समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सहावा - अध्याय ८ वा
नारायणकवच - वैष्णवीविद्येचा उपदेश -
राजा परीक्षिताने विचारले -
(अनुष्टुप्)
चतुरंग दळो नेता देवेम्द्र भगवन् कसा ।
मेळवी विजयो आणि राजलक्ष्मीहि भोगिली ॥ १ ॥
नारायणीय कवचा कृपया सांगणे मला ।
विद्रोही हरिला शत्रू सांगणे सर्व ते मला ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
देवेंद्र विश्वरूपाला श्रीगुरू मानुनी पुन्हा ।
कवचो पुसले प्रश्ने त्यासी सावध ऐकणे ॥ ३ ॥
विश्वरूप म्हणाले -
देवेंद्रा भय हो तेंव्हा स्मरा विद्याच वैष्णवी ।
तेणेचि रक्षिणे काया धुवुनी हते ॥ ४ ॥
पवित्र धारिणे आणि उत्तराभुमुखो बसा ।
निश्चये घेवुनी मौन आचम्य करणे पुन्हा ॥ ५ ॥
ॐ नारायणाय मंत्र हा म्हणणे तसे ।
नी ॐ नमो भगवते वासुदेवाय गाउनी ॥
मण्त्राने हृदयांगादी अक्रणे न्यास हा असा ।
किंवा त्या उलट्या योगे मंत्रे हा न्यास योजिने ॥ ६ ॥
द्वादशाक्षरि मंत्राने बोटांना न्यास घेउनी ।
अंगुष्ठ चार उच्चारे न्यास हा धारिणे असा ॥ ७ ॥
आणि ॐ विष्णवे नमः ॐकार हृदयास नी ।
विकार ब्रह्मरंध्रास भ्रूमध्ये तो षकार नी ॥ ८ ॥
णकार तो शिखेमाही वेकार नेत्र दोवरी ।
नकार तनुशी सर्व ॐ नमः अस्त्राय फट् ॥ ९ ॥
दिग्बंध करणे याने मंत्ररूप पुरुष हो ।
करणे विधि हा सर्व जाणुनी न्यास योजिणे ॥ १० ॥
तद्रूप भगवान् ध्यावा षड्गुणी इष्ट देव तो ।
विद्यातेज तपोरूप मंत्रपाठ सदा करा ॥ ११ ॥
(इंद्रवज्रा)
तो श्री हरी ॐ मज रक्षु नित्य
गरूड स्कंधी पद ठेवि जो तो ।
नी शंख चक्रो धनुबाण ढाल
गदा नि पद्मो करि घेइ पाश ॥ १२ ॥
जळात रक्षो मज मत्स्यमूर्ती
नक्रादिपासून वरून रक्षो ।
तो भूवरी वामन रक्षु माते
त्रिविक्रमोतो नभिं रक्षु नित्य ॥ १३ ॥
ज्या गर्जनेने घुमल्या दिशा नी
त्या राक्षसींचे गललेच गर्भ ।
दैत्यारि तो श्रीनरसिंह रक्षो
रणात नी जंगल दाट मार्गी ॥ १४ ॥
दाढेवरी रक्षि धरा हरी तो
मार्गावरी नी गिरि पर्वतासी ।
तो पर्शुरामो मज रक्षि नित्य
प्रवासि जाता मज रक्षु राम ॥ १५ ॥
त्या मारिणी मोहिनिपासुनीया
नारायणो तो मज गर्व होता ।
तो योगि दत्तात्रय संकटात
त्या कर्मबंधी कपिलोहि रक्षो ॥ १६ ॥
सनत्कुमारो मज रक्षु कामीं
नी चालताना हयग्रीव देव ।
नी वेदमूर्ती नमने न होता
करोत रक्षा मम नित्य देव ।
सेवाचुकीपासुनि नारदो ते
नर्कातुनी तो कज कूर्म रक्षो ॥ १७ ॥
कुपथ्य होता धनवंतरी नी
द्वंद्वातुनी श्रीऋषबो हरी नी ।
मनुष्यकष्टीं बलराम रक्षो
सर्पामधोनी मज शेष रक्षो ॥ १८ ॥
लोकापवादीं मज यज्ञ रक्षो
अज्ञानमार्गी मज व्यास रक्षो ।
कलिकालदोषी मज कल्कि रक्षो
पाखंडमार्गी मज बुद्ध रक्षो ॥ १९ ॥
गदा करीं घेवुनिया सकाळी
गोविंद वंशी करि घेवुनिया ।
सशस्त्र नारायण तो दुपारी
सुदर्शनाने मज विष्णु रक्षो ॥ २० ॥
नी सांध्यपूर्वी धनु बाण घेता
रक्षो मधूसूदन तो मला नी ।
ब्रह्मादि रक्षो मज सांजवेळी
त्रिमूर्तिधारी मज माधवो तो ।
पुन्हा हृषीकेश नि मध्यरात्री
त्या पद्मनाभे करणेचि रक्षा ॥ २१ ॥
पुढी रात्री हरि रक्षु माते
जनार्दनो तोहि प्रभातकाळी ।
दामोदरो सूर्य उदीत पूर्वी
विश्वेश्वरो संधिकाळात रक्षो ॥ २२ ॥
सुदर्शना ! तू रथचक्र ऐसा
भयान अग्नी तुझिया किनारी ।
तू श्रीहरीच्या भ्रमतोस इच्छ्ये
तू जाळोसी शत्रु तृणापरी त्या ॥ २३ ॥
गदे ! तुझा स्पर्शहि वज्र ऐसा
हरीप्रिये मी हरिदास आहे ।
त्या भूत प्रेता अन राक्षसांना
त्या शत्रुला ठेचुनि काढ चांग ॥ २४ ॥
शंखा ! तुला कृष्ण फुंकी जधी तो
तैं शत्रुचित्ता धडकी भरू दे ।
ते मातृका भूत पिशाच सर्व
पळोनि जावे इथुनी त्वरेने ॥ २५ ॥
खड्गा ! प्रियो तू हरिचा असा की
तुटोत शत्रू तव धारवेगे ।
नी पापदृष्टी अरि नेत्र बंद
ढाले ! करावी कणु अंध सर्व ॥ २६ ॥
(अनुष्टुप्)
धूम्रकेतु नि सूर्यादी ग्रह नी दुष्ट व्यक्तिही ।
सर्पादी आणि दाढांचे पशू जे हिंस्त्र भूत नी ॥ २७ ॥
प्रेतादी पापि प्राणी ते आम्हासी जे अमंगळ ।
नष्ट व्हावे त्वरे सर्व आयुधे नामकीर्तने ॥ २८ ॥
ब्रहद्रथादि त्या त्रेये जयाची स्तुति गायिली ।
गरूड वेदमूर्ती नी विष्वक् सेनासि ध्यायिता ।
नामोच्चार प्रभावाने तरोत आम्हि संकटी ॥ २९ ॥
श्रीहरी नाम नी रूप वाहनो पार्षदे तसे ।
आयुधे हे मनो बुद्धी इंद्रिया प्राण संकटी ।
आपत्तीमधुनी नित्य आम्हा तातोर नित्य ते ॥ ३० ॥
कार्यकारण ही सृष्टी भगवद्रूप हे खरे ।
सत्याच्या या प्रभावाने आमुचा त्रास नष्ट हो ॥ ३१ ॥
आत्मा ब्रह्म द्वयो एक जयांनी जाणिले असे ।
विकल्पहीन ते रूप परी तो रूप धारितो ॥ ३२ ॥
आयुधे भूषणे धारी नामशक्तीहि धारितो ।
सर्वज्ञ सत्य जो आहे रक्षो व्यापक तो अम्हा ॥ ३३ ॥
(इंद्रवज्रा)
जो अट्टाहासे भय वारितो नी
स्वतेजयोगे परतेज वारी ।
देशींविदेशीं नरसिंह देव
बाहेर खाली वर रक्षु आम्हा ॥ ३४ ॥
(अनुष्टुप्)
देवेंद्रा ! तुजसी सर्व वदलो वर्म स्तोत्र हे ।
सुरक्षित यये होई सहजी जिंकि शत्रुला ॥ ३५ ॥
धारितो कवचा जो तो पाहता स्पर्शिता पदा ।
तत्काल होतसे मुक्त समस्त भय यातुनी ॥ ३६ ॥
धारिता वैष्णवी विद्या तथा राजा नि चोरही ।
भूत प्रेत अशा बाधा प्राण्यांचे भय ना उरे ॥ ३७ ॥
देवेंद्रा ! पूर्वकाळात कौशिक गोत्र जो द्विजे ।
विद्या ही धारुनी वाळू भूवरी देह त्यागिला ॥ ३८ ॥
तदा सपत्न गंदह्र्व चित्ररथ विमानि तो ।
असोनी सहजी गेला र्पेताच्या वरुनी तदा ॥ ३९ ॥
विमान झुकुनी खाली पडले भूमिसी पहा ।
आश्चर्य वाटले त्यासी वालखिल्यमुनें तदा ।
प्रभाव कथिला थोर नारायणव्रती असा ॥ ४० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
समयी कथि जो आणि धारी जो कवचार या ।
तयासी आदरे प्राणी झुकती भय ना ह्रे ॥ ४१ ॥
इंद्राने वैष्णवी विद्या विश्वरूपाकडून ही ।
घेतली जिंकिले दैत्य भोगिली राजलक्षुमी ॥ ४२ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥ ६ ॥ ८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|