समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ३ ला
राज्य, युगधर्म, कलिदोषापासून वाचण्यास युगधर्म -
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
जिंकिण्या पाहती राजे पृथिवी हासुनी वदे ।
मृत्यूचे खेळणे हे तो जिंकिण्या पाहती मला ॥ १ ॥
ठावे त्यांनाहि मृत्यू तो तरी व्यर्थचि इच्छिती ।
फुग्याच्या सारखा जीव फसती त्या विसंबुनी ॥ २ ॥
इच्छिती इंद्रिया जिंकू स्वल्प तैं अरि बाह्यचे ।
जिंकोनी मंत्रि नी नेते सेना सर्व तशीच नी ।
विजये मार्गिचे काटे सहजी सारु सर्व ते ॥ ३ ॥
क्रमे सम्राट होवोनी समुद्र खंदकोचि की ।
विचार करिता ऐसा न स्मरे मृत्यु त्याजला ॥ ४ ॥
मिळता एक ते द्वीप उत्साहे चालतो पुढे ।
चित्तरोधे मिळे मोक्ष कष्टता तुकडा मिळे ॥ ५ ॥
पृथिवी वदते थोर आले गेले रितेच की ।
मूर्ख राज मला युद्धी जिंकाया पाहती पहा ॥ ६ ॥
स्वामित्व मानिता माझे जेवढे दृढ निश्चये ।
आपसी वाढते वैर लढती पुत्र बंधुही ॥ ७ ॥
वदती आपसा मध्ये मूढा ही पृथिवी मम ।
या परी वदता राज लढती रमती स्वयें ॥ ८ ॥
पृथू पुरुरवा गाधी नहूष भरतोऽर्जुन ।
मांधाता सगरो राम खट्वांग धुंधु नी रघु ॥ ९ ॥
तृणबिंदु ययाती नी शर्याति शंतनू गय ।
भगीरथो कुलयाश्व कुकुत्स्थो नल नी मृग ॥ १० ॥
हिरण्यकशिपू वृत्र रावणो लोकद्रोहि तो ।
नमिची शंबरो भौम हिरण्याक्षो नि तारको ॥ ११ ॥
अनेक थोर ते राजे दैत्य नी नृपती तसे ।
सर्वची ज्ञानि नी शूर सर्वची अजितो पहा ॥ १२ ॥
परी मेलेचि ते सारे मजला प्रेम लावुनी ।
काळाने ग्रासिले त्यांना कथा ती शेष राहिली ॥ १३ ॥
( इंद्रवज्रा )
झाले जगी कैक प्रतापी वीर
जगी यशा विस्तरुनीहि गेले ।
मी जे तुला ज्ञानचि बोललो ते
वाणीविलासे नच सत्य त्यात ॥ १४ ॥
नाशी अशूभा हरिची कथा ही
मोथे महात्मे म्हणुनीच गाती ।
जो प्रेम ठेवी हरिपादपद्मी
त्याने हरीचे गुण ऐकणे ते ॥ १५ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
कलीत राशि दोषाच्या मला तो दिसतात की ।
लोके त्या समयी काय करणे दोष नष्टिण्या ॥ १६ ॥
युगांचे रूपे नी धर्म कल्पाची स्थिति नी लय ।
भगवत्काल रुपाचे यथावत् सांगणे मला ॥ १७ ॥
कृतयुगात धर्माला असती चार पाय ते ।
सत्य दया तपो दान धर्म तो भगवद्रुप ॥ १८ ॥
तदा दया नि संतोषे शंतीने लोक राहती ।
द्वंद्वा समान पाहोनी बव्हंशी स्वरुपी स्थित ॥ १९ ॥
चारपाय अधर्माला खोटे हिंसा नि भाडणे ।
असंतोष, तसाच त्रेतीं चौथाइ धर्म क्षीण हो ॥ २० ॥
द्विजांची शक्ति तैं दृष्टी हिंसी लंपट ना कुणी ।
कर्मकांडी तपी सर्व धर्मार्थ काम सेविती ॥ २१ ॥
द्वापारी तो असंतोष हिंसा खोटे नि द्वेष तो ।
वाढता तप सत्यो नी दया दानहि अर्ध हो ॥ २२ ॥
यश वेद तसे कर्मीं लोक तत्पर राहती ।
संयुक्त सुखि नी श्रीमान् द्विज क्षात्र प्रधान तैं ॥ २३ ॥
कलीत क्षीण हो धर्म चवथाई उरे तदा ।
अंति तो सर्वचि लोपे अधर्म पूर्ण वाढतो ॥ २४ ॥
क्रोधी लोभी दुराचारी स्पर्धेने लोक सर्व ते ।
बांधिती वैर ते अन्यां शूद्रा प्राधान्य येतसे ॥ २५ ॥
सत्व रज तोमो हे तो पुरुषीं गुण राहती ।
कली संचरता अंगी शरीर पाण जाळिती ॥ २६ ॥
मन इंद्रिय बुद्धीसी सत्त्व जैं स्थिर होतसे ।
तप नी ज्ञान जै प्रीय मानावे सत्ययूग ते ॥ २७ ॥
प्रवृत्ति रुचि नी धर्म सुखाची वृत्ति वाढता ।
रजोवृत्ति स्थिरावे तै त्रैता हे युग मानणे ॥ २८ ॥
असंतोष तसा लोभ दंभ मत्सर गर्व तो ।
वाढता स्फूर्ति ये लोका द्वापारी रज नी तमे ॥ २९ ॥
हिंसा विषाद नी खोटे शोक मोह भयो तसे ।
निद्रा नी दीनता वाढे तमी तो कलियूग की ॥ ३० ॥
कलिचे राज्य ते येता क्षुद्रा दृष्टीच होतसे ।
निर्धनी बहु खादाड मंदभाग्य नि कामुका ।
स्त्रियात दुष्टता वाढे स्वैराचारीहि होत त्या ॥ ३१ ॥
सर्वत्र माजती चोर पाखंडी धर्म सांगती ।
राजा शोषी प्रजेला नी शिश्नोदर द्विजांप्रिय ॥ ३२ ॥
ब्रह्मचारी अपवित्र गृहस्थ भीक मागती ।
वानप्रश्ती वसे ग्रामीं संन्यासी धनलोभि ते ॥ ३३ ॥
सान स्तिर्या नि खादाड संतान बहु वाढते ।
सोडिती लाज लज्जा नी कर्कशा कपटी धृता ॥ ३४ ॥
व्यापारी काडी साठी दुजांना फसवी पहा ।
आपत्ती नसुनी हीन उद्योगा धनि लागती ॥ ३५ ॥
चन जाताचि ते भृत्य मालका सोडिती पहा ।
जुन्या भृत्यास ते स्वामी संकटीं सोडिती तसे ।
भाकडा गायही लोक विकिती मोल घेउनी ॥ ३६ ॥
पितरे बंधु नी मित्रा त्यजुनी पत्नि मेहुणे ।
ययांची घेतसे राय दीन स्त्रैण कलीं नर ॥ ३७ ॥
तपिंचा वेष तो शूद्र घेतील दान मागण्या ।
मुळीच नसता ज्ञान उच्चआसनि बोधिती ॥ ३८ ॥
दुष्काळी कर ना शक्य भयभीत प्रजा तदा ।
अस्थिपंजर ते लोक तुकडे धुंडितील की ॥ ३९ ॥
कलीत भाकरी पाणी वस्त्र नी झोपण्या भुमी ।
दांपत्य जीवना स्नाना नटण्या सुविधा न तैं ।
आकृती प्रकृती चेष्टा पिशाच्या परि होत ते ॥ ४० ॥
कौडिलोभे हि मित्राला मित्र ते तोडितील की ।
वधिती दमडीसाटी मरती त्याच त्या परी ॥ ४१ ॥
कलीत माय बापांना मुले ते पोषितीच ना ।
निपूण युक्त पुत्रांना वेगळे बाप ठेविती ॥ ४२ ॥
( इंद्रवज्रा )
जगद्गुरू नी पितरो हरीच
ब्रह्मादि त्याचे नमितात पाय ।
कलीत पाखंडचि माजता ते
न कोणि पूजी हरिच्या पदासी ॥ ४३ ॥
भावे तसे ठेचहि लागल्यास
मृत्यूशि त्याचे स्मरताच नाव ।
तो बंध तोडी गति उत्तमा दे
परी कलीमाजि न आथवे ते ॥ ४४ ॥
( अनुष्टुप् )
कलिचे दोष ते कैक स्थानही भ्रष्टती तदा ।
हृदयो मूळ दोषाचे हरी त्या भगवान् हरी ॥ ४५ ॥
भगवद् गुण रूपो नी लीला नामास ध्यायिता ।
हृदयीं वसतो नित्य पापांच्या राशि जाळितो ॥ ४६ ॥
सोन्याचा मळ जैं अग्नि जाळोनी संपवीतसे ।
हृदयीं स्थिरता विष्णु अशूभ सर्व संपते ॥ ४७ ॥
( इंद्रवज्रा )
विद्या तपो प्राणनिरोध मैत्री
तीर्थे व्रते दान नि जाप्य तैसे ।
न होय याने हृदयात शुद्धी
होते जसी विष्णु ध्याता हृदेयी ॥ ४८ ॥
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! तव मृत्यू तो पातला सावधान हो ।
हृदयासनि त्या कृष्णा स्थापिता सद्गती मिळे ॥ ४९ ॥
सर्वांनी भगवान् ध्यावा पातता मृत्यु आपुल्या ।
सर्वात्मा लाविता ध्यान आपुले रूप देतसे ॥ ५० ॥
कलि हा दोषभांडार परी सद्गुण एक तो ।
कीर्तनी कृष्ण तो गाता परमात्माचि लाभतो ॥ ५१ ॥
कृतीं विष्णूस त्या ध्याता त्रेतात यज्ञि पूजिता ।
द्वापारीं पूजिता तैसे कलीत कीर्तने मिळे ॥ ५२ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ ३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|