समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय २ ला
कलियुगातील धर्म -
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
नृपा कलि बळी मोठा वाढता नेइ सत्य हा ।
क्षमा शौच दया धर्म नेई आयु बलो स्मृती ॥ १ ॥
श्रीमंता कलियूगात कलीन गुणि मानिती ।
सोयीचा करिती धर्म न्याहही पाहिजे तसा ॥ २ ॥
कुलशील कलि माजी विवाहीं नच पाहती ।
युवा नी युवती मध्ये होतील प्रीतिसंग ते ॥
व्यव्हारी सत्य ना राही कापट्य चतुराइ ती ।
रतिकौशल्य श्रेष्ठत्व पवीतधारि तो द्विज ॥ ३ ॥
आश्रमा वस्त्र दंडोची कळेल कोण तो त्सा ।
लाच ना देइ तो त्याला न्यायही न मिळेल की ।
वाक्पटुत्वाचि ते लोक विद्वान मानितील हो ॥ ४ ॥
गरीबा मानिती पापी पाखंडी साधु होय तैं ।
हुंडा मोथाच वाढेल विधि तो नच राहि की ॥ ५ ॥
दूरचे जळ ते तीर्थ लाअण्य केश राखणे ।
चरितार्था पुरुषार्थो धीट तो सत्य होय की ॥ ६ ॥
कुटुंबा पोषि तो दक्ष यशार्थ धर्म सेविती ।
दुष्टां गौरवची वाटे बळी तो नृप होय की ॥ ७ ॥
समान चोर नी राजे होतील नृप क्रूर ते ।
प्रजेच्या लुटिती पत्न्या पळेल भिउनी प्रजा ॥ ८ ॥
शाका कंद मुळे मांस मध नी फळ फूल नी ।
बीज कोयाहि खावोनी प्रजा तेंव्हा जगेल की ॥ ९ ॥
करची अक्र वाढेल दुष्काळ पडतील ते ।
वाढेल ऊन्ह थंडी नी वारा ही तैंच होय की ।
उत्पात लढण्या मध्ये गलित जन होत तै ॥ १० ॥
क्षुधा तृष्णिच हो लोक रोग कोणा न सोडिती ।
कलीत सर्व लोकांची आयु तीसचि वर्ष ते ॥ ११ ॥
सान क्षीण असे देहे कलीत जन्मतील की ।
नासेल वेदमार्गी हा धर्म ना तो देसेलची ॥ १२ ॥
होईल धर्म पाखंड लुटितील न्रुप प्रजा ।
चोरी हिंसा कुकर्मींनी लोक ते जगतील की ॥ १३ ॥
शूद्रवत् सर्व ते लोक गाई शेळ्यांपरीच त्या ।
सान नी अल्प दुग्धाच्या होतील त्या कलीत की ॥
संन्यासी बांधुनी गेह गृहस्था परि राहती ।
लग्न संबंधियांनाच संबंधी मानितील ते ॥ १४ ॥
धान होईल ते सान काटेरी वृक्ष माजती ।
विजांसह ढग येती न पडे वृष्टि त्यातुनी ।
सत्कार श्रुतिघोषो वा जन संख्या घटोनिया ॥ १५ ॥
स्वभाव कलिच्या अंती गाढवा परि दुःसह ।
होवोनी विषयी ओझे वाह्तीलचि सर्व ते ।
धर्म रक्षावया तेंव्हा भगवान् प्रगटे पुन्हा ॥ १६ ॥
चराचरगुरूविष्णु सज्जना रक्षिण्यास नी ।
उद्धार करण्या येई प्रगटोनी पुनः पुन्हा ॥ १७ ॥
शंभलग्रामि तो विष्णु संत श्रेष्ठ द्विजाचिया ।
विष्णुयशा घरी जन्मे कल्कि नामे पहा हरी ॥ १८ ॥
देवदत्त अह्सा नामे शीघ्रगामीच अश्व जो ।
आरूढ त्या वरी होता घेईल खड्ग कल्कि तो ॥ १९ ॥
रोम रोमातुनी तेज दिशांना पसरेल की ।
कोटि कोटि हि दुष्टांना नृपा संहारिल प्रभू ॥ २० ॥
दुष्टा संहारिता कल्की पावित्र्ये सर्व ती प्रजा ।
हृदयीं भरुनी राही होईल वायु गंधित ॥ २१ ॥
तयांच्या हृदया मध्ये वसुदेव विराजुनी ।
पुष्ट हृष्ट प्रजा होय बलवान् पहिल्या परी ॥ २२ ॥
मन मोहन तो स्वामी प्रगटे कल्कि रूपि तो ।
सत्ययुग तदा येई सत्वयुक्तचि सर्व ते ॥ २३ ॥
चंद्रमा गुरु नी सूर्य पुष्प नक्षत्रि पातता ।
एक राशीस येता तैं आरंभ सत्ययूगिचा ॥ २४ ॥
परीक्षित् चंद्र नी सूर्य वंशाचे जेवढे नृप ।
संक्षीपे सर्व ते मी तो आपणा सर्व बोललो ॥ २५ ॥
पासोनी तव जन्माच्य नंदराजाऽभिषेकचा ।
एक हजार शत नी पंधरा वर्ष काळ हा ॥ २६ ॥
सप्तर्षी उदया वेळी दिसती दोनची पुढे ।
दक्षिणोत्तर त्या रेषीं दिसती अश्विनी पहा ॥ २७ ॥
नक्षत्रा सह ते सप्त फिरती शतवर्ष ते ।
तुझ्या जन्मी मघा तेची आजही दिसते पहा ॥ २८ ॥
विष्णू भगवतो भानू क्रृष्ण तो करुनी लिला ।
जाताचि निज धामा मनुष्यबुद्धि संपली ॥ २९ ॥
माधवो ठेविता पाय आपुले धरणीस या ।
कली तो धरणीला या कधीच स्पर्श ना करी ॥ ३० ॥
कलिची आयु ती देव वर्षे द्वादश ती असे ।
मनुष्य गणना वर्षे चौ लक्षहुनि जास्तची ॥ ३१ ॥
पूर्वाषाढात सप्तर्षी नंदाचे राज्य ते तदा ।
वृद्धी होईल तेव्हाच्या पासुनी कलिची तसी ॥ ३२ ॥
ज्ञाते ते इतिहासाचे वदती कलिपातला ।
कृष्ण जैं निजधामाला गेले त्या दिनिची असा ॥ ३३ ॥
देवतागनना वर्षे हजार संपती तदा ।
भगवान् कल्कि रूपाने स्पर्शिता युग सत्य ये ॥ ३४ ॥
संक्षेपे मनुचा वंश परीक्षित् वर्णिला असे ।
परंपरा अशा विप्र वैश्य शूद्रासि त्या पहा ॥ ३५ ॥
ज्या ज्या त्या पुरुषा संता वर्णिले नाव फक्त ते ।
आज शेष तशी कीर्ती ऐकण्या मिळते पहा ॥ ३६ ॥
शंतनू बंधु देवापी इक्ष्वाकुवंशिचा मरु ।
कलापग्रामि ते दोघे जिवंत युगयुक्त ते ॥ ३७ ॥
कलि हा संपता भगवान् कल्किने सांगता तया ।
वर्ण आश्रम तो पूर्ण विस्तार करितील ते ॥ ३८ ॥
कृत त्रेता नि द्वापार कलिच्यासह चारही ।
क्रमाने युग ते येती प्रभाव दाविती तसा ॥ ३९ ॥
परीक्षित् तुजला राजे वदलो त्याहुनी नृप ।
मी मी ते म्हणती कैक आले मेले कितीक ते ॥ ४० ॥
राजाही असला कोणी मरता घाणची उरे ।
शरिरे त्रासिता अन्यां उघडे नर्कद्वार ते ॥ ४१ ॥
विचार करिती कोणी आजोबा बाप आणि मी ।
आहोत नृअप्ती तेंव्हा पुत्र नातूस ते मिळो ॥ ४२ ॥
मूर्ख ते मातिच्या देहा मानिती आपुला तसे ।
धरेसी मानिती हक्क मरता दोन्हिही सरे ॥ ४३ ॥
बळाने तो ग्रासितो आहे कहाणी नावची उरे ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ २ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|