समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सहावा - अध्याय १९ वा
पुंसवन व्रताचा विधी -
राजा परीक्षिताने विचारले -
(अनुष्टुप्)
भगवन् तुम्हि तो आता पुंसवन व्रते अशा ।
वदले पावतो विष्णु मी इच्छि विधि तो कसा ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
शुद्ध प्रतिपदा मार्गशीर्षाच्या पति वंदुनी ।
आरंभ करणे याला सिद्धती सर्व कामना ॥ २ ॥
मरुद्गण कथा जन्म द्विजाज्ञा घ्यावि ती पुना ।
रोज स्नान करावे ते मुखमार्जन उत्तरे ॥
आभूषणे करावे तै नेसावे श्वेत वस्त्र दो ।
सकाळी कांहि ना खाता लक्ष्मी नारायणा पुजा ॥ ३ ॥
(अशी प्रार्थना करावी)
प्रभो रे पूर्णकामी तू न तुला देव-घेव ती ।
स्वामी सर्व विभूतींचा सर्व सिद्धीस्वरूप तू ।
वारंवार तुला ऐसा प्रणाम करिते सदा ॥ ४ ॥
माझ्या आराध्य देवा तू कृपा विभुति तेज नी ।
युक्त तू महिमा वीर्ये भगवान् शक्तिमान तू ॥ ५ ॥
विष्णुपत्नी महामाये महापुरुष लक्षणी ।
जगन्माते महादेवी नमस्कार कृपा करी ॥ ६ ॥
स्तुति ही करुनी राजा ! एकाग्र मंत्र हा म्हणा ।
(भृंगनाद)
ॐनमो भगवते महापुरुषाय महानुभावाय ।
महाविभूतये सह महाविभूति भिर् बलिमुपहराणि ॥
’ॐकार स्वरूप, महानुभाव स्वामी समस्त विभूतिसी
भगवान् पुरुषोत्तमाला नी तयाच्या महाविभूतियांना
मी नमस्कारिते’
या मंत्रे प्रतिदिन स्थिरचित्ते विष्णुभगवम्ताचे
आवाहन अर्घ्य पाद्य आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवित
आभूषण गंध पूष्प धूप दीप नी नैवेद्य पूजिणे ॥ ७ ॥
(अनुष्टुप्)
शेष नैवेद्य राही जो हविष्य मानुनी तया ।
बारा आहुति अग्नीत टाकता मंत्र हा म्हणा ॥
(भृंगनाद)
’ॐ नमो भगवते महापुरुषाय महाविभूतिपतये
स्वाहा ।’ ’भगवान ऐश्वर्यांचा अधिपति भवगान्
पुरुषोत्तमा नमस्कारिते’ ॥ ८ ॥
(अनुष्टुप्)
सर्व संपत्ति इच्छी जो तयाने विष्णु लक्ष्मिला ।
भक्तीने पूजणे रोज कार्यसिद्धी त्वरेचि हो ॥ ९ ॥
पुन्हा त्या भक्तिभावाने साष्टांग नमिणे तया ।
दहावेळा पुन्हा तोची मंत्र जापोनिया पुन्हा ।
म्हणणे स्तोत्र हे ऐसे असे जे सिद्धिदायक ॥ १० ॥
दोघांनी व्यापिले विश्व तुम्ही अंतिम कारण ।
माता लक्ष्मी तुझी पत्नी शक्ती अव्यक्त पार ना ॥ ११ ॥
अधीश्वर तिचा तू तो स्वयें तू पुरुषोत्तम ।
तू यज्ञ यज्ञक्रीयाही भोक्ता तू हव्य निर्मिता ॥ १२ ॥
अभिव्यक्ति गुणांची श्री भोक्ता तू व्यक्त शक्ति तू ।
जीव तू तनु ही लक्ष्मी तू रूपांचा प्रकाशक ॥ १३ ॥
प्रभो पवित्र कीर्ती तू त्रिलोका वरदायक ।
म्हणोनी श्रेष्ठ या इच्छा पूर्ण व्हाव्या तुझ्या कृपे ॥ १४ ॥
या परी वरदो भगवान् लक्ष्मी नारायणा स्तवा ।
नैवेद्य उचला आणि आचम्ये पूजिणे तया ॥ १५ ॥
पुन्हाही भक्ति भावाने हरीची स्तुति ती करा ।
यज्ञावशेष हुंगोनी पुन्हाही पूजिणे तया ॥ १६ ॥
भगवत्पूजना पश्चात् पती हा देव मानुनी ।
द्याव्या त्यां इच्छिल्या वस्तू पतीचे काम हे कि ती ।
इच्छिता सर्व ते द्यावे कार्यात साह्यभूत हो ॥ १७ ॥
पती-पत्नी मधे एक कोणीही व्रत जे करी ।
तयाचे फळ ते दोघा म्हणोनीए चार त्या दिनीं ।
श्रद्धेने पतिने सर्व व्रत ते करणे असे ॥ १८ ॥
विष्णुचे व्रत हे थोर मधे ना सोडणे कधी ।
सवाष्ण द्विज नी विष्णु पूजावी रोज हे असे ॥ १९ ॥
पाथवण करावी की भगवंताचि ती पुन्हा ।
नैवेद्य राहिला जो तो इच्छार्थ सेविणे तया ॥ २० ॥
साध्वी स्त्रीने असे बारा महिने व्रत हे करो ।
कार्तिकाच्या अमास्येसी उद्यापन उपास तो ।
करणे पूजिणे आदी व्रताच्या परि ते तसे ॥ २१ ॥
त्या दिनेहि उषःकाली उठोनी विष्णु पूजिणे ।
पतीने पाकौयज्ञाच्या विधीने घृत मिश्रित ।
खीर अग्नीत अर्पोनी बारा आहुति अर्पिणे ॥ २२ ॥
प्रसन्ने द्विज ते देई आशीर्वाद स्विकारणे ।
भक्तिने शिर टेकोनी प्रणाम करणे तया ।
आज्ञा ती घेउनी त्याची करावे भोजनो पुन्हा ॥ २३ ॥
आधी आचार्य जेवावे पुन्हा भाविक मंधु हां ।
सवेचि भोजना घ्यावे मौनव्रत करोनिया ॥
यज्ञावशेष ती खीर द्यावी पत्नीसि खावया ।
सौभाग्य पुत्र-संतान देणारा हा प्रसादची ॥ २४ ॥
(इंद्रवज्रा)
परीक्षिता हे व्रत आचरीता
इच्छीयली ती मिळतेच वस्तु ।
सौभाग्य संतान यशो नि गेह
मिळे तसी आयु पतीस वाढे ॥ २५ ॥
कुमारिकेने करिता व्रताला
सुलक्षणी तो पति प्राप्त होतो ।
सौभाग्यहीनो करिता व्रताने
निष्पाप होता हरिधाम लाभे ॥ २६ ॥
चिरायु होते मग संतती नी
सौभाग्य येतेचि अभागिनीला ।
सुरूप होते कुरुपा अशीही
रोगातुनी रोगिहि मुक्त होतो ।
बलिष्ट होतो शरिरे पुन्हा तो
श्राद्धीं पठीता गति पूर्वजांसी ॥ २७ ॥
समाप्ति होता हवनी अशी ते
तुष्टोनि कार्ये करितात पूर्ण ।
मरुद्गणांची अशि पुण्यवार्ता
ही सांगताना व्रत बोललो हे ॥ २८ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणिसावा अध्याय हा ॥ ६ ॥ १९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|