|
श्रीमद् भागवत पुराण गृहस्थानां कृते मोक्षधर्मनिरूपणं नारदस्य स्वप्राग्जन्मवृत्तान्तकथनं च - गृहस्थांसाठी मोक्षधर्मांचे वर्णन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
नारद उवाच -
कर्मनिष्ठा द्विजाः केचित् तपोनिष्ठा नृपापरे । स्वाध्यायेऽन्ये प्रवचने ये केचित् ज्ञानयोगयोः ॥ १ ॥
नारदजी सांगतात - (अनुष्टुप्) नृपा रे ! द्विज ते कोणी कर्मनिष्ठ कुणी तपी । स्वाध्यायी नी कुणी वक्ते अध्यात्मी योगि ते कुणी ॥१॥
नृप - हे राजा - केचित् द्विजाः - कित्येक ब्राह्मण - कर्मनिष्ठाः (सन्ति) - कर्मनिष्ठ असतात - अपरे तपोनिष्ठाः (सन्ति) - दुसरे तपोनिष्ठ असतात - ये अन्ये केचित् (ते) - आणि जे दुसरे कोणी असतात ते - स्वाध्याये प्रवचने - अध्ययन, अध्यापन, - ज्ञानयोगयोः च निष्ठिताः (सन्ति) - ज्ञानमार्ग व योगाभ्यास यात निमग्न असतात. ॥ १ ॥
नारद म्हणतात – युधिष्ठिरा, काही ब्राह्मणांची निष्ठा कर्मामध्ये, काहींची तपश्चर्येमध्ये, काहींची वेदांचा स्वाध्याय आणि निरूपणामध्ये, काहींची आत्मज्ञान संपादन करण्यामध्ये तर काहींची योग-साधनेत असते. (१)
ज्ञाननिष्ठाय देयानि कव्यान्यानन्त्यमिच्छता ।
दैवे च तदभावे स्याद् इतरेभ्यो यथार्हतः ॥ २ ॥
गृहस्थे श्राद्ध-पूजेत ज्ञाननिष्ठासि दान दे । न मिळे ज्ञान निष्ठो तै वक्त्यासी बहु दान दे ॥२॥
आनंत्यं इच्छता (नरेण) - कर्माचे अनंत फल मिळविण्याची इच्छा करणार्या पुरुषाने - कव्यानि च दैवे - पितरांना उद्देशून दिली जाणारी कव्ये व देवकार्यातील हव्ये - ज्ञाननिष्ठाय देयानि - ज्ञाननिष्ठ ब्राह्मणाला अर्पण करावी - तद्भावे इतरेभ्यः (देयानि) - तसा ज्ञाननिष्ठ ब्राह्मण न मिळाल्यास दुसर्यांना द्यावी - यथार्हतः स्यात् - ही गोष्ट योग्यतेप्रमाणे व्हावी. ॥ २ ॥
गृहस्थाने श्राद्ध किंवा देवपूजेच्या वेळी आपल्या कर्मांचे अक्षय्य फळ मिळण्यासाठी ज्ञाननिष्ठ ब्राह्मणालाच हव्य-कव्याचे दान करावे. तसा न मिळाल्यास इतरांना त्यांच्या योग्यतेनुसार दान द्यावे. (२)
द्वौ दैवे पितृकार्ये त्रीन् एकैकमुभयत्र वा ।
भोजयेत् सुसमृद्धोऽपि श्राद्धे कुर्यान्न विस्तरम् ॥ ३ ॥
देवकार्यात ते दोन पितृकार्यात तीन त्या । द्विजांना भोजने द्यावी पितृकर्मी न वाढवो ॥३॥
द्वौ विप्रौ दैवे (कार्ये) - दोन ब्राह्मणांना देवकार्यात - पितृकार्ये त्रीन् - पितृकार्यात तीन ब्राह्मणांना - उभयत्र वा एकैकं भोजयेत् - किंवा दोन्ही ठिकाणी एकेकालाच भोजन द्यावे - सुसमृद्धः अपि - पुष्कळ श्रीमंतानेही - श्राद्धे विस्तरं न कुर्यात् - श्राद्धांत विस्तार करू नये. ॥ ३ ॥
श्राद्धाच्या वेळी देवांसाठी दोन आणि पितरांसाठी तीन किंवा दोन्हींकडे एकेका ब्राह्मणास भोजन द्यावे. धनवान असणार्यानेसुद्धा यापेक्षा अधिक विस्तार करू नये. (३)
देशकालोचितश्रद्धा द्रव्यपात्रार्हणानि च ।
सम्यग्भवन्ति नैतानि विस्तरात् स्वजनार्पणात् ॥ ४ ॥
सोयरे स्वजनो यांची देहकालानुरूप ती । श्रद्धा पात्र पुजावस्तू न होय शुद्ध युक्त ते ॥४॥
एतानि देशकालोचित् - ही देशकालाला अनुरूप - तश्रद्धाद्रव्यपात्रार्हणानि - श्रद्धा, द्रव्ये, पात्रे व पूजासाहित्ये - विस्तरात् स्वजनार्पणात् च - विस्तार केल्याने व नातलगांना अर्पण केल्याने - सम्यक् न भवंति - फलदायक होत नाहीत. ॥ ४ ॥
कारण आप्तेष्टांचा विस्तार केल्याने देश-कालानुसार श्रद्धा, पदार्थ, पात्र आणि पूजन व्यवस्थित होत नाही. (४)
देशे काले च सम्प्राप्ते मुन्यन्नं हरिदैवतम् ।
श्रद्धया विधिवत् पात्रे न्यस्तं कामधुगक्षयम् ॥ ५ ॥
ईशास भोग लावोनी श्रद्धेने दान देइजे । कामना पूर्ण तै होती अक्षयो लाभते फळ ॥५॥
देशे काले च संप्राप्ते - योग्य देश व काल प्राप्त झाला असता - हरिदैवतं मुन्यन्नं - ज्याची हरि देवता आहे व जे मुनींना खाण्यास योग्य असे अन्न - विधिवत् श्रद्धया पात्रे न्यस्तं - सशास्त्र सत्पात्र ब्राह्मणाला श्रद्धापूर्वक दिले असता - कामधुकू अक्षयं च (भवति) - इच्छा पुरविणारे व अक्षय्य होते. ॥ ५ ॥
देश आणि काळ जुळून आल्यावर मुनींना देण्यायोग्य शुद्ध अन्न भगवंतांना नैवेद्य दाखवून श्रद्धेने आणि विधिपूर्वक सत्पात्र व्यक्तीस दिले असता ते सर्व कामना पूर्ण करणारे अक्षय्य फळ देते. (५)
देवर्षिपितृभूतेभ्य आत्मने स्वजनाय च ।
अन्नं संविभजन्पश्येत् सर्वं तत् पुरुषात्मकम् ॥ ६ ॥
देवता पितरे प्राणी स्वजनीं अन्न घे पुन्हा । स्वतात इतरामध्ये श्रीहरीरूप पहा ॥६॥
देवर्षिपितृभूतेभ्यः - देव, ऋषि, पितर भूते यांना - आत्मने स्वजनाय च - आणि स्वतःला व इष्टमित्रांना - अन्नं संविभजन् - अन्न विभागून देऊन त्याने - सर्वं तत् पुरुषात्मकं पश्येत् - सर्व जग ईश्वररूप पाहावे. ॥ ६ ॥
अन्न समर्पण करतेवेळी देव, ऋषी, पितर, अन्य प्राणी, स्वजन आणि स्वत:लासुद्धा परमात्मस्वरूपात पाहावे. (६)
न दद्याद् आमिषं श्राद्धे न चाद्याद् धर्मतत्त्ववित् ।
मुन्यन्नैः स्यात्परा प्रीतिः यथा न पशुहिंसया ॥ ७ ॥
धर्मज्ञ पुरूषे श्राद्धीं मांस ते नच भक्षिणे । हविष्यान्ने तया शांती लाभे हिंसे न लाभते ॥७॥
धर्मतत्त्ववित् - धर्माचे तत्त्व जाणणार्या पुरुषाने - श्राद्धे आमिषं न दह्यात् - श्राद्धात मांसदान करू नये - न च अद्यात् - आणि भाषण करू नये - यथा मुन्यन्नैः - जशी ऋषींच्या अन्नांनी - (देवतानां) परा प्रीतिः स्यात् - देवादिकांची अत्यंत तुष्टि होते - (तथा) पशुहिंसया न (स्यात्) - तशी पशुहिंसेने होत नाही. ॥ ७ ॥
धर्माचे मर्म जाणणार्या पुरुषाने श्राद्धाचेवेळी मांस अर्पण करू नये आणि स्वत:ही खाऊ नये. कारण मुनींना योग्य अशा अन्नाने पितरांना अत्यंत प्रसन्नता लाभते, तशी पशुहिंसेने नाही. (७)
नैतादृशः परो धर्मो नृणां सद्धर्ममिच्छताम् ।
न्यासो दण्डस्य भूतेषु मनोवाक् कायजस्य यः ॥ ८ ॥
सद्धर्म इच्छिती त्यांनी प्राण्यांना मन वाणिने । शरीरे कष्ट ना द्यावे श्रेष्ठ धर्म न तो दुजा ॥८॥
भूतेषु - प्राणिमात्रांच्या ठिकाणी - मनोवाक्कायजस्य दण्डस्य - मन, वाणी व देह यापासून होणार्या दंडाचा - यः न्यासः - जो त्याग - एतादृशः परः धर्मः - ह्याच्यासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म - सद्धर्मं इच्छतां - सद्धर्माने वागण्याची इच्छा करणार्या - नृणां न (अस्ति) - मनुष्याला नाही. ॥ ८ ॥
ज्या लोकांना सद्धर्मपालनाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी, कोणत्याही प्राण्याला कायावाचामनाने कोणत्याही प्रकारचे कष्ट न देणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही. (८)
एके कर्ममयान् यज्ञान् ज्ञानिनो यज्ञवित्तमाः ।
आत्मसंयमनेऽनीहा जुह्वति ज्ञानदीपिते ॥ ९ ॥
आत्मसंयमनो अग्नीमध्ये कर्मास हव्य दे । बाह्य कर्मासि त्यागावे संतसंगात हे घडो ॥९॥
एके अनीहाः - काही निष्काम - यज्ञवित्तमाः ज्ञानिनः - यज्ञाचे तत्त्व पूर्णपणे जाणणारे ज्ञानी पुरुष - ज्ञानसंदीपिते आत्मसंयमने - ज्ञानाने प्रदीप्त केलेल्या मनोनिग्रहात - कर्ममयान् यज्ञान् जुह्वति - कर्ममय यज्ञांचा होम करितात. ॥ ९ ॥
यज्ञाचे मर्म जाणणारे काही ज्ञानी लोक ज्ञानाने प्रज्वलित केलेल्या आत्मसंयमरूप अग्नीमध्ये कर्ममय यज्ञांचे हवन करतात आणि बाह्य क्रियाकर्मांपासून विरक्त होतात. (९)
द्रव्ययज्ञैर्यक्ष्यमाणं दृष्ट्वा भूतानि बिभ्यति ।
एष माकरुणो हन्याद् अतज्ज्ञो हि असुतृब् ध्रुवम् ॥ १० ॥
द्रव्ययज्ञा यजो जाता भिती सर्वचि प्राणि ते । पोसोनी मारितो मूर्ख निर्दयी वदती मनीं ॥१०॥
भूतानि - प्राणी - द्रव्ययज्ञैः यक्ष्यमाणं दृष्ट्वा - द्रव्यमय यज्ञांनी यजन करणार्या मनुष्याला पाहून - एष अकरुणः अतज्ज्ञः - हा निर्दय आत्मतत्त्व न जाणणारा - असुतूप् - व स्वतःच्या प्राणांची तृप्ति करणारा - मा ध्रवुं हन्यात् - मला खचित मारील - (इति) हि बिभ्यति - असे म्हणून खरोखर भितात. ॥ १० ॥
जेव्हा एखादा पशुपुरोडाशादी द्रव्यमय यज्ञांनी यजन करू इच्छितो, तेव्हा आपल्या प्राणांचे पोषण करण्यासाठी हा निर्दय मूर्ख आपल्याला निश्चितपणे मारील, या विचाराने सर्व प्राणी घाबरून जातात. (१०)
तस्माद् दैवोपपन्नेन मुन्यन्नेनापि धर्मवित् ।
सन्तुष्टोऽहरहः कुर्यात् नित्यनैमित्तिकीः क्रियाः ॥ ११ ॥
धर्मज्ञे करणे हेची हविष्यान्नेचि हव्य हो । नित्य नैमित्तिको कार्यीं सदा संतुष्ट राहणे ॥११॥
तस्मात् - त्याकरिता - धर्मवित् संतुष्टः - धर्म जाणणार्या संतुष्ट पुरुषाने - दैवोपपन्नेन मुन्यन्नेन अपि - दैववशात मिळालेल्या मुनींच्या अन्नांनीच - अहरहः नित्यनैमित्तिकीः क्रियाः कुर्यात् - प्रतिदिवशी नित्यनैमित्तिक कर्मे करावी. ॥ ११ ॥
म्हणून धर्म जाणणार्या मनुष्याने प्रारब्धानुसार दररोज मिळणार्या, मुनीजनांना योग्य अशा अन्नाने आपली नित्य-नैमित्तिक कर्मे करावीत आणि त्यात संतुष्ट असावे. (११)
विधर्मः परधर्मश्च आभास उपमा छलः ।
अधर्मशाखाः पञ्चेमा धर्मज्ञोऽधर्मवत् त्यजेत् ॥ १२ ॥
विधर्म परधर्मो नी आभास उपमा छळ । शाखा पाच अधर्माच्या त्यागाव्या पाचही तशा ॥१२॥
धर्मज्ञः - धर्म जाणणार्या पुरुषाने - विधर्मः परधर्मः आभासः - विधर्म, परधर्म, वरकरणी धर्मासारखी दिसणारी गोष्ट, - उपमा छलः च - सदृश धर्म आणि कपटयुक्त धर्म - इमाः पंच अधर्मशाखाः - ह्या पाच अधर्माच्या शाखा - अधर्मवत् त्यजेत् - अधर्माप्रमाणे सोडून द्याव्या. ॥ १२ ॥
विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल या अधर्माच्या पाच शाखा आहेत. अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणार्या पुरुषाने त्याग करावा. (१२)
धर्मबाधो विधर्मः स्यात् परधर्मोऽन्यचोदितः ।
उपधर्मस्तु पाखण्डो दम्भो वा शब्दभिच्छलः ॥ १३ ॥
धर्मबुद्धीस बाधा जै विधर्म म्हणणे तया । तिसर्या करिता बोध परधर्म असाचि तो । दंभ पाखंड या नाम उपमा उपधर्म तो । शास्त्रवाक्या दुजा अर्थ तयासी नाम ते छळ ॥१३॥
धर्मबाधः विधर्मः स्यात् - ज्या करण्याने स्वधर्माला बाध येतो तो विधर्म होय - अन्यचोदतः परधर्मः (स्यात्) - दुसर्यासाठी सांगितलेला जो धर्म तो परधर्म होय - उपधर्मः तुः पाखंडः वा दंभः (स्यात्) - उपधर्म किंवा उपमा म्हणजे पाखंड अथवा ढोंग होय - शब्दभित् छलः (स्यात्) - शब्दाचे भलभलते अर्थ करणे हा छळ म्हणतात. ॥ १३ ॥
धर्मबुद्धीने करूनसुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो, तो ’विधर्म’ होय. आपल्याखेरीज अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म ’परधर्म’ होय. पाखंड किंवा दंभ म्हणजे ’उपधर्म’ किंवा ’उपमा’ होय. शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे हा ’छ्ल’ होय. (१३)
यस्त्विच्छया कृतः पुम्भिः आभासो ह्याश्रमात् पृथक् ।
स्वभावविहितो धर्मः कस्य नेष्टः प्रशान्तये ॥ १४ ॥
आश्रमावेगळा धर्म आभास नाम त्या असे । वर्णाश्रमोचितो धर्म श्रेष्ठ तो जरि शांति ना ॥१४॥
यः तु - जो पण - हि आश्रमात् पृथक् - खरोखर आपल्या आश्रम धर्माहून निराळा असा - पुंभिः इच्छया कृतः - पुरुषाकडून स्वेच्छेने आचरिला जातो - सः आभासः (स्यात्) - तो आभास होय - स्वभावविहितः धर्मः - स्वभावाला अनुरूप असणारा धर्म - कस्य प्रशांतये न इष्टः - कोणाला शांती देण्यास इष्ट होणार नाही. ॥ १४ ॥
आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो, तो ’आभास’ होय. आपापल्या स्वभावाला अनुकूल जो वर्णाश्रमधर्म असतो, तो कोणाला शांती देणार नाही बरे ? (१४)
धर्मार्थमपि नेहेत यात्रार्थं वाधनो धनम् ।
अनीहानीहमानस्य महाहेरिव वृत्तिदा ॥ १५ ॥
असता निर्धनी संत धर्म वा जगण्यासही । धनार्थ नच कष्टावे ईश निर्वाह चालवी ॥१५॥
अधनः - दरिद्री मनुष्याने - धर्मार्थं यात्रार्थं वा अपि - धर्माकरिता किंवा उदरनिर्वाहाकरिता सुद्धा - धनं न ईहेत - द्रव्याची इच्छा करू नये - अनीहा - निरिच्छपणा - अनीह मानस्य महाहेः इव - उद्योग न करणार्या अजगराला जसा तसा - वृत्तिदा - उपजीविका देणारा होतो. ॥ १५ ॥
निर्धन अशा धर्मात्म्या पुरुषाने शरीर निर्वाहासाठी किंवा धर्मासाठीही धन मिळविण्याचा प्रयत्न करू नये. कारण, कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता अजगराची जशी उपजीविका चालते, त्याचप्रमाणे निवृत्तिपरायण पुरुषाची निवृत्तीच त्याची उपजीविका चालविते. (१५)
सन्तुष्टस्य निरीहस्य स्वात्मारामस्य यत् सुखम् ।
कुतस्तत् कामलोभेन धावतोऽर्थेहया दिशः ॥ १६ ॥
रमता आत्मरूपात संतोष सुख लाभते । धनासाठी फिरे नित्य तया ते न मिळे कधी ॥१६॥
संतुष्टस्य निरीहस्य स्वात्मारामस्य - संतुष्ट, निरीच्छ व स्वात्मसुखी रममाण झालेल्या पुरुषाला - यत् सुखं भवति - जे सुख मिळते - तत् - ते - कामलोभेन अर्थेहया - उपभोगेच्छेने व द्रव्याच्या इच्छेने - दिशः धावतः कृतः - दाही दिशांकडे धावणाराला कोठून मिळणार? ॥ १६ ॥
आत्मसुखात रममाण होणार्या निष्क्रीय पण संतुष्ट पुरुषाला जे सुख मिळते ते, जो इच्छेने आणि लोभाने धनासाठी वणवण हिंडतो, त्याला कसे बरे मिळू शकेल ? (१६)
सदा सन्तुष्टमनसः सर्वाः शिवमया दिशः ।
शर्कराकण्टकादिभ्यो यथोपानत्पदः शिवम् ॥ १७ ॥
काट्यांचे भय ना राही जोडे पायात घालता । संतोष असता चित्ती त्याला दुःख नसे तसे ॥१७॥
यथा उपानत्पदः - जसे पायात जोडा असणार्याला - शर्कराकंटकादिभ्यः शिवं - खडयाकाटयापासून अभय असते - (तथा) सदा संतुष्टमनसः - तसे निरंतर ज्याचे मन संतुष्ट आहे अशाला - सर्वाः दिशः सुखमयाः (भवन्ति) - सर्व दिशा सुखमय वाटतात ॥ १७ ॥
जसे पायात जोडे घालून चालणार्याला काट्याकुट्याची भीती वाटत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्या मनात संतोष आहे, त्याला नेहमी सर्व काही सुखच सुख असते. (१७)
सन्तुष्टः केन वा राजन् न वर्तेतापि वारिणा ।
औपस्थ्यजैह्व्यकार्पण्याद् गृहपालायते जनः ॥ १८ ॥
जळे निर्वाह तो होई गुंततो विषयी परी । घरासी राखितो कुत्रा तसा लाचार होतसे ॥१८॥
राजन् - हे राजा - संतुष्टः केन वा न वर्तेत - संतोषी प्राणी कशाने बरे निर्वाह करणार नाही - वारिणा अपि (वर्तेत) - प्राण्याने सुद्धा निर्वाह करील - जनः (तु) - परंतु लोक - औपस्थ्यजैहव्यकार्पण्यात् - मैथुनसुख, जिव्हेची तृप्ति, दैन्यवृत्ति यायोगे - गृहपालायते - घर राखणार्या कुत्र्याप्रमाणे होऊन राहतात. ॥ १८ ॥
राजा ! माणूस फक्त पाण्यावरसुद्धा संतुष्ट राहून जगत नाही का ? परंतु जननेंद्रिय आणि जीभ यांच्यामुळे दीनवाणा होऊन बिचारा कुत्र्यासारखा जगतो. (१८)
असन्तुष्टस्य विप्रस्य तेजो विद्या तपो यशः ।
स्रवन्ति इन्द्रियलौल्येन ज्ञानं चैवावकीर्यते ॥ १९ ॥
असंतुष्ट असा विप्र इंद्रियी लुब्ध त्याचिये । यश विद्या तपो तेज विवेक क्षीण होतसे ॥१९॥
असंतुष्टस्य विप्रस्य - असंतोषी ब्राह्मणाचे - तेजः विद्याः तपः यशः - तेज, विद्या, तपश्चर्या व यश ही - स्त्रवंति - गळून जातात - इंद्रियलौल्येन च - आणि इंद्रियांच्या चंचलपणामुळे - ज्ञानं एव अवकीर्यते - ज्ञानसुद्धा नष्ट होते ॥ १९ ॥
असंतुष्ट ब्राह्मणाचे इंद्रियलोलुपतेमुळे तेज, विद्या, तपश्चर्या आणि यश क्षीण होतात आणि त्याचे ज्ञानही नाहीसे होते. (१९)
कामस्यान्तं हि क्षुत्तृड्भ्यां क्रोधस्यैतत्फलोदयात् ।
जनो याति न लोभस्य जित्वा भुक्त्वा दिशो भुवः ॥ २० ॥
खाता पिता मिटे इच्छा क्रोध इच्छेत शांत हो । परी पृथ्वीवरी राज्य होताही लोभ ना सरे ॥२०॥
च - आणि - जनः - मनुष्य - क्षुतृड्भ्यां - क्षुधा व तृषा यांच्या योगाने - कामस्य अन्तं (याति) - काम वासनेच्या नाशाला जातो - क्रोधस्य (च अंतं) एतत्फलोदयात् याति - आणि क्रोधाच्या नाशाला त्याचे फळ मिळाल्याने जातो - (किन्तु) दिशः जित्वा - पण दाही दिशा जिंकल्याने - भुवः वा भुक्त्वा - किंवा पृथ्वीचे राज्य भोगल्याने - लोभस्य न (अन्तं याति) - लोभाच्या अंताला जात नाही ॥ २० ॥
तहान आणि भूक शमल्यानंतर खाण्या-पिण्याची इच्छा संपते. आपले काम झाल्यानंतर क्रोधसुद्धा शांत होतो; परंतु जरी माणसाने पृथ्वीवरील सर्व दिशांकडील राज्य जिंकून घेतले आणि त्यांचा उपभोग घेतला तरी लोभाचा शेवट होत नाही. (२०)
पण्डिता बहवो राजन् बहुज्ञाः संशयच्छिदः ।
सदसस्पतयोऽप्येके असन्तोषात् पतन्त्यधः ॥ २१ ॥
शास्त्राचा अर्थ लावोनी मिटवी कुणि पंडित । ज्ञाता तो असता लोभी तरीही घसरे पुढे ॥२१॥
राजन् - हे राजा - बहवः बहुज्ञाः संशयच्छिदः पंडिताः - पुष्कळ बहुश्रुत व लोकांचे संशय दूर करणारे पंडित - एके सदसस्पतयः अपि - कित्येक सभाध्यक्ष सुद्धा - असंतोषात् अधः पतंति - असंतोषामुळे अधोगतीस जातात ॥ २१ ॥
अनेक विषयांचे जाणकार, शास्त्रातील शंकांचे समाधान करणारे आणि विद्वानांच्या सभांचे सभापती असणारे विद्वानसुद्धा असंतोषामुळे अध:पतित होतात. (२१)
असङ्कल्पात् जयेत् कामं क्रोधं कामविवर्जनात् ।
अर्थानर्थेक्षया लोभं भयं तत्त्वावमर्शनात् ॥ २२ ॥
संकल्प त्यजुनी काम इच्छा त्यागोनि काम तो । धना त्यागोनि लोभाला विचारे भय जिंकिणे ॥२२॥
असंकल्पात् कामं (जयेत्) - संकल्पाच्या त्यागाने काम जिंकावा - अर्थान् अनर्थेक्षया लोभं (जयेत्) - अर्थाना अनर्थ समजून लोभाला जिंकावे - तत्त्वावमर्शनात् च भयं (जयेत्) - व तत्त्वविचाराने भीती जिंकावी ॥ २२ ॥
संकल्पांचा त्याग करून कामाला, कामनांचा त्याग करून क्रोधाला, अर्थाला अनर्थ समजून लोभाला आणि तत्वविचाराने भयाला जिंकले पाहिजे. (२२)
आन्वीक्षिक्या शोकमोहौ दम्भं महदुपासया ।
योगान्तरायान् मौनेन हिंसां कायाद्यनीहया ॥ २३ ॥
विद्येने शोक नी मोह संतसेवेचि दंभ तो । मौनेचि विघ्न योगाने जिंकोनी प्राण नी तनू । निचेष्ट करणे तेंव्हा विजयासन ते मिळे ॥२३॥
आन्वीक्षिक्या शोकमोहौ (जयेत्) - आत्मविचाराने शोक व मोह जिंकावे - महदुपासया दंभं (जयेत्) - सत्पुरुषांच्या सेवेने दंभ जिंकावा - मौनेन योगां तरायान् (जयेत्) - मौनधारणाने योगांतील विघ्ने जिंकावी - कायाद्यनीहया हिंसां (जयेत्) - शरीरादिकांविषयीच्या निरिच्छपणाने हिंसाबुद्धि जिंकावी ॥ २३ ॥
अध्यात्मविद्येने शोक आणि मोह यांवर, संतांच्या सेवेने दंभावर, मौनाच्याद्वारा योग साधनेतील विघ्नांवर आणि शरीर, प्राण इत्यादींना क्रियाशून्य करून हिंसेवर विजय मिळविला पाहिजे. (२३)
कृपया भूतजं दुःखं दैवं जह्यात् समाधिना ।
आत्मजं योगवीर्येण निद्रां सत्त्वनिषेवया ॥ २४ ॥
दयेने भौतिकी दुःख दैवदुःख समाधिने । अध्यात्मदुःख योगाने विहारे झोप जिंकिणे ॥२४॥
कृपया भूतजं दुःखं [जह्यात्] - कृपया प्राण्यांपासून होणारे दुःख दूर करावे - समाधिना दैवं [जह्यात्] - समाधीच्या योगे दैविक दुःख टाकावे - योग वीर्येण आत्मजं [दुःखं जह्यात्] - योगसामर्थ्याने शरीरजन्य दुःख टाकावे - सत्त्वनिषेवया च निद्रां [जह्यात्] - आणि सात्त्विक आहाराने निद्रेला दूर करावे ॥ २४ ॥
अधिभौतिक दु:खाला दयेने, अधिदैविक वेदनांना समाधीने आणि आध्यात्मिक दु:खाला योगबलाने तसेच झोपेला सात्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकले पाहिजे. (२४)
रजस्तमश्च सत्त्वेन सत्त्वं चोपशमेन च ।
एतत्सर्वं गुरौ भक्त्या पुरुषो ह्यञ्जसा जयेत् ॥ २५ ॥
सत्वे तम रजा जिंको सत्वा उपरते पुन्हा । गुरूकृपा असे तेंव्हा साधका सहजी जमे ॥२५॥
च सत्त्वेन - आणि सत्त्वगुणाने - रजः तमः च जयेत् - रजोगुण व तमोगुण जिंकावे - उपशमेन च सत्त्वं [जयेत्] - आणि उपशमाने सत्त्वगुण जिंकावा - एतत् सर्वं - हे सर्व - पुरुषः - पुरुष - गुरोः भक्त्या - गुरुविषयी भक्तीने - हि अंजसा जयेत् - खरोखर सहज जिंकू शकतो ॥ २५ ॥
सत्वगुणाच्या योगाने रजोगुण-तमोगुणांवर आणि विरक्तीने सत्त्वगुणावर विजय मिळविला पाहिजे. श्रीगुरुभक्तीने या सर्वांवर माणसाला सहज विजय मिळविता येतो. (२५)
यस्य साक्षाद्भगवति ज्ञानदीपप्रदे गुरौ ।
मर्त्यासद्धीः श्रुतं तस्य सर्वं कुञ्जरशौचवत् ॥ २६ ॥
ज्ञानदीप गुरू लावी प्रत्यक्ष भगवान् गुरू । माणूस बघता त्याला ज्ञान कुंजरस्नानवत् ॥२६॥
यस्य - ज्याची - साक्षात् - प्रत्यक्ष - भगवति ज्ञानदीपप्रदे गुरौ - भगवद्रूपी व ज्ञानरूप प्रकाश देणार्या गुरूच्या ठिकाणी - मर्त्यासध्दीः [स्यात्] - मनुष्याप्रमाणे तुच्छ बुद्धि असेल - तस्य सर्वं श्रुतं - त्याचे सर्व अध्ययन - कुंजरशौचवत् [व्यर्थं भवति] - हत्तीच्या स्नानाप्रमाणे फुकट होय. ॥ २६ ॥
हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारे गुरुदेव साक्षात भगवंतच आहेत. जो दुर्बुद्धी पुरुष त्यांना सामान्य माणूस समजतो, त्याचे सर्व शास्त्रांचे श्रवण हत्तीच्या स्नानाप्रमाणे व्यर्थ होय. (२६)
एष वै भगवान् साक्षात् प्रधानपुरुषेश्वरः ।
योगेश्वरैर्विमृग्याङ्घ्रिः लोको यं मन्यते नरम् ॥ २७ ॥
श्रेष्ठ योगेश्वरो ध्याती पदांबुत गुरूचिये । गुरू प्रत्यक्ष तो विष्णु भ्रमाने जीव भासतो ॥२७॥
एषः वै भगवान् - हा खरोखर भगवान - साक्षात् प्रधानपुरुषेश्वरः - प्रत्यक्ष प्रकृतिपुरुषांचा नियामक - योगेश्वरः विमृग्यांघ्रिः [च अस्ति] - व योगिजन ज्याच्या चरणांचा शोध करतात, असा आहे - [तं] वै लोकं नर मन्यते - पण लोक त्यालासुद्धा मनुष्य समजतात. ॥ २७ ॥
मोठ-मोठे योगेश्वर ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहातात, प्रकृती आणि पुरुषाचे अधीश्वर असलेले ते गुरू साक्षात भगवंतच असतात. लोक त्यांना अज्ञानाने माणूस समजतात. (२७)
षड्वर्गसंयमैकान्ताः सर्वा नियमचोदनाः ।
तदन्ता यदि नो योगान् आवहेयुः श्रमावहाः ॥ २८ ॥
शास्त्राचे सार ते एक षड्रिपू जिंकणे असे । त्याविना ध्यान ते व्यर्थ उरती कष्ट केवळ ॥२८॥
सर्वाः नियमचोदनाः - सगळे नियम आणि विधी - षड्वर्गसंयमैकान्ताः [सन्ति] - सहा विकारांचे नियंत्रण हा आहे उद्देश ज्यांचा असे होत - तदन्ताः यदि [ते] - ते फळ आहे ज्याचे असे ते जर - योगान् नो आवहेयुः - ध्यानधारणासमाधिरूप योग संपादन करणार नाहीत - [तर्हि ते] श्रमावहाः [स्युः] - तर ते केवळ श्रमदायक होत. ॥ २८ ॥
शास्त्रामध्ये जितके नियम सांगितले आहेत, त्यांचे तात्पर्य हेच आहे की, कामादी सहा शत्रूंवर, सहा इंद्रियांवर विजय मिळवावा. एवढे करूनही जर त्या नियमांनी भगवंतांचे ध्यान करता आले नाही, तर सारा खटाटोप व्यर्थ आहे. (२८)
यथा वार्तादयो ह्यर्था योगस्यार्थं न बिभ्रति ।
अनर्थाय भवेयुः स्म पूर्तमिष्टं तथासतः ॥ २९ ॥
शेती व्यापार आदीत भक्ती वा मुक्ति ना मिळे । दुष्टांचे कर्म ते तैसे कल्याण मुळि त्यात ना ॥२९॥
यथा वार्तादयः अर्थाः - जसे कृषि इत्यादि व्यापार - योगस्य अर्थं न बिभ्रति - योगाभ्यासाची फळे देत नाहीत - ते अनर्थाय भवेयुः - ते अनर्थाला कारण होतात - तथा आसतः - त्याप्रमाणे अभिमानी पुरुषाला - पूर्तं इष्टं अनर्थाय भवति - इष्टापूर्तादि धर्म अनर्थकारक होतात. ॥ २९ ॥
जसे शेती, व्यापार इत्यादी आणि त्यापासून मिळणारे फळसुद्धा योगसाधनेचे फळ जे भगवत्प्राप्ती, ते देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दांभिक माणसाने केलेली लोकोपयोगी किंवा यज्ञयागादी कर्मे कल्याणकारी होत नाहीत, उलट अनर्थकारक फळ देतात. (२९)
यश्चित्तविजये यत्तः स्यात् निसंगोऽपरिग्रहः ।
एको विविक्तशरणो भिक्षुर्भैक्ष्यमिताशनः ॥ ३० ॥
मनाला जिंकिणे त्याने आसक्ती नी परीग्रहा । त्यागिता घेइ संन्यास एकांती राहणे सदा । भिक्षावृत्ती धरोनीया मिताहारचि भक्षिणे ॥३०॥
यः चित्तविजये यत्तः - जो मन जिंकण्याविषयी उद्युक्त आहे - [सः] निःसंगः - तो सर्वसंगपरित्यागी, - अपरिग्रहः - कसलाही संग्रह न करणारा - एकः विविक्तशरणः - एकटा व एकांतात राहणारा - भिक्षुः भिक्षामिताशनः स्यात् - भिक्षेचे नेमके अन्न खाणारा असा संन्यासी असावा. ॥ ३० ॥
जो आपल्या मनावर विजय मिळवू इच्छितो, त्याने आसक्ती आणि संग्रह यांचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा. एकांतात एकट्यानेच राहावे आणि भिक्षेवर मिळलेले मर्यादित भोजन करावे. (३०)
देशे शुचौ समे राजन् संस्थाप्यासनमात्मनः ।
स्थिरं सुखं समं तस्मिन् आसीतर्ज्वङ्ग ओमिति ॥ ३१ ॥
राजा ! आसन मेळावे समान पाहुनी भुमी । स्वल्प नी स्थिर भावाने ॐकारा जपणे तये ॥३१॥
राजन् - हे राजा - शुचौ समे देशे - शुद्ध व सपाट प्रदेशात - आत्मनः स्थिरं समं - आपले न हालणारे, सपाट - सुखं आसनं संस्थाप्य - व सुखकर आसन स्थापन करून - तस्मिन् - त्यावर - ऋज्वंगः - सरळ शरीर धारण करून - ओं इति (जपन्) आसीत् - ओम् ह्या मंत्राचा उच्चार करीत बसावे. ॥ ३१ ॥
राजा ! पवित्र आणि सपाट जमिनीवर आपले आसन अंथरावे आणि त्यावर सुखावह रीतीने ताठ व स्थिर बसून ॐकाराचा जप करावा. (३१)
प्राणापानौ सन्निरुन्ध्यात् पूरकुम्भकरेचकैः ।
यावन् मनस्त्यजेत् कामान् स्वनासाग्रनिरीक्षणः ॥ ३२ ॥
संकल्प नि विकल्पांना जर ना सोडिते मन । पूरके कुंभके प्राण अपानी गति रोधणे ॥३२॥
यावत् मनः कामान् त्यजेत् - जोपर्यंत मन विषयेच्छा सोडील - स्वनासाग्रनिरीक्षणः - आपल्या नाकाच्या टोकाचे निरीक्षण करीत - पूरकुंभकरेचकैः - पूरक, कुंभक व रेचक यांनी - प्राणापानौ संनिरुध्यात्ः - प्राण व अपान ह्यांचा निरोध करीत बसावे. ॥ ३२ ॥
जोपर्यंत मन विषयांपासून परावृत्त होत नाही, तोपर्यंत नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून, पूरक, कुंभक आणि रेचक करून प्राणायाम करावा. (३२)
यतो यतो निःसरति मनः कामहतं भ्रमत् ।
ततस्तत उपाहृत्य हृदि रुन्ध्याच्छनैर्बुधः ॥ ३३ ॥
कामघायाळ ते चित्त भटके दूर दूर ते । तेथुनी परती आणा हळू रोधा तया हृदीं ॥३३॥
बुधः - ज्ञानी मनुष्याने - कामहतं भ्रमत् मनः - इच्छांनी ताडिलेले व भ्रमण करणारे मन - यतः यतः निःसरति - जेथून जेथून बाहेर पडेल - ततः ततः शनैःउपाहृत्य - तेथून तेथून हळू हळू आणून - (ततः) हृदि रुंध्यात् - ते हृदयात कोंडून ठेवावे. ॥ ३३ ॥
बुद्धिमान माणसाने कामनांच्या आवेगाने भटकणारे चित्त जेथे जेथे जाईल, तेथून तेथून त्याला परत खेचून आणून हळू हळू हृदयात स्थिर करावे. (३३)
एवं अभ्यस्यतश्चित्तं कालेनाल्पीयसा यतेः ।
अनिशं तस्य निर्वाणं याति अनिन्धन वह्निवत् ॥ ३४ ॥
इंधने सरती तेंव्हा अग्नि तो शांत होतसे । थोड्या त्या समयामाजी चित्त तै शांत होतसे ॥३४॥
एवं अनिशं अभ्यसतः - याप्रमाणे नेहमी अभ्यास करणार्या - तस्य यतेः चित्तं - त्या योग्याचे मन - अल्पीयसा कालेन - अगदी थोडया दिवसात - अनिन्धनवह्वित् निर्वाणं याति - काष्ठरहित अग्नीप्रमाणे शांतीस प्राप्त होते. ॥ ३४ ॥
जेव्हा साधक नेहमी अशा प्रकारे अभ्यास करतो, तेव्हा इंधन न मिळालेला अग्नी जसा विझून जातो, त्याप्रमाणे थोड्याच काळात त्याचे चित्त शांत होते. (३४)
कामादिभिः अनाविद्धं प्रशान्ताखिलवृत्ति यत् ।
चित्तं ब्रह्मसुखस्पृष्टं नैवोत्तिष्ठेत कर्हिचित् ॥ ३५ ॥
कामाच्या जखमा आणि वृत्तीही शांत होत त्या । ब्रह्मानंदास ते चित्त स्पर्शिता मागुती न ये ॥३५॥
कामादिभिः अनाविद्धं - कामक्रोधादिकांनी न चालविलेले - ब्रह्मसुखस्पृष्टं - ब्रह्मसुखाचा स्पर्श झालेले - प्रशांताखिलवृत्ति - व ज्यांच्या संपूर्ण वृत्ती शांत झाल्या आहेत असे - यत् चित्तं - जे चित्त - (तत्) कर्हिचित् न एव उत्तिष्ठेत - ते कधीही विक्षेप पावतच नाही. ॥ ३५ ॥
अशा प्रकारे जेव्हा कामादी विकार उत्पन्न न झाल्यामुळे सर्व वृत्ती अत्यंत शांत होतात, तेव्हा चित्ताला ब्रह्मानंदाचा स्पर्श होतो. पुन्हा ते कधीही विकारयुक्त होत नाही. (३५)
यः प्रव्रज्य गृहात्पूर्वं त्रिवर्गावपनात् पुनः ।
यदि सेवेत तान्भिक्षुः स वै वान्ताश्यपत्रपः ॥ ३६ ॥
गृहस्थीधर्म सोडोनी पुन्हा इच्छी यती असा । उलटे श्वान नी खाय निर्लज्ज यति तो तसा ॥३६॥
यः भिक्षुः - जो संन्यासी - पूर्वं - प्रथम - त्रिवर्गावपनात् - तीन पुरुषार्थांचे उत्पत्तिस्थान - गृहात् प्रव्रज्य (गच्छति) - अशा घरातून बाहेर पडून जातो - (सः) पुनः यदि तान् सेवेत - तो पुनः जर त्यांचा स्वीकार करील - (तहिं) सः वै वांताशी अपत्रपः स्यात् - तर तो खरोखर ओकलेले खाणारा निर्लज्ज समजावा. ॥ ३६ ॥
जो संन्यासी अगोदर धर्म, अर्थ आणि कामाचे मूळ कारण असलेल्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून पुन्हा त्यांचे सेवन करतो, तो निर्लज्ज आपणच ओकलेले पुन्हा खातो. (३६)
यैः स्वदेहः स्मृतोऽनात्मा मर्त्यो विट्कृमिभस्मवत् ।
ते एनं आत्मसात् कृत्वा श्लाघयन्ति ह्यसत्तमाः ॥ ३७ ॥
अनात्मा मर्त्य हा देह राख विष्ठा कृमी जसा । मानिता मागुती मानी आत्मा देहास तो पुन्हा ॥३७॥
यैः स्वदेहः - ज्यांनी आपला देह - अनात्मा मर्त्यः - अनात्मा, मरणधर्मी, - विट्कृमिभस्मसात् स्मृतः - विष्ठा, कृमि व भस्म होण्याच्या योग्यतेचा मानिला - ते यदि एवं - ते जर याला - आत्मसात् कृत्वा श्लाघयंति - आपलासा करून गौरवतील - हि असत्तमाः - खरोखर नीच. ॥ ३७ ॥
जे आपल्या शरीराला अनात्मा, नाशिवंत आणि विष्ठा, कृमी तसेच राख समजले होते, तेच मूर्ख पुन्हा त्याला आत्मा समजून त्याची प्रशंसा करू लागतात. (३७)
गृहस्थस्य क्रियात्यागो व्रतत्यागो वटोरपि ।
तपस्विनो ग्रामसेवा भिक्षोरिन्द्रियलोलता ॥ ३८ ॥ आश्रमापसदा ह्येते खल्वाश्रमविडम्बकाः । देवमायाविमूढान् तान् उपेक्षेतानुकम्पया ॥ ३९ ॥
गृहस्थ कर्मत्यागी नी व्रतत्यागी बटू असा । ग्रामी राही तपस्वी नी लोभी संन्यासि चार हे ॥३८॥ आश्रमा डाग तो आहे व्यर्थ ढोंग असे पहा । मोहीत भगवत्माये उपेक्षा नित्य त्याजला ॥३९॥
गृहस्थस्य क्रियात्यागः - गृहस्थाने कर्ममार्ग सोडणे - बटोः अपि व्रतत्यागः - ब्रह्मचार्याने व्रते सोडणे - तपस्विनः ग्रामसेवा - वानप्रस्थाने गावात येऊन राहणे - भिक्षोः च इंद्रियलौल्यता - आणि संन्याशाचा इंद्रियसुखाकडे ओढा असणे - एतत् अनर्थावहं अस्ति - हे अनर्थाला कारण होते. ॥ ३८ ॥ एते हि - खरोखर असे लोक - आश्रमापसदाः आश्रमविडंबकाः खलु (सन्ति) - निःसंशय आश्रमास नीचपणा आणणारे व आश्रमाचे सोंग घेणारे होत - तान् देवमायाविमूढान् - देवाच्या मायेने मोहित झालेल्या त्यांना - अनुकंपया उपेक्षेत - कीव करून उपेक्षावे. ॥ ३९ ॥
कर्माचा त्याग केलेले गृहस्थाश्रमी, व्रतांचा त्याग केलेले ब्रह्मचारी, गावात राहणारा वानप्रस्थ आणि इंद्रियलोलुप संन्यासी हे चारही आश्रमांना कलंकभूत आहेत आणि आश्रमांचे विनाकारण ढोंग करतात. भगवंतांच्या मायेने मोहित झालेल्या त्या मूर्खांची कीवच केली पाहिजे. (३८-३९)
आत्मानं चेद् विजानीयात् परं ज्ञानधुताशयः ।
किमिच्छन्कस्य वा हेतोः देहं पुष्णाति लम्पटः ॥ ४० ॥
ज्ञानाने जाळिता इच्छा आत्मरूपासि जाणिले । कसा पोषिल तो देहा वासना भोगण्या पुन्हा ॥४०॥
ज्ञानधुताशयः - ज्ञानाने ज्याचे चित्त निर्मळ झाले आहे असा मनुष्य - परं आत्मानं विजानीयात् चेत् - जर श्रेष्ठ आत्म्याला जाणील - (तर्हि) लंपटः किं इच्छन् - तर तो लंपट होऊन काय इच्छील - कस्य वा हेतोः - अथवा कोणत्या कारणाकरिता - देहं पुष्णाति - देहाला पोशील. ॥ ४० ॥
आत्मज्ञानाने ज्याच्या सर्व वासना नष्ट झाल्या आहेत आणि ज्याने आपल्या आत्म्याला परब्रह्मस्वरूप जाणले आहे, तो कोणत्या इच्छेने आणि कशासाठी इंद्रियांच्या अधीन होऊन आपल्या शरीराचे पोषण करील ? (४०)
आहुः शरीरं रथमिन्द्रियाणि
हयानभीषून् मन इन्द्रियेशम् । वर्त्मानि मात्रा धिषणां च सूतं सत्त्वं बृहद्बन्धुरमीशसृष्टम् ॥ ४१ ॥ अक्षं दशप्राणमधर्मधर्मौ चक्रेऽभिमानं रथिनं च जीवम् । धनुर्हि तस्य प्रणवं पठन्ति शरं तु जीवं परमेव लक्ष्यम् ॥ ४२ ॥
(इंद्रवज्रा) इंद्रीय घोडे रथ हे शरीर लगाम चित्तो मति सारथी ती । आरे दहा त्या रथचक्रि जाणा अधर्म धर्मो तयि चक्र दोन ॥४१॥ रथात गर्वी जीव बैसलेला ॐकार हाती धनु-बाण आत्मा । रथी तयाचे असु लक्ष ईश तयात त्याला करणे विलीन ॥४२॥
शरीरं रथं आहुः - शरीराला रथ म्हणतात - इंद्रियाणि हयान् - इंद्रियांना घोडे - इंद्रियेशं मनः अभीषून् - इंद्रियांचा स्वामी जे मन त्याला लगाम - मात्रा वर्त्मानि - शब्दादि विषयांना मार्ग - धिषणां सूतं - बुद्धीला सारथी - ईशसृष्टं च सत्त्वं बुहद्वंधुरं (आहुः) - आणि ईश्वराने निर्माण केलेल्या चित्ताला मोठे जोखड म्हणतात. ॥ ४१ ॥ दशप्राणं अक्षं पठन्ति - दहा प्राणांना रथाचा आस म्हणतात - अधर्मधर्मौ चक्रे - अधर्म व धर्म यांना दोन चाके म्हणतात - अभिमानं जीवं रथिनं - अहंकारवान जीवाला रथात बसणारा - च हि - आणि शिवाय - प्रणवं तस्य धनुः - ओंकाराला त्याचे धनुष्य - जीवं तु शरं - शुद्ध जीवाला तर बाण - परं एव लक्ष्यं (पठंति) - परब्रह्माला वेधण्याचे ठिकाण म्हणतात. ॥ ४२ ॥
उपनिषदांमध्ये असे सांगितले आहे – शरीर रथ आहे, इंद्रिये घोडे आहेत, इंद्रियांचा स्वामी मन लगाम आहे, शब्दादी विषय रस्ता आहे, बुद्धी सारथी आहे, चित्त हेच भगवंतांनी निर्माण केलेली बांधण्याची मोठी दोरी आहे. दहा प्राण धुरा आहेत, धर्म व अधर्म चाके आहेत आणि यांचा अभिमानी जीव रथी म्हटला गेला आहे. ॐकार हेच त्या रथीचे धनुष्य आहे. शुद्ध जीवात्मा बाण आणि परमात्मा लक्ष्य आहे. (ह्या ॐकाराच्या जपाने अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन केले पाहिजे.) (४१-४२)
रागो द्वेषश्च लोभश्च शोकमोहौ भयं मदः ।
मानोऽवमानोऽसूया च माया हिंसा च मत्सरः ॥ ४३ ॥ रजः प्रमादः क्षुन्निद्रा शत्रवस्त्वेवमादयः । रजस्तमःप्रकृतयः सत्त्वप्रकृतयः क्वचित् ॥ ४४ ॥
(अनुष्टुप्) राग द्वेष भयो शोक लोभ मोह मदो तसे । मानापमान नी निंदा हिंसा तृष्णा प्रमाद तो ॥४३॥ भूक मत्सर हे शत्रू रजो नी तम वृत्ति ह्या । सत्वगुण प्रधानीही वृत्ती त्यां दिसती कधी ॥४४॥
रागः द्वेषः लोभः च - शोक, मोह, भय आणि मद - मानः अवमानः असूया च - मान, अपमान व द्वेष - माया हिंसा मत्सरः च - कपट हिंसा व मत्सर - रजः प्रमादः क्षुत् निद्रा - अभिमान, प्रमाद, क्षुधा व निद्रा - एवमादयः तु शत्रवः (सन्ति) - इत्यादिक तर शत्रु होत - क्वचित् रजस्तमःप्रकृतयः (सन्ति) - यातील काही रजोगुणी व काही तमःप्रकृति - (क्वचित्) सत्त्वप्रकृतयः (सन्ति) - व काही सत्त्वप्रकृति आहेत. ॥ ४३-४४ ॥
राग, द्वेष, लोभ, शोक, मोह, भय, मद, मान, अपमान, दुसर्यांच्या गुणांमध्ये दोष पाहाणे, कपट, हिंसा, मत्सर, दुराग्रह, प्रमाद, भूक आणि निद्रा हे आणि असेच अनेक जीवांचे शत्रू आहेत. त्यांमध्ये रजोगुण आणि तमोगुणप्रधान वृत्ती प्रबळ शत्रू आहेत. काही सत्त्वगुणप्रधान वृत्तीसुद्धा शत्रू असतात. (४३-४४)
यावन्नृकायरथमात्मवशोपकल्पं
धत्ते गरिष्ठचरणार्चनया निशातम् । ज्ञानासिमच्युतबलो दधदस्तशत्रुः स्वानन्दतुष्ट उपशान्त इदं विजह्यात् ॥ ४५ ॥
(वसंततिलका) अंकीत हा रथ असे अन ठाकठीक तेणे गुरूपद भजो अन ज्ञानशस्त्रे । शत्रू समस्त करणे मग नष्ट तेंव्हा सिंहासनास बसणे मग देहत्याग ॥४५॥
आत्मवशोपकल्पं - आपल्या अधीन आहे साहित्य ज्याचे असा - नृकायरथं यावत् धत्ते - मनुष्यदेहरूप रथ जोवर मनुष्य धारण करीत आहे - गरिष्ठचरणार्चनया - महासाधूंच्या चरणांच्या सेवेने - निशातं ज्ञानासिं दधत् - तीक्ष्ण झालेली ज्ञानरूपी तलवार धारण करीत - अच्युतबलः - परमेश्वर आहे बळ ज्याचे - अस्तशत्रुः - व नाहीसे झाले आहेत शत्रु ज्याचे असा - उपशांतः स्वाराज्यतुष्टः (भूत्वा) - शांत व ब्रह्मानंदाने संतुष्ट झालेला असा होऊन - इदं विजह्यात् - ह्या शरीरादिकांचा त्याग करावा. ॥ ४५ ॥
हा मनुष्य शरीररूप रथ जोपर्यंत आपल्या स्वाधीन आहे आणि सर्व इंद्रिये कार्यरत आहेत, तोपर्यंत श्रीगुरुदेवांच्या चरणकमलांच्या सेवेने धारदार केलेल्या ज्ञानाची तीक्ष्ण तलवार घेऊन भगवंतांच्या बळावर या शत्रूंचा नाश करून स्वराज्यसिंहासनावर विराजमान व्हावे आणि नंतर अत्यंत शांतपणे या शरीराचासुद्धा त्याग करावा. (४५)
नोचेत् प्रमत्तमसदिन्द्रियवाजिसूता
नीत्वोत्पथं विषयदस्युषु निक्षिपन्ति । ते दस्यवः सहयसूतममुं तमोऽन्धे संसारकूप उरुमृत्युभये क्षिपन्ति ॥ ४६ ॥
थोडा प्रमाद घडता मग दुष्ट घोडे नी सारथी उलट नि लुट-मार जेथे । ते चोरटे धरिती अश्व नि सारथ्याला मृत्यूसमान तमकूपिच टाकति की ॥४६॥
नो चेत् - नाही तर - असदिंद्रियवाजिसूताः - दुष्ट इंद्रियरूप घोडे व सारथी - प्रमत्तं उत्पथं नीत्वा - बेसावध मनुष्याला आडमार्गाला नेऊन - विषयदस्युषु निक्षिपंति - विषयरूपी चोरवस्तीत फेकून देतात - ते दस्यवः - ते चोर - अमुं सहयसूतं - ह्याला घोडे व सारथी यांसह - तमोंधे उरुमृत्यूभये - ज्यात मृत्यूचे मोठे भय आहे अशा अज्ञानांधकाराने - संसारकूपे क्षिपंति - भरलेल्या संसाररूप कूपात लोटितात. ॥ ४६ ॥
अन्यथा बेसावध जीवाला हे इंद्रियरूप दुष्ट घोडे आणि दुर्बुद्धिरूप सारथी भलत्याच रस्त्याने घेऊन जाऊन विषयरूप लुटारूंच्या हातात देतील. ते चोर, सारथी आणि घोड्यांसहित या जीवाला, मृत्यूचे अत्यंत भय असणार्या घोर अंधकारमय संसाराच्या विहीरीत ढकलून देतील. (४६)
प्रवृत्तं च निवृत्तं च द्विविधं कर्म वैदिकम् ।
आवर्तते प्रवृत्तेन निवृत्तेनाश्नुतेऽमृतम् ॥ ४७ ॥
(अनुष्टुप्) प्रवृत्ती नी निवृत्ती हे दो मार्ग वेदकर्मिचे । प्रवृत्तीने पुन्हा जन्म नी निवृत्तीत मोक्ष तो ॥४७॥
प्रवृत्तं च निवृत्तं - प्रवृत्त आणि निवृत्त असे - द्विविधं वैदिकं कर्म (अस्ति) - दोन प्रकारचे वैदिक कर्म आहे - प्रवृत्तेन आवर्तेत - प्रवृत्तीमार्गाने पुनःपुन्हा संसारात परत येतो - निवृत्तेन च अमृतं अश्र्नुते - आणि निवृत्तिमार्गाने मोक्षसुख भोगतो. ॥ ४७ ॥
वैदिक कर्मे दोन प्रकारची असतात. प्रवृत्तिपर व निवृत्तिपर. प्रवृत्तिपर कर्ममार्गाने संसाराची येरझार चालू राहाते आणि निवृत्तिपर ज्ञान किंवा भक्तिमार्गाने मोक्षप्राप्ती होते. (४७)
हिंस्रं द्रव्यमयं काम्यं अग्निहोत्राद्यशान्तिदम् ।
दर्शश्च पूर्णमासश्च चातुर्मास्यं पशुः सुतः ॥ ४८ ॥ एतदिष्टं प्रवृत्ताख्यं हुतं प्रहुतमेव च । पूर्तं सुरालयाराम कूपाजीव्यादिलक्षणम् ॥ ४९ ॥
हिंसाद्रव्यमयी याग अग्निहोत्र नि दर्श ते । चातुर्मास्य पूर्णमास्य पशू सोमादि यागहि ॥४८॥ मंदिरे बगिचे प्याऊ पूर्तकर्मचि मानणे । सकामयुक्त ते सर्व अशांती मिळते तये ॥४९॥
हिंस्रं - श्येनयागादि हिंस्र कर्म - द्रव्यमयं अग्निहोत्रादि - व ज्यामुळे द्रव्य पुष्कळ लागते असे अग्निहोत्रादि - दर्शः पूर्णमासः च - दर्श व पूर्णमास याग - काम्यं अशांतिदं - हे सर्व कामनायुक्त व शांति न देणारे आहे - चातुर्मास्यः पशुः सुतः च - चातुर्मास्य याग, पशुयाग व सोमयाग. - एतत् प्रवृत्ताख्यं - हे प्रवृत्तिमार्गातील कर्म - हुतं प्रहुतं च एव - तसेच वैश्वदेव व बलिहरण - इष्टं (अस्ति) - इष्टनामक कर्म होय - सुरालयाराम - देवालय बांधणे, बागबगीचे करणे, - कूपाजीव्यादिलक्षणं पूर्तं (स्यात्) - विहीरी बांधणे, पाणपोई घालणे इत्यादि प्रकारचे कर्म पूर्त कर्म होय. ॥ ४८-४९ ॥
श्येनयागादी हिंसामय याग, अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, पशुयाग, सोमयाग, वैश्वदेव, बलिहरण इत्यादी द्रव्यमय कर्मांना ’इष्ट’ म्हटले जाते आणि देवालय, बगीचे, विहीरी बांधणे, पाणपोई घालणे यांसारखी लोकोपयोगी कामे ही ’पूर्तकर्मे’ होत. ही सर्व प्रवृत्तिपर काम्यकर्मे आहेत. आणि ती अशांतीला कारण ठरतात. (४८-४९)
द्रव्यसूक्ष्मविपाकश्च धूमो रात्रिरपक्षयः ।
अयनं दक्षिणं सोमो दर्श ओषधिवीरुधः ॥ ५० ॥ अन्नं रेत इति क्ष्मेश पितृयानं पुनर्भवः । एकैकश्येनानुपूर्वं भूत्वा भूत्वेह जायते ॥ ५१ ॥
प्रवृत्तीपर तो जीव धूमाभिमानि देवता- । पासानि फिरूनी जातो चंद्रलोकात राहण्या ॥५०॥ संपता भोग ते सर्व क्षीण होवोनि वृष्टित । औषधी अन्नरूपाने वीर्यमार्गेचि जन्मतो ॥५१॥
क्ष्मेश - हे पृथ्वीपते - द्रव्यसूक्ष्मविपाकः च धूमः - होमद्रव्याचा सूक्ष्म परिणाम जो धूम - रात्रिः - रात्र - अपक्षयः - कृष्णपक्ष - दक्षिणं अयनं - दक्षिणायन - सोमः दर्शः ओषधीवीरुधः - चंद्र, दर्श, औषधि व वनस्पती - अन्नं रेतः - अन्न व रेत - इति (अयम्) - असा हा - पुनर्भवः पितृयानः - पुनः जन्म देणारा पितृमार्ग होय - एकैकश्येन अनुपूर्वं - प्रवृत्तिमार्गाने जाणारा क्रमाक्रमाने प्रत्येक - भूत्वा भूत्वा इह जायते - स्थानाजवळ जाऊन पुनः या भूमीवर जन्मास येतो. ॥ ५०-५१ ॥
हे राजा, मेल्यावर प्रवृत्तिमार्गी पुरुष चरू, पुरोडाश इत्यादी द्रव्यांच्या सूक्ष्म भागांपासून बनलेले शरीर धारण करून धूमाभिमानी देवतांच्या जवळ जातो. नंतर तेथून अनुक्रमे रात्र, कृष्णपक्ष आणि दक्षिणायन यांच्या अभिमानी देवतांजवळ जाऊन चंद्रलोकात जाऊन पोहोचतो. तेथून पुण्यभोग भोगून झाल्यावर त्याचा तेथील देह नाहीसा होऊन पावसाच्या वृष्टीतून त्याचा सूक्ष्म देह अनुक्रमे वनस्पती, अन्न आणि वीर्य यांच्या रूपांत परिणत होऊन पितृयानमार्गाने पुन्हा या लोकात जन्म घेतो. अशा रीतीने त्याच्या पुण्यकर्मानुसार त्या त्या लोकांत जाऊन पुण्यभोग संपल्यावर पुन्हा पुन्हा जन्म घेतो. (५०-५१)
निषेकादिश्मशानान्तैः संस्कारैः संस्कृतो द्विजः ।
इन्द्रियेषु क्रियायज्ञान् ज्ञानदीपेषु जुह्वति ॥ ५२ ॥ इन्द्रियाणि मनस्यूर्मौ वाचि वैकारिकं मनः । वाचं वर्णसमाम्नाये तमोंकारे स्वरे न्यसेत् । ओंकारं बिन्दौ नादे तं तं तु प्राणे महत्यमुम् ॥ ५३ ॥ अग्निः सूर्यो दिवा प्राह्णः शुक्लो राकोत्तरं स्वराट् । विश्वोऽथ तैजसः प्राज्ञः तुर्य आत्मा समन्वयात् ॥ ५४ ॥ देवयानं इदं प्राहुः भूत्वा भूत्वानुपूर्वशः । आत्मयाज्युपशान्तात्मा ह्यात्मस्थो न निवर्तते ॥ ५५ ॥
ज्यांचे सोळाहि संस्कार होती ते द्विज जाणणे । इष्टपूर्तक्रियायज्ञां हविती इंद्रियात ते ॥५२॥ इंद्रियांना मनामध्ये मनाला वाणिच्या मधे । वर्णात वाणिला तैसे वर्णाला त्या अउम् मध्ये । ॐकारा स्थिरबिंदूत बिंदुनादात नाद तो । प्राणात सूत्र रूपाने प्राण ब्रह्मात लीन हो ॥५३॥ अग्नी सूर्या दिने सायं शुक्ले नी उत्तरायणी । देवता अभिमानीच्या कडोनी ब्रह्मलोक नी । पुढे विश्वीं पुढे तेजी निवृत्तीनिष्ठ जातसे । प्राज्ञ होतो पुढे तैसा साक्षीचा सर्वव्यापकू । दृश्य लोप असा आत्मा तुरीया मोक्ष मेळवी ॥५४॥ देवयान असा मार्गी आत्मोपासक यामुळे । ब्रह्मलोका मधे जातो येतो मृत्युसि तो पुन्हा ॥५५॥
निषेकादिश्मशानान्तैः संस्कृतः - गर्भधानापासून अंत्येष्टीपर्यंत संस्कारांनी युक्त झालेला - द्विजः (स्यात्) - ब्राह्मण होय - ज्ञानदीपेषु इंद्रियेषु - ज्ञानाने उद्दीपित झालेल्या इंद्रियांमध्ये - क्रियायज्ञान् जुह्वति - क्रियायज्ञांचा होम करितात ॥ ५२ ॥ इंद्रियाणि मनसि (न्यसेत्) - इंद्रियांचा मनामध्ये लय करावा - वैकारिकं मनः वाचि - विकारी अशा मनाचा वाणीमध्ये - वाचं वर्णसमाम्नाये - वाणीचा वर्णसमूहात - तं स्वरे ओंकारे - वर्णसमूहाचा त्रिवर्णरूप ओंकारात - ओंकारं बिंदौ - ओंकाराच्या बिंदूत - तं नादे - त्या बिंदूच्या नादामध्ये - तं तु प्राणे (न्यसेत्) - त्या नादाचा परब्रह्मरुपी लय करावा ॥ ५३ ॥ अग्नीः सूर्यः - अग्नि, सूर्य - दिवा प्राहूणः - दिवस, प्रातःकाल - शुक्लः राका - शुक्लपक्ष, पूर्णिमा - उत्तरं स्वराट् - उत्तरायण अशा मार्गाने - विश्वः च तैजसः प्राज्ञः - आणि तेथे विश्व, तेजस व प्राज्ञ ही स्वरुपे घेतो - समन्वयात् तुर्यः आत्मा - एकरुप झाल्यावर चौथा जो आत्मा तोच तो ॥ ५४ ॥ इदं देवयानं प्राहुः - ह्याला देवांचा मार्ग म्हणतात - हि अनुपूर्वशः भूत्वा भूत्वा - कारण क्रमाक्रमाने उत्पन्न होऊन - आत्मयाजी उपशांतात्मा आत्मस्थः - आत्म्याचा उपासक, शांत मनाचा व आत्मनिष्ठ पुरुष - न निवर्तते - पुनः संसारात येत नाही ॥ ५५ ॥
गर्भधानापासून अंत्येष्टीपर्यंतच्या सर्च संस्कारांनी युक्त असलेला निवृत्तिमार्गी द्विज सर्व द्रव्ययज्ञांचे ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या इंद्रियांमध्ये हवन करतो. इंद्रियांना दर्शनादिसंकल्परूप मनामध्ये, मनाला परा वाणीमध्ये आणि परा वाणीला वर्णसमुदायांमध्ये, वर्णसमुदायाला ’अ उ म’ या तीन स्वरांच्या रूपात राहणार्या ॐकारामध्ये, ॐकाराला बिंदूमध्ये, बिंदूला नादामध्ये, नादाला सूत्रात्मारूप प्राणामध्ये आणि प्राणाला ब्रह्मामध्ये लीन करतो. अशा रीतीने तो निवृत्तिनिष्ठ ज्ञानी अनुक्रमे अग्नी, सूर्य, दिवस, मध्याह्न, शुक्लपक्ष, पौर्णिमा आणि उत्तरायणाच्या अभिमानी देवतांच्याजवळ जाऊन ब्रह्मलोकात पोहोचतो आणि तेथील भोग समाप्त झाल्यावर तो स्थूल उपाधियुक्त असलेले ’विश्व’ शरीर सूक्ष्मामध्ये विलीन करून सूक्ष्म उपाधियुक्त ’तैजस’ होतो. नंतर सूक्ष्म उपाधीचा कारणशरीरामध्ये लय करून कारणोपाधिक ’प्राज्ञ’ होतो. नंतर त्या शरीराचा लय करून ’तुरीय’ रूपात राहातो. अशा प्रकारे दृश्यांचा लय झाल्यानंतर तो शुद्ध आत्माच राहतो. हेच मोक्षपद होय. याला देवयान मार्ग म्हणतात. या मार्गाने जाणारा आत्म्याचा उपासक अनुक्रमे एका देवतेकडून दुसर्या देवतेकडे जात ब्रह्मलोकात जातो आणि तेथे आपल्या स्वरूपात स्थित होतो. तो पुन्हा जन्माला येत नाही. (५२-५५)
ये एते पितृदेवानां अयने वेदनिर्मिते ।
शास्त्रेण चक्षुषा वेद जनस्थोऽपि न मुह्यति ॥ ५६ ॥
पितृ-देवो द्वयो यान वेदोक्त मार्ग हे असे । तत्वाला जाळिले ज्याने तो ना मोहात गुंततो ॥५६॥
वेदनिर्मिते एते - वेदांनी निर्माण केलेले हे - पितृदेवानां अयने - पितर व देव यांचे दोन मार्ग - शास्त्रेण चक्षुषाः यः वेद - शास्त्रदृष्टीने जो जाणतो - जनस्थः अपि - लोकांत वागूनही - न मुह्यति - मोह पावत नाही ॥ ५६ ॥
पितृयान आणि देवयान हे दोन्हीही वेदाने सांगितलेले मार्ग आहेत. जो यांना शास्त्ररूप दृष्टीने जाणतो, तो शरीरात राहूनही मोहित होत नाही. (५६)
आदौ अन्ते जनानां सद् बहिरन्तः परावरम् ।
ज्ञानं ज्ञेयं वचो वाच्यं तमो ज्योतिस्त्वयं स्वयम् ॥ ५७ ॥
जन्मता कारणीरूपे मरता अवधीरूपे । भोगरूपेचि बाहेर भोक्तारूपात आत तो । विषयां विषयो तोची तत्ववेत्ता स्वयंहि तो । तमांधकारही तोची मोहाचा स्पर्श ना तया ॥५७॥
जनानां आदौ अंते सत् - जनांच्या प्रारंभी व अंती असणारे - बहिः अंतः परावरं - बाहेर, आत, उच्च व नीच - ज्ञानं ज्ञेयं - ज्ञान व ज्ञानाचा विषय - वचः वाच्यं - भाषण व भाषणाचा विषय - तमः ज्योतिः - अप्रकाश व प्रकाश - (एतत् सर्वं) स्वतः तु अयं अस्ति - ही सर्व हा स्वतःच होय ॥ ५७ ॥
जो उत्पन्न होणार्या शरीरांच्या आधी व शेवटी असतो, जो विषयरूपाने बाहेर आणि भोक्तारूपाने आत असतो, तसेच कारण व कार्य, जाणणे आणि जाणण्याचा विषय, वाणी आणि वाणीचा विषय, अंधार आणि प्रकाश इत्यादी वस्तूंच्या रूपामध्ये सर्व काही हा तत्त्ववेत्ताच असतो. (म्हणूनच मोह त्याला स्पर्श करू शकत नाही.) (५७)
आबाधितोऽपि ह्याभासो यथा वस्तुतया स्मृतः ।
दुर्घटत्वाद् ऐन्द्रियकं तद्वदर्थविकल्पितम् ॥ ५८ ॥
अस्तित्व नसता त्याला तरी वस्तूत तो दिसे । असंभव असोनीया सत्याच्या परि भासतो ॥५८॥
यथा हि आबाधितः अपि आभासः - जसे खरोखर खोटे ठरलेले प्रतिबिंबसुध्दा - वस्तुतया स्मृतः - वस्तुरुपाने प्रतीतीला येते - तद्वत् ऐंद्रियकं - त्याप्रमाणे इंद्रियांचे विषय - दुर्घटत्वात् - वास्तविकपणे असणे कठिण असल्यामुळे - अर्थविकल्पितं (अस्ति) - वस्तुरुपाने कल्पिलेले आहेत ॥ ५८ ॥
आरसा इत्यादींमध्ये दिसणारे प्रतिबिंब विचार आणि युक्ती यांनी बाधित होऊनही सत्य वाटते, त्याचप्रमाणे इंद्रियांना दिसणार्या वस्तू सत्य नाहीत, हे विचार, युक्ती आणि आत्मानुभव यांनी सिद्ध होऊनसुद्धा खर्या वाटतात. (५८)
क्षित्यादीनामिहार्थानां छाया न कतमापि हि ।
न सङ्घातो विकारोऽपि न पृथङ् नान्वितो मृषा ॥ ५९ ॥
नसे तो पंचभूतांचा विकार त्याजला नसे । असे नसे असा होय मिथ्या तो म्हणुनी असे ॥५९॥
इह अर्थानां - ह्या विश्वात देहादि पदार्थांमध्ये - क्षित्पादीनां छाया - पृथिव्यादिकांच्या ऐक्यबुद्धीला आधार शरर आदि आहे असे - कतमा अपि न - कोणत्याही प्रकारे संभवत नाही - हि संघातः न अपि विकारः - अथवा कार्यावयवीही संभवत नाही - न पृथक् - पंचमहाभूतांपासून वेगळेही नाही - न अन्वितः मृषा - व युक्तही संभवत नाही म्हणून खोटे होय ॥ ५९ ॥
या शरीराची निर्मिती पृथ्वी वगैरे पंचमहाभूतांपासून झालेली नाही. तसेच ते त्या पंचमहाभूतांचा समूह नाही, की परिणामही नाही; ते आपल्या अवयवांपासून वेगळे नाही की त्यांनी युक्त नाही, म्हणून ते मिथ्या आहे. (५९)
धातवोऽवयवित्वाच्च तन्मात्रावयवैर्विना ।
न स्युर्ह्यसत्यवय विन्यसन् अवयवोऽन्ततः ॥ ६० ॥
पंचभूतांतुनी भिन्न नव्हेत त्यास इंद्रिये । असत् सिद्ध असा होतो स्वयंसिद्धचि होतसे ॥६०॥
धावतः च - आणि महाभूते - अवयवित्वात् - अवयवयुक्त असल्यामुळे - तन्मात्रावयवैः न स्युः - परमाणुरुपी अवयवांहून निराळी असू शकत नाहीत - अवयविनी हि असति - म्हणून अवयवी खोटे ठरल्यावर - अंततः अवयवैः असत् (स्यात्) - शेवटी अवयवहि खोटा ठरणारच ॥ ६० ॥
तशीच पंचमहाभूतेसुद्धा अवयवी असल्यामुळे त्यांच्या अवयवांपासून – सूक्ष्मभूतांपासून वेगळी नाहीत; पुष्कळ विचार केल्यानंतरही अवयवांव्यतिरिक्त अवयवीचे अस्तित्व सापडत नाही. म्हणून ते असत आहे असेच सिद्ध होते. तेव्हा हे अवयवसुद्धा असत्य आहेत, हे आपोआप सिद्ध होते. (६०)
स्यात् सादृश्यभ्रमस्तावद् विकल्पे सति वस्तुनः ।
जाग्रत्स्वापौ यथा स्वप्ने तथा विधिनिषेधता ॥ ६१ ॥
अज्ञाने एकची वस्तू विविधा भासते परी । सरता भ्रम तो एक मूळ वस्तुचि ती दिसे । मोहे भिन्नत्व ते भासे तोवरी शास्त्र हे असे ॥६१॥
तावत् वस्तुनः विकल्पे सति - अविद्या निवृत्त झाली नाही तोपर्यंत वस्तूचा भेद भासत असता - सादृश्यभ्रमः स्यात् - सारखेपणाची भूल असणारच - यथा स्वप्ने जाग्रत्स्वापौ - ज्याप्रमाणे स्वप्नातील जागेपणा किंवा झोप - तथा विधिनिषेधता (अस्ति) - त्याप्रमाणे मिथ्यासृष्टीतील विधिनिषेध सांगणारी शास्त्रे होत ॥ ६१ ॥
अज्ञानामुळे जोपर्यंत एकाच परमतत्त्वामध्ये अनेक वस्तूंचे भेद जाणवतात, तोपर्यंत सारखेपणामुळे हा भ्रम राहतो की, ज्या वस्तू अगोदर होत्या, त्याच आताही आहेत. स्वप्नात ज्याप्रमाणे जागृती, झोप इत्यादी अवस्थांचे वेगवेगळे अनुभव स्वप्न असेपर्यंत सत्य असतात, तसेच अज्ञान असेपर्यंत विधि-निषेधाचे शास्त्र असते. (६१)
भावाद्वैतं क्रियाद्वैतं द्रव्याद्वैतं तथात्मनः ।
वर्तयन् स्वानुभूत्येह त्रीन् स्वप्नान् धुनुते मुनिः ॥ ६२ ॥
भावद्वैत क्रियाद्वैत द्रव्यद्वैत अशा तिन्ही । विचारे पाहतो आत्मा साक्षात्कारी तिन्ही रूपी ॥६२॥
आत्मनः - आत्म्याचे - भावाद्वैतं - भावाद्वैत - क्रियाद्वैतं तथा द्रव्याद्वैतं - क्रियाद्वैत व तसेच द्रव्याद्वत - वर्तयन् मुनिः - मनात वागविणारा मुनी - स्वानुभूत्या इह - आत्मस्वरुपाच्या अनुभवाने ह्या संसारातील - त्रीन् स्वप्नान् धुनुते - जागृति, स्वप्न व निद्रा ह्या तीन अवस्थांना दूर करितो ॥ ६२ ॥
जे विवेकी पुरुष स्वानुभूतीने आत्म्याच्या भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत अशा त्रिविध अद्वैताचा साक्षात्कार करून घेतात, ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि द्रष्टा, दर्शन दृश्य हे भेदरूप स्वप्न असल्याचे जाणून त्याचा त्याग करतात. (६२)
कार्यकारणवस्त्वैक्य दर्शनं पटतन्तुवत् ।
अवस्तुत्वाद् अकल्पस्य भावाद्वैतं तदुच्यते ॥ ६३ ॥
दोर्याने वस्त्र ते होते कार्यमात्रचि कारण । न भेद मुळि दोघात भाव द्वैत तसाचि तो ॥६३॥
विकल्पस्य अवस्तुत्वात् - भेदाच्या खोटेपणामुळे - पटतंतुवत् - तंतु व वस्त्रं यांप्रमाणे - कार्यकारणवस्त्वैक्यमर्शनं - कार्य व कारण ह्या दोन्ही वस्तूंचे ऐक्य आहे असे पहाणे - तत् भावाद्वैतं उच्यते - ते भावाद्वैत म्हणतात ॥ ६३ ॥
वस्त्र जसे सूतरूपच असते, तसेच कार्यसुद्धा कारणरूप आहे, त्यांत भेद नाही, असे जाणणे म्हणजे ’भावाद्वैत’. (परमात्मा व विश्व एकरूप मानणे म्हणजे भावाद्वैत.) (६३)
यद्ब्रह्मणि परे साक्षात्सर्वकर्मसमर्पणम् ।
मनोवाक्तनुभिः पार्थ क्रियाद्वैतं तदुच्यते ॥ ६४ ॥
मन वाणी शरीराने घडते कर्म सर्व ते । घडते ईश इच्छेने मानणे कृष्ण अर्पण । क्रियाद्वैत यया नाम जाणणे रे युधिष्ठिरा ॥६४॥
पार्थ - हे धर्मा - मनोवाक्तनुभिः साक्षात् - मन, वाणी व शरीर याच्या योगे प्रत्यक्ष - परे ब्रह्मणि - परब्रह्माच्या ठिकाणी - यत् सर्वं कर्मसमर्पणं - जे सर्व कर्मांचे समर्पण करणे - तत् क्रियाद्वैतं उच्यते - त्याला क्रियाद्वैत म्हणतात ॥ ६४ ॥
युधिष्ठिरा ! मन, वाणी आणि शरीराने होणारी सर्व कर्मे स्वत: परमात्म्यामध्येच होत आहेत, हा भाव ठेऊन सर्व कर्मे त्याला समर्पण करणे हे ’क्रियाद्वैत’ होय. (६४)
आत्मजायासुतादीनां अन्येषां सर्वदेहिनाम् ।
यत्स्वार्थकामयोरैक्यं द्रव्याद्वैतं तदुच्यते ॥ ६५ ॥
स्त्रिया पुत्र सखे स्नेही समस्त प्राणियांचिये । स्वार्थ नी भोग ते एक द्रव्य द्वैत असा असे ॥६५॥
आत्मजायासुतादीनां - स्वतः व स्त्रीपुत्रादिक यांच्या - अन्योषां सर्वदेहिनां - आणि इतर सर्व प्राण्यांच्या - यत् स्वार्थकामयोः ऐक्यं - स्वार्थाशी व कामाशी जे ऐक्य - तत् द्रव्याद्वैतं उच्यते - त्याला द्रव्याद्वैत म्हणतात. ॥ ६५ ॥
स्वत:, स्त्री-पुत्रादी नातलग व इतर सर्व प्राणी यांचे स्वार्थ व भोग एकच आहेत आणि त्यांचा भोक्ता जीव हाच परमात्मा आहे, या प्रकारचा विचार म्हणजे ’द्रव्याद्वैत’ होय. (६५)
यद् यस्य वानिषिद्धं स्याद् येन यत्र यतो नृप ।
स तेनेहेत कर्माणि नरो नान्यैरनापदि ॥ ६६ ॥
सन्मार्गे अर्जिणे द्रव्य सत्कार्यी सर्व वेचिणे । संकटाविण न व्हावा तयाचा संग्रहो मुळी ॥६६॥
नृप - हे राजा - यत् यस्य - जे द्रव्य ज्या वर्णाला - येन वा यत्र - ज्या उपायाने अथवा ज्या देशी व काली - यतः अनिषिद्धं (स्यात्) - ज्यासाठी निषिध्द सांगितले नसेल - तेन सः नरः - त्या द्रव्याच्या योगे त्या मनुष्याने - कर्माणि ईहेत - कर्मे करावी - अनापदि अन्यैः न (ईहते) - संकटकाल प्राप्त झाला नसता दुसर्या द्रव्यांनी कर्मे करु नयेत. ॥ ६६ ॥
युधिष्ठिरा, ज्या पुरुषाला जे द्रव्य, ज्यावेळी, ज्या उपायाने घेणे निषिद्ध नसेल, ते द्रव्य घेऊन त्याने आपली कर्मे करावीत. आपत्तिकाल वगळता यापेक्षा वेगळे काही करू नये. (६६)
एतैरन्यैश्च वेदोक्तैः वर्तमानः स्वकर्मभिः ।
गृहेऽप्यस्य गतिं यायाद् राजन् तद्भक्तिभाङ्नरः ॥ ६७ ॥
महाराजा ! हरिभक्त वेदोक्त कर्म आचरे । अथवा अन्य कार्याने घरी ही गति पावतो ॥६७॥
राजन् - हे राजा - एतैः च अन्यैः - ह्या आणि दुसर्या - वेदोक्तैः स्वकर्मभिः - वेदोक्त स्वकर्मांनी - वर्तमानः तद्भक्तिभाक् नरः - वागणारा कृष्णाचा भक्त मानव - गृहे अपि अस्य गतिं यायात् - गृहस्थाश्रमात असूनही श्रीकृष्णाच्या गतीला प्राप्त होतो. ॥ ६७ ॥
महाराज, वेदांनी सांगितलेल्या या, तसेच इतर सर्व स्वकर्मांच्या अनुष्ठानाने भगवद्भक्त मनुष्य घरात राहूनसुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करतो. (६७)
यथा हि यूयं नृपदेव दुस्त्यजाद्
आपद्गणादुत्तरतात्मनः प्रभोः । यत्पादपङ्केरुहसेवया भवान् अहारषीन् निर्जितदिग्गजः क्रतून् ॥ ६८ ॥
(इंद्रवज्रा) युधिष्ठिरा ! तू तव स्वामि कृष्ण कृपेमुळे संकट पार होसी । जिंकीयले तू पृथिवीस सार्या मोठेहि यज्ञे करिशी कृपेने ॥६८॥
यथा हि - जसे खरोखर - नृपदेव यूयं - हे राजाधिराज तुम्ही - प्रभोः - प्रभु श्रीकृष्णाच्या आश्रयाने - आत्मनः दुस्त्यजात् आपद्वणात - स्वतःवर आलेल्या दुर्धर संकटातून - उत्तरत - पार पडला - सेवया - आणि तूही ज्याच्या चरणकमलांच्या सेवेने - निर्जितदिग्गजः क्रतून् अहार्षीत् - दशदिशांकडील दिग्गजांना जिंकून यज्ञ करिता झालास. ॥ ६८ ॥
युधिष्ठिरा, हेच पहा ना ! तुम्ही आपले स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मोठमोठ्या विपत्ती पार करून गेलात आणि त्यांच्याच चरणकमलांच्या सेवेने सर्व भूमंडळ जिंकून घेऊन राजसूयादी यज्ञ केले. (६८)
अहं पुराभवं कश्चिद् गंन्धर्व उपबर्हणः ।
नाम्नातीते महाकल्पे गन्धर्वाणां सुसम्मतः ॥ ६९ ॥ रूपपेशलमाधुर्य सौगन्ध्यप्रियदर्शनः । स्त्रीणां प्रियतमो नित्यं मत्तस्तु पुरुलम्पटः ॥ ७० ॥
(अनुष्टुप्) पूर्वकल्पामधे माझा जन्म गंधर्व तो असे । उपबर्हण हे नाम सन्मानित असे बहू ॥६९॥ माझे रूप नि कौमार्य माधुर्यहि अपूर्व ते । सुगंध शरिरा ये नी दिसेही चांगला तसा । स्त्रिया त्या लुब्धती नित्य प्रमादी रत मी असे ॥७०॥
पुरा अतीते महाकल्पे - पूर्वी गेलेल्या महाकल्पात - अहं गंधर्वाणां सुसंमतः - मी गंधर्वांना अत्यंत मान्य असा - नाम्ना उपबर्हणः - उपबर्हण नावांचा - रूपपेशलमाधुर्य - सुंदर रूप, नाजूकपणा, माधुर्य - सौगन्ध्यप्रियदर्शन - व सुगन्ध इत्यादि गुणांमुळे ज्यांचे दर्शन सर्वांस आवडणारे होते असा - स्त्रीणां प्रियतमः - स्त्रियांचा आवडता - नित्त्यं मत्तः तु पुरुलंपटः - नित्य उन्मत्त व अतिशय लंपट असा - कश्चित गंधर्वः अभवं - कोणी एक गंधर्व होतो. ॥ ६९-७० ॥
पूर्वीच्या महाकल्पामध्ये पूर्वजन्मी, मी एक गंधर्व होतो. उपबर्हण होते आणि गंधर्वांमध्ये मला मोठा मान होता. (६९) सौंदर्य, कोमलता, माधुर्य आणि सुगंध यांमुळे मी अत्यंत सुंदर दिसत होतो. स्त्रिया माझ्यावर अतिशय प्रेम करीत. मी उन्मत्त आणि अत्यंत विलासी होतो. (७०)
एकदा देवसत्रे तु गन्धर्वाप्सरसां गणाः ।
उपहूता विश्वसृग्भिः हरिगाथोपगायने ॥ ७१ ॥
एकदा देवतांमध्ये ज्ञानसत्रचि जाहले । थोर प्रजापती आले भगवान् कीर्ति ऐकण्या । गंधर्व अप्सरा यांना गायनास निमंत्रिले ॥७१॥
एकदा देवसत्रे तु - एके दिवशी देवांच्या सभेत तर - विश्वसृग्भिः हरिगाथोपगायने - प्रजापतींनी हरिकथेचे गायन करण्यासाठी - गंधर्वाप्सरसां गणाः उपहूताः - गंधर्व व अप्सरांचे समुदाय बोलाविले. ॥ ७१ ॥
एकदा देवांच्या ज्ञानसत्रात प्रजापती आले होते. भगवंतांच्या लीलांचे गायन करण्यासाठी गंधर्व आणि अप्सरांना बोलाविले होते. (७१)
अहं च गायन् तद्विद्वान् स्त्रीभिः परिवृतो गतः ।
ज्ञात्वा विश्वसृजस्तन्मे हेलनं शेपुरोजसा । याहि त्वं शूद्रतामाशु नष्टश्रीः कृतहेलनः ॥ ७२ ॥
संतांच्या समुहामध्ये गावी ती हरिकीर्तिची । जाणी मी परि त्या तेथे स्त्रियांच्यासह पातली । उन्मत्त होवुनी चित्ती लौकिक गीत गायिलो । देवता अवमानाते नच, साहून बोलल्या । सौंदर्य नष्ट हे होवो शुद्रयोनीत जन्म घे ॥७२॥
तत् च विद्वान् अहं - आणि ते आमंत्रण कळल्यावर मी - स्त्रीभिः परिवृतः गायन् गतः - स्त्रियांनी परिवेष्टित होऊन गात गात गेलो - तत् विश्वसृजः हेलनं ज्ञात्वा - तो मी केलेला प्रजापतींचा अपमान जाणून - मे ओजसा शेपुः - आपल्या प्रभावाने मला शाप दिला - त्वं कृतहेलनः - ज्याने आमचा अपमान केला आहे असा तू - नष्टश्रीः आशु शूद्रतां याहि - ऐश्वर्यापासून भ्रष्ट होऊन लवकर शूद्राच्या जन्माला जा. ॥ ७२ ॥
ते कळल्यावर मी स्त्रियांसह (वेड्यासारखा) गात तेथे गेलो. हा आपला अनादर करीत आहे असे प्रजापतींना वाटून त्यांनी आपल्या सामर्थ्याने मला शाप दिला की, "तू आमची अवहेलना केली आहेस; म्हणून तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन तू लवकरच शूद्र होशील. (७२)
तावद् दास्यामहं जज्ञे तत्रापि ब्रह्मवादिनाम् ।
शुश्रूषयानुषङ्गेघ्गेण प्राप्तोऽहं ब्रह्मपुत्रताम् ॥ ७३ ॥
शापाने दासिचा पुत्र जाहलो परि जन्मि त्या । घडली संतसेवा नी ब्रह्मपुत्रचि जन्मलो ॥७३॥
तावत् अहं - तत्काल मी - दास्यां जज्ञे - दासीच्या उदरी जन्माला आलो - तत्र अपि अहं - तेथेही मला - ब्रह्मवादिनां शुश्रूषया अनुषङगेण - ब्रह्मज्ञानी पुरुषांची सेवा प्राप्त झाल्यामुळे व संगति घडल्यामुळे - ब्रह्मपुत्रतां प्राप्तः - ब्रह्मदेवाचा पुत्र झालो आहे. ॥ ७३ ॥
त्यांच्या शापाने मी दासी-पुत्र झालो; परंतु त्या शूद्र-जीवनातही महात्म्यांचा सहवास आणि सेवाशुश्रुषा झाल्यामुळे मी पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. (७३)
धर्मस्ते गृहमेधीयो वर्णितः पापनाशनः ।
गृहस्थो येन पदवीं अञ्जसा न्यासिनामियात् ॥ ७४ ॥
संतांचा अवमानो नी संतसेवीं अशी फळे । प्रत्यक्ष भोगिले मी त्या सत्संगी भगवान् मिळे । पापनाशक हा धर्म गृहस्थांचा कथीयला । संन्याशासी मिळे ऐसे श्रेष्ठची की परंपद ॥७४॥
पापनाशनः गृहमेधीयः धर्मः - पापांचा नाश करणारा गृहस्थाश्रम्याचा धर्म - ते वर्णितः - तुला निवेदन केला - गृहस्थः येन - गृहस्थ ज्याच्या योगाने - अञ्जसा न्यासिनां पदवीं इयात् - अनायासे संन्याशांच्या गतीला प्राप्त होतो. ॥ ७४ ॥
गृहस्थांचा पापनाशक धर्म मी तुला सांगितला. या धर्माच्या आचरणाने गृहस्थसुद्धा संन्याशांना मिळणारे परमपद अनायासे प्राप्त करून घेतो. (७४)
यूयं नृलोके बत भूरिभागा
लोकं पुनाना मुनयोऽभियन्ति । येषां गृहानावसतीति साक्षाद् गूढं परं ब्रह्म मनुष्यलिङ्गम् ॥ ७५ ॥
(इंद्रवज्रा) जगात सार्या तुम्हि भाग्यवंत कैवल्यलेणे घरि नांदते की । ऋषी जगा जे करिती पवित्र ते दर्शना त्या नित येथ येती ॥७५॥
यूयं नृलोके भूरिभागाः (स्थ) - तुम्ही मनुष्यलोकांमध्ये मोठे भाग्यवान आहा - बतमनुष्यलिंगं गूढं - कारण मनुष्यचिन्हाने गुप्त असा - साक्षात् परं ब्रह्म - प्रत्यक्ष परब्रह्म श्रीकृष्ण - आवसति इति - राहतो म्हणून - लोकं पुनानाः मुनयः - लोकांना पवित्र करणारे मुनि - येषां गृहान् अभियंति - ज्यांच्या घरी चालून येतात. ॥ ७५ ॥
या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे. कारण तुमच्या घरी साक्षात परब्रह्म मनुष्यरूपात गुप्तरूपाने निवास करते. म्हणूनच सार्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. (७५)
स वा अयं ब्रह्म महद्विमृग्य
कैवल्यनिर्वाणसुखानुभूतिः । प्रियः सुहृद् वः खलु मातुलेय आत्मार्हणीयो विधिकृद् गुरुश्च ॥ ७६ ॥
ध्याती सदा संत बघावयाते ते शांत ब्रह्मो परमात्म कृष्ण । तुम्हा गुरू मित्र नि पूज्य दास हितैषि आहे अन मातुळाचा ॥७६॥
वः प्रियः सुहृत् - तुमचा प्रिय मित्र - मातुलेयः आत्मा - मामेभाऊ जिवलग - विधिकृत् अर्हणीयः - आज्ञेप्रमाणे वागणारा पूज्य - गुरुः च - आणि उपदेश कर्ता - सः अयम् (कृष्णः) - तो हा कृष्ण - कैवल्यनिर्वाणसुखानुभूतिः - मोक्ष व परमानंदाचा अनुभव हेच ज्याचे स्वरूप असा - महद्विमृग्यं ब्रह्म - मोठे मोठे साधु ज्याचा शोध करितात तो परमात्माच होय. ॥ ७६ ॥
महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात, जे मायालेशविरहित, परम शांत, परमानंदानुभवस्वरूप परब्रह्म आहेत, तेच तुमचे प्रिय, हितैषी, मामेभाऊ, पूज्य, आज्ञाधारक, गुरू आणि स्वत: आत्मा श्रीकृष्ण आहेत. (७६)
न यस्य साक्षाद् भवपद्मजादिभी
रूपं धिया वस्तुतयोपवर्णितम् । मौनेन भक्त्योपशमेन पूजितः प्रसीदतामेष स सात्वतां पतिः ॥ ७७ ॥
ब्रह्मादिदेवा नच शक्य झाले रूपास गाणे हरि तोचि कृष्ण । मौनेचि आम्ही पुजितो तयाला पावो अम्हा श्रीहरि कृष्णदेव ॥७७॥
साक्षात् भवपद्मजादिभिः - प्रत्यक्ष शंकर व ब्रह्मदेवादिकांनाही - यस्य रूपं - ज्याचे स्वरूप - धिया वस्तुतया - विशाल बुद्धीच्या योगे वास्तविक रीतीने - न उपवर्णितं - वर्णन करिता आले नाही - सः एषः सात्वतां पतिः - तो हा यदुपती भगवान - मौनेन भक्त्या - मौनाने, भक्तीने - उपशमेन (च) पूजितः - आणि शांति ह्या साधनांनी पूजिलेला असा - नः प्रसीदतां - आम्हावर प्रसन्न होवो. ॥ ७७ ॥
शंकर, ब्रह्मदेव इत्यादीसुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन, भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो. आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत ! (७७)
श्रीशुक उवाच -
इति देवर्षिणा प्रोक्तं निशम्य भरतर्षभः । पूजयामास सुप्रीतः कृष्णं च प्रेमविह्वलः ॥ ७८ ॥
श्रीशुकदेव सांगतात - (अनुष्टुप्) परीक्षिता ! अशा बोला ऐकता नृप तोषला । झाला विव्हळही प्रेमे पूजिले कृष्णनारदा ॥७८॥
इति देवर्षिणा प्रोक्तं निशम्य - याप्रमाणे नारदाने सांगितलेले श्रवण करून - सुप्रीतः - अत्यंत संतोष पावलेला - भरतर्षभः प्रेमविव्हलः (भूत्वा) - भरताश्रेष्ठ धर्मराज प्रेमाने गहिवरला होऊन - कृष्णं (नारदं) च पूजयामास - कृष्णाची व नारदाची पूजा करिता झाला. ॥ ७८ ॥
श्रीशुक म्हणतात – देवर्षींचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला आणि प्रेमभराने त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. (७८)
कृष्णपार्थौ उपामन्त्र्य पूजितः प्रययौ मुनिः ।
श्रुत्वा कृष्णं परं ब्रह्म पार्थः परमविस्मितः ॥ ७९ ॥
सत्कार घेउनी तेंव्हा निरोप घेउनी पुढे । गेले ब्रह्मर्षि तेथोनी राजहर्षास ना सिमा ॥७९॥
पूजितः मुनिः - पूजा केलेला नारदमुनि - कृष्णपार्थौ उपामंत्र्य प्रययौ - कृष्ण व धर्मराज यांचा निरोप घेऊन निघून गेला - पार्थः कृष्णं परं ब्रह्म श्रुत्वा - धर्मराज, श्रीकृष्ण परब्रह्म आहे असे ऐकून - परमविस्मितः - अत्यंत विस्मित झाला. ॥ ७९ ॥
भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिराचा निरोप घेऊन आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद निघून गेले. भगवान श्रीकृष्णच परब्रह्म आहेत, हे ऐकून युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. (७९)
इति दाक्षायिणीनां ते पृथग्वंशा प्रकीर्तिताः ।
देवासुरमनुष्याद्या लोका यत्र चराचराः ॥ ८० ॥ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे प्रह्रादानुचरिते युधिष्ठिरनारदसंवादे सदाचारनिर्णयो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
परीक्षिता ! असा मी हा दक्ष विस्तार वंशिचा । स्वतंत्र बोललो सर्व जयीं देव मनुष्य नी । पशूपक्ष्यादि नी सर्प चराचराचि सृष्टि ही ॥८०॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥ ७ ॥ १५ ॥ ॥हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ सप्तम स्कंध परिपूर्ण हा ॥
इति ते - याप्रमाणे तुला - दाक्षायणीनां पृथग्वंशाः प्रकीर्तिताः - दक्षकन्यांचे निरनिराळे वंश सांगितले - यत्र देवासुरमनुष्याद्याः - ज्या वंशात देव, दैत्य व मनुष्यादिक - चराचराः लोकाः - चराचर सृष्टि उत्पन्न झाली. ॥ ८० ॥
अशा प्रकारे मी तुला दक्षकन्यांच्या वेगवेगळ्या वंशांचे वर्णन ऐकविले. त्यांच्याच वंशांमध्ये देव, असुर, मनुष्य इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली. (८०)
स्कंध सातवा - अध्याय पंधरावा समाप्त |