समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सहावा - अध्याय ६ वा
दक्षप्रजापतीच्या साठ कन्यांच्या वंशाचे वर्णन -
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
परीक्षिता ! ब्रह्मदेवे अती विनविल्यावरी ।
दक्षे असिक्नि गर्भाने साठ कन्याहि निर्मिल्या ।
पितृवत्सल त्या होत्या बहू दक्षावरी अशा ॥ १ ॥
दहा त्यातील धर्माला तेरा त्या कश्यपास नी ।
चंद्रा सत्ताविसो तैशा दो दो त्या भूत अंगिरा ।
कृशाश्वा दो तशा अन्य तार्क्ष्यासी दिधल्या पहा ॥ २ ॥
कन्यांची नी प्रपौत्रांची नावे मी सांगतो तुला ।
तिन्ही लोक जये वंशे भरूनी उरले असे ॥ ३ ॥
भानु लंबा कुकुभ् जामी विश्वा साध्या मरुत्वती ।
मुनुर्ता वसु संकल्पा धर्मपत्न्या नि त्यां मुले ॥ ४ ॥
भानूचे देवऋषभ नि त्याचा इंद्रसेन तो ।
विद्योत पुत्रलंबाचा मेघगण तयास तो ॥ ५ ॥
संकटो कुकुभाचा नी तया कीकटा पुत्र तो ।
दुर्गाभिमानि ते देव कीकटा पोटि जन्मले ॥ ६ ॥
विश्वेला विश्वदेवोनी न तया पुत्र ते पुढे ।
साध्यगणचि साध्याचे अर्थ सिद्धि तया पुन्हा ॥ ७ ॥
जयंत मरुत्वान् ऐसे मरुत्वी पुत्र दोन ते ।
जयंत भगवत् अंश उपेंद्र नाम त्यां दुजे ॥ ८ ॥
मुहूर्तीस मुहूर्ताचे गर्वी देवहि जाहले ।
मुहूर्तापरि ते जीवां आपुले फळ देत जे ॥ ९ ॥
संकल्पा पुत्र तो काम वसूचे आठ ते वसू ।
आठींचे नाम ते ऐसे ऐकावे तू परीक्षिता ॥ १० ॥
द्रोण प्राण ध्रुवो अर्क अग्नि दोष वसू विभा ।
द्रोणपत्नी अभिमती तिचे शोकादि हर्ष ते ॥ ११ ॥
ऊर्जस्वी प्राणपत्नीला सहो आयू पुरोजन ।
नगराचे अभिमानी पुत्र ते धरणीस की ॥ १२ ॥
वासना अर्कपत्नी ही तृषादी पुत्र हे तिला ।
धारा या अग्निपत्नीसी अनेक द्रविणक् पुढे ॥ १३ ॥
कृतीचा पुत्र जो स्कंद अग्निवीर्यात जन्मला ।
विशाख पोटि हा त्यांचा, शर्वरी दोषपत्नि ही ।
हिच्या गर्भे शिशूमार कलेचे हरिरूप ते ॥ १४ ॥
अंगिरसा वसू पत्नी विश्वकर्मा तिच्या मुळे ।
शिल्पांचे सर्वसर्वेशा भगवद्रूप जाहले ॥
पत्णि त्यांची कृती गर्भे चाक्षूष मनुनी तसे ।
विश्वेदेव तसे अन्य साध्यगणहि जाहले ॥ १५ ॥
विभावसू उषा ह्यांचे व्यूष्ट रोचिष आतप ।
आतपा पंचयामो नी तै कार्या जीव लागले ॥ १६ ॥
सरूपा भूतपत्नीने कोटि कोटिहि जन्मिले ।
रेवतोऽजो भवो भीम वाम उग्रो वृषाकपी ॥
अजैकपाद् अहिर्बुध्न्यो बहुरूपो महानिती ।
असे हे अकरा पुत्र मुख्य ते रुद्र की पहा ॥ १७ ॥
भूता या भूत्पत्नीला विनायक नि ते दहा ।
जाहले भूत जे श्रेष्ठ रुद्राचे पार्षदे खरे ॥ १८ ॥
स्वध्या जी अंगिरापत्नी पितृगण हिच्या मुळे ।
अथर्ववेद हा पुत्र दुजी त्या सतिचा असे ॥ १९ ॥
कृताश्व पत्नि जी अर्ची हिचा तो धूम्रकेश हा ।
धीषणाचा वेदशिरो देवलो वायु नी मनू ॥ २० ॥
तार्क्ष्याच्या विनिता कद्रू पतंगी यामिनी अशा ।
पतंगी पासुनी पक्षी पतंग शलभी मुळे ॥ २१ ॥
गरूड विनिता पोटी साक्षात् यज्ञेशवाहन ।
अरूण तो दुजा पुत्र जो सूर्यसारथी असे ।
कद्रूच्या उदरी सर्प जन्मले सर्व ते पुढे ॥ २२ ॥
सत्ताविस अशा देवी कृत्तिकादि शशिस्त्रिया ।
रोहिणीशी अति प्रेम चंद्राचे असल्या मुळे ॥ २३ ॥
कृष्णपक्षी क्षयी तैसा शुक्लपक्षात पूर्ण हा ।
उश्शाप जरि त्या धाला तरी मूल न जाहले ॥ २४ ॥
आता कश्यप पत्न्यांची नावे मंगल ऐकणे ।
लोकमाताचि त्या सर्व सृष्टि त्यांनीच निर्मिली ॥ २५ ॥
अदिती दीति काष्ठा नी अरिष्टा दनु सूरसा ।
क्रोधवशा इला ताम्रा सुरभी समरा मुनी ॥
तेरावी तिमिच्या पोटी जल जीव नि जंतु ते ।
समरा पोटि ते व्याघ्र आदी हिंसी तसे पशू ॥ २६ ॥
द्वीक्षूरी सुरभीपुत्र गायी म्हैस्यादि प्राणि ते ।
ससाने गृध्र हे पक्षी ताम्रासी पुत्र जाहले ।
मुनीच्या पोटि त्या झाल्या अप्सरा सुंदर्या पहा ॥ २७ ॥
क्रोधवशामुळे झाले विषारी साप विंचु ते ।
लता वृक्ष इलाचे नी राक्षसो सुसराचिया ॥ २८ ॥
गंधर्व ते अरिष्टाचे काष्ठाचे एकक्षूरि ते ।
एकसष्ट दनूपुत्र प्रमुख नाम ऐकणे ॥ २९ ॥
द्वीमूर्धा शंबरारिष्ट हयग्रीव विभावसू ।
अयोमुख शंकुशीरा स्वर्भानू कपिलो तसा ॥ ३० ॥
पुलोमा वृषपर्वा नी एकचक्रोऽनुतापन ।
धूम्रकेशी विरूपाक्ष विप्रचित्ती नि दुर्जय ॥ ३१ ॥
स्वर्भानुपुत्रि सुप्रभा नमुची वरिला हिने ।
पुत्री ती वृषपर्वाची शर्मिष्ट्ये तो ययाति नी ॥ ३२ ॥
वैश्वानर दनूपुत्रा सुकन्या चार ह्या अशा ।
उपदानवी हयशीता पुलोमा आणि कालका ॥ ३३ ॥
उपदानवी हिरण्याक्षे हयशीरा क्रतू विरे ।
दोघांनी वरिल्या दोघी पुलोमा कालका पुन्हा ॥ ३४ ॥
भगवान् कश्यपो यांनी ब्रह्म्याचा हेतु जाणुनी ।
वरिल्या द्वय त्या कन्या त्या वैश्वानरपुत्रि ज्या ॥
पुलोम कालकेयो हे साठ सहस्र दानवो ।
जन्मले वीर ते ऐसे यज्ञघ्न जाणुनी पुढे ॥ ३५ ॥
प्रप्पित्ये तव त्या पार्थे एकाने सर्व मारिले ।
स्वर्ग तो जिंकिला तेंव्हा जाहली गोष्ट ही अशी ॥ ३६ ॥
विप्रचित्ती सिंहिकेने जन्मिले शत पुत्र नी ।
राहू तो थोरला त्यात नी नव्व्यानव केतु ते ॥ ३७ ॥
आता परीक्षिता ऐक अदिती वंश तो क्रमे ।
देवाधिदेव या वंशी जन्मला रूपि वामन ॥ ३८ ॥
विवस्वान् आर्यमा पूषा सविता भग नी त्वष्टा ।
धाता विधाता वरुणो इंद्र मित्र त्रिविक्रम ॥ ३९ ॥
संज्ञा भाग्यवती हीस विवस्वान् तेज प्राप्तीने ।
वैवस्वत मनू आणि यम नी यमि जन्मले ॥
संज्ञेने घोडिचे रूप घेवोनी सूर्य गाठिला ।
तयाच्या पासुनी तीस अश्विनीकुमार द्वय ॥ ४० ॥
छाया ही दुसरी पत्नी हिला सावर्णि तो मनू ।
दुजा शनैश्वरो आणि तपती पुत्रि जाहले ।
तपतीने परीरूपी वरिला संवरण तो ॥ ४१ ॥
मातृका आर्यमापत्नी हिला चर्षणी नावचे ।
जाहले ज्जानि ते पुत्र जयांनी वर्ण निर्मिले ॥ ४२ ॥
संतान नच ते पूषा हासला दक्षयज्ञि तो ।
म्हणून पडले दात चाळले अन्न घेतसे ॥ ४३ ॥
रचना दैत्यपुत्री ही त्वष्टाची पत्नी जाहली ।
विच्या गर्भे सन्निवेश विश्वरूप असे तरी ।
इंद्राच्या अवमानाने रुसता तो बृहस्पती ।
देवांनी विश्वरूपाला मानिला आपुला गुरु ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥ ६ ॥ ६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|