|
श्रीमद् भागवत पुराण भगवतो विभूतीनां वर्णनम् - भगवंतांच्या विभूतींचे वर्णन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीउद्धव उवाच -
( अनुष्टुप् ) त्वं ब्रह्म परमं साक्षाद् अनादिअंतं अपावृतम् । सर्वेषामपि भावानां त्राणस्थित्यप्ययोद्भवः ॥ १ ॥ उच्चावचेषु भूतेषु दुर्ज्ञेयं अकृतात्मभिः । उपासते त्वां भगवन् याथातथ्येन ब्राह्मणाः ॥ २ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -( अनुष्टुप ) स्वयं ब्रह्म तुम्ही कृष्ण न अंत पार तो तुम्हा । अव्दितीय असे तुम्ही सृष्टिचे हेतुही तुम्ही ॥ १ ॥ राहता सान थोरात परी अज्ञ न जाणिती । पुरुषा ब्रह्मवेत्तेची तुम्हा युक्त उपासिती ॥ २ ॥
अनाद्यंतं - अनादि व अनंत - अपावृतं - आवरण नसलेले - सर्वेषां अपि भावानां - सर्व चराचर पदार्थांच्या - त्राणस्थित्यप्ययोद्भवः - संरक्षणाचे, असण्याचे, नाशाचे आणि उत्पत्तीचे कारण असा - त्वं साक्षात् परमं ब्रह्म - तू प्रत्यक्ष अति श्रेष्ठ ब्रह्म आहेस. - भगवन् - हे भगवंता - अकृतात्मभिः दुर्ज्ञेयं त्वां - नाही जिंकिले आहे चित्त ज्यांनी अशा लोकांस अज्ञेय अशा तुझी - ब्राह्मणाः - ज्ञानी लोक - उच्चावचेषु भूतेषु - लहान थोर पदार्थांत असणारे तुझे रूप समजून घेऊन - याथातथ्थेन उपासते - यथार्थ व यथासांग उपासना करितात ॥१-२॥
उद्धव म्हणाला - भगवन ! आपण स्वतः परब्रह्म आहात, आपल्याला आदी नाही की अंत नाही आपण मायेचे आवरण नसलेले अद्वितीय तत्त्व आहात सर्व पदार्थांची उत्पत्ती, स्थिती, रक्षण आणि प्रलय यांना कारणीभूत आपणच आहात उच्चनीच अशा सर्व प्राण्यांमध्ये आपण आहात, परंतु ज्यांनी आपले मन आणि इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवली नाहीत, ते आपल्याला जाणू शकत नाहीत. ब्रह्मवेत्ते लोकच यथार्थरूपाने आपली उपासना करतात. (१-२)
येषु येषु च भूतेषु भक्त्या त्वां परमर्षयः ।
उपासीनाः प्रपद्यंते संसिद्धिं तद् वदस्व मे ॥ ३ ॥
श्रेष्ठ ऋषि महर्षिंनी तुमच्या त्या विभूतिसी । भजोनी सिद्ध ते झाले सांगाव्या मज सर्व त्या ॥ ३ ॥
येषु येषु व भावेषु - ज्या ज्या स्वरूपाचे ठायी - त्वां - तुला - भक्त्या - परम भक्तीने - उपासीनाः परमषयः - भजणारे मोठमोठे ऋषि - संसिद्धिं प्रपंद्यते - सिद्धीप्रत प्राप्त होतात - तत् - ते स्वरूप - मे वदस्व - मला सांग - ॥३॥
मोठमोठे ऋषी आपल्या ज्या विभूतींची भक्तीने उपासना करून सिद्धी प्राप्त करून घेतात, त्या विभूती आपण मला सांगाव्यात. (३)
गूढश्चरसि भूतात्मा भूतानां भूतभावन ।
न त्वां पश्यंति भूतानि पश्यन्तं मोहितानि ते ॥ ४ ॥
भूतात्मा तुम्हि तो लीला करिता गुप्ता राहुनी । मायेने मोहिता सर्वां तेणे प्राणी न पाहतो ॥ ४ ॥
भूतभावन - हे भूतपालका देवा - भूतात्मा (त्वं) - भूतांचा नियंता असा तू - भूतानां गूढः चरसि - भूतांमध्ये अप्रकट रीतीने संचार करतोस - ते मोहितानि भूतानि - तुझ्या मायेमुळे मूढ झालेले प्राणी - पश्यंतं त्वां - चराचरांचा पाहणारा अशा तुला - न पश्यंति - पाहत नाहीत - ॥४॥
हे प्रभो ! आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात आपण त्यांच्यामध्ये स्वतःला गुप्त ठेवून लीला करीत असता आपण सर्वांना पाहाता, पंरतु जगातील प्राणी आपल्या मायेने मोहित झाल्यामुळे आपल्याला पाहात नाहीत. (४)
( मिश्र )
याः काश्च भूमौ दिवि वै रसायां विभूतयो दिक्षु महाविभूते । ता मह्यमाख्याहि अनुभावितास्ते नमामि ते तीर्थपदाङ्घ्रिपद्मम् ॥ ५ ॥
( इंद्रवज्रा ) स्वर्गादि पाताळ दिशा विदीशीं प्रभावयुक्तो विभुती अशा ज्या । कृपा करोनि मज सांगणे त्या तीर्थासतीर्थो पद वंदितो मी ॥ ५ ॥
महाविभूते - अत्यंत मोठी आहे स्वरूपस्थिति ज्याची अशा देवाधिदेवा - भूमौ दिवि रसायां दिक्षु वै - भूलोकी, स्वर्गात, पाताळात, दाही दिशांत निश्चियेकरुन - अनुभाविताः - काही एक शक्तिविशेषाने तूच संयोजित केलेल्या - याः काः च ते विभूतयः - ज्या काही तुझ्या विभूती आहेत - ताः मह्यं आख्याहि - त्या सर्व मला सांग - ते तीर्थपदांघ्रिपद्मं नमामि - तुझ्या तीर्थाचे आश्रयस्थान अशा चरणकमलाला मी वंदितो - ॥५॥
हे अचिंत्य ऐश्वर्यसंपन्न प्रभो ! पृथ्वी, स्वर्ग, पाताळ तसेच दिशांदिशांमध्ये आपल्या प्रभावांनी युक्त अशा ज्या ज्या विभूती आहेत, त्या आपण मला सांगाव्यात प्रभो ! मी आपल्या चरणकमलांना वंदन करतो ही सर्व तीर्थांनाही तीर्थपण देणारी आहेत. (५)
श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् ) एवं एतद् अहं पृष्टः प्रश्नं प्रश्नविदां वर । युयुत्सुना विनशने सपत्नैः अर्जुनेन वै ॥ ६ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात - ( अनुष्टुप ) प्रश्नशिरोमणी ऐसे उद्धवा शोभता तुम्ही । युद्धात अर्जुने हाची प्रश्र तो पुसला असे ॥ ६ ॥
प्रश्नविदां वर - जिज्ञासेने प्रश्न विचारणारांमध्ये श्रेष्ठ उद्धवा - एवं एतत् प्रश्नं - हा असाच प्रश्न - सपत्नैः विनशने युयुत्सुना अर्जुनेन - आपल्या शत्रूंबरोबर कुरुक्षेत्री युद्ध करू इच्छिणार्या अर्जुनाने - वै अहं पृष्टः - मला विचारला होता. ॥६॥
श्रीभगवान म्हणाले - हे उद्धवा ! प्रश्न विचारणार्यांमध्ये तू श्रेष्ठ आहेस कुरूक्षेत्रावरील युद्धाच्या वेळी शत्रूंशी युद्ध करण्यास तयार झालेल्या अर्जुनाने मला हाच प्रश्न विचारला होता. (६)
ज्ञात्वा ज्ञातिवधं गर्ह्यं अधर्मं राज्यहेतुकम् ।
ततो निवृत्तो हंताहं हतोऽयमिति लौकिकः ॥ ७ ॥
राज्यार्थ त्या कुटुंबीया मारणे निंद्य वाटता । मारितो मी मरती ते लक्षोनी पार्थ थांबला ॥ ७ ॥
‘हंता अहं, हतः अयं’ इति लौकिकः - माझा आत्मा मारणारा (म्हणजे कर्ता), दुसर्याच्या आत्मा मेलेला (म्हणजे भोक्ता आहे), अशी अज्ञानी समजूत असणारा अर्जुन - राज्यहेतुकं ज्ञातिवधं गर्ह्यं अधर्मं ज्ञात्वा - राज्यप्राप्तीसाठी स्वज्ञातीतील बंधुबांधवांचा वध करणे इहलोकी निंद्य आणि परलोकी पापात्मक जाणून - ततः निवृत्तः - त्या युद्धापासून निवृत्त झाला. ॥७॥
राज्यासाठी कुटुंबियांना मारणे हे निंद्य आणि अधर्माचे कृत्य आहे, असे वाटून सामान्य माणसाप्रमाणे तो असा विचार करीत होता की, "मी मारणारा आहे आणि हे सर्वजण मरणारे आहेत" असा विचार करून तो युद्धापासून परावृत्त झाला होता. (७)
स तदा पुरुषव्याघ्रो युक्त्या मे प्रतिबोधितः ।
अभ्यभाषत मामेवं यथा त्वं रणमूर्धनि ॥ ८ ॥
युक्त्या रणात सांगोनी पार्था मी समजाविले । त्या वेळी अर्जुने ऐसा केला प्रश्र तुम्हापरी ॥ ८ ॥
रणमूर्धनि - संग्रामाच्या ऐन प्रसंगी - यथा त्वं - जसा तू आता प्रश्न विचारीत आहेस - एवं मां अभ्यभाषत - तसाच प्रश्न अर्जुनाने मला विचारला होता - तदा - त्यावेळी - पुरुषव्याघ्रः सः - पुरुषपुंगव जो अर्जुन त्याला - युक्त्या - अनेक प्रमाणबद्ध युक्तिप्रयुक्ति सांगून - मे प्रतिबोधितः - मी बोध केला. ॥८॥
तेव्हा मी रणभूमीवर अनेक युक्त्या सांगून वीराग्रणी अर्जुनाची समजूत घातली होती त्यावेळी अर्जुनानेसुद्धा तू मला विचारलास, तोच प्रश्न विचारला होता. (८)
अहमात्मा उद्धवामीषां भूतानां सुहृदीश्वरः ।
अहं सर्वाणि भूतानि तेषां स्थित्युद्भवाप्ययः ॥ ९ ॥
आत्मा हितैषि सुहृदो नियंता प्राणियास मी । प्राणी पदार्थ रूपांचा हेतूही मीच तो असे ॥ ९ ॥
उद्धव - उद्धवा - अमीषां भूतानां - ह्या अखिल ब्रह्मांडातील चराचर पदार्थांचा - अहं आत्मा - मी नियंता आहे - सुहृत् - त्यांचा उपकारक मित्र - ईश्वरः - त्यांचा स्वामी - सर्वाणि भूतानि - सर्व भूतात्मा - तेषां स्थित्युद्भवाप्ययः - त्यांची स्थिती, उत्पत्ती, नाश, - अहं - मी आहे. ॥९॥
उद्धवा ! मी या सर्व प्राण्यांचा आत्मा, सृहृद आणि नियमन करणारा आहे मीच हे सर्व चराचर आहे आणि याच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाला कारणही मीच आहे. (९)
अहं गतिर्गतिमतां कालः कलयतामहम् ।
गुणानां चाप्यहं साम्यं गुणिन्यौत्पत्तिको गुणः ॥ १० ॥
गतिमंतां गती मीची स्वाधीन काळ मीच तो । गणांचे मूळरूपो मी स्वाभाविक गुणोहि मी ॥ १० ॥
अहं गतिमतां गतिः - वेगवंतांची गति मी - कलयतां कालः - सत्ता गाजविणार्यांचा प्रभु - अहं गुणानां साम्यं - सत्त्व, रज, तमांची साम्य अवस्था मी - गुणिनि च - धर्मी जे जे द्रव्य असते त्या द्रव्याच्या - औत्पत्तिकः - स्वरूपभूत - गुणः अपि - गुणधर्मही - अहं - मीच असतो - ॥१०॥
गतिशील पदार्थांची गती मी आहे गणना करणार्यांमध्ये काळ मी आहे गुणांची साम्यावस्था जी प्रकृती, ती मी आहे गुणी लोकांचा नैसर्गिक गुण मी आहे. (१०)
गुणिनामप्यहं सूत्रं महतां च महानहम् ।
सूक्ष्माणां अप्यहं जीवो दुर्जयानां अहं मनः ॥ ११ ॥
गुणांचा सूत्र मी आहे महत्तत्व महानिही । सूक्ष्म वस्तूत मी जीव चपळो मन तेहि मी ॥ ११ ॥
गुणिनां अपि अहं सूत्रं - त्या गुणधर्म असणार्या पदार्थांचाही मी सूत्रात्मा - महतां च महान् अहं - मोठयांत मोठे असून मोठयांचे उपादान कारण असणारे महत्तत्त्व मी - सूक्ष्माणां अपि अहं जीवः - अत्यंत सूक्ष्म पदार्थांपेक्षाही मी सूक्ष्मतम असून सर्वांची जीवनकला मी - दुर्जयानां अहं मनः - दुर्दांत व अवखळांमध्ये सुद्धा जिंकण्यास अति कठीण असे चंचल मन मी होय. ॥११॥
गुणयुक्त पदार्थांमध्ये ज्ञानशक्तिप्रधान वस्तूंतील महत्तत्त्व मी आहे आणि क्रियाशक्तिप्रधान सूत्रात्मा मी आहे सूक्ष्म वस्तूंमध्ये जीव मी आहे अजिंक्य वस्तूंमध्ये मन मी आहे. (११)
हिरण्यगर्भो वेदानां मंत्राणां प्रणवस्त्रिवृत् ।
अक्षराणां अकारोऽस्मि पदानि च्छंदसामहम् ॥ १२ ॥
हिरण्यगर्भ वेदांचा मंत्रीं त्रयोहि मी । अकार अक्षरां मध्ये छदीं गायत्रिही तसा ॥ १२ ॥
वेदानां हिरण्यगर्भः - सर्वमान्य वेदांचा प्रकटकर्ता - मंत्राण त्रिवृत् प्रणवः - मंत्रांतील मंत्रश्रेष्ठ असून ‘अ, उ, म ’ या तीन वर्णानी घटित झालेला ॐ - अक्षराणां ‘अ ’ कारः - ६३ अक्षरांचा आदि ‘अ ’ - छंदसां पदानि अहं अस्मि - छंदातील उत्कृष्ट छंद गायत्री मी आहे. ॥१२॥
वेदांचा अध्यापक हिरण्यगर्भ मी आहे मंत्रांमध्ये ‘अउम‘ या तीन मात्रांनी युक्त असा ॐकार मी आहे अक्षरांमध्ये अकार आणि छंदांमध्ये त्रिपदा गायत्री मी आहे. (१२)
इन्द्रोऽहं सर्वदेवानां वसूनां अस्मि हव्यवाट् ।
आदित्यानां अहं विष्णू रुद्राणां नीललोहितः ॥ १३ ॥
इंद्र मी देवतां मध्ये वसूत अग्नि श्रेष्ठ मी । आदित्यीं विष्णु मी तैया रुद्रात नीललोहितो ॥ १३ ॥
सर्वदेवानां इंद्रः अहं - सर्व देवांचा स्वामी इंद्र मी - रुद्राणां नीललोहितः - एकादश रुद्रांतील नीलकंठ शंकर - आदित्यानां विष्णुः - बारा आदित्यांतील विष्णु - वसूनां हव्यवाट् - अष्ट वसूंतील प्रमुख अग्नी - अहं अस्मि - मी आहे - ॥१३॥
सर्व देवांमध्ये इंद्र, आठ वसूंमध्ये अग्नी, बारा आदित्यांमध्ये विष्णू आणि अकरा रूद्रांमध्ये शंकर मी आहे. (१३)
ब्रह्मर्षीणां भृगुः अहं राजर्षीणां अहं मनुः ।
देवर्षीणां नारदोऽहं हविर्धान्यस्मि धेनुषु ॥ १४ ॥
भृगु भ्रह्मर्षि मध्ये मी मनु राजर्षियां मधे । देवर्षीत नारदो मी गाईत कामधेनु मी ॥ १४ ॥
ब्रह्मर्षीणां भृगुः अहं - ब्रह्मर्षींतील भृगु मी - राजर्षीणां मनुः अहं - राजर्षींतील मनु मी - देवर्षीणां नारदः अहं - देवर्षींतील नारद मी - धेनुषु हविर्धानी (अहं) अस्मि - धेनूंतील कामधेनु मी आहे. ॥१४॥
मी ब्रह्मषर्मींध्ये भृगू, राजर्षीमध्ये मनू, देवर्षीमध्ये नारद आणि गाईंमध्ये कामधेनू आहे. (१४)
सिद्धेश्वराणां कपिलः सुपर्णोऽहं पतत्रिणाम् ।
प्रजापतीनां दक्षोऽहं पितॄणां अहमर्यमा ॥ १५ ॥
सिद्धेशवरात कपिलो पक्षांमध्ये गरूड मी । प्रजापतीत दक्षो मी आर्यामा पितरां मध्ये ॥ १५ ॥
सिद्धेश्वराणां कपिलः - सिद्ध श्रेष्ठांत कपिल - पतत्रिणां सुपर्णः अहं - पक्ष्यांत बळकट पंख असणारा गरुड मी - प्रजापतीनां दक्षः अहं - प्रजापतींमध्ये दक्ष मी - पितृणां अर्यमा अहं - पितरांमध्ये प्रेमळ अर्यमा मी आहे. ॥१५॥
मी सिद्धेश्वरांमध्ये कपिल, पक्ष्यांमध्ये गरूड, प्रजापतींमध्ये दक्ष प्रजापती आणि पितरांमध्ये अर्यमा आहे. (१५)
मां विद्ध्युद्धव दैत्यानां प्रह्लादं असुरेश्वरम् ।
सोमं नक्षत्रौषधीनां धनेशं यक्षरक्षसाम् ॥ १६ ॥
दैत्यीं प्रल्हाद तो भक्त नक्षत्रीं चंद्रमाच मी । सोमरसौषधीं मध्ये यक्षां मध्ये कुबेर मी ॥ १६ ॥
उद्धव - उद्धवा - दैत्यानां असुरेश्वरं प्रल्हादं, - दैत्यांमध्ये दैत्यांच्या अधिपति पण माझा भक्त प्रल्हाद, - नक्षत्रौषधीनां सोमं, - नक्षत्रांचा पति व औषधांचा पोषक चंद्र, - यक्षरक्षसां धनेशं, - यक्षराक्षसांचा स्वामी धनेश कुबेर मी आहे ॥ १६ ॥
हे उद्धवा ! मी दैत्यांमध्ये दैत्यराज प्रह्लाद, नक्षत्रांचा आणि वनस्पतींचा राजा चंद्र मी आहे यक्षराक्षसांमध्ये मी कुबेर आहे. (१६)
ऐरावतं गजेंद्राणां यादसां वरुणं प्रभुम् ।
तपतां द्युमतां सूर्यं मनुष्याणां च भूपतिम् ॥ १७ ॥
ऐरावतो गजेंद्रात जलचरीं वरूण तो। तपीं मध्येहि सूर्यो मी मनुष्यात नृपो असे ॥ १७ ॥
गजेंद्राणां ऐरावतं, - गजेंद्रांचा ऐरावत, - यादसा प्रभुं वरुणं, - जलचरांचा स्वामी वरुण, - तपता द्युमतां सूर्यं, - जलचरांचा स्वामी वरुण, - मनुष्याणां च भूपतिं मां विद्धि - आणि मनुष्यांतील भूपति मला जाण. ॥१७॥
गजेंद्रांमध्ये ऐरावत नावाचा हत्ती, जलचरांचा राजा वरूण, तापणार्या आणि प्रकाश देणार्यांमध्ये सूर्य आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे. (१७)
उच्चैःश्रवाः तुरङ्गाणां धातूनामस्मि काञ्चनम् ।
यमः संयमतां चाहं सर्पाणामस्मि वासुकिः ॥ १८ ॥
उच्चैश्रवाच आश्वाच अश्वात धातुं मध्ये सुवर्ण मी । यम मी दंडधारीत सर्पांमध्येहि वासुकी ॥ १८ ॥
तुरंगाणां उच्चैःश्रवाः - अश्वांत उच्चैःश्रवा - धातूनां कांचनं अहं अस्मि - धातूंमध्ये सोने मी आहे - संयमतां च यमः - व निरोध करणार्यांत यम - सर्पाणां वासुकिः अहं अस्मि - सर्पातील वासुकि मी आहे - ॥१८॥
मी घोड्यांमध्ये उच्चैःश्रवा, धातूंमध्ये सोने, दंड करणार्यांमध्ये यम आणि सर्पांमध्ये वासुकी आहे. (१८)
नागेंद्राणां अनंतोऽहं मृगेंद्रः श्रृङ्गिदंष्ट्रिणाम् ।
आश्रमाणां अहं तुर्यो वर्णानां प्रथमोऽनघ ॥ १९ ॥
नागेंद्रात अनंतो मी मृगेंद्र श्वापदात मी । आश्रमी यति तो मीच वर्णात व्दिज मी असे ॥ १९ ॥
अनघ - हे निष्पाप - नागेंद्राणां अनंतः, शृंगिदंष्ट्रिणां मृगेंद्रः अहं - नागांतील अनंत, शिंगांनी व दाढांनी हल्ला करणार्या पशूंत सिंह मी, - आश्रमाणां तुर्यः अहं, - ब्रह्मचर्य गार्हस्थ वानप्रस्थ संन्यास यांतील चवथा संन्यास आश्रम, - चार वर्णानां प्रथमः अहं, - वर्णांतील ब्राह्मणवर्ण मी आहे ॥ १९ ॥
हे पुण्यशील उद्ववा ! मी नागराजांमध्ये शेषनाग, शिंग आणि दाढा असलेल्या प्राण्यांमध्ये मुख्य सिंह, आश्रमांमध्ये संन्यास आणि वर्णांमध्ये ब्राह्मण आहे. (१९)
तीर्थानां स्रोतसां गङ्गा समुद्रः सरसामहम् ।
आयुधानां धनुरहं त्रिपुरघ्नो धनुष्मताम् ॥ २० ॥
तीर्थस्त्रोतात गंगा मी समुद्र तो जलाशयीं । आयुधात धनुष्यो नी धनुर्धार्यात तो शिव ॥ २० ॥
तीर्थानां स्रोतसां गंगा, - तीर्थांत व नद्यांत गंगा, - सरसां समुद्रः अहं, - सरोवरांत समुद्र मी, - आयुधानां धनुः, - हत्यारांत हत्यार धनुष्य, - धनुष्मतां त्रिपुरघ्नः अहं - धनुर्धार्यांत त्रिपूर राक्षसांचा हंता शंकर मी आहे. ॥२०॥
मी तीर्थे आणि नद्यांमध्ये गंगा, जलाशयांमध्ये समुद्र, शस्त्रांमध्ये धनुष्य तसेच धनुर्धार्यांमध्ये त्रिपुरारी शंकर आहे. (२०)
धिष्ण्यानां अस्म्यहं मेरुः गहनानां हिमालयः ।
वनस्पतीनां अश्वत्थ ओषधीनां अहं यवः ॥ २१ ॥
निवासात सुमेरु नी गिरीमध्ये हिमालय । अश्वत्थो तरुच्या मध्ये धान्यात जव मी असे ॥ २१ ॥
धिष्ण्यानां मेरुः अहं, - वास्तव्य स्थानांतील अति सुरक्षित स्थान जे मेरु तो मी, - गहनानां हिमालयः, - दुर्गमांतील हिमाचल, - वनस्पतीनां अश्वत्थः, - वृक्षांतील यज्ञोपयोगी अश्वत्थ, - ओषधीनां अहं यवः, - पीक दिल्यानंतर वठून जाणार्या ओषधींत यव मी आहे. ॥ २१ ॥
मी निवासस्थानांमध्ये सुमेरू पर्वत, दुर्गम स्थानांमध्ये हिमालय, वनस्पतींमध्ये पिंपळ आणि धान्यांमध्ये सातू आहे. (२१)
पुरोधसां वसिष्ठोऽहं ब्रह्मिष्ठानां बृहस्पतिः ।
स्कंदोऽहं सर्वसेनान्यां अग्रण्यां भगवानजः ॥ २२ ॥
पुरोहितीं वसिष्ठो मी वेदवेत्ती ब्रहस्पती । सेनापतीत स्कंदो मी सन्मार्गीत विरंचि मी ॥ २२ ॥
पुरोधसां अहं वसिष्ठः, - पुरोहितांत पुरोहित वसिष्ठ, - ब्रह्मिष्ठानां बृहस्पतिः, - ब्रह्मवेत्त्यांतील अत्यंत शुद्धशीलाचा ब्रह्मनिष्ठ बृहस्पति, - सर्वसेनान्यां स्कंदः, - सेनापतींतील उत्तमोत्तम सेनापति षडानन, - अग्रण्यां भगवान् अजः अहं - जगन्नायकांतील श्रेष्ठ भगवान् ब्रह्मदेव मी आहे. ॥२२॥
मी पुरोहितांमध्ये वसिष्ठ, वेदवेत्त्यांमध्ये बृहस्पती, सर्व सेनापतींमध्ये कार्तिक स्वामी तसेच सन्मार्गप्रवर्तकांमध्ये भगवान ब्रह्मदेव आहे. (२२)
यज्ञानां ब्रह्मयज्ञोऽहं व्रतानां अविहिंसनम् ।
वाय्वग्न्यर्काम्बुवाग् आत्मा शुचीनां अप्यहं शुचिः ॥ २३ ॥
स्वाध्याययज्ञ मी यज्ञीं अहिंसा त्या व्रतां मधे । शुद्धकर्त्यात सूर्यान्गि जलात्मा वायु वाणि मी ॥ २३ ॥
यज्ञानां ब्रह्मयज्ञः अहं, - यज्ञांतील उत्तम यज्ञ म्हणजे ब्रह्मयज्ञ - व्रतानां अविहिंसनं, - , व्रतोत्तम अहिंसा - वाय्वग्न्यर्कांबुवागात्मा - आणि शुद्ध करणारे वायु, अग्नि, सूर्य, जल, वाणी व आत्माज्ञान यांस - शुचीनां अपि शुचिः अहं अस्मि - शुद्ध करण्याचे सामर्थ्य देणारा शुचिधर्म मी आहे. ॥२३॥
पंचमहायज्ञांमध्ये ब्रह्मयज्ञ मी आहे, व्रतांमध्ये अहिंसाव्रत आणि शुद्ध करणार्या पदार्थांमध्ये नित्यशुद्ध वायू, अग्नी, सूर्य, जल, वाणी व आत्मा मी आहे. (२३)
योगानां आत्मसंरोधो मंत्रोऽस्मि विजिगीषताम् ।
आन्वीक्षिकी कौशलानां विकल्पः ख्यातिवादिनाम् ॥ २४ ॥
योगामध्ये समाधी मी विजयात मंत्रनीति मी । कुशलात असे आत्मा ख्यातिवादीं विकल्प मी ॥ २४ ॥
योगानां आत्मसंरोधः - योगांत आत्मसंयमन अथवा समाधियोग - विजिगषितां मंत्रः - विजयेच्छु लोकांची राजकारणी मसलत - कौशलानां आन्वीक्षिकी - विवेकचातुर्यामध्ये आत्मानात्मविवेकविद्या - ख्यातिवादिनां विकल्पः - वस्तूंचे भान आणि कथन यासंबंधी जे अनेक वाद आहेत त्यांपैकी विकल्प - (अहं) अस्मि - मी आहे. ॥२४॥
योगांमध्ये मनोनिरोधरूपी समाधियोग मी आहे जिंकण्याची इच्छा करणार्यांची गुप्त मसलत मी आहे आत्मानात्मविवेकाच्या चर्चेमधील ब्रह्मविद्या मी आहे वादविवाद करणार्यांमधील विकल्प मी आहे. (२४)
स्त्रीणां तु शतरूपाहं पुंसां स्वायंभुवो मनुः ।
नारायणो मुनीनां च कुमारो ब्रह्मचारिणाम् ॥ २५ ॥
स्त्रियांमध्ये शतरूपा स्वायंभूव नरात मी । नारायण मुनीं मध्ये ब्रह्मचार्यात संत चौ ॥ २५ ॥
स्त्रीणां तु शतरूपा - स्त्रियांत शतरूपी सरस्वती अथवा विद्युत् - पुंसां स्वायंभुवः मनुः - पुरुषांत स्वायंभुव मनु - मुनीनां च नारायणः - मुनींतील श्रेष्ठ नारायण मुनि - ब्रह्मचारिणां कुमारः अहं - ब्रह्मचार्यांमध्ये सनत्कुमार मी आहे. ॥२५॥
मी स्त्रियांमध्ये मनुपत्नी शतरूपा, पुरूषांमध्ये स्वायंभुव मनू, मुनीश्वरांमध्ये नारायण आणि ब्रह्मचार्यांमध्ये सनत्कुमार आहे. (२५)
धर्माणां अस्मि संन्यासः क्षेमाणां अबहिर्मतिः ।
गुह्यानां सुनृतं मौनं मिथुनानां अजस्त्वहम् ॥ २६ ॥
धर्मात कर्मसंन्यास अभयी साधनात ते । आत्म्याचे अनुसंधान, अभिप्रायात मौन मी ॥ आणीक रूप ते एक जोडप्यात प्रजापती ॥ २६ ॥
धर्माणां संन्यासः - आश्रमांतील वरिष्ठ संन्यास - क्षेमाणां अबहिर्मतिः - सुरक्षित ठेवणार्या उपायांतील उत्तम उपाय आत्मैकश्रद्धा - गुह्यानां सूनृतं मौनं - गुप्त ठेवण्याच्या साधनांपैकी उत्तम साधन मिष्ट भाषण व मूकव्रत - मिथुनानां तु अजः - दांपत्यांतील पहिल्या पदवीचे प्रजापतीचे दांपत्य - अहं अस्मि - मी आहे. ॥२६॥
धर्मांमध्ये सन्यासधर्म मी आहे कल्याण करून घेऊ इच्छिणार्यांची अंतर्मुख वृत्ती मी आहे कोणतीही गोष्ट गुप्त राखण्यासाठी लागणारी मधुर वाणी आणि मौन मी आहे, ज्याच्या शरीरापासून स्त्रीपुरूषांची पहिली जोडी उत्पन्न झाली, तो ब्रह्मदेव मी आहे. (२६)
संवत्सरोऽस्म्यनिमिषाम् ऋतूनां मधुमाधवौ ।
मासानां मार्गशीर्षोऽहं नक्षत्राणां तथाभिजित् ॥ २७ ॥
जागृतात असे काल ऋत मध्ये वसंत मी । मासात मार्गशीर्षो मी नक्षत्रात अभीजितो ॥ २७ ॥
अनिमिषां संवत्सरः - जागृत असणार्यांतील सदा जागृत असणारा संवत्सर - ऋतूनां मधुमाधवौ - ऋतूंमध्ये मधु व माधव म्हणजे चैत्र व वैशाख - मासानां मार्गशीर्षः - मासांतील मार्गशीर्ष - तथा नक्षत्राणां अभिजित् - तसेच नक्षत्रांतील अभिजित् - अहं अस्मि - मी आहे. ॥२७॥
नेहमी जागृत असणार्यांमध्ये संवत्सररूप काळ मी आहे, ऋतूंमध्ये वसंत, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि नक्षत्रांमध्ये अभिजित. (उत्तराषाढाचा चौथा व श्रवणाचा पहिला चरण याला अभिजित नाव आहे) मी आहे. (२७)
अहं युगानां च कृतं धीराणां देवलोऽसितः ।
द्वैपायनोऽस्मि व्यासानां कवीनां काव्य आत्मवान् ॥ २८ ॥
कृष्णव्दैपायनो व्यासीं सत्ययुग युगात त्या । विवेकींच्या मघे मी ते देवलो असितो ऋषि ॥ २८ ॥
युगानां च कृतं - युगांत कृतयुग - धीराणां देवलः असितः - बुद्धिवंतांपैकी देवल व असित - व्यासानां द्वैपायनः - वेदव्यवस्था करणार्यांतील द्वैपायन व्यास - कवीनां आत्मवान् काव्यः - विद्वानांमध्ये सूक्ष्मबुद्धि शुक्राचार्य - अहं अस्मि - मी आहे. ॥२८॥
मी युगांमध्ये सत्ययुग, विवेकी पुरूषांमध्ये महर्षी देवल व असित, व्यासांमध्ये द्वैपायन व्यास आणि विद्वानांमध्ये बुद्धिमान शुक्राचार्य आहे. (२८)
वासुदेवो भगवतां त्वं तु भागवतेष्वहम् ।
किम्पुरुषानां हनुमान् विद्याध्राणां सुदर्शनः ॥ २९ ॥
वासुदेवो भगवंती भक्तात तूच उद्धवा । किंपुरुषात हनुमान विद्याधरीं सुदर्शन ॥ २९ ॥
भगवतां वासुदेवः - देवांपैकी वासुदेव - भागवतेषु तु त्वं - भागवतोत्तम जो तू तो - किंपुरुषाणां हनुमान् - वानरांतील हनुमान - विद्याध्राणां सुदर्शनः - विद्याधरांतील सुदर्शन - अहं अस्मि - मी आहे. ॥२९॥
मी षड्गुणैश्वर्य संपन्नांमध्ये वासुदेव, भगवद्भक्तांमध्ये तू. (उद्वव), किंपुरूषांमध्ये हनुमान आणि विद्याधरांमध्ये सुदर्शन आहे. (२९)
रत्नानां पद्मरागोऽस्मि पद्मकोशः सुपेशसाम् ।
कुशोऽस्मि दर्भजातीनां गव्यमाज्यं हविःष्वहम् ॥ ३० ॥
रत्नात पद्मरागो मी पद्मकोश सुसुंदरीं । तृणामध्ये कुशो, तूप गाईचे हविषा मघे ॥ ३० ॥
रत्नानां पद्मरागः - रत्नोत्तम पद्मराग - सुपेशसां पद्मकोशः अस्मि - सुंदरांपैकी कमलकोश मी आहे - दर्भजातीनां कुशः - दर्भवर्गांत कुश - हविःषु गव्यं आज्यं - अग्नीस अर्पण करण्याच्या पुरोडाशादि हविर्द्रव्यांमध्ये गाईचे तूप - अहं अस्मि - मी आहे. ॥३०॥
रत्नांमध्ये पद्मराग, सुंदर वस्तूंमध्ये कमळाची कळी, तृणांमध्ये कुश आणि हविर्द्रव्यांमध्ये गाईचे तूप मी आहे. (३०)
व्यवसायिनां अहं लक्ष्मीः कितवानां छलग्रहः ।
तितिक्षास्मि तितिक्षूणां सत्त्वं सत्त्ववतां अहम् ॥ ३१ ॥
व्यापारात असे लक्ष्मी छळात द्यूत मी असे । तितिक्षूंची तितिक्षा मी सात्त्विकां गुण सत्त्व मी ॥ ३१ ॥
व्यवसायिनां लक्ष्मीः - व्यापार्याची लक्ष्मी - कितवाना छलग्रहः अहं - धूर्तांपैकी कपटद्यूतकार मी - तितिक्षूणां तितिक्षा - सहनशीलांची सहनशक्ति - सत्त्ववतां सत्त्वं - उत्साहवंतांचा उत्साह - अहं अस्मि - मी आहे. ॥३१॥
मी व्यापार करणार्यांमध्ये राहाणारी लक्ष्मी, कपटाने खेळ करणार्यांमध्ये द्यूत, सहनशील लोकांची सहनशीलता आणि सात्त्विक पुरूषांचा सत्त्वगुण आहे. (३१)
ओजः सहो बलवतां कर्माहं विद्धि सात्वताम् ।
सात्वतां नवमूर्तीनां आदिमूर्तिः अहं परा ॥ ३२ ॥
वैष्णवा वासुदेवो मी नऊ मूर्तीत तोच मी । उत्साह बळवंता मी नैष्कर्म्य वीरतेत मी ॥ ३२ ॥
बलवतां ओजः, सहः - बलवंताचे कार्यक्षम व सहनक्षम बळ - सात्वतां कर्म अहं - भागवतांची भक्ति मी - सात्वतां नवमूर्तींनां परा आदिमूर्तिः - नऊ सात्वत मूर्तींतील पहिली व मुख्य वासुदेव मूर्ति मी जाण. ॥३२॥
मी बलवानांमधील उत्साह आणि पराक्रम, भगवद्भक्तांमधील भक्तियुक्त निष्काम कर्म आणि वैष्णवांना पूज्य अशा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरूद्ध, नारायण, हयग्रीव, वराह, नृसिंह आणि वामन या नऊ मूर्तीमध्ये पहिली व श्रेष्ठ मूर्ती वासुदेव आहे. (३२)
विश्वावसुः पूर्वचित्तिः गंधर्व अप्सरसां अहम् ।
भूधराणामहं स्थैर्यं गंधमात्रमहं भुवः ॥ ३३ ॥
विश्वावसूचि गंधर्वी पूर्वचित्तीच अप्सरीं । स्थिरता पर्वतीं मी नी पृथ्वीत गंध मी असे ॥ ३३ ॥
गंधर्वाऽप्सरसा विश्वावसुः पूर्वाचित्तिः अहं - गंधर्वांतील विश्वावसु व अप्सरांपैकी पूर्वचित्ति - भूधराणां स्थैर्यं अहं - पर्वतांची स्थिरता मी - भुवः गंधमात्रं अहं - पृथ्वीचा शुद्धगुण गंध मी आहे. ॥३३॥
मी गंधर्वामध्ये विश्वावसू, अप्सरांमध्ये पूर्वचित्ती, पर्वतांमध्ये स्थैर्य आणि पृथ्वीमध्ये शुद्ध गंध तन्मात्रा आहे. (३३)
अपां रसश्च परमः तेजिष्ठानां विभावसुः ।
प्रभा सूर्येंदुताराणां शब्दोऽहं नभसः परः ॥ ३४ ॥
जळात रस मी तैसा तेजस्वीयात अग्नि मी । प्रभा तार्यात मी सर्व आकाशीं शब्द मी असे ॥ ३४ ॥
अपां परमः रसः - जलांतील मधुर रस - तेजिष्ठानां च विभावसुः - व तेजास्व्यांमध्ये सूर्य किंवा अग्नि - सूर्येंदुताराणां प्रभा - सूर्य, चंद्र, नक्षत्रे यांची प्रभा - नभसः परः शब्दः - आकाशशब्दांतील परा वाणी - अहं (अस्मि) - मी आहे. ॥३४॥
मी पाण्यामध्ये तन्मात्रा रस, तेजस्वी पदार्थांमध्ये अग्नी, सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांमध्ये प्रभा आणि आकाशाचा गुण शब्द आहे. (३४)
ब्रह्मण्यानां बलिरहं वीराणां अहमर्जुनः ।
भूतानां स्थितिरुत्पत्तिः अहं वै प्रतिसङ्क्रमः ॥ ३५ ॥
बळी मी व्दिजभक्तात वीरात अर्जुनो असे । जन्मस्थिति लयो सारे प्राण्यांचे मीच तो असे ॥ ३५ ॥
ब्रह्मण्यानां बलिः अहं - पवित्र वस्तूंमध्ये अवदान किंवा ब्रह्मवेत्त्यांत बलि मी - वीराणां अर्जुनः अहं - धनुर्धरांत अर्जुन मी - भूतानां स्थितिः उत्पत्तिः प्रतिसंक्रमः - पदार्थांची उत्पत्ति, स्थिति, लय - अहं वै - मीच आहे. ॥३५॥
मी ब्राह्मणभक्तांमध्ये बली, वीरांमध्ये अर्जुन आणि प्राण्यांमध्ये त्यांची उत्पत्ती, स्थिती व लय आहे. (३५)
गति उक्ति उत्सर्ग उपादानं आनंद स्पर्शलक्षणम् ।
आस्वाद श्रुति अवघ्राणं अहं सर्वेंद्रियेंद्रियम् ॥ ३६ ॥
पायात चालणे शक्ती गुदात त्याग शक्ति ती । जननेंद्रियि मी मोद त्वचेत स्पर्श मी असे ॥ नेत्रात दृष्टि मी आहे जिव्हेत स्वादही तसा । कानात ऐकणे शक्ती नाकात श्वासशक्ति मी ॥ ३६ ॥
गति उक्ति उत्सर्ग उपादानं आनंद - गमन, भाषण, विसर्जन, ग्रहण आणि आनंद, - स्पर्शलक्षणं, आस्वादश्रुत्यवघ्राणं, - ही पाय, जिव्हा, पायु, हात व उपास्थ या इंद्रियांची कर्मे व स्पर्श, दर्शन, रसन, श्रवण, गंधग्रहण, ही त्वचा, नेत्र, जिव्हा, कान, घ्राण, - सर्वेंद्रियेंद्रियं अहं - या ज्ञानेंद्रियांची कर्मे असून विषयग्रहणांची शक्ति जे मन ते मी आहे. ॥३६॥
चालणे, बोलणे, मलत्याग, घेणे, आनंद उपभोगणे, स्पर्श, पाहाणे, स्वाद घेणे, ऐकणे, वास घेणे ही कामे करणार्या सर्व इंद्रियांची शक्ती मीच आहे. (३६)
पृथिवी वायुराकाश आपो ज्योतिरहं महान् ।
विकारः पुरुषोऽव्यक्तं रजः सत्त्वं तमः परम् । अहं एतत्प्रसङ्ख्यानं ज्ञानं तत्त्वविनिश्चयः ॥ ३७ ॥
पंचभूते महत्तत्वे अव्यक्त व्यक्त यां परा । त्रैगुणाच्याहुनी दूर ब्रह्म मीच असे पहा ॥ ३७ ॥
पृथिवी, वायुः, आकाशः, आपः, ज्योतिः - पृथ्वीप्रभृति पंचमहाभूतांच्या तन्मात्रा - अहं - अहंकार - महान् - महतत्त्व - विकारः - पंचभूतांदि सोळा विकृति - व्यक्तं - मूलप्रकृति - रजः, सत्त्वं, तमः - सत्त्व, रज, तम हे तीन प्रकृतीचे गुण - पुरुषः - जीव - परं (अहं) - परब्रह्म मी आहे - ॥३७॥
पृथ्वी, वायू, आकाश, जल, तेज, अहंकार, महतत्त्व, पंचमहाभूते, जीव, अव्यक्त प्रकृती, सत्त्व, रज, तम हे सर्व विकार आणि त्यांच्याही पलीकडे असणारे ब्रह्म मीच आहे. (३७)
मयेश्वरेण जीवेन गुणेन गुणिना विना ।
सर्वात्मनापि सर्वेण न भावो विद्यते क्वचित् ॥ ३८ ॥
तत्त्व लक्षण नी संख्या तयाचे रूप नी फळ । ईश्वरो जीव नी तैसे गुण नी गुणि मी असे ॥ सर्वात्मा सर्व मी आहे माझ्या वाचून कांहि ना ॥ ३८ ॥
एतत् प्रसंख्यानं, ज्ञानं, तत्त्व विनिश्चयः - ही सर्व मिळवणी, त्याचे ज्ञान आणि निःसंदेह निश्चय - अहं - मी आहे - ईश्वरेण, जीवेन, गुणेन गुणिना, सर्वात्मना अपि - मी जो ईश्वर, जीव, गुणी -द्रव्य आणि सर्वांचा आत्मा, सर्व मी आहे. - सर्वेण मया विना क्वचित् भावः न विद्यते - माझ्याशिवाय कोणत्याही वस्तूला अस्तित्व नाही. ॥३८॥
या तत्त्वांची गणना, लक्षणांच्या द्वारे त्यांचे ज्ञान व तत्त्वज्ञानरूप त्यांचे फळुसद्धा मीच आहे मीच ईश्वर, जीव, गुण आणि गुणी आहे मीच सर्वांचा आत्मा आहे आणि सर्वरूपसुद्धा आहे माझ्या व्यतिरिक्त कोणताच पदार्थ कोठेही नाही. (३८)
सङ्ख्यानं परमाणूनां कालेन क्रियते मया ।
न तथा मे विभूतीनां सृजतोऽण्डानि कोटिशः ॥ ३९ ॥
आणु मी शकतो मोजू विभूती मोजणे किती । ब्रह्मांडे कोटि कोटी ते रचिले विभुती तशा ॥ ३९ ॥
परमाणूनां संख्यानं मया कालेन क्रियते - कालसाह्याने मज सर्वज्ञाला परमाणूंची संख्या करिता येते - कोटिशः अंडानि सूजतः मे - कोटयानुकोटि ब्रह्मांडे उत्पन्न करणार्या मला देखील - विभूतीनां तथा न - माझ्या विभूतींची वरील प्रकारची गणना करता येत नाही. ॥३९॥
मी कालान्तराने का असेना, परमाणूंचीसुद्धा गणना करू शकेन, परंतु अनंत कोटी ब्रह्मांडे रचणार्या माझ्या विभूतींची गणना मला करता येणार नाही. (३९)
तेजः श्रीः कीर्तिः ऐश्वर्यं ह्रीस्त्यागः सौभगं भगः ।
वीर्यं तितिक्षा विज्ञानं यत्र यत्र स मेंऽशकः ॥ ४० ॥
तेज श्री कीर्ति ऐश्वर्य सौंदर्य लाज त्याग नी । भाग्य शैर्य तितिक्षा नी विज्ञाना अंश मी असे ॥ ४० ॥
तेजः श्रीः कीर्तिः ऐश्वर्य - तेजस्विता, संपन्नता, कीर्तिवंतता, ऐश्वर्यप्राप्ति, - र्हीः त्यागः सौभगं भगः वीर्यं तितिक्षा विज्ञानं - मर्यादारक्षण किंवा विनम्रता, औदार्य, सौंदर्य, भाग्यशीलता, कर्मसामर्थ्य, सहनशीलता, ज्ञानसंपन्नता हे गुण - यत्र यत्र - जेथे जेथे - सः मे अंशकः - तो माझी विभूति अंशतः आहे. ॥४०॥
जेथे जेथे तेज, श्री, कीर्ती, ऐश्वर्य, लज्जा, त्याग, सौंदर्य, सौभाग्य, पराक्रम, तितिक्षा आणि विज्ञान असेल तो तो माझाच अंश आहे, असे समज. (४०)
एतास्ते कीर्तिताः सर्वाः सङ्क्षेपेण विभूतयः ।
मनोविकारा एवैते यथा वाचा अभिधीयते ॥ ४१ ॥
संक्षेपे विभुती सर्व उद्धवा बोललो असे । मनोविकार हे सर्व परमार्थ न वाणि ती ॥ ४१ ॥
एताः ते कीर्तिताः - या ज्या मी सर्व तुला विभूति सांगितल्या त्या - सर्वाः संक्षेपेण विभूतयः - माझ्या सकल विभूतींचा नुसता संक्षेप आहे - एते मनोविकाराः एव - या विभूति मनाचे विकार म्हणजे मनोविलास मात्र आहेत - यथा वाचा अभिधीयते - ज्याप्रमाणे गंधर्वनगरी हा पदार्थ नुसता वाणीचा विलास मात्र त्याचप्रमाणे ह्या विभूति नुसते मनाचे व वाणीचे खेळ आहेत. ॥४१॥
उद्धवा ! मी या सर्व विभूती तुला संक्षेपाने सांगितल्या वास्तविक या काल्पनिक आहेत कारण वाणीने सांगितलेली कोणतीही वस्तू पारमार्थिक दृष्ट्या खरी नसते. (४१)
वाचं यच्छ मनो यच्छ प्राणान् यच्छेंद्रियाणि च ।
आत्मानमात्मना यच्छ न भूयः कल्पसेऽध्वने ॥ ४२ ॥
त्यजी विकल्प संकल्प वाणीही रोधिणे पहा । प्राणां वश करोनीया इंद्रिया रोधिणे तसे ॥ शांत बुद्धि करी सत्त्वे तदाचि मुक्ति लाभते ॥ ४२ ॥
वाचं यच्छ - वाणीचा - मनो यच्छ - मनाचा - प्राणान् इंद्रियाणि च यच्छ - प्राण व इंद्रिये यांचा - आत्मानं आत्माना यच्छ - आत्मज्ञानाने जीवात्म्याचा उपाधींचा निरोध करून शेवटी त्यालाही टाकून दे - (म्हणजे) अध्वने भूयः न कल्पसे - पुनः जन्ममरणाचे चक्र त्रास देणार नाही. ॥४२॥
म्हणून तू वाणी, मन प्राण आणि इंद्रियांना ताब्यात ठेव सात्त्विक बुद्धीने प्रपंचाकडे लागलेल्या बुद्धीला आवर मग तुला संसाराच्या जन्ममृत्यूच्या मार्गावर भटकावे लागणार नाही. (४२)
यो वै वाङ्मनसी सम्यग् असंयच्छन् धिया यतिः ।
तस्य व्रतं तपो दानं स्रवत्यां अघटांबुवत् ॥ ४३ ॥
बुद्धिने मन ना रोधी तयाचे व्रत नी तप । दानही क्षीण होते ते कच्च्या मठात जैं जल ॥ ४३ ॥
धिया - आपल्या बुद्धीने - वाङ्मनसी सम्यक् यः यतिः असंयच्छन् वै - आपली वाणी आणि मन यांचा विवेकतः जो यति चांगला निरोध करीत नाही - तस्य व्रतं तपः दानं - त्याचे व्रत, त्याचे तप, आणि त्याने केलेले दान ही सर्व - आमघटांबुवत् स्रवति - मातीच्या कच्च्या घागरीतील पाण्याप्रमाणे गळून जातात. ॥४३॥
जो साधक बुद्धीच्या द्वारा वाणी आणि मनाला पूर्णपणे ताब्यात ठेवत नाही, त्याचे व्रत, तप आणि ज्ञान कच्च्या घड्यात भरलेल्या पाण्याप्रमाणे नाहीसे होते. (४३)
तस्माद्वचो मनः प्राणान् नियच्छेन् मत्परायणः ।
मद्भक्तियुक्तया बुद्ध्या ततः परिसमाप्यते ॥ ४४ ॥
म्हणौनी प्रेमि भक्तांनी वाणी नी मन प्राण ते । रोधिता शेष ना राही करिता मम भक्ति ती ॥ ४४ ॥
तस्मात् - म्हणून - मनोवचः प्राणान् - मन, बुद्धि, प्राण यांचा - मद्भक्तियुक्तया बुद्ध्या - मद्भक्तिपूर्ण जी बुद्धि तिचे साह्य घेऊन - मत्परायणः नियच्छेत् - माझ्या अनन्यभक्ताने पूर्ण निरोध करावा - ततः - हे केले असता - परिसमाप्यते - तो मुक्त होतो. ॥४४॥
म्हणून भक्ताने मत्परायण होऊन, भक्तियुक्त बुद्धीने, मन, वाणी आणि प्राणांचा संयम करावा असे केल्याने तो कृतकृत्य होतो. (४४)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |