समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सहावा - अध्याय १३ वा
इंद्रावर ब्रह्महत्त्येचे आक्रमण -
श्रीशुकदेव सांगतात -
(इंद्रवज्रा)
वृत्रमृत्युमुळे इंद्र सोडोनी सर्व लोक नी ।
लोकपालास आनंद झाला नी भय संपले ॥ १ ॥
युद्ध जै संपले तेंव्हा पितरे देवता ऋषी ।
भूत दैत्य नि गंधर्व इंद्रासी पुसल्या विना ।
गेले निघूनि ते सर्व ब्रह्मादी सह ते पहा ॥ २ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
मुनी मी इच्छितो हे की इंद्रासी हर्ष का न तो ।
सर्वांना मोद तो झाला इंद्र दुःखी कशामुळे ॥ ३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
महर्षी देवता सर्व वृत्रासुर पराक्रमे ।
भीतीने भरले तेंव्या इंद्रासी प्रार्थिले असे ।
ब्रह्महत्त्ये भये इंद्रा नच ते इच्छिती मनी ॥ ४ ॥
देवेंद्राने देवता व ऋषींना सांगितले ०
विश्वरूपवधे ब्रह्म-हत्त्या ती मज लागली ।
स्त्री भू जल नि वृक्षांनी घेतले पाप वाटुनी ।
आता मी वधिता याला कोण तो सोडवी मला ॥ ५ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
ऐकोनी बोल इंद्राचे वदले ऋषि तेधवा ।
देवेंद्रा सुखि हो नित्य चिंता थोडी हि ना करी ।
अश्वमेध करोनीया तुझे पाप धुऊत की ॥ ६ ॥
जगासी अधिता पाप अश्वमेधे धुवेल की ।
तेणे तुष्टेल तो विष्णु असुरीवध काय तो ॥ ७ ॥
द्विज माता पिता गाय गुरूहत्त्यादि पाप ते ।
नामसंकीर्तने जाते महापापी हि शुद्ध ची ॥ ८ ॥
(इंद्रवज्रा)
त्या अश्वमेधी यजितोत आम्ही
आराधिता श्री हरिच्या कृपेने ।
समस्तजीवा वधिसी जरी तू
न पाप राही मग काय त्यात ॥ ९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
विप्रांनी प्रेरिता इंद्रे मारिला वृत्रराक्षस ।
मरता तो ब्रह्महत्या इंद्राच्यापासि पातली ॥ १० ॥
तयाने क्लेश नी आग इंद्रासी लागली बहू ।
सभ्यासी लागला डाग गुण नी धैर्य व्यर्थ ते ॥ ११ ॥
चांडाळी सम ती हत्या इंद्राच्या पाठ पाठिसी ।
लागली पाहिली इंद्रे वृद्धा ती कंपिता तसी ।
सुटला क्ष ही अंगा भिजले वस्त्र शोणिते ॥ १२ ॥
पिंजार केस ते श्वेत वदली थांब थांब रे ।
दुर्गंधी मासळी ऐसी मार्ग दूषित जाहला ॥ १३ ॥
राजा तिच्या भये इंद्र दिशा आकाशि धावला ।
तारिले नचे ते कोणी घुसला मान पुष्करीं ॥ १४ ॥
(इंद्रवज्रा)
देवेंद्र तो तै लपला नलीनी
मधे जळासीच सहस्र वर्षे ।
तदा तयासीउपवास झाला
तिथे न अग्नी हवि पोचविता ॥ १५ ॥
विद्या तपे योग बळेहि तेंव्हा
नहूष झाला मग देवराजा ।
धना मदाने शचि भोगू इच्छी
तो सर्प झाला ऋषिशाप होता ॥ १६ ॥
ध्यानें हरीच्या मग इंद्र शुद्ध
झाला द्विजांनी मग स्वर्गि नेले ।
श्रीने स्वये रक्षियलेचि इंद्रा
पापास रुद्रे हत तेज केले ॥ १७ ॥
(अनुष्टुप्)
पातता इंद्र स्वर्गासी दीक्षा त्या ऋषिंनी दिली ।
हरीच्या अर्चनी हेते अश्वमेधास योजिले ॥ १८ ॥
वेदवादी ऋषी यांनी करिता अश्वमेध तो ।
भगवान् हरिची त्यांनी केली श्रेष्ठ उपासना ॥ १९ ॥
प्रसन्न जाहला विष्णु पाप सर्वचि संपले ।
सूर्याच्या उदये जैसे तिमिर पळतो दुरी ॥ २० ॥
(इंद्रवज्रा)
मरीचि आदी ऋषिनी जधी तो
केला असे यज्ञ विधी जसा तो ।
तो इंद्र झाला मग पाप मुक्त
नी पूज्य झाला पहिल्यापरी तो ॥ २१ ॥
आख्यानि या तो जय इंद्रदेवा
नी पाप मुक्ती अन भक्तदैत्य ।
की कीर्ति सारी हरिचीच सत्य
धुतेचि पापा अन भक्ति वाढे ॥ २२ ॥
चतूर तेणे पठणे सदाची
नी एकवावी दुजयास नित्य ।
त्या पर्वकाळी पठतो तयाचे
धनो यशो आयु वृद्धीत होते ॥ २३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥ ६ ॥ १३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|