समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय ४ था

ऋषभदेवाचे राज्य शासन -

श्री शुकदेवजी सांगतात् -
(भृंगनाद)
राजन ! नाभिनंदना अंगी वज्रांकुशादी श्री
भगवान्‌ विष्णुचे युत चिन्ह लाभले जन्मता,
समता शांती वैराग्य ऐश्वर्यादी महाविभूती
कारणे प्रभाव वाढू लागला । मंत्र्यादिवर्गा
प्रजेसी देवतांना अभिलाषा वाढली की पृथ्वीचे
शासन करील हाच की ॥ १ ॥
तो सुडौल शरिरी सुंदर, विपुल कीर्तिमान्‌, तेज
बल ऐश्वर्य यश पराक्रम नि शूरवीरतादी गुण
पाहता नाभीने ऋषभ नाम त्यां ठेविले ॥ २ ॥
ईर्षावश इंद्रे एकदा तया राज्यीं वर्षा नच वर्षिली ।
तेंव्हा योगेश्वर भगवान्‌ ऋषभे इंद्राच्या मूर्खत्वा
हांसुनि योगमाया प्रभावे अजनाभ खंडे खूप
जल वर्षिले ॥ ३ ॥
आपुल्या इच्छेनुसार श्रेष्ठपुत्र प्राप्तीने नाभी
अत्यंत आनंदमग्न जाहला नी पुराण पुरुष श्रीहरी
मानवी देह धारुनी आपुल्या गेही वसल्या आनंदे
त्याचे लालन सप्रेमे करिता मुग्ध हो‌उनि वत्सा !
तात ! या सद्‌गदित वाणीने म्हणता बहुहि सुख
मानू लागला ॥ ४ ॥
जेंव्हा पाहिले त्याने मंत्रीमंडळ, राष्ट्राची जनता,
ऋषभदेवा बहुत प्रेम करिते, तेंव्हा त्याने त्याला
अभिषिक्त करिता द्विजांच्या विश्वासे
सोपविले । नी स्वतः नी आपुली भार्या मेरुदेवीच्या
सहित बदरिकाश्रमीं पातला । तेथे अहिंसावृत्ती
ने उद्वेग विहिन, कौशल्यपूर्ण, तपस्या नी
समाधानीने भगवान्‌ वासुदेवाच्या नर
नारायणरूपा प्राप्त समये तयांच्या स्वरूपा
आराधिता जाहला लीन ॥ ५ ॥
पांडुनंदना ! राजा नाभीच्या विषयी उक्ती प्रसिद्ध असे -
(अनुष्टुप्‌)
राजर्षी नाभिचे कर्म कोण तो आचरू शके ।
शुद्ध कर्मास तुष्टोनी श्रीहरी पुत्र जाहला ॥ ६ ॥
द्विजभक्त तया ऐसा सुद्धा तो कोण हो शके ।
तुष्टोनी मंत्रयोगाने द्विजे श्रीहरी दाविला ॥ ७ ॥
(भृंगनाद)
भगवान्‌ ऋषभदेवे अजनाभ खंडा कर्मभूमि
माणनि मानु लोकसंग्रहा गुरुगृही कांही काल
राहिला । यथोचित दक्षिणा गुरुसी देउनी
गृहस्थाश्रमी प्रवेशण्या आज्ञा घेतली । पुन्हा
लोकांना गृहस्थाश्रम शिकविण्या इंद्राने जी पुत्रि
दिधलि जयंती हिच्याशी विवाह साधिला नि
श्रौत-स्मार्त दोन्ही शास्त्रोपदिष्ट कर्माचे आचरण
करुनी आपुल्या समान शतपुत्रां जन्मवी ॥ ८ ॥
तयां सर्वात थोर भरतजी जो अधिक गुणी ।
तयांच्या नामे या अजनाभ खंडा लोक भारत
वर्ष म्हणू लागले ॥ ९ ॥
त्याहुनी सान कुशावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू,
भद्रसेन, इंद्रस्पृक्‌, विदर्भ नि कीकट हे नव्वदांहुनि
थोर नऊ बंधू श्रेष्ठ एवं ज्येष्ठहि होते ॥ १० ॥
तयांहुनि सान कवी, हरी, अंतरीक्ष, प्रबुद्ध,
पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस नी
करभाजन हे नऊ राजपुत्र ॥ ११ ॥
हे होते मोठे भागवत्‌धर्म प्रसारक नि श्रेष्ठ ऋषि
जाहले। भगवान्‌ महिमाने महिमान्वित नि परम
शांतिपूर्ण चारित नारद-वसुदेव संवादे एकादश
स्कंधी वदुचि ॥ १२ ॥
जयंतीचे सान एक्क्याऐंशी पुत्र पितयाची
आज्ञा पालनी तत्पर, अति विनित महान्‌ वेदज्ञ
नि निरंतन होते यज्ञ करणारे असे । ते
पुण्यकर्मानुष्ठाने शुद्ध हो‌उनी जाहले ब्राह्मण ॥ १३ ॥
परम स्वतंत्र असुनि ऋषभदेव तरि अनर्थ
परंपरारहित केवलानंदानुभवरूप नि साक्षात्‌
परमेश्वरचि, तरीही अज्ञानिया समान कर्म
करुनि न तत्व जाणी तयां ते शिकविती ।
सवेचि सम शांत सुहृद करुणामय राहुनी धर्म
अर्थ यश संतान सुखभोग गृहस्थाश्रमी
राहुनी लोकांना नियम दाविले ॥ १४ ॥
जैसे जैसे महापुरुष वागती तैसेचि अन्य
लोक वागती ॥ १५ ॥
जरी तो धर्माचे साररूप वेदाचे गूढरूप रहस्य
जाणी, तो ही द्विज बोलती तसे विधीने
सामदामादी नियमानुसार प्रजेचे पालन करी ॥ १६ ॥
तये शास्त्र नी द्विजोपदेश भिन्न भिन्न देवतां
करिता द्रव्य, देश, काल, आयु, श्रद्धा नी
ऋत्विजादि संपन्न सर्व प्रकारे शत शत यज्ञहि केले ॥ १७ ॥
भगवान्‌ ऋषभे देवाच्या शासन समयीं या देशी
कोणी पुरुष आपुल्या साठी कोणत्याहि मार्गे
प्रभूच्या अनुराग दिन दिन वाढविण्या विना
अन्य कांहीच नेच्छी न एवढेचि कुणि न बघे
आकाश कुसुमादी अविद्यामान्‌ वस्तुंकडे ढुंकूनही ॥ १८ ॥
एकदा भगवान्‌ ऋषभदेव फिरत फिरत ब्रह्मावर्त
देशी पहुचले । तेथे मोठमोठ्या ब्रह्मर्षिंयां सभीं
तसे प्रजे पुढे आपुले समाहित चित्त नि विनय
नि प्रेमभारे सुसंयत पुत्रांना दीक्षा देण्या कारणे
बोलला या परी ॥ १९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हा ॥ ५ ॥ ४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP