[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
( अनुष्टुप् )
साधके शरणी यावे सावधे धर्म माळिणे ।
निष्काम आश्रमो वर्ण कुळाचारास सेविणे ॥ १ ॥
निष्काम्यां धर्म पाळावा तेणे शुद्धचि चित्त हे ।
विषया विषयी सत्य मानिता दुःखची मिळे ॥ २ ॥
स्वप्नात भोगिता वस्तु कल्पना सर्व व्यर्थ त्या ।
भेद बुद्धि तशी व्यर्थ द्वंद्व सर्वचि व्यर्थ ते ॥ ३ ॥
कर्म निष्काम भजके करो, सकाम ते त्यजो ।
ज्ञान जिज्ञासु त्यांना तो कर्म विधि न आवडो ॥ ४ ॥
अहिंसादि यमो व्हावे नियमी आत्मज्ञान हो ।
मजला जाणता ऐसा गुरु शांतचि सेविणे ॥ ५ ॥
न व्हावा गर्व नी द्रोह दक्ष हो नच आळसी ।
श्रद्धेने सेविण्या पाय ममत्व नच ठेविणे ॥
सावधाने करो कर्म परमार्थचि इच्छिणे ।
गुण दोष न काढावे व्यर्थ ते बोलणे नको ॥ ६ ॥
जिज्ञासूंचे धनो आत्मा स्त्री-पुत्रे बघणे तया ।
ममत्व नच ठेवावे उदास नित्य राहणे ॥ ७ ॥
उद्धवा चुलिचा अग्नि-प्रकाशज्योत भिन्न ती ।
स्थूळ सूक्ष्म द्वयो देह आत्मा भिन्न प्रकाशक ॥
अनित्य जड हा देह आत्मा चेतन नित्य तो ।
देहाहून असा आत्मा विलक्षण महानची ॥ ८ ॥
जळती लाकडे कैक अग्नि ना वाकडा तसे ।
आत्म्याला गुण ना होती देहात असती जसे ॥ ९ ॥
मायेने निर्मिला देह आत्म्यां आरोप होतसे ।
जन्मे मरे तसा भास ज्ञानाने मूळ ते तुटे ॥ १० ॥
म्हणोनी स्वरुपा ध्यावे अद्वैत स्थित जे हृदीं ।
ज्ञानाने संपती देह क्रमाने शून्य होइजे ॥ ११ ॥
मेळाया ज्ञान अग्नी तो अरणी गुरु शिष्य ते ।
मध्यकाष्ठ उपदेश सुखदो अग्नि तो मिळे ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा )
विशारदो घेइ विशुद्ध ज्ञान
नी जाळि माया विषयी गुणांची ।
राही तदा शेषचि एक आत्मा
ज्ञानाग्नि ही तो मग शांत होई ॥ १३ ॥
( अनुष्टुप् )
कदाचित् कर्मकर्ता तू मानिता प्रिय उद्धवा ।
जीवसृष्टी तसे काल वेद आत्माहि नित्य हे ॥ १४ ॥
घट पटासि आकाशा अंदाजे जाणिसी तयां ।
अनर्थ समजी सारा मुक्ती ना मिळते कधी ॥
काळाला मानिता सत्य जन्म मृत्यूहि सत्य हो ॥ १५ ॥
कर्म कर्ता नि भोक्ता तो परतंत्रचि होतसे ।
स्वतंत्र असता त्याला दुःख का भोगणे मिळे ॥ १६ ॥
तेणे जीवास मुक्ती ती कधीही मिळु ना शके ।
परतंत्र असा जीव परमार्थ न तो घडे ॥
स्वार्थ नी परमार्थाला राही वंचित सर्वदा ॥ १७ ॥
विद्वाना मिळते दुःख मूर्खाला नच ते कधी ।
बुद्धिने सुख मी घेतो वदता गर्व व्यर्थ तो ॥ १८ ॥
जर ते मानिले सत्य दुःखनाशासि जाणिती ।
मग ते मानणे त्यांना मृत्यु तो नच येई की ॥ १९ ॥
शिरासी मृत्यु तो येता सुख ते काय देतसे ।
फाशीला निघता प्राणी स्त्री चंदन तोषि कां ? ॥ २० ॥
इह नी परलोकीचे दोषयु्क्तचि ते सुख ।
आसुया राहि थोरांची नष्टते दिन एक ते ॥ २१ ॥
निर्विघ्न जाहला यज्ञ तर तो स्वर्ग लाभतो ।
तयाच्या प्राप्तिचे सारे सांगतो ऐक हे असे ॥ २२ ॥
यज्ञे आराधिता देवां स्वर्ग तो प्राप्त होतसे ।
पुण्यकर्मे तिथे भोगी देवतांसम भोग ते ॥ २३ ॥
पुण्यानुसार तै त्याला विमान शुभ्र ते मिळे ।
देवींच्या सह तो त्यात विहार नित्यची करी ॥
गाती गंधर्व त्यां गान इतरां लोभवी रुपें ॥ २४ ॥
विमान चालते इच्छें घंटानाद दिशांत तो ।
क्रीडतो अप्सरादीत न स्मरे पुण्य ते सरे ॥ २५ ॥
शेष पुण्यें तिथे राही मजेत स्वर्गि त्या पहा ।
संपता पुण्य ते त्याचे इच्छा त्याची असो नसो ॥
पुन्हा खाली घडे येणे काळाची गति ती अशी ॥ २६ ॥
दुष्टांच्या संगतीमध्ये अधर्मी घडतो असा ।
स्वैराचारी तसा वागे इंद्रिया वश राहुनी ॥ २७ ॥
प्राण्यांना बळि तो देतो भूत प्रेतासची भजे ।
शेवटी नरकीं जातो अंधारी फिरणे घडे ॥ २८ ॥
सकाम कर्मि ते दुःख मोह मायेत गुंतणे ।
पुन्हा जन्मे पुन्हा मृत्यु मृत्युधर्मी न ते सुख ॥ २९ ॥
लोक नी लोकपालांची एक कल्पचि आयु ती ।
ब्रह्म्यासही भयो माझे दो परार्धची तो जगे ॥ ३० ॥
गुणांनी करिती कर्म कर्ता मानिति आपणा ।
तयांचे फळ ते लाभ सुख नी दुःखही तसे ॥ ३१ ॥
मी पणा असता देहीं एकतत्त्व न ते कळे ।
द्वैतमानी असा देहीं कर्माआधीन राहणे ॥ ३२ ॥
परतंत्र असे त्याला ईश्वरी भयही असे ।
परतंत्र्या न वैराग्य शोक मोह तया मिळे ॥ ३३ ॥
मायेच्या गुण क्षोभाने आत्म्याला काल जीव नी ।
वेद लोक स्वभावे नी धर्मादी नाम हे पडे ॥ ३४ ॥
उद्धवजीने विचारिले -
आत्मा देहात तो राही सुख दुःख कसे तया ।
निर्लेप असता आत्मा बंधनी पडतो कसा ॥ ३५ ॥
बद्ध मुक्त कसे होती ओळखावे कसे तयां ।
झोपणे चालणे खाणे तयांचे ते कसे असे ॥ ३६ ॥
अच्युता प्रश्न जाणाया श्रेष्ठ तूं, सांग हे मला ।
आत्मा अनादि संसर्गे नित्य बद्धचि भासतो ॥
असंग नित्य मुक्तोही भासतो भ्रमची पडे ॥ ३७ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ १० ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥