समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ११ वा
मन्वंतरादि कालविभागाचे वर्णन -
मैत्रेयजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
पृथ्व्यादि कार्य सूक्ष्मांशू ते न भागती ।
परमाणू न संयोगी संयोगे भ्रम तो पडे ॥ १ ॥
परमाणू सूक्ष्मांशाचे कार्य ते पृथिवी महत् ।
न भान कालमात्राचे घटकाशी जसा भ्रम ॥ २ ॥
अवस्थी परमाणूंच्या व्याप्त होवोनि व्यक्त त्या ।
पदार्था भोगतो सृष्टी काळाला जीव जाणतो ॥
स्थूळ नी सूक्ष्म रूपाचा अंदाज लागतो तया ॥ ३ ॥
परमाणू स्थितीकाल प्रपंची अति तो लघु ।
सृष्टिच्या पासुनी भोगी अवस्था सर्व तो महान ॥ ४ ॥
दोन त्या परमाणूंचा अणू नी अणुच्या त्रये ।
त्रसरेणु झरोक्यात पाहता चमके दिसे ॥ ५ ॥
त्यातुनी कीरा जाण्या तृत्यांश समयो त्रुटी ।
त्रुटीच्या शंभरी वेध वेधत्रयचि तो लव ॥ ६ ॥
त्रिलवाचा निमिषो नी त्रिनिमेषेचि तो क्षण ।
क्षणी पाचात ती काष्ठा पंधरा गुणि तो लघु॥ ७ ॥
पंधरा लघुच दंड द्विदंडाचा मुहुर्त तो ।
सप्त प्रहर तो दंड यामही त्यास बोलिजे ॥
याम हा चवथा भाग दिन वा रात्रिचा असे ॥ ८ ॥
सहा पळेभर तांबे त्याचे पात्र करोनिया ।
सुवर्ण माष छिद्राने जळाचा ओघ नाडिका ॥ ९ ॥
चार प्रहर रात्रीचे दिवसाचे तसेच ते ।
पंधरादिन रात्रीचे पक्ष शुक्ल कृष्ण हे ॥ १० ॥
द्वीपक्षी मास तो एक पित्रांची दिनरात्र ती ।
द्वैमासी ऋतो तो एक अयनी मास ते सहा ॥
अयनी भेद ते दोन उत्तरायण दक्षिण ॥ ११ ॥
दोघांच्या दिनरात्रीने देवांचा दिन एक तो ।
वर्ष हे द्वादशो मासी मानवा आयु शंभरी ॥ १२ ॥
चंद्रादि ग्रह नक्षत्रे तारांगणहि सर्व हे ।
कालस्वरूप सूर्याने बारा राशीत फीरती ॥ १३ ॥
सूर्य बृहस्पती चंद्र सवनी भेद मास जे ।
संवत् परि इडा वर्ष अनुवत्सर वत्सर ॥
या परी रूप वर्षाचे नावही त्या तसे मिळे ॥ १४ ॥
(वसंततिलका)
तेजस्वरूप सविता बिज अंकुराला
कालादि शक्त गतिने करि कर्म सारे ।
मोहादि वृत्ति पुरूषी हरि आयु सारी
यज्ञादि मंगलमाया फळ तेज देतो ॥ १५ ॥
विदुरजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
मनुष्य पितरे देव यांची तो आयु बोलले ।
त्रिलोक बाह्य जे कोणी तयांची आयु सांगणे ॥ १६ ॥
तुम्ही तो भगवंताची जाणता काळशक्ति ती ।
ज्ञानी तो पहती योगे दृष्टिने विश्व दिव्य ते ॥ १७ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
सत्य त्रेता नि द्वापार कली सह चतुर्युग ।
बाराहजारतो वर्षे आयु देवास ती असे ॥ १८ ॥
क्रमाने चार यूगाचे चौ तीन दोन एक ते ।
सहस्त्र दिव्य ते वर्ष संध्येचा काळ दुप्पट ॥ १९ ॥
युगादिकाळ ती संध्या अंती संध्यांश जाणि जे ।
दोघात कळ तो यूग युगधर्म सुनिश्चित ॥ २० ॥
धर्म तो सत्य यूगात चौपदी छान चालतो ।
पुढे तो हीन आचारे एकेक पाय हो क्षिण ॥ २१ ॥
त्रिलोका पुढती महर् ब्रह्मलोक सहीत त्यां ।
तेवढीच तया रात्र तेंव्हा ब्रह्माहि झोपतो ॥ २२ ॥
सरता रात्र ती त्याची कल्पारंभास तो क्रमे ।
चौदा त्या मनुचा जन्म एकेक कल्प वेळिला ॥ २३ ॥
दोनशे चवर्याऐंशी युगे मनु अधिपिती ।
सप्तर्षि इंद्रदेवादी सवे मन्वंश राज ते ॥ २४ ॥
सारी सृष्टि अशी रोज ब्रह्मा त्रीलोक मांडतो ।
मनुष्य देवाता पित्रे पक्षादी कर्म भोगिती ॥ २५ ॥
सत्वात आश्रया राहे चालू या मनवंतरी ।
भगवान् मूर्तिच्या द्वारे सांभाळी विश्व तो बळे ॥ २६ ॥
ब्रह्म्याचादिन सरता तमाला तो स्विकारतो ।
निर्माण पुरूषार्थाला थांबवी, शांत राहतो ॥ २७ ॥
तेंव्हा तो लोप सृष्टीचा तया मध्येच होतसे ।
प्रलयी रात्र ती ऐसी चंद्र सूर्य जघी नसे ॥ २८ ॥
शेषाच्या मुखिच्या अग्ने जळती तिन्हि लोक ते ।
तपाने व्याकुळे विश्व महर्लोकातुनी जना ।
आश्रया पातती भृगु अणि जे ते मुनीश्वर ॥ २९ ॥
प्रचंड प्रलयी वारे वाहुनी सात सागरा ।
उन्मत्त उठती लाटा त्रिलोका बुडवीतशा ॥ ३० ॥
तेंव्हा त्यांचि जलामध्ये भगवान् योगविद्रित ।
राहतो नि तदा त्याला स्तात्रे ते मुनि गात ती ॥ ३१ ॥
काळाच्या गतियोगाने सहस्त्रयुग चार ते ।
दिनांनी शंभरी वर्षे ब्रह्म्याची आयु संपते ॥ ३२ ॥
त्याच्या अर्ध्या आयुष्याला परार्ध नाम ते असे ।
पारार्ध जाहला एक दुसरा सद्य हा असे ॥ ३३ ॥
परार्धारंभ काळात ब्राह्म कल्प महान जे ।
तेंव्हाचि जन्माला ब्रह्मा नामे जे शब्द ब्रह्म ते ॥ ३४ ॥
पुन्हा जे जाहले कल्प पद्मनाम तया असे ।
तेंव्हा सरोवरीं नाभी विराट पद्म जन्मले ॥ ३५ ॥
द्वितीय कल्प आरंभी वराह अवतार तो ।
सध्या जो चालु हा कल्पवराह नाम त्याजला ॥ ३६ ॥
दोन या प्रहरामधे अव्यक्त नि अनादि जो ।
विश्वात्मा श्री हरी त्याचा निमेष मानला असे ॥ ३७ ॥
परमाणू सवे काळ ज्या आधिनी असे ।
मनीं त्या मालकी नाही गर्व्यांना शासितोचि तो ॥ ३८ ॥
पंचतन्मात्र नी आठ प्रकृती दश ईंद्रिये ।
मन नी पंचभूते ते सोळांचे कवचो असे ॥ ३९ ॥
योजने कोटि पन्नास विस्तार आत ज्या असा ।
ब्रह्मांड बाह्य अंगाला दहाच्यात्या पटीत ते ॥
कवचो सात ते त्याला याला तो अणु मानितो ॥ ४० ॥
ब्रह्मांड शेकडो राशी ब्रह्माक्षर ते पहा ।
समस्त कारणी तोची परमात्मा पुराण जो ॥
त्याचे ते धाम हे ऐसे भगवत् रूपची असे ॥ ४१ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥ ३ ॥ ११ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|