समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सहावा - अध्याय १४ वा
वृत्रासुराचे पूर्वचरित्र -
राजा परीक्षिताने विचारले -
रज तमी स्वभावीतो वृत्रासुर बहू असा ।
देवता त्रासिल्या त्याने लालची भक्तिचा कसा ॥ १ ॥
पवित्र ऋषि नी देव भक्तीला मुकती पहा ।
खरेचि भगवत्भक्ती दुर्मीळ मानवा तशी ॥ २ ॥
असंख्य प्राणि जै धूळ कण ते मोजता न ये ।
तयात मानवो श्रेष्ठ कल्याणा इच्छिती सदा ॥ ३ ॥
मुनी त्यातील संसारी इच्छिती अल्प मोक्ष तो ।
हजारो ते तयातील सिद्धी साधून बैसती ॥ ४ ॥
करोडो सिद्ध मुक्तात संते ते दुर्लभोच की ।
इच्छिती एकचित्ताने भगवत्पद नित्य जे ॥ ५ ॥
तरी वृत्रासुरे कैसी कृष्णासी वृत्ती लाविली ।
लोकांना सतवी पापी कसे हे घडले असे ॥ ६ ॥
संशयो बहु हा येथे औत्सुक्य ऐकण्यातही ।
बळी पौरुषि दैत्याने शत्रूही तोषिला मनीं ॥ ७ ॥
सूतजी सांगतात -
ऋषिंनो ! शुकदेवाने ऐकिला प्रश्न हा असा ।
पिता नी नारदे तैसे देवले कथिले मज ॥ ९ ॥
चित्रकेतू करी राज्य देशात शूरसेन या ।
इछिता सर्व ही पृथ्वी अन्नादी रस देतसे ॥ १० ॥
एक कोटी तया पत्न्या समर्थ नृप तो परी ।
न गर्भ राहिला कोणा न झाले मूल एकही ॥ ११ ॥
उणे ते नव्हते कांही तारुण्य रूप वैभव ।
कुलीनता तशा विद्या परी वांझचि त्या स्त्रिया ॥ १२ ॥
स्वयं सम्राट नी राण्या सगळ्या रूपवान त्या ।
वंशविस्तार विश्वाचा चिंता ऐश्वर्यि ना सुखी ॥ १३ ॥
अंगिरा ऋषि जो योगी शाप नी वर दे असा ।
स्वेच्छेने पोचला त्याच्या महाली एकदा तदा ॥ १४ ॥
उठोनी चित्रकेतूने पूजिले विधिपूर्वक ।
बैसले तोषता योगी राजा समिप वैसला ॥ १५ ॥
ऋषिने पाहिले की हा निनयी नृप केवढा ।
भूमिसी बसुनी माझी सेवा ही करितो अशी ॥ १६ ॥
अंगिरा ऋषि म्हणाले -
राजा रे क्षेम ना सर्व स्वास्थ्य मंत्री नि राष्ट्र हे ।
दुर्ग कोष गुरू सेना यातची क्षेम तो नृप ॥ १७ ॥
राजाच्या प्रकृती सात तेणे राजा सुखी असे ।
प्रजा ती भार सोपोनी सुखी राजा प्रजा तसी ॥ १८ ॥
तुझ्या राण्या प्रजा मंत्री दूत व्यापारि ते तसे ।
देशवासी नि ते पुत्र देशीचे मांडलीक ते ।
नागरीक तुझी आज्ञी होत ना सर्व ठीक ते ? ॥ १९ ॥
मनासी धाक जो ठेवी तया अंकीत हे जग ।
लोकींचे लोकपालोही आदरे भेटती सदा ॥ २० ॥
परी संतुष्ट राजा तू मला ना दिससी खरा ।
अपूर्ण कामना कांही चिंता मुद्रेवरी दिसे ।
तूच का कारणी त्याचा कोणी अन्य दुजा तसा ॥ २१ ॥
कशाची मनिं ती चिंता अंगिरा ऋषि जाणती ।
परी त्या पुसले प्रश्न विनये नृप बोलला ॥ २२ ॥
सम्राट चित्रकेतू म्हणाला -
तपस्या ज्ञान ध्यानाने योगी ते पाप नाशिती ।
जीवांची कोणती गोष्ट तयांना नच ती कळे ? ॥ २३ ॥
तरीही मानुनी आज्ञा चिंता मी वदतो तुम्हा ।
चरणी नम्र भावाने सर्व मी ते निवेदितो ॥ २४ ॥
राज्य ऐश्वर्य संपत्ती सर्वची प्राप्त ते मला ।
संतान नच ते कांही तेणे शांती मला नसे ॥ २५ ॥
दुःखी मी तो महाभागा शंकीत पितरेहि ते ।
पिंडदान न ते त्यांना नर्काचा घोर तो मला ।
अशा दुःखातुनी व्हावी सुटका ऋषिजी पहा ॥ २६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
असे हे प्रार्थिता त्याने कृपाळू अंगिरा ष्ये ।
यजिले चरु निर्मोनी त्वष्टा तुष्ट्यर्थ तो पहा ॥ २७ ॥
महाराणी कृतद्युती ज्येष्ठ बी सद्गुणी हिला ।
महर्षी अंगिरा यांनी यज्ञप्रसाद तो दिला ॥ २८ ॥
वदले चित्रकेतूसी हिच्या गर्भेचि पुत्र तो ।
होईल हर्ष नी शोक देईल दोन्हिही नृपा ।
अंगिरा वदुनी ऐसे गेले ते निघुनी पुढे ॥ २९ ॥
यज्ञावशेष तो खाता तेजाने चित्रकेतुच्या ।
राणीसी राहिला गर्भ कृतिकापोटि अग्नि जै ॥ ३० ॥
सम्राट शूरसेनेचा राणीसी तेज अर्पिता ।
राहिला गर्भ राणीला वाढला चंद्र शुक्लि जै ॥ ३१ ॥
योग्य त्या पुढती वेळी पुत्र सुंदर जाहला ।
वार्ता ही कळता सर्व प्रजा हर्षीत जाहली ॥ ३२ ॥
न सीमा राजहर्षाते स्नाने तो शुद्ध जाहला ।
सजला भूषणे वस्त्रे केले जातक सर्व ही ॥ ३३ ॥
सहा अर्बूद गायी नी सोने चांदी नि वस्त्र ही ।
भूषणे ग्राम नी घोडे हत्ती दान दिले द्विजां ॥ ३४ ॥
पुत्राच्या धन येशाते आयुवृद्ध्यर्थ याचका ।
याचिले दिधले ते ते जीवां जै मेघ वर्षतो ॥ ३५ ॥
दरिद्या मिळता द्रव्य जसा लोभेचि वाढवी ।
तसाचि पुत्र प्रेमात बुडाला नृप तेधवा ॥ ३६ ॥
राणीसी पुत्रप्रेमाने वाढवी प्रेम नित्य तो ।
पाहता अन्य राण्या त्या जळाल्या पुत्र हेतुने ॥ ३७ ॥
नित्य त्या लाडिता पुत्रा वाढले पट्टराणिसी ।
प्रेम नी अन्य राण्यांच्या वरी राजा न ते करी ॥ ३८ ॥
न पुत्र म्हणूनी दुःखी न प्रेम दुःख वाढले ।
धिक्कार करिता चित्ती राण्या त्या जळु लागल्या ॥ ३९ ॥
भगिनिंनो ! अभागी ही वांझ स्त्री जीवने अशी ।
असो धिक्कार जीण्यांचा दासीच्या परि हे जिणे ॥
त्यातल्या त्यात तो राजा पत्न्याही नच मानितो ।
वदल्या कैक हे ऐसे आपापसात बोल ते ॥ ४० ॥
दास्यांना हे नसे दुःख नित्य सेवेत मान तो ।
तिरस्कार असा होतो दास्यांच्या दासि त्या बर्या ॥ ४१ ॥
सौतीची भरता कूस जळल्या मनि सर्व त्या ।
तेनेचि वाढला द्वेष मनीं तो ज्येष्ठ राणिचा ॥ ४२ ॥
द्वेषाने संपली बुद्धी जन्मली क्रूरता मनीं ।
चिडता घातले वीष राजपुत्रास तेधवा ॥ ४३ ॥
मातेला नच हा पत्ता वाटले बाळ झोपले ।
आनंदे फिरली गाता प्रासादात चहूकडे ॥ ४४ ॥
स्मरता वाटले चित्ती बाळ तो बहु झोपला ।
दायीसी वदली ऐसी कल्याणी बाळ आण तो ॥ ४५ ॥
बाळासी पाहता दायी फाटले नेत्र तेधवा ।
संपले सर्व बाळाचे मेमे मी वदता असे ।
पडली पृथिवीसी नी बोलली हाय हाय ते ॥ ४६ ॥
(इंद्रवज्रा)
पिटोनि छाती रडताचि दायी
माता त्वरेने तिज पासि आली ।
नी पाहिले तो शयनगृहात
बाळास मृत्यू विपरीत आला ॥ ४७ ॥
मूर्छित झाली नच शोक साही
वस्त्रे नि वेणी विखरून गेली ॥ ४८ ॥
राणी अशी ती रडता वियोगे
प्रासादवासी नरनारि आले ।
हत्त्यारि राण्या तयिं पातल्या नी ।
खोटेचि सार्या रडु लागल्या की ॥ ४९ ॥
अकालमृत्यू कळता असा हा
अंधार राजा पुढतीच झाला ।
मंत्र्यांसवे तो पडता उठोनी
आला नि मूर्च्छ्ये पडला बघोनी ॥ ५० ॥
ते केश वस्त्रे विखरोनि गेले
नी दीर्घ श्वासा मग घे वियोगे ।
दाटोनि आला तयि कंठ त्याचा
न बोलता अश्रुचि ढाळियेले ॥ ५१ ॥
पतीस दुःखी अन पुत्र मृत्यू
पाही जधी ती कृतद्यूति तेव्हा ।
मोठ्या स्वराने रडली बहू ती
सारेचि झाले मग शोकग्रस्त ॥ ५२ ॥
अश्रू तिचे अंजन घेवुनीया
वक्षस्थलाची उटि धूत गेले ।
फुले गळोनी कच पांगले नी
आलाप केला टिटवी परी तै ॥ ५३ ॥
अरे ! विधात्या तव मूर्खता ही
सृष्टीविरोधी करतोस सारे ।
हे वृद्ध जीते अन बाळ नेले
तू शत्रू सार्या जिव मानवांचा ॥ ५४ ॥
क्रमे न ये हे जगणे नि मृत्यू
तेंव्हा तुझा ना उपयोग आम्हा ।
वृद्ध्यर्थ सृष्टी तुचि बंध देतो
मारोनि पुत्रा तव हानि झाली ॥ ५५ ॥
(आपल्या पुत्राकडे पाहून)
(वसंततिलका)
झाले अनाथ मजला त्यजि कां असा रे
थोडे तरी उघडि नेत्र पहा पिता हा ।
शोकात जाय बुडुनी गति ना पुढे ती
जाऊ नको यम असे बहु निर्दयी तो ॥ ५६ ॥
हे लाडक्या उठि त्वरे बघ मित्र आले
खेळावया तुजसवे तुज बाहतात ।
तू झोपला बहुहि भूक तुला असे की
तऊं खाय कांहि दुध पी मग शोक जाय ॥ ५७ ॥
हे लाडक्या नच दिसे हसुनी पहाणे
दुर्भागि मी अशि कशी हर हाय हाय ।
ऐको न ये सुमधु बोलहि प्रीय बाळा
का त्या यमे तुजसि क्रूर खरेचि नेले ॥ ५८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
सम्राटे पाहिली पत्नी वियोगी बुडता अशी ।
शोक संतप्त होवोनी घोर तो रडला अए ॥ ५९ ॥
राणीचा पाहुनी शोक सर्वांना दुःख जाहले ।
शोकाची पडली छाया नगरीं संपली कळा ॥ ६० ॥
अंगिरे नारदे ऐसा पाहिला शोक तो बहू ।
चित्रकेतूकडे आले काढण्या समजूत ती ॥ ६१ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौदावा अध्याय हा ॥ ६ ॥ १४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|