राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
कार्य गुण परा ब्रह्म श्रुति तो वर्णिती तया ।
निर्गुणा वर्णिती कैसे जेथ वाणी न पोचते ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
इंद्रीय मन नी बुद्धी जीवांना अर्पितो प्रभु ।
स्विकार करिता श्रद्धे मोक्षादि मिळती जिवा ॥ २ ॥
श्रुतिचे स्वरुपो ऐसे सनकादिकि धारिले ।
श्रद्धेने करिता कर्म तुटती सर्व बंध ते ॥ ३ ॥
अन्वया सांगतो गाथा हरि नारायणी अशी ।
संवाद नारदाचा नी श्रेष्ठ नारायणात जो ॥ ४ ॥
देवर्षि एकदा गेले फिरत बद्रिकाश्रमी ।
दर्शना भगवंताच्या, नारायण ऋषेश्वरां ॥ ५ ॥
कल्पारंभाहि पासोनी लोक कल्याण हेतुने ।
संयमे धर्म नी ज्ञाने तप ते नित्य साधिती ॥ ६ ॥
कलापग्रामिच्या सिद्ध-मुनिंच्या समुदायि त्या ।
नारदे बसता त्यांना प्रश्न हाचि विचारिला ॥ ७ ॥
नारायण तदा त्यांना उत्तरा बोलले जसे ।
पूर्वीही जनलोकांच्या लोकांना बोलले तसे ॥ ८ ॥
भगवान् नारायण म्हणाले -
एकदा जनलोकात सनकादिक संत जे ।
ब्रह्म्याचे मानसीपुत्र ब्रह्मसत्रात श्रेष्ठ त्या ॥ ९ ॥
श्वेतद्वीपी तदा तुम्ही आलेत मम दर्शना ।
चर्चा झाली तिथे छान नेति ज्यां श्रुति बोलती ।
तिथे प्रश्न असा झाला तुम्ही जो पुसला मला ॥ १० ॥
समान बंधु हे चारी शीले ज्ञाने तपे तसे ।
वक्ता सनंदनो झाले तिघे श्रोतेचि जाहले ॥ ११ ॥
सनंद म्हणाले -
गाती भूपाळि वंदी ते नृपाला उठवावया ।
नृपाचे गाउनी येश प्रभात समयास त्या ॥ १२ ॥
तसेचि श्रुतिही गाती उठाया लीन रूप ते ।
प्रलयांती असे गाती श्रुति त्या उठवावया ॥ १३ ॥
श्रुति म्हणतात -
( नर्कुटक )
जय जय हो तुझा रचिसि मिथ्यचि मोह हरी ।
तुजविण जीव ते न तरती भव सागरि या ॥
जरि असमर्थ् हो अम्हि तुझे गुण वर्णियण्या ।
सगुणरूपा स्वये धारिशि तै क्वचिदो सरलो ॥ १४ ॥
जगतचि ब्रह्म माणुनि अम्ही स्तवितो तुजसी ।
जगात तुझ्या मुळे प्रतित हो न विकार तुला ॥
शतमख रूप ते स्तवितसो रुप तेहि तुझे ।
सकल जगी तुझेचि रुप हे तव नामचि ते ॥ १५ ॥
गुणत्रय विश्व हे नटखटा तूचि नाचिविशी ।
म्हणवुनि संत ध्याती तुझिये कथनामृत ते ॥
मिटवुनि राग द्वेष गुण जो रुपि मग्नचि की ।
सकल मिटेचि ताप नि सुखी नित ते जगती ॥ १६ ॥
न भजति ते वृथा श्वसति जै श्वसि धौकनिची ।
मिळवुनि तत्व सृष्टि रचिशी अन मोह घडे ॥
नि तव कृपेचि ते कळते कि परा तयि तू ।
नच कळते उरे तव रुपो परि सत्यचि ते ॥ १७ ॥
मणििपुरा चक्रि अग्निरुपि ते ऋषि ध्याति तुला ।
अरुण जनो हृदी स्मरति ब्रह्म पाहती रुपा ॥
हृदय सुषुम्नि ब्रह्मकमला जइ मार्ग मिळे ।
पुढती वरिच ज्योति स्थळि जै नच जन्म पुन्हा ॥ १८ ॥
स्वकृत विचित्र योनि मधुनी प्रगटोनि रुपे ।
दिसशि जणू शिखा भडकती लघु थोर यज्ञीं ॥
न फसति संत हाट भरता मनहंसजनो ।
सकल रुपी तुझ्या बघति ते समभाव तसे ॥ १९ ॥
धरि तनु जीव आवरण ते न लिपे तयि ते ।
ऋषि वदती कि शक्तिरुप ते तव ना जरि तू ॥
मुनिपद ध्याति जीव स्वरुपा मनि जाणुनि तुझ्या ।
सकलचि वेदकर्म तुजशी मिळती सुटण्या ॥ २० ॥
नच परमात्म तत्त्व सुलभो कळण्या भगवन् ।
अवतरशी अम्हा समजण्या नि लिला करिशी ॥
पिउनी कथासुधा मन नवजे जरि मोक्ष उभा ।
नि परमहंस त्यागिति तसे गृह आश्रम तो ॥ २१ ॥
तव पथ साधना तनुचि दे प्रियप्राण तया ।
असशि, न ज्या फळ अवगती मिळेचि तया ॥
फळ निच कष्टदायिच मिळे पशु आदि जन्मी ।
नि भटकणे घडे भवभयीं जनना मरणा ॥ २२ ॥
ऋषि मुनि इंद्रिया वशविती नि तुला स्मरती ।
परि नवलो कि शत्रुसिहि ती मिळेच कृपा ॥
भुजि धरिशी प्रिया सुख तसे मिळतेहि अम्हा ।
तुज मनि नाचि भाव मुळिही जनि आप परा ॥ २३ ॥
नच कुणि जाणि रूप तव ते कि विरंचिही न तो ।
निजसि जधी जगा मिटवुनी नच साक्षि तया ॥
स्थुळ लघु ते हि ना उरतसे क्षण काल नुरे ।
नि सकल शास्त्रहि मिळती लिनत्वात तसे ॥ २४ ॥
जनमत ते असत् निपजते अन सत्य नष्टी ।
नि वदति आत्मरूप कितिको अन कर्म खरे ॥
भ्रम सकलो तसे वदति ते नच संशयहि तो ।
सकल परा नि ज्ञान नच रुपो नच वाद मुळी ॥ २५ ॥
त्रयगुण विश्व कल्पितचि हे न खरे पुरुषा ।
तव रुप सत्य श्रेष्ठचि वदो मुनि ज्ञानि तसे ॥
नृपवर कुंडले न त्यजिती नि सुवर्ण कळे ।
अनुभवि आत्मज्ञान म्हणती सकळ तुचि तो ॥ २६ ॥
भजति तुला जनो सकल आश्रय जाणुनि जे ।
मरणहि जिंकिती शिरि पदे चिरडोनि तया ॥
विमुख बुधास बांधि श्रुति ती पशु जै धरणे ।
नि भजक तो दुजा सहित तो करि पावन हो ॥ २७ ॥
करण नि साधनी परय तू सकली पुरा ।
स्वय बलि तेजहि स्वयचि हो न हवी तुजसी ॥
गरजचि इंद्रियी नृप जसा स्वया घोषित नी ।
पुजन करोनि घे तव रुपा जन पूजिति रे ॥ २८ ॥
अतित प्रभो जधी क्रिडसि तू मनि कल्पिशि तू ।
परम दयाळु तू नभ जसे नच आप परा ॥
मन गति वाणिची नच तुला नच रूप तुझे ।
नदिसशि शून्यची गमसि पै अधिनेत्र तुची ॥ २९ ॥
अपरिमिता ध्रुवो असशि रे जनिता हि तसा ।
सकलि वसो परि नच कळे कि कसे स्वरुपो ॥
वदति कि जाणिले परि मतिहुनि तू कि परा ।
मत-मत अंतरे मतपरा असशी कि प्रभो ॥ ३० ॥
निपज तुझ्या मुळे नच खरे परिणामचि तू ।
प्रकृति-पुरुष जन्म ना तया जल तोचि फुगा ॥
एक दुजिं कल्पना मधुमधे सकलो फुल जै ।
नचहि उपाधि तै तुज मुळी पारि हो सकलीं ॥ ३१ ॥
भटकति मायिके परि सतो समजोनि तसे ।
धरिति पदा तुझ्या भवभयी तरण्यासहि पहा ॥
अभजक तया सदैवचि भिती ऋतु जै सकला ।
शरणपदीं तया कसलि ती भविची भिती ॥ ३२ ॥
तपि वशितींद्रिये गुरुपदा न धरी जन त्या ।
श्रम पडती नि ना गवसता मन ते खचते ॥
अन त्रिपदा श्रमो घडतसे कि जहाजि जसे ।
वणिकहि नाविका विपदि ते बघता खचती ॥ ३३ ॥
स्वजन सुतो स्त्रि देह धन नी रथ गेह ययी ।
न सुख नि नश्वरो सकल ते भव दुःखचि ते ॥
सकल लयासि जाय रस ना तइ तो मुळि हो ।
अखिर मृत्तिकाचि सगळी सुख ती कइ दे ॥ ३४ ॥
विमलचि तीर्थ संतजन जे त्यजिती आपुला ।
तप धन गर्व तो पृथिविसी मळ नाशिति ते ॥
तवरुपि मोद घेवुनि मना तुज अर्पिति जी ।
न फसति गेहि देहि गुण संपविती रमती ॥ ३५ ॥
घटिं सत मृत्तिका न जरी भेद विवरणे पृथक् ।
जइचि सर्पहि रज्जुसि गमे नम स्वर्णी मुदीं ॥
जग गमतेहि सत्य नि असे व्यवहारिक खरे ।
भ्रम पडतो अम्हा न नित कर्म भजण्यासि ॥ ३६ ॥
नच जग पूर्वि न राहि पुढती म्हणुनी न खरे ।
जइ घट शस्त्र कुंडलि कि माति नि धातु खर्या ॥
तइ उपमाचि देति श्रुति केवल मात्र पहा ।
न मति जयासि सत्यचि म्हणती कि असत्यचि ते ॥ ३७ ॥
भ्रमुनिच जीव मेळवियला म्हणुनि भजतो ।
भवि पडतो न सर्प चिरगुटा मुळि अन्वयो तसा ॥
वसशिहि तू तसा षडगुणीं अपरिमितची ।
न कसल्या सिमा तुजसि नी नच बद्ध मुळी ॥ ३८ ॥
गळिं मणि राहि धुंडि जइ तै यति ना त्यजिता ।
मनजुट तोचि दुःखभर भरुनि भव भोगितसे ॥
नरकि पडे जनी मिसळता रमवि जो सकला ।
नच रुप जाणि ना सुटतसे नि अधर्मचि तो ॥ ३९ ॥
नच सुख दुःख संत जन त्यां निवृत्तिचि मिळे ।
न तनु बघे युगे बघतसे तुज नी भजतो ॥
गति उरशी फलो निजजना न निषेध उरे ।
हृदयि वसो तयां नित प्रभो गुण दिव्य रुपे ॥ ४० ॥
अधिपति इंद्रादिसे थांग नसे कि अनंतचि तू ।
दशगुणि सात आवरणि ब्रह्महि गोल जयी ॥
उदरि तदा सिमा कसलि तै श्रुति नेति वदे ।
सफल वदे निषेध करुनी तइअ वस्तुशि ती ॥ ४१ ॥
श्री भगवान् नारायण म्हणाले -
( अनुष्टुप् )
ब्रह्मत्म एकता ऐशी ऐकता सनकादिका ।
वाटले कृत कृत्यो नी पूजिलेहि सनंदना ॥ ४२ ॥
नारदा संत ते चौघे पूर्वजो जगतास या ।
रस हा चाखिला त्यांनी वेदांचे सर्वसार जे ॥ ४३ ॥
ब्रह्मपुत्र तुम्ही तैसे तयांचे वारसोच की ।
ब्रह्मविद्या स्मरोनीया विचरा पृथिवीस या ।
जळती वासना सर्व विद्या श्रेष्ठ अशीच ही ॥ ४४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
संयमी ज्ञानि नी पूर्ण देवर्षि ब्रह्मचारि ते ।
ऐकता धारिते झाले श्रद्धेने वदले पुन्हा ॥ ४५ ॥
देवर्षि नारद म्हणाले -
नमो तुला भगवते श्री कृष्णा शुद्धकीर्ति तू ।
कल्याणा अवतारो हा वारंवार नमो तुला ॥ ४६ ॥
महात्मा नारदो तेंव्हा नारायण नि शिष्य ते ।
वंदिता आश्रमी गेले माझिया पितयाचिया ॥ ४७ ॥
भगवान् वेद व्यासांनी केले स्वागत तेधवा ।
ऐकिले सर्व ते त्यांनी हासोनी वदले तया ॥ ४८ ॥
अगोचर परब्रह्मा श्रुति त्या स्तविती कशा ।
मन तेथे कसे पोचे प्रश्न हा तुमचा असे ॥ ४९ ॥
( शार्दूलविक्रीडित )
आदी मध्य अंति ही हरि वसे संकल्प तोची तया ।
जीवा स्वामिहि जन्मताचि वसतो जीवात जन्मीहि तो ।
ना हो भान सुषुप्ति तैचि भजणे तो वेगळा प्राकृता ।
तो एको अभयो चिरंतन तया चिंता मनीं जीव हो ॥ ५० ॥