॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ पञ्चमोऽध्यायः - अध्याय पाचवा ॥

सूत उवाच -
अथ प्रादुरभूत्तत्र हिरण्मयरथो महान् ।
अनेकदिव्यरत्नांशुकिर्मीरितदिगन्तरः ॥ १ ॥
सूत म्हणाला, इतक्यांत त्या ठिकाणी अनेक दिव्य रत्नांच्या कांतीनें सर्व दिशा चित्रविचित्रवर्ण करणारा असा एक मोठा सुवर्णाचा रथ उत्पन्न झाला. १.

नद्युपान्तिकपङ्काढ्यमहाचक्रचतुष्टयः ।
मुक्तातोरणसंयुक्तः श्वेतच्छत्रशतावृतः ॥ २ ॥
शुद्धहेमखलीनाढ्यतुरङ्गगणसंयुतः ।
शुक्तावितानविलसदूर्ध्वदिव्यवृषध्वजः ॥ ३ ॥
मत्तवारणिकायुक्तः पट्टतल्पोपशोभितः ।
पारिजाततरूद्भूतपुष्पमालाभिरञ्चितः ॥ ४ ॥
मृगनाभिसमुद्भूतकस्तूरिमदपङ्किलः ।
कर्पूरागधूपोत्थगन्धाकृष्टमधुव्रतः ॥ ५ ॥
संवर्तघनघोषाढ्यो नानावाद्यसमन्वितः ।
वीणावेणुस्वनासक्तकिन्नरीगणसंकुलः ॥ ६ ॥
एवं दृष्ट्वा रथश्रेष्ठं वृषादुत्तीर्य शंकरः ।
अम्बया सहितस्तत्र पट्टतल्पेऽविशत्तदा ॥ ७ ॥
नदीच्या तीरावरून आल्यामुळें चार मोठी चक्रें कर्दमयुक्त झालेला, मौक्तिकांच्या तोरणांनी युक्त, शेकडों श्वेतछत्रांनी युक्त, शुद्ध सुवर्णाचे लगाम आहेत असे चार अश्व जोडलेला; मौक्तिकयुक्त वितानचांदवा असलेला, ज्याच्या ध्वजावर वृषभ आहे, मत्त हस्तिनी बरोबर असलेला, रेशमी आसनानें युक्त, पारिजातपुष्पांच्या मालांनी सुशोभित, मृगनाभीपासून उत्पन्न झालेल्या कस्तूरीच्या लेपानें कर्दमयुक्त, कर्पूर आणि अगरु (चंदन) यांच्या धूपानें उत्पन्न झालेल्या गंधाला लुब्ध होऊन भ्रमरांचे थवे ज्याच्यावर येऊन बसले आहेत, प्रलयकालीन मेघासारखा गडगडाट असलेला, अनेक प्रकारच्या वाद्यांनी युक्त, वीणा वेणु इत्यादि वाद्यें वाजविणार्‍या किन्नरींच्या गणानें युक्त, अशा प्रकारचा उत्तम रथ पाहून शंकर वृषभावरून उतरून पार्वतीसह त्या रथांतील रेशमी आसनावर बसले.२-७.

नीराजनैः सुरस्त्रीणां श्वेतचामरचालनैः ।
दिव्यव्यजनपातैश्च प्रहृष्टो नीललोहितः ॥ ८ ॥
देवांगनांच्या ओवाळण्यानें, श्वेतचामरें वारण्यानें व दिव्य पंख्यांच्या वार्‍याने शंकर फार आनंदित झाला. ८.

क्वणत्कङ्कणनिध्वानैर्मंजुमञ्जीरसिञ्जितैः ।
वीणावेणुस्वनैर्गीतैः पूर्णमासीज्जगत्त्रयम् ॥ ९ ॥
शुककेकिकुलारावैः श्वेतपारावतस्वनैः ।
उन्निद्रभूषाफणिनां दर्शनादेव बर्हिणः ॥ १० ॥
त्या देवांगनांच्या कंकणांच्या मंजुल शब्दानें, नूपुरांच्या ध्वनीनें, वीणा, वेणु ह्यांच्या वादनानें, गानानें पोपट व मयूर यांच्या शब्दांनीं, पारव्यांच्या किलबिलानें त्रैलोक्य भरून गेले. हर्षाने ज्यांनी आपल्या फणा वर उभारल्या आहेत अशा सर्वांच्या दर्शनानें मयूर आपल्या पिसाच्यावरील असंख्य चंद्रक दाखवीत नृत्य करू लागले. ९-१०.

ननृतुर्दर्शयन्तः सर्वांश्चन्द्रकान्कोटिसंख्यया ।
प्रणमन्तं ततो राममुत्थाप्य वृषभध्वजः ॥ ११ ॥
आनिनाय रथं दिव्यं प्रहृष्टेनान्तरात्मना ।
कमण्डलुजलैः स्वच्छैः स्वयमाचम्य यत्नतः ॥ १२ ॥
समाचम्याथ पुरतः स्वांके राममुपानयत् ।
अथ दिव्यं धनुस्तस्मै ददौ तूणीरमक्षयम् ॥ १३ ॥
नंतर नमस्कार करणार्‍या रामाला शंकरानें उठवून मोठ्या आनंदाने आपल्या दिव्य रथावर घेतले. आपल्या कमंडलूतील स्वच्छ, उदकानें प्रथम आपण आचमन करून नंतर रामचंद्राकडून करविले आणि त्याला आपल्या मांडीवर घेतलें आणि दिव्य धनुष्य व अक्षय बाणभाते त्याला दिले. ११-१३.

महापाशुपतं नाम दिव्यमस्त्रं ददौ ततः ।
उक्तश्च तेन रामोऽपि सादरं चन्द्रमौलिना ॥ १४ ॥
नंतर पाशुपत नांवाचे दिव्यास्त्र दिले. नंतर शंकरांनी रामाला आदरपूर्वक भाषण केले. १४.

जगन्नाशकरं रौद्रमुग्रमस्त्रमिदं नृप ।
अतो नेदं प्रयोक्तव्यं सामान्यसमरादिके ॥ १५ ॥
हे नृपा, हे अस्त्र फार भयंकर आहे, त्रैलोक्याचा नाश करणारे आहे, म्हणून सामान्य युद्धांत ह्याचा प्रयोग करूं नको. १५.

अन्यन्नास्ति प्रतीघातमेतस्य भुवनत्रये ।
तस्मात्प्राणत्यये राम प्रयोक्तव्यमुपस्थिते ॥ १६ ॥
ह्याला त्रैलोक्यांत दुसरा प्रतीकार नाहीं. तस्मात् हे रामा, प्राणांताचा प्रसंग येईल त्यावेळींच याचा प्रयोग कर. १६.

अन्यदैत्यत्प्रयुक्तं तु जगत्संक्षयकृद्भवेत् ।
अथाहूय सुरश्रेष्ठान् लोकपालान्महेश्वरः ॥ १७ ॥
उअवाच परमप्रीतः स्वं स्वमस्त्रं प्रयच्छत ।
राघवोऽयं च तैरस्त्रै रावणं निहनिष्यति ॥ १८ ॥
अन्य कालीं प्रयोग केला असतां जगताचा क्षय होईल. नंतर शिवाने सर्व इंद्रादि लोकपालांना हाक मारली आणि असे सांगितले की, देवहो, तुम्हीही आपआपलीं अस्त्रें रामाला द्या. म्हणजे हा रामचंद्र त्या अस्त्रांनी रावणाला मारील. १७-१८.

तस्मै देवैरवध्यत्वमिति दत्तो वरो मया ।
तस्माद्वानरतामेत्य भवन्तो युद्धदुर्मदाः ॥ १९ ॥
साहाय्यमस्य कुर्वन्तु तेन सुस्था भविष्यथ ।
तदाज्ञां शिरसा गृह्य सुराः प्राञ्जलयस्तथा ॥ २० ॥
प्रणम्य चरणौ शंभोः स्वं स्वमस्त्रं ददुर्मुदा ।
नारायणास्त्रं दैत्यारिरैन्द्रमस्त्रं पुरंदरः ॥ २१ ॥
मी त्या रावणाला "देवांकडून तुला मृत्यु नाहीं" असा वर दिला आहे, म्हणून तुम्ही युद्धाविषयी उत्कंठित आहां तर वानरजन्म घेऊन रामाला साह्य करा म्हणजे सुखी व्हाल. ही शंकराची आज्ञा शिरसा वंदन करून देव अंजलि जोडून शिवाच्या चरणीं प्रणिपात करून रामचंद्राला आपापलीं अस्त्रें देते झाले. विष्णूनें नारायणास्त्र दिले. इंद्राने इंद्रास्त्र दिले. १९-२१.

ब्रह्मापि ब्रह्मदण्डास्त्रमाग्नेयास्त्रं धनंजयः ।
याम्यं यमोऽपि मोहास्त्रं रक्षोराजस्तथा ददौ ॥ २२ ॥
वरुणो वारुणं प्रादाद्वायव्यास्त्रं प्रभञ्जनः ।
कौबेरं च कुबेरोऽपि रौद्रमीशान एव च ॥ २३ ॥
सौरमस्त्रं ददौ सूर्यः सौम्यं सोमश्च पार्वतम् ।
विश्वेदेवा ददुस्तस्मै वसवो वासवाभिधम् ॥ २४ ॥
ब्रह्मदेवानें ब्रह्मदंडास्त्र, अग्नीनें अग्न्यस्त्र, यमानें याम्यास्त्र, निर्ऋतीनें मोहनास्त्र, वरुणानें वरुणास्त्र, वायूनें वायव्यास्त्र, कुबेरानें सौम्यास्त्र, ईशानानें रुद्रास्त्र, सूर्यानें सौरास्त्र, चंद्रानें सोमास्त्र, विश्वेदेवांनीं पर्वतास्त्र आणि अष्टौ वसुंनीं वासवास्त्र दिले. २२-२४.

अथ तुष्टः प्रणम्येशं रामो दशरथात्मजः ।
प्राञ्जलिः प्रणतो भूत्वा भक्तियुक्तो व्यजिज्ञपत् ॥ २५ ॥
तेव्हां दशरथात्मज रामचंद्र संतुष्ट झाला आणि नम्रतेने अंजलि जोडून भक्तियुक्त होत्साता बोलला. २५.

श्रीराम उवाच -
भगवान्मानुषेणैव नोल्लङ्घ्यो लवणाम्बुधिः ।
तत्र लङ्काभिधं दुर्गं दुर्जयं देवदानवैः ॥ २६ ॥
श्रीराम म्हणाला, हे भगवन्, केवल मनुष्यांकडूनच हा भयंकर क्षारसमुद्र उल्लंघिला जाण्यासारखा नाहीं. त्या समुद्रांत लंका नांवाचा जो किल्ला आहे तो देवदानवांसही जिंकावयास अशक्य आहे. २६.

अनेककोटयस्तत्र राक्षसा बलवत्तराः ।
सर्वे स्वाध्यायनिरताः शिवभक्ता जितेन्द्रियाः ॥ २७ ॥
त्या ठिकाणीं अतिशय बलाढ्य अनेक कोटि राक्षस आहेत. ते सर्व वेदाध्ययनतत्पर, शिवभक्त व जितेंद्रिय आहेत. २७.

अनेकमायासंयुक्ता बुद्धिमन्तोऽग्निहोत्रिणः ।
कथमेकाकिना जेया मया भ्रात्रा च संयुगे ॥ २८ ॥
तसेच अनेक प्रकारच्या मायेनें युक्त,बुद्धिमान् आणि अग्निहोत्री आहेत. ते एकट्या मजकडून आणि लक्ष्मणाकडून युद्धांत कसे जिंकले जातील ? २८.

श्रीमहादेव उवाच -
रावणस्य वधे राम रक्षसामपि मारणे ।
विचारो न त्वया कार्यस्तस्य कालोऽयमागतः ॥ २९ ॥
महादेव म्हणाले, रामा, रावणाच्या वधाविषयीं आणि राक्षसांच्या वधाविषयीं तू विचार करू नकोस. त्यांच्या वधाचा काल समीप प्राप्त झाला आहे. २९.

अधर्मे तु प्रवृत्तास्ते देवब्राह्मणपीडने ।
तस्मादायुःक्षयं यातं तेषां श्रीरपि सुव्रत ॥ ३० ॥
ते अधर्माचे ठिकाणीं प्रवृत्त झाले आहेत. देव ब्राह्मण यांना पीडा करूं लागले आहेत. तस्मात् हे सुव्रता, आतां त्यांच्या आयुष्याचा व वैभवाचा क्षय झाला. ३०.

राजस्त्रीकामनासक्तं रावणं निहनिष्यसि ।
पापासक्तो रिपुर्जेतुः सुकरः समराङ्गणे ॥ ३१ ॥
हे राजा,स्त्रीची अवज्ञा करावयास प्रवृत्त झालेल्या रावणाला तू मारशील. पापासक्त शत्रु समरांगणामध्ये सहज जिंकता येतो. ३१.

अधर्मे निरतः शत्रुर्भाग्येनैव हि लभ्यते ।
अधीतधर्मशास्त्रोऽपि सदा वेदरतोऽपि वा ॥ ३२ ॥
विनाशकाले सम्प्राप्ते धर्ममार्गाच्च्युतो भवेत् ।
पीड्यन्ते देवताः सर्वाः सततं येन पापिना ॥ ३३ ॥
ब्राह्मणा ऋषयश्चैव तस्य नाशः स्वयं स्थितः ।
किष्किंधानगरे राम देवानामंशसंभवाः ॥ ३४ ॥
वानरा बहवो जाता दुर्जया बलवत्तराः ।
साहाय्यं ते करिष्यन्ति तैर्बध्वा च पयोनिधिम् ॥ ३५ ॥
अधर्मी रत झालेला शत्रु भाग्यानेंच मिळत असतो. संपूर्ण धर्मशास्त्राचें अध्ययन केलेला असो, सर्वदा वेदाध्ययन तत्पर असो, विनाशकाल आला की तो धर्ममार्गापासून च्युत व्हावयाचाच. जो पापी निरंतर देव, ब्राह्मण, ऋषि, या सर्वांना पीडा देऊ लागला त्याचा नाश मूर्तिमंत प्राप्त झाला म्हणून समजावें. रामा, नगरींत देवांच्या अंशांपासून उत्पन्न झालेले मोठे बलाढ्य व जिंकण्यास अशक्य असे बहुत वानर उत्पन्न झाले आहेत. ते तुला साहाय्य करतील, त्यांच्याकडून तुं समुद्राला बंधन करून अनेक पर्वतांनीं सेतु बांधलास म्हणजे वानर त्यावरून लंकेंत जातील. नंतर परिवारासहित रावणाचा वध करून आपल्या प्रियेला आण. ३२-३५.

अनेकशैलसंबद्धे सेतौ यान्तु वलीमुखाः ।
रावणं सगणं हत्वा तामानय निजां प्रियाम् ॥ ३६ ॥
युद्धांत ज्या ठिकाणी शस्त्रांनी जय होण्यासारखा आहे त्या ठिकाणीं अस्त्रांचा उपयोग करू नये. जे अस्त्र जाणत नाहीत, किंवा ज्यांच्यापाशी थोडी शस्त्रें आहेत, अथवा जे पलायन करतात अशांवर दिव्यास्त्रांचा प्रयोग केला तर प्रयोग करणाराच नाश पावतो. ३६

शस्त्रैर्युद्धे जयो यत्र तत्रास्त्राणि न योजयेत् ।
निरस्त्रेष्वल्पशस्त्रेषु पलायनपरेषु च ॥ ३७ ॥
अस्त्राणि मुञ्चन् दिव्यानि स्वयमेव विनश्यति ।
अथवा किं बहूक्तेन मयैवोत्पादितं जगत् ॥ ३८ ॥
मयैव पाल्यते नित्यं मया संह्रियतेऽपि च ।
अहमेको जगन्मृत्युर्मृत्योरपि महीपते ॥ ३९ ॥
अथवा तुला आता फार काय सांगू , हे सर्व जग मींच उत्पन्न केले आहे. मीच ह्याचे रक्षण करतों व नाशही मीच करतो. हे महीपते, सर्व जगताचा मृत्यु मीच व मृत्यूचाही मृत्यु मीच. ३७-३९.

ग्रसेऽहमेव सकलं जगदेतच्चराचरम् ।
मम वक्त्रगताः सर्वे राक्षसा युद्धदुर्मदाः ॥ ४० ॥
हे चराचर सर्वं जगत् मीच ग्रासून टाकतो. हे युद्धाविषयी प्रवृत्त झालेले सर्व राक्षस माझ्या [=काळाच्या ] मुखांत पडलेले आहेत. ४०.

निमित्तमात्रं त्वं भूयाः कीर्तिमाप्स्यसि संगरे ॥ ४१ ॥
तू निमित्तमात्र हो, म्हणजे युद्धामध्ये कीर्ति पावशील. ४१.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
रामाय वरप्रदानं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥
इति पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥





GO TOP