समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सहावा - अध्याय १७ वा
चित्रकेतूला पार्वतीचा शाप -
श्री शुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
ज्या दिशीं गुप्त भगवान् ती दिशा नमुनी पुन्हा ।
विद्याधर चित्रकेतू गगनी फिरु लागला ॥ १ ॥
करोडो वर्ष पर्यंत फिरला श्रेष्ठ योगि तो ।
सुमेरूघाटि फिरला आयू बल जसे तसे ॥ २ ॥
सिद्ध नी सिद्धपत्न्यांनी शक्तिमान् भगवान् हरी ।
याच्या त्या गुणलीलांची कीर्तने गायिली तदा ॥ ३ ॥
तेजोमय विमानात एकदा चित्रकेतु हा ।
बसुनी चालला तेंव्हा पाहिले देव शंकरा ।
सिद्धचारण यांच्यात बसले शिवशंअक्र ॥ ४ ॥
पार्वती एक हाताने आलिंगी शंकरा जधी ।
तदा हा चित्रकेतू तै विमानी बसुनी हसे ।
हासुनी पुढती जाण्या वदला पार्वतीस तो ॥ ५ ॥
चित्रकेतु म्हणाला -
अहो हे श्रेष्ठ प्राण्यात जगताचे गुरूच की ।
दशा यांची अशी की ती आलिंगी पत्नि या सभी ॥ ६ ॥
तपस्वी अन् जटाधारी ब्रह्म वाद्यात श्रेष्ठ जे ।
लज्जा सोडोनि सर्वात कुशीत पत्नि घेतसे ॥ ७ ॥
सामान्य जनही सर्व स्त्रीस एकांति भेटती ।
व्रतधारी सभेमध्ये बैसले हे असे पहा ॥ ८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
बुद्धिमान् शिवजी तेंव्हा पाहुनी फक्त हासले ।
सदस्य राहिले गप्प प्रभाव चित्रकेतुला ।
माहीत नव्हता तेंव्हा खूप कांहीहि बोलला ॥ ९ ॥
तयासी गर्व हा ऐसा जितेंद्रिय असाच मी ।
धारिष्ट्य पाहुनी त्याचे क्रोधे ती सति बोलली ॥ १० ॥
श्री पार्वती म्हणाली -
आमुच्या परि या दुष्टा निर्लज्जा शासण्यास हा ।
एकटा प्रभु का आहे विश्वामाजी समस्त या ॥ ११ ॥
(इंद्रवज्रा)
वाटे न ब्रह्मा अन नारदो नी
भृगू कपीलो मुनि आदि सर्व ।
न जाणती धर्म रहस्य सारे
कामा शिवाच्या नच कोण द्वषी ॥ १२ ॥
ब्रह्मादि सारे पद ध्याति यांचे
नी हे सदा मंगल त्यां पहाती ।
जगद्गुरू हे अन हे सदस्य
क्षत्रीय हा तो वदतोय शिक्षा ॥ १३ ॥
(अनुष्टुप्)
मोठेपणात झाला हा गर्वी हे नच योग्य की ।
हरीच्या चरणी राह्या तिथे संत उपासिती ॥ १४ ॥
दुर्मते पापहोनीत जन्म घे जा इथोनिया ।
तदा मुला कधी ऐसा अपराध न तो घडे ॥ १५ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षिता ! जधी ऐसा ऐकिला चित्रकेतुने ।
शाप नी पातला खाली झुकोनी बोलु लागला ॥ १६ ॥
चित्रकेतु म्हणाला -
अंबिके पार्वती माते शाप मी आदरेचि घे ।
देव जे वदती लोका प्रारब्ध सूचनाच ती ॥ १७ ॥
देवी ! अज्ञ असा जीव भटके कालचक्रि हा ।
सदाचि सुख नी दुःख भोगता फिरतो असा ॥ १८ ॥
माते ! त्या सुखसुःखांना न दे आत्मा दुजाहि ना ।
अज्ञ ते मानिती ऐसे स्वकर्ता अथवा दुजा ॥ १९ ॥
गुणप्रवाह हे विश्व शाप बोध नि स्वर्ग तो ।
काय तो नरको आणि काय दुःख सुखातही ॥२० ॥
एकटा भगवान् सर्व माया जी आत्मरूपिणी ।
हिच्याचि सहकार्याने जीवांची रचना करी ।
बंध मोक्ष सुखाची नी दुःखाची रचना करी ॥ २१ ॥
(इंद्रवज्रा)
माते हरी तो सम नी विभक्त
तया न कोणी प्रिय नी पराय ।
न जात बंधू नच मोह त्याला
तै क्रोध त्याला मग काय स्पर्शी ॥ २२ ॥
तथापि माया करि कार्य त्याचे
प्राण्यासि पापो अन पुण्य होते ।
सुखो नि दुःखो हित नी अहीत
नी बंध मोक्षा तिच कारणी की ॥ २३ ॥
(अनुष्टुप्)
देवी मी तुजला शाप मुक्त्यर्थ नच प्रार्थितो ।
इच्छितो बोलणे माझे चूक ते करणे क्षमा ॥ २४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
प्रसन्न करिता ऐसे पार्वती अन शंकरा ।
चित्रकेतू विमानात बसोनी निघले पुढे ।
लोकांना जाहला मोठा विस्मयो पाहता तदा ॥ २५ ॥
तदा श्रीभगवान् रुद्र दैत्य नी ऋषि देवता ।
पार्षदा पुढती ऐसे बोलले पारव्तीस ते ॥ २६ ॥
भगवान् शंकर म्हणाले -
सुंदरी पाहिले ना तू दिव्य लीला विहारि तो ।
निस्पृह हरिचा दास याचा तो महिमा कसा ? ॥ २७ ॥
हरीच्या शरणी जाता न त्याला भय विश्वि ही ।
स्वर्ग मोक्ष तसा नर्क सम त्या हरिच्या परी ॥ २८ ॥
जीवांना हरिच्या लीले देह संयोग होवुनी ।
जन्म मृत्यु सुखो दुःख द्वंद्व हे शाप मोक्ष ते ॥ २९ ॥
स्वप्नात सुखदुःखो नी भ्रमता जागला तरी ।
दोरीचा सर्प तो भासे कल्पीत भेद हा असा ॥ ३० ॥
वैराग्य बल नी ज्ञान हरीची भक्ति ना मनीं ।
न त्याच्यापसि ते कांही राग द्वेषास कारण ॥ ३१ ॥
(इंद्रवज्रा)
ना नारदो ब्रह्मजी नी कुमार
मी नी भृगू आदिहि कोणिही ते ।
न जाणतो त्या भगवत् रहस्या
अनाकलीनी हरिच्या लिला त्या ।
जो अंश त्याचा लघु कोणि मानी
मी ईश्वरो त्या रुप ना कळाले ॥ ३२ ॥
(अनुष्टुप्)
न त्यासी कोणि ही प्रीय न दूर कोणिही नसे ।
आत्मा तो सर्व प्राण्यांचा म्हणोनी प्रीय तो जिवां ॥ ३३ ॥
प्रिये हा भगवंताचा चित्रकेतू उपासक ।
शांत नी समदर्शीही हरीचा प्रीय मी हि तो ॥ ३४ ॥
म्हणोनी भगवद्भक्त शांत नी समदर्शि ते ।
महात्म्यां विषयी कांही आश्चर्य नच मानणे ॥ ३५ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षिता असे शब्द शिवाचे ऐकता तदा ।
जाहली पार्वती शांत विस्मयो संपला तिचा ॥ ३६ ॥
चित्रकेतू हरीप्रेमी समर्थ शाप बोलण्या ।
परी न वदला तैसा तिच्या शापासि मानिले ।
साधूपुरुष जो होतो तयाचे वागने असे ॥ ३७ ॥
चित्रकेतू पुढे झाला त्वष्टाच्या दक्षिणाग्नित ।
वृत्रासुर अशा नामे म्हणोनी ज्ञानिभक्त तो ॥ ३८ ॥
राजा ! तू पुसले की ते भक्ती वृत्५रासुरा कशी ।
विस्तारे वदलो सर्व असुरी योनि ही अशी ॥ ३९ ॥
चरित्र चित्रकेतूचे न त्याचेपरि सर्वची ।
विष्णुभक्त महात्म्यो हे ऐकता मिक्ति ती मिळे ॥ ४० ॥
प्रात्अःकाळी उठोनीया मौने श्रद्ध्येचि वाचिता ।
हरीची गति त्या लाभे संशयो यात ना मुळी ॥ ४१ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सतरावा अध्याय हा ॥ ६ ॥ १७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|