श्रीमद् भागवत पुराण
द्वितीयः स्कन्धः
षष्ठोऽध्यायः

पुरुषसूक्तार्थेन भगवतो विराट्‌स्वरूपस्य वर्णनम् -

विराट स्वरूपाच्या विभूतींचे वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


ब्रह्मोवाच -
वाचां वह्नेर्मुखं क्षेत्रं छन्दसां सप्त धातवः ।
हव्यकव्यामृत अन्नानां जिह्वा सर्व रसस्य च ॥ १ ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
( अनुष्टुप् )
वाचा अग्नि मुखामध्ये छंद ते सात धातूंचे ।
जीवां मृतां नि देवांना रसना प्रीय भोजना ॥
वरूण देवाता तेथे जिभेच्यावरि राहिली ॥ १ ॥

मुखं - तोंड - वाचां - वाणीचे - वन्हेः - व अग्नीचे - सप्त - सात - धातवः - धातू - छंदसां - छंदाचे - जिव्हा - जीभ - हव्यकव्यामृतान्नानां - हव्यान्न, कव्यान्न, व अमृतान्न यांचे - च - आणि - सर्वरसस्य - सर्वरसांचे - क्षेत्रं - स्थान होय. ॥१॥
ब्रह्मदेव म्हणाले - त्याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिची अधिष्ठात्री देवता अग्नी उत्पन्न झाला. सात धातूंपासून गायत्री, त्रिष्टुप्, अनुष्टुप्, उष्णिक, बृहती, पंक्ति आणि जगती या सात छंदांची उत्पत्ती झाली. रसनेंद्रिय आणि त्याची अधिष्ठात्री देवता वरुण, मनुष्य, पितर आणि देवतांना भोजन करण्यायोग्य अमृतमय अन्न, सर्व प्रकारचे रस हे सर्व विराट पुरुषाच्या जिभेपासून उत्पन्न झाले. (१)


सर्वा असूनां च वायोश्च तत् नासे परमायणे ।
अश्विनोः ओषधीनां च घ्राणो मोद प्रमोदयोः ॥ २ ॥
नाकास सर्व ते वायु जेथुनी गंध औषधी ।
निर्मिल्या, आश्विनीपुत्र नासिकेतचि जन्मले ॥ २ ॥

तन्नासे - त्या पुरुषाच्या दोन नाकपुडया - सर्वासूनां - सर्व प्राणांची - च - आणि - वायोः - वायूची - परमायने - दोन मुख्य ठिकाणे होत. - च - आणि - प्राणः - नाक - अश्विनोः - अश्विनीकुमारांचे - ओषधीनां - औषधींचे - च - आणि - मोदप्रमोदयोः - सामान्य व विशेष सुगंध यांचे स्थान होय. ॥२॥
त्याच्या नाकांच्या छिद्रांपासून प्राण, अपान, व्यान, उदान, आणि समान हे पाच प्राण तसेच वायू आणि घ्राणेंद्रियापासून अश्विनीकुमार, सर्व औषधी तसेच सर्वसाधारण व विशेष सुगंध उत्पन्न झाले. (२)


रूपाणां तेजसां चक्षुः दिवः सूर्यस्य चाक्षिणी ।
कर्णौ दिशां च तीर्थानां श्रोत्रं आकाश शब्दयोः ।
तद्‍गात्रं वस्तुसाराणां सौभगस्य च भाजनम् ॥ ३ ॥
त्वगस्य स्पर्शवायोश्च सर्व मेधस्य चैव हि ।
रोमाणि उद्‌भिज्ज जातीनां यैर्वा यज्ञस्तु सम्भृतः ॥ ४ ॥
बुबुळी जन्मला सूर्य कानात नभ ते पुढे ।
दिशा तीर्थ तसे शब्द तेथुनी मग जन्मले ॥
विश्वाचे सारसौंदर्य रूप त्याचेचि जाण पा ॥ ३ ॥
यज्ञ नी स्पर्ष वायू तो त्वचेच्या आत जन्मले ।
उद्‌भिजो असले सारे यज्ञ सामग्रि जन्मल्या ॥ ४ ॥

चक्षुः - नेत्रेन्द्रिय - रूपाणां - रूपांचे - तेजसां - तेजांचे - च - आणि - अक्षिणी - बुबुळे - दिवः - स्वर्गाचे - सूर्यस्य - सूर्याचे - कर्णौ - दोन कान - दिशां - दिशांचे - च - आणि - तीर्थानां - सर्व तीर्थांचे - श्रोत्रं - श्रोत्रेन्द्रिय - आकाशशब्दयोः - आकाश व शब्द यांचे - तद्‌गात्रं - त्याचे शरीर - वस्तुसाराणां - वस्तूतील तत्त्वांचे - च - आणि - सौभगस्य - सौंदर्याचे - च - आणि - अस्य - ह्याची - त्वक् - त्वचा - स्पर्शवायोः - स्पर्श व वायु यांचे - चैवहि - आणखीही - सर्वमेधस्य - सर्व यज्ञांचे - भाजनं - स्थान होय. ॥३-४॥
त्याचे डोळे रूप, तेज, डोळे, स्वर्ग आणि सूर्याची जन्मभूमी होत. त्याच्या कानांपासून सर्व दिशा आणि पवित्र करणारी तीर्थे आणि श्रोत्रेंद्रियापासून आकाश आणि शब्द यांची उत्पत्ती झाली. त्याचे शरीर तर सर्व वस्तूंचे सार, तसेच सौंदर्याचा खजिनाच होय. (३)
त्याच्या त्वचेपासून सर्व यज्ञ, स्पर्श आणि वायू निघाले आहेत. त्याचे रोम उद्‌भिज पदार्थांचे जन्मस्थान आहेत किंवा ज्यापासून यज्ञ संपन्न होतात त्या सर्वांचे जन्मस्थान तेच होत. (४)


केश श्मश्रु नखान्यस्य शिलालोहाभ्र विद्युताम् ।
बाहवो लोकपालानां प्रायशः क्षेमकर्मणाम् ॥ ५ ॥
विक्रमो भूर्भुवःस्वश्च क्षेमस्य शरणस्य च ।
सर्वकाम वरस्यापि हरेश्चरण आस्पदम् ॥ ६ ॥
केश दाढी नखा माजी मेघ वीज शिळा क्रमे ।
जन्मल्या धातु त्या साऱ्या लोकपाल भुजेतुनी ॥ ५ ॥
भूर्भुवःस्वःतिन्ही लोक त्याचा आधार तो असे ।
ते त्याचे इच्छिती पाय अभया कार्यपूर्तिसो ॥ ६ ॥

रोमाणि - केस - उद्‌भिज्जजातीनां - वृक्षादि उद्‌भिज्ज जातीचे - यैः - ज्या वृक्षादिकांनी - यज्ञः - यज्ञ - तु - तर - वा - अनेक प्रकारे - संभृतः - सिद्ध होतो - अस्य - ह्या पुरुषाचे - केशश्मश्रुनखानि - केस, दाढी व नखे - शिलालोहाभ्रविदयुतां - दगड, लोखंड, मेघ, वीज यांचे - बाहवः - बाहू - लोकपालानां - लोकपालांचे - प्रायशः - विशेषतः - क्षेमकर्मणां - पालन करणार्‍यांचे - विक्रमः - पाऊल टाकण्याची जागा - भूर्भुवः स्वः - पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग - च - आणि - क्षेमस्य - क्षेमाचे - च - आणि - शरणस्य - शरणागताचे - हरेः - पुरुषाचे - चरणः - पाय - सर्वकामवरस्य - सर्वेच्छापूरक अशा वरांचे - अपि - सुद्धा - आस्पदं - स्थान होय. ॥५-६॥
त्याचे केस, दाढी, मिशा, आणि नखांपासून मेघ, वीज, पाषाण आणि लोखंड इत्यादी धातू, तसेच भुजांपासून विश्वाचे बहुधा संरक्षण करणारे लोकपाल प्रकट झाले आहेत. (५)
त्याचे चालणे-फिरणे हे भूलोक, भुवर्लोक आणि स्वर्लोक या तिन्ही लोकांचे आश्रयस्थान आहे. सर्व इच्छांची पूर्तता करणार्‍या त्याचे चरणकमल, जे मिळाले आहे, त्याचे रक्षण करतात आणि भयाला पिटाळून लावतात. (६)


अपां वीर्यस्य सर्गस्य पर्जन्यस्य प्रजापतेः ।
पुंसः शिश्न उपस्थस्तु प्रजात्यानन्द निर्वृतेः ॥ ७ ॥
पायुर्यमस्य मित्रस्य परिमोक्षस्य नारद ।
हिंसाया निर्‌ऋतेर्मृत्यो निरयस्य गुदः स्मृतः ॥ ८ ॥
पाणी वीर्य तशी सृष्टी चवथा तो प्रजापती ।
यांना आधार लिंगाचा मैथुनानंद तेथुनी ॥ ७ ॥
पृष्ठाते यम मित्रादी गुदीं हिंसा नि निरृति ।
आणीक मृत्यु नर्काचे ते स्थान निर्मिले असे ॥ ८ ॥

पुंसः - पुरुषाचे - शिश्नः - जननेंद्रिय - अपां - पाण्याचे - वीर्यस्य - शुक्राचे - सर्गस्य - उत्पत्तीचे - पर्जन्यस्य - पावसाचे - प्रजापतेः - व प्रजापतीचे - उपस्थः - गुह्यस्थान - तु - तर - प्रजात्यानन्दनिर्वृतेः - प्रजोत्पादनार्थ होणार्‍या सुखानुभवाचे - नारद - हे नारदा ! - पायुः - गुदेन्द्रिय - यमस्य - यमाचे - मित्रस्य - मित्राचे - परिमोक्षस्य - मलविसर्गाचे - गुदः - गुद - हिंसायः - हिंसेचे - निऋतेः - दारिद्रयाचे - मृत्योः - मृत्यूचे - निरयस्य - नरकाचे - स्मृतः - स्थान असे शास्त्रात सांगितले आहे. ॥७-८॥
विराट पुरुषाचे लिंग हे पाणी, वीर्य, सृष्टी, मेघ आणि प्रजापती यांचा आधार आहे. तसेच त्याचे जननेंद्रिय प्रजनन व आनंदाचा उगम आहे. (७)
नारदा, विराट पुरुषाचे गुद हे इंद्रिय यम, मित्र, मलत्याग यांचे; तर गुदद्वार हिंसा, निर्‌ऋती, मृत्यू आणि नरकाचे उत्पत्तिस्थान आहे. (८)


पराभूतेः अधर्मस्य तमसश्चापि पश्चिमः ।
नाड्यो नदनदीनां च गोत्राणां अस्थिसंहतिः ॥ ९ ॥
अव्यक्त रससिन्धूनां भूतानां निधनस्य च ।
उदरं विदितं पुंसो हृदयं मनसः पदम् ॥ १० ॥
पराजय अधर्मादी अज्ञान पाठिसी पहा ।
नद्या नाड्या तशा अस्थी पर्वतां निर्मिले असे ॥ ९ ॥
अव्यक्त गमते पोट रस धातू समुद्र नी ।
समस्त प्राणि तेथेची जन्मती मरती पहा ।
सर्वांचे मन हे त्याच्या हॄदयातूनि जन्मले ॥ १० ॥

पश्चिमः - पृष्ठभाग - पराभूतेः - पराजयाचे - अधर्मस्य - अधर्माचे - चापि - आणखीही - तमसः - अज्ञानाचे - नाडयाः - नाडया - तु - तर - नदनदीनां - नदया व नद यांचे - अस्थिसंहतिः - अस्थींचा समूह - गोत्राणां - पर्वतांचे - पुंसः - पुरुषाचे - उदरं - उदर - अव्यक्तरससिन्धूनां - माया, षड्रस व समुद्र यांचे - भूतानां - प्राण्यांचे - च - आणि - निधनस्य - मृत्यूचे - हृदयं - हृदय - मनसः - मनाचे - पदं - स्थान - विदितं - प्रसिद्ध होय. ॥९-१०॥
त्याच्या पाठीपासून पराजय, अधर्म आणि अज्ञान तर नाड्यांपासून नद-नदी तसेच हाडांपासून पर्वत निर्माण झाला आहेत. (९)
त्याच्या पोटात मूळ प्रकृती, रस नावाचा धातू, समुद्र, समस्त प्राणी आणि त्यांचा मृत्यू यांचा समावेश आहे. त्याचे हृदय ही मनाची जन्मभूमी होय. (१०)


धर्मस्य मम तुभ्यं च कुमाराणां भवस्य च ।
विज्ञानस्य च सत्त्वस्य परस्याऽऽत्मा परायणम् ॥ ११ ॥
मी तू आणि तसा धर्म सनकादिक शंकर ।
अंतःकरण विज्ञान सर्व त्याचेचि आश्रित ॥ ११ ॥

परस्य - परमेश्वराचे - आत्मा - चित्त - धर्मस्य - धर्माचे - मम - माझे - तुभ्यं - तुझे - च - आणि - कुमाराणां - सनत्कुमारांचे - च - आणि - भवस्य - शङकराचे - विज्ञानस्य - विशिष्ट ज्ञानाचे - च - आणि - सत्त्वस्य - सत्त्वगुणाचे - परायणम् - श्रेष्ठ स्थान होय. ॥११॥
नारदा, मी, तू, धर्म, सनकादी, शंकर, विज्ञान आणि अंतःकरण हे सर्व त्याच्या चित्ताचे आश्रित आहेत. (११)


अहं भवान् भवश्चैव त इमे मुनयोऽग्रजाः ।
सुरासुरनरा नागाः खगा मृगसरीसृपाः ॥ १२ ॥
गन्धर्वाप्सरसो यक्षा रक्षोभूतगणोरगाः ।
पशवः पितरः सिद्धा विद्याध्राश्चारणा द्रुमाः ॥ १३ ॥
अन्ये च विविधा जीवाः जल स्थल नभौकसः ।
ग्रह ऋक्ष केतवस्ताराः तडितः स्तनयित्‍नवः ॥ १४ ॥
सर्वं पुरुष एवेदं भूतं भव्यं भवच्च यत् ।
तेनेदं आवृतं विश्वं वितस्तिं अधितिष्ठति ॥ १५ ॥
मी तू आणि तुझे बंधु शंकरो दैत्यही तसे ।
मनुष्य साप पक्षी नी मृग नी पायहीन ते ॥ १२ ॥
गंधर्व अप्सरा यक्ष भूत प्रेत नि राक्षस ।
सर्प नी पितरे सिद्ध विद्याधर तसे पशू ॥
वृक्ष चारण नी जीव जलस्थलादि खेचर ।
धूमकेतू नि नक्षत्रे ग्रह तारे विजा तशा ॥ १३ ॥
ढगादि सर्व वस्तूही विराट पुरुषी अशा ।
होते होईल ते सारे त्यांना तो व्यापुनी उरे ॥ १४ ॥
दशांगुल चि हे विश्व त्याचे ते परिमाण की ।
विराट रूप हे त्याचे प्रचंड एवढे असे ॥ १५ ॥

अहं - मी - भवान् - तूं - भवः - शंकर - चैव - आणखीही - ते - ते - इमे - हे - अग्रजाः - तुझे ज्येष्ठ बंधु असे - मुनयः - ऋषी - सुरासुर नराः - देव, दैत्य व मनुष्य - नागाः - हत्ती - खराः - गाढव - मृगसरीसृपाः - मृग व क्षुद्र साप - गन्धर्वाप्सरसः - गंधर्व व अप्सरा - यक्षाः - यक्ष - रक्षोभूतगणोरगाः - राक्षस, पिशाचगण व मोठे सर्प - पशवः - पशु - पितरः - पितर - सिद्धः - सिद्ध - विदयाध्राः - विदयाधर - चारणाः - देवांचे भाट - द्रुमाः - वृक्ष - च - आणि - अन्ये - दुसरे - विविधाः - अनेक प्रकारचे - जलस्थलनभौकसः - पाण्यात जमिनीवर व आकाशांत घरे करून राहणारे - जीवाः - जीव - ग्रहर्क्षकेतवः - ग्रह, नक्षत्रे, धूमकेतू इत्यादि - ताराः - चांदण्या - तडितः - विजा - स्तनयित्नवः - मेघ - भूतं - भूतकाळ - भव्यं - भविष्यकाळ - च - आणि - यत् - जो - भवत् - वर्तमानकाळ - इदं - हे - सर्वं - सगळे - पुरुषः एव - पुरुषच - इदं - हे - विश्वं - जग - तेन - त्याने - आवृतं - व्यापिले आहे - सः - तो पुरुष - वितस्तिं - वीतभर - अधितिष्ठति - आधिक्याने राहात आहे. ॥१२-१५॥
मी, तू, हे तुझे ज्येष्ठ बंधू सनकादी, शंकर, देवता, दैत्य, मनुष्य, नाग, पक्षी, मृग, सरपटणारे प्राणी, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, भूत-प्रेते, सर्प, पशू, पितर, सिद्ध, विद्याधर, चारण, वृक्ष, आकाश, पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे अनेक जीव, ग्रह, नक्षत्रे, धूमकेतू, तारे, वीज, आणि मेघ हे सर्व काही विराट पुरुषच आहेत. हे संपूर्ण विश्व, जे होते, जे आहे व जे असेल, सर्वांना त्यानेच वेढले आहे. इतकेच काय पण त्याच्यामध्ये हे विश्व केवळ वीतभरच आहे. (१२-१५)


स्वधिष्ण्यं प्रतपन् प्राणो बहिश्च प्रतपत्यसौ ।
एवं विराजं प्रतपन् तपत्यन्तः बहिः पुमान् ॥ १६ ॥
आतुनी तळपे सूर्य जगासी उजळी पुन्हा ।
स्वया नि अंश भागाना उजळी भगवान् तसे ॥ १६ ॥

असौ - हा - प्राणः - आदित्य - स्वधिष्ण्यं - स्वस्थानाला - प्रतपन् - प्रकाशविणारा असा होत्साता - बहिः च - बाहेरही - प्रतपति - प्रकाशित करतो. - एवं - याप्रमाणे - पुमान् - पुरुष - विराजं - विराट् स्वरूपाला - प्रतपन् - प्रकाशित करणारा - अन्तर्बहिः - आतबाहेर - तपति - प्रकाशित करतो. ॥१६॥
जसा सूर्य आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेरही प्रकाश पसरवितो, त्याप्रमाणे पुराण पुरुष परमात्मा सुद्धा विराट शरीराला प्रकाशित करून त्याच्या आत बाहेर सर्वत्र प्रकाशित होतो. (१६)


सोऽमृतस्याभयस्येशो मर्त्यं अन्नं यदत्यगात् ।
महिमा एष ततो ब्रह्मन् पुरुषस्य दुरत्ययः ॥ १७ ॥
संकल्प मानवी कार्य याहुनी दूर तो पहा ।
मोक्षाचा स्वामी तो आहे अभया नित्य देतसे ॥ १७ ॥

ब्रह्मन् - हे नारदा ! - सः - तो - अभयस्य - निर्भय अशा - अमृतस्य - मोक्षाचा - ईशः - स्वामी - यत् - ज्यामुळे - मर्त्यं - मरणधर्मी - अन्नं - अन्नादि उपभोगांना - अत्यगात् - सोडून अलिप्त व अविनाशी राहिला - ततः - त्यामुळे - एषः - हे - पुरुषस्य - पुरुषाचे - महिमा - माहात्म्य - दुरत्ययः - अवर्णनीय आहे. ॥१७॥
मुनिवरा, मनुष्याची क्रिया आणि संकल्पाने जे काही निर्माण होते, त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. तोच अमृत, तसेच मोक्षाचा स्वामी आहे. म्हणूनच कोणीही त्याचा हा महिमा जाणू शकत नाही. (१७)


पादेषु सर्वभूतानि पुंसः स्थितिपदो विदुः ।
अमृतं क्षेममभयं त्रिमूर्ध्नोऽधायि मूर्धसु ॥ १८ ॥
त्याच्या त्या पदमात्रेत समस्त लोक नांदती ।
हरीच्या पदमात्रेत सर्वभूते निवासती ।
अमृत क्षेम अभयो सर्वलोकाहुनी वरी ॥ १८ ॥

स्थितिपदः - स्थिर लोक हेच ज्याचे अंश आहेत अशा - पुंसः - पुरुषाच्या - पादेषु - पायांच्या ठिकाणी - सर्वभूतानि - सर्व प्राण्यांना - विदुः - समजतात. - अमृतं - मोक्ष - क्षेमं - क्षेम - अभयं - निर्भयता - त्रिमूर्धः - त्रैलोक्याच्या म्हणजे भूलोक, भुवर्लोक आणि स्वर्लोक यांच्या मस्तकाच्या म्हणजे महर्लोकाच्या - मूर्धसु - मस्तकरूप अशा जन, तप व सत्य या तीन लोकात - अधायि - ठेविले. ॥१८॥
संपूर्ण लोक भगवंतांचे अंशमात्र आहेत. तसेच त्यांच्या अंशमात्र लोकात सर्व प्राणी निवास करतात. भूलोक, भुवर्लोक, आणि स्वर्लोक यांच्या वर महर्लोक आहे. त्याच्याही वर जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक आहे. तेथे क्रमशः अमृत, क्षेम आणि अभय यांचा नित्य निवास आहे. (१८)


पादास्त्रयो बहिश्चासन् अप्रजानां य आश्रमाः ।
अन्तः त्रिलोक्यास्त्वपरो गृहमेधोऽबृहद्व्रतः ॥ १९ ॥
जनात ब्रह्मचारी नी तपात वानप्रस्थि ते ।
संन्यासी सत्यलोकात भूर्भूवःस्वीःप्रपंचिक ॥ १९ ॥

ये - जे - त्रयः - तीन - पादाः - जन, तप आणि सत्य हे तीन लोकरूपी पाय - बहिः - बाहेर - आसन् - होते - ते - ते - अप्रजानां - प्रजोत्पादन न करणार्‍यांचे - आश्रमाः - आश्रम होत - च - आणि - अपरः - दुसरा - अबृहद्‌व्रतः - ब्रह्मचर्यादि मोठी व्रते न आचरणारा - गृहमेधः - गृहस्थाश्रमी पुरुष - तु - तर - त्रिलोक्याः - त्रैलोक्याच्या - अन्तः - आत असतो. ॥१९॥
जन, तप आणि सत्य या तीन लोकांत अनुक्रमे ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमांतील लोक निवास करतात. दीर्घकालपर्यंत ज्यांनी ब्रह्मचर्य पाळलेले नाही, असे गृहस्थ लोक भूलोक, भुवर्लोक आणि स्वर्गलोक येथेच निवास करतात. (१९)


सृती विचक्रमे विश्वङ् साशनानशने उभे ।
यद् अविद्या च विद्या च पुरुषस्तु उभयाश्रयः ॥ २० ॥
विद्या निष्कामिकांसाठी जातो तो उत्तरे कडे ।
दक्षिणेस सकामीया आधार भगवान् द्वया ॥ २० ॥

विष्वङ् पुरुषः तु - स्वतंत्र संचार करणारा जीव म्हटला तर - उभयाश्रयः - दोहोंचा आश्रय करणारा - यद् - ज्या - अविदया च विदया च - अज्ञान आणि ज्ञान नावाने प्रसिद्ध आहेत त्या - उभे - दोन्ही - साशनानशने सृती - विषयोपभोगयुक्त आणि वैराग्ययुक्त अशा दोन मार्गांना - विचक्रमे - आक्रमण करतो. ॥२०॥
मनुष्य भोग मिळवून देणारा अविद्यारूप उपासनामार्ग यांपैकी एकावरून वाटचाल करतो. परंतु दोन्हींचेही आधार पुरुषोत्तम भगवानच आहेत. (२०)


यस्माद् अण्डं विराड् जज्ञे भूतेन्द्रिय गुणात्मकः ।
तद् द्रव्यं अत्यगाद् विश्वं गोभिः सूर्य इवाऽतपन् ॥ २१ ॥
सर्वांना तेज देवोनी सूर्य जै वेगळा असे ।
तसे ते भगवद्रूप निर्मुनी वेगळे पहा ॥ २१ ॥

यस्मात् - ज्या पुरुषापासून - अण्डं - ब्रह्माण्ड - जज्ञे - उत्पन्न झाले - सः - तो - भूतेन्द्रियगुणात्मकः - महाभूते, इंद्रिये व गुण यांनी युक्त - विराट् - विराट् पुरुष - तत् - त्या - द्रव्यं - पंचमहाभूतात्मक अशा - विश्वं - जगाला - गोभिः - किरणांनी - आतपन् - ताप देणार्‍या - सूर्यः - सूर्य - इव - प्रमाणे - अत्यगात् - व्यापून राहिला. ॥२१॥
ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करूनही स्वतः सर्वांपासून हे ब्रह्मांड, पंचमहाभूते, अकरा इंद्रिये आणि गुणांनी युक्त अशी विराटाची उत्पत्ती झाली आहे, ते प्रभूसुद्धा या सर्व वस्तूंमध्ये आणि त्यांच्या रूपाने राहूनसुद्धा त्यांपासून सर्वतोपरी अलिप्त आहेत. (२१)


यदास्य नाभ्यान्नलिनाद् अहं आसं महात्मनः ।
नाविंदं यज्ञसम्भारान् पुरुषा अवयवात् ऋते ॥ २२ ॥
नाभीत जन्मलो तेंव्हा त्याच्या अंगाविना दुजी ।
यज्ञ सामग्रि कांहीही मिळाली न मला तदा ॥ २२ ॥

यदा - जेव्हा - अस्य - ह्या - महात्मनः - पुरुषाच्या - नाभ्यात् - नाभीपासून उत्पन्न झालेल्या - नलिनात् - कमळापासून - अहं - मी - आस - झालो - पुरुषावयवात् - पुरुषाच्या अवयवाहून - ऋते - निराळ्या - यज्ञसं भारान् - यज्ञसामग्रीला - न अविदम् - न जाणता झालो. ॥२२॥
ज्यावेळी या विराट पुरुषाच्या नाभिकमलापासून माझा जन्म झाला, त्यवेळी या पुरुषांच्या अंगांव्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञसामुग्री मिळाली नाही. (२२)


तेषु यज्ञस्य पशवः सवनस्पतयः कुशाः ।
इदं च देवयजनं कालश्चोरु गुणान्वितः ॥ २३ ॥
वस्तूनि ओषधयः स्नेहा रस-लोह-मृदो जलम् ।
ऋचो यजूंषि सामानि चातुर्होत्रं च सत्तम ॥ २४ ॥
नामधेयानि मंत्राश्च दक्षिणाश्च व्रतानि च ।
देवतानुक्रमः कल्पः सङ्कल्पः तन्त्रमेव च ॥ २५ ॥
गतयो मतयश्चैव प्रायश्चित्तं समर्पणम् ।
पुरुषा अवयवैः एते संभाराः संभृता मया ॥ २६ ॥
तेव्हा मी त्याचि अंगाला पशू यूप कुशादि नी ।
यज्ञभूमी नि कालाला मनाने कल्पिले असे ॥ २३ ॥
ऋषी श्रेष्ठ तशी पात्रे तांदूळ औषधी घृत ।
स्नेहार्क लोह माती नी षड्रसो जल वेद ही ॥ २४ ॥
यज्ञानाम तसे मंत्र दक्षिणा व्रत देवता ।
पद्धती ग्रंथ संकल्प तंत्र श्रद्धा गती मती ॥ २५ ॥
प्रायश्चित्त तशी श्रद्धा सामग्री नी समर्पण ।
विराट पुरूषा अंगी कल्पिले सगळे मनीं ॥ २६ ॥

सत्तम - हे श्रेष्ठ नारदा ! - तेषु - त्यांमध्ये - यज्ञस्य - यज्ञाचे - पशवः - पशु - सवनस्पतयः - स्तूपासाठी लागणार्‍या वनस्पतींसह - कुशाः - कुश - च - आणि - इदं - हे - देवयजनं - यज्ञभूमि - च - आणि - उरुगुणान्वितः - पुष्कळ गुणांनी युक्त - कालः - काल - वस्तूनि - पदार्थ - ओषधयः - औषधि - स्नेहाः - घृतादि - रसलोहमृदः - षड्रस, लोखंड, मृत्तिका - जलं - पाणी - ऋचः - ऋग्वेद - यजूंषि - यजुर्वेद - सामानि - सामवेद - च - आणि - चातुर्होत्रं - चार ऋत्विजांनी केले जाणारे कृत्य - नामधेयानि - नावे - च - आणि - मंत्राः - मंत्र - च - आणि - दक्षिणाः - दक्षिणा - च - आणि - व्रतानि - व्रते - देवतानुक्रमः - देवांचे उद्देश - कल्पः - कर्मप्रवर्तक ग्रंथ - संकल्पः - संकल्प - चैव - आणखीही - तंत्रं - शास्त्र - गतयः - गति - मतयः - ध्याने - चैव - आणखीही - प्रायश्चित्तं - प्रायश्चित - समर्पणं - श्रीकृष्णाला अर्पण करणे - एते - हे - मया - माझ्याकडून - पुरुषावयवैः - पुरुषाच्या अवयवांनी - संभृताः - संग्रहीत केलेले - संभाराः - संभार म्हणजे सामग्री होय. ॥२३-२६॥
त्यावेळी मी त्याच्या अंगांमधूनच यज्ञाचा पशू, स्तंभ, कुश, ही यज्ञभूमि आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली. (२३)
हे ऋषिश्रेष्ठा, यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू, जव, तांदूळ अशी धान्ये, तूप, आदी स्निग्धपदार्थ, सहा रस, लोखंड, माती, पाणी, ऋक्, यजु, साम, चातुर्होत्र, यज्ञांची नावे, मंत्र, गती, मती, श्रद्धा, प्रायश्चित्त, आणि समर्पण अशी सर्व यज्ञसामुग्री मी विराट अंगांपासूनच एकत्रित केली. (२४-२६)


इति संभृतसंभारः पुरुषा अवयवैः अहम् ।
तमेव पुरुषं यज्ञं तेनैवायजमीश्वरम् ॥ २७ ॥
असे ते मेळुनि सर्व विराट यज्ञ रूप तो ।
याज्ञाने ध्यायिला तेंव्हा त्याला त्याचेनि ध्यायिले ॥ २७ ॥

इति - याप्रमाणे - पुरुषावयवैः - पुरुषाच्या अवयवांनी - संभृतसंभारः - जमविली आहे यज्ञसामुग्री असा - अहं - मी - तम् एव - त्याच - यज्ञं - यज्ञस्वरूपी - ईश्वरं - सर्वैश्वर्यसंपन्न - पुरुषं - पुरुषाला - तेन एव - त्याच यज्ञसामुग्रीने - अयजम् - पूजिता झालो. ॥२७॥
अशा प्रकारे विराट पुरुषाच्या अंगांपासूनच ही सर्व सामग्री गोळा करून मी तिने त्या यज्ञस्वरूप परमात्म्याचे यज्ञानेच पूजन केले. (२७)


ततस्ते भ्रातर इमे प्रजानां पतयो नव ।
अयजन् व्यक्तमव्यक्तं पुरुषं सुसमाहिताः ॥ २८ ॥
प्रजापती तुझे बंधू नऊही स्थीर होऊनी ।
अंतरी ध्यायिले त्यांनी विराट पुरूषोत्तमा ॥ २८ ॥

ततः - नंतर - इमे - हे - ते - तुझे - भ्रातरः - भाऊ - नव - नऊ - प्रजानां पतयः - मरीच्यादि प्रजापति - सुसमाहिताः - स्वस्थान्तःकरण होत्साते - व्यक्तं - सगुण - अव्यक्तं - निर्गुण - पुरुषं - पुरुषाला - अयजन् - पूजिते झाले. ॥२८॥
त्यानंतर तुझे बंधू असलेल्या या नऊ प्रजापतींनी आपले चित्त पूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतर्यामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली. (२८)


ततश्च मनवः काले ईजिरे ऋषयोऽपरे ।
पितरो विबुधा दैत्या मनुष्याः क्रतुभिर्विभुम् ॥ २९ ॥
पुढे कालगती मध्ये ऋषि नी मनु देवता ।
दैत्य नी मानवे यज्ञी ध्यायिले पुरूषोत्तमा ॥ २९ ॥

ततः - नंतर - मनवः - स्वायंभुवप्रमुख चौदा मनु - च - आणि - अपरे - दुसरे - ऋषयः - ऋषि - पितरः - पितर - विबुधाः - देव - दैत्याः - दैत्य - मनुष्याः - मनुष्य - काले - योग्य काळी - क्रतुमिः - यज्ञांनी - विभुं - पुरुषाला - ईजिरे - होमद्रव्याच्या योगे पूजिते झाले. ॥२९॥
नंतर वेळोवेळी मनू, ऋषी, पितर, देवता, दैत्य आणि मनुष्यांनी यज्ञाने भगवंतांची आराधना केली. (२९)


नारायणे भगवति तदिदं विश्वमाहितम् ।
गृहीत माया उरुगुणः सर्गादौ अगुणः स्वतः ॥ ३० ॥
नारदा विश्व हे सारे स्थित नारायणाची ।
गुणहीन परी त्याने प्रारंभी सर्व भोगिले ॥ ३० ॥

तत् - म्हणून - भगवति नारायणे - भगवान् नारायणाच्या ठिकाणी - इदं - हे - विश्वं - जग - आहितं - स्थापित झाले आहे. - स्वतः - तो स्वतः - अगुणः - निर्गुण असताही - सर्गादौ - जगाच्या उत्पत्तीच्या वेळी - गृहीतमायोरुगुणः - स्वीकारले आहेत मायेचे मोठे गुण ज्याने असा झाला. ॥३०॥
हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणातच स्थिर आहे, जे स्वतः गुणरहित आहेत; परंतु सृष्टीच्या प्रारंभी मायेच्या साह्याने पुष्कळ गुण ग्रहण करतात. (३०)


सृजामि तन्नियुक्तोऽहं हरो हरति तद्वशः ।
विश्वं पुरुषरूपेण परिपाति त्रिशक्तिधृक् ॥ ३१ ॥
त्याच्याचि प्रेरणेने मी निर्मितो सृष्टि ही अशी ।
रक्षि विष्णु शिवो नष्टी त्याचेचि गुण हे तिन्ही ॥ ३१ ॥

तन्नियुक्तः - पुरुषाने आज्ञा केलेला - अहं - मी - सृजामि - सृष्टी उत्पन्न करतो - तव्दशः - पुरुषाच्या आधीन झालेला असा - हरः - शंकर - हरति - सृष्टीचा संहार करतो - त्रिशक्तिधृक् - तीन गुणांनी युक्त अशा मायेला धरणारा - पुरुषरूपेण - विष्णुरूपाने - विश्वं - जगाला - परिपाति - रक्षितो. ॥३१॥
त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो, त्यांच्याच अधीन राहून रुद्र याचा संहार करतो आणि सत्त्व, रज, तमरूप तीन शक्ति धारण करणारे ते स्वतः विष्णुरूपाने याचे पालन करतात. (३१)


इति तेऽभिहितं तात यथेदं अनुपृच्छसि ।
न अन्यत् भगवतः किञ्चिद् भाव्यं सद्-असदात्मकम् ॥ ३२ ॥
मुला तू पुसिले जे जे ते ते मी वदलो तुला ।
कार्यकारण हे भाव तयाच्या भिन्न ना कधी ॥ ३२ ॥

तात - बा नारदा ! - यथा - जसे - अनुपृच्छसि - विचारतोस - इति - त्याप्रमाणे - इदं - हे सर्व - ते - तुला - अभिहितं - सांगितले आहे - सदसदात्मकम् - अव्यक्त किंवा व्यक्त असे - भाव्यं - होणारे - किञ्चित् - थोडे सुद्धा - भगवतः - पुरुषाहून - अन्यत् - दुसरे - न - नाही. ॥३२॥
पुत्रा, तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले. भाव किंवा अभाव, कार्य किंवा कारण या रूपांत भगवंतांपासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही. (३२)


न भारती मेऽङ्ग मृषोपलक्ष्यते
    न वै क्वचिन्मे मनसो मृषा गतिः ।
न मे हृषीकाणि पतन्त्यसत्पथे
    यन्मे हृदौत्कण्ठ्ययवता धृतो हरिः ॥ ३३ ॥
(इंद्रवज्रा)
प्रेमे स्मरे मी हृदयात त्याला
    तेणे कधी हो न असत्यवाणी ।
नाही कधी येत मनात पाप
    कुमार्गि ना हे मन जाय केव्हा ॥ ३३ ॥

अंग - हे नारदा ! - यत् - ज्या कारणास्तव - मे - माझ्याकडून - हरिः - परमेश्वर - औत्कण्‌ठयवता - उत्कंठित अशा - हृदा - हृदयाने - धृतः - धारण केलेला आहे - वै - तसे असल्यामुळे - मे - माझी - भारती - वाणी - मृषा - खोटी - न उपलक्ष्यते - झालेली दिसत नाही - मे - माझी - मनसः - मनाची - गतिः - गति - क्वचित् - कोठेही - मृषा न - व्यर्थ नाही. - मे - माझी - हृषीकाणि - इंद्रिये - असत्पथे - दुर्मार्गात - न पतन्ति - पडत नाहीत. ॥३३॥
प्रिय नारदा, भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंतांच्या स्मरणात नेहमी मी मग्न असतो, म्हणून माझी वाणी कधी असत्य होत नाही, माझे मन कधी असत्य संकल्प करीत नाही आणि माझी इंद्रिये कधी कुमार्गाने जात नाहीत. (३३)


सोऽहं समाम्नायमयः तपोमयः
    प्रजापतीनां अभिवन्दितः पतिः ।
आस्थाय योगं निपुणं समाहितः
    तं नाध्यगच्छं यत आत्मसंभवः ॥ ३४ ॥
मी वेदमूर्ती नि तपस्वि आहे
    प्रजापतीही नमिती मलाच ।
केले अनुष्ठान तरी न जाणी
    पूर्वी असा त्या भगवंत रूपा ॥ ३४ ॥

सः - तो - अहं - मी - समाम्नायमयः - वेदरूपी - तपोमयः - तपस्वी - अभिवंदितः - सर्वांनी वंदन केलेला - प्रजापतीनां - मरीच्यादि प्रजापतींचा - पतिः - अधिपति असा असूनसुद्धा - निपुणं - कुशलतेने - योगं - समाधियोगाला - आस्थाय - स्वीकारून - समाहितः - विचार करीत बसलो असता - अपि - सुद्धा - यतः - जेथून - आत्मसंभवः - माझा स्वतःचा जन्म झाला - तं - त्या ठिकाणाला - न अध्यगच्छम् - जाणू शकलो नाही. ॥३४॥
मी वेदमूर्ति आहे, माझे जीवन तपस्यामय आहे, मोठ मोठे प्रजापती मला वंदन करतात आणि मी त्यांचा स्वामी आहे. मी मोठ्या निष्टेने योगाचेही अनुष्ठान केले, परंतु मी माझेच मूळ कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही. (३४)


नतोऽस्म्यहं तच्चरणं समीयुषां
    भवच्छिदं स्वस्त्ययनं सुमङ्गलम् ।
यो ह्यात्ममायाविभवं स्म पर्यगाद्
    यथा नभः स्वान्तमथापरे कुतः ॥ ३५ ॥
सोडी भवाच्या मधुनी स्वलोका
    त्या श्रीहरीला नमितो सदा मी ।
माया तयाची नच थांग पत्ता
    तोही न जाणी मग अन्य काय ॥ ३५ ॥

अहं - मी - समीयुषां - शरणागतांच्या - भवच्छिदं - सांसारिक दुःखाला तोडणार्‍या - स्वस्त्ययनं - कल्याणरूप - सुमङ्गलम् - अत्यंत मंगलप्रद अशा - तच्चरणं - त्या पुरुषाच्या चरणाला - नतः अस्मि - नम्र झालो आहे. - यथा - जसे - नभः - आकाश - स्वांतं - स्वतःच्या अंताला - यः - जो - आत्ममायाविभवं - स्वतःच्या मायेच्या विस्ताराला - न पर्यगात् स्म - जाणू शकला नाही - अथ - तर - अपरे - दुसरे - हि - खरोखर - कुतः - कसे जाणणार ॥३५॥
मी परम मंगलमय आणि शरण आलेल्या भक्तांना जन्म-मृत्यूपासून सोडविणार्‍या, परम कल्याणस्वरूप अशा, भगवंतांच्या चरणांनाच नमस्कार करतो. जसे आकाश आपल्या महिम्याचा अंत जाणत नाही, तसेच भगवंत आपल्या महिम्याचा विस्तार जाणत नाहीत. अशा स्थितीत दुसर्‍या कोणाला त्यांचा अंत कसा लागेल ? (३५)


नाहं न यूयं यदृतां गतिं विदुः
    न वामदेवः किमुतापरे सुराः ।
तन्मायया मोहितबुद्धयस्त्विदं
    विनिर्मितं चात्मसमं विचक्ष्महे ॥ ३६ ॥
माझेव्तुम्ही पुत्र नि शंकरो मी
    न जाणितो सत्यरूपास त्याच्या ।
माया रुपाने रचिले तयाने
    ना ते कळे नी करितोत तर्क ॥ ३६ ॥

यदृतां - ज्याच्या सत्यस्वरूपी - गतिं - गतीला - अहं - मी - न - जाणत नाही - यूयं - तुम्ही - न - नाही - वामदेवः - शंकर - न - नाही - अपरे - दुसरे - सुराः - देव - विदुः - जाणतात - किमुत - हे शक्य आहे काय ! - च - आणि - तन्मायया - त्याच भगवंताच्या मायेने - मोहितबुद्धयः - अज्ञानी बनलेले आपण - तु - तर - इदं - ह्या - विनिर्मितं - निर्माण केलेल्या प्रपंचाला - आत्मसमं - आपापल्या शक्तीप्रमाणे - विचक्ष्महे - जाणत आहोत. ॥३६॥
मी, माझे पुत्र तुम्ही आणि भगवान शंकर सुद्धा त्यांचे सत्य स्वरूप जाणत नाहीत; तर दुसरे देव त्यांना कसे जाणू शकतील ? त्यांच्या मायेने मोहित झालेले आम्ही त्यांनी निर्मिलेल्या या जगाची आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतो (३६)


यस्यावतारकर्माणि गायंति ह्यस्मदादयः ।
न यं विदंति तत्त्वेन तस्मै भगवते नमः ॥ ३७ ॥
( अनुष्टुप् )
त्या अवतार लीलांचे करीतो गुणगानची ।
न कळे मूळ तत्त्वो ते नमितो भगवान् मनीं ॥ ३७ ॥

हि - खरोखर - अस्मदादयः - आमच्यासारखे लोक - यस्य - ज्या पुरुषाच्या - अवतारकर्माणि - अवतारांच्या कृत्यांना - गायन्ति - गातात - तत्त्वेन - यथार्थ रीतीने - यं - ज्याला - न विदन्ति - जाणत नाही - तस्मै - त्या - भगवते - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न पुरुषाला - नमः - नमस्कार असो. ॥३७॥
आम्ही केवळ त्यांच्या अवतारांच्या लीलांचे गायन करीत राहतो, पण त्यांचे तत्त्व जाणत नाही. त्या भगवंतांना मी नमस्कार करतो. (३७)


स एष आद्यः पुरुषः कल्पे कल्पे सृजत्यजः ।
आत्मा आत्मनि आत्मनाऽऽत्मानं, स संयच्छति पाति च ॥ ३८ ॥
जन्म नाही तया रूपा स्वयें तो निर्मितो जग ।
रक्षितो प्रेम मायेने संहारी लीलया पुन्हा ॥ ३८ ॥

सः - तो - एषः - हा - आदयः - श्रेष्ठ - अजःपुरुषः - जन्मरहित पुरुष असा परमेश्वर - कल्पे कल्पे - प्रत्येक कल्पात - सृजति - सृष्टि उत्पन्न करतो - च - आणि - आत्मा - आत्मस्वरूपी - आत्मना - आत्म्याच्याच योगे - आत्मनि - आत्म्यामध्ये - आत्मानं - आत्म्याला - संयच्छति - संहरतो - च - आणि - पाति - रक्षितो. ॥३८॥
ते अजन्मा तसेच पुरुषोत्तम आहेत. प्रत्येक कल्पामध्ये ते स्वतः आपल्यातच स्वतःला निर्माण करतात, त्याचे रक्षण करतात आणि त्याचा संहार करतात. (३८)


विशुद्धं केवलं ज्ञानं प्रत्यक् सम्यग् अवस्थितम् ।
सत्यं पूर्णं अनाद्यन्तं निर्गुणं नित्यमद्वयम् ॥ ३९ ॥
ऋषे विदंति मुनयः प्रशान्तात्मेन्द्रियाशयाः ।
यदा तद् एव असत् तर्कैः तिरोधीयेत विप्लुतम् ॥ ४० ॥
न लिंपे मोह मायेने स्थिर तो ज्ञानरूपची ।
आदि ना अंत त्या सत्या गुणहीन सनातन ॥ ३९ ॥
नारदा ऋषिं जेव्हा ते आत बाहेर शांतची ।
राहती घडतो तेंव्हा साक्षात्कार असा पहा ॥
असत्य जीव जेंव्हा ते कुतर्क कतिती तदा ।
तया त्या भगवंताचे न घडे कधि दर्शन ॥ ४० ॥

ऋषे - हे नारदा - यदा - जेव्हा - प्रशान्तात्मेन्द्रियाशयाः - शान्त झाली आहे बुद्धि, इंद्रिये व मन ज्यांची असे - मुनयः - ऋषि - केवलं - निर्विकार - विशुद्धं - अत्यंत शुद्ध अशा - प्रत्यक् - सर्वांतर्यामी राहणार्‍या - सत्यं - सत्यरूप - ज्ञानं - सर्व जाणणार्‍या - सम्यगवस्थितं - चांगल्या रीतीने राहिलेल्या - निर्गुणं - निर्गुण - नित्यं - सनातन - अव्दयं - एकरूप - अनादयन्तं - आदि व अन्त यांनी रहित - पूर्णं - पूर्णस्वरूपाचे असे - विदन्ति - जाणतात - तत् एव - तेच - असत्तर्कैः - कुतर्कांनी - विप्लुतम् - व्यापिलेले असता - तिरोधीयेत - आपोआपच नाश पावते. ॥३९-४०॥
ते मायेने रहित असे केवळ ज्ञानस्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत. ते तिन्ही कालांमध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत. त्यांना ना आदि, ना अंत. ते तिन्ही गुणांनी रहित, सनातन तसेच अद्वितीय आहेत. (३९)
नारदा, महात्मे लोक ज्यावेळी आपले अंतःकरण, इंद्रिये आणि शरीराला पूर्ण शांत करतात, ज्यावेळी त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो. परंतु जेव्हा कुतर्कांच्या पडद्यात त्यांना झाकले जाते, तेव्हा त्यांचे दर्शन होत नाही. (४०)


आद्योऽवतारः पुरुषः परस्य
    कालः स्वभावः सद्-असन्मनश्च ।
द्रव्यं विकारो गुण इन्द्रियाणि
    विराट् स्वराट् स्थास्नु चरिष्णु भूम्नः ॥ ४१ ॥
(इंद्रवज्रा)
पुराणरूपोचि विराट आहे
    काल स्वभावो मन पंचभूत ।
ती कारणे नी गुण इंद्रिये नी ।
    ते स्थांवरो जंगम श्रीहरीच ॥ ४१ ॥

भूम्नः - सर्वव्यापी अशा - परस्य - परमेश्वराचा - आदयः - पहिला - अवतारः - अवतार - पुरुषः - पुरुषनामक होय. - कालः - काळ - स्वभावः - स्वभाव - सत् असत् - कार्यकारणरूप प्रकृति - मनः - मन - च - आणि - द्रव्यं - पंचमहाभूते - विकारः - अहंकारादि - गुणः - गुण - इंद्रियाणि - इंद्रिये - विराट् - विराट् - स्वराट् - स्वयंप्रकाश - स्थास्नु - स्थावर - चरिष्णु - जंगम ॥४१॥
परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे. त्या खेरीज काल, स्वभाव, कार्यकारणात्मक प्रकृती, महत्तत्त्व, पंचमहाभूते, अहंकार, तीन गुण, इंद्रिये, ब्रह्मांड-शरीर, वैराज, स्थावर आणि जंगम जीव ही सर्व त्या अनंत भगवंतांचीच रूपे आहेत. (४१)


अहं भवो यज्ञ इमे प्रजेशा
    दक्षादयो ये भवदादयश्च ।
स्वर्लोकपालाः खगलोकपाला
    नृलोकपालाः तललोकपालाः ॥ ४२ ॥
गन्धर्वविद्याधरचारणेशा
    ये यक्षरक्षोरग नागनाथाः ।
ये वा ऋषीणां ऋषभाः पितॄणां
    दैत्येन्द्रसिद्धेश्वरदानवेंद्राः ॥ ४३ ॥
अन्ये च ये प्रेतपिशाचभूत
    कूष्माण्ड यादः मृगपक्षि-अधीशाः ।
यत्किञ्च लोके भगवन् महस्वत्
    ओजः सहस्वद् बलवत् क्षमावत् ।
श्रीह्रीविभूत्यात्मवद् अद्‌भुतार्णं
    तत्त्वं परं रूपवद् अस्वरूपम् ॥ ४४ ॥
मी विष्णु शंभू अन तू नि दक्ष ।
    प्रजापती आणि अनंत भक्त ।
नरेंद्र देवेंद्र खगेंद्र तैसे
    गंधर्व दिद्याधर आणि यक्ष ॥ ४२ ॥
नागेंद्र नी सर्व महर्षी आणि
    दैत्येंद्र सिद्धेश्वर भूत प्रेत ।
मृगेंद्र जे जे मुळचेच श्रेष्ठ
    ऐश्वर्य नी तेज क्षमा बलोहि ॥ ४३ ॥
विशेष सौंदर्य नि लाज सारी
    विभूति त्या ह्या भगवंत रूप ।
रूपी अरूपी नवलाववस्तू
    हे सर्व त्याचेचि विभूती रूप ॥ ४४ ॥

अहं - मी - भवः - शंकर - यज्ञः - यज्ञस्वरूपी विष्णु - इमे - हे - दक्षादयः - दक्ष वगैरे - प्रजेशाः - प्रजापति - च - आणि - ये - जे - भवदादयः - आपल्यासारखे भक्त - स्वर्लोकपालाः - इंद्रादि लोकपाल - खगलोकपालाः - गरुडादि पक्षिलोकपाल - नृलोकपालाः - भूलोकाचे रक्षक राजे - तललोकपालाः - पातालादिकांचे राजे - ये - जे - गन्धर्वविदयाधरचारणेशाः - गंधर्व, विदयाधर चारण यांचे अधिपति - यक्षरक्षोरगनागनाथाः - यक्ष, राक्षस, सर्प व नाग यांचे स्वामी - वा - अथवा - ये - जे - ऋषीणां - ऋषींमध्ये - पितृणां - व पितरांमध्ये - ऋषभाः - मुख्य - दैत्येन्द्रसिद्धेश्वरदानवेन्द्राः - दैत्यांचे, सिद्धांचे व दानवांचे राजे - च - आणि - ये - जे - अन्ये - दुसरे - प्रेतपिशाचभूतकूष्माण्डयादोमृगपक्ष्यधीशाः - प्रेत, पिशाच, भूत, कूष्मांड, मत्स्यादि प्राणी, पशु व पक्षी यांचे अधिपति - लोके - ह्या लोकात - यत् - जे - किंच - काहीहि - भगवत् - ऐश्वर्याने युक्त - महस्वत् - तेजस्वी - ओजःसहस्वत् - मानसिक शक्ती व शारीरिक शक्ती यांनी युक्त - बलवत् - सामर्थ्याने युक्त - क्षमावत् - क्षमाशील - श्रीन्हीविभूत्यात्मवत् - शोभा, लज्जा, ऐश्वर्य व बुद्धि यांनी विभूषित - अद्‌भुतार्णं - आश्चर्यजनक कांति असणारे - रूपवत् - सुंदर - च - आणि - अस्वरूपं - रूपहीन - परं - श्रेष्ठ - तत्त्वं - तत्त्व. ॥४२-४४॥
मी, शंकर, विष्णू, दक्ष आदि प्रजापती, तू आणि तुझ्यासारखे अन्य भक्त जन, स्वर्गलोकाचे रक्षक, पक्ष्यांचे राजे, मनुष्यलोकांचे राजे, पाताळलोकांचे अधिनायक, यक्ष, राक्षस, साप, आणि नागांचे स्वामी, महर्षी, पितृपती, दैत्येंद्र, सिद्धेश्वर, दानवराज, शिवाय प्रेत-पिशाच्च, भूत-कूष्मांड, जलजंतू, पशुपक्ष्यांचे राजे, यांखेरीज संसारातील जितक्या वस्तू ऐश्वर्य, तेज, इंद्रियबल, मनोबल, शरीरबल, किंवा क्षमा यांनी युक्त आहेत, किंवा जे काही विशेष सौंदर्य, लज्जा, वैभव आणि विभूतींनी युक्त आहे. तसेच जितक्या काही वस्तू अद्‌भुत वर्णाच्या रूपवान किंवा रूपरहित आहेत, हे सर्व परमतत्त्वमय असे भगवत्स्वरूपच आहे. (४२-४४)


प्राधान्यतो या नृष आमनन्ति
    लीलावतारान् पुरुषस्य भूम्नः ।
आपीयतां कर्णकषायशोषान्
    अनुक्रमिष्ये त इमान् सुपेशान् ॥ ४५ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं
संहितायां द्वितीयस्कन्धे षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
विशेष रूपी अवतार लीला
    शास्त्रे रूपी अवतार लीला
    शास्त्रे जया वर्णिती त्यास ऐक ।
मधूर ऐशी श्रवणा कथा ही
    हो सावधानो रस प्राशिष्याला ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्‌भगवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥
॥ सहावा अध्याय हा ॥ २ ॥ ६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

ऋषे - हे नारदा - भूम्नः - सर्वशक्तिमान - पुरुषस्य - पुरुषाच्या - यान् - ज्या - लीलावतारान् - क्रीडा करण्याकरिता घेतलेल्या अवतारांना - प्राधान्यतः - विशेष रीतीने - आपीयतां - त्या अवतारांच्या कथांना श्रवण करणार्‍या भक्तांच्या - कर्णकषायशोषान् - कानाच्या पातकांना नष्ट करणार्‍या - सुपेशान् - सुंदर - इमान् - ह्या अवतारांना - ते - तुला - अनुक्रमिष्ये - क्रमाक्रमाने सांगतो. ॥४५॥
नारदा, याशिवाय परम पुरुष परमात्म्याचे जे मुख्य मुख्य लीलावतार शास्त्रांत वर्णिले आहेत, त्या सर्वांचे मी क्रमशः वर्णन करतो. त्यांची चरित्रे ऐकण्यास मोठी मधुर आणि श्रवणेंद्रियांचे दोष दूर करणारी आहेत. तू लक्षपूर्वक त्यांचा आस्वाद घे. (४५)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां द्वितीयः स्कन्धे षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
स्कंध दुसरा - अध्याय सहावा समाप्त

GO TOP