॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. ४ था

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोक : यो जाग्रत्स्वप्नयोरेव बोधाभासविडंबना ॥ ४ ॥ (पूर्वार्ध)
अर्थ : चिदाभासाचा (जीवाचा) व्यवहार जागृती आणि स्वप्न या दोन अवस्थांतच होतो. । । ४ । । (पूर्वार्ध)

ऊ स्थूलासहित ते जागति ।
सूक्ष्मासह स्वप्नसाति । या दोहीं अवस्थेप्रति । आभास विडंबन ॥ ७३ ॥
स्थूल देहासहित असणारी जागत अवस्था आणि सूक्ष्म देहासह असणारी स्वप्नाची द्यांत अवस्था या दोन अवस्थांमध्येच फक्त आभासाचा खेळ चालतो. (५७३)

आभास ह्मणजे मिथ्या भासे । जळी प्रतिबिंब व्यर्थ जैसे ।
तयामाजीं नांव आलें असे । जडासी जीवी ॥ ७४ ॥
पाण्यामध्ये जसे प्रतिबिंब भासते. ते खोटे असते, त्याप्रमाणे जे खोटे असून भासते त्याला आभास म्हणतात. तो जडास जीवन देतो म्हणून त्या आभासाला जीव असे म्हणतात. (५७४)

स्थूलदेह हा जडाल्पक । हस्तपादादि आनख मस्तक ।
जो मागा बोलिला पांचभौतिक । पंचीकृत अन्नमय ॥ ७५ ॥
स्थूलदेह जड पांच भौतिक तत्त्वांचा बनलेला असतो. हातापायांच्या नखांपासून ते मस्तकापर्यंत त्याचा विस्तार असतो. तो मागे सांगितल्याप्रमाणे पाच भूतांपासून तयार झालेला असतो. तो पंचीकृत भूतांचा बनलेला असून अन्नमय कोशाचा बनलेला आहे, हे मागे सांगितले आहे. (पहा ओ. ७४ - ७९) (५७५)

अपंचीकृत जी तत्त्वें सत्रा । तोचि लिंगदेह स्थूलामाझारा ।
राहून करितसे देहव्यापारा । येकमेकां साह्यपणें ॥ ७६ ॥
या स्थूल देहामध्ये जो अपंचीकृत सतरा तत्त्वांचा लिंगदेह राहातो. तो तेथे राहून स्थूल देहाच्या सहकार्याने देहाचा व्यापार करत असतो. (५७६)

स्थूलाविण लिंगदेहासी । घेतां नये भोग्यजातासी ।
सूक्ष्माविणही स्थूल जडासी । व्यापार कैचा ॥ ७७ ॥
स्थूलाच्या आधाराशिवाय लिंगदेहाला भोग्य वस्तूचे ग्रहण करता येत नाही आणि सूक्ष्म देहावाचून जड स्थूल देहाचा व्यापार कसा शक्य होईल ? (५७७)

ह्मणून स्थल देही राहून । लिंगदेह करी विषय ग्रहण ।
तया व्यापारा नामे दोन । स्वप्न आणि जागति ॥ ७८ ॥
म्हणून स्थलदेहात राहूनच लिंगदेह विषयांचे ग्रहण करतो. त्या व्यापाराला दोन नावे आहेत- स्वप्न आणि जागृती. (५७८)

अंतःकरणवृत्ति ज्ञानेंद्रिय द्वारा । पंच विषयांचे येत सामोरा ।
भोक्ता जीव हा होय त्वरा । या नांव जागति ॥ ७९ ॥
अंतःकरणवृत्ती ज्ञानेंद्रियांच्या द्वारा पाच विषयांना सामोरी येते आणि जीव हा त्यांचा भोक्ता होतो. यालाच जागृती असे म्हणतात. (५७९)

हे पांच तत्त्वांचे व्यापार पांच । कमीद्रयांचीही क्रिया तैशीच ।
हें मागें सांगितलें आहाच । स्पष्ट करोनी ॥ ८० ॥
या पाच तत्त्वांचे पाच व्यापार होतात. कर्मेंद्रियाच्याही क्रिया तशाच होतात, हे मागे स्पष्ट करून सांगितले आहेच. (५८०)

इंद्रियविषय प्रत्यक्ष नसता । त्यांचा ध्यास घेऊन आतौता ।
बुद्धीच कल्पी जीव तया भोक्ता । ते अवस्था स्वप्न ॥ ८१ ॥
प्रत्यक्षात इंद्रियांचे विषय उपस्थित नसताना त्यांचा ध्यास घेऊन बुद्धीच कल्पना करते आणि जीव त्यांचा भोक्ता होतो. त्या अवस्थेला स्वप्न अवस्था म्हणतात. (५८१)

ऐसे हे स्वप्न जागती दोन । व्यापार होती सर्व जीवांलागून ।
मिथ्या प्रतिभास असोन । भ्रांतीनें सत्य मोनिल ॥ ८२ ॥
अशा प्रकारचे हे स्वप्न आणि जागृती या दोन अवस्थांचे व्यापार सर्व जीवांचे होतात. ते मिथ्यारूप, भासस्वरूप असूनही भ्रमामुळे त्यांना सत्य मानण्यात येते. (५८२)

अस्ति भाति प्रियरूप आपुले । जें कां मुख्याल्पाचे लक्षण बोलिले ।
तेंचि या आभासासी मानिलें । बिबाचे प्रतिबिंब जेवीं ॥ ८३ ॥
मुख्यात्म्याचे अस्ति भाति प्रिय हे लक्षण सांगितले आहे. तेच लक्षण या भासरूप जीवाला लागू केले जाते. बिंबाची सर्व लक्षणे जशी प्रतिबिंबाला जशीच्या तशी लागू होतात, तसेच येथेही होते. (५८३)

या आभासाचे लक्षण । असफ्लड ख संपूर्ण ।
हें टाकून आरोपी अज्ञान । अस्ति भीति प्रिय होच ॥ ८४ ॥
आणि या आभासरूप जीवाची वास्तविक जी असत, जड आणि दुःखरूप ही तीन लक्षणे आहेत ती टाकून देऊन त्याच्यावर अज्ञानी लोक अस्ति, भाति आणि प्रिय या आत्म्याच्या लक्षणांचे आरोप करतात. (५८४)

प्रतिबिंबित देहद्वयांत । तो जीवही नेणोनि द्यांत ।
उगाची सर्वही संघात । मी म्हणोन बैसला ॥ ८५ ॥
प्रतिबिंबस्वरूप दोन देहात जीवालाही भ्रम होऊन नेणतेपणाने तो उगीचच सर्व संघाताला 'मी' म्हणून बसतो. (५८५)

आणि तया सर्व संघाता । अस्ति भाति आरोपी प्रियता ।
हेचि जाण विडंबन तत्त्वतां । असे तें त्यागिलें ॥ ८६ ॥
आणि त्या पिंडांतर्गत सर्व संघातावर अस्ति, भाति, प्रियत्व या आत्म्याच्या लक्षणांचा आरोप करतो. हेच खरे विडंबन होय. त्याचा त्याग केला पाहिजे. (५८६)

हस्त आहे पाठ आहे । उदर कंठ मस्तक आहे ।
नख केश सर्व आहे । हेंचि विडंबन ॥ ८७ ॥
मी हात आहे, पाय आहे, पोट आहे, गळा आहे, मस्तक आहे, नखे आहे, केस आहे, सर्व मीच आहे असे त्याला वाटते. हेच विडंबन आहे. (५८७)

श्रोत्र आहे त्वचा आहे । लक्ष जिव्हा घाण आहे ।
वाचा पाणि पाव आहे । हेंचि विडंबन ॥ ८८ ॥
मीच कान आहे, त्वचा आहे, डोळा आहे, जीभ आहे, नाक आहे, वाचा आहे, हात आहे, पाय मीच आहे असे त्याला वाटते. हेच विडंबन आहे. (५८८)

उपस्थ गुदही मीच आहें । प्राण जपान व्यान आहें ।
उदान आहें समान आहें । हेंचि विडंबन ॥ ८९ ॥
उपस्थ (शिस्न), गुद (मलविसर्जनाचे इंद्रिय) मीच आहे. प्राण, अयान, व्यान, उदान आणि समान हे पाच वायू मीच आहे, असे त्याला वाटते. हेच विडंबन आहे. (५८९)

उपप्राणादि वायु आहें । अहंकार चित्त मीच आहें ।
बुद्धि मन अंतःकरण आहें । हेंचि विडंबन ॥ ९० ॥
उपप्राणादि वायू मीच आहे, अहंकार, चित्त, मन, बुद्धी आणि अंतःकरण हे अंतःकरणपंचक मीच आहे असे त्याला वाटते हेच विडंबन आहे. (५९०)

गुण असती वृत्ति आहे । जीव असे सर्वही आहे ।
एव अस्तित्वरूप सर्वा पाहे । हेंचि विडंबन ॥ ९१ ॥
सत्त्व, रज, तम हे गुण मीच आहे. सर्व अंतःकरणवृत्ती मीच आहे, जीव मीच आहे, सर्व काही मीच आहे अशा तऱ्हेने या सर्व तत्त्वांमध्ये तो अस्तित्वाचा आरोप करतो, हेच विडंबन आहे. (५९१)

तैसेचि हस्तासी अंधारी कळे । पाव नखासी लागता कळे ।
उदर कंठा बोटासी कळे । हेंचि विडंबन ॥ ९२ ॥
त्याचप्रमाणे हाताला अंधारातसुद्धा कळते, पाय, नख यांना कुठे लागले की लगेच कळते; पोट, कंठ, बोट यांनाही कळते, पण हा भातित्वाचा आरोप या तत्त्वांवर करणे हेच विडंबन आहे. (५९२)

नख शिख जबघियास कळे । दृष्टीली पार्श्वभागासी कळे ।
मागें पुढे अधोर्ध्य कळे । हेंचि विडंबन ॥ ९३ ॥
नख, शिखा (शेंडी) यांना कळते; दृष्टीला, दोन्ही बाजूंना, मागे, पुढे, खाली, वर हे सर्व कळते हेच विडंबन आहे. (५९३)

श्रोत्रासी शब्द कळतसे । त्वचा हे स्पर्शा जाणतसे ।
डोळा रूपा ओळखीतसे । हेंचि विडंबन ॥ ९४ ॥
कानाला शब्द कळतो, त्वचेला स्पर्श कळतो, डोळा रूप ओळखतो, असे त्याला वाटते हेच विडंबन होय. (५९४)

जिव्हा हे रसातें जाणें । सुगंध जाणून घेतसे घाणे ।
वाचा बोलोनियां जाणें । हेंचि विडंबन ॥ ९५ ॥
जिव्हेला रस कळतो, नाक सुगंध ओळखून तो घेते, वाणीला बोलण्याचे कळते, असे त्याला वाटते, हेच विडंबन होय. (५९५)

पाणी जाणें घेणेदेणिया । उपस्थ जाणें मैथुनक्रिया ।
गुद जाणें विसर्गा या । हेंचि विडंबन ॥ ९६ ॥
हाताला द्यायचे घ्यायचे कळते, उपस्थाला मैधुनक्रिया कळते, गुद मलविसर्जनाचे काम जाणते, असे जाणणे हेच विडंबन होय. (५९६)

प्राण जाणें व्यान जाणें । उदान समान जपान जाणें ।
उपप्राणांसही होय जाणणें । हेंचि विडंबन ॥ ९७ ॥
प्राण जाणतो, व्यान जागतो; उदान, समान, अयान हे जाणतात; उपप्राणांनाही जाणता येते, असे त्याला वाटते हेच विडंबन होय. (५९७)

अहंकार सर्वा जाणतसे । चित्त चिंतना ओळखीतसे ।
मन बुद्धि जाणें अपैसें । हेंचि विडंबन ॥ ९८ ॥
अहंकार सर्वांना जाणतो, ''काम चित्त जाणते; मन, बुद्धी ही तर स्वाभाविकपणे जाणतातच ही त्याची धारणा हेच विडंबन आहे. (५९८)

वृत्ति जाणें गुण जाणती । जीव तो जाणें सहजगती ।
एव हे अवघेचि जाणती । हेंचि विडंबन ॥ ९९ ॥
वृत्ती जाणते, त्रिगुण जाणतात, जीव तर जाणतो हे स्वाभाविकच आहे, अशा प्रकारे हे सर्वच जाणतात असे वाटणे हेच विडंबन आहे. (५९९)

ऐसें जडरूप सर्व असतां । ज्ञानरूपचि मानिलें तत्त्वतां ।
कोणीच नाहीं जाणिल्या परता । हेंचि विडंबन ॥ ६०० ॥
तेव्हा ही सर्व तत्त्वे जडरूप असता त्यांना ज्ञानरूप मानले. त्या तत्त्वांपैकी कोणीही जाणण्यापासून वंचित नाही, असे वाटणे हेच विडंबन आहे. (६००)

येणेंचि रीती मी किती चांगुला । नखशिख आवडता जाला ।
हस्त पादादि शोभला । हेंचि विडंबन ॥ १ ॥
याच पद्धतीने प्रियत्वाच्या संदर्भातही विडंबन कसे होते, हे आता पाहू मी किती चांगला आहे. मी नखशिखान्त सर्वांचा आवडता झालो आहे. हात, पाय यांनी मी कसा शोभतो, असे मानणे हेच विडंबन आहे. (६०१)

श्रोत्रांचे ऐकणे चौगुले । आवडे त्वचेने स्थर्शले ।
आकर्ण नेत्रे शुद्ध देखिले । हेंचि विडंबन ॥ २ ॥
कानांचे ऐकणे चांगले आहे. त्वचेने केलेला स्पर्श चांगला आहे. कानांपर्यंत पसरलेले डोळे चांगलेच पाहतात, असे जे वाटते तेच विडंबन आहे. (६०२)

रसनेची गोडी अति सुरस । अति चांगुला घेणे सुवास ॥ ९ ॥
माझें बोलणें किती नवरसा । हेंचि विडंबन ॥ ३ ॥
जिभेला चांगली चव आहे, माझे नाक सुवास चांगला घेते, माझे बोलणे कसे नवरसपूर्ण आहे ! पण असे वाटणे हेच विडंबन आहे. (६०३)

ग्रहण दाना हस्त चौगुले । गमन गती सरळ याद भले ।
उपस्थ गुरू किती शोभले । हेंचि विडंबन ॥ ४ ॥
हात ग्रहण आणि दान या क्रिया चांगल्या प्रकारे करतात, माझ्या चांगल्या पायांची चालण्याची गती सरळ आहे, उपस्थ, गुदद्वार हेही चांगले आहेत, असे तो मानतो, हेच विडंबन आहे. (६०४)

पंचप्राण चौगुले असती । अहंकार तो उत्तम अति ।
सावधानता चांगुली चित्तीं । हेंचि विडंबन ॥ ५ ॥
माझे पंचप्राण चांगले आहेत, माझा अहंकारही उत्तम आहे, माझ्या मनाची सावधानता चांगली आहे, असे वाटणे हेच विडंबन आहे. (६०५)

बुद्धि निश्चया अति उत्तम । मनही चौगुले असे परम ।
अंतःकरण गुणही होती सम । हेंचि विडंबन ॥ ६ ॥
माझ्या बुद्धीचा निश्चय अत्युत्तम आहे. माझे मनही चांगले आहे. अंतःकरण अतिशय चांगले आहे. गुणही समतोल आहेत. असे तो मानतो हेच विडंबन आहे. (६०६)

माझें करणें वर्तणें आचरणे । पाप कीं पुण्य न लणे ।
चौगुले ह्मणून भावी मने । हेंचि विडंबन ॥ ७ ॥
माझे करणे, वागणूक, आचरण ही सर्व चांगली आहेत, ती पापयुक्त आहेत की पुण्ययुक्त यांचा विचार मी करत नाही. पण ती चांगलीच आहेत, असे वाटणे हेच विडंबन आहे. (६०७)

ऐसे जागतीचे व्यापार । वाईट कीं असोत सुंदर ।
परी चांगुलेचि सविस्तर । हेंचि विडंबन ॥ ८ ॥
असे माझे जागृतीचे व्यापार वाईट असोत की सुंदर, पण ते चांगलेच आहेत, असे तो मानतो. हेच विडंबन होय. (६०८)

एव अस्ति भाति प्रिय या रीती । जागतींत आरोपी भासाप्रती ।
तैसेंचि स्वप्नी भावी ध्यासावरुती । हेंचि विडंबन ॥ ९ ॥
अशा प्रकारे जागृतीतील भासांवर तो अस्ति, भाति, आणि प्रियत्वाचे आरोप करतो. त्याचप्रमाणे स्वप्नातील भासांवरही करतो. हेच विडंबन होय. (६०९)

भासदेह जो मने कल्पिला । तो आहे जाणें चांगुला ।
येस भासा हर्षे कीं भ्याला । हेंचि विडंबन ॥ १० ॥
मनाने ज्याची कल्पना केली, तो भासदेह आहे. चांगला आहे, असे तो मानतो. बाकीच्या वास्तविक भासांनी तो आनंदित होतो किंवा भिऊन जातो, हेच खरे विडंबन होय. (६१०)

या रीती स्वप्न आणि जागती । माजी अस्ति भाति जे प्रीति ।
आपुली लक्षणें आभासावरूतीं । स्थापी बळे ॥ ११ ॥
याच रीतीने स्वप्न आणि जागृतीतील भासांवर आपली स्वतःची अस्ति, भाति आणि प्रिय ही लक्षणे बळेच आरोपित करतो. (६११)

जैसा वृक्षी बैसलियाचा । पाहणे प्रीति आहेपणा साचा ।
तो पडिलियावरी आरोप त्याचा । स्थापी बळे ॥ १२ ॥
ज्याप्रमाणे वृक्षावर बसलेल्या पुरुषाची अस्ति, भाति आणि प्रिय ही लक्षणे खरी आहेत. पण ती तो पाण्यात पडलेल्या भासात्मक प्रतिबिंबावर बळजबरीने आरोपित करतो. (६१२)

हस्तपादादि मस्तक आहे । पडिला कैसा टकमका पाहे ।
आवडी त्याची धरोनि राहे । तेव्हां काढा लणे ॥ १३ ॥
त्या प्रतिबिंबाला 'हात आहेत, पाय आहेत, मस्तक आहे, पाण्यात पडला असून तो कसा टकमका पाहत आहे ! ' असे म्हणून तो त्याबद्दल मनात प्रेम बाळगतो आणि त्या प्रतिबिंबाला 'पाण्यातून बाहेर काढा' असे म्हणतो. (६१३)

तैसाचि हाही वृत्तीपासोन । देहान्स मीच ऐसा माजून ।
सोडवा ह्मणे बंधांतून । हें विडंबन नव्हे ॥ १४ ॥
त्याप्रमाणे अज्ञानी जीवही स्वतःला 'वृत्तीपासून ते देहापर्यंत मीच आहे' असे मागून 'मला बंधनातून सोडवा' असे म्हणतो. हे विडंबन नव्हे काय ? (६१४)

अगा हे रविदत्ता तुजसी । निरोपिलें कळले कीं मानसी ।
येक तें सागितले अविनाशी । येक हें मिथ्या ॥ १५ ॥
अरे रविदत्ता, हे सर्व तुला उद्देशून सांगितले आहे. तुझ्या मनाला ते पटले आहे का ? या दृष्टांताच्या साहाय्याने एक अविनाशी तत्त्व जे परब्रह्म परमात्मा त्याचे स्वरूप तुला सांगितले आहे. आणि दुसरे त्यावर आरोपित अशा मिथ्या आभास असलेल्या जीवाचे स्वरूप तुला सांगितले आहे. (६१५)

अस्ति भाति प्रियरूपता । जे मागील कोकी बगेलेली तत्त्वतां ।
तिहीकाळी ज्या लक्षणा समता । तो सत्य आत्या ब्रह्म ॥ १६ ॥
मागील श्लोकात जी अस्ति भाति प्रियता ही लक्षणे सांगितली, ती लक्षणे तिन्ही काळात सारखीच असतात. त्या लक्षणांनी युक्त असा सत्य आत्मा हाच ब्रह्म आहे. (६१६)

आतां या म्हठोकी आभास जीव । ज्याचा असल्लड दु ःखाल्पक स्वभाव ।
परी आरोपिलें अस्ति भाति प्रियत्व । हा मिथ्या प्रतिबिंब ॥ १७ ॥
आता या श्लोकात आभासरूप जीवाचे स्वरूप सांगितले आहे. त्याचा असत, जड आणि दुःखात्मक असा स्वभाव आहे. पण त्याच्यावर अस्ति, भाति आणि प्रिय या लक्षणांचा आरोप केला जातो. तो म्हणजे खरोखर असत्य असे प्रतिबिंब आहे. (६१७)

ऐसे सत्य मिथ्या हे दोन । पदार्थ असती वेदांत प्रमाण ।
तिसरा नाहीं जरी नाना संपूर्ण । तरी अंतर्भूत दोहींत ॥ १८ ॥
असे हे एक सत्य आणि दुसरा मिथ्या असे दोनच वेदान्तात प्रमाण म्हणून मानले आहेत. बाकी सर्व विविधतेच्या विस्ताराने व्यापले असले तरी ते या दोहोत समाविष्ट होते. या दोहोंखेरीज तिसरा पदार्थच नाही. (६१८)

आत्मा ब्रह्म सच्चिदानंद । द्रष्टा साक्षी अद्वय अभेद ।
ऐसे नामाचे अनेकधा भेद । परी आब्रह्म एक ॥ १९ ॥
आत्मा हा सच्चिदानंद ब्रह्म आहे. तो द्रष्टा, साक्षी, अद्वय, अभेद अशा भिन्न भिन्न नावांनी ओळखला जात असला तरी सर्वत्र व्यापलेले एक ब्रह्मच आहे. (६१९)

माया गुण वृत्ति अंतःकरण । मनादि प्राण बहिःकरण ।
देहादि जीव आदिकरून । मिथ्या पदार्थ एक ॥ २० ॥
माया, त्रिगुण, वृत्ती, अंतःकरण, मन इ. प्राण, बाह्येद्रिये, देह इ. जीव इ. सर्व एकच मिथ्या पदार्थ आहे. (६२०)

तस्मात् दोन पदार्थचि असती । सत्य मिथ्या मुख्य आभास भ्रांति ।
यास्तव मुमुसूने विचारे निश्चिती । सत्य मिथ्या निवडावे ॥ २१ ॥
त्यामुळे सत्य आणि मिथ्या, मुख्य बिंब आणि आभासरूप, प्रातिरूप प्रतिबिंब असे दोनच पदार्थ आहेत. मुमुक्षूने विचारपूर्वक सत्य आणि मिथ्या निवडावेत म्हणजे वेगळे करावेत. (६२१)

निवडणे ह्मणजे विवेचन । सत्य तें सत्यत्वे घ्यावें आपण ।
मिथ्या तें मिथ्या त्यागून । सुखी व्हावें ॥ २२ ॥
हे निवडणे म्हणजे विवेचन करणे, विचार करणे होय. जे सत्य आहे ते सत्यत्वाने आपण ध्यावे आणि मिथ्याचा मिध्यत्वाने त्याग करावा आणि सुखी व्हावे. (६२२)

देह नासे इंद्रियें नासती । प्राण वाहती ते नास्त्र जाती ।
मनादि तीं क्षणाक्षणां पावती । स्वतांचि नाश ॥ २३ ॥
देह नष्ट होतो, इंद्रिये नष्ट होतात, शरीरात वाहणाऱ्या प्राणांचा नाश होतो, मन इ. तत्त्वे प्रत्येक क्षणाला स्वतःच नष्ट होत असतात. (६२३)

वृत्तीसहित जीव हारपे । जेर्वी सतोय प्रतिबिंब लोपे ।
तस्मात् हा केवीं होईल सदूपें । उद्धव लय जया ॥ २४ ॥
ज्याप्रमाणे अतिशय उष्णतेने साचलेले पाणी आटून जाते, त्याबरोबरच त्यातील प्रतिबिंबही लोप पावते, त्याप्रमाणे वृत्तीसहित जीव देखील नाहीसा होतो. त्यामुळे ज्याला उद्धव आणि लय आहेत असा तो जीव सदूष कसा असेल ? (६२४)

ऐसा विचारून या मिंध्याचा । आहेपणा जो असे सत्याचा ।
काढून निर्धार करावा साचा । अक्रमाला आभास त्यानें ॥ २५ ॥
असा विचार करून या जीवावर आरोपित आहेपणा हे सक्तरूपाचे लक्षण काढून टाकून त्या आभासाचा त्याग करून 'मी जीव नसून आत्मा आहे ' असा सत्य निर्धार करावा. (६२५)

जेर्वी वृक्षस्थावांचून । पडिलिया कैचे आहेपण ।
तैसा आल्या जो सच्चिदघन । त्याचें अस्तित्व या ॥ २६ ॥
ज्याप्रमाणे वृक्षस्थ पुरुष नसेल तर पाण्यात पडलेल्या आभासित पुरुषाला आहेपणा कसा असेल ? त्याप्रमाणे जो निखळ सच्चिद्‌रूप आत्मा आहे त्याच्या अस्तित्वावरच या आभासरूप जीवाचे अस्तित्व अवलंबून आहे (हे ओळखावे). (६२६)

आतां कळणे जें या सर्वांसी । देहादिकां वाटे आभासासी ।
परी जयाचिये प्रकाशी । प्रकाशमान हें ॥ २७ ॥
आता या सर्व देहादिक आभासाला कळते असे वाटते, ते चिद्र्रए ब्रह्माच्याच प्रकाशाने प्रकाशित झालेले असते. (६२७)

शब्दस्थर्शादि देहचि जाणत । तरी निद्रिस्थाचा देह पडे प्रेत ।
मागें पुढे असतां नेणत । स्त्री कीं सर्प ॥ २८ ॥
शब्द स्पर्शादी विषयांना देहच जाणतो असे वाटत असेल तर गाढ झोपलेल्या माणसाचा देह प्रेतवतू पडलेला असतो, त्यावेळी त्याच्या मागे अथवा पुढ्यात स्त्री आहे की सर्प हे त्याला कसे कळत नाही ? (६२८)

श्रोत्र असतां नायकती । स्पर्श न कळे त्वचेप्रति ।
नेत्र उघडे तरी न देखती । तम कीं प्रकाश ॥ २९ ॥
कान असूनही कधी ते ऐकू शकत नाहीत. त्वचेला स्पर्श कळत नाही. डोळे उघडे असूनही अंधार आहे की प्रकाश आहे हे पाहू शकत नाहीत. (६२९)

जिव्हेवरी साकर असतां । गोडी न कळे कीं तत्त्वतां ।
कस्तूरी नासिकी बांधितां । सुगंध नेघे ॥ ३० ॥
जिभेवर साखर असूनही तिची गोडी कळत नाही. कस्तुरी नाकाला बांधली तरी तिचा सुगंध त्याला कळत नाही. (६३०)

वाचादि कर्मी सर्व । व्यापार न करिती स्वयमेव ।
वाणी बरळे जरी जाणीव । नसे त्या शब्दाची ॥ ३१ ॥
हे ज्ञानेंद्रियांबद्दल झाले. त्याचप्रमाणे कर्मेन्हियांच्या बाबतीत होते. वाचा इ. सर्व कर्मेन्द्रिये स्वत: होऊन त्यांची कामे करत नाहीत. जीभ बरळते त्यावेळी तिला त्या शब्दाची जाणीव नसते. (६३१)

प्राण जरी देही वावरती । परी वस्त्रे हरितां ते नेणती ।
तस्मात् जडत्व प्राणाप्रती । स्वतःसिद्ध असे ॥ ३२ ॥
जरी देहात प्राण वावरत असले तरी देहावरचे कपडे कोणी काढून घेतले तरी त्यांना ते कळत नाही. त्यामुळे प्राण जड आहेत ही गोष्ट स्वत: सिद्ध आहे. (६३२)

मन बुद्धि चित्त अहंकार । जरी ही जाणती तत्त्वें चत्वार ।
तरी करून पाहतां विचार । परप्रकाशक ॥ ३३ ॥
मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही चार तत्त्वे जाणणारी असली तरी विचार करून पाहिले तर त्यांचे ज्ञानही परप्रकाशकच असते. (६३३)

जैसे उपनेत्रे स्पष्ट दिसे । परी जाधळिया काय असे ।
तैसें आत्ययाचीये प्रकाश । विण वृत्ति व्यर्थ ॥ ३४ ॥
ज्याप्रमाणे चक्क्याने दिसते खरे, पण आंधळ्याला त्याचा काय उपयोग ? त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रकाशावाचून वरील वृत्ती व्यर्थ होत. (६३४)

येकीकडे वृत्ति लागता । दुसरिया पदार्थां समस्तां ।
न जाणती सन्निध असतां । ह्मणोनि परप्रकाश ॥ ३५ ॥
वृत्ती एका विषयात गुंतली असता बाकीच्या सर्व पदार्थांना, ते कितीही जवळ असले तरी ती जाणत नाही. म्हणून तिला परप्रकाशी म्हणतात. (६३५)

अथवा वृत्ति विषयीं धांवे । तेधवाचि साक्षित्वा पहावे ।
साक्षी परतता स्वभावें । मग वृत्ति विषय नेघे ॥ ३६ ॥
आता वृत्ती विषयांकडे धावते, त्याचवेळी साक्षीकडे लक्ष द्यावे. साक्षी स्वाभाविकपणे परत फिरल्यावर वृत्ती विषय घेणे थांबवते. (६३६)

आढळून जडत्वे पडे । परी अमुक हें न निवडे ।
ऐसें विचारितां हे जडे । प्रत्यया येती ॥ ३७ ॥
ती जड असत्यामुळे विषयावर आदळून पडते आणि हा अमुक विषय आहे, हेही तिला निवडता येत नाही. या गोष्टीचा विचार केला की, वृत्ती जड आहे असा अनुभव येतो. (६३७)

या येका वृत्तीचे प्रकार । कार्यपरत्वे चत्वार ।
मन बुद्धि चित्त अहंकार । भिन्न भिन्न दिसती ॥ ३८ ॥
या वृत्तींचे कार्यानुसार चार प्रकार होतात. ते म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. असे ते परस्परभिन्न दिसतात. (६३८)

संकल्प विकल्प नव्हे आहे । संशयाल्पके निश्चय न लाहे ।
तेंचि मन ओळखून पाहे । परप्रकाश ॥ ३९ ॥
संकल्प, विकल्प; अमुक असे आहे किंवा नाही, अशा संशयात्मक स्वरूपामुळे ज्याला निर्णय करता येत नाही तेच मन ओळखून घे. ते परप्रकाश आहे. (६३९)

निश्चय करी जो येक । होय कीं नव्हे हें अमुक ।
हेंचि बुद्धीचें रूपक । परप्रकाश ॥ ४० ॥
जी, अमुक गोष्ट अमुकच आहे, अमुक नाही असा एक निश्चय करते, हेच बुद्धीचे रूप आहे. तीदेखील परप्रकाश आहे. (६४०)

दृष्ट श्रुत पदार्थांचा । छंद घेतसे चिंतनाचा ।
तेंचि चित्त नामे साचा । परप्रकाश ॥ ४१ ॥
पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या पदार्थाचे चिंतन करण्याचा जे एकच ध्यास घेते, त्याचे नाव चित्त आहे. तेही परप्रकाश आहे. (६४१)

अमुक करीन कीं न करी । हाचि अहंकार निर्धारी ।
हेंही जाणते तत्त्व परी । परप्र० ॥ ४२ ॥
मी अमुक करीन, अमुक करणार नाही अशा प्रकारे अभिमान बाळगणे हाच निश्चितपणे अहंकार आहे. हे जाणते तत्त्व खरे, पण ते परप्रकाश आहे. (६४२)

येक वृत्ति परप्रकाशक । कळता जरी निश्चयात्मक ।
तरी चारीही मासला येक । कळे निधरि ॥ ४३ ॥
यापैकी कोणतीही एक वृत्ती परप्रकाश आहे, असे निश्चितपणे कळले की सर्व चारी वृत्ती परप्रकाशच आहेत. सर्वांचा एकच मासला आहे, हे निश्चयपूर्वक कळते (६४३)

गुण तरी अंतःकरणाचे । कामादि धर्म तयाचे ।
यासीं जडत्व बोलणे साचे । नलगे वेग ॥ ४४ ॥
अंतःकरणाचे तीन गुण आहेत. त्याचे कामादी हे धर्म आहेत. मुळात अंतःकरणच जड असत्यामुळे त्याचे गुण आणि धर्मही जड आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. (६४४)

आतां वृत्तीमाजी जो पडे । प्रतिबिंबत्वे जीव आतुडे ।
परी यासही ज्ञान न जोडे । आल्पप्रभेवीण ॥ ४५ ॥
आता वृत्तीमध्ये प्रतिबिंबरूपाने पडून जो तिथेच अडकतो त्यालाही आत्म्याच्या प्रकाशाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. (६४५)

जेवीं आदित्य गगनीं नसलिया । प्रतिबिंबचि न पडे आरसिया ।
मा झुळझुळ पडे कोठोनियां । भिंती वरूती ॥ ४६ ॥
ज्याप्रमाणे सूर्य आकाशात नसल्यावर आरशात त्याचे प्रतिबिंबच पडणार नाही, मग भिंतीवर त्याचा कवडसा तरी कसा पडणार ? (६४६)

तैसें मन जाऊन पदार्थी आदळे । तया रवी किंचित् उजाळे ।
परी आदि अती प्रकाशामुळे । मध्ये उठोनि निमे ॥ ४७ ॥
त्याप्रमाणे मन जाऊन पदार्थावर आदळते, त्याला प्रकाशित करून त्या पदार्थाला किंचित उजाळा देते, परंतु त्या प्रकाशाचा आरंभ आणि त्या प्रकाशाच्या शेवट या दोहोंच्या मध्येच तो उठून दिसतो आणि नाहीसा होतो. (६४७)

हें बोलणें पुढें असे । सामान्य विशेष निवडे ऐसें ।
प्रस्तुत येथें समजावे मानसे । कीं परप्रकाश जीव ॥ ४८ ॥
हे पुढे बोलायचेच आहे. सामान्य प्रकाश आणि विशेष प्रकाश याविषयीचे विवेचन पुढे येणारच आहे. सध्यापुरते एवढे समजून घ्यावे की जीव हा परप्रकाशक आहे. (६४८)

तस्मात् देहापासून जीव । पर्यंत हें जडचि सर्व ।
जाणती वाटती ते अपूर्व । व्यर्थ विडंबन ॥ ४९ ॥
तेव्हा देहापासून जीवापर्यंत हे सर्व पदार्थ जडच आहेत. ते जाणते वाटतात, पण हेच एक अपूर्व विडंबन आहे. ते अर्थात खोटे आहे. (६४९)

जेवीं वृक्षस्थाचा हात पाय हाले । डोळे फिरती मान डोले ।
तेचि पडिलियावरी उमटले । कीं प्रत्यक्ष हालती ॥ ५० ॥
ज्याप्रमाणे वृक्षावर बसलेल्या पुरुषाचे हातपाय हलतात, डोळे फिरतात, मान डोलते. त्याप्रमाणे या सर्व हालचाली पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी उमटतात. त्या काय प्रत्यक्ष क्रिया असतात काय ? (६५०)

तेवीं सामान्य साक्षी बोधाला । स्वप्रकाशक चिदात्मा ।
त्याचा आभास हा जीवात्मा । तद्धासें तद्वत ॥ ५१ ॥
त्याप्रमाणे चिद्र्रप आत्मा हा सर्वांचा सामान्य साक्षी आहे. तो स्वप्रकाशक असून चिद्‌रूप आहे. त्याचा आभास म्हणजे हा जीवात्मा होय. तो पुढे स्वतःच्या भासरूप प्रकाशाने इतरांना प्रकाशित करतो. (६५१)

एव या रीती हा जीव खरा । चिदूप नव्हे हा भास सारा ।
तसेंचि प्रियत्वही विचारा । या नसे ॥ ५२ ॥
अशा प्रकारे हा जीव खरा चिद्‌रूप नाही. तो खरा आभासरूप आहे. त्याचप्रमाणे त्याच्या प्रियत्वाविषयीही विचार केला तर ते प्रियत्वही याला नाही असे कळते. (६५२)

पूर्वी प्रियत्व सर्वांचे । निषेधिले स्त्रीपुत्रादिकांचे ।
कीं आल्यार्थ प्रिय असती साचे । तेव्हां प्रियतर स्वये ॥ ५३ ॥
यापूर्वी स्त्री पुत्र इत्यादिकांच्या प्रियत्वाचा निषेध केला आहे. कारण त्याचे प्रियत्व केवळ आत्म्यासाठी असणारे प्रियत्व आहे. त्यामुळे आत्मा हाच खरा अधिक प्रिय आहे. (६५३)

येथें कोणी मंदमती । मानील कीं आपुली देहाकृति ।
सर्व आभासाही शास्त्रें ह्मणती । आत्या ह्मणोनी ॥ ५४ ॥
येथे कोणी मंदबुद्धीचा मनुष्य असे मानील की, आपला देह आणि आभासरूप जीव यांनाही शास्त्रात आत्मा असे म्हटले आहे. (६५४)

तस्मात् अनाल्पिया आत्मा ह्मणणें । ही चार्वाकाची लक्षणें ।
देहाल्प वादादि निरसणें । युक्ति स्वानुभवें ॥ ५५ ॥
पण अनात्म पदार्थांना आत्मा म्हणून संबोधणे ही देहात्मवादी चार्वाकाची लक्षणे आहेत. त्यामुळे देहाला आत्मा मानणाऱ्या या पक्षाचे युक्ती आणि स्वानुभवाने निरसन करणे प्राप्त आहे. (६५५)

देह जरी हा सर्व आवडे । तरी यांतही तारतम्य निवडे ।
नखे केश वाढता कोडे । छेदिती स्वये ॥ ५६ ॥
आपल्याला आपला हा संपूर्ण देह जरी आवडत असला तरी त्याबाबतीतही आपण तारतम्य पाळत असतो. नखे, केस स्वाभाविकपणे वाढतात तेव्हा आपण ते कापून टाकतो. (६५६)

अंगुलीस्तव सडे जरी हात । तरी अंगुली छेदिती त्वरित ।
तस्मात् अंगुलीवरील प्रीत । व्यर्थ ह्मणावी ॥ ५७ ॥
एका बोटामुळे सगळा हात सडून जाण्याची पाळी आली तर ते बोटही तोडून टाकतात. त्यामुळे त्या बोटावरील प्रेम व्यर्थच म्हणावे लागते. (६५७)

हस्त तोडितां नेत्र येती । ऐसें कोणी वैद्य सांगती ।
तरी तत्क्षणीं हस्त तोडिती । तेव्हां डोळा आवडे ॥ ५८ ॥
हात तोडला तर डोळे बरे येऊन दृष्टी प्राप्त होईल, असे कोणा वैद्याने सांगितले तर त्या क्षणी माणूस हात तोडायला तयार होईल. तेव्हा डोळा आवडतो, हे स्पष्ट झाले. (६५८)

कांहीं अपराध चक्रवर्ती । शिरच्छेदाची आज्ञा करीती ।
तेव्हां कोणी वाचवी तयाप्रति । नेत्र कर्ण काढोनी ॥ ५९ ॥
काही अपराध झाल्यामुळे चक्रवर्ती राजाने शिरच्छेदाची आला केली तर कोणीतरी त्याचे डोळे आणि कान काढून वाचवितो. (६५९)

नेत्र कर्ण जरी गेले । परी प्राण वाचता भले जाले ।
सुखी होय ह्मणे निरसलें । अरिष्ट मोठे ॥ ६० ॥
डोळे आणि कान जरी गेले तरी प्राण वाचले हे बरे झाले, मोठे अरिष्ट टळले असे म्हणून तो माणूस सुखी होतो. (६६०)

येखादे अपकीर्तीस्तव । विष असून देती जीव ।
कीं मरणाहून अधिक स्वभाव । अपकीर्तीचा ॥ ६१ ॥
कोणी अपकीर्तीच्या भीतीने विष खाऊन जीव देतात. कारण त्यांना मरणापेक्षाही अपकीर्तीचे भय वाटते. (६६१)

अपकीर्ति कल्पना मनाची । ह्मणजे अंतःकरणचतुष्टयाची ।
तस्मात् अधिक प्रियता साची । मनाची प्राणाहून ॥ ६२ ॥
अपकीर्तीचे भय म्हणजे मनाची कल्पना होय. म्हणजे अंत: करणचतुष्टयाची ती कल्पना होय म्हणजे प्राणापेक्षाही त्याला मनाचे प्रेम अधिक वाटते. (६६२)

झोप किंवा समाधि घेतां । तेथें मन वाउर्गे चिंतितो ।
विक्षेप वाटे आपणा तत्त्वतां । ह्मणे मज हें सुख नेदी ॥ ६३ ॥
झोप किंवा समाधी घेताना मनात नको त्या कल्पना येतात. त्यामुळे झोपेत अथवा समाधीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यावेळी तो म्हणतो की, ' 'हे मन मला सुख मिळू देत नाही. '' (६६३)

तस्मात् अंतःकरणाची प्रीति । आपुल्या प्रियत्वापुढें विटती ।
येथें खरी आवडी निश्चिती । कोणाची तें पहा ॥ ६४ ॥
त्यामुळे अंत: करणाबद्दलचे प्रेम आपल्यावरील प्रेमापुढे फिके वाटते. यावरून येथे खरी आवड कोणाबद्दल आहे, हे पहा. (६६४)

वृत्तीचीच अनावडी होतां । मा प्रतिबिंब पडे जें ती आतौता ।
तयाची प्रीति असे केउता । जे नासे वृत्तीसर्वे ॥ ६५ ॥
आता वृत्तीबद्दलच नावड निर्माण झाली. मग तिच्यामध्ये पडणाऱ्या प्रतिबिंबाची म्हणजे जीवाची आवड किती असेल ? ती आवड वृत्तीबरोबरच नाश पावते. (६६५)

सर्व स्फूर्तीपासून तृणास्त । जितुकें उत्पन्न ईशनिर्मित ।
यावरी जीवाचे असे कल्पित । त्रिप्रकारेंचि ॥ ६६ ॥
सर्व स्फूर्तीपासून अगदी गवतापर्यंत जेवढे उत्पन्न झालेले असते, ते सर्व ईश्वराने निर्माण केलेले असते. त्याबद्दल जीव तीन प्रकारच्या कल्पना करतो. (६६६)

उपेक्ष्य द्वेष्य आणि प्रिय । जीव कल्पित प्रकार चय ।
येक मणीच त्रिधा होय । हेतु तिघांचे ॥ ६७ ॥
त्या म्हणजे, ते ईशसूष्ट उपेक्षणीय वाटते, किंवा द्वेष करण्यासारखे वाटते अथवा प्रिय वाटते. असे हे जीवाने कल्पिलेले तीन प्रकार होत. एकच मणी. तो तिघांनी पाहिला. त्यांचे हेतू वेगवेगळे . असत्यामुळे तो त्यांना तीन प्रकारचा. वाटला. (६६७)

लाभे तया हर्ष उपजे । तयासी प्रिय होय सहजे ।
अलाभे कोपती दुजे । तया होय द्वेष्य ॥ ६८ ॥
ज्याला तो मिळाला त्याला आनंद वाटला. साहजिकच तो त्याला प्रिय झाला. ज्याला तो मिळाला नाही, तो दुसरा त्यामुळे रागावला. त्याला तो द्वेष्य वाटला. (६६८)

तिसरा उदास जरी देखतां । सहजत्वे होय उपेक्षिता ।
एव तीन प्रकार मण्यावरूता । तिघी केला ॥ ६९ ॥
तिसऱ्याने उदासीन भावनेने त्याच्याकडे पाहिले. साहजिकच तो त्याला उपेक्षणीय वाटला. अशा प्रकारे त्या तिघांनी त्या मण्याचे तीन प्रकार केले. (६६९)

तस्मात् एक वस्तू त्रिप्रकारें । कल्पित असे व्यभिचारें ।
यांत कोणतें येक मानावें खरें । प्रिय कीं हेश्व उपेक्ष्म ॥ ७० ॥
तेव्हा एकाच वस्तूच्या बाबतीत त्या तिघांनी तीन प्रकारच्या कल्पना केल्या, हा व्यभिचार होय. यातील कोणती कल्पना खरी मानावी ? प्रियत्व. द्वेष्यत्व की उपेक्षणीयता ? (६७०)

प्रिय हेम्प नसावे उपेक्यासी । प्रिय उपेक्य नुठावें हेच्याली ।
उपेक्ष्य द्वेष्य न व्हावें प्रियासी । होतां व्यभिचार ॥ ७१ ॥
जी वस्तू उपेक्ष्य आहे तिच्याबद्दल प्रियत्व आणि डेष्यत्व वाटता कामा नये जी वस्तू डेष्य आहे ती वस्तू प्रिय आणि उपेक्ष्य वाटू नये पण ती वाटते. आणि जी वस्तू प्रिय आहे तिच्याबद्दल द्वेष अथवा उपेक्षा वाटू नये. तसे झाले तर व्यभिचार घडतो. (६७१)

जेथें हा व्यभिचार होय । तेथें येकही त्या मालू नये ।
ऐसा हा व्यभिचाररूप न्याय । असे युक्तीचा ॥ ७२ ॥
जेथे व्यभिचार तो त्यावेळी त्या वस्तूबद्दलची एकही कल्पना खरी ठरत नाही. असा व्यभिचारासंबंधीचा युक्तिसिद्ध न्याय आहे. (६७२)

येथें ह्मणसी मण्यावरी तिघांची । कल्पना ते नव्हे खरी ।
तरी बोलिजेत असे निर्धारी । येका होती त्रिविध ॥ ७३ ॥
आता असे म्हटले जाईल की, एकाच मण्याबद्दलची तिघांची भिन्न भिन्न कल्पना खरी नव्हे. तर आता एकाच व्यक्तीला या तीन कल्पना कशा वाटतात ते सांगतो. (६७३)

व्याधादि द्वेष्य असतां । उपेक्ष्य होती दुरोन जातां ।
तेचि कुर्वाळिती पाळितां । तस्मात् द्वेष्य ते न होती ॥ ७४ ॥
व्याघादी हिंस प्राणी डेष्य असायला पाहिजेत. पण ते दुरून गेल्यामुळे उपेक्षणीय वाटतात. परंतु ते पाळल्यानंतर त्यांना कुर्वाळता येते. त्यावेळी तेच उपेक्षणीय न वाटता प्रिय वाटतात. द्वेष्य वाटत नाहीत. (६७४)

तृण पाषाण उपेक्य सहज । परी प्रिय होय पडता काज ।
रुपतां लागता द्वेष्यरूप सहज । तेव्हां ते उपेक्य न होती ॥ ७५ ॥
तृण, पाषाण हे स्वाभाविकपणे उपेक्ष्य आहेत पण त्यांची गरज भासताच ते प्रिय होतात. आणि ते रुतले किंवा त्यांची ठेच लागली तर साहजिकच द्वेष्यरूप होतात. तेव्हा ते उपेक्षणीय वाटत नाहीत. (६७५)

पुत्रादि सहज प्रिय असती । परी अनुकूल नसता द्वेष्य होती ।
न मानितां तया उपेक्षिती । तस्मात पुत्र प्रिय नव्हे ॥ ७६ ॥
पुत्रादी स्वाभाविकपणे प्रिय असतात, परंतु ते जर अनुकूल नसतील तर द्वेष्य ठरतात. ते जर आपल्याला मानत नसतील तर त्यांची उपेक्षा करतात. त्यामुळे पुत्र प्रिय होत नाही. (६७६)

हाचि न्याय स्थलापासून । वृत्तीपावेतो संपूर्ण ।
व्यभिचार होतां निश्चर्ये कडून । प्रियता त्या नसे ॥ ७७ ॥
हाच न्याय स्थूल सुष्टीपासून ते वृत्तीपर्यंत सगळ्यांना लागू होतो. त्यात व्यभिचार होत असेल तर त्यामुळे तो पदार्थ प्रिय ठरत नाही. (६७७)

मुख्याला जो वृत्ति अधिष्ठान । तोचि प्रियतर सर्वांहून ।
तेथें व्यभिचाराचें दूषण । किमपि नुठे ॥ ७८ ॥
वृत्तींचे अधिष्ठान असलेला जो मुख्यात्मा तो सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहे. तेथे मात्र प्रियत्वाच्या बाबतीत व्यभिचाराचा दोष निर्माण होऊ शकत नाही. (६७८)

प्रियत्वाचीही वृत्ति नुठे । मा द्वेष्य उपेक्य कोठे ।
निर्वृत्तिक सुख गोमटे । संचले असे ॥ ७९ ॥
वास्तविक पाहता मुख्यात्म्याच्या संदर्भात प्रियत्वाचीसुद्धा वृत्ती उठत नाही. मग द्वेष्यत्व अथवा उपेक्ष्यत्व यांचे नावच काढायला नको. तेथे वृत्तिविरहित निखळ सुखच सर्वत्र व्यापून राहिलेले असते. (६७९)

ह्यणसी आल्या जना जाणवेना । तेव्हां उपेक्षा येतसे अनुमाना ।
आणि विष असून देती प्राणा । तेव्हां द्वेष्य होय ॥ ८० ॥
तू असे म्हणशील की, सर्वसामान्य लोकांना आत्म्याचे अस्तित्व जाणवत नाही. तेव्हा ते आत्म्याची उपेक्षा करतात असे अनुमान काढता येते आणि जेव्हा लोक विषभक्षण करून प्राण देतात तेव्हा तो डेष्य ठरत नाही काय ? (६८०)

तरी अवधारीं बोलिजे । जगी आल्या उपेक्षिजे ।
परी सुख व्हावें वाटे जें । तें जात्ययास्तव ॥ ८१ ॥
तर ऐक. याचे उत्तर मी सांगतो. जग आत्म्याची उपेक्षा करते. पण प्रत्येकाला जे सुख व्हावे असे वाटते, ते आत्म्याकरिताच वाटत असते. (६८१)

जैसा वृक्षस्थचि जळी पडला । वाटे तोचि जावा वाचला ।
त्याहून भास जरी समजला । तरी तो मरो कीं वांचो ॥ ८२ ॥
ज्याप्रमाणे प्रत्यक्ष वृक्षावर बसलेला माणूसच पाण्यात पडला तर तो वाचावा असे स्वाभाविकपणेच वाटते. पण त्याऐवजी तो आभास आहे असे समजले तर तो मरेना का अथवा वाचेना का, अशी उपेक्षेची भावना त्या आभासाबद्दल निर्माण होते. (६८२)

तैसें आपण हेंच वाटे मनीं । ह्मणोनि दुजा आत्या नसे जनी ।
इकडील आपुली प्रियता धोनी । तया उपेक्षिले ॥ ८३ ॥
तसे आपण म्हणजे चिदाभास जीवच आहोत असे मनात वाटत असते. म्हणून या जगात दुसरा आत्मा नाही, अशी धारणा होते. त्यामुळे मुळातील आत्म्याबद्दलची प्रियत्वाची भावना त्या जीवाबद्दल वाटू लागते. त्यामुळे त्या आत्म्याची उपेक्षा होते. (६८३)

तो ह्मणजे आपणाहून वेगळा । मालूनि उपेक्षितसे हेळा ।
आपुले प्रियत्वाचा सोहळा । असे तो कवणा ॥ ८४ ॥
तो मुख्यात्मा म्हणजे आपल्यापेक्षा वेगळाच आहे, असे म्हणून त्याची सहज उपेक्षा केली जाते. मग आपल्या प्रियत्वाचा सोहळा (आनंद) वाटतो, तो कोणाला ? (६८४)

तैसेचि विष असून प्राण देती । धिक्कार असो मज ह्मणती ।
परी जर्नी न व्हावी अपकीर्ति । हे आवडी अकृत्रिम ॥ ८५ ॥
त्याप्रमाणेच माणसे विष खाऊन प्राण देतात, माझा धिक्कार असो असे म्हणतात, पण लोकांमध्ये आपली अपकीर्ती होऊ नये असे त्यांना वाटत असते. ते अकृत्रिम असते. मग हे त्यांना वाटणारे प्रेम कोणाबद्दल असते ? (६८५)

तुह्यी असा फार चौगुले । मी हीन निकृष्ट ऐसा बोले ।
तें उपरोधिक जाण वहिले । परी अंतर्हेतु भिन्न ॥ ८६ ॥
'आपण फार चांगले आहात. मी काय हीन मुक असा माणूस ! ' असे एखादा माणूस म्हणतो. पण ते बोलणे उपरोधिक आहे असे निश्चयपूर्वक समज. पण त्या बोलण्यामागे त्याचा अंतःस्थ हेतू वेगळाच असतो. (६८६)

हें मुमुसूने पुरते विचारावे । आत्या प्रिय हेश्व कधीं नव्हे ।
तस्मात् प्रियतमत्व जाणार्ये । मुख्य आल्पयाचे ॥ ८७ ॥
मुमुलूने याचा पूर्णपणे विचार करावा. आत्मा प्रिय, डेष्य कधीच नसतो. त्यामुळे मुख्य आत्माच सर्वांत अधिक प्रिय आहे. (६८७)

इतुकीयाही निरूपणावरी । जो मूड न समजे अंतरीं ।
तया पाषाणा शास्त्रें सारी । आणि गुरूही करी काय ॥ ८८ ॥
इतके निरूपण केल्यानंतरही ज्या मूर्खाला आपल्या मनात त्याची समज येत नाही. त्या दगडाला सर्व शास्त्रे आणि सहुरू तरी काय करतील ? (६८८)

असो रविदत्ता अव्यभिचार । आत्या पूर्ण प्रियतर ।
तोचि चिदूपही साचार । आणि अस्ति तोचि ॥ ८९ ॥
असो. तेव्हा हे रविदत्ता, आत्मा सर्वीत जास्त प्रिय आहे. आणि हे त्याचे प्रियत्व अव्यभिचारी आहे. त्याचप्रमाणे तो चिद्र्रपही आहे. अस्तित्वही त्याचेच आहे. (६८९)

येर हा अवघा आभास । देहादि जीवान फोस ।
येथें अस्तित्व ना नसे सुरस । प्रिय न चिडूप ॥ ९० ॥
इतर सर्व हा आभास आहे. देहापासून ते जीवापर्यंत सर्व पदार्थ फोस (व्यर्थ) आहेत. त्यांना ना अस्तित्व, ना गोडी, ना प्रियत्व, ना चिद्‌रूपत्व ! (६९०)

हेचि आहे आवडे जाणते । ऐसें अज्ञाना व्यर्थ वाटते ।
पीर हेचि विडंबन बोलिजेतें । यथार्थ विचारे पहा ॥ ९१ ॥
पण अज्ञानी माणसाला मात्र तेच आवडते, तेच जाणते तत्त्व असे वाटते आणि त्याचेच अस्तित्व खरे आहे असे वाटते. पण यालाच विडंबन म्हणतात. यथार्थ विचार करून पहा. (६९१)

तथापि ऐशिया निरूपणे । संशय न त्यागिजे मने ।
तरी सावधान अंतःकरणे । दुजा न्याय बोल- ॥ ९२ ॥
तरीसुद्धा तुझ्या मनाने या निरूपणानंतरही संशयाचा त्याग केला नाही (तुझ्या मनातला संशय गेला नाही) तर तू अंतःकरण सावध करून ऐक. तुला दुसरा युक्तिवाद सांगतो. (६९२)

जागतीमाजी प्रत्यक्ष देहाचे । अस्ति भाति प्रियत्व रुचे ।
तें स्वप्नामाजी उरे कैचे । विचारे पहा ॥ ९३ ॥
जागृतीच्या अवस्थेत प्रत्यक्ष देहाचे अस्ति भाति प्रियत्व आहे असे वाटते. पण ते स्वप्नाच्या अवस्थेमध्ये शितुक राहते का, याचा विचार कर. (६९३)

स्वध्यामाजीही भास दुसरा । या ऐसाचि कल्पी अंतरा ।
हाचि मी या भास विषयमात्रा । भोगी सुखदु खा ॥ ९४ ॥
स्वप्नामध्येही याहून दुसऱ्या भासाची अंतःकरणात कल्पना केली जाते. त्यावेळी हा दुसरा भास म्हणजेच मी असून या भोवतीच्या विषयांचा भोग मीच घेतो, आणि त्यातून प्राप्त होणारी सुखदुःखेही मीच भोगतो, असे वाटत असते. (६९४)

मुख्य देह अस्तरणीं पडिला । तया न स्मरे आहे कीं मेला ।
आभास स्वप्नींचा आहेसा केला । तेव्हां निस्तत्त्व प्रत्यक्ष जो ॥ ९५ ॥
मुख्य देह त्यावेळी अंथरुणावर पडलेला असतो. त्या जीवाला तो देह आहे की मेला आहे याचेही भान नसते. स्वप्नीच्या आभासाला त्यावेळी तो खरा म्हणून मानत असतो. पण प्रत्यक्षात तो भास पूर्णपणे खोटा असतो. (६९५)

भास' देहचि भास विषयांसी । देखत असे त्या समयासी ।
इकडे पडे जो त्याचे त्वचेसी । मृदु कठिणही कळेना ॥ ९६ ॥
त्या काळात भासरूप देहच भासरूप विषयांना पाहत असतो. पण अंथरुणावर पडून राहिलेल्या त्या देहाच्या त्वचेला मृदु, कठीण यातील काहीच कळत नाही. (६९६)

प्रत्यक्षा सर्प जरी वेष्टिलें । तयाचे भयही नाहीं वाटलें ।
स्वप्नी व्याष्टे जें आभास धरिलें । तेणें आक्रदोनि रडे ॥ ९७ ॥
प्रत्यक्ष देहाला सर्पाने वेढले तरी त्याचे भय वाटत नाही. पण स्वप्नामध्ये मात्र वाघाने त्या आभासमान देहाला धरत्याचा त्याला जो भास होतो त्यामुळे तो जोरात ओरडतो, रडतो. (६९७)

स्थूलाचे प्रियत्वचि असतें । तरी सर्प थरितां कां उपेक्षिते ।
आणि हें चिदूपचि जरी होतें । तरी जाणते निजलिया ॥ ९८ ॥
स्थूल देहाचे प्रेम जर त्याला खरोखरच असते तर सर्पाने धरल्यानंतरही त्याने त्याची उपेक्षा का केली असती ? आणि तो स्थूल देह जर खरोखरच चिद्र्रप असता तर त्या निजलेल्या देहाला तो जाणू शकला असता. (६९८)

तेथें .आहेपणा जरी असता । तरी स्वप्नदेहांत कासया येता ।
असो अस्ति भाति तिजी प्रियता । स्वप्नीचिया भासा आली ॥ ९९ ॥
त्या देहाच्या ठिकाणी जर आहेपणा असता तर मग तो स्वप्नदेहात कसा काय आला ? असो, तर अस्ति, भाति आणि तिसरी प्रियता या स्वप्नाच्या देहाकडे आली. (६९९)

अस्तित्व तिकडे गेलें । इकडे निस्तत्त्व मढे पडियले ।
जाणतेपण स्वप्नांत आलें । इकडे उरे जडत्व ॥ ७०० ॥
अस्तित्व स्वप्नदेहाकडे आले आणि इकडे प्रत्यक्ष देहाचे मढे पडले ! जाणतेपण स्वप्नात आले आणि इकडे जडत्व उरले ! (७००)

प्रियत्वही गेलें स्वप्नभासा । इकडे अप्रियता उरे सहसा ।
एव असल्लड दुःखरूप जैसा । परोक्ष कोणी ॥ १ ॥
प्रियत्वही स्वप्नभासाकडे गेले आणि इकडे लगोलग अप्रियता आली ! अशा तऱ्हेने प्रत्यक्ष देह हा जणू काही अप्रत्यक्ष परक्याचा देह असत्याप्रमाणे असत्, जड आणि दु: खरूप झाला. (७०१)

तोचि आपण असता जरी । तरी कां त्यागिता परोक्षापरी ।
तस्मात् आपण आत्या निर्विकारी । हा अनात्या देह ॥ २ ॥
तोच जर आत्मा असता तर त्याचा असा परक्या देहाप्रमाणे त्याग का केला असता ? त्यामुळे आपणच निर्विकारी आत्मा आहोत आणि हा देह अनात्मा आहे. (७०२)

आतां स्थप्नभासासी जें आलें । अस्ति भाति प्रियत्व उमटले ।
कीं मी हा आणि व्या देखिले । कल्पित विषय ॥ ३ ॥
आता जो स्वप्नभासामध्ये आला, त्याच्या ठिकाणी अस्ति, भाति आणि प्रियत्व आले ! तो भासदेह म्हणजे मी आणि भासातील कल्पित विषय मीच पाहिले. (७०३)

हाचि मी आणि भास विषया । देखत असें काळी या ।
आणि प्रियरूपही मानिलें तया । सूक्ष्मदेहासी ॥ ४ ॥
हाच मी असून भास विषयांना सध्या पाहत आहे; आणि त्याच रूमदेहाला मी प्रिय मानले आहे. म्हणजे याच्या ठिकाणी मी अस्ति, भाति, प्रियत्व अनुभवतो. (७०४)

तरी हेही असल्लड दु ःखाल्पक । ऐसा करणें जरी विवेक ।
तरी हाचि न्याय निश्चयात्मक । स्थूलापरी पहावा ॥ ५ ॥
पण हाही देह असज्जड दुःखात्मक आहे असा जर विवेक करायचा झाला तर स्धूलदेहाचाच न्याय यालाही लावावा. (७०५)

जैसा स्थूल नाहीं स्वप्नामाझारी । तेवींच सुप्तींत निमती सत्रा सारी ।
जया संघासी बोलती उत्तरी । सूक्ष्मदेह भासरूप ॥ ६ ॥
ज्याप्रमाणे स्वप्न- अवस्थेमध्ये स्थूल शरीराचे अस्तित्व नसते, त्याप्रमाणे रूम देहाची सतरा तत्त्वे सुषुप्ती अवस्थेमध्ये नाहीशी होतात. या सतरा तत्त्वांच्या संघाताला भासरूप सूक्ष्मदेह असे म्हणतात. (७०६)

श्लोक : सुप्तौतु तल्लये बोध: शुद्धी जाऊं प्रकाशते ॥ ४ ॥ (उत्तरार्ध)
अर्थ : गाढ निद्रेत बुद्धी (च्या ठिकाणचा चिदाभास) लय पावत्यामुळे शुद्ध ज्ञान केवळ जाड्यालाच (अज्ञानालाच) प्रकाशित करते. । । ४ । । (उत्तरार्ध)

ऊ सुप्तीच्या ठाई तया देहाचा । लय होतसे समूळ साचा ।
नुसधी नेणीव उरे तयाचा । शुद्ध बोधे प्रकाश करी ॥ ७ ॥
सुमीच्या अवस्थेत त्या सूक्ष्मदेहाचा समूळ लय होतो आणि केवळ नेणीव उरते. ती नेणीव शुद्ध बोध प्रकाशित करते (ती नेणीव शुद्धबोध दाखविते). (७०७)

पद : सुप्तौतु ।
पदाचा अर्थ दिलेला नाही

सुषुप्ति म्हणजे लागता झोप । किंचित- दुजे तुरे अल्प ।
येक नेणीव मात्र असडूप । उरे कारण ॥ ८ ॥
सुखी म्हणजे झोप लागल्यावर दुसरे थोडेसुद्धा उरत नाही. एक नेणीव मात्र उरते. ती असद्‌रूप असून कारणरूप असते. (७०८)

जया अज्ञानास्तव । देहहुया आलें रूप नांव ।
तोचि याचा विश्रांतिठाव । तेथेंचि विश्रामती ॥ ९ ॥
त्या नेणिवेमुळेच म्हणजेच अज्ञानामुळेच स्थूल आणि रूम या दोन देहांना नाम आणि रूप प्राप्त झाले. या अज्ञानात म्हणजे कारणदेहात हे दोन विश्रांती पावतात. तेच त्यांचे विश्रांतीचे स्थान आहे. (७०९)

जैसा दयेनपक्षी विहार करी । दशदिशी आहारादि सारी ।
शिणतां नीडीं प्रवेशे माघारी । पक्ष संकोचोनी ॥ १० ॥
ज्याप्रमाणे श्येनपक्षी (ससाणा) भराऱ्या मारतो. दहा दिशांत फिरून आहारादी क्रिया पार पाडतो आणि मग थकल्यानंतर पंख मिटवून पुन्हा आपल्या घरड्यात प्रवेश करतो. (७१०)

तैसा सूक्ष्म देहासहित । जीव हा जागर स्वप्नी क्रीडत ।
तेथें सुखदु- शीण पावत । तेव्हां विश्रांति घ्यावी वाटे ॥ ११ ॥
त्याप्रमाणे जीव सूक्ष्मदेहासह जागृती आणि स्वप्न या दशांमध्ये क्रीडा करतो. तेथील सुखदु: खामुळे तो शीण पावतो. तेव्हा त्याला विश्रांती ध्यावी असे वाटते. (७११)

मग ज्ञान क्रियाशक्ति दोन्ही । मनबुद्धींत आकर्षोनी ।
विषय दशदिशा उपेसूनी । कारणाकडे फिरे ॥ १२ ॥
मग तो ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या दोहोंना मनबुद्धीत आकर्घून घेतो आणि विषय आणि दाही दिशा यांची उपेक्षा करून कारणाकडे परततो. (७१२)

मनामाजी इंद्रियें येतां । शून्य पडे विषया समस्तां ।
आणि देही पडे निचेष्टिता । मृत्यूप्राय ॥ १३ ॥
सर्व इंद्रिये मनामध्ये एकवटत्यावर सगळे विषयही नाहीसे होतात आणि देहदेखील मरण पावत्याप्रमाणे निचेष्टित पडतो. (७१३)

प्राण मात्र जडत्वे वावरती । तेणे मृत्यूची नव्हे भ्रांति ।
हा निजेला ऐसें ह्मणती । पाहनि लोक ॥ १४ ॥
प्राण मात्र जडपणाने त्या शरीरात वावरत असतात. त्यामुळे मृत्यूची भाती (काळजी) वाटत नाही. त्याला पाहून लोक म्हणतात की, हा झोपलेला आहे. (७१४)

परी मी हा निजलों असें । निद्रिस्त जाणेना अल्पसें ।
प्राणही वावरती जैसे । तेंही न स्मरे ॥ १५ ॥
पण झोपलेल्या माणसाला मात्र 'मी स निजलेला आहे. असे थोडेदेखील ज्ञान नसते. शरीरात प्राण वाहात असतात तेही त्याला आठवत नाही. (७१५)

मन बुद्धि येकत्र जाली । कि । चेत- जरी कल्पना स्फुरली ।
तरी ते स्वप्नभासाची मुली । तेही निमेल यांत ॥ १६ ॥
मन, बुद्धी एकत्र झाली आणि किंचितशी जरी कल्पना स्फुरली तरी तो स्वप्नभासाचा भ्रम असतो. तोही या कारणात लीन होतो. (७१६)

येखादे वेळे स्वप्न होतें । केव्हां जागति सरता गाढ होतें ।
कल्पित विषयाही समस्तांतें । उपेक्षन बुद्धि ॥ १७ ॥
एखादेवेळेस जागृती सरताच स्वप्न पडते किंवा गाढ झोप लागते. त्यावेळी बुद्धी सर्व कल्पित विषयांची उपेक्षा करते. (७१७)

ते बुद्धि वृत्ति अज्ञानी मिळे । किंचितू न स्मरे सुखदुःख सोहळे ।
मी अज्ञान हेंही न कळे । जाड मात्र उरे ॥ १८ ॥
आणि ती बुद्धी अज्ञानात मिसळते. त्यावेळी तिला सुख दु: ख काहीदेखील स्मरण राहत नाही. मी अज्ञानी आहे, हेही कळत नाही. तिच्या ठिकाणी केवळ जडता उरते. (७१८)

पद : तल्लये ।
पदार्थ : बुद्धीचा लय झाल्यानंतर

ऐशी गाढ सुपुसि जालिया । अभाव होतसे देहहुया ।
जागति स्वप्नकाळी तया । निःशेष निमती ॥ १९ ॥
अशी गाढ झोप आल्यावर दोन्ही देहांचा स्थूल व सूक्ष्म अभावच होतो. जागृती आणि स्वप्न या दोन्हीही अवस्था त्यावेळी संपूर्णपणे मावळतात. (७१९)

मनादि वृत्ति कीं ज्ञानेंद्रिय । प्राण कीं देह ना कर्मेंद्रिय ।
प्रत्यक्ष कीं भासरूप विषय । हे सर्वही मावळती ॥ २० ॥
मनादी वृत्ती, ज्ञानेंद्रिये, प्राण, देह, कर्मेन्द्रिये, प्रत्यक्ष अथवा भासरूप विषय हे सगळे मावळतात. (७२०)

नुसती जाड्यता जे नेणीव । उरे होऊन सर्व अभाव ।
ऐसिये समर्थी तो स्वयमेव । आत्याचि येक ॥ २१ ॥
केवळ जाड्यता म्हणजे अज्ञान तेवढे उरते. बाकी सर्व गोष्टींचा तेथे अभाव असतो. अशा वेळी खरे तर केवळ आत्माच एकटा उरलेला असतो. (७२१)

दुजेवीण आनंदघन । सच्चितूप आत्मा पूर्ण ।
परी नेणीव न फिटे कारण । म्हणोनि ते झोप ॥ २२ ॥
इतर कोणत्याही पदार्थावाचून केवळ अद्वय, निखळ आनंदस्वरूप, सच्चिद्‌रूप, परिपूर्ण आत्माच उरतो. पण अज्ञान नष्ट झाले नसत्याने त्या आत्मस्थितीला झोपेचे स्वरूप येते. (७२२)

पहिली नेणीव जे आपुली । तेचि देहट्टया कारण जाली ।
त्या देहहुयाची उपाधि सरली । परी नेणीव न फिटे ॥ २३ ॥
प्रथम आपले जे अज्ञान असते ते स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहांचे कारण होते. सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये या दोन देहांची उपाधी नष्ट झाली, तरी अज्ञान फिटलेले नसते. (७२३)

जैसे तृणादि वरील नासले । परी भूमिपोटी बीज उरले ।
तेणेंचि वार्षिकीं विरूढलें । पूर्ववत् जैसे ॥ २४ ॥
ज्याप्रमाणे जमिनीवर उगवलेले गवत वरून जळून गेले तरी भूमीच्या गर्भात त्याचे बी उरलेले असते. त्यामुळेच वर्षाऋतूत ते पूर्वीसारखे जसेच्या तसे उगवते. (७२४)

अथवा वृक्षस्थे डोळे झांकितां । जळी पडिला न दिसे तत्वतां ।
परी तें मिथ्या न कळता । उघडितां मानी मी पडिलो ॥ २५ ॥
अथवा वृक्षस्थ माणसाने डोळे झाकल्यावर पाण्यात पडलेला पुरुष त्याला दिसत नाही. पण ते पडणे खोटे आहे, हे न कळत्यामुळे डोळे उघडताच आपणच पडलो आहोत, असे तो मानतो. (७२५)

तैशी नेणीव मात्र बीजरूपें । उरलीसे विना सकल्पे ।
म्हणोनि उत्थानी पूर्वरूपें । अन्यथा उठे ॥ २६ ॥
त्याप्रमाणे अज्ञान (नेणीव) फक्त बीजरूपाने उरलेले असते. तिच्यात नेणीवदशेत संकल्पाचा अभाव असतो. म्हणून जागा झाल्यावर तो संकल्प नव्याने पूर्वरूपात उत्पन्न होतो. (७२६)

जागति स्वप्नी जरी ज्ञान । पदार्थभासाचें विपरीत भान ।
परी तें निजात्ययाचे अज्ञान । न फिटे वृत्ती ॥ २७ ॥
जागृती आणि स्वप्नदशा यात जरी ज्ञान असले तरी पदार्थांच्या आभासाचे विपरीत ज्ञान हेच त्याचे स्वरूप असते. परंतु निजात्म्याबद्दलचे वृत्तीचे अज्ञान त्यामुळे फिटत नाही. (७२७)

तेवि स्मरण रूप विशेष वृत्ति । उभय व्यापारी क्रीडत होती ।
तेचि लयकाळीं नेणीव पुढती । सामान्यत्वे उरे ॥ २८ ॥
त्याप्रमाणे स्मरणरूप विशेषवृत्ती जागृती आणि स्वप्न या दोन्ही व्यापारात क्रीडा करत होती. तीच झोपेत लय झाल्यावर अज्ञानरूपाने सामान्यत्वाने उरते. (७२८)

उरे ते अमुकसी आहे । ऐसा आहेपणा न लाहे ।
परी अनुमानें जाणावी कीं राहे । कार्य उत्पत्तीमुळे ॥ २९ ॥
जी वृत्ती उरते ती अमुक आहे असा तिचा आहेपणा सांगता येत नसला तरी पुढे होणाऱ्या कार्यावरून ती तेथे असते असे अनुमानाने जाणता येते. (७२९)

असो ऐशी जे मूढवृत्ति । उरली जे जाड्यता तयेप्रति ।
अस्ति भाति प्रियरूप निश्चिती । सहजगति आले ॥ ३० ॥
ही जी मूढवृत्ती झोप उरलेली असते तिच्यात जडता (अज्ञान) असते. तरीपण तिच्यात अस्ति भाति प्रियता हे सामान्यत्वाने असतातच. (७३०)

जाड्यता आहे आणि भासे । आवडीही तेथेंचि वसतसे ।
देहद्वय होती फोसे । निस्तत्त्वपणें ॥ ३१ ॥
जाड्यता जी आहे ती भासतेच. प्रीतीही तिथेच वास्तव्य करते आणि स्थूल आणि सूक्ष्म देह सत्त्वहीन झाल्यामुळे फोस (निष्फळ) होतात. (७३१)

निस्तत्त्व म्हणजे नाहींपणा । नाहीं ते कदां असेना ।
त्याची आवडी तरी होय कोणा । वंध्यापुत्रापरी ॥ ३२ ॥
निस्तत्त्व म्हणजे नाहीपणा. जे नाही ते केव्हाही असत नाही. मग वंध्यापुत्राप्रमाणे असणाऱ्या त्याच्याबद्दल कोणाला आवड निर्माण होणार ? (७३२)

समे आहे होतें वाटलें । मंदांधकारीं सर्प उमटले ।
ते गाढ अंधारी निमाले । तेवीं सुप्तींत देहद्वय ॥ ३३ ॥
श्रमाने जे आहे आणि होते असे वाटले, ते अर्धवट झालेल्या अंधारात सर्प म्हणून मनात ठसले. पण अंधकार दाट झाल्यानंतर तर ते पूर्णपणे नाहीसे झाले. त्याप्रमाणे सुमुप्तीत दोन्ही देह नष्ट झाले. (७३३)

स्थूलदेह तो जागतीसहित । निमाला असे स्वप्नांत ।
तें स्वप्नही नासोनि जात । सुधुसीमार्जी ॥ ३४ ॥
स्यूतदेह जागृती अवस्थेसह स्वप्नाच्या स्थितीत लोप पावला. ते स्वप्नदेखील सुषुप्तीमध्ये नष्ट झाले. (७३४)

असच्चड अप्रियता । देहहुयाची अकृत्रिमता ।
जरी हे अस्तिभातित्वे असतां । तरी नासती कासया ॥ ३५ ॥
यावरून या दोन देहांचे असते, जड आणि दुःखमय रूप अकृत्रिम (स्वाभाविक) आहे असे सिद्ध झाले. ते जर अस्ति, भाति, प्रियरूपाने असते तर नष्ट कसे झाले असते ? (७३५)

अस्तित्त्व होतें तें जाउनी । निस्तत्व आलें दोहींलागुनी ।
चिडूप प्रिय तींही मावळुनी । जडदुःख आलें ॥ ३६ ॥
त्यांना जे अस्तित्व आहे असे वाटत होते. ते जाऊन त्या दोहोंनाही नाहीपणा आला. त्यांच्यात भासणारी चिद्‌रूप, प्रिय ही लक्षणेही मावळून त्यांच्या जागी त्यांना जड, दुःखरूप अशी लक्षणे मिळाली. (७३६)

नेणिवेसी आली अस्तिता । तेथेंचि वसिन्नली चिडूपता ।
आणि स्वकीय प्रियता । तेथेंचि आली ॥ ३७ ॥
नेणिवेला आहेपणा आला. तेथेच चिद्र्रपतेने वास्तव्य केले आणि स्वकीयतेमुळे तेथेच प्रियताही आली. (७३७)

आतां तेचि अस्तित्वादि नेणिवेचें । कैसे तें पुढें निरोपिजे साचे ।
प्रस्तुत ज्ञान सुप्तींत जें न वचे । तेचि आधीं साधू ॥ ३८ ॥
आता नेणिवेस अस्ति भाति प्रियता कशी आली ते पुढे सागू प्रस्तुत प्रसंगी सुपुसीतही ज्ञान नाहीसे कसे होत नाही, ते सांगतो. (७३८)

पद : बोध: शुद्धो जाड्यं प्रकाशते ॥ ४ ॥
पदार्थ : शुद्ध बोध जाड्यास प्रकाशित करतो । । ४ । ।

जे का सामान्यत्वे ज्ञान । शुद्ध ह्यणिजे नेणिवेवीण ।
जाड्यता नेणिवेतें आपण । प्रकाशीत असे ॥ ३९ ॥
जे ज्ञान सामान्यत्वाने असते, जे शुद्ध म्हणजे नेणीवरहित असते ते सुषुप्तीतील नेणीव आणि जाड्यता यांना प्रकाशित करते. (७३९)

तें शुद्ध ज्ञान जात्ययाचे । तें पुढे विरून कळे साचे ।
प्रस्तुत ठाई या सुपुप्तीचें । ज्ञान कैसे ऐके ॥ ४० ॥
ते आत्म्याचे शुद्ध ज्ञान होय. ते पुढे होणाऱ्या विवरणाने कळून येईल. सध्याच्या प्रस्तुत प्रसंगी या सुषुप्तीत ज्ञान कसे असते ते सांगतो. (७४०)

सुसिकाळीं वृत्तीचा लय । जाणिला असे प्रकाशे स्वये ।
जरी जाणिला नसता तो समय । उत्थानी न स्मरता ॥ ४१ ॥
सुसिकाळी (झोपेच्या काळात) वृत्तीचा लय कसा होतो, हे आत्म्याने स्वतःच्या प्रकाशाने जाणले आहे. जर या झोपेच्या काळात आत्म्याला ते कळले नसते, तर झोपेतून उठल्यावर त्याला तो आठवला नसता. (७४१)

आतां जेधवा असे स्मरला । कीं लय अमुक वेळ होता जाला ।
तस्मात् तो अनुभव घेतला । तेव्हां आतां स्मरे ॥ ४२ ॥
आता ज्या अर्थी त्याला हे आठवते की लय अमुक वेळ झाला होता. त्याअर्थी त्याने तो अनुभव घेतला होता म्हणूनच तो त्याला आठवतो आहे. (७४२)

विशेष वृत्तीचे स्मरण नव्हतें । परी सामान्यत्वे जाणे नेणिवतें ।
आतां विशेष पाहिलें त्यातें । तेव्हां जाणिले ह्मणोनि ॥ ४३ ॥
झोपेत त्याला विशेष वृत्तीचे स्मरण नव्हते, पण सामान्यत्वाने त्याने नेणिवेला जाणले. आता जागूतिकाळी त्याने विशेष वृत्तीने तिच्याकडे पाहिले तेव्हा त्या जाणण्याचा अनुभव त्यास सांगता आला. (७४३)

जैसा स्वसुखी पुरुष कोणी एक । बैसला निवांत सकौतुक ।
तया पुढून जातां लोक । परी तो विशेषें देखेना ॥ ४४ ॥
जेव्हा एखादा पुरुष आपल्या सुखात निमग्न होऊन निवांतपणे बसला असता त्याच्या पुढून एक व्यक्ती गेली, पण तो विशेष वृत्तीने ते पाहात नव्हता. (७४४)

आपुले ऐश्वर्यसुखे कोंदला । हा अमुक वृत्तीसी नाहीं कळला ।
नेत्र उघडून पाहे त्याला । सामान्य गती ॥ ४५ ॥
आयत्याच सुखरूपी ऐश्वर्याने तो व्यापला असत्यामुळे त्यास त्याच्या वृत्तीस ही अमुक म्हणून कळली नव्हती. त्याचे डोळे उघडलेले होते तो त्या व्यक्तीला पाहातही होता पण ते सामान्यत्वाने पाहणे होते. (७४५)

मागून येणारे तया पुसिले । कीं या मार्गी अमुकसें गेलें ।
तंव तो स्मरून या बोले । कीं गेलेसे वाटे ॥ ४६ ॥
नंतर आलेल्या माणसाने त्याला विचारले की, ' 'या मार्गाने अमुक अमुक व्यक्ती गेली का, '' ते त्याने आठवून सांगितले की, ' 'कोणीतरी गेल्याचे वाटते खरे ! '' (७४६)

सामान्यत्वे देखिले होतें । तें स्मरून सांगतसे तया ।
जरी तेणें पाहिलेंचि नसतें । तरी सांगता काय ॥ ४७ ॥
त्याने सामान्यत्वाने ते पाहिले होते म्हणून आठवून त्याने तसे सांगितले. जर त्याने तसे पाहिलेच नसते, तर तो तसे सांगता काय ? (७४७)

तस्मात् अनुभविला विषय आठवी । नानुभूताचि स्मृति न व्हावी ।
हें सत्य सत्य अन्यथा न घडावी । युक्ति न्यायाची ॥ ४८ ॥
तेव्हा ज्याचा अनुभव घेतला तोच विषय त्याला आठवतो. ज्याचा अनुभव घेतला नाही, त्याची स्मृती त्याला होत नाही. हे सत्य आहे. अन्यथा हा तर्क न्यायाला धरून होत नाही. (७४८)

हें अनुमान परी सत्य असें । नदीसी पूर जेव्हां आलासे ।
तेव्हां उगर्मी पर्जन्य पडिलासे । यांत संदेह नाही ॥ ४९ ॥
हा तर्क आहे, तरी पण तो सत्य आहे. नदीला ज्या अर्थी पूर आला आहे, त्या अर्थी तिच्या उगमप्रदेशात पाऊस पडला असला पाहिजे यात काही संशय नाही. (७४९)

तैसा ज्ञानाचा अनुभव । झोपेत घेतला स्वयमेव ।
ह्मणून आतां करी आठव । तया समयाचा ॥ ५० ॥
त्याप्रमाणे ज्ञानाचा अनुभव झोपेत त्याने स्वत: घेतला होता, म्हणून त्या काळाचे त्याला आता स्मरण होते आहे. (७५०)

लय सामान्य देखिला । होता तो उत्थानी आठविला ।
तस्मात नेणिवेचा अनुभव घेतला । शुद्ध साक्षिज्ञानें ॥ ५१ ॥
वृत्तीचा लय त्याने सामान्यत्वाने पाहिला होता, तो त्याला आता उत्थानकाळी आठवला. त्याचा अर्थ असा की. त्याने आपल्या शुद्ध (सामान्य) साक्षिज्ञानाने नेणिवेचा अनुभव घेतला होता. (७५१)

ह्मणसी सर्वांचा लय होतां । साक्षीचा लय होय त्या सहिता ।
तरी साक्षीच्या लयाचा पाहता । असे कोण साक्षी ॥ ५२ ॥
तू असे म्हणशील की, सर्वांचा लय होत असता साक्षीचाही त्यांच्याबरोबर लय होतो, तर असे विचारता येईल की, त्या साक्षीचा लय पाहणारा दुसरा कोणता साक्षी आहे ? (७५२)

असाक्षी कीं लय मालू नये । हें सत्य सत्य यथा न्याये ।
मागुतीं ह्मणसी कीं सर्वांचा क्षय । जाला या साक्षी कोण ॥ ५३ ॥
लय झाला त्याला कोणी साक्षी नाही असे मागू नकोस. कारण साक्षीविना लय मानू नये हे न्यायाला धरून आहे. यावर तू म्हणशील की, सर्वांचाच लय झाल्यावर त्याला साक्षी कोण असतो ? (७५३)

तरी पाहे शुद्ध साक्षी ज्ञान । सर्वांचा लय पाहे आपण ।
तस्मात् सर्वांचा लय जो होणें । हें अन्यथा नव्हे ॥ ५४ ॥
तर असे पहा की, शुद्ध साक्षी असणारे जे ज्ञान तेच सर्वांचा लय पाहते. म्हणून सर्वांचा लय होतो. हे खोटे नव्हे. (७५४)

जैसा सर्वांचा लय साक्षी जाणे । म्हणून सत्य सत्य सर्वा लय होणें ।
तैसा साक्षीचा लय पाहिला कोणे । हें बोले विचारूनी ॥ ५५ ॥
ज्याप्रमाणे साक्षी हा सर्वांचा लय जाणतो, म्हणून सर्वांचा लय होतो हे अगदी सत्य आहे. त्याप्रमाणे साक्षीचा लय पाहणारा कोणी आहे का, हे विचार करून सांग. (७५५)

म्हणसी सर्वांचा लय अनुमानिला । तेवींच अनुमानावा साक्षी निमाला ।
तरी जैसा सामान्य साक्षी उरला । तैसा उरे कोण ॥ ५६ ॥
आता म्हणशील की, सर्वांच्या लयाचे अनुमान केलेत, तसेच सर्वांच्या लयाचा साक्षी लोप पावला असेही अनुमान करावे. तर ज्याप्रमाणे सामान्य साक्षी उरला तसा साक्षीचा लय पाहणारा कोण उरला ते सांग. (७५६)

दीप नेत्र दोन्ही मिळता । पदार्था देखतसे समस्तां ।
त्यांतील दीप जरी मावळता । तरी डोळा देखे अंधार ॥ ५७ ॥
दिवा आणि डोळा दोन्ही एकत्र आत्यावर सगळ्या पदार्थांना पाहू शकतात. त्यातील दिवा मालवला तर एकटा डोळा अंधाराला पाहू शकतो. (७५७)

अंधार नेत्रे देखिला । ह्मणोनि सत्य दीपाचा लय जाला ।
तैसा डोळा जरी असे गेला । तो देखिला कोणे ॥ ५८ ॥
डोळ्याने अंधार पाहिला म्हणून दिव्याचा लय झाला हे सत्य आहे. त्याप्रमाणे डोळाच जर गेला, तर तो गेलेला आहे हे पाहणारा कोण ? (७५८)

तथापि लय जो साक्षीचा । मानिसी अनुमानें साचा ।
तरी साक्षी जो अनुमानिला साक्षीचा । तो हाच कीं दुजा ॥ ५९ ॥
तरी साक्षीचा लय अनुमानाने मानत असशील तर जो साक्षीचा साक्षी अनुमानलास तो हाच की दुसरा ? (७५९)

डोळियाचा लय डोळा देखे । कीं दुजा डोळा लया ओळखे ।
तेवीं साक्षीचा लय साक्षी निरिखे । कीं चिदूप दुसरें ॥ ६० ॥
डोळ्याचा लय डोळाच पाहतो की, दुसरा डोळा तो लय पाहतो ? त्याप्रमाणे साक्षीचा लय स्वत: साक्षीच पाहतो की, दुसरा कोणी चिद्‌रूप ते पाहात आहे ? (७६०)

साक्षीचा लय साक्षीने देखिला । तरी आपणा देखतां आपण मेला ।
कीं डोळाचि पाहे डोळा गेला । हा तो असंभव ॥ ६१ ॥
साक्षीचा लय साक्षीनेच पाहिला असे म्हणत असशील तर आपल्यादेखतच आपण मेलो असे होईल. डोळ्यानेच डोळा गेला हे पाहणे अशक्यप्राय आहे. (७६१)

दुसरिया ज्ञाने हें ज्ञान । निमालें ह्मणतां तें ज्ञान कोण ।
डोळा गेला तो पाहे अन्य डोळियाने । तो डोळा कोणता ॥ ६२ ॥
दुसऱ्या ज्ञानाने हे ज्ञान लोपले असे म्हटले तर ते दुसरे ज्ञान कोणते ? डोळा गेला हे दुसऱ्या डोळ्याने पाहिले, असे म्हटले तर हा दुसरा डोळा कोणता ? (७६२)

तस्मात् ज्ञानही दुसरे नाहीं । कीं ज्ञान लया होय गाही ।
डोळाचि दुसरा नसे कांहीं । कीं डोळा गेला देखे ॥ ६३ ॥
त्यामुळे ज्ञानाच्या लयाला साक्षी होईल असे दुसरे ज्ञानही नाही, तसे डोळा गेला असे पाहणारा दुसरा डोळाच नाही. (७६३)

ऐसिया विरोधामुळे पाहतां । साक्षीचा लय नये मानितां ।
ह्मणोनि साक्षि ज्ञान असे तत्त्वतां । लयकाळी लय साक्षी ॥ ६४ ॥
असा विरोध येतो आहे. हे पाहिल्यानंतर साक्षीचा लय मानता येत नाही. म्हणून लयकाळी लयाचा लय जाणणारे ज्ञानच खरे साक्षी आहे. त्या साक्षीचे ज्ञान हेच खरे ज्ञान होय. (७६४)

मागुर्ती ह्मणसी कीं लय नव्हे साक्षीचा । परी अनुभव कां नसे तयाचा ।
तरी सांगबापा अनुभव नेणिवेचा । कोणे घेतला ॥ ६५ ॥
आता पुन्हा म्हणशील की, साक्षीचा लय होत नाही, तर मग त्याचा अनुभव का येत नाही ? तर बाबा ३ सांग की, नेणिवेचा अनुभव कोणी घेतला ? (७६५)

हे च्या नेणीव असे पाहिली । ह्मणसी जरी ऐसिया बोली ।
तरी नेणीव जे तुवा देखिली । आपुली कीं पराची सांग ॥ ६६ ॥
' 'मी नेणीव पाहिली आहे, '' असे म्हणत असशील तर पुढचा प्रश्न असा की, ही नेणीव तू पाहिली म्हणतोस तर ती नेणीव कोणाची होती ? तुझी स्वतःची की दुसऱ्या कोणाची ? (७६६)

हा अन्य गृहस्थ असे निजला । जड घोरतसे उगला ।
तरी त्याचा तुला अनुभव जाला । कैसा तो न कळे ॥ ६७ ॥
हा एक दुसरा गृहस्थ निजला आहे. झोपेमुळे जड होऊन तो घोरत आहे. तरी त्याचा अनुभव तुला कसा आला ते कळत नाही. (७६७)

अरे पराचे जागे असतां मन । काय कल्पिते न कळे पाहून ।
मा निजेल्याचे नेणिवेचें ज्ञान । तुज जाले हा असंभव ॥ ६८ ॥
अरे, मन दुसऱ्याचे असेल तर त्याला नुसते पाहून त्याचे मन कशाची कल्पना करते हे कळत नाही. मग निजलेल्या माणसाच्या नेणिवेचे ज्ञान तुला झाले हे अशक्य आहे. (७६८)

आतां लणसी नेणीव आपुली । झोपेमाजी प्रत्यक्ष पाहिली ।
तरी पाहे पाहे गोष्ट साधली । आमुच्या पक्षाची ॥ ६९ ॥
आता जर म्हणशील की, ' 'मी माझी नेणीव झोपेमध्ये प्रत्यक्ष पाहिली. '' तर आमच्याच पक्षाची गोष्ट साधली. (७६९)

तुवा वृत्ति समूळ नसता । आपुली नेणीव पाहिली ह्मणतां ।
अनुभवून कीं होसी बोलता । हा अनुभविता साक्षी ॥ ७० ॥
झोपेत वृत्ती मुळीच नसताना आपली नेणीव पाहिली असे म्हणतोस, हे तू अनुभव घेऊन बोलतो आहेस. हा अनुभविता हाच साक्षी आहे. (७७०)

अरे ऐसा टळटळीत अनुभव । लय साक्षी हा स्वयमेव ।
तयासी कोठे असे नेणीव । नेणिवेचा प्रकाशक ॥ ७१ ॥
असो. असा हा तुझा अनुभव स्पष्ट असता, स्वतःच वृत्तीच्या लयाचा साक्षी झाला आहेस, त्याला नेणीव कशी असेल ? तू तर नेणिवेचा प्रकाशक आहेस. (७७१)

लय काळीही जया ज्ञानाचा । नाश नाहीं प्रकाशाचा ।
जागती स्वप्नी तो अभाव तयाचा । नाहींच नाहीं ॥ ७२ ॥
वृत्तिलयकाळीही ज्या ज्ञानाच्या प्रकाशाचा नाश होत नाही तो जागृतीत अथवा स्वप्नात कधीच नाश पावणार नाही. (७७२)

एव तिही काळीही नासेना । हेचि समूपत्व असे ज्ञाना ।
सदूप तेचि चिडूप आपणा । आत्मयाचें सिद्ध ॥ ७३ ॥
अशा प्रकारे तिन्ही काळी जे नष्ट होत नाही, हेच त्या ज्ञानाचे सद्र्रपत्व होय. जे सद्‌रूप तेच चिद्‌रूप आहे. अशाप्रकारे आत्म्याचे सच्चिद्र्रप सिद्ध होत आहे. (७७३)

जैसे समूप चिडूप आत्ययाचे । असे तें निगेपिले वाचे ।
आतां तिजें लक्षण कां साचे । तें प्रियत्व बोलिजे ॥ ७४ ॥
ज्याप्रमाणे आत्म्याच्या सद्र्रपाचे आणि चिद्र्रपाचे विवेचन केले. आता तिसरे प्रियत्व नावाचे जे लक्षण आहे त्याचे विवेचन करू. (७७४)

मागें मिथ्याल्पा गौणात्मा । निषेधून जो कां मुख्याला ।
तो आवडता प्रत्यगात्मा । अव्यभिचारें बोलिला ॥ ७५ ॥
मागे मिथ्यात्मा, गौणात्मा यांचा निषेध करून जो मुख्यात्मा अथवा प्रत्यगात्मा तो कसा प्रिय आहे, त्याचे प्रियत्व कसे व्यभिचाररहित आहे, हे स्पष्ट केले. (७७५)

तोचि आल्या सुघुप्तीमाजीं । सुखरूप जैसा असे सहजी ।
तोचि बोलिजे जेथें तुजी । अनुभववृत्ति नसे ॥ ७६ ॥
तोच आत्मा सुषुप्तीमध्ये सुद्धा स्वाभाविकपणे कसा सुखरूप आहे, हे आता सांगतो. सुमुप्तीमध्ये दुसरी कोणतीही अनुभववृत्ती नसते. (७७६)

जागतिमाजी सुखदुःख होणें । तें येका संकल्पाच्या गुणे ।
तेवींच स्वप्नीही सुखदुःख देणे । संकल्पमात्रे ॥ ७७ ॥
जागृतीमध्ये केवळ एका संकल्पामुळे सुखदुःख होते; त्याचप्रमाणे स्वप्नातदेखील संकल्पामुळेच सुखदुःख होते. (७७७)

झोपेत संकल्पचि निमतां । सुखदुःखाची तुरे वार्ता ।
तस्मात् सुखदु चि नसता । तत्त्वतां निजसुख ॥ ७८ ॥
झोपेत संकल्पच लोपत्यामुळे सुखदुःखाची गोष्ट उरत नाही. सुखदुःखांच्या अभावी तेथे तत्त्वतः निजसुखच असते. (७७८)

जें सुख वृत्तींत उत्पन्न होणें । तयासी नाश होय श्रुति खणे ।
जें नुद्धवे ना असे सहजपणे । या नांव निजसुख ॥ ७९ ॥
जे सुख वृत्तीत उत्पन्न होते, त्याचा नाश होतो, असे धुती (वेद) म्हणते. पण जे उद्भवत नाही, जे अगदी सहजपणे असते त्याला निजसुख म्हणतात. (७७९)

तया सुखाली घेईना वृत्ति । ह्मणून नोहेचि अनुभूति ।
परी अनुभाव्यरूपी चिऱ्यर्ति । आहे तैसा असे ॥ ८० ॥
वृत्तीने ते सुख घेतले जात नाही, म्हणून त्याची अनुभूती येत नाही. परंतु अनुभाव्यरूप चिन्यूर्त सुख (निजसुख) आहे तसेच आहे. (७८०)

आहेपणा तेंचि चिढूपज्ञान । तोचि आत्या आनंदघन ।
ही तिन्हीही ब्रह्मलक्षणें । येकत्र असती ॥ ८१ ॥
त्याचे आहेपण हेच चिन्मूर्त ज्ञान आहे. तोच निखळ आनंदरूप असा आत्मा आहे. ही तिन्ही ब्रह्मलक्षणे सत्, चित, आनंद) तेथे एकत्रित असतात. (७८१)

येथें रविदत्ता मानिसी ऐसें । कीं जडासी सुखदु खही नसे ।
आणि आहेपणा तो तेथे वसे । तरी असे जडत्वीं सुख ॥ ८२ ॥
यावर रविदत्ता तू असे मानशील की, जडाच्या ठिकाणी सुखदुःख नसते. तेथे आहेपणा असतोच. तेव्हा जडत्वामध्ये सुख असते. (७८२)

काष्ठ पाषाण मृत्तिका । येथेंचि आनंद असे निका ।
तरी याचें उत्तर ऐका । बोलिजेत असे ॥ ८३ ॥
काष्ठ, पाषाण, मृत्तिका यांच्या मध्येच निखळ आनंद असतो, तर आता या तर्काचे उत्तर सांगतो, ऐका. (७८३)

जडीं सुखदुःखाचा अभाव । म्हणणें हाचि कीं असंभव ।
जें जें उत्पन्न जाले रूपनांव । जड कीं चेतनविकार ॥ ८४ ॥
विकारी म्हणजे उत्पन्न जाले । जाले ते वाईट कीं चौगुले ।
तयासी सुखदुःख नाहीं वाटलें । परी सुखदुःखरूप ॥ ८५ ॥
जडामध्ये सुखदुःखाचा अभाव असतो, असे म्हणणेच संभवत नाही. जड असो चेतन असो, जो जो विकार उत्पन्न होतो, जेथे जेथे नाव आणि रूप असते, ते ते विकारी म्हणजे उत्पन्न झालेले असते. ते वाईट असो की चांगले, त्याला सुखदुःख वाटले नाही, तरी ते सुखदुःखरूपच असते. (७८४ - ७८५)

फोडिती तोडिती फेकिती । येके स्थानीं ठेऊन पूजिती ।
ही काय तेथें तुज न दिसती । सुखे आणि दुःखे ॥ ८६ ॥
त्या जडास कोणी फोडतात, कोणी तोडतात, कोणी फेकून देतात; तर कोणी ते एका विशिष्ट ठिकाणी ठेवून त्याची पूजा करतात. ही सुखे आणि दुःखे तुला काय दिसत नाहीत का ? (७८६)

तथापि सुखदु- तेणें । अनुभविलीं नाहींत मानिसी मने ।
तरी निजसुखही असे कवणे । रीती तेथें ॥ ८७ ॥
तथापि तू मनात असे म्हणशील की, जड पदार्थांनी ती सुखदु: खे कुठे अनुभवलेली असतात ? तर मग निजसुख तरी तेथे कोणत्या प्रकाराने असते, ते सांग. (७८७)

तेथें सुख आहे तें तुज कैसे । कळले तें सांगे पां आपैसें ।
तेथें हर्ष किंवा ग्लानि दिसे । अनुमानाजोगे ॥ ८८ ॥
तेथे सुख आहे ते तुला आपोआप कसे कळले ते सांग. तेथे अनुमान करता येईल असा हर्ष किंवा ग्लानी (दुःख) तुला दिसली काय ? (७८८)

ह्यणसी निजेलिया कोणतें चिन्ह । कीं सुख आहे करावा अनुमान ।
तरी पाहे त्याचें मुख विकासमान । हर्ष खेद नसता ॥ ८९ ॥
यावर तू म्हणशील की, झोपी गेलेल्या माणसाच्या ठिकाणी सुख आहे, असे अनुमान करण्याजोगे कोणते चिन्ह दिसून येते ? तर त्याच्या ठिकाणी हर्ष किंवा खेद ही दोन्ही नसतात, पण त्याचे मुख मात्र प्रफुट्रित कसे दिसते ते पहा. (७८९)

तस्मात् सुयुसीमाजीं निजानंद । वृत्तीवीण सुखाचा कंद ।
जर्डी नसताही हर्ष खेद । सुख तेथें नसे ॥ ९० ॥
त्यामुळे सुषुप्तीमध्ये निजानंद असतो. तो वृत्तिरहित असा सुखाचा कंदच असतो. तसे जडामध्ये हर्ष आणि खेद नसतात तसेच सुखही नसते. (७९०)

तथापि सुख आहेच ह्मणसी । तरी कोण पावे तया सुखाली ।
मिळणी होतां सुख समरसीं । जीव हा सुखी होय ॥ ९१ ॥
तरीसुद्धा तू जडामध्ये सुख आहेच असे म्हणत असशील तर ते सुख कोणाला मिळते ? कारण जीव सुखात मिळाला म्हणजे तो सुखी होतो. (७९१)

हा अनुभव सर्वत्रांचा । सुखीच विश्रामती साचा ।
उत्थानी बोलताति वाचा । कीं काय हो सुखी होतों ॥ ९२ ॥
सुखातच सर्वांना विश्रांती मिळते, हा सर्वांचा अनुभव आहे. सर्वच झोपेतून उठल्यावर म्हणतात, ' 'काय हो, मी किती सुखात होतो !'' (७९२)

जरी कोणे बळे उठविलें । तें वैरियापरी वाटतें जाले ।
आहा महन्मुख होतें ते गेलें । तेव्हां तळमळी ॥ ९३॥
जर कोणी झोपेतून बळेच उठविले तर तो उठवणारा त्यास वैऱ्यासारखा वाटतो, आपले मोठे सुख गेले म्हणून तो तळमळतो. (७९३)

उठलिया क्षणभरी । त्या सुखाचि येतसे लहरी ।
पुढें मग येतसे जागरीं । हळूहळू व्यापारा ॥ ९४ ॥
उठल्यानंतरसुद्धा काही क्षणभर त्याला त्या सुखाच्या लहरी येतात. मग पुढे तो जागृतीत येतो आणि हळूहळू व्यापारांना सुरुवात करतो. (७९४)

आहेपणा तेथें सुख असे । मानिलें जें तुवा मानसे ।
परी जेथें विकार हा उमसे । सुखदु खाचा ॥ ९५ ॥
तू आहेपणा जेथे आहे. तेथे सुख आहे असे मनाने मानतोस, पण हा सुखदुःखाचा विकार जेथे उमटतो, (७९५)

तेथें आनंद हा लोपत । सुखदु खेचि होऊनि निद्यांत ।
मग असो कोणतीही वस्तुजात । जड कीं चेतन ॥ ९६ ॥
तेथे आनद लोप पावतो. कारण वस्तू जड असो की चेतन, तेथे सुखदु खे निर्माण होतात. त्यामुळे तेथील आनंद लोप पावतो. (७९६)

जैसे विकार सुयुसीमार्जी । सुखदुःखरूप नसती हुजी ।
केवळ निजसुखचि सहजी । असे तैसें आहे ॥ ९७ ॥
सुषुप्तीमध्ये सुखदुःखरूप दुसरे विकार नसतात, केवळ निजसुखच असते. ते जसे असायला पाहिजे तसे असते. (७९७)

आणीक येक करिसी कल्पना । दारयादि असली सुखसाधना ।
परी ते आरंभी मात्र वृत्तीचे ग्रहणा । होय कीं मी येक सुखी ॥ ९८ ॥
तू आणखी कल्पना करत असशील की, शय्यादी साधने सुख मिळण्यास कारणीभूत असतील, पण ती साधने प्रथम वृत्तीस मी सुखी आहे असे मानण्यास उपयोगी पडतात. (७९८)

परी गाढ जेव्हां झोप लागली । मग त्या सर्वा वृत्ति विसरली ।
येका निजसुखी मिळणी जाली । तेव्हां वारयादि सुख कैचे ॥ ९९ ॥
परतु गाढ झोप लागत्यानंतर त्या वृत्तीला त्या सर्व साधनांचा विसर पडतो. मुख्य अशा एका निजसुखाची प्राप्ती झाल्यावर शय्यादी साधनांमध्ये काय सुख असेल ? (७९९)

हें असो मृद आस्तरणे । झोप येतां कठिणही न लळा ।
जेथें पाहिजे तेथें पडणें । विश्रांति घ्यावया ॥ ८०० ॥
झोप आल्यावर कठीण आणि मृदु अथरूण न म्हणता (असा विचार न करता) विश्रांती घेण्यासाठी जेथे पाहिजे तेथे तो पडतो. (८००)

तस्मात कांहीं साधनाविण । सुमुसिसुख असे गहन ।
अमुक येक प्रयोजन । पाहिजे ऐसें नाहीं ॥ १ ॥
त्यामुळे गाढ झोपेचे सुख काही साधनांवर अवलंबून नसते, त्याला अमुक एक निमित्त पाहिजेच असे नाही. (८०१)

जैसी पतिसंगे पतिव्रता । सुखैक भोगितसे तत्त्वतां ।
व्यापार सर्वही नेणता । बहिरंतरींचे ॥ २ ॥
ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री पतीच्या सान्निध्यात असताना घरातले अथवा घराबाहेरचे व्यापार विसरते आणि एकमेव सुख भोगत असते. (८०२)

घरधंदा हे बहिर्व्यापार । आंतील तांबूलादि शृंगार ।
या दोहींचाही पडे विसर । मैथुनकाळीं ॥ ३ ॥
त्यावेळी घरधंदा इ. बाहेरची कामे, शय्याकक्षातील तांबूल इ. शृंगार या दोहोंचा मैधुनकाळात तिला विसर पडतो. (८०३)

तैसा जागतीचा व्यापार वृत्तीनें । आणि स्वप्नींचाही भास नेणें ।
येक आल्पसुखी समरस । त्यागून द्वैता ॥ ४ ॥
त्याप्रमाणे सुमुप्तीच्या काळात माणूस वृत्तीने जागृतीचा आणि स्वप्नकाळातील व्यापार जाणत नाही. तो सर्व द्वैतभाव सोडून एका आत्मसुखात समरस होतो. (८०४)

मैथुनकाळीं कामिनीसी । अंतर्बहिर्नेणवे शब्दासी ।
तेवीं आलिंगन पडे वृत्तीली । स्वप्न जागर न स्मरे ॥ ५ ॥
मैथनुकाळात पतिव्रता कामिनी आतील अथवा बाहेरील शब्द जाणत नाही. त्याप्रमाणे सुपुप्तिकाळात वृत्तीला स्वप्न अथवा जागृती यांची आठवण होत नाही. (८०५)

हेंही बोलणें हैताचे । सुघुप्तींत सुखग्रहण तरी कैचे ।
येक निवर्तन नव्हे नेणिवेचें । ह्यणोनि बोलावे ॥ ६ ॥
अर्थात हेही बोलणे द्वैताचेच होते. सुधुमीत सुखाचा भोग तरी कसा म्हणता येईल ? केवळ त्या अवस्थेत नेणीव नाहीशी होत नाही म्हणून सुखाची भाषा करावी लागते. (८०६)

असो रविदत्ता या निरोपणीं । सावध असी कीं अंतःकरणीं ।
अस्ति भाति प्रियत्व तिन्ही । सुपुसति आले ॥ ७ ॥
रविदत्ता, हे निरूपण तू लक्षपूर्वक ऐकतो आहेस ना ? जागृती, स्वप्न या अवस्थांतील अस्ति, याति आणि प्रियता ही लक्षणे सुषुप्तीत आली. (८०७)

स्वप्न जागति दोन्ही नसती । भाति प्रियताही मावळती ।
तरी त्या अवस्था सत्य होती । कोणे काळी तरी ॥ ८ ॥
सुषुप्तीत स्वप्न आणि जागृती या दोन्ही अवस्था नसतात, त्यांची भाति, प्रियता ही लक्षणेही लोप पावतात. नाहीतर त्या दोन अवस्था कधी तरी सत्य ठरल्या असत्या. (८०८)

तस्मात् जागति स्वप्न असतां । उभयांसीही न ये सत्यता ।
अस्तित्वेवीण भाति प्रियता । असे कवणासी ॥ ९ ॥
त्यामुळे जागृती आणि स्वप्न अवस्था असताना त्या दोन्ही लक्षणांना सत्यता येत नाही. कारण अस्तित्वावाचून भाति आणि प्रियता कशाला असतील ? (८०९)

समेच जरी आहेसे मानिलें । तरी काय तेथें सत्यत्व आलें ।
वृक्षस्थे पडिलिया जरी देखिले । तरी काय जळी खरा ॥ १० ॥
श्रमाने जरी ही लक्षणे तेथे आहेत असे मानले तरी तेवड्याने तेथे सत्यता (सत्ता, अस्तित्व) येईल काय ? वृक्षस्थ माणसाने पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहिले तरी काय पाण्यात ते खरे होते काय ? (८१०)

डोळे झांकितां पडिला न दिसे । तेव्हां मावळून वृक्षस्थीं समरसे ।
मा पाहतां काय जळी असे । खरा पडिला ॥ ११ ॥
डोळे झाकल्यावर पाण्यात पडलेला दिसणार नाही. त्यावेळी त्याचा लोप होऊन तो वृक्षस्थामध्ये समरसून जातो. मग डोळ्याने पाहू लागत्यावर पाण्यात पडलेला खरा होतो काय ? (८११)

तैसी जागति स्वप्नव्यापारा । सत्यता न ये सुप्तीमाझारा ।
मा असतां काय हा भास खरा । सत्यत्वे जाला ॥ १२ ॥
त्याप्रमाणे जागृती आणि स्वप्न व्यापारांना सुषुप्तीमध्ये सत्यत्व नसते. पण ते (सत्यत्व) असते तरी त्यामुळे काय हा भास खरा ठरतो काय ? (८१२)

हे असो स्वप्नजागृति । जालीच नाहीं ना होणार पुढती ।
तरी काय वास्तविक हे सुपुसि । होईल तिही कार्ली ॥ १३ ॥
हे राहू दे. स्वप्न आणि जागृती या दोन्ही झाल्याच नाहीत आणि पुढेही होणार नाहीत. तरी ही सुषुप्ती तेवढी तिन्ही काळी सत्य होणार आहे काय ? (८१३)

कार्य जें का प्रत्यक्ष दिसलें । तें विवेकें मिथ्या केलें ।
मा त्याचें कारण जें अनुमानिलें । तें सत्य कैसे ॥ १४ ॥
जे प्रत्यक्ष दिसले ते कार्य विचाराने मिथ्या ठरविले, मग त्याचे अनुमानित कारण सत्य कसे होईल ? (८१४)

कारण अज्ञान तो निःशेष नसे । कार्यामुळे मानिजे आहेसे ।
तें कार्यचि जालिया वायसे । तरी कारण तें कोठे ॥ १५ ॥
कारण अज्ञान हे निश्चितपणे नाही. केवळ कार्यावरून ते आहे, असे मानावे लागते. पण ते कार्यच जर मिथ्या ठरले तर कारण कसे सत्य ठरेल ? (८१५)

देहादिकां आपणसें मानिलें । तेव्हां जाणावे विस्मरण आपुले ।
त्या देहहुयाचे मीपण त्यागिलें । तरी उरे केवी अज्ञान ॥ १६ ॥
ज्यावेळी आपण देह इत्यादींना मी म्हणून स्वीकारतो, तेव्हा हे समजावे की आपण आपल्याला विसरलो. या दोन्ही देहांबद्दलच्या मीपणाचा त्याग केला तर अज्ञान कसे शितुक राहील ? (८१६)

जळी पडिलाचि नाहीं खरा । तरी नेणपणासी कैचा थारा ।
तेवीं मिथ्यात्व येतां उभय व्यापारा । अज्ञान नाहींच नाहीं ॥ १७ ॥
मुळात पाण्यातच पडला नाही तर अज्ञानाला कशाचा आधार मिळेल ? त्याप्रमाणे या दोन्ही व्यापाराना मिथ्या ठरवले, तर अज्ञान नाहीच असे निष्पन्न होईल. (८१७)

परी सत्य आपण नेणिवेपरता । वृत्तीस कळावे अपरोक्षता ।
तेव्हांचि हे देहहुय असतां । मिथ्या स्कूरती ॥ १८ ॥
तर आपण अज्ञानापेक्षा भिन्न असे सत्य आहोत. हे वृत्तीस अपरोक्षत्वाने (प्रत्यक्षपणे) कळावे. म्हणजे हे दोन देह असले तरी मिथ्या आहेत असे ज्ञान होईल. (८१८)

जरी गुरु शास्त्राचे वचनीं । मिंध्या मानिलें विश्वास ठेवूनी ।
तरी तें नव्हे मिथ्या असोनी । स्वानुभवावीण ॥ १९ ॥
जरी गुरू शास्त्र यांच्या वचनांवर विश्वास ठेवून आपण त्यांना मिथ्या मानले, तरी ते मिथ्या असूनसुद्धा प्रत्यक्ष स्वतःच्या अनुभवावाचून ते खरे मिथ्या ठरत नाहीत. (८१९)

तो स्वानुभव जागतींत यावा । आपण निजाल्पा हा प्रत्यय व्हावा ।
तरीच देहाचा मीपणा जावा । निपटूनियां ॥ २० ॥
तो स्वतःचा अनुभव जागृतीत यावा, आपणच आत्मा आहोत असा प्रत्यय यावा, तरच देहाचा मीपणा नि: शेष जाईल. (८२०)

तें निरोपण पुढें तुज । कीजेल तया रीती समज ।
येथें बोलिलें असे सहज । सत्य मिथ्या कळावया ॥ २१ ॥
ते निरूपण तुझ्यापुढे नंतर करूच, त्यावेळी ते समजून घे. येथे केवळ सत्य आणि मिथ्या तुला कळावे म्हणून सहज सांगितले आहे. (८२१)

तिही काळी जें येकरूप आहे । तो आल्या सत्य विवेकें पाहे ।
केव्हां असे केव्हां न राहे । तें तें मिथ्या अनाल्पा ॥ २२ ॥
तिन्ही काळी जे एकरूप आहे तोच आत्मा आहे असे विचार करून ठरव. कधी आहे, कधी नाही असे जे असेल ते मिथ्या अनात्मा आहे, असे समज. (८२२)

जागतीमाजी जागति खरी । तेव्हां स्वप्न झोप नसोनि निर्धारी ।
सुसि जागर स्वप्नामाझारी । मावळून जाती ॥ २३ ॥
जागृतीमध्ये जागृती खरी वाटते. त्यावेळी स्वप्न आणि सुपुसी निश्चितपणे नसतात आणि स्वप्नदशेमध्ये सुपी आणि जागृती मावळून जातात. (८२३)

सुसीमाजीं स्वप्नजागति । निःशेषच हरपून जाती ।
तस्मात् येक होतां दोन्ही मावळती । म्हणोनि अवस्था मिथ्या ॥ २४ ॥
सुप्तीमध्ये स्वप्न आणि जागृती पूर्णपणे हरवून जातात, त्यामुळे एक असताना दोन मावळून जातात. म्हणून त्या अवस्था मिथ्या म्हणून समजाव्यात. (८२४)

आत्मा जो अस्ति भाति प्रिय । तिही अवस्थेंत एकला अहुय ।
तस्मात् सत्य आत्या हा निश्चय । विवेकें निवडावा ॥ २५ ॥
आत्मा हा अस्ति, भाति, प्रिय या लक्षणांनी युक्त आहे. तो तिन्ही अवस्थांमध्ये एकमेव आणि अद्वितीय असतो. त्यामुळे आत्मा हा सत्य आहे हे निश्चित ठरते. तो विवेकाने सत्य म्हणून स्वीकारावा. (८२५)

एव असल्लडदुःखरूप अनात्मा । वृत्यादि देहान्स भास जीवात्मा ।
आणि येक मुख्य ब्रह्मप्रत्यगात्मा । अस्ति भाति प्रियात्मक ॥ २६ ॥
अशा प्रकारे आल्यावाचून इतर सर्व असच्चड दुःखात्मक पदार्थ हे अनात्म ठरतात. वृत्तीपासून ते देहापर्यंत जीवात्मा आभासरूपाने वावरत असतो. आणि प्रत्यगात्मा हाच मुख्य ब्रह्म असून तो अस्ति, भाति, प्रिय या लक्षणांनी युक्त आहे. (८२६)

ऐसे सत्य मिथ्या दोन्ही । यथार्थ निवडिले निरूपणी ।
हेचि विवेचन मुमुक्षूंनी । अत्यादरें करावें ॥ २७ ॥
अशा तऱ्हेने या निरूपणात सत्य आणि मिथ्या हे वेगळेवेगळे स्पष्ट केले. याचेच विवेचन (मनात चिंतन) मुमुक्षूंनी अतिशय आदराने करावे. (८२७)

येथेंही रविदत्ता कोणाची । आशंका असे मंदप्रज्ञाची ।
तेचि अवधारीं आधीं साची । पुढे उत्तर बोल- ॥ २८ ॥
या संदर्भात, हे रविदत्ता, कोणा मंदप्रज्ञाची एक आशंका आहे. ती आधी ऐकून घे. मग पुढे उत्तर सागू (८२८)

दोनचि पदार्थ निवडिले । सत्य मिथ्या हे वेगळाले ।
या डोहींतून अज्ञान जाले । तेंचि कवणा ॥ २९ ॥
तुम्ही दोन पदार्थ सत्य आणि मिथ्या असे वेगळेवेगळे करून सांगितलेत. या दोहोंपैकी अज्ञान कुणाला होते ? (८२९)

दृष्टांतही जो दिधला । जळी बुडे आणि वृक्षी बैसला ।
हेही दोनचि परी विस्मर जाला । वृक्षी बैसणारा ॥ ३० ॥
या संदर्भात जो दृष्टान्त दिलात त्यातही वृक्षावर बसलेला आणि पाण्यात पडलेला अशी दोनच माणसे निवडलीत. त्यापैकी जो वृक्षावर बसलेला होता तोच स्वतःला विसरला. (८३०)

जळी पडला तो नाहींच खरा । तेथें भाव नसे स्मरविस्मरा ।
तस्मात् वृक्षी जयासी असे थारा । तोचि विसरला आपणा ॥ ३१ ॥
जळात पडलेला खरा नाहीच. त्यामुळे त्याच्या ठिकाणी स्मरण आणि विस्मरण यांना अस्तित्वच नाही. त्यामुळे वृक्षावर जो बसलेला होता तोच स्वतःला विसरला. (८३१)

तैसें स्थूलादि तो हें जड असे । वृत्यादि चंचल पाणियाऐसें ।
त्यांत प्रतिबिंब जीव हा आभासे । हें तरी मिथ्या ॥ ३२ ॥
त्याप्रमाणे स्थूल इ. हे जड आहे. वृत्ती इ. चंचल पाण्यासारख्या आहेत. त्यात जीव हा प्रतिबिंबाप्रमाणे भासमान आहे. (तो केवळ आभासरूप आहे) त्यामुळे तो मिथ्याच आहे. (८३२)

तयासी जाणणें कोठे खरें । कीं तो मुख्य जात्यया विसरे ।
तस्मात् मुख्य आत्मा जो निर्विकारें । तयासीच अज्ञान ॥ ३३ ॥
त्याचे जाणणे खरे नाही. त्यामुळे तो मुख्य आत्म्याला विसरतो असे म्हणता येत नाही. त्यामुळे निर्विकारी असा जो मुख्य आत्मा त्यालाच अज्ञान झाले. (८३३)

आल्या आपआपणा विसरला । जीवाकडे पाहूं लागला ।
त्यासीच मी ह्मणून बैसला । तस्मात् अज्ञान आत्मा ॥ ३४ ॥
आत्मा स्वतःला विसरला आणि जीवाकडे पाहू लागला तो त्यालाच आपण (मी) समजला. त्यामुळे आत्मा हाच अज्ञानी ठरतो. (८३४)

ऐशी मंदप्रज्ञाची आशंका । येणे निर्विकारा आला झोका ।
तरी याचें उत्तर सावध ऐका । जे जे श्रवणार्थी ॥ ३५ ॥
ही मंदप्रज्ञाची शंका आहे. त्या शंकेमुळे आत्म्याच्या निर्विकारित्वाला बाधा येते. तेव्हा जे श्रवणार्थी आहेत, त्यांनी याचे उत्तर आता ऐकावे. (८३५)

हें निरूपण उपक्रमी । प्रांजळ केलें असे आह्मी ।
तथापि हा संशय अंतर्यामी । फिटावया बोल- ॥ ३६ ॥
या संदर्भातले निरूपण आम्ही प्रारंभीच्या भागात केले होते. वाढू. १७० - १७५). तथापि मनातील संशय फिटण्यासाठी ते पुन्हा सांगतो. (८३६)

वृक्षी बैसलिया जाली विस्मृति । हे सत्य परी पहावी पुरती ।
पहिली सर्वांगदेखणी दशा होती । नेत्र झांकितां कीं उघडितां ॥ ३७ ॥
वृक्षावर बसलेल्या पुरुषाला विस्मृती झाली होती हे सत्य आहे. परंतु त्याच्या हकीगतीचा पूर्ण विचार करावा. त्याची सर्वांगदेखणी दशा डोळे उघडल्यावर होती की डोळे मिटत्यावर ? (८३७)

आंधारी आपआपणा । प्रत्यक्ष जरी दिसेना ।
परी नखशिखांत असे देखणा । हा मी म्हणोनी ॥ ३८ ॥
काळोखात आपण आपत्त्याला प्रत्यक्ष दिसत नसलो तरी आपण आपल्या नखापासून ते शिखेपर्यंत (शेंडीपर्यंत) 'हा मी आहे ' म्हणून जाणत असतो. (८३८)

ऐसिया सामान्य देखणिया । विशेष देखणेंही बोलणें वाया ।
तेथें विस्मरण पडलें कैसिया । परी सांगा ॥ ३९ ॥
अशा सामान्य देखणेपणाला (पाहणाऱ्याच्या ठिकाणी) विशेष पाहणे असे म्हणता येत नाही. त्याबाबतीत विस्मरण कसे होईल, ते सांग. (८३९)

सामान्य नखशिख जो देखता । तेथें नेत्र उघडोनि जाहला पाहता ।
तेंचि येकदेशी पाहणे खासुता । मुख्य सामान्य हें नव्हे ॥ ४० ॥
जो सामान्यपणे पायाच्या नखापासून ते शेंडीपर्यंत संपूर्णपणे पाहतो, तोच डोळे उघडून पाहतो तेव्हा ते विशेष पाहणे होते. ते पाहणे एकदेशी (मर्यादित पाहणे) असते. मुख्य सामान्य पाहणे असे एकदेशी नाही. (८४०)

ऐसें एकदेशी पाहणे उद्भवले । तया पाहण्यासी विस्मरण जाहले ।
हे दोन्हीही असती नाथिले । पुरुषाच्या ठाई ॥ ४१ ॥
असे जे एकदेशी पाहणे जे निर्माण झाले, त्या पाहण्यालाच विस्मरण झाले. परंतु स्मरण आणि विस्मरण ही दोन्हीही पुरुषाच्या ठिकाणी खोटी आहेत. (८४१)

ऐसें एकदेशी जरी पाहतसे । परी बैसला त्याचें विस्मरण नसे ।
विसरे तरी मुंगी कळतसे । स्पर्शतां ते कवणा ॥ ४२ ॥
तो पुरुष एकदेशी पाहत असला तरी त्याला वृक्षावर बसलेल्या स्वतःचे विस्मरण नसते. विस्मरण झाले असे म्हणावे तर मुंगी चावत्यावर कोणाला कळते ? (८४२)

मी पडलो मज काढा ह्मणे । विसरे तरी केवी होय बोलणें ।
तस्मात् सर्वांगी जें असे देखणे । तया लोप नाहीं ॥ ४३ ॥
'मी पडलो, मला काढा' अशा प्रकारचे बोलणे विसरल्यानंतर कसे शक्य होईल ? त्यामुळे सर्वांगाचे पाहणे (सर्वांगाची जाणीव असणे) जे असते, त्याचा लोप कधी होत नाही. (८४३)

तस्मात् सामान्य देखणे दशेसी । विकार नव्हे निशयेसी ।
आणि जळी ही पडलियासी । स्मर ना विस्मर ॥ ४४ ॥
त्यामुळे सामान्य देखण्या दला निश्चितपणे विकार नसतो. त्याप्रमाणेच पाण्यात पडलेल्यालाही स्मरण आणि विस्मरण होत नाहीत. (८४४)

मध्येंच तिसरे जाले उत्पन्न । तेंचि कीं पडणारासी कारण ।
हाचि दृष्टान्त तेवी दार्ष्टान्स समान । विचारे पहावा ॥ ४५ ॥
मध्येच तिसरे उत्पन्न झाले तेच पडणारास कारण आहे. हाच दृष्टांत दार्ष्टान्तिकासही कसा लागू होतो ते विचारपूर्वक पहावे. (८४५)

किंचित- वृत्तीचे स्फुरण नसता । वृत्ति अभावाचा जो जाणता ।
तेथें ज्ञानकी अज्ञान वार्ता । लावी कवणा ॥ ४६ ॥
वृत्तीचे अजिबात स्फुरण झाले नसता वृत्तीचा अभाव ज्याला कळतो, त्याच्या ठिकाणी सज्ञान अज्ञान अशी विशेषणे कशी लावता येतील ? (८४६)

तेथें न होऊन स्फुरण जाले । जैसे रस्तूवरी सर्प उमटले ।
तेचि माया तये नाथिले । पण अनादि ॥ ४७ ॥
त्याच्या ठिकाणी न होऊन (खोटे) स्फुरण झाले. तीच माया होय. दोरीच्या जागी सर्प दिसू लागला तसाच हा प्रकार. तीच माया होय तिचे खोटेपण अनादी असते. (८४७)

निर्विकार जो सामान्य देखणा । जैसा तैसा परिपूर्णपणा ।
त्या अनंतरूपीं माया स्फुरणा । उद्धव जाला ॥ ४८ ॥
जो निर्विकार आहे, सामान्य द्रष्टा आहे, जसा आहे तसा परिपूर्ण आहे, अनंत आहे, त्याच्या ठिकाणी मायेच्या स्फुरणाची निर्मिती झाली. ते अर्थातच नाथिले म्हणजे खोटे, पण अनादी आहे. (८४८)

जितुकें स्वरूप सरिचदघन । तितुके जरी होतें स्फुरण ।
तरी हें स्वरूपाचें लक्षण । म्हणो येतें ॥ ४९ ॥
सच्चिरून पूर्ण ब्रह्माची जेवढी व्याप्ती आहे, तेवढी जरी त्या स्फुरणाची व्याप्ती असती तरी ते स्वरूपाचे लक्षण म्हणून मान्य केले असते. (८४९)

समुद्रामध्ये जैशी राई । इतुकी स्फूर्तीची असे नवाई ।
तेही वंध्यापुत्राची आई । जाहली ना होणार पुढे ॥ ५० ॥
परंतु समुद्रामध्ये राईचा कण जसा दिसेल, तेवढीच त्या स्फूर्तीची व्याप्ती आहे आणि तेवढी असूनही ती वंध्यापुत्राची आईच शोभेल, जी कधी झाली नाही आणि पुढे होणारही नाही. (८५०)

एकेकाहून दशगुणें वाड । ससावरणाल्पक हे ब्रह्मांड ।
येवढें विस्तीर्ण तें असे झाड । या माया बीजाचे ॥ ५१ ॥
एकाहून एक दसपट मोठे असलेल्या सात आवरणांचे हे ब्रह्मांड बनलेले आहे. तेवढे विस्तीर्ण असे त्या मायाबीजाचे झाड आहे. (८५१)

येवढी विस्तीर्ण जे पृथ्वी । उदकाचे एकदेशीं जाणावी ।
तिच्याही दशगुणें वोळखावी । ब्रह्मांडरचना ॥ ५२ ॥
एवढी विस्तीर्ण अशी जी वृद्धी आहे ती तिच्याभोवती असलेल्या पाण्याच्या केवळ एका प्रदेशाइतकी आहे. तिच्याही दसपट या ब्रह्मांडाची रचना आहे. (८५२)

त्यामाजीं स्वर्ग मृत्यू पाताळ । वसिन्नले हे सकळ ।
अवघा मिळून हा भूगोल । सप्तद्वीप असे ॥ ५३ ॥
त्यामध्ये स्वर्ग, मृत्यू पाताळ या सर्व लोकांची वसाहत आहे. सर्व मिळून हा भूगोल सात द्वीपांचा बनलेला आहे. (८५३)

त्या द्वीपामाजीं जंबुद्वीप । त्यांत नवखंडें अल्प अल्प ।
त्यांत भरतखंडामाजीं जल्प । नाना ग्रामें धुरे ॥ ५४ ॥
त्या द्वीपांमध्ये एक जंबुद्रीप आहे. त्यात लहान लहान अशी नऊ खडे आहेत. त्यातील भरतखंडामध्ये निरनिराळी गावे आणि शहरे आहेत. (८५४)

त्यांत एका ग्रामीं एक घर । त्या घरायेवढेंही नाहीं शरीर ।
तया शरीरी उमटला प्रकार । स्कूर्तिविकाराचा ॥ ५५ ॥
त्यात एका गावामध्ये एक घर आहे. त्या घराएवढेही नाही असे हे शरीर आहे. त्या शरीरात हा स्कूर्तिविकाराचा प्रकार उमटतो. (८५५)

हें असो देह मानवाचा । परी अत्यंत सान जो कीटकाचा ।
त्यांतही विकार हा वृत्तीचा । उमटे इतुकाचि ॥ ५६ ॥
हे राहू द्या, हा मानवाचा देह होता. पण कीटकाचा देह अत्यंत लहान असतो. त्यातही या वृत्तीचा विकार एवढाच उमटतो. (८५६)

एव स्फूर्ति ब्रह्मादिकांपासून । कटिकान्स विभागली संपूर्ण ।
तितुक्याचि देहासी मी ह्मणून । बैसली असे ॥ ५७ ॥
अशा प्रकारे ती स्फूर्ती ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत संपूर्णपणे विभागली गेली आहे. त्या सर्व देहांना ती 'मी' म्हणून बसली आहे. (८५७)

एव स्फूर्तीचा सानपणा ऐसा । स्वरूपाचे एकदेशीं अल्पसा ।
तेथेंचि ज्ञानाज्ञानाचा ठसा । उमटला असे ॥ ५८ ॥
अशा प्रकारे वृत्तीचा लहानपणा असा की तिने स्वरूपाचा केवळ एक छोटासा भाग व्यापून टाकला आहे. तेथेच ज्ञान- अज्ञानाचा ठसा उमटला आहे. (८५८)

ब्रह्मात्ययाचे स्वरूप केव्हडे । कीं जयाच्या एके देशी ब्रह्मांडे ।
आकाशही जेथें बापुडे । समुद्री राई ॥ ५९ ॥
याउलट ब्रह्मात्म्याचे स्वरूप एवढे व्यापक आहे की, त्याच्या एका भागात अनेक ब्रह्मांडे राहतात. तेथे आकाश बापडे समुद्रातील मोहरीएवढे आहे. (८५९)

जयाचा अंतचि नलगे किती । शेवटचि नाहीं जयाप्रति ।
परी समजावा दृष्टान्सी । कांहींसे आकाश ॥ ६० ॥
ब्रह्मात्म्याचा अंतच लागत नाही. त्याला शेवटच नाही. केवळ समजण्यासाठी आकाशाचा दृष्टान्त दिला आहे. (८६०)

आकाशाचाही अंत न लगे । तैसाचि ब्रह्माला निजांर्गे ।
गगनावीण नसती रिते जागे । तेवीं आत्या सधन ॥ ६१ ॥
आकाशाचाही अंत लागत नाही. ब्रह्मात्माही अगदी तसाच आहे. आकाशावाचून एकही रिकामी जागा नाही. त्याचप्रमाणे आत्माही सर्वत्र दाटून भरलेला आहे. (८६१)

परी आत्या असे ज्ञानघन । आकाश शब्दगुणी अज्ञान ।
म्हणोनि भेद हा भिन्न भिन्न । स्वरूप गगनाचा ॥ ६२ ॥
पण आत्मा निखळ ज्ञानाने परिपूर्ण आहे. आकाशाचा शब्द हा गुण आहे. पण ते अज्ञानयुक्त आहे म्हणून आकाश आणि स्वरूप यांमध्ये खूप फरक आहे. (८६२)

आकाशी पोकळपणा वसे । स्वरूप सधन भरले असे ।
आकाश अवकाशरूप भासे । निराभास ब्रह्म ॥ ६३ ॥
आकाशात पोकळी असते. पण स्वरूप मात्र दाट भरलेले आहे. आकाश अवकाशरूप भासते. ब्रह्माच्या ठिकाणी आभास नसतो. (८६३)

परी आकाशाचा पोकळपणा । वाउगी करीतसे कल्पना ।
दृष्टीली बैसले पदार्थ नाना । ते ते घन वाटती ॥ ६४ ॥
आकाशाचा पोकळपणा ही एक व्यर्थ कल्पना आहे. कारण आपल्या दृष्टीला जे वेगवेगळे पदार्थ दिसतात ते ते घन वाटतात. (म्हणून आपण आकाशाला पोकळ मानतो.) (८६४)

इकडे तिकडे पदार्थ असे । मध्ये भावी कांही नसे ।
उगाचि पोकळपणा दिसे । परी तें पोकळ न म्हणावें ॥ ६५ ॥
या बाजूला, त्या बाजूला पदार्थ असले, म्हणजे मध्ये काही नाही अशी आपण कल्पना करतो. त्या अवकाशातच आपल्याला पोकळपणा जाणवतो. पण खरे पाहता आकाशाला पोकळ म्हणू नये. (८६५)

आकाश जरी कोठे नसावे । तरी पोकळ ऐसें म्हणो यावें ।
सर्वव्यापक असतां स्वभावें । अवकाश कैचा ॥ ६६ ॥
आकाश जर कोठेच नसते तर त्याला पोकळ म्हणता आले असते. ते स्वभावाप्रमाणे सर्वव्यापक असत्यामुळे त्यात अवकाश कसा असेल ? (८६६)

तस्मात् आकाशही व्यापक पूर्ण । तैसाचि ब्रह्माल्पा सधन ।
दोहींचा अंत पाहणे । कवणा न घडे ॥ ६७ ॥
म्हणून आकाश व्यापक आणि पूर्ण आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मही सघन आहे. या दोहोंचाही अंत पाहणे कोणालाही शक्य नाही. (८६७)

आकाशी गड येक निर्मिला । त्यांतही अवकाश साठवला ।
बाहेरी तो किती अंत लागला । न वचे कवणा ॥ ६८ ॥
आकाशात एक किट्रा बांधला, त्यातही काही अवकाश साठवला जातो. त्या किल्ल्याच्या बाहेर किती अवकाश आहे याचा अंत कोणालाही लागत नाही. (८६८)

तैसाचि ब्रह्माल्पा परिपूर्ण । त्यामाजी ब्रह्मांड झालें निर्माण ।
त्या ब्रह्माडी आत्या हा सधन । बाह्य तो अमर्याद ॥ ६९ ॥
त्याचप्रमाणे ब्रह्मात्मा हा परिपूर्ण असून त्यामध्ये ब्रह्मांड निर्माण झाले आहे. त्या ब्रह्मांडात आत्मा घनदाट भरला आहे. त्याच्या बाहेर तर तो अमर्याद पसरला आहे. (८६९)

मठउपाधीमुळें ना । औत बाहेरी जाहली कल्पना ।
गगनामाजी गडाची रचना । तया मठीं आकाश ॥ ७० ॥
मठरूपी उपाधीमुळे आकाशाच्या बाबतीत आत आणि बाहेर या कल्पना निर्माण झाल्या. आकाशात मठाची रचना केली. त्या मठात आकाश साठवलेले आहे. (८७०)

तैशीच ब्रह्मांड उपाधि जाहली । त्यास्तव अंतर्बाह्य कल्पना केली ।
ब्रह्मी ब्रह्मांडरचना उद्भवली । ब्रह्मांडी ब्रह्म ॥ ७१ ॥
त्याप्रमाणेच ब्रह्मांड ही ब्रह्माची उपाधी झाली असून त्यामुळे आत बाहेर अशी कल्पना झाली. ब्रह्मामध्ये ब्रह्मांडाची रचना झाली आणि त्या ब्रह्मांडामध्येही ब्रह्म भरून राहिले आहे. (८७१)

मठामाजीं घट भिन्न भिन्न । त्या घटा आंत बाहेर गगन ।
आकाशामार्जी घट तोही पूर्ण । गगने भरिला ॥ ७२ ॥
मठामध्ये भिन्न भिन्न घट आहेत. त्या घटाच्या आत बाहेर आकाश व्यापलेले आहे. आकाशात असलेला घटही आकाशाने पूर्ण भरलेला आहे. (८७२)

तैसे ब्रह्मांर्डी नाना पिंड । त्या औत बाहेरी आत्मा वाड ।
आत्ययामाजी देहाचा पवाड । कीं देही आत्मा ॥ ७३ ॥
त्याप्रमाणे ब्रह्मांडात निरनिराळे पिंड असतात.' त्यांच्या आतबाहेर आत्मा दाटपणे भरलेला आहे. आत्म्यामध्ये देहाचा विस्तार आहे तसाच देहामध्येही आत्मा भरलेला आहे. (८७३)

जो ब्रह्मांडीं तोचि पिडी असे । येकचि घटीं मठीही आकाश जैसे ।
राईसम स्थळ रिते नसे । आत्मया गगनाविण ॥ ७४ ॥
जो ब्रह्मांडात आहे तोच आत्मा पिंडातही आहे. एकाच घटात किंवा मठातही आकाश तसेच भरलेले आहे. आकाशाला काय किंवा आत्म्याला काय एका मोहरी एवढीही जागा रिकामी राहिलेली नाही. (८७४)

पाहे पाहे रविदत्ता येवढा । आत्या सघन पूर्ण उघडा ।
त्यांत देहाचा साकार बापुडा । त्यामाजीं ते स्कूर्ति ॥ ७५ ॥
रविदत्ता, असे पहा की, आत्मा एवढा मोठा सघन, पूर्ण आणि उघडा असून त्यात देहाचा एवढासा आकार, त्यातही ती स्फूर्ती. (८७५)

इतुकी सानसी हे वृत्ति । सर्व जगातें जाली कल्पिती ।
म्हणोनि हेचि कारण सर्वांप्रती । इसीच माया हें नाम ॥ ७६ ॥
इतकी स्फूर्ती लहान आहे. तरी सुद्धा ती सगळ्या जगाची कल्पना करते. म्हणून ती सगळ्या पदार्थांच्या उत्पत्तीचे कारण आहे. हिलाच माया हे नाव आहे. (८७६)

इला सानपणा तरी येवढा । परी उठता गवसणी घाली ब्रह्मांडा ।
परंतु ब्रह्माल्पा जो किती उघडा । इसी जाणवेना ॥ ७७ ॥
ती इतकी लहान आहे पण ती ब्रह्मांडाला गवसणी घालते. पण ब्रह्मात्मा, जो उघडा असूनदेखील तिला तो किती उघडा आहे हे जाणवत नाही. (८७७)

तो जाणे या स्कृरणासी । परी हे न जाणे बापुडी त्यासी ।
बुधिया आद्यमध्य अवसानासी । स्वप्रकाश जाणे ॥ ७८ ॥
तो या स्फुरणाला जाणतो, पण ही बापडी त्याला जाणत नाही. पण तो मात्र तिचा आद्य, मध्य आणि शेवट स्वतःच्या प्रकाशाने जाणतो. (८७८)

जेधवां हे उत्पन्न नव्हती । तेधवां स्वप्रकाश चिऱ्यर्ति ।
ज्ञान कीं अज्ञान नसता चित्तीं । स्वसंवेद्य असे ॥ ७९ ॥
जेव्हा ही माया (स्फूर्ती) उत्पन्न झाली नव्हती तेव्हा स्वयंप्रकाशित विमूर्ती असा ब्रह्मात्मा ज्ञान किंवा अज्ञाननिरपेक्ष, स्वसंवेद्य असा एकटाच असतो. (८७९)

तोचि अविनाश ज्ञानघन । आनंद अनंत परिपूर्ण ।
तयाचे यथार्थ केलें निरूपण । तुज यथामति मागा ॥ ८० ॥
तोच अविनाशी, ज्ञानघन, आनंदपरिपूर्ण, अनंत असा आहे. त्याचे तुला मागे यथार्थपणे आपल्या बुद्धीनुसार वर्णन करून सांगितले आहे. (८८०)

तो आल्याचि असे अज्ञान । मानीत असती मूर्ख जन ।
तयाचे व्हावया निरसन । बोलणें लागे ॥ ८१ ॥
असा तो आत्माच अज्ञानी आहे असे मूर्ख लोक मानत असतात. त्यांच्या या मताचे निरसन करण्यासाठी आता बोलावे लागते. (८८१)

ब्रह्मात्या कैसा किती केवढा । तयाचा साकत्ये जाला निवाडा ।
वृत्यादि देहान्स हा बापुडा । उद्धवही कळला ॥ ८२ ॥
ब्रह्मात्मा कसा आहे, किती मोठा आहे, याचा साकल्याने निवाडा झाला. वृत्तीपासून ते देहापर्यंत हा जो संघात आहे, त्याची उत्पत्तीही कळली. (८८२)

आतां ज्ञान अज्ञान हें कवणासी । बोलिजेत आहे निश्चयेसी ।
जें कां मायास्फुरण येकदेशी । तेथेचि हे दोन्ही ॥ ८३ ॥
आता ज्ञान आणि अज्ञान हे कोणाला असते, हे आता सांगतो. जे मायेचे एकदेशी स्फुरण असते. तिथेच हे दोन्हीही असतात. (८८३)

स्फुरण होतांचि हें सहजी । ब्रह्माल्पा व्यापून आला त्यामाजीं ।
तोचि जाणता आणि हे तुजी । स्फूर्ति चंचळ ॥ ८४ ॥
स्फुरण होताक्षणीच ब्रह्मात्मा त्या सर्वांमध्ये येऊन व्यापतो. तो जाणता असून, ही दुसरी स्फूर्ती चंचल आहे. (८८४)

सर्वांग जो असे देखणा । तो जाणेचि उठतो स्फुग्णा ।
परी त्या जाणणिया आणि चळणा । उत्पत्ति नाश आहे ॥ ८५ ॥
तो सर्वांगाने पाहणारा आहे. स्फुरण उद्भवले की तो त्याला जाणतो. पण त्याच्या या जाणण्याला आणि स्फुरणाच्या या चलनाला उत्पत्ती आणि नाश आहे. (८८५)

ह्मणोनि तें शबलब्रह्म ह्मणावें । प्रकृति पुरुष ही याची नावे ।
चंचलत्व तें प्रकृतिरूप जाणा । जाणणें तो पुरूष ॥ ८६ ॥
म्हणून त्याला शबल ब्रह्म असे म्हणतात आणि स्फूर्तीला चंचल म्हणतात. या दोहोंनाच अनुक्रमे पुरुष आणि प्रकृती असे म्हणतात. पुरुष हा जाणतो आणि प्रकृतीचे चंचलता हे रूप आहे. (८८६)

हेचि शिवशक्ति सविशेष । अर्धनारीनटेश्वर विशेष ।
या उभयांचा पन्;स्थरे संतोष । आणि साह्य येकमेकां ॥ ८७ ॥
यांनाच खास करून शिवशक्ती, अर्धनारीनटेश्वर असे म्हणतात. ही दोघे एकमेकांच्या सहवासात सुखी असतात. आणि एकमेकांना साहाय्य करतात. (८८७)

ऐशी द्विविध रूपें येक स्फूर्ति । ज्ञान अज्ञान आलें तिजप्रति ।
इकडे स्फुरणा जाणे सहजगति । हेंचि ज्ञान ॥ ८८ ॥
अशा प्रकारे एका स्फूर्तीची ही दोन रूपे होत. या स्कूर्तीच्याच ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान असतात. ती स्वाभाविकपणे स्फुरण निर्माण झाले की त्यास पाहते. हे ज्ञान होय. (८८८)

स्फुरणा इतुकेंचि जाणणें उठिले । तयासीच ज्ञान ऐसें बोलिलें ।
याविरहित जे पूर्ण सचले । तें जाणिलें नाहीं ॥ ८९ ॥
या स्फुरणाइतकचि या ज्ञानाची व्याप्ती असते. त्यालाच ज्ञान असे म्हणतात. या व्यतिरिक्त स्फुरण नसलेल्या भागात जे व्यापून राहिले आहे, ते या स्फुरणाने जाणले नाही, हे स्पष्ट आहे. (८८९)

तया न जाणणिया नांव अज्ञान । स्फुरण जाणिलें तेचि ज्ञान ।
जोवरी हे दोन्हीं न होती उत्पन्न । तो काल ज्ञाता ना अज्ञाता ॥ ९० ॥
त्या न जाणण्याला अज्ञान असे म्हणतात. स्फुरणाला जे जाणते, ते ज्ञान होय. जोपर्यंत हे ज्ञान आणि त्याविरहित असलेले अज्ञान उत्पन्न झाले नव्हते तोपर्यंत ज्ञाता जाणणारा ही नव्हता आणि अज्ञाताही नव्हता. (८९०)

इकडे कळणे उद्धवतां स्फुरणाचे । तिकडे न कळणे होय स्वरूपाचें ।
तस्मात येका स्वतीमुळे उभयांचे । विकार जाहले ॥ ९१ ॥
इकडे स्फुरणाचे कळणे उत्पन्न होते, पाचवेळी स्वस्वरूपाचे न कळणेही उत्पन्न होते. त्यामुळे केवळ एका स्फुरणामुळे कळणे (ज्ञान) आणि न कळणे हे दोन विकार निर्माण झाले. (८९१)

तेधून जें जें उत्पन्न जाले । तें तें जड चंचल नाथिलें ।
स्फुरणा अधिष्ठान जें संचलें । तें सत्य निर्विकारी ॥ ९२ ॥
तेधून जे जे उत्पन्न झाले ते ते जड, चंचल आणि असत्य असे होते. स्फुरणाचे अधिष्ठान (आधार) असलेले निर्विकारी स्वस्वरूप मात्र सत्य आहे हे लक्षात ठेव. (८९२)

या उभयांसी ज्ञान ना अज्ञान । तस्मात् मध्ये स्कूतींसी हे दोन ।
तेचि या सर्व जगाली कारण । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ९३ ॥
अनात्मा असलेली जड आणि असत्य वृष्टी आणि स्वस्वरूप या दोघांना ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. त्यामुळे मधल्या स्फुरणासच ही दोन्ही आहेत. ते स्फुरणच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण होय; हे त्रिवार सत्य आहे. (८९३)

ज्ञान हा विकार वृत्तीचा । तैसा उद्धव हा न कळणियाचा ।
स्वरूपी विकारचि नसता ज्ञानाचा । मा अज्ञान कासयाचें ॥ ९४ ॥
वृत्तीचे ज्ञान आणि अज्ञान हे दोन विकार आहेत. स्वस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानाचा विकारच नसल्याने अज्ञान तरी तेथे कसे असणार ? (८९४)

आल्पत्वी अज्ञानचि असतें । तरी सुमीत नेणीव केवी प्रकाशिर्ते ।
लय साक्षित्वे अनुभविते । हें निरोपिलें मागा ॥ ९५ ॥
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असते तर झोपेत नेणिवेला ते प्रकाशित कसे करते ? लयाचा साक्षी होण्याचा अनुभव कसा घेते ? याचे निरूपण मागे केले आहे. (८९५)

तस्मात् आत्मा जाणता ना नेणता । ज्ञानघन उभयांपरता ।
ज्ञाता आणि तुजी अज्ञातता । येका वृत्तीली दोन्ही ॥ ९६ ॥
म्हणून आत्मा हा जाणताही नाही आणि नेणताही नाही. या दोहोंपेक्षाही वेगळा केवळ ज्ञानघन (ज्ञानाने पूर्ण दाटलेला) असा आहे. ती जी मूळ स्कूर्तिरूप वृत्ती आहे तिच्याच ठिकाणी ज्ञातेपणा आणि नेणीवपणा हे दोन्ही आहेत. (८९६)

असो स्मृतीचे जें जाणणें । तेंचि ज्ञान विद्या ही ह्यणणे ।
तेचि विक्षेपशक्तीची लक्षणें । निमित्त कारण तेंचि ॥ ९७ ॥
स्फूर्तीच्या ठिकाणी जो जाणतेपणा आहे त्यालाच ज्ञान किंवा विद्या असेही म्हणतात. तिच्यातच विक्षेपशक्तीची (भास निर्माण करण्याची) लक्षणे आहेत. आणि ती शक्तीच सुष्टिनिर्मितीचे निमित्तकारण आहे. (८९७)

तयेमध्ये शुद्ध जाणणें आलें । तेंचि प्रतिबिंबरूपे कल्पिले ।
तयासी ईश नाम ठेविलें । नियंतृत्व सर्वांचे ॥ ९८ ॥
तिच्यामध्ये जे शुद्ध ज्ञान (मी ब्रह्म आहे, असे ज्ञान) असते. त्यातच प्रतिबिंबरूपाने ज्याची कल्पना केली जाते ते ईश्वरतत्त्व होय. तो सर्वांचा नियंता आहे. (८९८)

स्फुरणामाजी जे नेणीव । न कळे स्वस्वरूप स्वयमेव ।
तेचि अविद्या अज्ञानही नांव । आणि आवरणशक्ति ॥ ९९ ॥
स्फूर्तीच्या ठिकाणी जो नेणतेपणा आहे, म्हणजे त्याला स्वरूपाचे ज्ञान नसते, त्याला अविद्या असे म्हणतात. तेच अज्ञान होय. तिलाच आवरणशक्ती (म्हणजे स्वरूपाला झाकून टाकण्याची शक्ती) असे म्हणतात. (८९९)

तयामाजीं जाणणें आलें । त्या प्रतिबिंबा जीव नांव ठेविलें ।
तेंचि सुखदुःखा भोगू लागलें । तेव्हां जन्मे मरे ॥ ९०० ॥
त्या अज्ञानामध्ये जे शुद्ध ज्ञानाचे प्रतिबिंब पडते त्यास जीव असे नाव आहे. तो (प्रतिबिंबरूप जीव) सुखदुःखाचा भोक्ता होऊन जन्मतो आणि मरतो. (९००)

एव मुळीं जे अहब्रह्मस्कृर्ति । ते स्वरूपातें जाली विसरती ।
येथेंही कोणी शंका करिती । कीं ईश सर्वज्ञ कैसा ॥ १ ॥
अशा प्रकारे मुळातील ' अहं ब्रह्म' ही स्फूर्ती तिला स्वरूपाचे विस्मरण होते. येथे कोणी शंका काढतात की ईश्वर हा मग सर्वज्ञ कसा म्हटला जातो ? (९०१)

जरी नेणणें मूळपुरुषासी । तरी ईशासी सर्वज्ञता कैशी ।
तरी नुसधी विद्या उपाधि जयासी । तेणें जाणें सर्वाते ॥ २ ॥
जर मूळ पुरुषासच अज्ञान आहे, तर ईश्वर हा सर्वज्ञ कसा होईल ? केवळ विद्या उपाधीमुळे ईश्वर सर्वांस जाणू शकतो. (९०२)

स्फुरणापासून जें जें जाले । ब्रह्मादि कृणान्स उद्भवले ।
तें तें जाणें ईक्षणे आपुले । ह्मणोनि सर्वज्ञ ॥ ३ ॥
स्फुरणापासून निर्माण झालेले ब्रह्मदेवापासून ते तृणापर्यंत ते ते सर्व ईश्वर आपल्या ईक्षणाने जाणतो. म्हणून तो सर्वज्ञ आहे. (९०३)

न जाणणें जें कां ब्रह्मीचे । तें तो सर्वपणांत नवचे ।
त्याविरहित होणें जितुकियाचें । जाणणें घडे ॥ ४ ॥
ईश्वर ब्रह्माला जाणत नाही. त्या गोष्टीचा सर्वपणात समावेश होत नाही. ब्रह्माला सोडून जे जे निर्माण होते, ते ते सर्व ईश्वर जाणतो. (९०४)

मागुतीं ह्मणसी ब्रह्म आसिकें । ईशासी न कळे निकें ।
तरी जीव केवीं जाणे कौतुकें । तरी अवधारीं ॥ ५ ॥
यावर म्हणशील की, ईश्वराला संपूर्ण ब्रह्माचे पूर्ण ज्ञान नसते, तर मग जीव तरी त्याला कसा जाणू शकेल ? यावर उत्तर ऐक. (९०५)

स्कृरणापासून जे त्रिगुण । त्या त्रिगुणांचे अंश ईशान ।
देह धी२ता जाला आपण । मानसिक साकार ॥ ६ ॥
स्फुरणापासून त्रिगुण निर्माण झाले. त्या त्रिगुणांच्या अंशाने ईश्वराने मानसिक साकार देह धारण केला. (९०६)

पुढे चारी खाणीही होती । पांचवी मानसिक योनी निश्चिती ।
एव जे जे देवादि कीटकान्स उद्धति । इतुकी ही साकार ॥ ७ ॥
त्यानंतर चार खाणी निर्माण झाल्या. त्यामध्ये या पाचव्या मानसिक योनीची भर पडली. अशा प्रकारे देवांपासून ते कीटकापर्यंत जी उत्पत्ती आहे, ती सर्व साकार सृष्टी होय. (९०७)

इतुक्याही जाकरी प्रवेश । जीवरूपें करी ईश ।
तेव्हां ज्ञानाज्ञान हें विशेष । प्रगटते जाले ॥ ८ ॥
या सर्व साकार सुष्टीत ईश्वर जीवरूपाने प्रवेश करतो तेव्हा विशेष ज्ञान आणि अज्ञान प्रकट झाले. (९०८)

विष्णू सदाशिव हे दोन्ही । तेथें अज्ञान नसे निपटूनी ।
स्वस्वरूपज्ञान ऐक्यपणी । अपसयाची जाहले ॥ ९ ॥
विष्णू आणि शंकर या दोहोंच्या ठिकाणी एकाच स्वस्वरूपाचे ज्ञान आपोआपच निर्माण होते. त्यांच्या ठिकाणी अज्ञान अजिबात नसते. (९०९)

नाहीं गुरु ना सहार । उत्पन्न होतांचि स्वरूप निर्धार ।
होता जाला कीं निर्विकार । अहंब्रह्मास्मिरूपें ॥ १० ॥
त्यांना गुरू आणि सच्छास्त्र दोन्ही नसली, तरी ते उत्पन्न झाल्याबरोबरच त्यांच्या ठिकाणी आपण निर्विकार ब्रह्म आहोत, असा स्वरूपाबद्दलचा निर्धार निर्माण झाला. (९१०)

ऐसें स्वयेचि ज्ञान जाले । किंचित- नेणणें तें निपटून गेलें ।
तयासी नित्यमुक्त असें बोलिलें । झुल्यादिही व्यापारी ॥ ११ ॥
अशा प्रकारचे ज्ञान आपोआप निर्माण झाले, त्यामुळे जे काही थोडे फार अज्ञान होते त्याचाही संपूर्ण निरास झाला. त्यामुळे ते जरी सुजन, पालन, संहार इ. व्यापार करत असले तरी ते नित्यमुक्तच होत. (९११)

पुढें गुरुमुखे येकमेकां । ज्ञानानुभूति निश्चयाल्पका ।
प्रगटती जाली तया कौतुका । जीवन्मुक्ति नाम ॥ १२ ॥
पुढे त्यांस परस्परांच्या गुरुमुखाने निश्चयात्मक ज्ञानानुभव प्राप्त झाला. या कौतुकपूर्ण अनुभवाला जीकमुक्ती म्हणतात. (९१२)

तस्मात जो कोणी विचारवंत । गुरुमुखे ज्ञान आकळित ।
तयाचे अज्ञान सर्व नासत । ब्रह्माल्पत्वी ऐक्य पावे ॥ १३ ॥
त्यामुळे जो कोणी विचारवंत गुरुमुखाने ज्ञान प्राप्त करून घेतो, त्याचे सर्व अज्ञान नष्ट होते आणि त्याला ब्रह्मात्मत्वामध्ये ऐक्य प्राप्त होते. (९१३)

जया वृत्तीली अज्ञान आलें । तया वृत्तीसीच ज्ञान उद्भवले ।
त्या दोन्हींसहित स्कृरण मावळलें । पुढें अभिन्नता ऐशी ॥ १४ ॥
ज्या वृत्तीला अज्ञान होते, त्याच वृत्तीला ज्ञान उत्पन्न झाले. नंतर या दोन्ही ज्ञान आणि अज्ञानासह स्फुरण मावळते (मी ब्रह्म आहे ही जाणीवही नष्ट होते) आणि अभिन्नता उरते. (९१४)

कोणताही पदार्थ पाहतां । आरंभी त्याची अज्ञातता ।
तो अमुक ऐसा वृत्तीली कळता । अज्ञान नासे ॥ १५ ॥
कोणताही पदार्थ पाहिला तर आरंभी त्याच्याबद्दल अज्ञानाची दशा असते. नंतर तो पदार्थ कोणता आहे हे कळले की, त्याबद्दलचे अज्ञान नाहीसे होते. (९१५)

अज्ञान नास्त्र ज्ञान जाले । तेंही ज्ञान स्कूर्तिरूप मावळलें ।
पुढे पदार्थमात्र स्वये उरले । हा स्वभावचि वृत्तीचा ॥ १६ ॥
अज्ञान नष्ट होते व ज्ञान प्राप्त होते, त्यानंतर स्कूर्तिरूप असलेले ते ज्ञानही अज्ञानासह मावळते. नंतर केवळ पदार्थच उरतात. हा वृत्तीचा स्वभावच आहे. (९१६)

तैशी गुरुमुखे बहिर्मुखता । वृत्तीची मोडून तत्त्वतां ।
होय जेव्हां स्वरूपाकारता । अंतर्मुखत्वे ॥ १७ ॥
त्याप्रमाणे गुरुमुखाने वृत्तीची बहिर्मुखता मोडून ती अंतर्मुख होऊन स्वरूपाकार बनते. (९१७)

तेव्हां निजरूपाचें अज्ञान । फिटोन वृत्तीसी होय ज्ञान ।
ते ज्ञानस्कूर्तीही मावळून । केवळ ब्रह्माल्या उरे ॥ १८ ॥
त्यावेळी निजरूपाचे (स्वरूपाचे) अज्ञान फिटून वृत्तीला ज्ञान प्राप्त होते. त्यानंतर ते ज्ञानाचे स्फुरणही मावळते आणि केवळ ब्रह्मात्माच उरतो. (९१८)

यासीच बोलिजे अभिन्नता । हेचि बापा जीवऱ्यक्तता ।
तस्मात् जीवही पावे अपरोक्षता । तेथें संदेह नाहीं ॥ १९ ॥
यालाच अभेद अथवा अभिन्नता म्हणतात. अरे, हीच जीवन्मुक्तता आहे. त्यामुळे जीवदेखील अपरोक्ष ज्ञान (साक्षात ज्ञान) प्रास करून घेऊ शकतो, यात काही संशय नाही. (९१९)

येकदा सांगतां नाहीं कळले । तरी वारंवार पाहिजे श्रवण केलें ।
तैसेंचि मनन निदिध्यासन आपुले । केलेंचि पुन्हा करावें ॥ २० ॥
एकदा सांगितल्यावर जर कळले नाही, तर वारंवार श्रवण केले पाहिजे. त्याचबरोबर आपले मनन, निदिध्यासन पुन पुनः केलेलेच करत राहावे. (९२०)

याचि हेतु अतिप्रयशी । अभ्यासावे दिवा कीं निशी ।
मागें बोलिलो आह्मी तुजसी तस्मात् मुमुक्षे यत्न करावा ॥ २१ ॥
याच कारणास्तव दिवस असो, रात्र असो, हा अभ्यास दृढ प्रयत्नपूर्वक करत राहावा, असे आम्ही तुला मागे सांगितले आहे. म्हणून मुमुक्षूने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. (९२१)

ऐसें गुरुमुखे वचन ऐकता । रविदत्त घाली दडवता ।
अति सप्रेमें झाला विनविता । जी जी ताता सद्‌गुरु ॥ २२ ॥
गुरुमुखीचे हे शब्द ऐकताच रविदत्ताने त्यांना दंडवत घातले, 'पितृसदृश गुरूमहाराज' असे संबोधून त्यांना तो प्रेमाने विनवू लागला. (९२२)

अहो धन्य मी सर्व उपेसून । श्रीचरणा आलों शरण ।
आतां कृतकृत्य जालों हें अप्रमाण । न घडे कल्पांतीं ॥ २३ ॥
इतर सर्वांची उपेक्षा करून मी श्रीसद्‌गुरूंच्या पायांशी शरण आलो. त्यामुळे मी खरोखरच धन्य झालो. मी कृतकृत्य झालो. हे कल्पान्तीही अप्रमाण ठरणार नाही (९२३)

कामधेजूचे वासरू । भुकेले न राहे निर्धारू ।
तेवीं मज वोळलासी सद्‌गुरु । आतां साकडे काय ॥ २४ ॥
कामधेतूचे वासरू कधीही भुकेले राहणार नाही, हे निश्चित. त्याप्रमाणे माझ्यावर सहुरू प्रसन्न झालेले आहेत. आता कशाचे संकट राहिले आहे ? (९२४)

मी जरी मंदप्रज्ञ असे । तरी वारंवार श्रवण अभ्यासें ।
ऐक्यता पावेन कृपेसरिसें । मज चिंता कासया ॥ २५ ॥
मी जरी मंदप्रज्ञ असलो तरी वारंवार श्रवण आणि अभ्यास करून सहुरूच्या कृपेच्या साहाय्याने मी ब्रह्मात्मैक्य प्राप्त करून घेईन. मला आता कसली चिंता आहे ? (९२५)

मज घुसावे काय न घुसावे । हेंही कळेना स्वभावें ।
परी गुरुमायेने लेववावे । जपत्या वाक्यनर्गे ॥ २६ ॥
मला काय विचारावे, काय विचारू नये, हेही कळेनासे झाले आहे. परंतु गुरुमाउलीने आपले वचनरूपी दागिने माझ्या अंगावर घालावेत. (९२६)

तथापि आर्षपणें तें लेकरू । छंद घे भलताचि अलंकारू ।
भलते स्थानीं परिकर । लेखर्वी ह्मणे ॥ २७ ॥
तथापि एखादे असमंजस लेकरू आहे ते हट्ट करून ' भलताच अलंकार भलत्याच जागी घालून सजव' म्हणून हट्ट धरून बसते. (९२७)

तें स्थान नव्हे त्या नगाचें । परी जननीस कौतुक बाळाचे ।
तेवीं माझिये आर्ष प्रश्नाचें । कोडे पुरवावे ॥ २८ ॥
वास्तविक पाहता त्या दागिन्याचे ते स्थान नसते. पण आईला त्या बाळाचे कौतुक असत्यामुळे ती त्याचा हट्ट पुरवते. त्याप्रमाणे माझ्या मूर्ख प्रश्नाचे आपण कौतुकाने समाधान करावे. (९२८)

जागति नाहीं स्वप्नाआत । स्वप्न नसे सुघुप्तींत ।
तेवींच सुपुसिही नसे दोहींत । तेव्हां अवस्था मिथ्या ॥ २९ ॥
स्वप्नामध्ये जागृती नसते स्वप्न सुषुप्तीत नसते. त्याप्रमाणेच सुषुप्ती या दोन्ही अवस्थांत नसते. त्यामुळे या सर्व अवस्था मिथ्या होत. (९२९)

अस्ति भाति प्रिय आत्मा । याची तिही अवस्थेंत गरिमा ।
तोचि सत्य या रूपनामा । वास्तवपणा नसे ॥ ३० ॥
आत्मा अस्तिभातिप्रिय असा आहे. त्याचे वरील तिन्ही अवस्थात माहात्म्य आहे. तोच एक खरा सत्य आहे. बाकीच्या नामरूपात्मक पदार्थाना सत्यत्व नाही. (९३०)

जागतींत अथवा स्वप्नामाजीं । आत्मा ज्ञानघन असे सहजी ।
परी विशे जे वृत्ति तुजी । ते आच्छादी सामान्या ॥ ३१ ॥
जागृतीत अथवा स्वप्नात ज्ञानघन आत्मा स्वाभाविकपणे सामान्य प्रकाशाने अस्तित्वात असतो. परंतु विशेष प्रकाशाने युक्त अशी दुसरी वृत्ती त्याची ती सामान्य प्रकाशकता झाकून टाकते. (९३१)

सुघुसींत जरी सामान्य प्रगटे । वृत्तीचे विशेषत्व वोहटे ।
परी अनुभवासी न भेटे । प्रत्यक्ष वृत्तीसी ॥ ३२ ॥
पण सुधुमीत सामान्य जरी प्रकट असले तरी त्यावेळी वृत्तीचे विशेषत्व ओसरलेले असते. प्रत्यक्ष वृत्तीच्या ते अनुभवास येत नाही. (९३२)

वृत्तीली न कळता सधन । केवीं जाईल हें अज्ञान ।
भ्रांतीच न फिटतां अन्यथा भान । न जाय सहसा ॥ ३३ ॥
आणि वृत्तीला हे घनदाट स्वस्वरूप कळले नाही तर हे अज्ञान कसे नष्ट होईल ? श्रमाचे निराकरण झाल्याखेरीज विपरीत ज्ञान सहसा जात नाही. (९३३)

एव जागर स्वप्नी विशेषामुळें । सच्चिदानंद वृत्तीसी न कळे ।
सुप्तींत तो स्वानुभवाचे डोळे । असून अनुपयोग ॥ ३४ ॥
अशा प्रकारे जागृतीत आणि स्वप्नात विशेष प्रकाशामुळे सच्चिदानंद आत्म्याचे वृत्तीला ज्ञान होत नाही आणि सुपुसीमध्ये अनुभवाचे डोळे असूनही त्यांचा उपयोग नाही. (९३४)

तस्मात् सच्चिदघन आत्मयाचें । वृत्तीसी ज्ञान केधवां साचे ।
होय या बरळ प्रश्नाचे । साकडे फेडावे जी ॥ ३५ ॥
त्यामुळे सच्चिदन अशा आत्म्याचे वृत्तीला ज्ञान कधी होईल ! या माझ्या असंबद्ध प्रश्नाचे उत्तर देऊन समाधान करावे. (९३५)

ऐसी रविदत्ताची ऐकता वाणी । स्वामीसी अति हर्ष जाला मनीं ।
खणती भला असी अवधानी । प्रश्नही करिसी नेटका ॥ ३६ ॥
अशी रविदत्ताची विनंती ऐकून स्वामींच्या मनास खूप आनंद झाला. ते म्हणाले, 'तुझे चांगले लक्ष आहे. तू सर्व लक्ष देऊन ऐकतो आहेस आणि तू प्रश्नही योग्य असाच विचारलास. (९३६)

आतां असावें सावधान । जागतीमाजी सच्चिदघन ।
दाखवू ऐकावे निरूपण । एकाग्रभावे ॥ ३७ ॥
श्रोत्यांनी आता सावधान होऊन ऐकावे. जागृतीतच सच्चिरून आत्म्याची भेट करून देतो. आपण एकाग्र चित्ताने ऐकावे. (९३७)

GO TOP