[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
गाईंना चारण्या रोज वनात कृष्ण जाय तैं ।
गोपिंचे मनही जायी गात त्या हरिच्या लिला ॥ १ ॥
( स्वागता )
गोपिका आपसात म्हणतात -
वामस्कंधि हरि टेकवि गाल
भुवई उडवी वंशिस छिद्रा ।
बोट चाळवितसे मऊ ऐसे
सिद्धपत्नि गगनी जमती त्या ॥ २ ॥
पाहता पतिसि लाजुनि जाती
काम विंधि विवशोनिहि जाती ।
गाठ ती सुटत वस्त्रहि जाई
ना मनास कळते रत होता ॥ ३ ॥
पाहि हा अतिव सुंदर आहे
हासता चमकती मणि सारे ।
श्याम मेघि बिजली जणु थांबे
चेतिण्या सजिव वंशिस फुंकी ॥ ४ ॥
नाद ऐकुनि पशू जमती तै
घास राहि मुखि चावुनि घ्याया ।
राहति स्थिरचि जै पुतळे ते
बासुरी तशिच मोहवि जीवा ॥ ५ ॥
बांधितो शिरि पिसे मयुराची
अंगि पुष्प अन पर्णहि खोची ।
गायि हाकरित तैं रुकती त्या
थांबतेहि जळ तैं यमुनेचे ॥ ६ ॥
श्री हरीच वळिता भुज कांपे
प्रेम हो बहुत ते मन कांपे ।
हातही विवश होवुनि थांबे
प्रेमवेग बहु होवुनि राही ॥ ७ ॥
देवता हरिचि कीर्तिच गाती
गान गाति हरिचे तयि गोप ।
नाम घेउनि जिवा हरि बाहे
वृक्ष ते लवुनि त्या नमिती की ॥ ८ ॥
वेलि सूचविति स्वै अभिविष्णु
फूल फूल हसते मन दावी ।
घोसते फळ फुले वदती ते
सर्व ते मधुरची गमते की ॥ ९ ॥
सौंदर्य जगिचिये हरिश्रेष्ठ
सावळ्यास उटि ती विलसे की ।
कंठि लांब रुळते वनमाळा
तुलसीदल तयी बहु गंधी ॥ १० ॥
वाजवी मुरलि तै खग हर्षे
राहिना मनहि ते मग त्यांचे ।
नेत्रचि मिटविती रमती ते
कृष्ण हा परम हंसचि वाटे ॥ ११ ॥
कुंडला परि धरी हरि पुष्पे
मोहवी जगत वंशिस फुंकी ।
विश्वची कवळितो रव तैसा
मेघनाद नच हो अपराधी ॥ १२ ॥
मेघ छत्र धरिती हरिसी की
जीवना हरिस भेटचि देती ।
वर्षती हळु तेहि तुषारे
देवता लपुनि पुष्प वहाती ॥ १३ ॥
येश्वदे चतुर खेळचि खेळे
प्रीय लाल सकला तव कान्हा ।
बासुरी न शिकला तरि गातो
गातसे ऋषभ आदि हि नादा ॥ १४ ॥
नच हरादिसी जो कळतो तो
मन न राहि करि गे अपुलीया ।
शिर झुके हरिचिया पुढती हे
हरिच हो मनहि राहि न शुद्धी ॥ १५ ॥
व्रजभूमि क्षत गोक्षुरि पीडे
गजगती धरुनिया हरि चाले ।
करि तदा धरुनि वंशिस फुंकी
रव अम्हा बहुहि गुंजवि नित्य ॥ १६ ॥
हलुहि ना शकतो जड जैसे
ना कळे सुटत हे कच केंव्हा ।
ना ठरे मनहि यातनु ठायी
वसन हे गळति या पृथिवीसी ॥ १७ ॥
तुलसि माल प्रियो हरिसी ती
तैचि त्या असति त्यागळिं कैक ।
हरि गिणी मणि मोजुनि गायी
कर ठिवी जवळिच्या सखयासी ॥ १८ ॥
हरि जधी रवफुकी तै वंशी
हरिणीही मनच त्या पदि देती ।
घरि असोनि मन तो हरि कृष्ण
पळतसो वनिच आम्हि न येतो ॥ १९ ॥
येश्वदा करिच कौतुक भाग्ये
लाडका हरि असे सुकुमार ।
प्रेमिका हरतर्हे सुखवी तो
गोपाबाळिं यमुनी तटि खेळे ॥ २० ॥
वायु तो मलयगंधित वाहे
सेवितो हरिसि या बहु लाला ।
देव गाति जणु भाटचि याचे
भेटि अर्पुनिहि तोषिति कृष्णा ॥ २१ ॥
गायिसी करितसे बहु प्रेम
तैचि हा गिरिधरी उचलोनी ।
येतसे बघ प्रिये हरि आता
शंकरादि करिती नमने त्यां ॥ २२ ॥
पातलाचि हरि हा बघ माळां
धूळती उडतसे बघ कैसी ।
चंद्रची हरि जसा थकता ही
कामना करिल तो बघ पूर्ण ॥ २३ ॥
नयन ते बघ की मद तेथे
सुचवितोचि जणू आपणा तो ।
बघ कपोल हरिचे किति छान
फळ गाबुळि ते की जणु ओठ ॥ २४ ॥
यदुपती मदन तो हरि येतो
गज जसा चलतसे निशि वेळी ।
मुदित हास्य करी हरि येता
जणु शशी उगवला बघ आम्हा ॥ २५ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
अशा व्रजस्त्रिया राजा ! कृष्णलीलाच गात त्या ।
कृष्णरूप अशा झाल्या वनात हरि जाय तै ।
हरिचे गुण गाण्यात तयांचा दिन जातसे ॥ २६ ॥