राजा परीक्षित् म्हणाला -
( अनुष्टुप् )
बाणकन्या उषा हीस अनिरुद्धे वरीयले ।
ऐकिले तैचि कृष्णो नी शिवाचे युद्ध जाहले ।
विस्तारे कृपया सांगा वृत्तांत सर्व तो अम्हा ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
महात्मा बळीची वार्ता तुम्हा मी बोललो असे ।
तयाच्या शतपुत्रात बाणासुरचि ज्येष्ठ तो ॥ २ ॥
रमे तो शिवभक्तीत समाज मानिही तसा ।
उदार बुद्धिमंतो तो वचने सत्यची करी ॥ ३ ॥
शोणीतपुरि तो राही इंद्रादी देवता तिथे ।
सेवा ती करिती नित्य शिवाचीच कृपा तशी ।
सहस्र बाहुने वाद्ये छेडिता शिव मेळिला ॥ ४ ॥
शिव तो सर्व भक्तांना सदैव रक्षिता असे ।
प्रसन्ने वर त्यां देता वदला राहि या पुरीं ॥ ५ ॥
बल पौरुष गर्वात सोनेरी मुकिटा सह ।
शिवाला वंदुनी दैत्य मग तो बोलला असे ॥ ६ ॥
नमस्ते हो महादेवा त्रिलोकगुरु ईश्वरा ।
कल्पवृक्ष तुम्ही जीवा इच्छिले देतसा तुम्ही ॥ ७ ॥
हजार बाहु या तुम्ही मजला दिधल्या अशा ।
उगाच वाहतो भार लढाया वीर ना कुणी ॥ ८ ॥
लढाया खजवे हात दिग्गजो दूर धावती ।
म्हणोनी गिरि ते थोर बुक्क्यांनी कैक फोडिले ।
तुम्हीच लढण्या युक्त मजसी या त्रिलोकि की ॥ ९ ॥
प्रार्थना ऐकता ऐशी थोडेसे क्रोधले शिव ।
तुटेल ध्वज हा तेंव्हा युद्धात गर्व हा जिरे ॥ १० ॥
ऐकता शिववाणी ती मूर्ख हा वाट पाहि ती ।
जिच्यात बलवीर्याचा होणार नाश हा तसा ॥ ११ ॥
उषा बाणसुरां कन्या पाही स्वप्नात भोगिला ।
न ऐकिला अनिरुद्ध कधी जो पाहिला नसे ॥ १२ ॥
प्राणप्रीय कुठे तू रे वदता उठली असे ।
सख्यांना पाहता सार्या लाजली बहु ती मनी ॥ १३ ॥
बाणासुरास मंत्री जो कुभांड त्यास पुत्रि ती ।
चित्रलेखा असे नाम उषासी पुसले तिने ॥ १४ ॥
कोणा निश्चियले ना तू सुंदरी मीहि जाणिते ।
मग तू कोणत्या रूपा मनात कल्पिले असे ॥ १५ ॥
उषा म्हणाली -
सखे मी पाहिला स्वप्नी सावळा पद्मलोचनो ।
पीतांबर असे अंगी चित्ताचा चोरटा असा ॥ १६ ॥
अधरामृत जो पाजी पीते मी त पिते तसे ।
स्वपान सोडुनी गेला धुंडीते प्राणवल्लभा ॥ १७ ॥
चित्रलेखा म्हणाली -
त्रिलोकी धुंडुनी त्याला व्यथा मी शांत ती करी ।
रेखिते चित्र मी तैसे धुंडोनी आणिते पहा ॥ १८ ॥
वदता देव गंधर्व सिद्ध चारण पन्नग ।
दैत्य विद्याधरो यक्ष मनुष्य चित्र रेखिले ॥ १९ ॥
शूरसेनो वसूदेव कृष्ण नी बलरामाचे ।
प्रद्युम्न रेखिला तेंव्हा उषा ती बहु लाजली ॥ २० ॥
अनिरुद्धा उषा पाही तेंव्हा ती मान खालती ।
घालुनी हासली मंद वदली हाच गे प्रिय ॥ २१ ॥
योगिनी चित्रलेखेनें जाणिला कृष्ण पौत्र तो ।
रात्री आकाशमार्गाने द्वारकापुरि पातली ॥ २२ ॥
आपुल्या मंचकी तेंव्हा झोपले अनिरुद्ध ते ।
योगाने चित्रलेखेने उषेच्यापाशि आणिले ॥ २३ ॥
आनंदेपुहुलुनी तेंव्हा उषा त्या प्राणवल्लभा ।
सहीत रत ती झाली विहारे मंदिरी पहा ।
सुरक्षित् स्थान ते होते पुरुषीसावली नसे ॥ २४ ॥
दुणावे दिनि ते प्रेम निशीं चौपट जाहले ।
वस्त्र नी गजरे हार धूप नी गोड पेय ते ॥ २५ ॥
फराळ बोलणे गोड केली सेवा अशी तिने ।
भुलले अनिरुद्धो नी गेले तेथे बहु दिन ॥ २६ ॥
परीक्षित् ! सहवासे या उषाकौमार्य संपले ।
स्पष्ट ई जाहली चिन्हे प्रसन्न राहु लागली ॥ २७ ॥
रक्षके जाणिता राजा संबंध ओळखोनिया ।
बाणाला वदले तेंव्हा डाग हा लागतो कुळा ॥ २८ ॥
निशि दिनी प्रभो आम्ही महाला रक्षिले असे ।
पाहिले न तिने कोणा कलंक लागला कसी ॥ २९ ॥
चारित्र्य पुत्रिचे ऐसे सांगता द्वारपालने ।
दुःखाने पातला गेहीं अनिरुद्ध दिसे तिथे ॥ ३० ॥
( इंद्रवज्रा )
कामात्मजो तो अति सुंदरोकी
पद्माक्षश्यामो तइ पीतवस्त्र ।
बृहद्भुजा कुंडल केशकाळे
सुहास्य ओठी अति शोभले की ॥ ३१ ॥
प्रीयेसवे फासचि खेळताना
गळी फुलांची बहु माळ शोभे ।
वक्षस्थलाची उटी लागलेली
स्तिमीत बाणासुर होय तेंव्हा ॥ ३२ ॥
सैनीक होते सहही तयाच्या
सशस्त्र ऐसा बघता असूर ।
परीघ घेई अनिरुद्ध तेंव्हा
दंडावया जै यम पातला तै ॥ ३३ ॥
सैनीक येता धरण्यास त्याला
येईल त्याला वधिले तयाने ।
मांढ्या भुजा अंग तुटोनि कोणी
पळोनि गेले भयभीत होता ॥ ३४ ॥
बाणासुराने वध पाहिला तो
नी नागपाशे अनिरुद्ध यासी ।
बांधोनि टाली, बघता उषा ती
शोके विलापे रडु लागली की ॥ ३५ ॥