समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय १ ला
कलियुगाच्या राजवंशाचे वर्णन -
राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
स्वधामा कृष्ण ते जाता कोणाचे राज्य जाहले ।
कोणती पुढती होती कृपया सांगणे मज ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
नवव्या स्कंधि हे सर्व तुम्हा मी वदलो असे ।
बृहद्रथाचिये वंशी अंत्य राजा पुरंजय ।
शुनको मंत्रि हा त्याचा साधील वध स्वामिचा ॥ २ ॥
प्रद्योता अभिषेकिल राज्य सारे पहावया ।
तयाचा पालको पुत्र विशाखयूप त्याजला ।
तयाच्या राजको याला नंदिवर्द्धन पुत्र हा ॥ ३ ॥
प्रत्योदन असे पाच एकशे अडतीस ते ।
वर्षची पृथिवीचे या राज्याला भोगितील की ॥ ४ ॥
शिशुनाग पुढे होई तयाचा काकवर्ण तो ।
तयाचा क्षेमधर्मा नी क्षेत्रज्ञ क्षेमधर्मचा ॥ ५ ॥
तयाचा विरधो आणि अजातशत्रु हा तया ।
पुढती दर्भको याला अजेय पुत्र होइ तो ॥ ६ ॥
नंदवर्धन हा त्याचा महानंद तया पुढे ।
वंशी त्या शिशुनागाच्या होतील दश हे नृप ॥ ७ ॥
तीनशेसाठ वर्षे हे करिती राज्य पृथ्विचे ।
महानंदीस शूद्रा या पत्निला नंद होय तो ।
महानंदा महापद्म निधिचा तो अधीपती ॥ ८ ॥
महापद्म असे नाव पडले त्याजला दुजे ।
विनाश करि हा सार्या क्षत्रिय राजवंशिचा ।
शूद्र होतील राजे तै अधार्मिक असेहि की ॥ ९ ॥
नोल्लंघी शासना कोणी एकछत्रीचि हा नृप ।
मारील क्षत्रिया सार्या दुसरा पर्शुरामची ॥ १० ॥
सुमाल्य आदि त्या आथ पुत्र होतील भूपती ।
भूवरी शत वर्षे ते चालवीतील शासन ॥ ११ ॥
चाणक्य नावचा विप्र नष्टील नंदवंश तो ।
नृपती मौर्यवंशाचे शासितील धरेस या ॥ १२ ॥
चंद्रगुप्तहि तो विप्र अभिषिक्त करील नी ।
तयाच्या वारिसाराला अशोकवर्धनो पुढे ॥ १३ ॥
अशोका सुयशो पुत्र तया संगत हा पुढे ।
संगता शालिशूको नी सोमशर्मा तयास तो ॥ १४ ॥
पुढेती शालिधन्वा नी तयाचा तो बृहद्रथ ।
दहा ते कलियूगात शतछत्तीस वर्ष ते ।
करितील पुढे राज्य कलीत पृथिवी वरी ॥ १५ ॥
बृहरथास मारील त्याचा सेनापती पहा ।
पुष्पमित्र तथा शुंग स्वयें होईन तो नृप ।
तयाला अग्निहोत्रोनी तया पुत्र सुज्येष्ठ तो ॥ १६ ॥
सुज्येष्ठाला वसुमित्रो तयाच्या भद्रका पुढे ।
पुलिंदा घोष हा पुत्र घोषाचा वज्रमित्र तो ॥ १७ ॥
वज्रमित्रा भागवतो तयाचा देवभूति तो ।
दहा हे शुंग वंशाचे नृपती पृथिवीस या ।
शत द्वादश वर्षे ही राज्यास करितील की ॥ १८ ॥
शुंगांचा संपता काळ कण्व वंशीय भूपती ।
अपेक्षा गुणवत्तीने कमीच ठरतील ते ॥ १९ ॥
शुंगांचा अखरी राजा लंपटो देवभूतिला ।
मंत्री जो कण्ववंशीचा वसुदेव वधील की ॥
करील राज्य चातूर्ये तयाचा भूमि मित्र नी ।
त्याच्या नारायणो पुत्रा सुशर्मा कीर्तिमान् पुढे ॥ २० ॥
काण्वायन अस् चौघे तीनशे पंचचाळिस ।
वर्षे तया कली माजी राज्य हो करतील की ॥ २१ ॥
सुशर्म्यां बलि हा शूद्र आंध्रजाती नि दुष्ट तो ।
मारोनी राज्य घेवोनी करील कांहि काळ नी ॥ २२ ॥
पुढती कृष्ण हा त्याचा बंधू होईल भूपती ।
श्रीशांतकर्ण हा त्याचा पौर्णमास तयास हो ॥ २३ ॥
लंबोदर तया पुत्र तयाचा चिबिलक् पुढे ।
मेघस्वाति चिबिलका तयाचा अटमान नी ॥ २४ ॥
अनिष्टकर्म्यां हालेय हालेया तलको पुधे ।
पुरीषभिरुला पुत्र सुनंदनृप होय तो ॥ २५ ॥
चकोर होइ त्या पुत्र चकोरा बहु नावचे ।
होतील आठते त्यात सान जो शिवस्वाति तो ॥
होईल वीर तो मोठा मर्दील शत्रु थोर ते ।
तयाला गोमती पुत्र तयाला पुरिमान् पुढे ॥ २६ ॥
मेदाशिरा तया पुत्र तयाचा शिवस्कंद नी ।
तयाच्या यज्ञश्री याच्या विजया दोन पुत्र ते ।
तयांचे नाम हे ऐसे चंद्रविज्ञ नि लोमधी ॥ २७ ॥
चारशे छप्पनी वर्ष तीस राजे असे पुढे ।
करितील पहा राज्य भूवरी रे परीक्षिता ॥ २८ ॥
आवभृती नगरीचे सात आभीर नी दहा ।
गर्दभी कंक ते सोळा लोभाने राज्य पाहती ॥ २९ ॥
पुन्हा ए यवनी आठ तुर्की चौदा तसे पुन्हा ।
गुरुंड ते दहा तैसे होतील मौन द्वादश ॥ ३० ॥
एक हजार नी तैसे नव्यान्नवहि वर्ष ते ।
करितील तसे राज्य तीनशे वर्ष मौनचे ॥ ३१ ॥
संपता राज्यकालो हा किल्किला नगरीत तो ।
भूतनंदन हा राजा करील राज नीपुढे ॥ ३२ ॥
वंगिरी नी तया बंधू शिशुनंदि तसाच तो ।
यशोनंदि प्रविरको ऐकशे वर्ष नी सहा ।
पृथिवी करि ते राज्य करितील तसे पहा ॥ ३३ ॥
तयांचे पुत्र ते तेला बाल्हीक नाम हे तया ।
पुष्पमित्र पुढे क्षात्रपुत्र दुमित्र तो नृप ॥ ३४ ॥
बाल्हीक सर्व ते राज विभिन्न प्रांत घेउनी ।
अंधकी कोसली तैसे निषधी स्वामि ते पहा ॥ ३५ ॥
विश्वस्फूर्जी जया नाम दुसरा तो पुरंजय ।
विप्रादी उच्चवर्णींना जातीभ्रष्ठ करील तो ॥ ३६ ॥
नाशील वर्ण तो चारी शूद्रप्राय करील की ।
बळाने नागवी क्षात्रां पद्मावतिस राहुनी ।
पूर्व पश्चिमते राज्य करील दृध आपुले ॥ ३७ ॥
वाधेल कलि हा जैसा सर्व प्रांतात विप्र ते ।
संस्कारशून्य होतील राजेही शून्यवत् तसे ॥ ३८ ॥
सिंधू नी चंद्रभागा नी कौंती काशिमिर मंडली ।
नामधारी द्विजांचे नी म्लेंच्छ राजच होय मी ॥ ३९ ॥
कंजूष नि निधर्मी ते होतील सर्व भूपती ।
सान थोर अशा शब्दा होतील क्रोधमान ते ॥ ४० ॥
मुले स्त्रिया नि गाईंना विप्रांना मारण्यास ते ।
धजतील तसे स्त्री नी धनाते लुटतील की ।
शक्तिनी आयुही त्यंची अत्यल्प होय ती तदा ॥ ४१ ॥
संस्कारा त्यजुनी सर्व कर्म कर्तव्य तोडिती ।
तमाने अंध ते होता राजवेषात म्लेंच्छची ।
लूटमार करोनीया प्रजेचे रक्त शोषिती ॥ ४२ ॥
होता राजे असे सारे प्रजा होईल ती तशी ।
शोषितील तयां राजे एकमेकास पीडिता ।
सर्वच्या सर्व ते अंती विनाश पावतील की ॥ ४३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ १ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|