समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध पाचवा - अध्याय ३ रा

राजा नाभिचे चरित्र -

श्री शुकदेवजी सांगतात -
(भृंगनाद)
राजन ! अग्निध्रपुत्र नाभीला नव्हते संतान तेंव्हा
त्याने आपुली पत्‍नी मेरुदेवीच्या सह पुत्रेच्छे
एकाग्रे यज्ञपुरुषा याचिले ॥ १ ॥
जरी सुंदरकांति भगवान्‌ कुणा न भेटती तरी द्रव्य
काल ऋत्विज दक्षिणा नि विधि या यज्ञसाहित्ये
न भेटता भक्ता कृपा करितीं । जेंव्हा नाभीने
अर्चिले तेंव्हा त्याचे प्रसन्नले मन । तरी त्याचे
स्वतंत्र सर्वथा रूप ते तरिहि सुंदर, ह्रदयाकर्षक
नेत्रानंदी अवयवयुत मूर्तीत तो प्रगटला ॥ २ ॥
त्यांच्या श्री अंगी पीतांबर नि वक्षीं श्रीवत्स
चिन्ह शोभले नि शंख चक्र गदा पद्म करीं नि
गळ्यात वनमाला कौस्तुभ शोभला । सर्व अंग-
प्रत्यंग कांतिवर्धे किरणजालमंडित किरिटे,
कुंडले, कंकणे, करधनी नि हार बाजुबंद नुपुरादी
आभूषणे । ऐसा चतुर्भुज पुरुष विशेषा प्रगटता
ऋत्विज, सदस्य, यजमान आदि सर्व हर्षले, जैसे
निर्धन्या धनराशी मिळता ना लपविता ये । पुन्हा
सर्वे झाकुनि शिरे अत्यंत आदरे अर्घ्याने प्रभुसी
पूजिले नि ऋत्विजे त्यांची स्तुती वर्णिली ॥ ३ ॥
ऋत्विज म्हणाले-
पूज्यतमा ! अनुगत भक्त तुझे तू आम्हा पूजनियची ।
परंतू काय माहित अम्हा तुझी पूजने ? वारंवार
तुला नमस्कार असो, महापुरुषे शिकविले
एवढेची, प्रकृती पुरुषाहुनी परेशा प्राकृतगुण
कार्यभूत प्रपंची बुद्धी फसता तव गुण गाण्या
सर्वथा असमर्थ असा कोणता पुरुषो ? जो
प्राकृत नाम रूप तसे आकृते रूपा निरूपण
करु शके ? तू साक्षात्‌ परमेश्वर ॥ ४ ॥
तुझे परम मंगलमय गुण दुःखांना संपूर्ण लोकांच्या
दमन करिती । जरी कोणी तू ते वर्णिति तरी
एकदेशिचि होतसे ॥ ५ ॥
प्रभो परंतु जरि तुझ्या गुणा सद्‌गद-वाणिने,
प्रेमे स्तुति करिता जल पल्लव तुलसि वा दुर्वांकुर
वाहुनि पूजिता तरिहि तू तोषसी ॥ ६ ॥
आम्हासी तो वाटे प्रेमविण हे द्रव्य-कालादी
यज्ञ याचे तुला न कांही प्रयोजन ॥ ७ ॥
स्वतः तू क्षणोक्षणी समस्त पुरुषार्थाचे फलस्वरुप
परमानंद स्वभावतःच मगय्यी । तू साक्षात्‌ त्याचे
स्वरुप असशि । तुज तेंव्हा यज्ञादीचे प्रयोजन नच
मुळी, तथापि अनेक परिच्या कामनासिद्धी आम्ही
इच्छितो मनोरथ सिद्ध्यर्थ हेच पर्याप्त साधन असे ॥ ८ ॥
तू श्रेष्ठ ब्रह्मादिकांहुनि । आम्हा ना ठावे आमुचे
कल्याण कशात ते नी आम्हा कडुनि उचित
पूजन नच । तथापि ज्यापरि अक्षान्याच्यां कडे
करुणावश तलज्ञहि जाती निमंत्रणाविना, तैसे
मोक्ष संज्ञक अम्हा परमपद नि अभीष्ट वस्तू
पुरवावया साधारण दर्शका समोरही प्रगटले ॥ ९ ॥
पूजनीया सर्वश्रेष्ठ वर अम्हा तू दिधला ब्रह्माही
समस्त वरांत तो की राजर्षी नाभिमज्ञशालीं
साक्षात्‌ आमुच्या नेत्रापुढे प्रगटला । आता
काय वर आम्ही मागोत याहुनी ॥ १० ॥
प्रभो आपुल्या गुणांचे गान गाण मंगलमय परम
असे । ज्यांनी वैराग्य द्वारा प्रज्वलित ज्ञान द्वारा
आपुल्या हृदयिचा जाळिला राग द्वेषादी मळ
अर्थात ज्यांचा स्वभाव आपुल्या समान शांतचि
ते आत्माराम मुनिगणहि गाती आपुली कीर्तने
तेंव्हा आम्ही मागतो एवढाचि वर की पडता
ठेचाळता शिंकता जांभई देता संकट समयी तसे
ज्वरात नी मरणादी अवस्थां मधे आपुले स्मरण
न होता ही कवण्या प्रकारे आपुले सकल
कलिमल विनाशक भक्तवत्सल, दीनबंधू आदी
गुणद्योतक नाम म्हणूं शको ॥ ११-१२ ॥
या शिवाय म्हणणे योग्य नसे, अशीही एक
प्रार्थना आणखी असे, तूं साक्षात्‌ परमेश्वर स्वर्ग-
अपवर्ग आदी अशी कोणती वस्तु की ती तूं देऊ
न शके । तथापि कंगाल द्रव्यदात्यापाशी जाता
भुसाही न मिळू शके त्यापरी यजमान आमुचे
यज्ञीं राजर्षि नाभि संताना परमपुरुषार्थ मानिती
नी तया आपुल्यापरी संतान मागण्या करित ते
आपुली आराधना ॥ १३ ॥
न आश्चर्य यात कांही । तुझी माया कोणीही पार
करुं न शके न कुणा वशहि होतसे । जये
महापुरुषांच्या चरणि आश्रम न घेतला ऐशा कोणा न
माया मोही ? बुद्धीसी त्याचा न पडे पडदा कदा नि
विषयरूप विषाचा वेग दूषित न करणार का ? ॥ १४ ॥
देवाधिदेवा मोठाले काम करिता स्वभक्तांचे आम्ही
मंदमति कामनांवश हो‌उनी ही तुच्छ कार्या आवाहिले
हा तो अनादरि । परंतू तुम्ही आहा समदर्शि
तेंव्हा अम्हा अक्षांच्या धारिष्ट्या क्षमाचि करा ॥ १५ ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
राज्‌ वर्षाधिपतिनाभिच्या पूज्य ऋत्विजे प्रभूच्या
चरणा वंदिले नी पूर्वोक्त स्तोत्रा गायिले तदा
देवश्रेष्ठ हरि करुणावशे या परी बोलला ॥ १६ ॥
श्री भगवान म्हणाले -
ऋषिंनो मोठी अज्ञानी गोष्ट ही । सत्यवादी महात्मे
तुम्ही सर्व तो तुम्ही तो मला माझ्या सम नाभीस
पुत्र मागीतला, हे दलभचि । मुनिंनो । माझ्यापरी
मीचि नि अद्वितीय ही । तरीही ब्रह्मवाक्य न हो
मिथ्या द्विजकुलमुख माझे असे ॥ १७ ॥
करिता आग्नीध्रनंदन नाभिकुळीं अंशकलेने मी
अवतरे, कांकी मज समान न दिसे मला अन्य कोणी ॥ १८ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
महाराणी मेरुदेवीला ऐकवुनि यापरि पतीस
वदुनि भगवान्‌ गुप्तहि जाहले ॥ १९ ॥
विष्णुदत्त परीक्षिता ! या यज्ञीं महर्षिद्वारा प्रसन्न होता
श्रीभगवान्‌ नाभिचा वर पुरा करण्या महाली मेरु
देवीच्या गर्भीं दिगंबर संन्यासी, ऊर्ध्वरेता मुनिधर्म
प्रगटिण्या शुद्ध सत्त्वमय विग्रहे प्रगटला ॥ २० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ ५ ॥ ३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP