समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध सहावा - अध्याय ७ वा

बृहस्पतीकडून देवतांचा त्याग व विश्वरूपाचा देवगुरू म्हणून स्वीकार -


राजा परीक्षिताने विचारले -
(अनुष्टुप्)
बृहस्पति सुरांना ते त्यागिती काय कारणे ।
देवांची कोणती चूक सांगावी कृपया मला ॥ १ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
राजा त्या इंद्रदेवाला जाहला गर्व तो बहू ।
तेणे तो धर्ममर्यादा सदाचारहि त्यागिला ॥ २ ॥
सभेत एकदा इंद्र शचीरानीसहीत तो ।
उच्चसिंहासनी होता सर्वात बसुनी सुखे ॥ ३ ॥
अक्रा रुद्र वसू आठ सर्वची ते मरुद्‌गण ।
आदित्य विश्वदेवो नी ऋभूगण नि साध्यही ॥
अश्विनीकुमरो होते सेवेत नित्य तिष्ठले ।
गंधर्व चारणो सिद्ध ब्रहम्वादी मुनीगण ॥ ४ ॥
अप्सरा किन्नरे नाग पक्षी विद्याधरो तसे ।
सेवेत गान ते गाती बैसला इंद्र हा असा ॥ ५ ॥
आलापे स्वर ते गाता गाती इंद्रस्तुती पुढे ।
चंद्राच्या परि ते छत्र शोभले मस्तकी तदा ।
चवर्‍या ढळती छान इंद्र हा शोभला असा ॥ ६ ॥
या वेळी इंद्र नी अन्य देवांचे गुरुदेव ते ।
आले बृहस्पती तेथे नमिले त्या सुरासुरे ॥ ७ ॥
इंद्राने पाहिले त्यांना परी ना उठला मुळी ।
नमिले नचही त्याने गर्वे ना हलला मुळी ॥ ८ ॥
त्रिकालज्ञ बृहस्पती जाणते जाहले मनी ।
ऐश्वर्यमद हा आहे तात्काळ घरि पातले ॥ ९ ॥
परीक्षिता ! यये वेळी इंद्राला अनुताप तो ।
जाहला वदला निंद्य स्वताला शब्द त्या सभीं ॥ १० ॥
हाय ! मूर्खत्व योगाने ऐश्वर्यीं माजलो असा ।
चुकलो निंद्य ते झाले गुरूसी अवानिले ॥ ११ ॥
विवेकी कोण तो इच्छी स्वर्गाची राजलक्षुमी ।
पहा मी या हिच्या योगे भरलोसे रजोगुणे ॥ १२ ॥
कुणी जे वदती ऐसे राजसिंहासनावरी ।
बसता न उठो राजा न त्यसी धर्म तो कळे ॥ १३ ॥
असे जे बोधिती ते तो कुमार्ग नारकी स्वये ।
विश्वासे जो तया बोला दगडी नाव नाविका ॥ १४ ॥
माझे हे गुरु की थोर अथांग ज्ञानधी असे ।
आता मी चरणा त्यांच्या वंदोनी समजावितो ॥ १५ ॥
"भगवान् गुरु ते झाले गुप्तची स्वगृहातुनी" ।
परीक्षिता ! असा इंद्र मनात स्मरु लागला ॥ १६ ॥
देवेंद्र धुंडिले खूप परी ना शोध लागला ।
अपंगिता गुरुवीण जाहला तो अशांतची ॥ १७ ॥
परीक्षिता ! असे सारे कळले दैत्य दानवा ।
शुक्राने सोडिता आज्ञा धावले समरा तदा ॥ १८ ॥
सोडिते जाहले तीक्ष्ण बाण नी तोडिले कर ।
डोकी नी पायही तैसे तदा तो इंद्रदेवही ।
घेवोनी अन्य देवांना ब्रह्म्याच्या पदि लागला ॥ १९ ॥
पाहोनी दुर्दशा ब्रह्मा द्रवला हृदयात तो ।
धीर तो बांधुनी चित्ती देवांना बोलले असे ॥ २० ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
खेदाची गोष्ट ही झाली वाईट वागले तुम्ही ।
मदांध जाहले छे ! छे ! वेदज्ञ द्विज छेडिला ॥ २१ ॥
अनितीने असे भोग समृद्ध असुनी तुम्ही ।
देवता जाहल्या क्षाण शत्रूने अवमानिले ॥ २२ ॥
देवेंद्रा तुमचा शत्रू गुरुशुक्रामुळे असा ।
क्षाणची जाहला होता परी तो सेविल्यामुळे ।
जाहला श्रेष्ठ संपन्न जिंकितील मलाहि ते ॥ २३ ॥
(इंद्रवज्रा)
ही अर्थनीती दिधली तयांना
    अभेद्य ऐसी भृगुवंशियाम्नी ।
ती गुपविद्या हरितील विश्व
    गो-विप्र देवाभजकात शक्ती ॥ २४ ॥
तेंव्हा त्वरे विश्वरूपास जावे
    शरण्य तो तो द्विज संयती की ।
तुम्ही तयांच्या असुरास व्हावे
    प्रेमी तदा होइल क्षेम सारे ॥ २५ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
परीक्षिता ! ब्रह्मदेव देवांना बोलता असे ।
निश्चिंत जाहले सर्व विश्वरूपासि भेटले ।
भेटता प्रेमभावाने बोलले बोल हे असे ॥ २६ ॥
देवता म्हणाल्या -
पुत्रा ! विश्वरुपा व्हावे कल्याण सर्व ते तुझे ।
आश्रया पातलो येथे आम्ही तो पितरे तुझी ।
या मुळे सर्व त्या इच्छी पूर्णची करणे तुम्ही ॥ २७ ॥
’जयांसी जाहले’ पुत्र तयांचा धर्म हा असे ।
करणे गुरुची सेवा पितरां सेविने तसे ॥
ब्रह्मचारी अशांना तो सांगणे काय ते असे ॥ २८ ॥
वत्सा ! आचार्य वेदांचे पिता तो ब्रह्मयाचि नी ।
बंधू देवेंद्रमूर्ती नी माता पृथ्वीच ती असे ॥ २९ ॥
दयेची मूर्ति भगिनी धर्माची अतिथी असे ।
अभ्यागतोचि तो अग्नी आत्म्याच्या मूर्ति ते जिव ॥ ३० ॥
तुझे तो पितरे आम्ही शत्रूने जिंकिले अम्हा ।
आम्ही दुःखी असे सारे दारिद्र्य दुःख टाळू तू ।
पुत्रा ! ही आमुची आज्ञा पाळने कार्य हे तुझे ॥ ३१ ॥
ब्रह्मनिष्ठ द्विजो तू तो जन्माने आमुचा गुरु ।
तुजला गुरुची आम्ही मानितो विजयार्थ त्या ॥ ३२ ॥
पुत्रा रे ! सान असुनी कार्यार्थ पायही धरू ।
वेदज्ञानविना वृद्ध न होय थोर तो कधी ॥ ३३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
देवांनी प्रार्थिता ऐसे विश्वदेवे पुरोहिती ।
करण्या बोलले गोड प्रसन्न होवुनी मनी ॥ ३४ ॥
विश्वरूप म्हणाले -
ब्रह्मतेजांकरे क्षीण पौरोहित्य असे असे ।
त्यामुळे निंदिती संत महात्मे धर्मशील ते ॥
परी लोकेश्वरो स्वामी प्रार्थिता मह हे असे ।
मग माझ्या परी कोण नकार देउ तो शके ॥
खरा मी तुमचा आहे देवांचा नित्य सेवक ।
आज्ञा ही पाळणे यात माझा स्वार्थ बरा असे ॥ ३५ ॥
(इंद्रवज्रा)
अकिंचनो मी करि देवकार्य
    धान्यास गोळा करुनी भुईच्या ।
मी कां करू निंद्यचि भिक्षुकी जी
    भ्रमित ऐसे करितात कार्य ॥ ३६ ॥
(अनुष्टुप्)
इच्छा जी करिता तुम्ही कार्याची मजपासुनी ।
कार्य ते निंद्यची सत्य परी मी आपुले मन ॥
न मोडू शकतो कांकी कठीण नच ते मुळी ।
मनस्वी करितो कार्य होवो पूर्ण मनोरथ ॥ ३७ ॥
श्री शुकदेव सांगतात -
तपस्वी थोर ते होते विश्वरूप परीक्षिता ।
प्रतिज्ञा करुनी ऐसी मनस्वी कार्यि लागले ॥ ३८ ॥
नैतिक बळ लावोनी शुक्राने द्रव्य रक्षिले ।
तरी ते असुरी द्रव्य विद्या वैष्णवि योजुनी ।
इंद्राला विश्वरूपाने मेळुनी दिधले पुन्हा ॥ ३९ ॥
राजा ! जी मेळुनी विद्या इंद्रे मेळविला जय ।
ती सारी विश्वरूपाने औदार्ये दिधली असे ॥ ४० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ ६ ॥ ७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP