|
श्रीमद् भागवत पुराण तत्त्वानां संख्या पुरुषप्रकृतिविवेकश्च - तत्त्वांची संख्या आणि पुरूषप्रकृतिविवेक - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीउद्धव उवाच -
( अनुष्टुप् ) कति तत्त्वानि विश्वेश सङ्ख्यातानि ऋषिभिः प्रभो । नवैकादश पञ्च त्रीणि आत्थ त्वमिह शुश्रुम ॥ १ ॥ केचित्षड्विंशतिं प्राहुः अपरे पञ्चविंशतिं । सप्तैके नव षट्केचित् चत्वार्येकादशापरे । केचित्सप्तदश प्राहुः षोडशैके त्रयोदश ॥ २ ॥ एतावत्त्वं हि सङ्ख्यानां ऋषयो यद्विवक्षया । गायन्ति पृथगायुष्मन् इदं नो वक्तुमर्हसि ॥ ३ ॥
उद्धवजी म्हणाले - ( अनुष्टुप ) विश्वेशा किति ते तत्व संख्येने ऋषि सांगती । अठ्ठावीस तशी तत्त्वे आत्ताच ऐकिली प्रभो ॥ १ ॥ सव्वीस बोलती कोणी सात वा पंचवीस नी । नऊ वा चार वा कोणी बारा संख्येत सांगती ॥ २ ॥ सतरा वदती कोणी सोळा तेराहि ते कुणी । एवढी भिन्नता कैसी कृपया सांगणे प्रभो ॥ ३ ॥
विश्वेश प्रभो - हे विश्वस्वामिन प्रभुराया - ऋषिभिः कति तत्त्वानि संख्यातानि - ऋषिपंडितांनी किती मूळतत्त्वे सांगितली आहेत - इह नव एकादश पंच त्रीणि त्वं आत्थ शुश्रुम - येथे नऊ + अकरा + पांच + तीन = अठ्ठावीस तत्त्वे आहेत असे तू म्हणालास हे आम्ही ऐकले आहे. ॥ १ ॥ केचित् षड्विंशतिं, अपरे पंचविंशतिं प्राहुः - काही ऋषि सव्वीस, दुसरे काही पंचवीस तत्त्वे सांगतात - सप्त एके, केचित् नव षट् चत्वारि, अपरे एकादश - कोणी सात, कोणी नऊ, कोणी सहा, कोणी चार, काही अकरा. ॥ २ ॥ केचित् सप्तदश, एके षोडश त्रयोदश प्राहुः - कोणी सतरा, कोणी सोळा, कोणी तेरा, अशा मूलतत्त्वांच्या संख्या सांगतात - हि यद्विवक्षया - जी विवक्षा धरून - संख्यानां एतावत्वं - तत्त्वसंख्या इतकीच असे - ऋषयः पृथक् गायंति - ऋषि पृथक् गातात - इदं - ती विवक्षा - आयुष्मन् - हे चिरंजीव प्रभो - नः वक्तुं अर्हसि - आम्हाला सांगण्यात तू योग्य व समर्थ आहेस. ॥ ३ ॥
उद्धव म्हणाला हे प्रभो ! हे विश्वेश्वर ! तत्त्वांची संख्या ऋषींनी किती सांगितली आहे ? आपण तर नुकतीच नऊ, अकरा, पाच आणि तीन म्हणजेच एकूण अठ्ठावीस तत्त्वे सांगितलेली ऐकली काहीजण सव्वीस तत्त्वे सांगतात, तर दुसरे काहीजण पंचवीस काहीजण सात, नऊ किंवा सहा म्हणतात काहीजण चार सांगतात, तर काहीजण अकरा ! काहीजण सतरा, काहीजण सोळा, तर काहीजण तेरा सांगतात हे सनातन श्रीकृष्णा ! इतकी वेगवेगळी संख्या ऋषी कशी काय सांगतात ? आपण कृपा करून ते आम्हांला सांगावे. (१-३)
श्रीभगवानुवाच -
युक्तं च सन्ति सर्वत्र भाषन्ते ब्राह्मणा यथा । मायां मदीयामुद्गृह्य वदतां किं नु दुर्घटम् ॥ ४ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - वेदज्ञ व्दिज ते याचे सांगती सर्व युक्त ते । एकमेकात ते तत्व मायेने दिसती पहा ॥ ४ ॥
ब्राह्मणाः यथा भाषंते - ब्राह्मण सांगतात त्याला आधार - सर्वत्र युक्तुयः संति - सर्वत्र योग्य युक्ति आहेतच - मदीयां मायां उद्गृह्य - माझ्या मायेचा स्वीकार केल्यानंतर - वदतां - बोलणार्याला - दुर्घटं किं नु - अशक्य असे काय आहे. ॥ ४ ॥
श्रीभगवान म्हणाले उद्धवा ! यांविषयी वेद जाणणारे जे काही सांगतात, ते सर्व खरेच आहे कारण सर्व तत्त्वे सर्वांच्यामध्ये अंतर्भूत आहेत माझ्या मायेच्या आधारावर काय सांगणे अशक्य आहे ? (४)
नैतदेवं यथाऽऽत्थ त्वं यदहं वच्मि तत्तथा ।
एवं विवदतां हेतुं शक्तयो मे दुरत्ययाः ॥ ५ ॥
तू खोटा सत्य मी बोले विवाद चालतो असा । सत्त्व रज तमो वृत्ती दुसर्यां लादिती पहा ॥ ५ ॥
यथा त्वं आत्थ एवं एतत् न - तू जसे म्हणालास तसे हे नाही - यत् अहं वच्मि तथा तत् - जसे मी म्हणतो तसेच ते आहे - एवं विवदतां हेतुं - अशाप्रकारे विवाद करणार्यांचा हेतु - मे दुरत्ययाः शक्तयः - माझ्या दुर्लंघ्य शक्ति होत. ॥ ५ ॥
तुम्ही जे म्हणता, ते बरोबर नाही मी जे सांगतो, तेच बरोबर अशा प्रकारे जगाच्या कारणासंबंधीचा वाद, सोडण्यास कठीण अशा त्रिगुणात्मक वृत्तींमुळे होतो. (५)
यासां व्यतिकराद् आसीत् विकल्पो वदतां पदम् ।
प्राप्ते शमदमेऽप्येति वादस्तमनु शाम्यति ॥ ६ ॥
कल्पिती सर्वची खोटे वादाचा विषयो नसे । चित्तशांतीत निवृत्ती मग तो वादही मिटे ॥ ६ ॥
यासां व्यतिकरात् - ज्या शक्तिंचा क्षोभ झाल्यामुळे - पदं वदतां - वादीप्रतिवादींच्या विषयांत - विकल्पः आसीत् - भेद उत्पन्न झाला होता - शमदमे प्राप्ते अप्येति - इंद्रियदमन आणि मनःशांति मिळाली म्हणजे नष्ट होतो - तं अनु वादः शाम्यति - त्यानंतर वादविवादही अर्थात् मिटतो. ॥ ६ ॥
सत्त्व इत्यादी गुणरूप शक्तींच्या क्षोभामुळेच, केवळ नावरूपात्मक मिथ्या प्रपंच उभा राहिला आहे वादविवाद करणार्यांच्या वादाचा हाच विषय आहे जेव्हा इंद्रिये आपल्या ताब्यात येतात आणि चित्त शांत होते, तेव्हा त्यांची भेदबुद्धी नाहीशी होते आणि वादसुद्धा शांत होतो. (६)
परस्परानुप्रवेशात् तत्त्वानां पुरुषर्षभ ।
पौर्वापर्यप्रसङ्ख्यानं यथा वक्तुर्विवक्षितम् ॥ ७ ॥
मिळता तत्त्व तत्त्वात वकत्याच्या कल्पनेत ते । कार्यकारण संख्येन करितो सिद्ध तेवढे ॥ ७ ॥
पुरुषर्षभ - हे पुरुषश्रेष्ठा - तत्त्वानां परस्परानुप्रवेशात् - मूलतत्त्वांनी अन्योन्यांमध्ये प्रवेश केला असल्यामुळे - पौर्वापर्यप्रसंख्यानं - कारण आणि कार्य यांचा विनिश्चय होतो तो - वक्तुः - बोलणार्याच्या - यथा विवक्षितं - प्रतिपादनेच्छेवर अवलंबून असतो. ॥ ७ ॥
हे पुरूषश्रेष्ठा ! तत्त्वे एकमेकात प्रवेश करू शकतात, म्हणून तत्त्वांची जितकी संख्या वक्ता सांगू इच्छितो, त्यानुसार कारणे कार्यांमध्ये किंवा कार्ये कारणांमध्ये मिळवून आपली इच्छित संख्या तो सिद्ध करतो. (७)
एकस्मिन्नपि दृश्यन्ते प्रविष्टानीतराणि च ।
पूर्वस्मिन् वा परस्मिन् वा तत्त्वे तत्त्वानि सर्वशः ॥ ८ ॥
कितेक तत्त्व एकाशी दिसती बंधनो नसे । माती सूत घट पटीं पट घटो दिसती कधी ॥ कार्य कारणभावाने अंतर्भाव असे असा ॥ ८ ॥
पूर्वस्मिन् वा अपरस्मिन् वा एकस्मिन् अपि तत्त्वे - पूर्वस्मिन् म्हणजे कारणात्मक अथवा अपरस्मिन् म्हणजे मागाहूनच्या कार्यात्मक एकाच तत्त्वात - इतराणि सर्वशः च तत्त्वानि - इतर तत्वे= कारण तत्त्वांत इतर सर्व कार्यतत्त्वे आणि कार्यरूप तत्त्वात इतर सर्व कारणतत्त्वे - प्रविष्टानि दृश्यंते - अंतर्भावाने प्रविष्ट झालेली दिसतात. ॥ ८ ॥
एकाच कारणरूप तत्त्वामध्ये किंवा कार्यरूप तत्त्वामध्ये पूर्णपणे दुसरी तत्त्वे मिसळलेली दिसतात. (८)
पौर्वापर्यमतोऽमीषां प्रसङ्ख्यानमभीप्सताम् ।
यथा विविक्तं यद्वक्त्रं गृह्णीमो युक्तिसम्भवात् ॥ ९ ॥
वादी नी प्रतिवादी ते संख्या जी ती स्विकारिती । युक्त संगतची होते कार्य-कारण भेद तो ॥ ९ ॥
अतः म्हणून - अमीषां पौर्वापर्यं प्रसंख्यानं - या तत्त्वांचे कारणकार्यसंबंध व त्यांची गणना ही - अभीप्सतां - बोलण्याची इच्छा करणार्या वाद्यांपैकी - यथा यद् वक्त्रं - ज्याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे त्याचे बोलणे - (वयं) विविक्तं गृह्णीमः - आम्ही खरेपणाने स्वीकृत करतो - युक्तिसंभवात् - सर्व ठिकाणी युक्तीच्या साह्याचा संभव असतो. ॥ ९ ॥
यांची गणती जे जे करू इच्छितात, त्यांनी ज्या कार्याला ज्या कारणामध्ये किंवा ज्या कारणाला ज्या कार्यामध्ये अंतर्भूत करून तत्त्वांची जितकी संख्या स्वीकारली आहे, ते प्रतिपादन युक्तिसंगत असल्यामुळे आम्ही निश्चितपणे स्वीकारले आहे. (९)
अनादि अविद्यायुक्तस्य पुरुषस्यात्मवेदनम् ।
स्वतो न सम्भवादन्यः तत्त्वज्ञो ज्ञानदो भवेत् ॥ १० ॥
सव्वीस तत्त्व जे घेती वदती जीव अज~झ ते । न तो जाणी स्वताला तै गुरु त्यास हवाच तो ॥ १० ॥
अनाद्यविद्यायुक्तस्य पुरुषस्य - अनादिकाल असणार्या मायेने अथवा मायाजन्य अज्ञानाने मूढ झालेल्या पुरुषाला - स्वतः - आपल्याचपासून - आत्मवेदनं - आत्मज्ञान मिळण्याचा - न संभवात् - संभव नसतो म्हणून - अन्यः तत्त्वज्ञः ज्ञानदः भवेत् - दुसरा तत्त्वज्ञ म्हणजे गुरु, ज्ञान देणारा होतो. ॥ १० ॥
जीव अनादी कालापासून अविद्येने युक्त असल्यामुळे तो स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही म्हणून त्याला आत्मज्ञान करून देण्यासाठी दुसर्या सर्वज्ञाची आवश्यकता आहे अशा रीतीने प्रकृतीची चोवीस तत्त्वे, पुरूष आणि ईश्वर अशी ही सव्वीस तत्त्वे आहेत. (१०)
पुरुषेश्वरयोरत्र न वैलक्षण्यं अण्वपि ।
तदन्यकल्पनापार्था ज्ञानं च प्रकृतेर्गुणः ॥ ११ ॥
पंचेवीस जया मान्य जीवात्मा एक मानिती । भेदाची कल्पना व्यर्थ ज्ञान ते प्रकृती गुणो ॥ ११ ॥
अत्र - या पक्षात - पुरुषेश्वरयोः वैलक्षण्यं - पुरुष व ईश्वर यांमध्ये स्वरूपभेद - अणु अपि न - किंचित सुद्धा नाही - तदन्यकल्पना अपार्था - ते भिन्नस्वरूपी आहेत ही कल्पनाच व्यर्थ आहे - च - आणि - ज्ञानं - ज्ञान हा - प्रकृतेः गुणः - प्रकृतीचाच गुण आहे. ॥ ११ ॥
या शरीरामध्ये असणार्या जीव आणि ईश्वरामध्ये किंचितही भेद नाही म्हणून त्यांना वेगळे मानू नये ज्ञान हा सत्त्वगुणात्मक प्रकृतीचा गुण आहे. (अशा प्रकारे २४ जड तत्त्वे आणि एक चेतन पुरूष मिळून २५ तत्त्वे झाली). (११)
प्रकृतिर्गुणसाम्यं वै प्रकृतेर्नात्मनो गुणाः ।
सत्त्वं रजस्तम इति स्थित्युत्पत्त्यन्त हेतवः ॥ १२ ॥
प्रकृती गुणसाम्याचि आत्म्याचे गुण ना तसे । गुणात हेतु सृष्टी घे न आत्म्याचे असे दिसे ॥ १२ ॥
प्रकृतिः गुणसाम्यं वै - प्रकृतीचे स्वरूप म्हणजे खरोखर सत्त्वादि तिन्ही गुण समसमान असणे होय - स्थित्युत्पत्यंतहेतवः - स्थिति, जन्म, आणि मरण यांचे कारक - सत्त्वं, रजः, तमः इति - सत्त्व, रज आणि तम हे गुण आहेत - प्रकृतेः गुणाः - अर्थात् हे गुण प्रकृतीचे होत - न आत्मनः - आत्म्याचे नव्हेत. ॥ १२ ॥
तीन गुणांची साम्यावस्था हेच प्रकृतीचे स्वरूप आहे म्हणून सत्त्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचेच आहेत, आत्म्याचे नव्हेत हेच जगाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय यांना कारण आहेत. (१२)
सत्त्वं ज्ञानं रजः कर्म तमोऽज्ञानण् इहोच्यते ।
गुणव्यतिकरः कालः स्वभावः सूत्रमेव च ॥ १३ ॥
सत्व ज्ञान रजो कर्म तमो अज्ञान ते असे । गुणक्षोभी तसा काल महत्तत्त्व स्वभाव तो ॥ १३ ॥
सत्त्वं ज्ञानं - सत्त्व म्हणजे ज्ञान - रजः कर्मः, तमः अज्ञानं - रजोगुण कर्मप्रवर्तक आणि तम म्हणजे अज्ञान होय - इह उच्यते - या सांख्यशास्रात म्हणतात - गुणव्यतिकरः कालः - गुणांचा क्षोभ म्हणजे काल - च - आणि - स्वभावः सूत्रं एव - स्वभाव म्हणजे सूत्र अथवा महतत्त्व होय. ॥ १३ ॥
या विवेचनात सत्त्वगुणच ज्ञान आहे, रजोगुणच कर्म आहे आणि तमोगुणच अज्ञान म्हटले गेले आहे तसेच गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न करणारा ईश्वरच काळ आहे आणि सूत्र म्हणजे महत्तत्त्वच स्वभाव होय. (१३)
पुरुषः प्रकृतिर्व्यक्तं अहङ्कारो नभोऽनिलः ।
ज्योतिरापः क्षितिरिति तत्त्वानि उक्तानि मे नव ॥ १४ ॥ श्रोत्रं त्वग्दर्शनं घ्राणो जिह्वेति ज्ञानशक्तयः । वाक्पाण्युपस्थपाय्वङ्घ्रि कर्माण्यङ्गोभयं मनः ॥ १५ ॥ शब्दः स्पर्शो रसो गन्धो रूपं चेत्यर्थजातयः । गत्युक्त्युत्सर्गशिल्पानि कर्मायतनसिद्धयः ॥ १६ ॥
पुरूष प्रकृती वायु महत्तत्त्व नि ते जल । अहंकार नि आकाश तेज पृथ्वी नऊ असे ॥ मी तो हे वदलो पूर्वी मोजोनी तत्त्व हे पहा ॥ १४ ॥ नाक कान त्वचा डोळे रसना ज्ञानइंद्रिय । वाणी हात तसे पाय उपस्थ पायु कर्मिचे ॥ मन ते अकरावे ही जाहले आणखी पहा । शब्द स्पर्श रुप गंध रस हे विषयो तया ॥ १५ ॥ अकरा नउ नी तीन पाच हे तत्त्व जाहले । अठ्ठाविस असे झाले चालणे बोलणे तसे ॥ मलत्याग असे तत्त्व वाढती त्यात ते पुन्हा । कर्मेंद्रिय असे त्यांना मानणे युक्त होतसे ॥ १६ ॥
पुरुषः, प्रकृतिः, व्यक्तं, अहंकारः, नभः, अनिलः, ज्योतिः, आपः, क्षितिः - पुरुष, प्रकृति, महतत्त्व, अहंकार, आकाश, वायु, तेज, जल व पृथ्वी - इति नव तत्त्वानि मे उत्त्कानि - अशी नऊ तत्त्वे मी सांगितली आहेत. ॥ १४ ॥ श्रोत्रं त्वक् दर्शनं घ्राणः जिव्हा इति ज्ञानशक्तयः - कर्ण, स्पर्श, नेत्र, नासिका, जीभ ह्या पाच ज्ञानशक्ति (ज्ञानेंद्रिये) आहेत - वाक्पाण्युपस्थपायु अंघ्रिः कर्माणि - वाणी, हस्त, शिश्न, मलद्वार आणि चरण ही पाच कर्मेंद्रिये होत - अंग- उद्धवा - मनः उभयं - मन हे उभय म्हणजे कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये आहे. याप्रमाणे ५ + ५ + १ = ११ तत्त्वे झाली. ॥ १५ ॥ शब्दः, स्पर्शः, रसः, गंधः, रूपं च इति अर्थजातयः - शब्द, स्पर्श, रस, गंध आणि रूप या विषयाच्या जाति आहेत - गत्युक्त्युत्सर्गशिल्पानि कर्मायतनसिद्धयः - गमन, वचन, दोन उत्सर्ग म्हणजे मलमूत्रत्याग व शिल्प ही कर्मेंद्रियांची जी कर्में त्यांची फळे होत. ॥ १६ ॥
पुरूष, प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही नऊ तत्त्वे, मी अगोदरच सांगितली आहेत कान, त्वचा, डोळे, नाक आणि जीभ ही पाच ज्ञानेंद्रिये वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये. तसेच कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये असे उभयरूप मन, अशी अकरा इंद्रिये आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ज्ञानेंद्रियांचे पाच विषय अशा प्रकारे तीन, नऊ, अकरा आणि पाच अशी सर्व मिळून अठ्ठावीस तत्त्वे होतात कम]द्रियांच्या द्वारे होणारी, चालणे, बोलणे, मलमूत्र त्याग आणि काम करणे या पाच कर्मांमुळे तत्त्वांची संख्या वाढत नाही यांना कर्मेंद्रियस्वरूप मानावे. (१४-१६)
सर्गादौ प्रकृतिह्यस्य कार्यकारणरूपिणी ।
सत्त्वादिभिर्गुणैर्धत्ते पुरुषोऽव्यक्त ईक्षते ॥ १७ ॥
प्रारंभी प्रकृती जन्मी कार्य कारण रूपिणी । सत्त्वादि गुण साहयान अवस्था सृष्टिसी मिळे ॥ अव्यक्त पुरुषो होतो एकटा साक्षिमात्र तो ॥ १७ ॥
कार्यकारणरूपिणी प्रकृतिः - कार्याचे व कारणाचेही स्वरूप धारण करणारी प्रकृति - अस्य सर्गादौ - या विश्वाची उत्पत्ति वगैरे होण्याच्या आधी - सत्त्वादिभिः गुणैः - सत्त्व, रज आणि तम या गुणांच्या साह्याने - धत्ते - उत्पत्तीला योग्य अशी अवस्था धारण करते - अव्यक्तः पुरुषः ईक्षते हि - विकृत न होणारा पुरुष म्हणजे ईश्वर फक्त अवलोकन मात्र करतो. ॥ १७ ॥
सृष्टीच्या प्रारंभी कार्य. (अकरा इंद्रिये आणि पंचमहाभूते) आणि कारण. (महत्तत्त्व इत्यादी) यांच्या रूपाने प्रकृतीच असते तीच सत्त्वादी गुणांच्या रूपाने विश्व स्वतःमध्ये धारण करते अव्यक्त परमात्मा या प्रकृतीचा फक्त साक्षी असतो. (१७)
व्यक्तादयो विकुर्वाणा धातवः पुरुषेक्षया ।
लब्धवीर्याः सृजन्त्यण्डं संहताः प्रकृतेर्बलात् ॥ १८ ॥
महत्तत्वादि धातुंना विकार मिळती तदा । ईक्षणीशक्ति ती घेता एकमेकात मेळती ॥ प्रकृतीच्याच आधारे बले ब्रह्मांड निर्मिती ॥ १८ ॥
विकुर्वाणाः व्यक्तादयः धातवः - प्रक्षुब्ध झालेले महतत्त्वादि धातु म्हणजे तत्त्वे - पुरुषेक्षया लब्धवीर्याः - ईश्वरसंकल्पाने वीर्यवंत होऊन - प्रकृतेः बलात् संहताः - प्रकृतिबलाने व आश्रयाने एकत्र होऊन - अंडं सृजंति - ब्रह्मांड उत्पन्न करतात. ॥ १८ ॥
महत्तत्त्व इत्यादी प्रकृतीचे कार्य व अहंकारादिकांचे कारण असणारे पदार्थ आदिपुरूषाच्या संकल्पामुळे शक्ती प्राप्त करून घेऊन एकमेकांत मिसळतात आणि प्रकृतीच्या साह्याने ब्रह्मांड निर्माण करतात. (१८)
सप्तैव धातव इति तत्रार्थाः पञ्च खादयः ।
ज्ञानमात्मा उभयाधारः ततो देहेन्द्रियासवः ॥ १९ ॥
पंचभूते नि आत्मा नी सातवा जीव हे असे । मानिती कोणि ते तैसे अन्या ना मानिती पहा ॥ १९ ॥
सप्त एव धातवः इति - मूल तत्त्वे सातच आहेत, असे म्हणतात - तत्र - त्यांच्या प्रक्रियेत - पंच खाद्यः अर्थाः - आकाशादि पंचमहाभूते हे ज्ञेय विषय होत - ज्ञानं - ज्ञाता जीव आहे - उभयाधारः आत्मा - ज्ञेय आणि ज्ञाता या उभयतांचा आधार आत्मा आहे - ततः - त्यांच्यापासून - देहेंद्रियासवः - शरीर, इंद्रिये आणि प्राण उत्पन्न होतात. ॥ १९ ॥
उद्धवा ! जे लोक तत्त्वांची संख्या सात मानतात, त्यांच्या विचारसरणीनुसार आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते, सहावा जीव आणि सातवा परमात्मा होय तो जीव व जग या दोहोंचा आधार आहे या सातांपासून देह, इंद्रिये व प्राण उत्पन्न होतात म्हणून ते स्वतंत्र मानले नाहीत. (१९)
षडित्यत्रापि भूतानि पञ्च षष्ठः परः पुमान् ।
तैर्युक्त आत्मसम्भूतैः सृष्ट्वेदं समुपाविशत् ॥ २० ॥
पंचभूते नि तो आत्मा सहावा मानिती कुणी । पंचभूतेचि हा देह जीव आत शिरे तयां ॥ २० ॥
‘षट् ’ इति अत्राऽपि - सहाच तत्त्वे मानणार्यांच्या प्रक्रियेत सुद्धा - पंच भूतानि - आकाशादि पाच महाभूते - षष्ठः परः पुमान् - व सहावे तत्त्व उत्तम पुरुष होय - तैः आत्मसंभूतैः युक्तः - तो त्या स्वतःपासून निर्माण झालेल्या भूतांचे उपादान करून - इदं सृष्ट्वा - हे विश्व निर्मितो - समुपाविशत् - त्यात प्रविष्ट होतो. ॥ २० ॥
जे फक्त सहा तत्त्वांचा स्वीकार करतात, ते असे म्हणतात की, पाच महाभूते आणि सहावा परमात्मा तो परमात्मा आपण निर्माण केलेल्या पंचमहाभूतांनी युक्त होऊन देह इत्यादींची सृष्टी निर्माण करतो आणि त्यामध्ये जीवरूपाने प्रवेश करतो. (२०)
चत्वार्येवेति तत्रापि तेज आपोऽन्नमात्मनः ।
जातानि तैरिदं जातं जन्मावयविनः खलु ॥ २१ ॥ मानिती चार जे तत्व आत्म्याने तेज पृथ्वि नी । जळ निष्पन्न ते होते याच्यात सर्व ते पहा ॥ २१ ॥
चत्वारि एव इति - चारच तत्त्वे ज्यांच्या मती आहेत - तत्रापि - तेथेही - तेजः आपः अन्नं - तेज, जल, व पृथ्वी - आत्मनः जातानि - आत्म्यापासून झाली आहेत - तैः इदं जातं - त्यापासून हे विश्व झाले - अवयविनः जन्म खलु - सावयव असणारी कार्ये यांचा जन्म वस्तुतः या पृथ्व्यादि चार तत्त्वांपासून झाला. ॥ २१ ॥
काहीजण आत्म्यापासून तेज, जल आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली आहे, म्हणून ही चारच तत्त्वे आहेत असे म्हणतात कारण सर्व कार्यांचा जन्म यांच्यापासूनच आहे. (२१)
सङ्ख्याने सप्तदशके भूतमात्रेन्द्रियाणि च ।
पञ्च पञ्चैकमनसा आत्मा सप्तदशः स्मृतः ॥ २२ ॥
सतरा मानिती जे ते भूत तन्मात्र इंद्रिय । एकेक मन नी आत्मा संख्येचा मेळ ला_ती ॥ २२ ॥
सप्तदशके संख्याने - तत्त्वे सतरा आहेत या मताप्रमाणे - भूतमात्रेंद्रिया च पंच पंच - पाच भूते, त्यांच्या पाच मात्रा, म्हणजे सूक्ष्मरूपे आणि पाच इंद्रिये अशी मिळून १५ तत्त्वे; अथवा ५ भूतमात्रा व १० ज्ञानकर्मेंद्रिये मिळून १५ तत्त्वे - एकमनसा आत्मा सप्तदशः स्मृतः - एक मनासह सत्रावा आत्मा अशी १७ तत्त्वे स्मृति म्हणते. ॥ २२ ॥
काही लोक पंच महाभूते, पाच तन्मात्रा, पाच ज्ञानेंद्रिये, एक मन आणि एक आत्मा, अशी तत्त्वांची संख्या सतरा सांगतात. (२२)
तद्वत् षोडश सङ्ख्याने आत्मैव मन उच्यते ।
भूतेन्द्रियाणि पञ्चैव मन आत्मा त्रयोदश ॥ २३ ॥
आत्म्यात मेळिता चित्त कोणी सोळास मानिती । भूते इंद्रिय नी चित्त आत्मा जीवे त्रयोदश ॥ २३ ॥
तद्वत् षोडशसंख्याने आत्मा एव मनः उच्यते - त्याचप्रमाणे १६ मूळतत्त्वे आहेत या मतात जीवात्माच मन होय असे म्हणतात - भूतेंद्रियाणि पंच एव, मनः आत्मा - ५ भूते, ५ इंद्रिये, १ मन, आणि जीवात्मा व परमात्मा मिळून २ - त्रयोदश - एकंदर १३ तत्त्वे होतात. ॥ २३ ॥
जे तत्त्वांची संख्या सोळा सांगतात, ते आत्म्यामध्येच मनाचाही समावेश करतात जे लोक तेरा तत्त्वे मानतात, ते म्हणतात की, पाच महाभूते, पाच ज्ञानेंद्रिये, मन, जीवात्मा आणि परमात्मा. (२३)
एकादशत्व आत्मासौ महाभूतेन्द्रियाणि च ।
अष्टौ प्रकृतयश्चैव पुरुषश्च नवेत्यथ ॥ २४ ॥
एकादशत्वि आत्मा नी भूते इंद्रिय मानिती । नवात मनऽहंकार भूते पुरुष बुद्धिही ॥ २४ ॥ ऋषिंनी भिन्न ते तत्त्व यापरी मोजिली पहा ॥ सर्वांचे सांगणे युक्त तत्त्वज्ञा मान्य सर्व ते ॥ २५ ॥
एकादशत्वे - ११ च मूलतत्त्वे या मतात - असौ आत्मा महाभूतेंद्रियाणि च - तो आत्मा, ५ महाभूते, व ५ इंद्रिये मिळून अकरा होतात - च - आणि - नव एव इति - ९ तत्त्वेच होत या मतात - अष्टौ प्रकृतयः अथ पुरुषः च - आठ प्रकृति म्हणजे महतत्त्व, अहंकार, मन व पंचमहाभूते आणि मग नववा पुरुष होय. ॥ २४ ॥
अकरा संख्या मानणारे पाच महाभूते, पाच ज्ञानेंद्रिये आणि एक आत्मा मानतात काहीजण पाच सूक्ष्म भूते, मन, बुद्धी, अहंकार, पुरूष ही नऊ तत्त्वे मानतात. (२४)
इति नानाप्रसङ्ख्यानं तत्त्वानां ऋषिभिः कृतम् ।
सर्वं न्याय्यं युक्तिमत्त्वाद् विदुषां किमशोभनम् ॥ २५ ॥
उद्धवजी म्हणाले - प्रकृती पुरुषो दोघे एकरूपचि जाहले । न भिन्न वाटती तैसे भिन्नता जाणणे कशी ॥ २६ ॥
इति तत्त्वानां नानाप्रसंख्यानं ऋषिभिः कृतं - याप्रमाणे अनेक ऋषींनी नानाप्रकारे तत्त्वसंख्या परिगणली - युक्तिमत्वात सर्वं न्याय्यं - ती प्रत्येक युक्तिसिद्ध म्हणून न्यायघटित आहे - विदुषां किं अशोभनं - विद्वानांचे कोणते वाक्य अन्याय्य असते ? ॥२५ ॥
ऋषींनी अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींनी तत्त्वांची गणना केली आहे सगळ्यांचे म्हणणे युक्तिसंगत असल्यामुळे उचितच आहे नाहीतरी विद्वानांना काय शोभत नाही ? (२५)
श्रीउद्धव उवाच -
प्रकृतिः पुरुषश्चोभौ यद्यप्यात्मविलक्षणौ । अन्योन्य अपाश्रयात् कृष्ण दृश्यते न भिदा तयोः ॥ २६ ॥
उद्धवजी म्हणाले - प्रकृती पुरुषो दोघे एकरूपचि जाहले । न भिन्न वाटती तैसे भिन्नता जाणणे कशी ॥ २६ ॥
कृष्ण - कृष्णा - प्रकृतिः पुरुषः च उभौ - प्रकृति आणि पुरुष ही दोन्ही - यद्यपि आत्मविलक्षणौ - जरी स्वरूपाने परस्पर भिन्न आहेत - अन्योन्यापाश्रयात् - परस्परांचा परस्पर आश्रय करतात म्हणून - तयोः भिदा न दृश्यते - त्यांच्यामध्ये भेद आहे असे दिसत नाही. ॥ २६ ॥
उद्धव म्हणाला - हे कृष्णा ! जरी स्वरूपतः प्रकृती आणि पुरूष हे एकमेकांपासून सर्वथैव वेगळे आहेत, तरीसुद्धा ते एकमेकांमध्ये मिसळून गेल्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक दिसत नाही प्रकृतीमध्ये पुरूष आणि पुरूषामध्ये प्रकृती आहे, असेच वाटते. (२६)
प्रकृतौ लक्ष्यते ह्यात्मा प्रकृतिश्च तथात्मनि ।
एवं मे पुण्डरीकाक्ष महान्तं संशयं हृदि । छेत्तुमहसि सर्वज्ञ वचोभिर्नयनैपुणैः ॥ २७ ॥
कृपेने मिळते ज्ञान मायेने नष्टते पहा । न कळे तव ती माया समर्थ तुम्हि बोधिण्या ॥ २८ ॥
हि आत्मा प्रकृतौ लक्ष्यते - कारण, प्रकृति व तिची महदादि कार्य यांत आत्मा-जीव दृग्गोचर होतो - तथा च आत्मनि प्रकृतिः - आणि तशीच प्रकृतीही आत्म्यामध्ये जीवस्वरूपात दृग्गोचर होते - एवं - याप्रकारचा - पुंडरीकाक्ष - कमलनयना देवा - मे हृदि महांतं संशयं - माझ्या अंतःकरणात वास्तव्य करणारा मोठा संशय - सर्वज्ञ - सर्वज्ञ ईश्वरा - नयनैपुणैः वचोभिः - न्यायपूर्ण भाषणांनी - छेत्तुं अर्हसि - कापून काढण्यास योग्य आहेस. ॥ २७ ॥
हे कमलनयना ! अशा प्रकारे, यांची भिन्नता आणि अभिन्नता पाहून माझ्या अंतःकरणामध्ये फार मोठा संशय निर्माण झाला आहे हे सर्वज्ञा ! आपल्या युक्तिसंगत वाणीने माझ्या या संशयाचे निराकरण करा. (२७)
त्वत्तो ज्ञानं हि जीवानां प्रमोषस्तेऽत्र शक्तितः ।
त्वमेव ह्यात्ममायाया गतिं वेत्थ न चापरः ॥ २८ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात - पुरुष प्रकृती यात अत्यंत भेद तो असे । विकारे भरली सृष्टी क्षोभाची पुत्रि ती पहा ॥ २९ ॥
हि त्वत्तः जीवानां ज्ञानं - कारण, सर्व प्रकारचे ज्ञान, जीवास तुझ्यापासूनच मिळते - ते शक्तितः अत्र प्रमोषः - तसेच या ज्ञानप्रकरणी तुझ्याच शक्तिने ज्ञानाचा नाश होतो - हि - कारण - आत्ममायायाः गतिं - तुझी जी माया तिची गति तिचा विकास व विलास हे सर्व - त्वं एव वेत्थ - तुलाच समजते - च अपरः न - दुसर्या कोणाला नाही. ॥ २८ ॥
भगवन ! आपल्याच कृपेने जीवांना ज्ञान होते आणि आपल्याच अविद्याशक्तीने त्यांच्या ज्ञानाचा नाश होतो या आपल्या मायेचे हे स्वरूप आपणच जाणता दुसरे कोणीही नाही. (२८)
श्रीभगवानुवाच -
प्रकृतिः पुरुषश्चेति विकल्पः पुरुषर्षभ । एष वैकारिकः सर्गो गुणव्यतिकरात्मकः ॥ २९ ॥
( इंद्रवज्रा ) ममांग प्रकृती यात गुण कैक दावी विकल्प बुद्धी भ्रम निर्मिते ती । विस्तार मोठा तरि तीन भागी अध्यात्म दैवी अधिभूत झाली ॥ ३० ॥
पुरुषर्षभ - पुरुषश्रेष्ठा - प्रकृतिः पुरुषः च इति विकल्पः - प्रकृति आणि पुरुष या उभयतांमध्ये फार मोठा भेद आहे - गुणव्यतिकरात्मकः एषः सर्गः - गुणांचा क्षोभ हेच आहे स्वरूप ज्या सृष्टीचे ती सृष्टि - वैकारिकः - विकारात्मक आहे. ॥ २९ ॥
श्रीभगवान म्हणाले उद्धवा ! प्रकृती आणि पुरूष म्हणजेच शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये फार फरक आहे कारण गुणांच्या क्षोभाने सृष्टी उत्पन्न होते म्हणून ती विकारांनी युक्त आहे. ()
(मिश्र - ११ अक्षरी) ममाङ्ग माया गुणमय्यनेकधा
विकल्पबुद्धीश्च गुणैर्विधत्ते । वैकारिकस्त्रिविधोऽध्यात्ममेकं अथाधिदैवमधिभूतमन्यत् ॥ ३० ॥
अध्यात्म नेत्रो अधिभुत रूप ती दृष्टिशक्ती अधिदैव आहे । तिघास आधार परस्परांचा आकाशिचा सूर्य विमुक्त सिद्ध । आत्मा तसाची नित मुक्त साक्षी प्राकाशको तो मुळ सिद्ध आहे । नेत्रात ते जे त्रय भेद होती त्वचादिं चित्ती तइ ही तसेच ॥ ३१ ॥
अंग - अगा उद्धवा - मम माया गुणमयी - माझी माया गुणांनी युक्त आहे - च - आणि - गुणैः - ती आपल्या गुणांच्या साह्याने - विकल्पबुद्धीः - भेद आणि भेदबुद्धी - अनेकधा - अनेक प्रकारांनी - विधत्ते - उत्पादिते - वैकारिकः त्रिविधः - ही विकारपूर्ण सृष्टि तीन प्रकारची आहे - एकं अध्यात्मं अथ अधिदैवं - एक आध्यात्मिक, दुसरा आधिदैविक - अन्यत् अधिभूतं - आणि तिसरा आधिभौतिक असे ते तीन प्रकार होत. ॥ ३० ॥
उद्धवा ! माझी माया त्रिगुणात्मिका आहे तीच आपल्या गुणांनी अनेक प्रकारच्या भेदवृत्ती निर्माण करते हिची कार्ये जरी अनेक असली तरीसुद्धा त्यांची अध्यात्म, अधिदैव आणि अधिभूत या तीन भागांमध्ये विभागणी केली जाते. ()
दृग् रूपमार्कं वपुरत्र रन्ध्रे
परस्परं सिध्यति यः स्वतः खे । आत्मा यदेषामपरो य आद्यः स्वयानुभूत्याखिलसिद्धसिद्धिः । एवं त्वगादि श्रवणादि चक्षुः जिह्वादि नासादि च चित्तयुक्तम् ॥ ३१ ॥
या प्रकृतीचेच महान तत्व त्याचा अहंकार गुणेचि क्षोभे । विकार होता प्रकृतीहि जन्मे गुणेचि होते विविधा रुपाने ॥ ३२ ॥
दृक् रूपं अत्र रंध्रे आर्कं वपुः - दृष्टि, रूप, आणि या गोलकामधील सूर्याचे अंशभूत शरीर - परस्परं सिध्यति - ही अन्योन्यांच्या आश्रयाने सिद्ध होतात - यः स्वतः खे - जो सूर्य स्वरूपतः आकाशात असतो त्याचा अंश नेत्रगोलकात असतो - यत् - ज्याअर्थी - एषां यः आत्मा - या अध्यात्मादिकांचा जो आत्मा आहे तो - अपरः आद्यः स्वया अनुभूत्या - याहून भिन्न, या सर्वांचे कारण आणि स्वयंप्रकाश आहे - अखिलसिद्धसिद्धिः - सर्व सिद्धवस्तूंचाही साधक आहे - एवं त्वगादि श्रवणादि चक्षुः जिव्हादि नासादि च चित्तयुक्तं - याचप्रमाणे स्पर्शादि, श्रवणादि, नेत्रादि, जिव्हादि, गंधादि आणि चित्तादि; ॥ ३१ ॥
जसा, डोळा अध्यात्म आहे, त्याचा विषय रूप हे अधिभूत आहे आणि डोळ्यांमध्ये असलेला अधिदैव अंश सूर्य आहे हे तिघेही एकमेकांच्या आश्रयाने राहातात परंतु आकाशातील सूर्य एक असून तो स्वतःसिद्ध आहे तसाच आत्मासुद्धा तिन्ही भेदांचे मूलकारण असल्यामुळे एकरूप असून त्यांच्याहून वेगळा आहे तो स्वयंप्रकाश असून आपल्या प्रकाशाने सर्व पदार्थांना प्रकाशित करतो त्याचप्रमाणे त्वचा, कान, जीभ, नाक आणि चित्त इत्यादींचे सुद्धा तीनतीन भेद आहेत [त्वचा, स्पर्श, वायू, कान, शब्द, दिशा, जीभ, रस, वरुण, नाक, वास, अश्विनीकुमार, चित्त, चिंतनविषय, वासुदेव.] (३१)
योऽसौ गुणक्षोभकृतो विकारः
प्रधानमूलान् महतः प्रसूतः । अहं त्रिवृन्मोहविकल्पहेतुः वैकारिकस्तामस ऐन्द्रियश्च ॥ ३२ ॥
आत्मा परिज्ञानमयी न वाद नाही नि आहे मुळि दृष्टि भेद । विवाद सारा मुळि व्यर्थ आहे वादात मुक्तीनच त्या अभक्ता ॥ ३३ ॥
प्रधानमूलात् महतः प्रसूतः - प्रकृति आहे ज्याचे उपादानकारण अशा महतत्त्वापासून उत्पन्न झालेला - यः असौ गुणक्षोभकृतः विकारः - जो हा गुणांच्या प्रक्षोभाने निर्माण केलेला विकार आहे - अहं - अहंकार होय - मोहविकल्पहेतुः - मोहाचा व भेदबुद्धीचा कारक आहे - वैकारिकः तामसः ऐंद्रियः च त्रिवृत् - सात्त्विक, तामस आणि राजस असा तीन प्रकारचा आहे. ॥ ३२ ॥
त्वचा, स्पर्श, वायू; कान, शब्द, दिशा; जीभ, रस, वरुण; नाक, वास, अश्विनीकुमार; चित्त, चिंतनविषय, वासुदेव प्रकृतीपासून महत्तत्त्व आणि महत्तत्त्वापासून अहंकार उत्पन्न होतो म्हणून हा अहंकार गुणांच्या क्षोभाने उत्पन्न झालेल्या प्रकृतीचेच कार्य आहे अहंकाराचे तीन भेद आहेत, वैकारिक. (सात्त्विक), ऐंद्रिय. (राजस) आणि तामस हा अहंकारच अज्ञान आणि सृष्टीच्या विविधतेचे कारण आहे. (३२)
आत्मापरिज्ञानमयो विवादो
ह्यस्तीति नास्तीति भिदार्थनिष्ठः । व्यर्थोऽपि नैवोपरमेत पुंसां मत्तः परावृत्तधियां स्वलोकात् ॥ ३३ ॥
उद्धवजीने विचारिले - ( अनुष्टुप ) कर्मस्वरूप जीवा त्या योनी ही नव लाभते । आता तो उरला प्रश्र आत्मा तो नव त्या तनीं । शिरतो ते कसे शक्य अकर्ताहि असोनिया ॥ ३४ ॥
आत्मा परिज्ञानमयः - आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे - अस्ति इति, न अस्ति इति भिदा विवादः - तो आहे की नाही हा भेदवाद - अर्थनिष्ठः अपि व्यर्थः हि - अर्थनिष्ठ असला तरी व्यर्थच आहे - स्वलोकात् मत्तः - सर्वांचा लोक जो मी त्या मजपासून - परावृत्तधियां पुंसां - परावृत्त झालेल्या बुद्धीच्या लोकांमधून हा वाद - न उपरमेत - नाहीसा होणे नाही - एव - हेच खरे. ॥ ३३ ॥
आत्म्याच्या अज्ञानामुळे तो आहे किंवा नाही, हा वाद आहे पदार्थांविषयीची भेदबुद्धीही आत्म्याच्या अज्ञानामुळे आहे हे सर्व अर्थशुन्य असूनही ज्ञानस्वरूप अशा मला जे लोक विन्मुख आहेत, त्यांचा हा वाद संपत नाही. (३३)
श्रीउद्धव उवाच -
( अनुष्टुप् ) त्वत्तः परावृत्तधियः स्वकृतैः कर्मभिः प्रभो । उच्चावचान्यथा देहान् गृह्णन्ति विसृजन्ति च ॥ ३४ ॥
गोविंदा अज्ञ ते लोक ज्ञाते त्यां नच भेटती । भ्रमात पडले सारे रहस्य सांगणे मला ॥ ३५ ॥
प्रभो - ईश्वरा - त्वत्तः परावृत्तधियः - तुझ्यापासून ज्यांनी आपली बुद्धि निवृत्त केली असे लोक - स्वकृतैः कर्मभिः - आपण केलेल्या कर्मांनी - यथा - ज्याप्रकारे - उच्चावचान् देहान् गृह्णंति विसृजंति च - श्रेष्ठ कनिष्ठ योनींमध्ये देह घेतात व पुढे सोडून देतात. ॥ ३४ ॥
उद्धवाने विचारले भगवान ! आपल्याला विन्मुख असलेले जीव स्वतःच केलेल्या कर्मांमुळे उच्चनीच योनींमध्ये जात-येत राहातात. (३४)
तन्ममाख्याहि गोविन्द दुर्विभाव्यमनात्मभिः ।
न ह्येतत्प्रायशो लोके विद्वांसः सन्ति वञ्चिताः ॥ ३५ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - कर्म संस्कारि ते चित्त इंद्रिया भुलवी पहा । लिंगदेह तया नाम मरता अन्य लोकिं ये ॥
गोविंद - कृष्णा- अनात्मभिः दुर्विभाव्यं - आत्मज्ञानशून्यास अतिकष्टाने समजणारा - तत् मम आख्याहि - तो विषय मला सांग - एतत् विद्वांसः - हा विषय जाणणारे - लोके - व्यवहारात - प्रायशः न संति - बहुधा नसतात - हि - कारण - वंचिताः - बहुजन अज्ञानाने फसलेले असतात. ॥ ३५ ॥
हे गोविंदा ! ज्या लोकांना आत्मज्ञान नसते, त्यांना या विषयाची कल्पनाही करता येत नाही आणि जगात बहुतेक लोक आपल्या मायेत गुंतल्यामुळे हे जाणत नाहीत म्हणून आपणच मला याचे रहस्य सांगा. (३५)
श्रीभगवानुवाच -
मनः कर्ममयं नॄणां इन्द्रियैः पञ्चभिर्युतम् । लोकाल्लोकं प्रयात्यन्य आत्मा तदनुवर्तते ॥ ३६ ॥
आत्मा तो वेगळा त्याच्या परी तो गुंततो तयीं । अहंकार करोनीया येतो जातो गमे तसा ॥ ३६ ॥
नृणां - लोकांचे - पंचभिः इंद्रियैः युतं कर्ममयं मनः - पाची इंद्रियांसह कर्मप्रधान असलेले मन - लोकात् लोकं प्रयाति - एक देह सोडून दुसर्या देहात जाते - अन्यः आत्मा - आणि मनाहून विलक्षण असणारा आत्मा - तत् अनुवर्तते - मन जाईल तिकडे जातो. ॥ ३६ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - मनुष्यांचे मन हे कर्मसंस्कारांचा समूह आहे त्या संस्कारांनुसार भोग प्राप्त करून घेण्यासाठी ते मन पाच इंद्रियांसह एका शरीरातून दुसर्या शरीरात जात असते. आत्मा त्यापासून वेगळा असूनही त्याचा अहंकार धरतो त्यामुळे त्याला सुद्धा आपले जाणेयेणे भासू लागते. (३६)
ध्यायन् मनोऽनु विषयान् दृष्टान् वानुश्रुतानथ ।
उद्यत् सीदत् कर्मतंत्रं स्मृतिस्तदनु शाम्यति ॥ ३७ ॥
आधीन मन त्या कर्मीं विषया चिंतिते सदा । स्मृति नी अनुसंधान तदा ते नष्ट होत की ॥ ३७ ॥
कर्मतंत्रं - कर्मप्रधान असल्यामुळे - दृष्टान् वा अनुश्रुतान् विषयान् - प्रत्यक्ष पाहिलेले अथवा ऐकलेले = श्रुतिस्मृतींनी सांगितलेले जे विषय त्यांचे - अनु ध्यायत् मनः - सदैव चिंतन करणारे मन - अथ - नंतर - उद्यत् - ध्यानी असलेल्या विषयांत जागृत - सीदत् - ध्यानी नसलेल्या विषयांत निद्रित होते - तत् अनु - त्यानंतर - स्मृतिः शाम्यति - स्मृतिही शांत होते. ॥ ३७ ॥
कर्माच्या अधीन असणारे मन नेहमी या किंवा परलोकांशी संबंधीत विषयांचे चिंतन करीत असते जेव्हा ते नव्या विषयाचे चिंतन करते, तेव्हा ते पहिला विषय विसरते त्यावेळी त्याची अगोदरच्या विषयांची स्मृतीसुद्धा नाहीशी होते. (३७)
विषयाभिनिवेशेन नात्मानं यत् स्मरेत् पुनः ।
जन्तोर्वै कस्यचित् हेतोः मृत्युरत्यन्त विस्मृतिः ॥ ३८ ॥
देवादी शरिरी होतो तल्लीन स्मृति नष्टते । शरिरी विसरे त्याचा मृत्यु तोचि असे पहा ॥ ३८ ॥
विषयाभिनिवेशेन - भोगविषयांचा अभिमान असल्यामुळे - कस्यचित् हेतोः - आणि कोणत्या तरी कारणाने - यत् पुनः आत्मानं न स्मरेत् - पुनः पूर्वरूपाची विस्मृति होणे ही - अत्यंतविस्मृतिः - जी अत्यंत विस्मृति - जंतोः मृत्युः वै - तोच जीवाचा मृत्यु होय. ॥ ३८ ॥
नवीन देहाच्या विषयात तल्लीन झाल्यामुळे जीवाला, पहिल्या देहाचे विस्मरण होते कोणत्याही कारणाने आपल्या अगोदरच्या शरीराविषयी मुळीच आत्मीयता नसणे. (किंवा त्याला पूर्णपणे विसरणे) म्हणजेच मृत्यू होय. (३८)
जन्म त्वात्मतया पुंसः सर्वभावेन भूरिद ।
विषयस्वीकृतिं प्राहुः यथा स्वप्नमनोरथः ॥ ३९ ॥
जीव तनूस मानी मी तदाचि जन्म पावतो । स्वप्नीव्या अभिमानाने स्वप्न जैं घडते मनीं ॥ ३९ ॥
च- आणि - भूरिद - उदार मनाच्या उद्धवा - तु - परंतु - सर्वभावेन आत्मतया पुंसः - सर्वथा आपले स्वतःचे स्वरूपच सर्वथा विषयरूप होय असे जाणून केलेला - विषयस्वीकृतिं - विषयांचा स्वीकार हाच - जन्म प्राहुः - जीवाचा पुनर्जन्म होय, असे म्हणतात - यथा स्वप्नमनोरथः - जसा स्वप्नातील मनोरा ज्याचा जन्म व मृत्यु तसा. ॥ ३९ ॥
हे उदार उद्धवा ! मनुष्य जेव्हा नव्या शरीराचा पूर्णपणे आपलेपणाने स्वीकार करतो, तोच त्याचा जन्म होय ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना माणूस नव्या शरीराचा आपले म्हणून स्वीकार करतो. (३९)
स्वप्नं मनोरथं चेत्थं प्राक्तनं न स्मरत्यसौ ।
तत्र पूर्वमिवात्मानं अपूर्वं चानुपश्यति ॥ ४० ॥ वर्तमान अशा देहा पूर्वदेह न आठवे । स्वप्नात पडता स्वप्न पूर्वीचा देह नाठवे ॥ ४० ॥
इत्थं - अशाप्रकारे - तत्र - विद्यमान स्वप्नात व मनोरथात - प्राक्तनं स्वप्नं मनोरथं च - पूर्वीच्या स्वप्नांचे व मनोरथांचे - असौ न स्मरति - त्याला स्मरणच होत नाही - च - आणि - पूर्वं आत्मानं अपूर्वं इव अनुपश्यति - पूर्वी असलेल्या आपणाला अपूर्व असे आताच जन्मलेला पाहतो. ॥ ४० ॥
नव्या स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना पहिले स्वप्न किंवा मनोरथ जीवाला मुळीच आठवत नाही त्याचप्रमाणे नव्या शरीराचा स्वीकार केल्यावर जीव आपण पूर्वीचेच असूनही नव्यानेच उत्पन्न झालो आहो, असे मानतो. (४०)
इन्द्रियायनसृष्ट्येदं त्रैविध्यं भाति वस्तुनि ।
बहिरन्तर्भिदाहेतुः जनोऽसज्जनकृदद् यथा ॥ ४१ ॥
इंद्रियाश्रित तो आत्मा त्रिविधा भासतो पहा । अभिमाने दिसे भेद दुष्ट पुत्र अरी जसा ॥ ४१ ॥
इंद्रियायनसृष्टया - ज्ञानकर्मेंद्रियांचे अयन म्हणजे जे आश्रयस्थान त्याने उत्पन्न केलेल्या सृष्टीमुळे - इदं त्रैविध्यं - अशा प्रकारची त्रिविधता - वस्तुनि भाति - ज्ञात वस्तूंमध्ये दिसते - बहिरंतर्भिदाहेतुः - तेच मन अंतर्बाह्य भेद निर्माण करण्याचे कारक असते - यथा जनः असज्जनकृत् - ज्याप्रमाणे सामान्य पुरुष स्वप्नामध्ये नसणारे भिन्न लोक उत्पादितो. ॥ ४१ ॥
मनाच्या निरनिराळ्या देहांविषयीच्या अभिमानामुळे आत्म्याच्या ठिकाणी उत्तम, मध्यम व अधम असा नसलेलाच भेद उत्पन्न होतो तसाच आतबाहेर हा भेद उत्पन्न होतो जसा दृष्ट पुत्राला जन्म देणारा पिता त्या मुलामुळे लोकांचा शत्रू किंवा मित्र बनतो. (४१)
नित्यदा ह्यङ्ग भूतानि भवन्ति न भवन्ति च ।
कालेनालक्ष्यवेगेन सूक्ष्मत्वात्तन्न दृश्यते ॥ ४२ ॥
काळाची गति ती सूक्ष्म साधरण न त्या दिसे । प्रतिक्षण तनू नाशी न जाणी मृत्यु जन्म तो ॥ ४२ ॥
अंग - उद्धवा - भूतानि नित्यदा - ही भूते म्हणजे शरीरादि सर्व जडाजड वस्तू प्रतिक्षणी - भवंति - जन्म पावतात - न हि भवंति च - व मरतातही - अलक्ष्यवेगेन कालेन - ज्याचा वेग चित्ताला आकलन करता येत नाही अशा प्रचंडवेगी कालाच्या सामर्थ्यामुळे - (परंतु) - तत् सूक्ष्मत्वात् न दृश्यते - हे रूपांतर अतिसूक्ष्म असते म्हणून इंद्रियगोचर होत नाही. ॥ ४२ ॥
उद्धवा ! काळाची गती सूक्ष्म असल्यामुळे क्षणोक्षणी प्राण्यांच्या शरीरांशी उत्पत्ती आणि नाश असूनही ते दिसून येत नाहीत. (४२)
यथार्चिषां स्रोतसां च फलानां वा वनस्पतेः ।
तथैव सर्वभूतानां वयोऽवस्थादयः कृताः ॥ ४३ ॥
कालप्रवाहि ती ज्योत नद्यांचाही प्रवाह तो । अवस्था वृक्षिच्या सार्या शरिरा स्थिति होतसे ॥ ४३ ॥
यथा अर्चिषा - ज्याप्रमाणे दीपज्वालांच्या - स्त्रोतसां च - किंवा नदीप्रवाहांच्या - वा वनस्पतेः फलानां - वा वृक्षाच्या फलांच्या - वयोऽवस्थादयः कृताः - वयोवस्था होतात - तथा एव सर्वभूतानां - त्याचप्रमाणे सर्व जडाजडांच्या अवस्था कालप्रभुत्वाने होतात. ॥ ४३ ॥
कालाच्या प्रभावाने ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत, नद्यांचे प्रवाह किंवा झाडावरील फळांच्या अवस्था बदलत असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांच्या शरीराचे आयुष्य, अवस्था इत्यादीसुद्धा बदलत असतात. (४३)
सोऽयं दीपोऽर्चिषां यद्वत् स्रोतसां तदिदं जलम् ।
सोऽयं पुमानिति नृणां मृषा गीर्धीर्मृषायुषाम् ॥ ४४ ॥
दीपाची ज्योत नी जैसा नदीचातो प्रवाहही । समजणे जसे मिथ्या देहा आयुष्य ते तसे ॥ ४४ ॥
अर्चिषां सः अयं दीपः - दीपज्योति प्रतिक्षणी भिन्न होतात तरी तोच हा दिवा - स्त्रोतसां तत् इदं जलं यद्वत् - नदीच्या ओघाचे पाणी प्रतिक्षणी भिन्न होत असते तरी तेच हे जल असे एकत्वसूचक बोलतो - मृषायुषां नृणां - अज्ञानाने व्यर्थ झाले आयुष्य ज्यांचे अशा लोकांची - सः अयं पुमान् इति मृषा गीः धीः - हाच तो पुरुष - अशी प्रतिक्षणी भिन्न होत आहे शरीर ज्याचे अशा पुरुषासंबंधाची वाणी व बुद्धि व्यर्थ अथवा असत्य होय. ॥ ४४ ॥
त्याच ज्योतीचा हा दिवा आहे, प्रवाहातील पाणी तेच आहे, असे समजणे आणि म्हणणे जसे खोटे आहे, त्याचप्रमाणे विषयचिंतनामध्ये आपले आयुष्य व्यर्थ घालविणार्या अविवेकी पुरूषांचे तोच हा मनुष्य असे म्हणणे आणि समजणे सर्वथैव खोटे आहे. (४४)
मा स्वस्य कर्मबीजेन जायते सोऽप्ययं पुमान् ।
म्रियते वामरो भ्रान्त्या यथाग्निर्दारुसंयुतः ॥ ४५ ॥
आत्म्याला भ्रांति ना कर्म तसा तो अमरोअसे । दिसे काष्ठातुनी अन्गी पुन्हा जै नष्ट होतसे ॥ ४५ ॥
सः अपि अयं पुमान् - तोच हा पुरुष हाही - स्वस्य कर्मबीजेन - स्वतः कर्मरूपी बीजाने - मा जायते म्रियते वा - उत्पन्न होत नाही अथवा मरतही नाही - अमरः - अमर आहे - भ्रांत्या - तो जन्मतो मरतो ही भ्रांति होय - दारुसंयुतः अग्निः यथा - लाकडाची उपाधि असलेला जसा अग्नि. ॥ ४५ ॥
तो अविवेकी मनुष्यही वास्तविक कर्मबीजापासून उत्पन्न होत नाही की मरतही नाही परंतु भ्रमामुळे आत्मा अमर असूनही त्याला तसे वाटते जसा लाकडाशी संयोग झाल्याने अग्नी पेटतो किंवा वियोगाने विझतो असे वाटते वास्तविक अग्नी नित्य आहे. (४५)
निषेकगर्भजन्मानि बाल्यकौमारयौवनम् ।
वयोमध्यं जरा मृत्युः इत्यवस्थास्तनोर्नव ॥ ४६ ॥
गर्भाधान तशी वृद्धी जन्म बाल्य कुमार नी । तरूण पोक्त नी वृद्ध मृत्य या देहिच्या स्थिती ॥ ४६ ॥
निषेकगर्भजन्मानि - सिंचित रेत, गर्भ, जन्म, - बाल्यकौमारयौवनं - बालपण, कुमारता, तारुण्य, पोक्तपणा, - वयोमध्यं जरा मृत्युः इति तनोः नव अवस्थाः - वृद्धत्व व मृत्यु ह्या शरीराच्या ९ अवस्था आहेत. ॥ ४६ ॥
उद्धवा ! गर्भाधान, गर्भवृद्धी, जन्म, बाल्य, कुमारावस्था, तारूण्य, म्हातारपण आणि मृत्यू या नऊ अवस्था शरीराच्याच आहेत. (४६)
एता मनोरथमयीः हि अन्यस्योच्चावचास्तनूः ।
गुणसङ्गाद् उपादत्ते क्वचित् कश्चित् जहाति च ॥ ४७ ॥
जीव देह असे भिन्न उंच नीच मनोरथ । अज्ञाने भ्रमती सारे विवेके त्यजितीहि तो ॥ ४७ ॥
हि - प्रसिद्ध आहे की - अन्यस्य - दुसर्या म्हणजे देहाच्या - एताः उच्चावचाः तनूः - ह्या उत्तम व अधम नऊ अवस्था - मनोरथमयीः - मनोत्पादित असतात - गुणसंगात् उपादत्ते - गुणांची संगती केल्यामुळे या अवस्था स्वीकारतो - क्वचित् कश्चित् जहाति च - परंतु कोणी एखादाच शहाणा केव्हा केव्हा यांचा त्याग करतो. ॥ ४७ ॥
जीवापासून वेगळे असलेल्या शरीराच्या या निरनिराळ्या काल्पनिक अवस्था आहेत परंतु अज्ञानामुळे, गुणांच्या संगतीने आत्मा यांना आपल्या समजतो किंवा विवेक जागृत झाल्यावर त्यांना सोडूनही देतो. (४७)
आत्मनः पितृपुत्राभ्यां अनुमेयौ भवाप्ययौ ।
न भवाप्ययवस्तूनां अभिज्ञो द्वयलक्षणः ॥ ४८ ॥
पित्याने पुत्र जन्माने पुत्राने पितृमृत्यु तो । आपुला अनुमानावा आत्म्याला नच मृयु तो ॥ ४८ ॥
पितृपुत्राभ्यां - आपला पिता मेला व पुत्र जन्मला यावरून - आत्मनः भवाप्ययौ अनुमेयौ - आपला देहही जन्ममरणवंत आहे असे अनुमानाने जाणता येते - भवाप्ययवस्तूनां अभिज्ञः द्वयलक्षणः न - पण जन्ममरणात्मक देहादि जड वस्तूंचा द्रष्टा असणारा आत्मा जन्ममरणवंत असणे शक्य नाही. ॥ ४८ ॥
पित्याने पुत्राच्या जन्मावरून आणि पुत्राने पित्याच्या मृत्यूवरून आपापल्या जन्ममृत्यूचे अनुमान करावे जन्म आणि मृत्यू असणार्या वस्तूंना जाणणारा आत्मा या दोन्ही लक्षणांनी युक्त असत नाही. (४८)
तरोर्बीजविपाकाभ्यां यो विद्वान् जन्मसंयमौ ।
तरोर्विलक्षणो द्रष्टा एवं द्रष्टा तनोः पृथक् ॥ ४९ ॥
उगवे पेरिता धान्य पकता कापणीच हो । किसान वेगळा तैसा आत्मा देहास साक्षि तो ॥ ४९ ॥
तरोः बीजविपाकाभ्यां - वृक्ष व वनस्पतींच्या बीजफलाच्या साह्याने - तरोः जन्म संयमौ यः विद्वान् - वृक्षवनस्पतीचे जन्ममरणादि होते असे जो जाणणारा - (तरोः) विलक्षणः द्रष्टा - तरूंचा द्रष्टा तरूहून विलक्षण असतो - एवं तनोः द्रष्टा (तनोः) पृथक् - याप्रमाणे शरीराचा द्रष्टा शरीराहून निराळा असलाच पाहिजे. ॥ ४९ ॥
झाडाचे बी आणि त्याची परिपक्वता पाहाणारा माणूस त्यावरून त्याचा जन्म आणि विनाश पाहातो या दोन्ही गोष्टी पाहाणारा जसा झाडाहून वेगळाच असतो, तसा शरीराचे जन्ममृत्यू पाहाणारा सुद्धा शरीराहून वेगळा असतो. (४९)
प्रकृतेः एवमात्मानं अविविच्याबुधः पुमान् ।
तत्त्वेन स्पर्शसम्मूढः संसारं प्रतिपद्यते ॥ ५० ॥
अज्ञानी नेणती सारे विषया मानिती सुख । म्हणोनी जन्म मृत्युच्या फेर्यात भ्रमती पहा ॥ ५० ॥
आत्मानं एवं - आत्म्याला याप्रमाणे - प्रकृतेः अविविच्य - प्रकृतीपासून विवेकतः निराळा न काढता - तत्त्वेन स्पर्शसंमूढः - प्रकृतीशी सामरस्य करणार्या इंद्रियांनी मूढ केलेला - अबुधः पुमान् - अज्ञानी पुरुष - संसारं प्रतिपद्यते - जन्ममरणात्मक संसाराच्या प्रवाहात शिरून सर्वथा पडतो. ॥ ५० ॥
अज्ञानी पुरूष, प्रकृती आणि आत्म्याचे हे वास्तविक रूप न कळल्यामुळे विषयभोगांनाच खरे सुख मानून त्यातच गुरफटून जातो आणि जन्ममरणरूप संसारचक्रात सापडतो. (५०)
सत्त्वसङ्गात् ऋषीन् देवान् रजसासुरमानुषान् ।
तमसा भूततिर्यक्त्वं भ्रामितो याति कर्मभिः ॥ ५१ ॥
सत्त्व कर्म ऋषीजन्म राजसे नर -राक्षस । तमाने पशु नी भूत इत्यादी योनि लाभती ॥ ५१ ॥
कर्मभिः - कर्मे करकरून - सत्त्वसंगात् ऋषीन् देवान् - सत्त्वगुणसंगतीने ऋषींच्या किंवा देवांच्या - रजसा असुरमनुषान् - रजोगुण असला तर असुरांच्या किंवा मनुष्यांच्या - तमसा भूततिर्यक्त्वं - तमोगुणांचे प्राबल्य झाले तर स्थावरांच्या अथवा पशुपक्ष्यांच्या - भ्रामितः याति - भ्रमण करकरून जातो. ॥ ५१ ॥
जेव्हा जीव आपल्या कर्मानुसार जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत असतो, तेव्हा सात्त्विक कर्मांच्या आसक्तीने ऋषी, देव या योनींमध्ये, राजस कर्मांच्या आसक्तीने मनुष्य, असुर या योनींमध्ये आणि तामस कर्मांच्या आसक्तीने भूतप्रेत, पशुपक्षी इत्यादी योनींमध्ये जन्म घेतो. (५१)
नृत्यतो गायतः पश्यन् यथैवानुकरोति तान् ।
एवं बुद्धिगुणान् पश्यन् अनीहोऽप्यनुकार्यते ॥ ५२ ॥
पाहोनी नाच गाणी ती नाचे गायी तसा नर । निष्क्रीय असुनी बाध्य होवोनी वागतो तसा ॥ ५२ ॥
यथा नृत्यतः गायतः पश्यन् तान् एव अनुकरोति - ज्याप्रमाणे इतर नाचतात, गातात, त्या प्रकारांचीच हुबेहुब नक्कल उठवून आपण वागतो - एवं बुद्धिगुणान् पश्यन् - आणि याप्रमाणे इतरांचे मनोधर्म पाहिल्यामुळे - अनीहः अपि - त्याची इच्छा नसली तरी - अनुकार्यते - ते ते इतरांचे बुद्धिगुण प्रबल होऊन त्याला इतरांप्रमाणे वागण्याला भाग पाडतात. ॥ ५२ ॥
जेव्हा मनुष्य एखाद्याला नाचतानागाताना पाहून स्वतःसुद्धा त्याचे अनुकरण करू लागतो, त्याप्रमाणे जीव स्वतः निष्क्रिय असूनही बुद्धीच्या गुणांचे अनुकरण करू लागतो. (५२)
यथाम्भसा प्रचलता तरवोऽपि चला इव ।
चक्षुसा भ्राम्यमाणेन दृश्यते भ्रमतीव भूः ॥ ५३ ॥ यथा मनोरथधियो विषयानुभवो मृषा । स्वप्नदृष्टाश्च दाशार्ह् तथा संसार आत्मनः ॥ ५४ ॥
नदीत पाहता झाडे दिसती डौलातीहि ते । देहासी मारिता फेरी पॄथिवी फिरता दिसे ॥ ५३ ॥ स्वप्निचे भोग ते व्यर्थ संसार व्यर्थ हा तसा । आत्मा तो शुद्ध नी बुद्ध स्वभावे मुक्तची असे ॥ ५४ ॥
यथा प्रचलता अंभसा - वाहणार्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर - तरवः अपि - स्थावर वृक्ष सुद्धा - चलाः इव - चालतातसे दिसते - भ्राम्यमाणेन चक्षुषा - आपले नेत्र जोराने फिरविले तर - भूः भ्रमति इव दृश्यते - स्थिर पृथ्वीही फिरते असे दिसते. ॥ ५३ ॥ यथा स्वप्नदृष्टाः मनोरथधियः (स्वप्नदृष्टः) विषयानुभवः च मृषा - ज्याप्रमाणे मनोरथबुद्धि व स्वप्नात पाहिलेल्या विषयांचा अनुभव खोटा असतो - तथा - त्याप्रमाणे - दाशार्ह - यादवांच्या दाशार्ह कुलात जन्मलेल्या उद्धवा - आत्मनः संसारः - आत्म्यावर आरोपित झालेल्या जन्ममरणात्मक संसार मृषा आहे. ॥ ५४ ॥
जलाशयामधील पाणी हलण्याने त्यात प्रतिबिंबित झालेली झाडेसुद्धा हालत असल्यासारखी दिसतात किंवा डोळे फिरविले असता पृथ्वीसुद्वा फिरताना दिसते, किंवा जसे मनातील विचार अथवा स्वप्नातील पाहिलेले पदार्थ सर्वथैव खोटे असतात, त्याचप्रमाणे, हे उद्धवा ! आत्म्याचा विषयानुभवरूप संसारसुद्धा खोटा आहे. (५३-५४)
अर्थे हि अविद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते ।
ध्यायतो विषयानस्य स्वप्नेऽनर्थागमो यथा ॥ ५५ ॥
असत्य विषया चिंती भव ना सोडि त्या कधी । स्वप्नीची संकटे जैशी उठल्या विण जात ना ॥ ५५ ॥
हि - कारण - विषयान् ध्यायतः अस्य - विषयांचे ध्यान अखंड करणारा असतो म्हणून ह्या जीवाचा - संसृतिः - संसार - अविद्यमाने अपि अर्थे - वस्तुतः त्या विषयांचे पदार्थ नसतात तरी - न निवर्तते - नाहीसा होत नाही - यथा स्वप्ने अनर्थाग मः - जसा पदार्थ वस्तुतः नसताही स्वप्नद्रष्टयाला विषय सत्य वाटतात. ॥ ५५ ॥
जशी स्वप्नातील अनर्थपरंपरा ते पाहात असेपर्यंत नाहीशी होत नाही, त्याचप्रमाणे विषय खरे नसूनही जो जीव त्यांचेच चिंतन करीत राहातो, तोपर्यंत त्याचे हे संसारचक्र थांबत नाही. (५५)
तस्मात् उद्धव मा भुङ्क्ष्व विषयान् असदिन्द्रियैः ।
आत्माग्रहणनिर्भातं पश्य वैकल्पिकं भ्रमम् ॥ ५६ ॥
म्हणोनी विषया दुष्ट इंद्रियीं नच भोगणे । भेद भाव भ्रमो सारा अज्ञाने दिसते तसे ॥ ५६ ॥
तस्मात् - म्हणून - उद्धवा - उद्धवा - असद्रिंदियैः - खोटेच असणार्या इंद्रियांनी - विषयान् मा भुंक्ष्व - विषयांचा भोग घेऊ नको - आत्माग्रहणनिर्भातं वैकल्पिकं भ्रामं पश्य - आत्म्याच्या अज्ञानामुळे हा भेदरूप भ्रम होतो हे जाण. ॥ ५६ ॥
म्हणून उद्धवा ! या नाठाळ इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेऊ नकोस आत्म्याच्या अज्ञानामुळे भासणारा हा भेदभ्रम आहे, असे समज. (५६)
क्षिप्तोऽवमानितोऽसद्भिः प्रलब्धोऽसूयितोऽथवा ।
ताडितः सन्निरुद्धो वा वृत्त्या वा परिहापितः ॥ ५७ ॥ निष्ठितो मूत्रितो वाज्ञैः बहुधैवं प्रकम्पितः । श्रेयस्कामः कृच्छ्रगत आत्मनात्मानं उद्धरेत् ॥ ५८ ॥
गंचाडी दिधली कोणी अपमानित बोलले । निंदा मार तसे बद्ध थुंके वा लघवी करी ॥ ५७ ॥ न चळे तरि तो साधू अज्ञानी जीव जाणतो । विवेके रक्षिणे आत विपत्ति सर्व मोडिणे ॥ ५८ ॥
असद्भिः अज्ञैः क्षिप्तः अवमानितः प्रलब्धः अथवा - दुष्टांनी व मूर्खांनी तिरस्कारिले, अपमानिले, फसविले, असूयितः ताडितः सन्निबद्धः वा वृत्त्या वा परिहापितः - मत्सर करून गांजले, अथवा मारले, कैदेत टाकले किंवा आपली चरितार्थवृत्ति काढून घेतली - वा - किंवा - निष्ठितः मूत्रितः - थुंकण्याने, मूत्राने अंग मळविले - एवं बहुधा प्रकंपितः - याप्रकारे अनेक घाबरविणारी दुःखे दिली तरी - कृच्छ्रगतः - दुःखात लोटलेला - श्रेयस्कामः - जो मोक्षेच्छु त्याने - आत्मना - आपण स्वतःच - आत्मानं उद्धरेत् - आपल्या आत्म्याचा उद्धार करावा. ॥ ५७-५८ ॥
दुर्जनांनी धक्के मारून बाहेर हाकलले, अपमान केला, उपहास केला, निंदा केली, मारपीट केली, बांधून ठेवले, उपजीविकेचे साधन काढून घेतले, अंगावर थुंकले, मूत्रविसर्जन केले किंवा निरनिराळ्या प्रकारे त्रास देऊन चित्त विचलित करण्याचा प्रयत्न केला किंवा अशा तर्हेचे कोणतेही संकट असले, तरी ज्याला आपले कल्याण करून घेण्याची इच्छा आहे, त्याने आपल्या विवेकबुद्धीने त्या अडचणींपासून स्वतःचे रक्षण करावे. (५७-५८)
श्रीउद्धव उवाच -
यथैवमनुबुध्येयं वद नो वदतां वर । सुदुःसहमिमं मन्य आत्मनि असदतिक्रमम् ॥ ५९ ॥
उद्धवजी म्हणाले - वक्ताशिरोमणी देवा दुर्जने व्देषिले तदा । असह्य जाहले तेणे समजावू कसा मना ॥ पचवू उपदेशाते कसा ते सांगणे मला ॥ ५९ ॥
वदतां वर - प्रवचन करणार्यांमध्ये श्रेष्ठा - एवं यथा अनुबुध्येयं (तथा) नः वद - हे त्वदुक्त मला समजेल अशा रीतीने मला सांग - आत्मनि इमं असदतिक्रमं - हा दुष्टांचा अमर्याद छळ - सुदुःसहं - असह्य आहे - मन्ये - असे वाटते. ॥ ५९ ॥
उद्धव म्हणाला भगवन ! हे ज्ञान देण्यात आपणच कुशल आहात दुर्जनांची अशी कृत्ये मला मुळीच सहन होत नाहीत म्हणून मला अशा रीतीने हे सांगा की, जेणेकरून मी हे आचरणात आणू शकेन. (५९)
विदुषामपि विश्वात्मन् प्रकृतिर्हि बलीयसी ।
ऋते त्वद्धर्मनिरतान् शान्तांस्ते चरणालयान् ॥ ६० ॥
प्रेमाने भागवाद्धर्मीं तुझ्या पायासि राहाती । अशा संता विना कोणी न साही त्रास या जगी ॥ ६० ॥
विश्वात्मन् - हे विश्वमूर्ते - हि - कारण - विदुषां अपि प्रकृतिः बलीयसी - विद्वानांस सुद्धा प्रकृतीचे बल अनावर आहे हे ठाऊक असते - त्वद्धर्मनिरतान् शांतान् ते चरणालयान् ऋते - मात्र तुझ्या भागवतधर्माचे एकनिष्ठ, शांत आणि तुझ्या चरणाचा आश्रय केलेल्या भक्तांशिवाय बाकीचे विद्वान प्रकृतीलाच वश असतात म्हणून दुःख पावतात. ॥ ६० ॥
हे विश्वात्मन ! जे आपल्या चरणांना शरण आलेले असून भागवत धर्माच्या आचरणात कायम मग्न असतात, अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणाही विद्वानांनासुद्धा स्वभाव बदलता येत नाही. (६०)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |