्याचे कट्टे), बळदे, खोल्या, तळघरे ही सर्व सूर्यच प्रकाशित करतो. त्याप्रमाणे जड भिंतीप्रमाणे असणारा स्थूलदेह, तळघराप्रमाणे असणारा सूक्ष्म देह, कोळ्याच्या (कीटकाच्या) जाळ्याच्या तंतूप्रमाणे असणारे मूल स्फुरण यांना प्रकाशित करतो. (२५८-२५९)

तेही जयाच्या भासे । मा स्थळ चंचळ कां न दिसे ।
ऐसा आत्या सर्वत्रीं असे । साक्षी बोधरूप ॥ ६० ॥
ही सर्व त्याच्या प्रकाशाने उजळून निघतात. मग त्यामुळे स्थळ आणि चंचळ हे प्रकार त्याला कसे दिसणार नाहीत ? अवश्य दिसलेच पाहिजेत. अशा प्रकारे आत्मा सर्व ठिकाणी साक्षित्वाने आणि बोधरूपाने असतो. तो सर्वांना प्रकाशित करतो. (२६०)

सूर्याचा जो दृष्टांत दिधला । येथें अन्यथा भाव ज्यासी कल्पिला ।
कीं आत्या देहाहून दूर असे राहिला । गगनीं जेवीं रवि ॥ ६१ ॥
हा सूर्याचा दृष्टान्त जो दिला आहे, त्यामुळे तू वेगळाच अर्थ मनात धरशील. सूर्य आकाशात राहून सृष्टीतील सर्व पदार्थांना उजळ करतो त्याप्रमाणे आत्मा (कूटस्थ, प्रत्यगात्मा) देहापासून दूर राहून देहान्तर्गत सर्व पदार्थांना प्रकाशित करतो अशी कदाचित् कल्पना करशील. (२६१)

एव आत्या ऐसा दूर भामिता । अति दूषण असे तत्वता ।
देहादि ठाव जाला रिता । मग व्यापकत्वा बाध आला ॥ ६२ ॥
आणि तो देहात नसतो तो देहापासून दूर राहतो अशी कल्पना करणे हेच मुळी दोषास्पद आहे. म्हणजे आत्म्याने देहाची जागा रिकामी केली, असे म्हणावे लागते. असे म्हणण्यामुळे आत्मा सर्व विश्वभर व्यापून उरला आहे, या व्यापकत्वाच्या गुणाला बाधा येते. (२६२)

आणि देहामाजी जरी नसे । तरी तें साधका प्रास कैसे ।
येणे धुती अनुभवा आला असे । बाथ हा थोर ॥ ६३ ॥
आणि जर तो देहात नसेल तर साधकाला तो कसा प्राप्त होईल ? असे मानल्यामुळे धुतिवचनाला, आत्मानुभवाला ही मोठीच बाधा येते. (२६३)

तस्मात् नसे सूर्या ऐसा । उपमिला असे येथें सहसा ।
याचा भाव अनारिसा । बोलिजे तो ॥ ६४ ॥
त्यामुळे तो सूर्यासारखा एकदेशी नाही. येथे आपण आत्म्याला सूर्याची उपमा दिली आहे. तिचा अभिप्राय वेगळा आहे. तो आता सांगतो. (२६४)

सूर्य जेवीं सामान्य प्रकाशी । तेवीं आत्मा भासवी सर्वांसी ।
परी न पवे विकारासी । सूर्यासम आत्या ॥ ६५ ॥
सूर्य ज्याप्रमाणे सामान्यत्वाने सर्व पदार्थांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे आत्माही सर्वही पदार्थांना प्रकाशित करतो. पण तो सूर्याप्रमाणे विकार पावत नाही. (२६५)

सामान्यामुळे सूर्य घेतला । तरी दूर भाव न जावा कल्पिला ।
यास्तव पूर्वीचं असे दृष्टांत दिधला । आकाशापरी ॥ ६६ ॥
सामान्य प्रकाशामुळे त्याला सूर्याची उपमा दिली आहे. पण त्याचा दूरपणा येथे अभिप्रेत नाही. यासाठी या अगोदर तो आकाशासारखा आहे, असा दृष्टान्त आपण दिलाच आहे. (२६६)

आकाश जैसे घटीं व्यापले । तैसें आल्पत्व देही संचलें ।
परी तें असंग राहिलें । सर्वा भासऊनी ॥ ६७ ॥
आकाश घटामध्ये व्यापून राहिले आहे, त्याप्रमाणे देहामध्ये आत्मतत्त्व व्यापलेले आहे. पण सर्व पदार्थांना प्रकाशित करून ते आत्मतत्त्व स्वत: मात्र त्या सर्वांपासून अलिप्त राहिले आहे. (२६७)

उगाचि प्रकाश मात्र सर्वा । लय उत्यत्तीसी करावा ।
परी त्या त्या विकाराचा न घ्यावा । भाव किमपि ॥ ६८ ॥
आत्मा सर्वांना सामान्यत्वाने प्रकाशित करतो. त्यांची उत्पत्ती, लय यांना प्रकाशित करतो. पण त्यांच्याप्रमाणे तो विकार पावत नाही म्हणून निर्विकारी आत्मतत्त्वाला विकारित्वाचा गुण कधीही कल्प नये. (२६८)

तरी विकारासी कोण पावला । कोण पुण्यपापाचा कर्ता जाला ।
ऐसा भाव जरी असे बुजला । तरी जवधारावे ॥ ६९ ॥
असे असेल तर विकार कोणाला होतो ? पापपुण्याचा कर्ता कोण असतो ? असा विचार मनात निर्माण झाला, तर आता लक्ष देऊन ऐक. (२६९)

सूर्य प्रतिबिंबाची झळ झळ । विशेष भासे केवळ ।
तैसा बुद्धीमाजी जो सफळ । प्रतिबिंबित जीव ॥ ७० ॥
सूर्य प्रतिबिंबाची झळझळ ही विशेषत्वाने जाणवते. त्याप्रमाणे आत्म्याचे बुद्धीत पडलेले प्रतिबिंब जो जीव त्याचे अस्तित्व विशेषत्वाने जाणवते. (२७०)

पद - बोधाभासो बुद्धिगतः ।

पदार्थ : बुद्धीच्या ठिकाणी असणारा प्रतिबिंबरूप चिदाभास

ज्ञाना ऐसा बुद्धींत बिंबला । बोधाभास नाम तयाला ।
तो सत्य नव्हे पाहिजे कळला । परी दिसे साचा ऐसा ॥ ७१ ॥
बुद्धीत ज्ञानाप्रमाणे प्रतिबिंबित झालेल्या आत्मतत्त्वाला बोधाभास अथवा जीव असे म्हणतात, तो सत्य नाही, हे कळले पहिजे तो आत्म्याचे प्रतिबिंब असूनही मूळ बिंबाप्रमाणे (सत्य) खरा असल्यासारखा दिसतो. (२७१)

चित्रासी रंगाचे वस्त्र केलें । तया वस्त्राभास नाम जाले ।
कीं दर्पणीं मुखा ऐसें दिसलें । त्या नांव मुखाभास ॥ ७२ ॥
चित्रामध्यें रंगाच्या साहाय्याने एक रंगीत वस्त्र काढले, तर त्या वस्त्राला आपण वस्त्राभास म्हणतो; जेकिंवा आरशामध्यें मुखासारखे काही दिसले तर त्याला आपण मुखाभास असे म्हणतो. (२७२)

ऐसाचि बुद्धींत प्रतिबिंबत । तो जीव चिदाभास विख्यात ।
यावत् बुद्धि तो काल दिसत । वृत्ति अभावीं मरे ॥ ७३ ॥
याचप्रमाणे बुद्धीमध्ये प्रतिबिंबरूपानें जो जीव दिसतो. त्याला चिदाभास म्हणून ओळखले जाते. जोपर्यंत बुद्धिवृत्तीचे अस्तित्व असते तोपर्यंत तो भासतो बुद्धिवृत्तीच्या अभावी तो मरतो. (२७३)

सूर्य प्रकाशी दर्पण ठेविलें । त्यांत सूर्याचे प्रतिबिंब पडलें ।
तें भिंतीवरी विशेष दिसलें । सामान्य आच्छादुनी ॥ ७४ ॥
सूर्याच्या प्रकाशात आरसा ठेवला, त्यात सूर्याचे प्रतिबिब पडले ते प्रतिबिब भिंतीवर कवडशाच्या रूपाने स्पष्ट दिसते. त्या परावर्तित प्रकाशाने भिंतीवर जो अगोदरचा सामान्य प्रकाश पडला होता (ज्याच्यामुळे आपल्याला भिंत दिसत होती) त्याचा तेवढा भाग झाकला जातो. तेवढ्यापुरता आपल्याला कवडशाचा विशेष प्रकाशच जाणवतो. सामान्य प्रकाश जाणवत नाही. (२७४)

तैसाच बुद्धि आरसियांत । आत्मा सूर्य प्रतिबिंबित ।
तेणें विषयादि स्फुरविली भिंत । आच्छादुनी सामान्या ॥ ७५ ॥
त्याप्रमाणे बुद्धिरूपी आरशात आत्मारूपी सूर्याचे प्रतिबिंब पडते. त्या प्रतिबिंबामुळे विषयरूपी भिंतीवरील सामान्य प्रकाशरूपी चिद्र्रप झाकले जाऊन कवडशाच्या रूपाने जाणवणारा विशेष प्रकाशरूपी जीव किंवा चिदाभास जाणवू लागतो. (२७५)

हें विशेष जीवाचे रूप । सामान्य आत्या तो चिडूप ।
याचे निरूपण साक्षेप । पुढे बहुधा असे ॥ ७६ ॥
हा विशेष प्रकाश हे जीवाचे रूप आहे. सामान्य प्रकाश हे चिद्‌रूप अशा आत्म्याचे स्वरूप आहे. त्याचेच निरूपण पुढे अनेक प्रकारांनी होणार आहे. (२७६)

परी अल्पमात्रे येथें बोलिले । सामान्य विशेष निवडिलें ।
सामान्य तें सदा संचलें । निर्विकारत्वे ॥ ७७ ॥
पण येथे त्याचे थोडेसे वर्णन केले आहे. त्यायोगे सामान्य आणि विशेष यातील भेद स्पष्ट झाला. सामान्य हे निर्विकार असून सर्व काळ सर्वत्र व्यापून राहिले आहे. (२७७)

विशेष जो हा जीव । बोधा ऐसा उमटला भाव ।
तोचि एका अभिमानास्तव । कर्ता जाला ॥ ७८ ॥
विशेषरूपाने जो हा जीव, चिद्र्रप (ज्ञानरूप) वाटतो, तो अभिमानामुळे स्वतःकडे कर्तृत्व घेतो. (२७८)

पद : कर्तास्थात्युण्यपापयो ॥
पदार्थ : तो चिदाभासच (जीवच) पापपुण्याचा कर्ता असतो.

आपण तरी नाहीं जन्मला । उगाचि सताचा आहेपणा घेतला ।
आपण आहेसा भाव कल्पिला । आत्या नाहींसा करोनी ॥ ७९ ॥
आपण स्वत: तर जन्मला नाहीच, पण त्याने सच्चिदानंद स्वरूप ब्रह्माचा आहेपणा घेतला आणि आपण आहोत (सद्‌रूप) अशी कल्पना केली. आणि त्याच वेळी आत्म्याचे अस्तित्व त्याने नाही असे कल्पिले. (२७९)

आत्मा असता तरी दिसता । मी दिसे ह्मणोन आहें तत्वत्तां ।
मीच असें की सर्वा देखता । आत्मा जड न पाहे ॥ ८० ॥
तो जीव म्हणतो की, आत्मा जर खरोखरच असता तर तो दिसला असता. पण मी दिसतो म्हणून मी खऱ्या अर्थाने आहे. मीच सर्वांना पाहू शकतो, आत्मा जड असत्यामुळे पाहू शकत नाही. (२८०)

मी आपआपणा असें प्रिय । आत्या दुःखरूप अप्रिय ।
एव अस्ति भाति प्रिय जो होय । तें आपणा भाविलें ॥ ८१ ॥
मी मला स्वतःला प्रिय आहे. याउलट आत्मा दुःखरूप असून अप्रिय ठरतो. अशा प्रकारे जीव स्वतःकडे अस्तिभातिप्रियत्व घेतो (आणि आत्म्याला ती लक्षणे नाकारतो) (२८१)

आपण जो असफ्लड दुःखरूप । तो आल्पावरी केला आरोप ।
ऐसा अन्योन्याध्यास आपेआप ॥ कल्पिला ब ॥ ८२ ॥
वास्तविक पाहता आपण स्वत: असज्जड दुःखरूप असताना तो त्या लक्षणांचा आत्म्यावर आरोप करतो. (आणि आत्म्याची लक्षणे स्वतःच्या ठिकाणी मानतो) असा अन्योन्याध्यास तो कल्पनेने बळेच करतो. (२८२)

याचि नावे ग्रथि पडिली । आत्करूपता आभासें घेतली ।
आपुली अनात्यता घातली । जात्ययावरी ॥ ८३ ॥
यालाच ग्रंथी पडणे असे म्हणतात. चिदाभासाने आत्म्याची लक्षणे स्वीकारली आणि आपले अनात्मेपण आत्म्यावर लादले. (२८३)

ऐसा भाव जीवे कल्पिला । परी तो जात्यत्वीऐ नाहीं स्पर्शाला ।
आत्या जैसा तैसाचि संचला । अस्ति भाति प्रियाल्पक ॥ ८४ ॥
वरीलप्रमाणे जीवाने कल्पना केली असली तरी त्या कल्पनेचा आत्म्याला स्पर्शही झालेला नसतो. आत्मा नेहमीप्रमाणेच अस्तिभातिप्रियात्मक असून सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. (२८४)

देखोनि गुंजापुंज रक्त । अन्ये भाविला असे जळत ।
त्या कल्पने भस्म पावत । काय तो ढीग ॥ ८५ ॥
गुंजांचा लालभडक ढीग पाहिल्यानंतर एकाने तो जळत असत्याची कल्पना केली. त्या कल्पनेचा त्या ढिगावर काय परिणाम होणार ? त्या कल्पनेमुळे त्या ढिगाऱ्याची राख थोडीच होणार आहे ? (२८५)

ऐसा आत्मा सच्चिदघन । असे तैसा असे पूर्ण ।
जेणे भाविला तो जन्म मरण । पावला मात्र ॥ ८६ ॥
सच्चिरून असा आत्मा जसा आहे तसाच परिपूर्ण आहे. पण ज्याने त्याच्यावर नश्वरतेची कल्पना केली, तो मात्र स्वत: जन्ममरण पावला. (२८६)

असो ऐसा जीव असह असोनी । सत्यत्वचि आपणार्ते मानी ।
देहाचे अभिमानी । तादात्म्य पावे ॥ ८७ ॥
असो, तर जीव स्वत: असत् असून स्वतःला सत्यच मानतो. आणि दोन्ही देहाचा अभिमान धरून त्यांच्याशी तादात्म्य पावतो. (२८७)

स्थूलदेह मौसम्याचा । नेणोनि भाव तयाचा ।
मीच ह्मणोनि गर्जे वाचा । त्याचे धर्मही माथा घे ॥ ८८ ॥
स्धूलदेह मांसमय आहे, हे नीट लक्षात न घेता, मीच स्थूलदेह आहे अशी वाणीने गर्जना करतो, आणि त्याचे गुणधर्मही स्वतःच्या माथ्यावर घेतो. (२८८)

मी जन्मलो वाहू लागतो । आहें आणि तरुण होतों ।
वृद्धाप्य पावोनि मरतं । पुन्हा जन्येन पुढें ॥ ८९ ॥
मी जन्म पावलो, आता मी वाहू लागलो आहे, मी आता तरुण होतो आहे, आता मी वृद्ध झालो आहे, मी आता मरणार आहे, पुन्हा मी जन्म घेणार आहे. (२८९)

मी अमुक कुळी जन्मली । मी अमुक आश्रमातें पावलो ।
मी अमुक मेळवून राहिलों । सुखी वडिलां ऐसा ॥ ९० ॥
अमक्या कुळात माझा जन्म झाला आहे, मी अमुक आश्रम स्वीकारला आहे, मला अमुक अमुक गोष्टी मिळाल्या आहेत. मी माझ्या वडिलांप्रमाणेच सुखी झालो आहे. (२९०)

तैसेचि इंद्रियांचे धर्म । आपुले माथा घेतसे परम ।
मी बहिरा आंधळा की सूक्ष्म । ऐके आणि देखे ॥ ९१ ॥
याप्रमाणे स्थूलदेहाचे सर्व धर्म तो बळेच आपल्या माथ्यावर घेतो. त्याप्रमाणेच इंद्रियांचेही धर्म तो आपल्या माथ्यावर घेतो. मी बहिरा आहे, मी आंधळा आहे, मला सूक्ष्म पदार्थ दिसतात, सूक्ष्म ध्वनी ऐकू येतात. (२९१)

अजिव्ह कीं जसे रसज्ञ । निर्नासिक कीं सघाण ।
अस्पर्श कीं स्थर्शज्ञ । असें पूर्वकर्मा ऐसा ॥ ९२ ॥
मला जीभ नाही किंवा मी चांगला रसज्ञ आहे. मला नाक नाही किंवा मला नाक आहे; मी स्पर्श जाणणारा आहे किंवा मी अस्पृश्य आहे. पूर्व कर्मानुसार मी अशा प्रकारचा आहे. (२९२)

मी बोडका चालका दानी । मीच भोगी बहु कामिनी ।
मीच शौच सारी अनुदिनी । मजहनि हुवा नसे ॥ ९३ ॥
मी बोलका, मी चालणारा आहे, मी दान करणारा आहे, मी पुष्कळ स्त्रियांचा भोग घेणारा आहे, मी दररोज मलविसर्ग करणारा आहे. माझ्यापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ नाही. (२९३)

मजाच क्षुधा तृषा लागे । तेव्हां पितो खातो निजागे ।
एव प्राणाचेही धर्म वेगे । घे अभिमानें माथा ॥ ९४ ॥
मलाच भूक लागते, तहान लागते, मी खातो, मी पितो; अशा प्रकारे प्राणाचेही गुणधर्म मी अभिमानाने माझ्या माथ्यावर घेतो. (२९४)

च्या अमुकीया वचन दिधले । कीं तुज रक्षीन साम आपुले ।
तरी मीं प्राणांतींही उपेक्षिले । न जाय तया ॥ ९५ ॥
मी अमुक माणसाला वचन दिले की मी माझ्या सामर्थ्य बळावर तुझे रक्षण करीन; आणि त्याप्रमाणे त्याची प्राणांतीही उपेक्षा करत नाही. (२९५)

व्या घोकिलें तें विसरेना । कधींही आळस मज असेना ।
किती रीती मज होती कल्पना । तें माझा मीच जाणें ॥ ९६ ॥
मी एकदा काही घोकले की ते अजिबात विसरत नाही. मला कधीही आळस येत नाही. मला किती कल्पना सुचतात, त्या माझ्या मलाच माहीत ! (२९६)

माझा निश्चय किती जाडा । येर झुडतार कोण बापुडा ।
मीआठव करणार केव्हडा । आपुले ठायीं ॥ ९७ ॥
माझा निश्चय किती पक्का असतो ! त्यापुढे इतर कोणी म्हणजे बिचारे खुरटे, पर्णहीन व कोमेजलेले झुडूप (झुडतार) होय. माझी आठवण किती पक्की ! मला कशाचा विसर पडत नाही. (२९७)

एव देहेंद्रिय प्राण कर्म । अथवा अंत करणाचे धर्म ।
आपुलेचि माथा घेऊन अधम । बैसला बळे ॥ ९८ ॥
याप्रमाणे देह, इंद्रिये, प्राण, कर्मे, अथवा अंतःकरणाचे धर्म हे सर्व आपल्याच माथ्यावर घेऊन हा मूर्ख (अधम) मनुष्य बसला आहे. (२९८)

जागतीमाजी इतुक्यांचा । अभिमान घेतसें मीच साचा ।
कर्म धर्म वर्ण आश्रमांचा । कीं व्यापार लौकिकीं ॥ ९९ ॥
जागृतीमध्ये इतक्या सर्वांचा अभिमान मी घेतो. त्याप्रमाणे कर्म, धर्म, वर्ण, आश्रम किंवा लौकिक व्यवहार. (२९९)

हा मी आणि हें हें माझें । घेऊन बैसला तें न साडी ओझे ।
हाचि विश्वाभिमानी बुझे । नाम जीवासी ॥ ३०० ॥
हा मी आणि हे माझे असे म्हणत हे मीपणाचे ओझे तो स्वत:च्या डोक्यावर घेऊन बसला आहे. ते तो सोडायला तयार नाही. अशा जीवाला विश्वाभिमानी असे नाव आहे, हे ध्यानात घे. (३००)

तेवींच स्वप्नी स्वप्न तूनयासी । पाहतसे कल्पून मानसी ।
त्यांत आपण एक असे तयासी । कल्पनी पाहे ध्यासें ॥ १ ॥
त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये जीव स्वप्न पाहातो आणि एरव्हीही मनाने प्रसंग कल्पून पाहातो आणि या दोन्ही प्रकारच्या दृश्यांमध्ये आपण एक कर्ता भोक्ता आहोत, असा ध्यास या जीवाला लागलेला असतो. (३०१)

दृश्य आणि आपणाही कल्पिले । पीर हाचि मी त्या दृढ धरिलें ।
हे हे अन्य ते परते वाटले । मज सुखदुःख देती ॥ २ ॥
स्वप्नात पाहिलेले दृश्य अथवा स्वकल्पित दृश्य या दोहोत स्वतः स गुंफून तोच मी असे पक्के धरतो. त्या दृश्यातील व्यक्तींना हा परका, हे दुसरे असे मागून मला ते सुख- दुःख देत आहेत, असे तो जीव मानतो (३०२)

एव स्वप्नांत जो अभिमान धर्ता । तोचि तैजसाभिमानी तत्त्वता ।
पुढे झोपही जरी लागता । मीपणा न त्यागी ॥ ३ ॥
अशा प्रकारच्या स्वप्नांमध्येही जो अभिमान धारण करतो, त्यालाच तैजस अभिमानी म्हणतात, स्वप्नानंतर झोप लागली तरी त्याचा हा मीपणाचा अभिमान सोडत नाही. (३०३)

मी काय बहु वेळ निजेलो । होतों अन्य किमपि न स्मरलों ।
सुखदुःखासी न होतों स्पर्शाला । आणि कांहींच नेणें ॥ ४ ॥
असा हा अभिमान गाढ झोपेमध्येही जात नाही, मी फार वेळ झोपलो होतो, मला काहीसुद्धा आठवत नव्हते, मला कोणत्याही प्रकारच्या सुख- दु : खाचा स्पर्श झाला नाही झोपेमध्ये मला काहीच कळले नाही, असे जागा झालेल्या जीवाला वाटत असते. (३०४)

कांहीं विषय इच्छा नाहीं केली । न किंचिक्यप्न- अवस्था देखिली ।
ते जागे जालिया आठवली । परी अनुभविली नेणीव ॥ ५ ॥
तो म्हणत असतो की, कोठल्याही विषयाची मी इच्छा केली नाही, किंवा स्वप्न अवस्थेची दृश्येही पाहिली नाहीत. जागे झाल्यानंतर ती दृश्ये आठवायचा प्रयत्न केला, पण नेणीवेचाच मी अनुभव घेतला. (३०५)

तेथें मीपणा जरी नसता । तरी जागतींत अनुभवा न येता ।
एव नेणिवेचा अभिमान धर्ता । तो प्राज्ञ अभिमानी ॥ ६ ॥
या सुधुमीच्या अवस्थेत मीपणा नसता तर जागत अवस्थेत आत्यानंतर तो नेणिवेचा अनुभव आला नसता. तेव्हा नेणिवेचा अभिमान जो धरतो, त्याला प्राज्ञ अभिमानी असे म्हणतात. (३०६)

एव जागति स्वप्न सुपुति । ऐसिया तिन्ही अवस्थांप्रती ।
मीच ह्मणोनि दृढ प्रतीति । तया बोधाभासाची ॥ ७ ॥
अशा प्रकारे जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा तिन्ही अवस्थांमध्ये मीच सर्व अनुभव घेतो, अशी त्या बोधाभासाची म्हणजे जीवाची पक्की प्रचीती असते. (३०७)

या तीन अवस्था स्वाभाविक । परी अन्य असती आगांतुक ।
तेथें ही मीपणा आवश्यक । उणा नोव्हे ॥ ८ ॥
या तीन अवस्था स्वाभाविक आहेत. याखेरीज इतर काही अवस्था आगंतुक आहेत त्यातीलही मीपणाच्या अनुभवात काही फरक पडत नाही. तेथेही मीपणा असतोच. (३०८)

मुद्‌गल प्रहारें मुला आली । तेव्हां मज मूळ पडली मुली ।
हेही सावधानी आठवली । परी तेथें मीपण होतें ॥ ९ ॥
मुद्‌गलाच्या प्रहाराने मूर्च्छा आली, त्यामुळे मला भोवळ आली, तिच्यामुळे मला भूल पडली, हे सगळे मला शुद्ध आत्यानंतर आठवले, पण तशा परिस्थितीतही मीपण कायम होतेच. (३०९)

तैसेंच मरण जेव्हां पातले । तेंही मी मेलो ऐसें भाविलें ।
परी अभिमानाचे उणे जाले । नाही रोम ॥ १० ॥
त्याप्रमाणेच मरण जेव्हा आले, तेव्हा मीच मेलो अशी मी कल्पना केली. त्या वेळीही अभिमानाच्या एकाही केसाला धक्का लागला नाही. (त्याही वेळी अभिमानाचा एकही केस कमी झाला नाही) (३१०)

हें असो समाधींत बैसतां । मीपणासि नये उणिवता ।
मी सुखी बैसलों सांडून परता । विषय चिंतनादि ॥ ११ ॥
ते राहू द्या. समाधी लावून बसलो असताही मीपणा यत्किंचितही कमी झाला नाही. विषयचिंतनादी व्यापार बाजूला सारून मी सुखात बसलो होतो. (३११)

ऐसा मीपणा धरिला जेणे । तोच जीव आभास वोळखणें ।
असो देह क्रिया जे जे होणें । ते ते खणे व्या केली ॥ १२ ॥
तेव्हा अशा प्रकारचा मीपणा धरून जो बसतो तो आभासरूप जीव आहे, असे ओळखावे. तो देहाकडून होणाऱ्या सर्व क्रिया आपणच केल्या असे म्हणत असतो. (३१२)

स्नान संध्या स्वधर्म कर्म । नित्य नैमित्तिक यज्ञ होम ।
दान अथवा नित्य नेम । कर्ता मीच पुण्याली ॥ १३ ॥
आपण स्नान, संध्या, स्वधर्माचरण; नित्य, नैमित्तिक कर्मे, यज्ञ, होमादी कृत्ये, दानधर्म, नित्य नेमाचे पालन या पुण्यकर्मांचा कर्ता आहोत असे तो मानतो. (३१३)

शास्त्रीय जें कां न करावें । तें जरी केलें स्वभावें ।
तेंचि अभिमानें माथा घ्यावें । पाप केले ह्यणोनी ॥ १४ ॥
शास्त्राने जे कर्म करू नये म्हणून निषेधिले आहे, ते कर्म स्वतः च्या हातून केले गेले, त्यालाच पाप केले म्हणून तो आपल्या माथ्यावर घेतो. (३१४)

अथवा लोकरीती विषय । जैसा जैसा वर्ते काय ।
तें तें मां घेत जाव । पुण्य पाप म्हणोनी ॥ १५ ॥
किंवा लोकरीतीप्रमाणे शरीराची ज्या ज्या प्रकारे वर्तणूक होईल, ते सर्व काही पुण्य अथवा पाप म्हणून तो आपल्या माथी घेतो. (३१५)

विचार पाहतां जीवासी । करणें नाहीं आभासासी ।
परी मी कर्ता बुद्धि जरी ऐसी । तरी तें भोगावे लागे ॥ १६ ॥
खरा विचार केला तर आभासरूप जीवाला कोणतेच कर्म करावे लागत नाही. पण मीच सगळ्या गोष्टींचा कर्ता अशी जर त्याची बुद्धी असेल तर मग त्या कर्माची फळे त्याला भोगावीच लागतील. (३१६)

देह इंद्रिय आणि प्राण । कर्म आणि अंत : करण ।
हें इतुकें मिळता संपूर्ण । करणें घडे ॥ १७ ॥
देह, इंद्रिये, प्राण, प्रत्यक्ष कृती आणि अंतःकरण हे इतके सगळे मिळून येतील तेव्हाच कर्म घडत असते. (३१७)

देह नसता प्राण इंद्रिय । चित्ते कर्में करणें ही काय ।
इंद्रियांविण करणें न होय । देहादिही असतां ॥ १८ ॥
जर देहच नसेल तर प्राण, इंद्रिये, अंतःकरण, कृती यांच्याकडून कर्म कसे घडू शकेल ? त्याचप्रमाणे देहादिक इतर घटक असून इंद्रिये नसतील तरीही कर्म कसे होऊ शकेल ? (३१८)

प्राणेंविण इंद्रिय देहे । मन कर्म जरी आहे ।
तरी कर्म निफजू न लाहे । शुभ कीं अशुभ ॥ १९ ॥
तसेच प्राणावाचून इंद्रिये, देह, मन, कर्म इ. असूनही कर्म घडू शकणार नाही. मग ते शुभ असो की अशुभ असो. (३१९)

येकले अंतःकरण नसता । देह प्राणादि चारी असतां ।
कर्में नुद्धवती तत्त्वतां । तस्मात् कर्ता कोण ॥ २० ॥
देह, प्राण इ. बाकीची चार असतील आणि एकटे अंत: करण जर नसेल तरी खरे पाहिल्यास कर्मे निर्माणच होणार नाहीत. म्हणून यांपैकी कर्ता कोण समजायचा ? (३२०)

होणें कर्म नाहीं उदेलें । जरी मन इंद्रियादि असलें ।
तरी कर्में न घडतील जाणिलें । पाहिजे विचारे ॥ २१ ॥
जरी मन, इंद्रिये इत्यादी असले आणि होणारी कृतीच घडली नाही, तरी कर्मे घडणारच नाहीत, हे विचाराने जाणून घेतले पाहिजे. (३२१)

जीव तरी बुद्धि औत । मिथ्या प्रतिभास दिसत ।
तेथें करणियाचा संकेत । उपाधिविण केवी ॥ २२ ॥
जीव हा तर बुद्धीमध्ये पडलेले प्रतिबिंबरूप मिथ्याभास आहे. त्याच्या ठिकाणी वरील पाच उपाधींवाचून कर्म कसे निर्माण होईल ? (३२२)

एव सर्व हे भिन्न भिन्न । परी कोठच नाढळे कर्तेपण ।
उगेचि भाविलें न कळून । अभिमानें मी कर्ता ॥ २३ ॥
अशा प्रकारे या सगळ्यांच्या ठिकाणी एकटेपणाने कर्तृत्व कोठेही आढळत नाही. हे न कळल्यामुळे जीवाने उगीचच अभिमानाने मी कर्ता आहे, असे मानले. (३२३)

नेणें देह इंद्रिय प्राण । नेणे कर्म अंतःकरण ।
नेणें जीवाचे काय लक्षण । उगाचि सर्वा मी ह्मणे ॥ २४ ॥
त्याला देह, इंद्रिये, प्राण माहीत नाहीत (कारण तो केवळ भासरूप आहे), त्याला कर्म माहीत नाही, अंतःकरण माहीत नाही, जीवाचे खरे स्वरूप काय आहे हे माहीत नाही; आणि उगीचच या सगळ्यांना मीच म्हणून मानत असतो. (३२४)

एव तया मीपण योगें । अन्याचे कर्म तें व्या केलें अंगें ।
तया वृयासेचि लागवेगे मज भोगणें लागे मानी ॥ २५ ॥
अशाप्रकारे त्या मीपणाच्या योगाने इतर घटकांची कर्मे आपणच केली असा तो ध्यास घेतो. त्यामुळे आपल्याला त्या कर्मांची फळे भोगली पाहिजेत असे तो मानतो. (३२५)

पुण्य केलें तेणें मज । पुढें सुख होईल सहज ।
पापे घडली जी जी सहज । तेणें दुःख होय पुढें ॥ २६ ॥
पुण्यकारक कर्म घडले, आता मला सहज सुख प्राप्त होईल, जी जी पापे स्वाभाविकपणे घडली. त्यांच्यामुळे आपल्याला पुढे दुःख भोगावे लागेल, असे तो धरून चालतो. (३२६)

ऐसें जे जें कर्म जाले । तें ते कर्तेपणे दृढ भाविलें ।
तितुके ध्यास अंतरीं बैसले । हा देह पडिला जरी ॥ २७ ॥
अशा प्रकारे जे जे कर्म घडले त्यांचा आपणच कर्ता आहोत, असे मनात पक्के धरून ठेविले, ते ध्यास अंत: करणात तो देह पडला तरी पक्के बसलेले असतात. (३२७)

मरणकाळीं ऐशी वासना । दृढ धरून पावे जवसाना ।
तयाचि ध्यासें पावे जनना । भलतेहि योनी ॥ २८ ॥
मरणाच्या वेळी अशीच वासना दृढ घरून तो मृत्यू पावतो. त्याच ध्यासांना बरोबर घेऊन तो कोणत्यातरी योनीमध्ये जन्म घेतो (३२८)

GO TOP