समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय २० वा

पुरूचा वंश, दुष्यंत व भरताचे चरित्र -

श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्‌)

राजा! आता पुरूवंश वर्णितो ज्यात जन्मले ।
राजर्षी कैक ब्रह्मर्षी तुझा जन्म तयातला ॥१॥
पुरूचा जनमेजेय प्राचिवान्‌ त्यासि प्रविरो ।
तयाच्या नमस्यू याला चारूपदचि पुत्र तो ॥२॥
त्याच्या सुद्यूस तो पुत्र बहुगवो नि त्या पुढे ।
संयातीसी अहंयाती रौद्राश्व त्याज जाहला ॥३॥
दहा इंद्रीय प्राणाशी घृताची अप्सरा कुशीं ।
ऋतेयू आणि कुक्षेयू स्थंडिलेयू कृतेयू नी ॥४॥
जलेयू संततेयू नी धर्मेयू आणि सत्ययू ।
व्रजेयू वनयू सान रौद्राश्वा पुत्र जाहले ॥५॥
ऋतेया रंति भारोनी तयाचे सुमति धृव ।
तिसरा अप्रतिरथो तयाचा कण्व पुत्र तो ॥६॥
मेधातिथि तया झाला जो प्रस्कण्व द्विजो पुढे ।
सुमतीपुत्र रैभ्यो हा दुष्यंत पुत्र तो तया ॥७॥
वनात एकदा जाता दुष्यंत सैन्य घेवुनी ।
कण्वाच्या आश्रमी गेला शिकार करूनी पुन्हा ॥८॥
देवमाया अशी तेथे पाहिली बैसली कुणी ।
लक्षुमी परि ती तेजे दुष्यंत मोहिला तिला ॥९॥
आनंदे भरला राजा काम जागृत जाहला ।
शीण जाता वदे हास्ये मधूर शब्द योजुनी ॥१०॥
सुंदरी कामलाक्षे तू कोण, कोणास पुत्रि तू ।
हृदयी ठसशी माझ्या वनात काय इच्छिसी ? ॥११॥
सुंदरी वाटते चित्ती क्षत्रीयपुत्रि तू असे ।
पुरुवंशीय आम्हाचे अधर्मी चित्त ना झुके ॥१२॥
तुमचे बोलणे सत्य मी पुत्री विश्वमित्राची ।
मेनका अप्सरा गेली आई सोडोनिया वनी ॥
पोषिता कण्व हे साक्षी सेवा काय करू तुम्हा ॥१३॥
पद्‌माक्षा बैसणे येथ स्वागतास स्विकारणे ।
इच्छिल्या भात तो खावा रुचल्या थांबणे इथे ॥१४॥

दुष्यंत म्हणाला -
कुशीकवंश उत्पन्ने अतिथ्य तव छान हे ।
राजकन्या स्वयं घेते वरोनी आपुला पती ॥१५॥
शंकुतला स्विकारी तैं दुष्यंते धर्म जाणुनी ।
गांधर्व विधिने केला तदा विवाह त्या द्वये ॥१६॥
दुष्यंतवीर्य ते श्रेष्ठ एकरात्रीच राहुनी ।
सकाळी नगरा आला समयी पुत्र जाहला ॥१७॥
कण्वे त्या राजपुत्राचे केले जातक त्या वनीं ।
बाळ ते बलवान्‌ ऐसे सिंहा बांधोनि खेळले ॥१८॥
बाळ तो भगवत्‌अंश बळशौर्यहि श्रेष्ठ तै ।
शकुंतला तया घेता पतीच्यापाशि आलि नी ॥१९॥
निर्दोष पत्‍नि पुत्रा त्या दुष्यंते ना स्विकारिले ।
आकाशवाणि तै झाली वक्ता ना दिसला कुणी ॥२०॥
भात्याच्या परि ती माता पित्याचा पुत्र होतसे ।
दुष्यंता नच द्वेषावे पुत्राला पोषिणे पहा ॥२१॥
राजा ! ते वंशिये पुत्र नर्कातु्नहि काढिती ।
शकुंतला वदे सत्य गर्भ हा घातला तुम्ही ॥२२॥
पित्याच्या मरणापश्चात्‌ बाळ सम्राट जाहला ।
भगवद्‌अंश तो होता आजही कीर्ति ती असे ॥२३॥
चक्र त्यां उजव्या हाती पायासी पद्‌चिन्ह ते ।
भरतो बलशाली तो राजाधिराज जाहला ॥२४॥
भरते ममतापुत्र दीर्घतमापुरोहित ।
केले गंगोत्रि पर्यंत अष्ट्याहात्तर यज्ञ ते ॥२५॥
नी अश्वयज्ञि भरते धनराशीस दानिले ।
एकेकबद्ध गायी तै हजार ब्राह्मणा दिल्या ॥२६॥
एकशे तेहत्तीस्‌ ऐसे अश्वमेध करोनिया ।
आश्चर्यीं टाकिले सर्व नृपती या जगातले ॥
अंती मायेवरी केला विजयो हरि मेळिला ॥२७॥
मष्णार यज्ञ कर्मी या चौदालक्षहि हत्ति जे ।
श्वेतदंत असे कृष्ण द्विजांना दान ते दिले ॥२८॥
भरते थोर ते कार्य केले ते ना पुन्हा कुणी ।
तसेचि भूतकाळात न केले ते कधी कुणी ॥२९॥
दिग्विजयात भरते किरात हूण येवनो ।
अंध्र कंक खशो शेक म्लेंच्छ राजे हि मारिले ॥३०॥
पूर्वयूगी बळे दैत्ये देवांना हरवोनिया ।
देवांगनास पाताळी नेलेल्या सोडवीयल्या ॥३१॥
पृथ्वी आकाश हे इच्छा करिती पूर्ण सर्वही ।
भरतीराज्य ते वर्ष सताविस हजार जे ॥३२॥
चक्रवर्ती भरताने ऐश्वर्य श्रेष्ठ राज्य ही ।
मिथ्या मानोनि तो झाला संसारात विरक्तची ॥३३॥
वैदर्भी राजकन्या त्या भरतास पत्‍नि की तिघी ।
तिघिंना आदरे पाही परी माझा परी न तो ॥
पुत्र हा वदता त्यांनी मारिला भीतिने पहा ॥३४॥
खंडता वंश हा केला यज्ञ तो मरूतोत्सम ।
यज्ञदेवे भरद्वाज पुत्र तो भरता दिला ॥३५॥
उतथ्यपत्‍नि गर्भार भाउजयी त्या बृहस्पते ।
मैथुना इच्छिली तेंव्हा गर्भाने रोधिले असे ॥
न मानिता तया येणे अंध हो शाप हा दिला ।
गर्भाचे ते न मानोनी भरिला गर्भ तो दुजा ॥३६॥
पती त्यागील या भेणे गर्भ ती त्यागु इच्छिता ।
निर्वचन असे नाम गर्भा देवेंचि ठेविले ॥३७॥
बृहस्पती तदा बोले माझा औरस पुत्र नी ।
बंधुचा क्षत्रजो तेंव्हा दोघांनी पोसणे यया ॥
ममता वदली तेंव्हा हा माझ्या पतिचा नसे ।
दोघांचा आपुल्या आहे तेंव्हा तुम्हीच पोषिणे ॥
विवाद करिता दोघे त्यागिले बाळ ते पहा ॥३८॥
भरद्वाजचि वितथो निर्वचनहि नाम त्या ।
पुत्र हा दत्तको झाला भरताचा पुढे असा ॥३९॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर विसावा अध्याय हा ॥ ९ ॥ २० ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP