समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ९ वा
ब्रह्माजी द्वारा भगवंताची स्तुति -
ब्रह्मदेव म्हणाले -
(वसंततिलका)
मी जाणिले प्रभू तुला ! बहु काळ गेला
दुर्भागि जीव नच हे रुप जाणितात ।
नाही तुझ्याविण तसा अणु रेणु सुद्धा
माया गुणे प्रगटसी जरि सत्य ना ते ॥ १ ॥
चित् शक्ति तू तळपता तम नाश होतो
ज्या नाभिस्थान कमळीं मम जन्म झाला ।
ते शेकडोस मुळ हो अवतार स्थान
त्यांना कृपा करविण्या मम जन्म झाला ॥ २ ॥
आनंद,भे विण तू स्वरूपीहि तेज
मी विश्व हे रचियण्या तुज प्रार्थियेले ।
विश्वाअतिता शरण मी समजून आलो
संपूर्ण भूत न इंद्रिय आश्रयो तू ॥ ३ ॥
हे विश्वमंगलमया तुज पूजितो मी
झाली हितास मम ध्यानि तुम्हासि भेट ।
पापात्मि ज विषयी जीव तुला न ध्याति
मी तो तुला नमितसेचि पुनःपुन्हाही ॥ ४ ॥
जे वेद वायुरुप वेगि पदारविंदी
गंधास कर्णपटि सेविति नित्य संत ।
त्यांच्या न तू हृदय या कमळास दूर
ते बांधिती स्वमनची तव पादपद्मा ॥ ५ ॥
नाही पदां रण जो नच आश्रियेला
तेंव्हा तया धन घरादि भये नि शोक ।
ती लालसा भयप्रदो अन दीन होण्या
ती एक दुःप्रद कारण जीव भोगी ॥ ६ ॥
कीर्ती तुझी हटवितेच अमंगलाला
तेथे न गुंतिन नी विषयास भोगी ।
त्याच्या सुखार्थ करि जो नित हीन कर्म
तेणे त्यजानि दिधले जणु प्राक्तनाते ॥ ७ ॥
तृष्णा नि भूक कफ वात नि पित्त थंडी
ऊष्मादिका अन हि काम तसेचि क्रोधी ।
भोगी प्रज सतत हे मज पाहुनीया
होते प्रभो अतिव दुःख मना न साहे ॥ ८ ॥
माया प्रभाव पडता जिव पाहतो ती
स्वरूप अणि तुजला बघती निराळा ।
स्वामी तयास कुठली भवमुक्ति ? नाही !
मिथ्या तरहि जिव भोगि स्वकर्म दुःख ॥ ९ ॥
साक्षात जे हृषि मुनी नच कीर्तनाचा
आनंद ना मळविता फसती भवात ।
विक्षिप्त चित्त दिन रात्र ध्यास
निद्राहि ना मग तया धन ही न लाभे ॥ १० ॥
नाथा ! तुझा कळतसे गुण-गानि मार्ग
जो भक्तियेग करितो हृदयात तू त्या ।
जो जै भजे धरूनि भाव करूनि गान
तैशा रुपासरूनि मग बोध देसी ॥ ११ ॥
तूं एकटा निसतो परि सर्वभूती
त्या देवता धरूनि हेतु तुला पुजिती ।
ना पावसी कधिहि तू हवि यज्ञकर्मीं
जो सर्वभूत जतो मग त्यास पावे ॥ १२ ॥
जो आर्पिलेतुजसि कर्म न नाश पावे
हेतु तुझाच असता फल रूप याग ।
दानादि कतिव हेतु अपार श्रेष्ठ
नाही मुळी कठिण कांहि तुझ्या कृपेने ॥ १३ ॥
प्राण्यास भद-भ्रम जो तुझिया प्रकाशे
संपोनि जाय सगळा तयि अंधकार ।
उत्पत्ति नी स्थिति लयी तव खेळ आहे
तेंव्हा तुला प्रभु नमो नि नमो सदाही ॥ १४ ॥
जो प्राणत्यग समयी भजतो तुला नी
होऊनिया विवश नाम वदेल वाचे ।
तो त्यागिते सकल कर्म नि ब्रह्म होतो ।
अजन्म तू शरण मी तुजला परेशा ॥ १५ ॥
तू विश्वरूप तरुसीच विराजमान
स्वीकार तू करुनिया गुण तीन आम्ही ।
शाखेस भेद भरूनी मग जन्मलो की
शाखा तुझ्याच मनु या तुजला मनी मी ॥ १६ ॥
देवा तुझा शणधर्म हितैषि ऐसा
तू हा स्वये कथियला परि जीव भ्रांत ।
त्याचा प्रमाद करितो सुखनाश सारा
ती नाशशक्ति तुझिची नमितो तुला मी ॥ १७ ॥
मी सत्यलोक अधिदेव जगात श्रेष्ठ
तोमी भिऊनि तुयि ययि कालरूपा ।
केले तसेचि बहु ते तप,सा-----त
तू यज्ञरूप अधि हा नमितो तुला मी ॥ १८ ॥
तू पूर्णकाम असी विषयास मुक्त
तू आपुली परिसिमा अन धर्मकार्या ।
पक्षी नि ते पशु शा मग योनि अंशे
भोगि सुखास लिलया नमो तुला मी ॥ १९ ॥
तू राग नी अभिनिवेष नि द्वेष दंभ
नाहीस तू अधिही तयि त्या अविद्यीं ।
सारे तुझ्याच उदरी मिटवूनि शय्यी
झोपून हा श्रमित तू पहुडे असा हा ॥ २० ॥
मी जन्मलो कमलनाभिं तुझ्याच पोटी
जे साठले सकल विश्व तुझाच पोटी ।
ते विश्व तू रचियण्या मज दे कृपा ती
सारोनि योगनिज ही,नमितो तुला मी ॥ २१ ॥
तू तो समस्त जगता सुहृदेक आत्मा
तू पावसी निजकृपे शरणागताला ।
तू षड् गुणे करिहि जग मोद युक्त
तेणे भरे मम मती रचण्यास विश्व ॥ २२ ॥
भक्तास कल्पतरु तू कमले सहीत
घेऊनि कर्म कासी अवतार लीला ।
दे प्रेरणा रचियण्या अन शक्ति दे तू
जेणे न राहि मजला अभिमा त्याचा ॥ २३ ॥
मी तो तुझ्या कमलनाभित जन्मलो नी
विज्ञान शक्ति मज पासि तुझीच आहे ।
या सृष्टिला रयिण्या जरि वेळ गेला
तेंव्हाहि मी न विसरो मनि वेदमंत्रा ॥ २४ ॥
तू तो पुराण पुरुषो करुणामयो तू
तू प्रेमदृष्टि हसनी उघडी स्व नेत्रा ।
तू सोडवेगि शयना झोप सोडी
वाणीस बोल मधु शब्द विषाद टाळी ॥ २५ ॥
मैत्रेयजी म्हणाले-
तप विद्या समाधीत ब्रह्म्याने जन्मस्थान जो ।
पाहला भगवान् , त्याला स्तवोनी स्तब्ध राहिला ॥ २६ ॥
पाहिले भगवंते त्यां घाबरा खिन्नची असा ।
रण्यि सृष्टि हीसारी तयाची बुद्धि ना चले ॥ २७ ॥
पाहता ती अवस्था नी जाणुनी हेतु तो तया ।
खेदनाशार्थ तै बोले गंभीर मधुसुदन् ॥ २८ ॥
श्री भगवान् म्हणाले-
वेदगर्भा नको खेद आळसा टाकुनी उठी ।
त्वरे तू लाग उद्योगा हेतू मी जाणिला तुझा ॥ २९ ॥
पुन्हाही ऐक ते माझे तप तू करणे असे ।
तेणे या त्रयलोकाचे होईल ज्ञान अंतरी ॥ ३० ॥
तेंव्हा तू सर्वलोकांना भक्तियुक्त समाहित ।
माझ्यात पाहसी आणि तुलाही जाणसील तू ॥ ३१ ॥
कात अग्नि ज राही तैसे माझ्यात जीव ते ।
पाहता दृष्टिने ऐसा तेंव्हा अज्ञान नष्टते ॥ ३२ ॥
जेंव्हा कोणी वता मध्ये भूत इंद्रीय नी गुण ।
रही मज जो पाही त्यालाच मोक्ष लाभतो ॥ ३३ ॥
अनेक कर्म संकारे जीवांना हेतु निर्मिण्या ।
असुनी न तुला मोह ब्रह्माजी ही कृपा मम ॥ ३४ ॥
आद्य तू मंत्रद्रष्टा नी कार्यात स्मरशी मजसी मज ।
त्या रजो गुणिचे पाप त्यामुळे तुज बांधिना ॥ ३५ ॥
गुणातीत मलाऐसे जाणिसी तूच एकला ।
सोपे ना ज्ञान हे ऐसे तुला ते लाभले खरे ॥ ३६ ॥
आश्रय तुज सदेह येता तो नलिनीतुनी ।
जळात धुंलि तेंव्हा दाविले रूप मी तुला ॥ ३७
स्त्रोत्र तू गायिले माझे निष्ठेने वैभवी असे ।
प्रीय ! ते फळ माझ्याची कृपेचे जाणिज पहा ॥ ३८
सृष्टिच्या निर्मितीसाठी सगुणी गमलो परी ।
निगणी गायिले रूप ’तथास्थू’ मी प्रसन्नची ॥ ३९
समस्त कामनापूर्ती करण्या मी समर्थची ।
गायि जो स्तोत्री त्याला प्रसन्नशीघ्र होतसे ॥ ४० ॥
जाणिती तत्ववेत्ते ते दान योग समाधिला ।
कल्याणफळ जे आहे ही माझीच प्रसन्नता ॥ ४१ ॥
आत्म्याचा मी असे आत्मा प्रियाचा मी प्रियो असे ।
माझे ते प्रीय देहादी प्रेम माझ्यावरी करा ॥ ४२ ॥
वेळींया माझिया रूपी त्रिलोक लीन जाहले ।
पूर्वकल्पापरी त्याते वेदरूपे स्वयं रची ॥ ४३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ ३ ॥ ९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|