समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ७ वा
अथर्वेदाच्या शाखा नि पुराणाची लक्षणे -
सूत सांगतात -
( अनुष्टुप् )
अथर्वज्ञ सुमंताने कबंधा बोधिले तये ।
वेददर्शक नी पथ्या दोन भागात बोधिले ॥ १ ॥
शोक्लायनी ब्रह्मबली मोदोष पिप्पलायनी ।
वेददर्शकचे चार पथ्य शिष्य हि सांगतो ॥ २ ॥
कुमुदो शुनको तैसा अथर्वज्ञहि जाजली ।
अंगिरा गोत्र उत्पन्न शुनका दोन पुत्र ते ।
सैंधवान नी बभ्रु एकेक शिकले द्वय ॥ ३ ॥
नक्षत्रकल्प सावर्ण्य शांत कश्यप अंगिरा ।
आणखी शिष्य ते होते ऐका पौराणिका पुढे ॥ ४ ॥
त्र्यय्यारूणी कश्यपो नी सावर्षी अकृतव्रन ।
वैशंपायन हारीत पौराणिक सहा असे ॥ ५ ॥
या सर्वांनी पिता माझे भगवान् व्यासजीकडे ।
तसे मी शिकलो त्यांच्या सह ही संहिता पहा ॥ ६ ॥
सहा त्या संहिता तैशा शिकलो मूळ चारही ।
कश्यपो मी नि सावर्णी सम नी अकृतोव्रण ॥ ७ ॥
वेद नी शास्त्र आधारे पुराणलक्षणे ऋषि ।
सांगती स्वस्थ होवोनी वर्णना ऐकणे तुम्ही ॥ ८ ॥
विसर्ग सर्ग नी वृत्ति रक्शा मन्वंतरे तसे ।
वंश वंशानुचरित संस्था हेतू अपाश्रय ॥ ९ ॥
कोणी महा पुराणांची मानिती दश लक्षणे ।
कोणी सान पुराणांची मानिती पाच लक्षणे ॥ १० ॥
मूळ त्या प्रकृती मध्ये ते लीन गुण क्षोभता ।
निपजता महत्तत्व अहंकार त्रयी तरीं ॥
अहंकारात तन्मात्रा इंद्रीय विषयो तयीं ।
उपपत्ति क्रमा ऐशा सर्व नाम असे पहा ॥ ११ ॥
इच्छेने भगवंताच्या होती ते वासनामय ।
निपजे सर्व सृष्टी ही निसर्ग नाम त्याजला ॥ १२ ॥
अचरे जगती प्राण दुग्धादी तो स्वभावची ।
शास्त्रनुसारही खाती वृत्ति नाम यया असे ॥ १३ ॥
युगा युगात तो ईश जन्मोनी धर्म रक्षितो ।
पापी वा दुर्जना मारी रक्षा हे नाम त्याजला ॥ १४ ॥
मनु देव मनूपुत्र इंद्र सप्तर्षि आदि ते ।
सहांच्या युक्त वेळेला नमवंतर नाम ते ॥ १५ ॥
भविष्य वर्तमानो नी भूतकाळात जे नृप ।
परंपरा तयांची जी त्याजला नाम वंश ते ॥ १६ ॥
नैमित्तिको प्राकृतिको नित्य आत्यंतिकोलय ।
स्वभावे घडती सर्व संस्था हे नाम त्याजला ॥ १७ ॥
जीवास हेतु हे नाम अविद्यावश तो असे ।
चैतन्ये पाहती कोणी व्यक्त अव्यक्त रूप ते ॥ १८ ॥
व्यतिरेकान्वये भासे जागृत् स्वप्नी सुषुप्तिशी ।
तुरियीं जाणवे ब्रह्म नाम त्यास अपाश्रय ॥ १९ ॥
रूप नामे पदार्थाची सिद्धता होतसे पहा ।
ब्रह्म हे त्यातले सत्य साक्षी रूप नि आश्रय ॥ २० ॥
निवृत्ति लाभते योगे तत्वमसि उदीत हो ।
कर्म नी वासना संपे निवृत्त नाम त्याजला ॥ २१ ॥
ज्ञान्यांनी ही पुराणांची लक्षणे कथिली दहा ।
अठरा सान मोठे ते पुराण लक्षणांकित ॥ २२ ॥
ब्रह्म विष्णु नि पद्मो नी शिव लिंग गरूड नी ।
नारदो नी भागवतो अग्नि स्कंद गरूड नी ।
ब्रह्मवैवर्त नी तैसे मार्कंडेय नि वामन ।
वराहो मत्स्य नी कूर्म ब्रह्मांड अठरा असे ॥ २४ ॥
व्यासजींच्या कडोनीया शिकलो जे परंपरें ।
पुराणश्रुति या ऐशा वाचता ब्रह्मतेज हो ॥ २५ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ ७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|