|
श्रीमद् भागवत पुराण
वराहावतारादारभ्य श्रीकृष्णावतारपर्यंतं भगवंतांच्या लीलावतारांच्या कथा - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
ब्रह्मोवाच -
यत्रोद्यतः क्षितितलोद्धरणाय बिभ्रत् । क्रौडीं तनुं सकलयज्ञमयीमनन्तः । अन्तर्महार्णव उपागतमादिदैत्यं । तं दंष्ट्रयाऽद्रिमिव वज्रधरो ददार ॥ १ ॥
ब्रह्मदेव म्हणाले - (वसंततिलका) जेंव्हा धरा प्रलयकालि बुडोनि गेली तेंव्हा तिला उचलण्यास वराह रूपा । घेऊनि दैत्य वधिला तुकडे करोनी कापीयले शचिवरे गिरिपंख जैसे ॥ १ ॥
अनंतः - भगवान - सकलयज्ञमयीं - सगळ्या यज्ञांनी युक्त असे - क्रौडीं तनुं बिभ्रत् - वराहाचे शरीर धारण करणारा - यत्र - ज्या काळी - क्षितितलोद्धरणाय उदयतः - पृथ्वीतलाला वर काढावयास सिद्ध झाला - अंतर्महार्णवे - महासागराच्या आत - उपागतं तम् आदिदैत्यं - गेलेला आदिदैत्य जो हिरण्याक्ष त्याला - वज्रधरः अद्रिं इव - इंद्राने पर्वताला फोडिले त्याप्रमाणे - दंष्ट्रया ददार - दाढेने फाडून टाकिता झाला. ॥१॥
ब्रह्मदेव म्हणाले - प्रलयकालाच्या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवानांनी संपूर्ण यज्ञमय असे वराहशरीर ग्रहण केले. पाण्यामध्ये आदिदैत्य हिरण्याक्ष लढण्यासाठी त्यांच्यासमोर आला. इंद्राने जसे आपल्या वज्राने पर्वतांचे पंख तोडून टाकले होते, तशाच प्रकारे भगवंतांनी आपल्या दाढेने हिरण्याक्षाचे तुकडे तुकडे केले. (१)
जातो रुचेरजनयत् सुयमान् सुयज्ञ ।
आकूतिसूनुः अमरान् अथ दक्षिणायाम् । लोकत्रयस्य महतीं अहरद् यदार्तिं । स्वायम्भुवेन मनुना हरिरित्यनूक्तः ॥ २ ॥
आकूति आणि रुचिच्या उदरी पुन्हा तो सूयज्ञ नाम धरूनी स्वय जन्मला नी । ती दक्षिणा वरियली सुयमा म्हणुनी हरी तो ॥ २ ॥
अथ - नंतर - रुचेः - रुचि नावाच्या ऋषीपासून - जातः - उत्पन्न झालेला - आकूतिसूनुः - आकूतीचा पुत्र - सुयज्ञः - सुयज्ञ - दक्षिणायां - दक्षिणा नावाच्या पत्नीचे ठिकाणी - सुयमान् - सुयम नावाच्या - अमरान् - देवांना - अजनयत् - उत्पन्न करता झाला - यत् - ज्याअर्थी - लोकत्रयस्य - त्रैलोक्याच्या - महतीं - मोठया - आर्तिं - पीडेला - अहरत् - दूर करता झाला - स्वायंभुवेन - स्वायंभुव नावाच्या - मनुना - मनूने - हरिः - हरि - इति - याप्रमाणे - अनूक्तः - संबोधिला गेला. ॥२॥
पुढे प्रभूंची रुची नामक प्रजापतीपासून आकूतीच्या ठिकाणी सुयज्ञाच्या रूपाने अवतार घेतला. त्या अवतारात त्यांनी दक्षिणा नावाच्या पत्नीपासून सुयम नावाच्या देवतांना उत्पन्न केले आणि तिन्ही लोकांवर आलेली मोठमोठी संकटे नाहीशी केली. यावरून स्वायंभुव मनूने त्यांना ’हरि’ हे नाव ठेवले. (२)
जज्ञे च कर्दमगृहे द्विज देवहूत्यां ।
स्त्रीभिः समं नवभिरात्मगतिं स्वमात्रे । ऊचे ययाऽत्मशमलं गुणसङ्गपङ्कम् । अस्मिन् विधूय कपिलस्य गतिं प्रपेदे ॥ ३ ॥
पोटास कर्दममुनी अन देवहूती जन्मून ते कपिल नाम धरी हरी तो । झाल्या नऊ बहिणि त्या,अन बोधिली त्या मातेस उद्धरियले निजरूपि नेले ॥ ३ ॥
व्दिज - हे नारदा - कर्दमगृहे - कर्दम ऋषीच्या घरी - देवहूत्यां - देवहूतीचे ठिकाणी - नवभिः - नऊ - स्त्रीभिः समं - स्त्रीरूप भावंडांसह - जज्ञे - उत्पन्न झाला. - च - आणि - स्वमात्रे - आपल्या आईस - आत्मगतिं - आत्मज्ञानाच्या मार्गाला - ऊचे - सांगता झाला. - यया - ज्या ज्ञानमार्गाने - आत्मशमलं - आत्म्यावरील अज्ञानरूपी आवरणाला - गुणसङ्गपङ्क - व त्रिगुणोत्पन्न विषयांवर आसक्ति ठेवल्यामुळे उत्पन्न झालेल्या दोषाला - अस्मिन् - ह्या जगातच - विधूय - साफ धुवून काढून - कपिलस्य - कपिल महामुनीच्या - गतिं - ज्ञानमार्गाला म्हणजे मोक्षाला - प्रपेदे - प्राप्त झाली. ॥३॥
नारदा, कर्दम प्रजापतीच्या घरी देवहूतीच्या ठिकाणी नऊ बहिणींसह भगवंतांनी कपिलरूपाने अवतार धारण केला. त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यायोगे तिने याच जन्मामध्ये आपल्या हृदयातील संपूर्ण मल - तीन गुणांच्या आसक्तीचा चिखल धुऊन टाकून ती कपिल भगवानांच्या मूळ स्वरूपात विलीन झाली. (३)
अत्रेः अपत्यमभिकाङ्क्षत आह तुष्टो ।
दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः । यत् पादपङ्कजपराग पवित्रदेहा । योगर्द्धिमापुरुभयीं यदुहैहयाद्याः ॥ ४ ॥
तो पुत्ररूप असणे भगवान् असेचि अत्री मनात स्मरता अवधूत झाला । बाहू सहस्र ययि अर्जुन उद्धरीला नी भोग मोक्ष असल्या वरिल्याहि सिद्धी ॥ ४ ॥
यत् - ज्याअर्थी - तुष्टः - संतुष्ट झालेला - भगवान् - परमेश्वर - अपत्यं - पुत्राला - अभिकाङ्क्षतः - इच्छिणार्या - अत्रेः - अत्रि ऋषीला - मया - माझ्याकडून - अहं - मी स्वतः - दत्तः - दिला गेलो आहे - इति - असे - आह - बोलला - सः - तो - दत्तः - दत्त या नावाने प्रसिद्ध आहे. - यत्पादपङकजपरागपवित्रदेहाः - ज्याच्या पादकमलांच्या धुळीने ज्यांचे देह पवित्र झाले आहेत असे - यदुहैहयादयाः - यदु, हैहय वगैरे राजे - उभयीं - दोन्ही प्रकारच्या - योगर्धिं - ऐश्वर्याच्या समृद्धीला - आपुः - मिळविते झाले. ॥४॥
भगवंतांना पुत्ररूपाने प्राप्त करून घ्यावे, अशी महर्षी अत्रींची इच्छा होती. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवंत त्यांना एक दिवस म्हणाले की, "मी स्वतःला तुम्हांला दिले आहे." म्हणून अवतार घेतल्यानंतर भगवंतांचे नाव ’दत्त’ (दत्तात्रेय) पडले. त्यांच्या चरणकमलांच्या परागांनी आपल्या शरीराला पवित्र करून राजा यदू, सहस्रार्जुन इत्यादींनी योगाच्या भोग आणि मोक्ष या दोन्ही सिद्धी प्राप्त करून घेतल्या. (४)
तप्तं तपो विविधलोकसिसृक्षया मे ।
आदौ सनात् स्वतपसः स चतुःसनोऽभूत् । प्राक्कल्प संप्लवविनष्टमिह आत्मतत्त्वं । सम्यग् जगाद मुनयो यदचक्षतात्मन् ॥ ५ ॥
पाहूनि घोर तप ते मजला प्रसन्न होऊनि तो सनकपुत्र सनंदनो नी । सनत् कुमार नि तसाचि सनतनोहि ते बोधिले ऋषि मुनी प्रलयोत्तरे की ॥ ५ ॥
आदौ - प्रथम - विविधलोकसिसृक्षया - अनेक लोक उत्पन्न करण्याच्या इच्छेने - मे - माझ्याकडून - तपः - तपश्चर्या - तप्तं - अनुष्ठिली गेली - सनात् स्वतपसः - स्वतःच्या घोर तपश्चर्येपासून - सचतुःसनः - चार सनशब्दासह - अभूत् - अवतीर्ण झाला - इह - येथे - सम्यक् - चांगल्या तर्हेने - प्राक्कल्पसंप्लवविनष्टम् - पूर्वीच्या कल्पातील प्रलयात नष्ट झालेल्या - आत्मतत्त्वं - आत्मज्ञानाला - जगाद - सांगता झाला. - यत् - ज्या ज्ञानाला - मुनयः - ऋषि - आत्मन् - आत्म्याच्याच ठिकाणी - अचक्षत - अनुभविते झाले. ॥५॥
नारदा, सृष्टीच्या प्रारंभी मी विविध लोकांच्या रचनेची इच्छा धरून तपश्चर्या केली. माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन ’तप’ अर्थात ’सन’ नावांनी युक्त होऊन भगवंतांनी सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार रूपांमध्ये अवतार धारण केला. या अवरातारांत त्यांनी प्रलयामुळे पहिल्या कल्पातील, विस्मरण झालेल्या आत्मज्ञानाचा ऋषींना जसाच्या तसा उपदेश केला. त्यामुळे तांनी ताबडतोब आपल्या हृदयात परमतत्त्वाचा साक्षात्कार करून घेतला. (५)
धर्मस्य दक्षदुहितर्यजनिष्ट मूर्त्यां ।
नारायणो नर इति स्वतपः प्रभावः । दृष्ट्वात्मनो भगवतो नियमावलोपं । देव्यस्त्वनङ्गपृतना घटितुं न शेकुः ॥ ६ ॥
ती धर्मपत्नि अन दक्ष सुताचि मूर्ती नारायणो नर तिच्या उदरासि आले । त्यांच्या तपास बघुनी तयि अप्सराही भानास त्या हरपल्या मग विघ्न कैसे ॥ ६ ॥
धर्मस्य - धर्माच्या - दक्षदुहितरि - दक्षकन्या अशा - मूर्त्यां - मूर्तिनामक भार्येचे ठिकाणी - नारायणः - नारायण - च - आणि - नरः - नर - स्वतपःप्रभावः - तपश्चर्या हाच प्रभाव आहे ज्याचा असा - इति - अशा तर्हेचा - अजनिष्ट - उत्पन्न झाला. - अनंगपृतनाः - मदनाचे सैन्य अशा - देव्यः - अप्सरा - तु - तर - भगवतः - नारायणाच्या सन्निध - आत्मनः - स्वतःची प्रतिबिंबे - दृष्ट्वा - पाहून - नियमावलोपं - तपोभंगाला - घटितुं - करण्याला - न शेकुः - समर्थ झाल्या नाहीत. ॥६॥
धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नरनारायणांच्या रूपात प्रगट झाले. त्यांच्या तपस्येचा प्रभाव त्यांच्यासारखाच होता. इंद्राने पाठविलेली कामसेना म्हणजेच अप्सरा, त्यांना पाहताच त्या आत्मस्वरूप भगवंतांच्या तपस्येमध्ये विघ्न आणू शकल्या नाहीत. (६)
कामं दहन्ति कृतिनो ननु रोषदृष्ट्या ।
रोषं दहन्तमुत ते न दहन्त्यसह्यम् । सोऽयं यदन्तरमलं प्रविशन् बिभेति । कामः कथं नु पुनरस्य मनः श्रयेत ॥ ७ ॥
क्रोधासि जाळिती शिवापरि थोर संत पै क्रोध जाळि तनु त्यां नच कोणि जाळी । नारायणो नर ययां हृदयात जाता क्रोधास भीती गमली मग काम काय ॥ ७ ॥
ननु - खरोखर - कृतिनः - पुण्यवान पुरुष - रोषदृष्टया - क्रोधदृष्टीने - कामं - मदनाला - दहन्ति - जाळतात - उत - परंतु - ते - तेच पुण्यवान पुरुष - दहन्तं - स्वतःला जाळणार्या - असह्यं - दुःसह अशा - रोषं - क्रोधाला - न दहन्ति - जाळीत नाहीत - सः - तो - अयं - हा - यदन्तरं - ज्याच्या अंतःकरणात - प्रविशन् - प्रविष्ट होणारा - अलं - अत्यंत - बिभेति - भितो - पुनः - फिरून - कामः - मदन - अस्य - ह्याच्या - मनः - मनाला - नु - खरोखर - कथं - कसा - श्रयेत - आश्रय करून राहिला. ॥७॥
शंकर आदी महानुभाव आपले डोळे वटारूनच कामदेवाला भस्म करतात, परंतु आपल्याच जळणार्या असह्य क्रोधाला ते जाळू शकत नाहीत. तोच क्रोध-नरनारायणांच्या निर्मल हृदयात प्रवेश करण्याअगोदरच थरथर कापतो, मग त्या कामाचा त्यांच्या हृदयात प्रवेश कसा होऊ शकेल ? (७)
विद्धः सपत्न्युदितपत्रिभिरन्ति राज्ञो ।
बालोऽपि सन्नुपगतस्तपसे वनानि । तस्मा अदाद् ध्रुवगतिं गृणते प्रसन्नो । दिव्याः स्तुवन्ति मुनयो यदुपर्यधस्तात् ॥ ८ ॥
उत्तनपाद पितया जवळी नि अंकी बैसू न दे सुरुचि ती ध्रुव बाळकाला । तो बाळ घोर तप आचरुनी पदाला गेला तयास ऋषि ते करितात फेर्या ॥ ८ ॥
राज्ञः - उत्तानपाद राजाच्या - अंति - समक्ष - सपन्युदितपत्रिभि - सावत्र आईने उच्चारिलेल्या वाग्बाणांनी - विद्धः - ताडिलेला - बालः - लहान - अपि - सुद्धा - सन् - असतानाच - तपसे - तप करण्याकरिता - वनानि - अरण्याप्रत - उपगतः - गेला - प्रसन्नः - प्रसन्न झालेला परमेश्वर - गृणते - स्तुति करणार्या - तस्मै - त्या बाळाला - ध्रुवगतिं - अविनाशी अशा अढळपदाला - अदात् - देता झाला - यत् - ज्याची - उपरि - वर राहणारे - अधस्तात् - व खाली राहणारे - दिव्याः - दैदिप्यमान - मुनयः - ऋषि - स्तुवन्ति - स्तुति करितात. ॥८॥
राजा उत्तानपादाच्या जवळ बसलेल्या ध्रुवबाळाला त्याच्या सावत्र आई - सुरुचीने शब्दबाणांनी घायाळ केले. तेव्हा इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासठी तो वनात निघून गेला. त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन त्या ध्रुवाच्या वरखाली प्रदक्षिणा करीत दिव्य महर्षिगण त्याची स्तुती करतात. (८)
यद्वेनमुत्पथगतं द्विजवाक्यवज्र ।
निष्प्लुष्टपौरुषभगं निरये पतन्तम् । त्रात्वाऽर्थितो जगति पुत्रपदं च लेभे । दुग्धा वसूनि वसुधा सकलानि येन ॥ ९ ॥
वेनास शाप मिळता धन पौरूषो हे नष्टोनि जाय, तदि देह मथून त्या । जन्मास ये पृथु तये पृथिवीस धेनू देवूनि रूप मथिल्या सगळ्याहि वल्ली ॥ ९ ॥
यत् - ज्यामुळे - अर्थितः - प्रार्थिलेला - उत्पथगतं - कुमार्गाने चालणार्या - व्दिजवाक्यवज्रविप्लुष्टपौरुषभगं - ब्राह्मणांच्या वाग्वज्राने ज्याचे ऐश्वर्य व सामर्थ्य नष्ट झाले आहे अशा - निरये - नरकांत - पतन्तं - पडणार्या - वेनं - वेन नावाच्या राजाला - त्रात्वा - रक्षून - जगति - जगात - पुत्रपदं - पुत्र नावाला - लेभे - प्राप्त झाला - च - आणि - येन - ज्याने - वसुधा - पृथ्वीपासून - सकलानि संपूर्ण - वसूनि - पदार्थ - दुग्धा - दोहन केले. ॥९॥
कुमार्गाला लागलेल्या वेनाचे ऐश्वर्य आणि शौर्य ब्राह्मणांच्या हुंकाररूपी वज्राने जळून भस्म झाले. तो नरकात पडू लागला. ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंतांनी त्याच्या शरीरमंथनातून पृथूच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्याची नरकात पडण्यापासून मुक्तता केली. अशा प्रकारे ’पुत्र’ शब्दाचे सार्थक केले. त्याच अवतारात पृथ्वीला गाय बनवून त्यांनी तिच्यापासून जगासाठी सर्व वनस्पती निर्माण केल्या. (९)
नाभेरसावृषभ आस सुदेविसूनुः ।
यो वै चचार समदृग् जडयोगचर्याम् । यत्पारमहंस्यमृषयः पदमामनन्ति । स्वस्थः प्रशान्तकरणः परिमुक्तसङ्गः ॥ १० ॥
नाभी सुदेवि उदरी ऋषभावतारी असक्ति सर्व त्यजुनी स्वरूप्र्र् निमाले । वेड्यापरीच हरि योग करून राही संबोधिती ऋषि तया अवधूत नामे ॥ १० ॥
असौ - हा - नाभेः - नाभिराजापासून - सुदेविसूनुः - सुदेविनामक पत्नीच्या ठिकाणी झालेला पुत्र असा - समदृक् - समदृष्टि असा - प्रशान्तकरणः - जितेन्द्रिय - परिमुक्तसङगः - सर्वसंगपरित्याग केलेला - स्वस्थः - आत्म्यामध्येच रममाण होणारा - ऋषभः - ऋषभयोगी - आस - असता झाला - यः - जो - वै - खरोखर - जडयोगचर्यां - जडासारख्या योगसमाधीला - चचार - आचरिता झाला - ऋषयः - ऋषी - यत् - ज्या - पारमहंस्यं - परमहंस जे साधु त्यांना प्राप्त होणार्या अशा - पदं - स्थानाला - आमनन्ति - मानतात. ॥१०॥
राजा नाभीची पत्नी सुदेवीच्या ठिकाणी भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने जन्म घेतला. या अवतारात, सर्व आसक्तिंपासून निवृत्त होऊन आपली इंद्रिये आणि मन अत्यंत शांत करून तसेच आपल्या मूळ स्वरूपात स्थिर राहून त्यांनी समदर्शी होऊन, स्वतःला वेड्याप्रमाणे भासवून योगाचरण केले. या अवस्थेला महर्षी लोक ’परमहंसपद’ किंवा ’अवधूतचर्या’ असे म्हणतात. (१०)
सत्रे ममाऽस भगवान् हयशीर्ष एव ।
साक्षात् स यज्ञपुरुषः तपनीयवर्णः । छन्दोमयो मखमयोऽखिलदेवतात्मा । वाचो बभूवुरुशतीः श्वसतोऽस्य नस्तः ॥ ११ ॥
माझ्याचि यज्ञि पुरुषी हयग्रीव रूप घेवूनि दिव्य तनु स्वर्ण प्रकाशदिव्य । तो छंद यज्ञ अन देव अशा रूपाचा उच्छवास सोडित तयीं तिच वेदवाणी ॥ ११ ॥
अथो - नंतर - मम - माझ्या - सत्रे - यज्ञात - सः - तो - साक्षात् - प्रत्यक्ष - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न - यज्ञपुरुषः - यज्ञस्वरूपी पुरुष - तपनीयवर्णः - सुवर्णाप्रमाणे अंगकांति असणारा - छन्दोमयः - वेदस्वरूपी - मखभयः - यज्ञस्वरूपी - अखिलदेवतात्मा - संपूर्ण देवतांमध्ये आत्मस्वरूपाने राहिलेला असा - हयशीरषा - हयग्रीव नावाचा अवतार - आस - उत्पन्न झाला - श्वसतः - श्वासोच्छ्वास टाकणार्या - अस्य - ह्या हयग्रीवाच्या - नस्तः - नाकातून - उशतीः - सुंदर - वाचः - वेदवाणी - बभूवुः - उत्पन्न झाल्या. ॥११॥
यानंतर स्वतः त्या यज्ञपुरुषाने माझ्या यज्ञात सुवर्णासारखी कांती असलेल्या हयग्रीवाच्या रूपाने अवतार घेतला. भगवंतांचा हा अवतार वेदमय, यज्ञमय आणि सर्वदेवमय आहे. त्यांच्याच नासिकेतून वाहणार्या श्वासातून वेदवाणी प्रगट झाली. (११)
मत्स्यो युगान्तसमये मनुनोपलब्धः ।
क्षोणीमयो निखिलजीवनिकायकेतः । विस्रंसितानुरुभये सलिले मुखान्मे । आदाय तत्र विजहार ह वेदमार्गान् ॥ १२ ॥
मत्स्यस्वरूप धरिले, मनुसत्यव्रतो आराधिता, पृथिविते तरण्यास नौका । झाला समस्त जिव सृष्टिसी रक्षिण्याला वेदास रक्षुनि तदा फिरला जळात ॥ १२ ॥
युगान्तसमये - युग संपण्याचे वेळी - मनुना - वैवस्वत मनूने - उपलब्धः - पाहिलेला - क्षोणीमयः - पृथ्वीरूपी - निखिलजीवनिकायकेतः - सर्व जीवसमुदायांचा आश्रय असा - मत्स्यः - मत्स्यावतार - मे - माझ्या - मुखात् - तोंडातून - विस्रंसितान् - बाहेर पडलेल्या - वेदमार्गान् - वेद मार्गांना - आदाय - घेऊन - तत्र - त्या - उरुभये - फारच भयंकर अशा - सलिले - उदकात - ह - खरोखर - विजहार - क्रीडा करिता झाला. ॥१२॥
चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी भावी मनू सत्यव्रताने भगवंतांना मत्स्यरूपाने प्राप्त करून घेतले. त्यावेळी पृथ्वीरूप नौकेचा आश्रय झाल्याकारणाने ते सर्व जीवांचेच आश्रय बनले. प्रलयाच्या त्या भयंकर पाण्यात माझ्या मुखातून पडलेले वेद घेऊन ते त्यातच विहार करीत राहिले. (१२)
क्षीरोदधावमरदानवयूथपानाम् ।
उन्मथ्नताममृतलब्धय आदिदेवः । पृष्ठेन कच्छपवपुर्विदधार गोत्रं । निद्राक्षणोऽद्रिपरिवर्तकषाणकण्डूः ॥ १३ ॥
जेंव्हा सुधा मिळविण्यास सुरासुसांनी मंद्राचळां घुसळिले क्षिरसागरात । होऊनि कुर्म, धरिला गिरि पाठ भागी खाजें तयास मिळली सुख शांति निद्रा ॥ १३ ॥
अमरदानवयूथपानां - देवांचे व दैत्यांचे जे इन्द्रादि अधिपति ते - क्षीरोदधौ - क्षीरसमुद्रात - अमृतलब्धये - अमृत मिळविण्याकरिता - उन्मथ्नतां - मंथन करीत असत - निद्राक्षणः - निद्रेला योग्य वेळ असलेला - अद्रिपरिवर्तकषाणकण्डूः - पर्वताच्या घर्षणामुळे ज्याची कंडू नाहीशी झाली आहे असा - आदिदेवः - सर्वांचा आदि असणारा देव - कच्छपवपुः - कासवाचे शरीर धारण करणारा असा - पृष्ठेन - पाठीने - गोत्रं - पर्वताला - विदधार - धरिता झाला. ॥१३॥
जेव्हा प्रमुख देव आणि दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत होते, तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रूपाने आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण केले. त्यावेळी पर्वताच्या फिरण्याने, त्यांच्या पाठीला सुटलेली खाज नाहीशी झाली. त्यामुळे ते काही क्षण निद्रासुख घेऊ शकले. (१३)
त्रैविष्टपोरुभयहा स नृसिंहरूपं ।
कृत्वा भ्रमद् भ्रुकुटिदंष्ट्रकरालवक्त्रम् । दैत्येन्द्रमाशु गदयाऽभिपतन्तमारात् । ऊरौ निपात्य विददार नखैः स्फुरन्तम् ॥ १४ ॥
जेंव्हा भयात बुडल्या सुर देवता त्या तेंव्हा नृसिंह स्वरुपा धरिले भयान । दाढा प्रचंड जबडा बघणे तसेचि हिरण्यकश्यपु वधी नखिं पोट फाडी ॥ १४ ॥
त्रैविष्टपोरुभयहा - त्रैलोक्याच्या मोठया भयाला नष्ट करणारा - सः - तो - भ्रमद्भ्रुकुटिः - ज्याच्या भ्रुकुटीसभोवार फिरत आहेत असे - दंष्ट्रकरालवक्रं - ज्याचे मुख भयंकर दाढांनी युक्त दिसत आहे असे - नृसिंहरूपं - नृसिंहाचे स्वरूप - कृत्वा - धारण करून - गदया - गदेने - स्फुरितं - स्फुरण पावणार्या - आरात् - जवळ - अभिपतन्तं - येणार्या - दैत्येन्द्रं - दैत्याधिपति हिरण्यकशिपूला - ऊरौ - मांडीवर - निपात्य - पाडून - आशु - तत्काळ - नखैः - नखांनी - विददार - फाडता झाला. ॥१४॥
देवांचे मोठे भय नाहीसे करण्यासाठी त्यांनी नृसिंहाचे रूप धारण केले. थरथराणार्या भुवया आणि तीक्ष्ण दाढा यामुळे त्यांचे मुख अतिशय भयानक दिसत होते. त्यांना पाहताच हिरण्यकशिपू गदा घेऊन, त्यांच्या अंगावर तुटून पडला. यावर भगवान नृसिंहांनी लांबूनच त्याला पकडून आपल्या मांडीवर घेतले आणि तो धडपडत असताही आपल्या नखांनी त्याचे पोट फाडले. (१४)
अन्तः सरस्युरुबलेन पदे गृहीतो ।
ग्राहेण यूथपतिरम्बुजहस्त आर्तः । आहेदमादिपुरुषाखिललोकनाथ । तीर्थश्रवः श्रवणमङ्गलनामधेय ॥ १५ ॥
मोठ्या तळ्यात धरि नक्र जधी गजेंद्रा तेंव्हा थकूनि सुमना वरि फेकि हत्ती । हे आदि तू पुरूष स्वामी तुला नमी मी कल्याण तूचि करिसी वदला असा तो ॥ १५ ॥
अन्तःसरसि - सरोवराच्या आत - उरुबलेन - बलिष्ठ अशा - ग्राहेण - नक्राने - पदे - पायामध्ये - गृहीतः - धरलेला - आर्तः - अत्यंत पीडित झालेला - यूथपतिः - हत्तीच्या कळपांचा स्वामी - अम्बुजहस्तः - हातात कमळ घेतलेला असा - आदिपुरुषः - सर्वांचा आदि असणार्या हे परमेश्वरा ! - अखिललोकनाथ - हे लोकांच्या अधिपते - तीर्थश्रवः - हे पुण्यकीर्ते ! - श्रवणमङगलनामधेय - श्रवण करणार्यांना ज्यांचे नाव मंगलकारक आहे अशा हे विष्णो - इदं - अशा रीतीने - आहे - स्तुति करू लागला. ॥१५॥
मोठ्या सरोवरात एका महाबलाढ्य मगरीने गजेंद्राचा पाय पकडला, जेव्हा थकून जाऊन तो घाबरला, तेव्हा त्याने आपल्या सोंडेने कमल-पुष्प घेऊन "हे आदिपुरुषा ! हे समस्त लोकांच्या स्वामी ! ह पवित्रकीर्ती ! हे नामश्रवणानेच कल्याण करणार्या भगवंता !" असा भगवंतांचा धावा केला. (१५)
श्रुत्वा हरिस्तमरणार्थिनमप्रमेयः ।
चक्रायुधः पतगराजभुजाधिरूढः । चक्रेण नक्रवदनं विनिपाद्य तस्माद् । धस्ते प्रगृह्य भगवान् कृपयोज्जहार ॥ १६ ॥
ऐकोनि हाक हरि तो गरुडासवे ये ते चक्र सोडुनि तये वधिलाही नक्र । ऐसा कृपावश तये धरियेलि सोंड आणीक मोक्ष दिधला गजराज याला ॥ १६ ॥
अप्रमेयः - निरुपम - भगवान् - सर्वगुणसंपन्न - हरिः - परमात्मा - श्रुत्वा - गजेंद्राचे भाषण ऐकून - चक्रायुधः - हातात सुदर्शनचक्र धारण केलेला - पतगराजभुजाधिरूढः - गरुडारूढ झालेला - चक्रेण - सुदर्शन चक्राने - नक्रवदनं - नक्राच्या मुखाला - विनिपाटय - विदारण करून - तस्मात् - त्यायोगे - अरणार्थिनं - शरण आलेल्या - तं - त्या गजेन्द्राला - हस्ते - सोंडेशी - प्रगृह्य - धरून - कृपया - कृपेने - उज्जहार - वर काढिता झाला. ॥१६॥
त्याचा धावा ऐकून अनंतशक्ति भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून तेथे आले आणि कृपाळू भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या मगरीचे तोंड फाडून शरण आलेल्या गजेंद्राची सोंड पकडून त्याची त्या संकटातून सुटका केली. (१६)
ज्यायान् गुणैरवरजोऽप्यदितेः सुतानां ।
लोकान् विचक्रम इमान् यदथाधियज्ञः । क्ष्मां वामनेन जगृहे त्रिपदच्छलेन । याच्ञामृते पथि चरन् प्रभुभिर्न चाल्यः ॥ १७ ॥
अदीति पुत्र लघुही गुणि तो विशेष त्या वामने बळिचिया हरिलेहि गर्वा । तीन्ही पदात मिळता जग दक्षिणा ती "भिक्षू विना न हटती धनवान" दावी ॥ १७ ॥
अदितेः - अदितीच्या - सुतानां - मुलांमध्ये - अवरजः - सर्वांत धाकटा - अपि - असून सुद्धा - गुणैः - गुणांनी - ज्यायान् - श्रेष्ठ - यत् - ज्यामुळे - अधियज्ञः - यज्ञश्रेष्ठ असे म्हणतात - अथ - नंतर - इमान् - ह्या - लोकान् - लोकांना - विचक्रमे - व्यापून टाकता आला - प्रभुभिः - समर्थांनी - पथि - धर्ममार्गाने - चरन् - वागणारा - याञ्चां ऋते - याचना केल्याशिवाय - न चाल्यः - चलित करू नये - वामनेन - वामनावताराने - त्रिपदच्छलेन - तीन पावले भूमि मागण्याच्या मिषाने - क्ष्मां - पृथ्वीला - जगृहे - घेतले. ॥१७॥
भगवान वामन अदितीच्या पुत्रांपैकी सर्वांत लहान होते. परंतु गुणांच्या दृष्टीने ते सर्वांत श्रेष्ठ होते. कारण यज्ञपुरुष भगवंतांनी याच अवतारात, बलीने दानाचा संकल्प सोडताच सर्व लोक आपल्या पावलांनी व्यापले. वामन बटू बनून त्यांनी तीन पावलांचा बहाणा करून सारी पृथ्वी तर घेतलीच; परंतु यातून हेच सिद्ध केले की, सन्मार्गावरून चालणार्या पुरुषांना, समर्थ पुरुषसुद्धा याचनेशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांच्या स्थानापासून हटवू शकत नाहीत. (१७)
नार्थो बलेरयमुरुक्रमपादशौचम् ।
आपः शिखाधृतवतो विबुधाधिपत्यम् । यो वै प्रतिश्रुतमृते न चिकीर्षदन्यद् । आत्मानमङ्ग शिरसा हरयेऽभिमेने ॥ १८ ।
राजा बळी धरिपदा अपुल्या शिरासी तेणे तयास मिळले मग इंद्रस्थान । शुके स्वयेंहि-गुरुने अडवोनि त्यासी नाही परी बदलला बळि देहार्पी ॥ १८ ॥
उरुक्रमपादशौचं - वामनाचे पाय धुवून पवित्र झालेले - आपः - उदक - शिखा - मस्तकावर - धृतवतः - धारण करणार्या - बलेः - बलीचा - विबुधाधिपत्यं - देवांचे आधिपत्य - अयं अर्थः न - हा काही महत्त्वाचा अर्थ नव्हता - अंग - हे नारदा - यः - जो - प्रतिश्रुतं - प्रतिज्ञा केलेल्या - ऋते - शिवाय - अन्यत् - दुसरे - न - नाही - चिकीर्षत् - करू इच्छिणारा - शिरसा - मस्तकाने - आत्मानं - स्वतःला - हरये - हरीप्रीत्यर्थ - वै - खरोखर - अभिमेने - मानता झाला. ॥१८॥
हे नारदा, दैत्यराज बलीने आपल्या डोकावर वामनांचे चरणतीर्थ घेतले. किंवा तो देवतांचा राजा होता, यात काही विशेष नाही. आपल्या दिलेल्या वचनाच्या विरुद्ध काही करण्यास तो तयार नव्हता. एवढेच काय, भगवंतांचे तिसरे पाऊल ठेवण्यासाठी त्याने आपले मस्तक देऊन स्वतःलाही भगवंतांना समर्पित केले, यातच त्याचा खरा पुरुषार्थ आहे. (१८)
तुभ्यं च नारद भृशं भगवान्विवृद्ध ।
भावेन साधु परितुष्ट उवाच योगम् । ज्ञानं च भागवतमात्मसतत्त्वदीपं । यद्वासुदेवशरणा विदुरञ्जसैव ॥ १९ ॥
तो प्रेमभाव बघुनी तुज पावला तो घेऊनि हंस रुप ते तुज बोध केला । तो हाचि भागवतधर्म पुढे निघाला तो पावतोचि शरणागत त्यास नित्य ॥ १९ ॥
नारद - हे नारदा - च - आणि - भृशं - अत्यंत - विवृद्धभावेन - वाढलेल्या भक्तीने - परितुष्टः - संतुष्ट झालेला - भगवान् - परमेश्वर - तुभ्यं - तुला - योगं - भक्तियोगविषयक ज्ञान - च - आणि - आत्मसतत्त्वदीपं - आत्मतत्त्वाला प्रकाशित करणार्या - भागवतं - भगवंतासंबंधी - ज्ञानं - ज्ञानाला - साधु - चांगल्या रीतीने - उवाच - बोलला - वासुदेवशरणाः एव - भगवंताला शरण गेलेले भगवद्भक्त सुद्धा - अञ्जसा - तत्काळ - यत् - ज्याला - विदुः - जाणतात. ॥१९॥
नारदा, तुझ्या अत्यंत प्रेमभावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंतांनी तुला योग, ज्ञान आणि आत्मतत्त्वाला प्रकाशित करणार्या भागवतधर्माचा उपदेश केला. भगवंतांच्या शरणागत भक्तांनाच हा सुलभतेने प्राप्त होतो. (१९)
चक्रं च दिक्ष्वविहतं दशसु स्वतेजो ।
मन्वन्तरेषु मनुवंशधरो बिभर्ति । दुष्टेषु राजसु दमं व्यदधात्स्वकीर्तिं । सत्ये त्रिपृष्ठ उशतीं प्रथयंश्चरित्रैः ॥ २० ॥
स्वायंभुवादि मनुच्याहि रुपात तेणे रक्षीयला मनुजवंश सुदर्शनाने । ती कीर्तिही पसरली नि त्रिलोक गाजे होताचि भार पृथिवीस पुन्हाहि जन्मे ॥ २० ॥
च - आणि - मनुवंशधरः - मनुवंशाला धारण करणारा - मन्वन्तरेषु - अनेक मन्वंतरांच्या काळात - दशसु - दहाहि - दिक्षु - दिशांमध्ये - अविहृतं - अकुंठित - स्वतेजः - स्वसामर्थ्यानेच चकाकणार्या - चक्रं - चक्राला - बिभर्ति - धारण करतो म्हणजे सत्ता गाजवितो - चरित्रैः - आपल्या आचरणांनी - उशतीं - सुंदर - स्वकीर्तिं - स्वतःच्या यशाला - त्रिपृष्ठे - त्रैलोक्याचा पृष्ठभाग अशा - सत्ये - सत्यलोकात - प्रथयन् - प्रसिद्धीला नेणारा - दुष्टेषु - दुराचारी - राजसु - राजांचे ठिकाणी - दमं - दंडाला - व्यदधात् - करिता झाला. ॥२०॥
तेच भगवंत स्वायंभुव आदि मन्वंतरात मनूच्या रूपाने अवतार घेऊन मनुवंशाचे संरक्षण करीत आपल्या सुदर्शन चक्राच्या तेजाप्रमाणे दाही दिशांना विनासायास निष्कंटक असे राज्य करतात. तिन्ही लोकांच्या वर असणार्या सत्यलोकापर्यंत त्यांच्या चरित्राची उज्ज्वल कीर्ति पसरते आणि त्याच रूपात ते वेळोवेळी पृथ्वीला सारभूत झालेल्या राजांचे दमनही करतात. (२०)
धन्वन्तरिश्च भगवान् स्वयमेव कीर्तिः ।
नाम्ना नृणां पुरुरुजां रुज आशु हन्ति । यज्ञे च भागममृतायुरवावचन्ध । आयुश्च वेदमनुशास्त्यवतीर्य लोके ॥ २१ ॥
स्वनाम धन्य भगवान् धनवंतरी ने तेंव्हा बहू कठिण रोग निवारिले ते । देवां सुधा पिववुनी अमरत्व देई तो आयुवेद पुढती जगतास लाभे ॥ २१ ॥
स्वयम् एव - स्वतःच - कीर्ति - कीर्तिरूप असा - भगवान् - परमेश्वर - धन्वन्तरिः - धन्वन्तरी नावाचा - पुरुरुजां - फारच रोगग्रस्त अशा - नृणां - मनुष्यांच्या - रुजः - रोगांना - नाम्ना - नामस्मरणाने - आशु - तत्काळ - हन्ति - नष्ट करितो - च - आणि - अमृतायुः - ज्यापासून आयुष्यांतील मृत्यू दूर होतो असा - यज्ञे - यज्ञात - अव - बंद केलेल्या - भागं - हविर्भागाला - अवरुन्धे - मिळवितो - च - आणि - लोके - मृत्यूलोकात - अवतीर्य - अवतार घेऊन - आयुः वेदं - आयुर्वेदाला म्हणजे वैदयशास्त्राला - अनुशास्ति - प्रवृत्त करतो. ॥२१॥
स्वतःच्या नावाने धन्य झालेले धन्वन्तरी आपल्या केवळ नावानेच मोठमोठ्या रोग्यांच्या रोगांना ताबडतोब नष्ट करतात. त्यांनी देवतांना अमृत पाजून अमर केले आणि दैत्यांनी हरण केलेला यज्ञभाग देवांना पुन्हा मिळवून दिला. त्यांनीच अवतार घेऊन या जगात आयुर्वेद प्रकट केला. (२१)
क्षत्रं क्षयाय विधिनोपभृतं महात्मा ।
ब्रह्मध्रुगुज्झितपथं नरकार्तिलिप्सु । उद्धन्त्यसाववनिकण्टकमुग्रवीर्यः । त्रिःसप्तकृत्व उरुधारपरश्वधेन ॥ २२ ॥
जेंव्हा जगात द्विजद्वेष घडे स्वकर्मे । काटे असे परशुन् मग छेदितो तो तो होतसे परशुराम सक्रोधरूपी ॥ २२ ॥
उग्रवीर्यः - अत्यंत पराक्रमी - महात्मा - मोठया मनाचा - असौ - हा - उज्झितपथं - सोडला आहे सन्मार्ग ज्याने अशा - ब्रह्मध्रुक् - ब्राह्मणांचा व्देष करणार्या - नरकार्तिलिप्सु - नरकाच्या पीडांची इच्छा करणार्या - अवनिकण्टकं - पृथ्वीवर काटयाप्रमाणे दुःख देणार्या - विधिना - दैवाने - क्षयाय - नाशाकरिता - उपभृतं - साठविलेल्या - क्षत्रं - क्षत्रियाच्या समूहाला - उरुधारपरश्वधेन - तीक्ष्ण धारेच्या कुर्हाडीने - त्रिःसप्तकृत्वः - एकवीस वेळा - उद्धन्ति - समूळ मारून टाकतो. ॥२२॥
जेव्हा जगात ब्राह्मणद्रोही, आर्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे व त्यामुळे नरकयातना भोगू इच्छिणारे क्षत्रिय आपल्या नाशालाच दैववशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेच बनून राहिले, तेव्हा भगवंतांनी महापराक्रमी परशुरामाच्या रूपात अवतीर्ण होऊन आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशूने एकवीस वेळा त्यांचा संहार केला. (२२)
अस्मत्प्रसादसुमुखः कलया कलेश ।
इक्ष्वाकुवंश अवतीर्य गुरोर्निदेशे । तिष्ठन् वनं सदयितानुज आविवेश । यस्मिन् विरुध्य दशकन्धर आर्तिमार्च्छत् ॥ २३ ॥
आम्हा प्रबोध करण्या अवतार घेई इक्ष्वाकुळी भरत लक्ष्मणाच्या सहीत । आज्ञा म्हणोनि रिघला वनि राहण्याला त्यासी विरोध करिता वधि राक्षसांना ॥ २३ ॥
कलेशः - षोडश कलांचा अधिपति असा परमेश्वर - अस्मत्प्रसादसुमुखः - आमच्यावर प्रसाद करण्यास उदयुक्त झालेला असा होत्साता - कलया - अंशाने - इक्ष्वाकुवंशे - इक्ष्वाकुवंशात - अवतीर्य - अवतार घेऊन - गुरोः - पित्याच्या - निददे - आज्ञेत - तिष्ठन् - राहणारा - सदयितानुजः - पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांसह - वनं - अरण्याला - आविवेश - गेला - दशकन्धरः - दहा तोंडाचा रावण - यस्मिन् - जेथे - विरुद्ध्य - विरोध करून - आर्तिं - पीडेला - आर्च्छत् - मिळविता झाला. ॥२३॥
मायापती भगवंत आमच्यावर कृपा करण्यासाठी भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण या आपल्या कलांसहित श्रीरामांच्या रूपाने इक्ष्वाकुवंशात अवतीर्ण झाले. या अवतारात आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ते पत्नी आणि बंधू यांसह वनवासात गेले. त्याच वेळी त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून रावण त्यांच्या हातून मृत्युमुखी पडला. (२३)
यस्मा अदादुदधिरूढभयाङ्गवेपो ।
मार्गं सपद्यरिपुरं हरवद् दिधक्षोः । दूरे सुहृन्मथितरोष सुशोणदृष्ट्या । तातप्यमानमकरोरगनक्रचक्रः ॥ २४ ॥
सीतावियोग घडता फिरला वनात जै शंकरे त्रिपुर जळियले विमान । तैसे तदा नयनिलाल दिसेहि राम ती तप्त दृष्टि बघता जळि जीव मेले ॥ २४ ॥
हरवत् - शङ्कराप्रमाणे - अरिपुरं - शत्रुनगरीला - दिधक्षोः - जाळून टाकण्याची इच्छा करणार्यापासून - ऊढभयाङ्गवेपः - मोठया भीतीमुळे प्राप्त झाला आहे शरीरकंप ज्याला असा - दूरेसुहृन्मथितरोषसुशोणदृष्टया - प्रिय वस्तु दूर राहिल्यामुळे वाढलेल्या क्रोधाने लाल झालेल्या दृष्टीने - तातप्यमानमकरोरगनक्रचक्रः - संतप्त झाले आहेत मगर, सर्प, नक्र वगैरे जलचरांचे समूह ज्यात असा - उदधिः - समुद्र - सपदि - तत्काळ - यस्मै - ज्याला - मार्गं - मार्ग - अदात् - देता झाला. ॥२४॥
जसे भगवान शंकर त्रिपुर विमानाला जाळण्यासाठी उद्युक्त झाले, तसे ज्यावेळी भगवान राम शत्रूची नगरी लंकेला भस्मसात करण्यासाठी समुद्रावर पोहोचले, त्यावेळी सीतेच्या वियोगाने क्रुद्ध झालेल्या रामांचे डोळे इतके लाल झाले की, त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने समुद्रातील मासे, साप आणि मगरी इत्यादी जीव पोळू लागले आणि भयाने थरथर कापणार्या समुद्राने लगेच त्यांना वाट करून दिली. (२४)
वक्षःस्थलस्पर्शरुग्णमहेन्द्रवाह ।
दन्तैर्विडम्बितककुब्जुष ऊढहासम् । सद्योऽसुभिः सह विनेष्यति दारहर्तुः । विस्फूर्जितैर्धनुष उच्चरतोऽधि सैन्ये ॥ २५ ॥
तो इंद्रवाह टकरे जधि रावणाच्या वक्षस्थलास तयि भग्नचि दात झाले । तो गर्व त्यास भवला समरांगणात एका शरेचि हरितो हरि प्राण गर्व ॥ २५ ॥
धनुषः - धनुष्याच्या - विस्फूर्जितैः - टणत्कारांनी - अधिसैन्ये - उभय सैन्यामध्ये - उच्चरतः - वेगाने चालणार्या - दारहर्तुः - स्त्रीला हरण करणार्या रावणाच्या - वक्षःस्थलस्पर्शरुग्णमहेन्द्रवाहदन्तैः - वक्षःस्थलाला स्पर्श झाल्यामुळे भग्न झालेल्या ऐरावताच्या दातांनी - विडम्बितककुब्जयरूढहासम् - अनुकरण केले आहे ज्याचे अशा आपल्या दिग्विजयामुळे उत्पन्न झालेल्या हास्याला - असुभिः सह - प्राणांसह - सदयः - तत्काळ - विनेष्यति - दूर करील. ॥२५॥
जेव्हा रावणाच्या कठीण छातीला टक्कर दिल्याने इंद्राचे वाहन ऐरावत याच्या दातांचा चक्काचूर होऊन ते सगळीकडे पसरतील, त्यामुळे दिशाही पांढर्या शुभ्र होतील, तेव्हा विजयी रावण गर्वाने फुगून जाऊन हसू लागेल. आपल्या पत्नीला पळवणार्या त्या रावणाचा तो उद्दामपणा भगवान श्रीराम धनुष्याच्या टणत्कारानेच प्राणांसह तत्काळ नाहीसा करतील. (२५)
भूमेः सुरेतरवरूथविमर्दितायाः ।
क्लेशव्ययाय कलया सितकृष्णकेशः । जातः करिष्यति जनानुपलक्ष्यमार्गः । कर्माणि चाऽऽत्ममहिमोपनिबन्धनानि ॥ २६ ॥
झुंडी जधी पृथिविते छळिती असूरी तै श्वेत-कृष्णकच तो अवतार घेई । लीला तदा घडवितो अतिरम्य ऐशा कोणा कळे न कधिही महिमा तयाची ॥ २६ ॥
सुरेतरवरूथविमर्दितायाः - दैत्यसमूहांनी पीडिलेल्या - भूमेः - पृथ्वीचे - क्लेशव्ययाय - क्लेश दूर करण्याकरिता - सितकृष्णकेशः - पांढरे व काळे आहेत केस ज्याचे असा ईश्वर - कलया - अंशासह - जातः - झाला - च - आणि - जनानुपलक्ष्यमार्गः - लोकांना न समजणारा आहे मार्ग ज्याचा असा - आत्ममहिमोपनिबन्धनानि - आपले माहात्म्य स्पष्ट करणारी - कर्माणि - कर्मे - करिष्यति - करील. ॥२६॥
दैत्यांच्या झुंडींनी त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी कृष्णवर्ण भगवान गौरवर्ण बलरामासह अवतार ग्रहण करतील. ते आपला महिमा प्रगट करणार्या अद्भूत लीला करतील. त्या लीला लोकांना बिलकूल समजू शकणार नाहीत. (२६)
तोकेन जीवहरणं यदुलूकिकायाः ।
त्रैमासिकस्य च पदा शकटोऽपवृत्तः । यद् रिङ्गतान्तरगतेन दिविस्पृशोर्वा । उन्मूलनं त्वितरथाऽर्जुनयोर्न भाव्यम् ॥ २७ ॥
तो बालरूप पुतना वधिली तयाने गाडा पदे उचलिला दुर फेकिलाही भारी तरु उखडिले नवलाव केला तो-तोचि हे करु शके इतरा न शक्य ॥ २७ ॥
तोकेन - लहान असताना - यत् - जे - उलूकिकायाः - पूतनेचे - जीवहरणं - प्राणहरण केले - च - आणि - त्रैमासिकस्य - तीन महिन्याचा असताना - पदा - पायाने - शकटः - गाडा - अपवृत्तः - उलटा केला - वा - अथवा - रिंगता - रांगत असताना - दिविस्पृशोः - आकाशापर्यंत उंच गेलेल्या - अर्जुनयोः - यमलार्जुनांच्या - अंतरगतेन - मध्येच जाऊन - यत् - जे - उन्मूलनं - त्यांना उपटून टाकिले - इतरथा - अन्य कल्पनेने म्हणजे तो ईश्वरी अंश नसेल तर - न भाव्यं - संभवनीय नाही. ॥२७॥
बालपणातच पूतनेचे प्राण हरण करणे, तीन महिन्याच्या वयात पायाने भलामोठा छकडा उलटून टाकणे आणि गुडघ्यांवर रांगता रांगता आकाशाला भिडलेल्या यमलार्जुन वृक्षांमध्ये जाऊन त्यांना उखडून टाकणे, अशी कर्मे भगवंतांशिवाय अन्य कोणीही करू शकणार नाही. (२७)
यद्वै व्रजे व्रजपशून् विषतोयपीतान् ।
पालांस्त्वजीव यदनुग्रहदृष्टिवृष्ट्या । तच्छुद्धयेऽतिविषवीर्य विलोलजिह्वम् । उच्चाटयिष्यदुरगं विहरन् ह्रदिन्याम् ॥ २८ ॥
ते वीष मिश्रित जलो पिउनी नदीते मले स्थळीच सखये-शिशु-गोपबाळ । त्यांना सुधामयिकृपे जिवदान केले सापास हाकलुनिया जळ शुद्ध केले ॥ २८ ॥
यत् - जे - व्रजे - गोकुळात - अनुग्रहदृष्टिवृष्टया - कृपायुक्त अशा कटाक्षाच्या वर्षावाने - विषतोयपीथान् - विषजलांचे प्राशन करणार्या - व्रजपशून् - गोकुळातील गाई, बैल इत्यादिकांना - पालान् - गोपाळांना - तु - तर - वै - खरोखर - अजीवयत् - जिवंत करिता झाला - च - आणि - यत् - ज्यामुळे - हृदिन्यां - यमुनानदीत - तच्छुद्धये - तिच्या शुद्धीकरिता - विहरन् - क्रीडा करणारा - अतिविषवीर्यविलोलजिव्हं - तीव्र विषाच्या तेजाने ज्याची जीभ सारखी हलत आहे अशा - उरगं - कालियानामक सर्पाला - उच्चाटयिष्यत् - घालवून देईल. ॥२८॥
जेव्हा कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनेच पाणी पिऊन वासरे आणि गोपबालक मरतील, तेव्हा आपल्या अमृतमय कृपादृष्टीनेच ते त्यांना जिवंत करतील आणि यमुनेचे पाणी शुद्ध करण्यासाठी त्या जलात विहार करतील आणि विषशक्तीने जीभ हलविणार्या कालियानागाला तेथून हुसकून लावतील, (२८)
तत्कर्म दिव्यमिव यन्निशि निःशयानं ।
दावाग्निना शुचिवने परिदह्यमाने । उन्नेष्यति व्रजमतोऽवसितान्तकालं । नेत्रे पिधाप्य सबलोऽनधिगम्यवीर्यः ॥ २९ ॥
लागे तृणास वनवा जधि तो महान गोपाळ नेत्र मिटता गिळिलाहि अग्नि । रक्षीयलेचि हरिने सगळ्या जिवांना ऐशा अतर्क्य घडवी नवलाव लीला ॥ २९ ॥
यत् - जे - अनधिगम्यवीर्यः - अगम्य आहे पराक्रम ज्याचा असा - सबलः - बलरामासह श्रीकृष्ण - शुचि वने दावाग्निना परिदह्यमाने - उन्हाळ्यात सुकून गेलेले अरण्य वणव्याने दग्ध होत असता - निशि - रात्री - निःशयानं - झोपलेल्या - अतः - म्हणून - अवसितान्तकालं - ज्यांचा अंतकाळ जवळ आला आहे अशा - व्रजं - गोकुळाला - नेत्रे - डोळे - पिधाय्य - मिटायला लावून - उन्नेष्यति - बाहेर नेईल - तत् - ते - कर्म - कार्य - दिव्यम् इव - अलौकिकच होय. ॥२९॥
त्याच दिवशी रात्री जेव्हा सर्व लोक तेथेच यमुनातटावर निद्रिस्त होतील आणि दावाग्नी भडकल्याने सर्व मुंजवन चारी बाजूंनी जळू लागेल, तेव्हा बलरामासह, त्या प्राणसंकटांत सापडलेल्या व्रजवासीयांना त्यांचे डोळे बंद करावयास सांगून, ते त्यांना गोकुळात नेतील. ही त्यांची लीला तर अलौकिकच असेल. कारण त्यांची शक्ति अचिंत्य आहे. (२९)
गृह्णीत यद् यदुपबन्धममुष्य माता ।
शुल्बं सुतस्य न तु तत् तदमुष्य माति । यज्जृम्भतोऽस्य वदने भुवनानि गोपी । संवीक्ष्य शंकितमनाः प्रतिबोधिताऽऽसीत् ॥ ३० ॥
बांधी तयास जननी जधि दोरखंडे जोडास जोड करुनी नपुरे हरीला । कृष्णांमुखीं बघितले जधि येश्वदेने पाहूनि विश्व सगळे भयभीत झाली ॥ ३० ॥
अमुष्य - ह्या श्रीकृष्णाची - माता - आई यशोदा - यत् यत् - ज्या ज्या - उपबन्धं - बंधन करण्याजोग्या - शुल्बं - दोरीला - गृह्णीत - घेईल - तत् तत् - ती ती - अमुष्य - ह्या - सुतस्य - पुत्र जो श्रीकृष्ण त्याच्या - तु - तर - न माति - परिमाणाला पुरेशी होणार नाही - यत् - ज्यावेळी - गोपी - नंदपत्नी यशोदा - जृम्भृतः - जांभई देणार्या - अस्य - ह्याच्या - वदने - मुखात - भुवनानि - चौदा भुवनाना - संवीक्ष्य - पाहून - शङ्कितमनाः - साशंक अशा अंतःकरणाची होत्साती - प्रबोधिता - ज्ञानसंपन्न अशी - आसीत् - झाली. ॥३०॥
त्यांना बांधण्यासाठी म्हणून त्यांची माता जी जी दोरी आणील, ती ती त्यांच्या पोटाला पुरणार नाही. तसेच जांभई देतेवेळी श्रीकृष्णांच्या मुखामध्ये चौदा भुवने पाहून यशोदा प्रथम भयग्रस्त होईल, पण नंतर ते तिला आपल्या सामर्थ्याचा बोध करवतील. (३०)
नन्दं च मोक्ष्यति भयाद् वरुणस्य पाशात् ।
गोपान् बिलेषु पिहितान् मयसूनुना च । अह्न्यापृतं निशि शयानमतिश्रमेण । लोकं विकुण्ठ मुपनेष्यति गोकुलं स्म ॥ ३१ ॥
सर्पो तसेचि वरुणासह देवतांच्या पाशातुनी निजपित्या करि मुक्त कृष्ण । गुफेत बंद करिता जधि गोपबाळे व्योमासुरे तयिहि श्रीहरि सोदवी तो । गोकूळवासि जन ते श्रमती दिनासी रात्रीस ते थकुनिया मग झोप घेती । त्यांना कुठे समय साधन योग घेण्या त्यांनाहि मोक्ष दिधला नवलाव पाही ॥ ३१ ॥
च - आणखी - वरुणस्य - वरुणाच्या - पाशात् - पाशापासून उत्पन्न झालेल्या - भयात् - भीतीपासून - नन्दं - नन्दाला - च - आणि - मयसूनुनां - मयासुराचा पुत्र जो व्योमासुर त्याने - बिलेषु - गुहेत - पिहितान् - कोंडून ठेवलेल्या - गोपान् - गोपांना - मोक्ष्यति - मुक्त करील - च - आणि - अन्हि - दिवसा - आपृतं - स्वकार्यात गढून गेलेल्या - अतिश्रमेण - फारच थकून गेल्यामुळे - निशि - रात्री - शयानं - झोपी गेलेल्या - गोकुलं - गोकुळाला - विकुण्ठे - विष्णूच्या - लोके - लोकात - उपनेष्यति स्म - नेईल. ॥३१॥
ते नंदबाबांना अजगराच्या भयापासून आणि वरुणाच्या पाशातून सोडवतील. मग दानवाचा पुत्र व्योमासुर जेव्हा गोपबालकांना पहाडाच्या गुहेत बंद करून ठेवील, तेव्हा ते त्यांना तेथून वाचवतील. दिवसभर कामधंद्यात व्यग्र असणार्या गोकुळातील लोकांना, ते आपल्या परमधामाला घेऊन जातील. (३१)
गोपैर्मखे प्रतिहते व्रजविप्लवाय ।
देवेऽभिवर्षति पशून् कृपया रिरक्षुः । धर्तोच्छिलीन्ध्रमिव सप्तदिनानि सप्त । वर्षो महीध्रमनघैककरे सलीलम् ॥ ३२ ॥
निष्पाप नारद पहा जधि कृष्णबोधे केले न इंद्रवना वज्रि गोप यांनी । क्रोधे करी शतमखो दगडीच वृष्टी संरक्षणा हरि धरी नखि गोगिरीला ॥ ३२ ॥
अनघ - हे निष्पाप नारदा - गोपैः - गोपांनी - मखे प्रतिहते - यज्ञ बंद पाडला असता - व्रजविप्लवाय - गोकुळाला बुडवून टाकण्याकरिता - देवे अभिवर्षति - इंद्र पुष्कळ पाऊस पाडीत असता - कृपया - दयाळूपणाने - पशून् - गाईना - रिरक्षुः - राखण्यास इच्छणारा - सप्तवर्षः - सात वर्षांचा श्रीकृष्ण - सप्त दिनानि - सात दिवस - महीध्रं - गोवर्धन पर्वताला - एककरे - एकाच हातावर - उच्छिलीन्ध्रम् इव - छत्रीसारख्या अलबेंनामक वनस्पतीप्रमाणे - सलीलं - सहज श्रमाशिवाय - धर्ता - धरील. ॥३२॥
हे निष्पाप नारदा, जेव्हा श्रीकृष्णांच्या सल्ल्यावरून गोपलोक इंद्रासाठीचा यज्ञ बंद करतील, तेव्हा इंद्र व्रजभूमी बुडविण्यासाठी चारी बाजूंनी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात करील. त्यावेळी गोपांचे आणि त्यांच्या पशूंचे रक्षण करण्यासाठी सात वर्षांचे कृपाळू भगवंत सात दिवसपर्यंत गोवर्धन पर्वत, एकाच हाताने पावसाळी छत्री धरल्याप्रमाणे लीलेने धारण करतील. (३२)
क्रीडन् वने निशि निशाकररश्मिगौर्यां ।
रासोन्मुखः कलपदायतमूर्च्छितेन । उद्दीपितस्मररुजां व्रजभृद्वधूनां । हर्तुर्हरिष्यति शिरो धनदानुगस्य ॥ ३३ ॥
वृंदावनी विहरता मग चांदण्यात वंशीत गीत मधुरो करिता तयाने । प्रेमे विबद्ध बनुनी मग गोपि येती शंखाचुडे सतविता वधिले तयाला ॥ ३३ ॥
निशाकररश्मिगौर्यां - चंद्राच्या किरणांनी शुभ्रवर्ण दिसणार्या - निशि - रात्री - वने - कुंजवनात - क्रीडन् - खेळणारा - रासोन्मुखः - रासक्रीडा करण्यास उत्सुक झालेला श्रीकृष्ण - कलपदायतमूर्च्छितेन - मधुर स्वर, तान, मूर्छना इत्यादि प्रकारांनी - उद्दीपितस्मररुजां - वाढली आहे कामपीडा ज्यांची अशा - व्रजभृव्दधूनां - गोपस्त्रियांचे - हर्तुः - हरण करणार्या - धनदानुगस्य - कुबेरसेवक जो शंखचूड यक्ष त्याच्या - शिरः - मस्तकाला - हरिष्यति - हरण करील. ॥३३॥
वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी रास करण्याच्या इच्छेने जेव्हा चंद्राचे टिपूर चांदणे सगळीकडे पसरलेले असेल, तेव्हा ते आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ तान घेतील. ही तान ऐकून प्रेमविह्वल होऊन आलेल्या गोपींचे कुबेराचा सेवक शंखचूड जेव्हा हरण करील, तेव्हा ते त्याचे मस्तक उडवतील. (३३)
ये च प्रलम्बखरदर्दुरकेश्यरिष्ट ।
मल्लेभकंसयवनाः कपिपौण्ड्रकाद्याः । अन्ये च शाल्वकुजबल्वलदन्तवक्र । सप्तोक्षशम्बरविदूरथ रुक्मिमुख्याः ॥ ३४ ॥ ये वा मृधे समितिशालिन आत्तचापाः । काम्बोजमत्स्यकुरुकैकयसृञ्जयाद्याः । यास्यन्त्यदर्शनमलं बलपार्थभीम । व्याजाह्वयेन हरिणा निलयं तदीयम् ॥ ३५ ॥
चाणूर धेनुक बको अन तो प्रलंब केशी नि कालयवनादिक कंस मामा । भौमासुरो द्विविदवानर दंतवक्त्र शाल्वो नि रुक्मि कुरु कैकय सृजयादी ॥ ३४ ॥ येती जधी धनुष घेउनिया लढाया भीमार्जुना सहमते वधिही तयांना । लीला करोनि असल्या हरि तो निघेही वैकुठधामी निज जे स्वयमेव एक ॥ ३५ ॥
च - आणि - ये - जे - प्रलम्बखरदर्दुरकेश्यरिष्टमल्लेभकंसयवनाः - प्रलंब, खर, दर्दुर, केशी, अरिष्ट, मोठमोठे मल्ल, मत्तगज, कंस, व कालयवन हे सर्व - कुजपौंण्ड्रकादयाः - भौमासुर, पौंड्रक, आदिकरून - च - आणि - अन्ये - दुसरे - शाल्वकपिबल्वदन्तवक्रसप्तोक्षशम्बरविदूरथरुक्मिमुख्याः - शाल्व, व्दिविद, वानर, बल्वल, वक्रदंत, सात बैल, शम्बर, विदूरथ, व रुक्मि हे आहेत मुख्य ज्यात असे - वा - किंवा - ये - जे - शमितिशालिनः - युद्धकुशल - मृधे - युद्धात - आत्तचापाः - धनुर्धारी - काम्बोजमत्स्यकुरुकैकसृञ्जयादयाः - काम्बोज, मत्स्य, कुरु, कैकय, व सृञ्जय इत्यादी - बलभीमपार्थव्याजाव्हयेन - बलराम, भीमसेन, अर्जुन अशा स्वरूपाने अनेक नावे धारण करणार्या - हरिणा - कृष्णावतारी परमेश्वराकडून - अलं - अत्यंत - अदर्शनं - नाशाला - तदीयं - श्रीकृष्णाच्या वैकुंठसंज्ञक - निलयं - स्थानाला - यास्यन्ति - जातील. ॥३४-३५॥
आणखीही पुष्कळ पलंबासुर, धेनुकासुर, बकासुर, केशी, अरिष्टासुर इत्यादि दैत्य, चाणूरादि पहिलवान, कुवलयापीड नावाचा हत्ती, कंस, कालयवन, भौमासुर, मिथ्यावासुदेव, शाल्व, द्विविद वानर, बल्वल, दंतवक्र, राजा नग्नजिताचे सात बैल, शंबरासुर, विदूरथ आणि रुक्मी तसेच कांबोज इत्यादि, मत्स्य, कुरू, कैकेय आणि सृंजय आदि देशांचे राजे, तसेच जे जे योद्धे धनुष्य धारण करून रणांगणात समोर येतील, ते सर्व बलराम, भीमसेन, आणि अर्जुन आदी नावांच्या आडून भगवंतांच्या कडून मारले जाऊन त्यांच्याच धामाला जातील. (३४-३५)
कालेन मीलितधियामवमृश्य नॄणां ।
स्तोकायुषां स्वनिगमो बत दूरपारः । आविर्हितस्त्वनुयुगं स हि सत्यवत्यां । वेदद्रुमं विटपशो विभजिष्यति स्म ॥ ३६ ॥
हे कालचक्र कलिचे समजूत गेली आयू कमीच अन वेद नजाणि कोणी । प्रत्येक कल्प सरता उदरी सतीच्या येऊनि वेद कथितो मग व्यास रूपे ॥ ३६ ॥
अनुयुगं - प्रत्येक युगात - कालेन - कालाने - मीलितधियां - संकुचित बुद्धीच्या - स्तोकायुषां - अल्पायु अशा - नृणां - मनुष्यांस - स्वनिगमः - आपला हा वेदराशि - बत - खरोखर - दूरपारः - दुर्बोध - अवमृश्य - असा विचार करून - सः - तो - तु - तर - सत्यवतां - सत्यवतीचे ठिकाणी - आविर्हितः - प्रगट झाला - वेदद्रुमं - वेदवृक्षाचे - विटपशः - शाखाभेदाने - हि - निःसंशय - विभजिष्यति स्म - विभाग करील. ॥३६॥
काळाच्या ओघात लोकांची ग्रहणशक्ति कमी होत जाते, आयुष्यही कमी होऊ लागते, त्यावेळी भगवंत असे पाहतात की, आता हे लोक माझे तत्त्व सांगणारी वेदवाणी समजण्यास असमर्थ आहेत. तेव्हा प्रत्येक कल्पामध्ये सत्यवतीच्या ठिकाणी व्यासांच्या रूपाने प्रगट होऊन ते वेदरूपी वृक्षाचे विभिन्न शाखांमध्ये विभाजन करतील. (३६)
देवद्विषां निगमवर्त्मनि निष्ठितानां ।
पूर्भिर्मयेन विहिताभिरदृश्यतूर्भिः । लोकान् घ्नतां मतिविमोहमतिप्रलोभं । वेषं विधाय बहु भाष्यत औपधर्म्यम् ॥ ३७ ॥
देवास जे असुनि शत्रु नि वेद मार्गी राहूनिही नगर ग्राम करीत भ्रष्ट । बुद्धावतार धरुनी शिकवेल त्यांना तो वेष कांहि अगळा विलसेल लोकी ॥ ३७ ॥
निगमवर्त्मनि - वेदमार्गात - निष्ठितानां - राहणार्या - मयेन - मयासुराने - विहिताभिः - केलेल्या - अदृश्यतूर्भिः - अदृश्य गति असणार्या - पूर्भिः - नगरांनी - लोकान् - लोकांना - घ्नतां - मारणार्या - देवव्दिषां - दैत्यांच्या - मतिविमोहमतिप्रलोभं - बुद्धीला मोह व लोभ दर्शविणार्या - वेषं - वेषाला - विधाय - घेऊन - औपधर्म्यं - पाखंडधर्माला - बहु - पुष्कळ - भाष्यते - सांगेल. ॥३७॥
देवांचे शत्रू दैत्यसुद्धा वेदमार्गाचा आश्रय घेऊन मयदानवाने निर्माण केलेल्या, अदृश्य वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करू लागतील, तेव्हा भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि अत्यंत लोभ उत्पन्न करणारा वेष धारण करून बुद्धाच्या रूपाने पुष्कळशा उपधर्मांचा उपदेश करतील. (३७)
यर्ह्यालयेष्वपि सतां न हरेः कथाः स्युः ।
पाषण्डिनो द्विजजना वृषला नृदेवाः । स्वाहा स्वधा वषडिति स्म गिरो न यत्र । शास्ता भविष्यति कलेर्भगवान् युगान्ते ॥ ३८ ॥
पाखंडि ते तिन्हिहि वर्णि कलीस अंती होऊनि शुद्र करतील जगात राज्य । स्वाहा स्वधा हि नच ये स्वर कोठुनीही तैं कल्कि होऊनि पुढे करतील राज्य ॥ ३८ ॥
यर्हि - जर - सतां - साधूंच्या - अपि - सुद्धा - आलयेषु - घरात - हरेः - परमेश्वराच्या - कथाः - कथा - न स्युः - होणार नाहीत - व्दिजजनाः - व्दिज लोक - पाखण्डिनः - पाखंड मताचे होतील - वृषलाः - शूद्र - नृदेवाः - राजे होतील - यत्र - त्या काळी - स्वाहा - स्वाहाकार - स्वधा - स्वधाकार - वषट् - वषट्कार - इति - याप्रमाणे - गिरः - वाणीचे उच्चार - न स्म - होणार नाहीत - युगान्ते - युगाच्या शेवटी - भगवान् - परमेश्वर - कलेः - कलीचा - शास्ता - शासनकर्ता - भविष्यति - होईल. ॥३८॥
कलियुगाच्या शेवटी जेव्हा सत्पुरुषांच्या घरीसुद्धा भगवंतांचे कथा-कीर्तन होणार नाही, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे नास्तिक आणि शूद्र राजे होतील. एवढेच काय पण कोठेही ’स्वाहा’, ’स्वधा’ आणि ’वषट्कार’ चा ध्वनीही ऐकू येणार नाही, तेव्ह कलियुगाला शासन करण्यासाठी भगवंत "कल्कि" अवतार ग्रहण करतील. (३८)
सर्गे तपोऽहमृषयो नव ये प्रजेशाः ।
स्थाने च धर्ममखमन्वमरावनीशाः । अन्ते त्वधर्महरमन्युवशासुराद्या । मायाविभूतय इमाः पुरुशक्तिभाजः ॥ ३९ ॥
सर्गी तपी नि नऊ जन्म् प्रजापतींचे मी आणि त्या मरिचिसी हरि तोच रक्षी । तो धर्म विष्णु मनुदेव तसेचि राजे तो रुद्र क्रोध वश शेष लयासि होतो ॥ ३९ ॥
सर्गे - उत्पत्तिकार्यात - तपः - तपश्चर्या - ऋषयः - ऋषी - अहं - मी - ये - जे - नव - नऊ - प्रजेशाः - प्रजापति - च - आणि - स्थाने - रक्षणकार्यात - धर्ममखमन्वमरावनीशाः - धर्म, यज्ञरूपी विष्णु, चौदा मनु, देव व राजे - च - आणि - अन्ते - संहारकार्यात - तु - तर - अधर्महरमन्युवशासुरादयाः - अधर्म, शंकर, क्रोधाधीन क्रूर प्राणी, दैत्य इत्यादी - इमाः - ह्या - पुरुशक्तिभाजः - पुष्कळ शक्ति असणार्या - मायाविभूतयः - मायेच्या विभूति होत. ॥३९॥
जेव्हा विश्वरचनेची वेळ आलेली असते, तेव्हा तप, नऊ प्रजापती, मरीची आदि ऋषी आणि मी अशा रूपात; जेव्हा सृष्टिरक्षणाची वेळ असते तेव्हा धर्म, विष्णू, मनू, देवता आणि राजाच्या रूपात आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म, रुद्र आणि क्रोधवश नावाचे साप तसेच दैत्य आदिंच्या रूपात सर्वशक्तिमान भगवंतांच्या या विभूती मायेने प्रगट होतात. (३९)
विष्णोर्नु वीर्यगणनां कतमोऽर्हतीह ।
यः पार्थिवान्यपि कविर्विममे रजांसि । चस्कम्भ यः स्वरहसास्खलता त्रिपृष्ठं । यस्मात् त्रिसाम्यसदनाद् उरुकम्पयानम् ॥ ४० ॥
जैसे धुळीस कण ते न गणीच कोनी तैशा विभूति अवतार लिला कितेक । जेंव्हा त्रिविक्रमरुपा धरिले तयाने कंपीत विश्व गमले,मग शांत झाला ॥ ४० ॥
यः - जो - इह - येथे - पार्थिवानि - पृथ्वीसंबंधी - अपि - सुद्धा - रजांसि - रजःकणांना - विममे - मापता झाला - कतमः - कोणता - नु - खरोखर - कविः - विव्दान् पुरुष - विष्णोः - विष्णूच्या - वीर्यगणनां - पराक्रमांची गणती - अर्हति - करू शकतो - यः - जो विष्णु - अस्खलता - अढळ अशा - स्वरंहसा - आपल्या वेगाने - यस्मात् - ज्याअर्थी - त्रिसाम्यसदनात् - त्रिगुणांचे साम्य जीत आहे अशा प्रकृतिरूप आधारासह - उरु - पुष्कळ - कंपयानं - कांपणार्या - त्रिपृष्ठं - सत्यलोकाला - चस्कंभ - सावरून धरिता झाला. ॥४०॥
पृथ्वीवरील एकेक धूलिकण मोजू शकणाराही कोणता विद्वान भगवंतांच्या शक्तींची गणना करू शकेल ? जेव्हा भगवंत त्रिविक्रम अवतार घेऊन त्रैलोक्य पादाक्रांत करीत होते, त्यावेळी त्यांच्या पावलांच्या अफाट वेगामुळे प्रकृतिरूप अंतिम आवरणापासून ते सत्यलोकापर्यंत सर्व ब्रह्मांड थरथर कापू लागले होते. तेव्हा त्यांनीच आपल्या शक्तीने त्याला स्थिर केले. (४०)
नान्तं विदाम्यहममी मुनयोऽग्रजास्ते ।
मायाबलस्य पुरुषस्य कुतोऽपरे ये । गायन् गुणान् दशशतानन आदिदेवः । शेषोऽधुनापि समवस्यति नास्य पारम् ॥ ४१ ॥
ही सृष्टि तो रचियतो अन संहरेही सामर्थ्य मी नि सनाकादिक जाणिती ना । गातो हजार मुखिचा गुण ते सदैव ना तो तयाहि उमगे भगवंत रूप ॥ ४१ ॥
अहं - मी - मायाबलस्य - प्रकृतीवर सत्ता गाजविणार्या - पुरुषस्य - परमेश्वराच्या - अंतं - अंताला - न विदामि - जाणत नाही - अमी - हे - ते - तुझे - अग्रजाः - ज्येष्ठ बंधु - मुनयः - मरिच्यादि ऋषि - न - जाणत नाहीत - ये - ते - अपरे - दुसरे - कुतः - कसे जाणणार - गुणान् - गुणांना - गायन् - गाणारा - आदिदेवः - सर्वांच्या आदि असणारा - दशशताननः - हजार तोंडांचा - शेषः - शेष - अधुना - अजून - अपि - सुद्धा - अस्य - ह्याच्या - पारं - अंताला - न समवस्यति - प्राप्त होत नाही. ॥४१॥
समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया त्यांची एक शक्ती आहे. अशा अनन्त शक्तींचा आश्रय असलेल्या त्यांच्या स्वरूपाला मी जाणत नाही, तुझे ज्येष्ठ बंधू सनकादिकही जाणत नाहीत; तर इतर कोण जाणू शकेल ? आदिदेव भगवान शेष सहस्र मुखांनी त्यांच्या गुणांचे गायन करीत आहे; परंतु अजूनही त्याला त्यांचा पार लागलेला नाही. (४१)
येषां स एष भगवान् दययेदनन्तः ।
सर्वात्मनाऽश्रितपदो यदि निर्व्यलीकम् । ते दुस्तरामतितरन्ति च देवमायां । नैषां ममाहमिति धीः श्वशृगालभक्ष्ये ॥ ४२ ॥
जे भार ठेवूनि मनीं भगवंत रूपा सर्वस्व त्या पदि तया मग अर्पितात । जो श्वान पुत्र असला विसरूनि भाव भक्ती करी सतत त्यासचि देव पावे ॥ ४२ ॥
यदि - जर - निर्व्यलीकं - निष्कपटपणाने - सर्वात्मना - सर्वप्रकारे - आश्रितपदः - आश्रययोग्य आहेत पाय ज्याचे असा - सः - तो - एषः - हा - भगवान् - सर्वगुणसंपन्न - अनन्तः - ज्याचा अंत नाही असा परमेश्वर - येषां - ज्यांच्यावर - दययेत् - दया करील - ते - ते - दुस्तरां - तरण्यास कठीण अशा - देवमायां - परमेश्वराच्या मायेला - अतितरन्ति - तरून जातात - च - आणि - एषां - ह्यांची - श्वशृगालभक्ष्ये - कुत्रे, कोल्ही ह्यांनी भक्षण करण्यालायक अशा देहादिकावर - अहं मम इति - मी माझे अशी - धीः - बुद्धी - न - राहात नाही. ॥४२॥
जे निष्कपट भावाने सर्वस्वी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात, त्यांच्यावर जे अनंत भगवान स्वतःच दया करतात, असे भक्तच त्यांची दुस्तर माया तरून जातात. आणि अशा भक्तांचीच कोल्हाकुत्रांचे भक्ष्य असलेल्या देहाविषयी ’मी, माझे’ ही बुद्धी असत नाही. (४२)
वेदाहमङ्ग परमस्य हि योगमायां ।
यूयं भवश्च भगवानथ दैत्यवर्यः । पत्नी मनोः स च मनुश्च तदात्मजाश्च । प्राचीनबर्हि ऋभुरङ्ग उत ध्रुवश्च ॥ ४३ ॥ इक्ष्वाकुरैलमुचुकुन्दविदेहगाधि । रघ्वम्बरीषसगरा गयनाहुषाद्याः । मान्धात्रलर्कशतधन्वनुरन्तिदेवा । देवव्रतो बलिरमूर्त्तरयो दिलीपः ॥ ४४ ॥ सौभर्युतङ्कशिबिदेवलपिप्पलाद । सारस्वतोद्धवपराशरभूरिषेणाः । येऽन्ये विभीषणहनूमदुपेन्द्रदत्त । पार्थार्ष्टिषेणविदुरश्रुतदेव वर्याः ॥ ४५ ॥
त्याची अशीच सगळी नवलाव माया जाणी अगोदरचि मी नि पुन्हा तुम्ही ती । पश्चात शंकर मनू ध्रुव दैत्यबाळ प्राचीनबर्हि ऋभु ते सगळे पुन्हा की ॥ ४३ ॥ इक्ष्वाकु नी पुरुरवा मुचकुंद गाधी मांधात नी जनक सौभरि अंबरीष । अलर्क नी सगर आदि दिलीप भीष्म तै तो शिबी रघु अनू बलि रंतिदेव ॥ ४४ ॥ अर्जून नी विदुर श्रूत पराशारादी सारस्वतादि शतधन्व बिभीषणादी । उत्तंक धन्व हनुमान नि उद्धवाते ते थोर रूप प्रभुचे कळले महंता ॥ ४५ ॥
अङग - हे नारदा ! - हि - खरोखर - परमस्य - परमेश्वराच्या - योगमायां - योगमायेला - अहं - मी - वेद - जाणतो - यूयं - तुम्ही - च - आणि - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न - भवः - शंकर - अथ - नंतर - दैत्यवर्यः - दैत्यश्रेष्ठ प्रल्हाद - सः - तो - मनुः - स्वायंभुव मनु - मनोः - स्वायंभुव मनूची - पत्नी - स्त्री शतरूपा - च - आणि - तदात्मजाः - त्याचे पुत्र प्रियव्रतादि - च - आणि - प्राचीनबर्हिः - प्राचीनबर्हि - ऋभुः - ऋभु - अंग - अंग - उत - आणि - ध्रुवः - ध्रुव - ऐलमुचुकुन्दविदेहगाधिरघ्वंबरीषसगराः - ऐल, मुचुकुंद, जनक, गाधि, रघु, अंबरीष, सगर - गयनाहुषादयाः - गय, ययाति वगैरे - इक्ष्वाकुः - इक्ष्वाकु - मांधात्रलर्कशतधन्वनुरंतिदेवाः - मांधाता, अलर्क, शतधनु, अनु, रंतिदेव - देवव्रतः - भीष्म - बलिः - बलिराजा - अमूर्तरयः - अमूर्तरय - दिलीपः - दिलीप - सौभर्युतङकशिबिदेवल - सौभरी, उतंक, शिबि, देवल, - पिप्पलादसारस्वतोद्धवपराशरभूरिषेणाः - पिप्पलाद, सारस्वत, उद्धव, पराशर व भूरिषेण - ये - जे - अन्ये - दुसरे - बिभीषणहनूमदुपेन्द्रदत्त - बिभीषण, हनुमान, विष्णु, दत्त, - पार्थार्ष्टिषेणाविदुरश्रुतदेववर्याः - अर्जुन, आर्ष्टिषेण, विदुर, श्रुतदेव व दुसरेही श्रेष्ठ पुरुष. ॥४३-४५॥
प्रिय नारदा, परमपुरुषाच्या त्या योगमायेला मी, तुम्ही, भगवान शंकर, दैत्यकुलभूषण प्रह्लाद, शतरूपा, मनू, मनुपुत्र, प्राचीनबर्ही, ऋभू आणि ध्रुव जाणतात. (४३)
यांच्याशिवाय इक्ष्वाकू, पुरूरवा, मुचुकुंद, जनक, गाधी, रघू, अंबरीष, सगर, गय, ययाती, मांधाता, अलर्क, शतधन्वा, अनु, रन्तिदेव, भीष्म, बली, अमूर्तरय, दिलीप, सौभरी, उत्तंक, शिबी, देवल, पिप्पलाद, सारस्वत, उद्धव, पराशर, भूरिषेण, बिभीषण, हनुमान, शुकदेव, अर्जुन, आर्टिषेण, विदुर, श्रुतदेव इत्यादि महात्मेसुद्धा जाणतात. (४४-४५)
ते वै विदन्त्यतितरन्ति च देवमायां ।
स्त्रीशूद्रहूणशबरा अपि पापजीवाः । यद्यद्भुतक्रम परायणशीलशिक्षाः । तिर्यग्जना अपि किमु श्रुतधारणा ये ॥ ४६ ॥
ज्यांना मिळे गुरुकृपा भगवंत दीक्षा ते शूद्र भिल्ल अन हूण तशा स्त्रियाही । पापी असोत पशुपक्षिहि पार झाले ते संत साधु तरती तई काय शंका ॥ ४६ ॥
ते - ते - वै - खरोखर - देवमायां - ईश्वराच्या मायेला - विदन्ति - जाणतात - च - आणि - अतितरन्ति - उल्लंघितात - यदि - जरी - पापजीवाः - पापकर्मावर उपजीविका करणारे - अपि - सुद्धा - स्त्रीशूद्रहूणशबराः - स्त्रिया, शूद्र, हूण व शबर - अद्भुतक्रम - अद्भुत पराक्रमी अशा - परायणशीलशिक्षाः - परमेश्वराच्या भक्तांचा स्वभाव ज्यांना प्राप्त होण्याचे शिक्षण मिळाले आहे असे - च - आणि - तिर्यग्जनाः - पशु वगैरे - अपि - सुद्धा - ये - जे - श्रुतधारणाः - शास्त्रांचे आकलन करणारे पुरुष - किमु - तरून जातील यात काय संशय ? ॥४६॥
ज्यांना भगवंतांच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनविण्याचे शिक्षण मिळालेले असते, ते स्त्रिया, शूद्र, हूण, भिल्ल आणि पापांमुळे पशु-पक्षी आदि योनीत जन्मलेलेसुद्धा भगवंतांच्या मायेचे स्वरूप जाणतात आणि या संसारसागरातून कायमचे तरून जातात; तर जे लोक वेदविहित सदाचाराचे पालन करतात, त्यांच्याबद्दल काय सांगावे ? (४६)
शश्वत् प्रशान्तमभयं प्रतिबोधमात्रं ।
शुद्धं समं सदसतः परमात्मतत्त्वम् । शब्दो न यत्र पुरुकारकवान् क्रियार्थो । माया परैत्यभिमुखे च विलज्जमाना ॥ ४७ ॥ तद्वै पदं भगवतः परमस्य पुंसो । ब्रह्मेति यद्विदुरजस्रसुखं विशोकम् । सध्र्यङ् नियम्य यतयो यमकर्तहेतिं । जह्युः स्वराडिव निपानखनित्रमिन्द्रः ॥ ४८ ॥
तो शांत नी अभयसा अन ज्ञानरूपी नाही तयास मळ तो मग भेद कैचा । तो सत्य नी असत पार शब्दांपरा तो माया तयास बघुनी तशि लाजते की ॥ ४७ ॥ ते रूपची परम शांत अनंत मोदी जे ब्रह्मरूप गमते तयि शोक नाही । तेथे समाहित मना करितात योगी तो इंद्र काय उकरी जळ प्राशिण्याला ॥ ४८ ॥
यत् - ज्याला - ब्रह्म - ब्रह्म - इति - असे - विदुः - जाणतात - तत् - ते - वै - खरोखर - भगवतः - सर्वगुणसंपन्न अशा - परमस्य - श्रेष्ठ - पुंसः - पुरुषाचे - पदं - चरणकमल होय. - शश्वत् - नेहमी टिकणारे - प्रशान्तं - शान्त - अजस्रसुखं - सुखाने परिपूर्ण भरलेले - विशोकं - शोकरहित - अभयं - निर्भय - समं - भेदभावरहित - शुद्धं - शुद्ध - प्रतिबोधमात्रं - ज्ञानरूप - सदसतः - व्यक्ताहून व अव्यक्ताहून - परं - भिन्न - आत्मतत्त्वं - आत्मतत्त्वाने युक्त असे ब्रह्म आहे - यत्र - जेथे - शब्दः - शब्द - न - नाही - पुरुकारकवान - पुष्कळ साधनांनी युक्त - क्रियार्थः - कार्याचे फळ - न - नाही - माया - प्रकृति - अभिमुखे - परमेश्वरासमोर उभे राहण्यास - विलज्जमाना - लाजणारी अशी - परैति - परत फिरते - स्वराट् - स्वर्गाधिपति - इंद्रः - इंद्र - निपानखनित्रम् इव - विहीर खणण्याच्या साधनाप्रमाणे - यतयः - साधु - यं - ज्यासाठी - सघ्र्यङ् - मन - नियम्य - नियमित करून - अकर्तहेतिं - भेदनिरासार्थ शस्त्राला - जह्युः - सोडते झाले. ॥४७-४८॥
परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एकरस, शांत, भयरहित तसेच केवळ ज्ञानस्वरूप आहे. त्यांच्यामध्ये मायेचा मल नाही की त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही. सत् आणि असत् दोन्हीच्या पलीकडे ते आहे. कोणतेही वैदिक किंवा लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाहीत. अनेक कर्मांच्या साधनांद्वारा मिळणारे फळही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. एवढेच काय, स्वतः मायासुद्धा त्यांच्यासमोर न जाता लाजेने दूर उभी राहते. (४७)
परमपुरुष भगवंतांचे तेच परमपद आहे. महात्मे लोक त्याच शोकरहित, अनंत, आनंदस्वरूप ब्रह्माच्या रूपाने त्यांचा साक्षात्कार करून घेतात. संयमशील पुरुष त्यातच आपल्या मनाला एकाग्र करून स्थिर होतात. इंद्र जसा स्वतः मेघरूप असल्याकारणाने पाण्यासठी विहीर खोदण्याकरता कुदळ जवळ बाळगीत नाही, त्याचप्रमाणे भक्त भेद दूर करणार्या ज्ञान-साधनांनाही दूर लोटतात. (४८)
स श्रेयसामपि विभुर्भगवान् यतोऽस्य ।
भावस्वभावविहितस्य सतः प्रसिद्धिः । देहे स्वधातुविगमेऽनुविशीर्यमाणे । व्योमेव तत्र पुरुषो न विशीर्यतेऽजः ॥ ४९ ॥
कर्मास तो फलहि देइ स्वभाव जैसा आणिक कर्म रचना करितो तसाचि । तत्वे निघोनि जधि जात तदाच मृत्यु आत्मा निघोनि जरि जाय न होत नष्ट ॥ ४९ ॥
सः - तो - भगवान् - परमेश्वर - श्रेयसां - आत्यंतिक कल्याणाचा - विभुः - दाता - अपि - असे असल्यामुळे - यतः - ज्यापासून - भावस्वभावविहितस्य - वर्णाश्रम व शमदमादि यांनी युक्त - अस्य - ह्या - सतः - शुभकार्याची - प्रसिद्धिः - उत्पत्ति होते - स्वधातुविगमे - शरीराला कारणीभूत पंचमहाभूते नष्ट झाली आहेत ज्याची असा - देहे - देह - अनुविशीर्यमाणे - एकामागून एक विस्कळीत झाला असता - तत्र - तेथे - व्योम इव - आकाशाप्रमाणे - अजः - जन्मरहित - पुरुषः - पुरुष - न विशीर्यते - नाश पावत नाही. ॥४९॥
सर्व कर्मांचे फळही भगवंतच देतात, कारण मनुष्य आपल्या स्वभावानुसार जे शुभ कर्म करतो, ते त्यांच्याच प्रेरणेने केलेले असते. या शरीरात राहणारी पंचमहाभूते वेगळी होऊन शरीर नष्ट झाल्यावरही त्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नाहीसा होत नाही. (४९)
(अनुष्टुप्)
सोऽयं तेऽभिहितस्तात भगवान् विश्वभावनः । समासेन हरेर्नान्यद् अन्यस्मात् सदसच्च यत् ॥ ५० ॥
( अनुष्टुप् ) संकल्पे निर्मितो विश्व षडैश्वर्य असा हरी । सर्व भाव तयाचे ते परी तो भिन्न त्याहुनी ॥ ५० ॥
तात - बा नारदा ! - सः - तो - अयं - हा - विश्वभावनः - जगद्रक्षणकर्ता - भगवान् - परमेश्वर - ते - तुला - समासेन - संक्षेपाने - अभिहितः - सांगितला आहे - यत् - जे - सत् - कारण - च - आणि - असत् - कार्य - अन्यस्मात् - कार्यकारणव्यतिरिक्त अशा - हरेः - परमेश्वराहून - अन्यत् - निराळे - न - नाही. ॥५०॥
पुत्रा नारदा, केवळ संकल्पाने विश्वाची रचना करणार्या षडैश्वर्यसंपन्न श्रीहरीचे वर्णन संक्षेपाने मी तुझ्यासमोर केले, जो काही कार्य-कारणभाव किंवा अभाव आहे, तो काही भगवंतांपासून स्वतंत्र नाही. असे असूनही ते त्याच्यापासून अलिप्तही आहेत. (५०)
इदं भागवतं नाम यन्मे भगवतोदितम् ।
सङ्ग्रहोऽयं विभूतीनां त्वमेतद् विपुली कुरु ॥ ५१ ॥
बोधिले भगवंताने भगवंतचि नाम हे । विभूती थोडक्या ऐशा पुढे तू वाढवी तया ॥ ५१ ॥
यत् - जे - भगवता - परमेश्वराने - मे - मला - उदितं - सांगितले - इदं - ते हे - भागवतं नाम - भागवतनामक होय. - अयं - हा - विभूतीनां - विभूतींचा - संग्रहः - संग्रह - त्वं - तू - एतत् - ह्याला - विपुलीकुरु - विस्तृत कर. ॥५१॥
भगवंतांनी मला जे सांगितले होते, तेच हे ’भागवत’ होय. यात भगवंतांच्या विभूतींचे संक्षेपाने वर्णन आहे. तू याचा विस्तार कर. (५१)
राजोवाच -
यथा हरौ भगवति नृणां भक्तिर्भविष्यति । सर्वात्मन्यखिलाधारे इति सङ्कल्प्य वर्णय ॥ ५२ ॥
जेथे लोकास लाभेल भक्तिचे रस अमृत । श्रीहरीए पावतो जेणे सांगावा बोध तो जगा ॥ ५२ ॥
सर्वात्मनि - सर्वत्र आत्मस्वरूपाने राहणार्या - अखिलाधारे - सर्वाला आधारभूत अशा - भगवति - षड्गुणैश्वर्यसंपन्न - हरौ - परमेश्वराच्या ठिकाणी - यथा - ज्या योगे - नृणां - मनुष्यांस - भक्तिः - भक्ति - भविष्यति - प्राप्त होईल - इति - अशा रीतीने - संकल्प्य - मनाशी ठरवून - वर्णय - वर्णन कर. ॥५२॥
जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्वस्वरूप भगवान श्रीहरींच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल, अशा प्रकारे याचे वर्णन कर. (५२)
मायां वर्णयतोऽमुष्य ईश्वरस्यानुमोदतः ।
शृण्वतः श्रद्धया नित्यं माययाऽऽत्मा न मुह्यति ॥ ५५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां द्वितीयस्कन्धे सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
भगवत् शक्तिमायेचे करिती गुण गान जे । अथवा ऐकती कानीं तया ना मोह ही कधी ॥ ५३ ॥ ॥ इति श्रीमद्भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ सातवा अध्याय हा ॥ २ ॥ ७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
अमुष्य - ह्या - ईश्वरस्य - परमेश्वराच्या - मायां - मायेला - वर्णयतः - वर्णन करणार्याचे - अनुमोदतः - व अनुमोदन देणार्याचे - श्रद्धया - आणि श्रद्धेने - नित्यं - नेहमी - शृण्वतः - श्रवण करणार्याचे - आत्मा - मन - मायया - मायेने - न मुह्यति - मोहित होत नाही. ॥५३॥
जो मनुष्य भगवंतांची अचिंत्य शक्ति असलेल्या मायेचे वर्णन करतो किंवा दुसर्याने केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो, अथवा श्रद्धेने नित्य श्रवण करतो, त्याचे चित्त मायेने कधी मोहित होत नाही. (५३)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |