|
श्रीमद् भागवत पुराण अपशकुनदर्शनेन युधिष्ठिरस्य चिन्ता, द्वारकातोऽर्जुनस्यागमनं च - अपशकुन पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
सूत उवाच ।
सम्प्रस्थिते द्वारकायां जिष्णौ बन्धुदिदृक्षया । ज्ञातुं च पुण्यश्लोकस्य कृष्णस्य च विचेष्टितम् ॥ १ ॥
सूतजी सांगतात - स्वजना भेटण्या आणि कृष्णाचे काय चालले । पाहण्या द्वारकी पार्थ गेला होता तिथे तदा ॥ १ ॥
बन्धुदिदृक्षया - बन्धुंना पाहण्याच्या इच्छेने - च - आणि - पुण्यश्लोक - पुण्यकीर्तींच्या - कृष्णस्य - श्रीकृष्णाच्या - विचेष्टितं - लीलांना - ज्ञातुं - जाणण्याकरिता - च - आणि - जिष्णौ - अर्जुन - द्वारकायां - द्वारकेत - संप्रस्थिते - गेला असता. ॥१॥
सूत म्हणाले - स्वजनांना भेटण्यासाठी आणि पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण आता काय करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुन द्वारकेला गेला होता. (१)
व्यतीताः कतिचिन्मासाः तदा नायात् ततोऽर्जुनः ।
ददर्श घोररूपाणि निमित्तानि कुरूद्वहः ॥ २ ॥
कित्येक महिने गेले तरी ना परते त्वरे । धर्माने पाहिले मोठ्या वाईट शकुना तदा ॥ २ ॥
तदा - त्यावेळी - कतिचित् - कित्येक - मासाः - महिने - व्यतीताः - गेले - ततः - तेथून - अर्जुनः - अर्जुन - न आयात् - आला नाही. - कुरुद्वहः - कुरुश्रेष्ठ - घोररूपाणि - भयंकर - निमित्तानि - अपशकुन - ददर्श - पाहता झाला. ॥२॥
पुष्कळ महिने लोटले तरी अर्जुन परतला नाही, त्यावेळी युधिष्ठिरांना भयंकर अपशकून दिसू लागले. (२)
कालस्य च गतिं रौद्रां विपर्यस्तर्तुधर्मिणः ।
पापीयसीं नृणां वार्तां क्रोधलोभानृतात्मनाम् ॥ ३ ॥ जिह्मप्रायं व्यवहृतं शाठ्यमिश्रं च सौहृदम् । पितृमातृसुहृद्भ्रातृ दम्पतीनां च कल्कनम् ॥ ४ ॥ निमित्तान्यत्यरिष्टानि काले तु अनुगते नृणाम् । लोभादि अधर्मप्रकृतिं दृष्ट्वोवाचानुजं नृपः ॥ ५ ॥
वाईट जाणिला काळ उलटे ऋतु चक्रही । क्रोधी लोभी नि खोटे ही लोक ते वागु लागले ॥ ३ ॥ व्यव्हार कपटी झाला मित्र मित्रात ही तसा । सोयरे बाप नी बंधू जोडपे भांडु लागले ॥ ४ ॥ आगमने कलीच्या त्या लोभ दंभहि माजला । पाहुनी विपरीताला बोलला भीमसेनला ॥ ५ ॥
विपर्यस्तर्तुधर्मिणः - ऋतुधर्माच्या विपरीत कार्य करणार्या - कालस्य - कालाच्या - रौद्रां - भयंकर - गतिं - गतीला - च - आणि - क्रोधलोभानृतात्मनां - क्रोध, लोभ व असत्य ह्यांनी युक्त अशा - नृणां - मनुष्यांच्या - पापीयसीं - पापरूपी - वार्तां - वर्तनांना - जिह्मप्रायं - बहुतेक कपटयुक्त - व्यवहृतं - व्यवहाराला - च - आणि - शाठयमिश्रं - फसवेगिरीच्या - सौहृदं - मैत्रीला - च - आणि - पितृमातृसुहृद्भातृदम्पतीनां - बाप, आई, मित्र व पतिपत्नि यांच्या - कल्कनं - कलहांना - च - आणि - अनुगते - क्रमप्राप्त - काले - कालात - तु - तर - अत्यरिष्टानि - अत्यंत अशुभ - निमित्तानि - अपशकुनांना - नृणां - मनुष्यांच्या - लोभाद्यधर्मप्रकृतिं - लोभादि अधर्म प्रवृत्तीला - दृष्ट्वा - पाहून - नृपः - धर्मराज - अनुजं - भीमाला - उवाच - म्हणाला. ॥३-५॥
त्यांनी पाहिले की, काळाची गति भयंकर होऊ लागली आहे. ज्यावेळी जो ऋतू असावयास पाहिजे तो असत नाही आणि त्याच्या क्रियाही उलट्या होत आहेत. लोक क्रोधी, लोभी आणि असत्य बोलणारे झाले आहेत. आपला जीवन - निर्वाह चालविण्यासाठी लोक पापी वर्तन करू लागले आहेत. (३)
सर्व व्यवहार खोटेपणाने चालले आहेत. एवढेच काय मैत्रीमध्येही कपट आहे. पिता, माता, सगे-सोयरे, बंधू, पति-पत्नी यांच्यात तंटे होऊ लागले आहेत. (४) कलियुग असल्यामुळे लोकांचा स्वभावही लोभ, दंभ, अधर्म यांनी व्याप्त झालेला आहे आणि निसर्गातही अरिष्टसूचक अपशकुन होऊ लागले आहेत. हे सर्व पाहून युधिष्ठिर धाकट्या भावास भीमसेनास म्हणाले, (५)
युधिष्ठिर उवाच ।
सम्प्रेषितो द्वारकायां जिष्णुर्बन्धु दिदृक्षया । ज्ञातुं च पुण्यश्लोकस्य कृष्णस्य च विचेष्टितम् ॥ ६ ॥
राजा युधिष्ठिर म्हणाला- बंधो! मी द्वारकेला तो पार्थ मुद्दाम धाडिला । करितो काय श्रीकृष्ण भगवान् पाहण्या तिथे ॥ ६ ॥
बन्धुदिदृक्षता - बंधूना भेटण्याच्या इच्छेने - च - आणि - पुण्यश्लोकस्य - पुण्यकीर्ति अशा - कृष्णस्य - श्रीकृष्णाच्या - विचेष्टितं - लीलांना - ज्ञातुं - जाणण्याकरिता - जिष्णुः - अर्जुन - द्वारकायां - द्वारकेत - संप्रेषितः - पाठविला. ॥६॥
युधिष्ठिर म्हणाले - भीमसेना ! अर्जुनाला आम्ही द्वारकेला यासाठी पाठविले होते की, तेथे जाऊन त्याने पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण काय करीत आहेत याची माहिती घ्यावी आणि सगेसोयर्यांना भेटून यावे. (६)
गताः सप्ताधुना मासा भीमसेन तवानुजः ।
नायाति कस्य वा हेतोः नाहं वेदेदमञ्जसा ॥ ७ ॥
महिने सात ते झाले परी तो परतेचि ना । तेथले सत्य जाणावे वाटते का न पातला ॥ ७ ॥
भीमसेन - हे भीमा ! - अधुना - हल्ली - सप्त - सात - मासाः - महिने - गताः - गेले - तव - तुझा - अनुजः - धाकटा भाऊ अर्जुन - कस्य - कोणत्या - हेतोः - कारणास्तव - न आयाति - येत नाही - वा - अथवा - अहं - मी - अञ्जसा - वास्तविक रीतीने किंवा चटकन - न वेद - जाणत नाही. ॥७॥
सात महिने होऊन गेले तरी तुझा धाकटा भाऊ अजून परतला नाही. तो अजून का आला नाही, याचे योग्य कारण मला तरी काही समजत नाही. (७)
अपि देवर्षिणाऽऽदिष्टः स कालोऽयमुपस्थितः ।
यदाऽऽत्मनोऽङ्गमाक्रीडं भगवान् उत्सिसृक्षति ॥ ८ ॥
नारदे बोलिला काळ पातला का समीप हा । सावरी आपुल्या कां तो लीला सर्वचि कृष्णजी ॥ ८ ॥
देवर्षिणा - नारदाने - आदिष्टः - सांगितलेला - सः - तो - अयं - हा - कालः - काल - उपस्थितः - प्राप्त झाला - अपि - काय ? - यत् - ज्यामुळे - भगवान् - श्रीकृष्ण - आत्मनः - स्वतःच्या - आक्रीडं - खेळण्याप्रमाणे असणार्या - अङगं - शरीराला - उत्सिसृक्षति - टाकण्यास इच्छितो. ॥८॥
देवर्षी नारदांनी सांगितले होते की, भगवान श्रीकृष्ण आपला अवतार समाप्त करू इच्छितात. ती वेळ तर आली नाही ना ? (८)
यस्मान्नः सम्पदो राज्यं दाराः प्राणाः कुलं प्रजाः ।
आसन् सपत्नविजयो लोकाश्च यदनुग्रहात् ॥ ९ ॥
भगवंत कृपेनेची संपत्ती राज्य प्राण नी । लाभले यश पुत्रादी स्वर्गचा अधिकारही ॥ ९ ॥
यस्मात् - ज्याच्यामुळे - नः - आम्हाला - संपदः - संपत्ती - राज्यं - राज्य - दाराः - स्त्री - प्राणाः - प्राण - कुलं - कुल व - प्रजाः - संतति - यदनुग्रहात् - ज्याच्या कृपेने - सपत्नविजयः - शत्रूंना जिंकून विजय - च - आणि - लोकाः - लोक - आसन् - मिळाले. ॥९॥
त्याच भगवंतांच्या कृपेने आम्हांला ही संपत्ती, राज्य, पत्नी, प्राण, कुल, संतान, शत्रूंवर विजय आणि स्वर्गादी लोकांवर अधिकार प्राप्त झाला आहे. (९)
पश्योत्पातान् नरव्याघ्र दिव्यान् भौमान् सदैहिकान् ।
दारुणान्शंसतोऽदूराद् भयं नो बुद्धिमोहनम् ॥ १० ॥
भीमा तू माणुसींवाघ उल्का आकाशि या अशा । भूकंप रोगराई ही कुशकून भयंकर । वाटते शीघ्र ही बुध्दी मोहाच्या पतनी पडे ॥ १० ॥
नरव्याघ्र - नरश्रेष्ठा भीमा ! - दिव्यान् - आकाशोत्पन्न - भौमान् - भूमीवर होणार्या - सदैहिकान् - देहासंबंधी - दारुणान् - भयंकर - बुद्धिमोहनं - बुद्धीला मोहित करणार्या - भयं - भीतीला - अदूरात् - जवळच - नः - आम्हाला - शंसतः - सांगणार्या - उत्पातान् - अपशकुनांना - पश्य - पाहा. ॥१०॥
हे नरश्रेष्ठा, बघ ना ! आकाशात उल्कापात इत्यादी, पृथ्वीवर भूकंप इत्यादी आणि शरीरात रोग इत्यादी कितीतरी भयंकर अपशकुन होऊ लागले आहेत. त्यावरून वाटते की लवकरच बुद्धी मोहाने झाकून टाकणारे संकट आपल्यावर येणार आहे. (१०)
ऊर्वक्षिबाहवो मह्यं स्फुरन्त्यङ्ग पुनः पुनः ।
वेपथुश्चापि हृदये आरात् दास्यन्ति विप्रियम् ॥ ११ ॥
मांडी डोळा भुजा डावी माझी स्फुरण पावते । ह्रदयी धड्धडे तैसे नक्की आरिष्ट पातले ॥ ११ ॥
अङ्ग - हे भीमा - पुनःपुनः - वारंवार - उर्वक्षिबाहवः - मांडया, डोळे व दंड - स्फुरन्ति - फुरफुरतात - च - आणखी - अपि - सुद्धा - हृदये - हृदयात - वेपथुः - कंप - मह्यं - मला - आरात् - जवळ - विप्रियं - अनिष्टाला - दास्यन्ति - दाखवितात. ॥११॥
भीमसेना, माझी डावी मांडी, डावा डोळा आणि डावा हात वारंवार फडफडू लागला आहे. हृदयात धडकी भरली आहे. लवकरच काही तरी अनिष्ट होणार आहे. (११)
शिवैषोद्यन्तं आदित्यं अभिरौति अनलानना ।
मामङ्ग सारमेयोऽयं अभिरेभत्यभीरुवत् ॥ १२ ॥
पहा कोल्हे उषःकाली रडती सूर्य पाहुनी । वाटते ओकिता आग भुंकती श्वान हे असे ॥ १२ ॥
अङ्ग - अहो - अनलानना - अग्नीप्रमाणे मुख असणारी - एषा - ही - शिवा - भालू - उद्यन्तं - उगवणार्या - आदित्यं - सूर्याला - अभिरौति - सामोरी जाऊन रडते - हि - आणखीही - अयं - हा - सारमेयः - कुत्रा - अभीरुवत् - धिटाईने - मां - मला - अभिरौति - सामोरा येऊन रडतो. ॥१२॥
बंधो, सूर्योदय होताच ही भालू सूर्याकडे तोंड करून रडू लागली आहे. बघ ना ! तिच्या तोंडातून ज्वाळाही निघत आहेत. आणि हा कुत्रा निर्भय होऊन माझ्याकडे पाहून भुंकत आहे. (१२)
शस्ताः कुर्वन्ति मां सव्यं दक्षिणं पशवोऽपरे ।
वाहांश्च पुरुषव्याघ्र लक्षये रुदतो मम ॥ १३ ॥
सुपशू चालती डावे कुपशू उजवीकडे । अश्वादी वाहने सर्व रडावे मज पाहती ॥ १३ ॥
पुरुषव्याघ्र - हे नरश्रेष्ठा - शस्ताः - पवित्र - पशवः - पशु - मां - मला - सव्यं - डाव्या बाजूने - अपरे - दुसरे - दक्षिणं - उजव्या बाजूने - कुर्वन्ति - करतात - च - आणि - मम - माझ्या - वाहान् - घोडयांना - रुदतः - रडणारे असे - लक्षये - पाहतो. ॥१३॥
भीमसेना, गायीसारखे शुभ पशू माझ्या डाव्या बाजूने आणि गाढवासारखे अशुभ पशू माझ्या उजव्या बाजूने जाऊ लागले आहेत. माझे घोडे मला रडताना दिसत आहेत. (१३)
मृत्युदूतः कपोतोऽयं उलूकः कम्पयन् मनः ।
प्रत्युलूकश्च कुह्वानैः अनिद्रौ शून्यमिच्छतः ॥ १४ ॥
मृत्युचे दूत ते उल्लू कपोत आणि कावळे । रात्रीच्या समयी घोर चित्कार काढिती पहा ॥ १४ ॥
अयं - हा - मृत्यूदूतः - यमाचा सेवक - कपोतः - पारवा - मनः - मनाला - कम्पयन् - कापविणारा - उलूकः - घुबड - च - आणि - प्रत्युलूकः - कावळा - अनिद्रौ - दोघेही निद्रा न घेता - कुह्वानैः - वाईट शब्दांनी - शून्यं - शून्य करण्याला - इच्छतः - इच्छितात. ॥१४॥
मृत्यूचा दूत असलेला हा पारवा घुबड आणि त्याचा शत्रू कावळा रात्री आपल्या कर्कश आवाजाने माझ्या मनात कापरे भरीत जगाला उजाड करून टाकू पाहात आहेत. (१४)
धूम्रा दिशः परिधयः कम्पते भूः सहाद्रिभिः ।
निर्घातश्च महांस्तात साकं च स्तनयित्नुभिः ॥ १५ ॥
धुराडल्या दिशा सार्या चंद्र सूर्यास ते खळे । गर्जती मेघ जोराने सर्वत्र पडती विजा ॥ १५ ॥
दिशाः - दिशा - धूम्राः - धुरकटलेल्या - परिधयः - चंद्रसुर्याची खळी - च - आणि - सहाद्रिभिः - पर्वतांसह - भूः - पृथ्वी - कम्पते - कापू लागते - च - आणि - स्तनयित्नुभिः - मेघगर्जनेशी - साकं - सहवर्तमान - महान् - मोठा - निर्घातः - वज्रपात - आसीत - झाला आहे. ॥१५॥
दिशा धूसर झाल्या आहेत, सूर्य आणि चंद्राच्या भोवती वारंवार खळी पडत आहेत. पृथ्वीवर पर्वतांसह भूकंप होऊ लागले आहेत. ढग जोराने गडगडत आहेत आणि चहूकडे विजा पडू लागल्या आहेत. (१५)
वायुर्वाति खरस्पर्शो रजसा विसृजंस्तमः ।
असृग् वर्षन्ति जलदा बीभत्सं इव सर्वतः ॥ १६ ॥
शरीरा कापिते ऐसी धुळीने वाहते हवा । अंधार दाटला मार्गी रक्ताची वृष्टि होतसे ॥ १६ ॥
खरस्पर्शः - खरखरीत लागणारा - रजसा - धुळीने - तमः - अंधकाराला - विसृजन् - उत्पन्न करणारा - वायुः - वायु - वाति - वाहतो - जलदाः - मेघ - बीभत्सं - ओंगळ - इव - प्रमाणे - सर्वतः - सर्व प्रकारे - असृक् - रक्ताला - वर्षन्ति - वर्षतात. ॥१६॥
शरीराला झोंबणारा आणि धुळीने अंधार पसरविणारा झंझावात सुरू झाला आहे. ढग जणू किळसवाणा रक्ताचा सडा पाडू लागले आहेत. (१६)
सूर्यं हतप्रभं पश्य ग्रहमर्दं मिथो दिवि ।
ससङ्कुलैर्भूतगणैः ज्वलिते इव रोदसी ॥ १७ ॥
जाहला सूर्यही मंद ग्रहांच्या धडका पहा । गर्दीत ह्या पिशाच्यांच्या पृथ्वीला आग लागली ॥ १७ ॥
हतप्रभं - निस्तेज - सुर्यं - सुर्याला - दिवि - आकाशात - मिथः - एकमेकांत - ग्रहमर्दं - ग्रहांच्या लठ्ठालठ्ठीला - ससङ्कुलैः - एकमेकांत मिसळलेल्या - भूतगणैः - पंचमहाभूतांच्या समूहांनी - रोदसी - अंतरिक्ष म्हणजे पृथ्वी व आकाश ह्यांतील पोकळी - ज्वलिते - पेटलेली - इव - अशा प्रमाणे - पश्य - पाहा. ॥१७॥
पहा ना ! सूर्य फिका दिसू लागला आहे. आकाशात ग्रहांची एकमेकांशी टक्कर होत आहे. भूत-गणांच्या गर्दीमुळे पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये जणू आग लागल्यासारखी झाली आहे. (१७)
नद्यो नदाश्च क्षुभिताः सरांसि च मनांसि च ।
न ज्वलत्यग्निराज्येन कालोऽयं किं विधास्यति ॥ १८ ॥
नद्या नद तळे आणि प्रक्षुब्ध माणासे मनीं । तुपाने न जळे अग्नी न जाणे काय होतसे ॥ १८ ॥
नद्यः - नद्या - च - आणि - नदा - नद - सरांसि - सरोवरे - च - आणि - मनांसि - मने - क्षुभिताः - खवळून गेली - अग्निः - अग्नि - आज्येन - तुपाच्या योगे - न ज्वलति - पेट घेत नाही - अयं - हा - कालः - काळ - किं - काय - विधास्यति - करण्याचे योजित आहे. ॥१८॥
नद्या, नद, तळी आणि लोकांची मने क्षुब्ध होऊ लागली आहेत. तूप घातले तरी अग्नी पेटत नाही. हा भयंकर काळ काय करील हे सांगता येत नाही. (१८)
न पिबन्ति स्तनं वत्सा न दुह्यन्ति च मातरः ।
रुदन्त्यश्रुमुखा गावो न हृष्यन्ति ऋषभा व्रजे ॥ १९ ॥
आटल्या गायि नी वत्स न पिती दूध धेनूचे । गोठ्यात ढाळिती अश्रु गायी नी बैल ते सदा ॥ १९ ॥
वत्साः - बालके - स्तनं - स्तनाला - न पिबन्ति - पीत नाहीत - च - आणि - मातरः - माता - न दुह्यन्ति - दूध देत नाहीत. - व्रजे - गोठयात - गावः - गाई - अश्रुमुखाः - अश्रूंनी युक्त मुखे असणार्या - रुदन्ति - रडतात. - ऋषभाः - बैल - न हृष्यन्ति - आनंदित होत नाहीत. ॥१९॥
वासरे दूध पीत नाहीत, गायी दूध देत नाहीत, गोठ्यामध्ये गायी आसू ढाळीत आहेत. बैलही उदास आहेत. (१९)
दैवतानि रुदन्तीव स्विद्यन्ति ह्युच्चलन्ति च ।
इमे जनपदा ग्रामाः पुरोद्यानाकराश्रमाः । भ्रष्टश्रियो निरानन्दाः किमघं दर्शयन्ति नः ॥ २० ॥
रडव्या देवतामूर्ती घामाने डौलती पहा । देश बाग पुरे गावे उदास जाहले अहा । आम्हाला न कळे काही कोणती संकटे पुढे ॥ २० ॥
दैवतानि - देवता - रुदन्ति - रडतात - इव - प्रमाणे - च - आणि - हि - खरोखर - स्विद्यन्ति - घामाघूम होतात - उच्चलन्ति - चलन पावतात - इमे - हे - जनपदाः - देश - ग्रामाः - खेडीपाडी - पुरोद्यानाकराश्रमाः - नगरे, बागा, खाणी व ॠषींचे आश्रम - भ्रष्टश्रियः - शोभारहित - निरानन्दाः - आनंदरहित - नः - आम्हाला - किं - कोणत्या - अघं - संकटांना व पापांना - दर्शयन्ति - दाखवितात. ॥२०॥
देवतांच्या मूर्ति रडवेल्या चेहेर्याच्या दिसत आहेत. त्यांच्या अंगातून घाम वाहात आहे आणि त्या हलूही लागल्या आहेत. बंधो, हा देश, गाव, शहरे, बगीचे, खाणी आणि आश्रम निस्तेज आणि आनंदरहित झाले आहेत. हे आम्हांला कोणत्या दुःखाची सूचना देत आहेत बरे ? (२०)
मन्य एतैर्महोत्पातैः नूनं भगवतः पदैः ।
अनन्यपुरुषश्रीभिः हीना भूर्हतसौभगा ॥ २१ ॥
दुश्चिन्ह पाहुनी सारे वाटे भाग्यहिना धरा । विशेष पदचिन्हाच्या कृष्णे कां सोडिले हिला ॥ २१ ॥
नूनं - खरोखर - एतैः - ह्या - महोत्पातैः - मोठमोठया दुश्चिन्हांनी - अनन्यपुरुषश्रीभिः - अद्वितीय शोभणार्या - भगवतः - श्रीकृष्णाच्या - पदैः - पायांनी - हीना - रहित - भूः - पृथ्वी - हतसौभगा - सौंदर्यरहित - मन्ये - मानितो. ॥२१॥
हे मोठमोठे उत्पात पाहून मला तर असे वाटू लागले आहे की, निश्चितपणे ही अभागी पृथ्वी भगवंतांच्या, अन्य कोणाकडेही न आढळणार्या सौंदर्याने शोभणार्या चरणांना पारखी झाली आहे. (२१)
इति चिन्तयतस्तस्य दृष्टारिष्टेन चेतसा ।
राज्ञः प्रत्यागमद् ब्रह्मन् यदुपुर्याः कपिध्वजः ॥ २२ ॥
उत्पात पाहता ऐसा राजा चिंतितसे मनीं । तेव्हांचि पार्थ तो तेथे पातला द्वारकेहुनी ॥ २२ ॥
ब्रह्मन् - शौनक हो - दृष्टारिष्टेन - अपशकुनांना अवलोकन करणार्या - चेतसा - अंतःकरणाने - इति - याप्रमाणे - तस्य - तो - राज्ञः - धर्मराज - चिन्तयतः - विचार करीत असता - कपिध्वजः - अर्जुन - यदुपुर्याः - द्वारकेतून - प्रत्यागमत् - परत आला. ॥२२॥
शौनक महोदय, हे भयंकर उत्पात पाहून राजा युधिष्ठिर मनोमन चिंताग्रस्त झाले होते. एवढ्यात द्वारकेहून अर्जुन परत आला. (२२)
तं पादयोः निपतितं अयथापूर्वमातुरम् ।
अधोवदनं अब्बिन्दून् सृजन्तं नयनाब्जयोः ॥ २३ ॥ विलोक्य उद्विग्नहृदयो विच्छायं अनुजं नृपः । पृच्छति स्म सुहृत् मध्ये संस्मरन् नारदेरितम् ॥ २४ ॥
धर्माने पाहिला पार्थ आतुरे येत तेधवा । कांपरे तोंड ते त्याचे ढाळिती नेत्र अश्रुही ॥ २३ ॥ निस्तेज जाहली काया राजा ते पाहता भिला । स्मरले नारदी बोल पार्थासी पुसले तये ॥ २४ ॥
पादयोः - पायांवर - निपतितं - पडलेल्या - अयथापूर्वं - पूर्वीप्रमाणे नसणार्या - आतुरं - भ्यालेल्या - अधोवदनं - खाली तोंड घातलेल्या - नयनाब्जयोः - दोन नेत्रकमळांतून - अब्बिन्दून् - अश्रुबिंदूना - मुञ्चन्तं - टाकणार्या - विच्छायं - निस्तेज - तं - त्या - अनुजं - कनिष्ठ भाऊ अर्जुनाला - विलोक्य - पाहून - उद्विग्नहृदयः - दुःखित अंतःकरण झालेला - नृपः - राजा धर्मराज - नारदेरितं - नारदाच्या भाषणाला - संस्मरन् - स्मरण करणारा - सुहृन्मध्ये - मित्रमंडळीत - पृच्छतिस्म - विचारू लागला. ॥२३-२४॥
युधिष्ठिरांनी पाहिले की, अर्जुन इतका हवालदिल पूर्वी कधीच झाला नव्हता. त्याने तोंड खाली घातले होते. त्याच्या कमळासारख्या नेत्रांतून अश्रू वाहात होते आणि शरीरावर बिलकुल तजेला नव्हता. अशा स्थितीतच अर्जुनाने युधिष्ठिरांच्या चरणांवर लोटांगण घातले, तेव्हा युधिष्ठिर भयभीत झाले. देवर्षी नारदांच्या बोलण्याची आठवण होऊन सर्व सुहृदांच्या समक्ष त्यांनी अर्जुनाला विचारले. (२३-२४)
युधिष्ठिर उवाच ।
कच्चिदानर्तपुर्यां नः स्वजनाः सुखमासते । मधुभोजदशार्हार्ह सात्वतान्धकवृष्णयः ॥ २५ ॥
राजा युधिष्ठिर म्हणाला- बंधो कुशल ना सारे आपुले स्नेहि सोयरे । मधुभोज दशार्हाह अंधको यादवी कुळे ॥ २५ ॥
आनर्तपुर्यां - द्वारकेत - नः - आमचे - स्वजनाः - आप्तेष्ट - मधुभोजदशार्हार्हाः - मधु, भोज, दशार्ह, अर्ह - सात्वतान्धकवृष्णयः - सात्वत, अंधक व वृष्णि - सुखं - सुखाने - आसते कच्चित् - राहत आहेत ना ? ॥२५॥
युधिष्ठिर म्हणाले - बंधो ! द्वारकानगरीत आपले नातलग असलेले मधू, भोज, दशार्ह, अर्ह, सात्वत, अंधक आणि वृष्णिकुलातील यादव यांचे कुशल आहे ना ? (२५)
शूरो मातामहः कच्चित् स्वस्त्यास्ते वाथ मारिषः ।
मातुलः सानुजः कच्चित् कुशल्यानकदुन्दुभिः ॥ २६ ॥
आजोबा शूरसेनादी प्रसन्न पाहिलेत का । स्वबंधूसह त्या मामा वसूदेव खुशाल ना? ॥ २६ ॥
अथवा - किंवा - मारिषः - पूज्य - मातामहः - आईचे वडील म्हणजे आजोबा - शूरः - शूरसेन - स्वस्ति - खुशाल - आस्ते कच्चित् - आहे काय ? - मातुलः - मामा - आनकदुन्दुभिः - वसुदेव - सानुजः - भावांसह - कुशली - क्षेम - कच्चित् - आहे काय ? ॥२६॥
आपचे परमपूज्य आजोबा शूरसेन सुखरूप आहेत ना ? वसुदेव मामा आपल्या धाकट्या बंधूसह खुशाल आहेत ना ? (२६)
सप्त स्वसारस्तत्पत्न्यो मातुलान्यः सहात्मजाः ।
आसते सस्नुषाः क्षेमं देवकीप्रमुखाः स्वयम् ॥ २७ ॥
देवकीसह त्या माम्या सातीही सांग त्या कशा । तयांचे पुत्र नी नातू कसे ते सांग सर्वची ॥ २७ ॥
तत्पत्न्यः - त्याच्या - देवकीप्रमुखाः - देवकी वगैरे पत्न्या - सप्त - सात - स्वसारः - बहिणी - मातुलान्यः - आमच्या मामी - सहात्मजाः - पुत्रांसह - सस्नुषाः - व सुनांसह - स्वयं - स्वतः - क्षेमं - कुशल - आसते - आहेत ? ॥२७॥
त्यांची पत्नी देवकी आणि तिच्या सात बहिणी आपल्या पुत्र-सुनांसह आनंदात आहेत ना ? (२७)
कच्चित् राजाऽऽहुको जीवति असत्पुत्रोऽस्य चानुजः ।
हृदीकः ससुतोऽक्रूरो जयन्तगदसारणाः ॥ २८ ॥ आसते कुशलं कच्चित् ये च शत्रुजिदादयः । कच्चिदास्ते सुखं रामो भगवान् सात्वतां प्रभुः ॥ २९ ॥
कुपुत्र कंस ज्यांचा ते उग्रसेन जिवंत की । ह्रदीक कृतवर्मा नी गद सारण अक्रुर ॥ २८ ॥ जयंत शत्रुजित् आदी ठीक यादव ना तसे । यदुराज बळीराम आनंदे नांदतो कसा ॥ २९ ॥
असत्पुत्रः - निपुत्रिक - आहुकः - उग्रसेन - राजा - राजा - जिवति कच्चित् - जिवंत आहे का ? - च - आणि - अस्य - ह्याचा - अनुजः - धाकटा भाऊ - हृदीकः - हृदीक - ससुतः - पुत्रांसह - अक्रूरः - अक्रूर - जयन्तगदसारणाः - जयन्त, गद व सारण - च - आणि - ये - जे - शत्रुजिदादयः - शत्रुजित वगैरे - कुशलं - खुशाल - आसते कच्चित् - आहेत का ? - सात्वतां - यादवात - प्रभुः - श्रेष्ठ - भगवान् - सर्वगुणसंपन्न - रामः - बलराम - सुखं - सुखी - आस्ते कच्चित् - आहे का ? ॥२८-२९॥
ज्याचा मुलगा कंस अतिशय दुष्ट होता, तो राजा उग्रसेन धाकटा भाऊ देवक यांच्यासह हयात आहे ना ? हृदीक, त्याचा मुलगा कृतवर्मा, अक्रूर, जयंत, गद, सारण तसेच शत्रुजित इत्यादी यादव-वीर कुशल आहेत ना ? यादवांचे स्वामी भगवान बलराम आनंदात आहेत ना ? (२८-२९)
प्रद्युम्नः सर्ववृष्णीनां सुखमास्ते महारथः ।
गम्भीररयोऽनिरुद्धो वर्धते भगवानुत ॥ ३० ॥ सुषेणश्चारुदेष्णश्च साम्बो जाम्बवतीसुतः । अन्ये च कार्ष्णिप्रवराः सपुत्रा ऋषभादयः ॥ ३१ ॥
वृष्णिवंशात मोठा जो प्रद्युम्न सांग तो कसा । युध्दात स्पुर्ति दावी तो अनिरुध्द खुशाल ना? ॥ ३० ॥ चारुदत्त सुषेणादी सांबो ऋषभपुत्र ते । कृष्णाचे सर्वच्या सर्व प्रसन्न राहती कसे ॥ ३१ ॥
सर्ववृष्णीनां - सर्व यादवात - महारथः - महारथी - प्रद्युम्नः - प्रद्युम्न - सुखं - क्षेम - आस्ते - आहे ? - उत - आणि - गंभीररयः - मोठा वेगवान - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न - अनिरुद्धः - अनिरुद्ध - च - आणि - सुषेणः - सुषेण - चारुदेष्णः - चारुदेष्ण - च - आणि - जाम्बवतीसुतः - जांबवतीचा मुलगा - साम्बः - साम्ब - च - आणि - अन्ये - दुसरे - कार्ष्णिप्रवराः - श्रेष्ठ श्रेष्ठ कृष्णपुत्र - सपुत्राः - पुत्रांसह - ऋषभादयः - ऋषभ वगैरे - वर्धते - भरभराटीत आहेत ना ? ॥३०-३१॥
वृष्णिवंशातील सर्वश्रेष्ठ महारथी प्रद्युम्न सुखरूप आहे ना ? युद्धामध्ये मोठी चपळता दाखविणारे भगवान अनिरुद्ध आनंदात आहेत ना ? (३०)
सुषेण, चारुदेष्ण, जांबवतीपुत्र सांब आणि आपल्या पुत्रांसहित ऋषभ आदी भगवान श्रीकृष्णांचे सर्व पुत्रसुद्धा प्रसन्नचित्त आहेत ना ? (३१)
तथैवानुचराः शौरेः श्रुतदेवोद्धवादयः ।
सुनन्दनन्दशीर्षण्या ये चान्ये सात्वतर्षभाः ॥ ३२ ॥ अपि स्वस्त्यासते सर्वे रामकृष्ण भुजाश्रयाः । अपि स्मरन्ति कुशलं अस्माकं बद्धसौहृदाः ॥ ३३ ॥
कृष्ण भक्त श्रुतदेव उध्दवो नी सुनंद तो । नंद हा बळिरामाच्या कृष्णाच्या सावलीत ना ॥ ३२ ॥ सर्वांचे क्षेम आहे ना? स्नेही ते आमुचे जन । आमुचे पुसती कां ते सांगणे सर्व काय ते ॥ ३३ ॥
तथैव - त्याचप्रमाणे - शौरेः - श्रीकृष्णाचे - अनुचराः - सेवक - श्रुतदेवोद्धवादयः - श्रुतदेव, उद्धव वगैरे - च - आणि - ये - जे - अन्ये - दुसरे - सात्वतर्षभाः - यादवश्रेष्ठ - सुनन्दनन्दशीर्षण्याः - सुनन्द, नन्द व शीर्षण्य - सर्वे - सगळे - रामकृष्णभुजाश्रयाः - बलराम व श्रीकृष्ण यांच्या बाहुबलावर अवलंबून राहणारे - स्वस्ति - खुशाल - आसते अपि - आहेत का ? - बद्धसौहृदाः - प्रेमबद्ध असे - अस्माकं - आमच्या - कुशलं - खुशालीला - स्मरान्तिअपि - स्मरतात का ? ॥३२-३३॥
तसेच भगवान श्रीकृष्णांचे श्रुतदेव, उद्धव इत्यादी सेवक, सुनंद, नंद इत्यादी प्रमुख यदुवंशी, जे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहेत ते सर्वजण कुशल आहेत ना ? आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे असे ते सर्वजण कधी आमच्याविषयी विचारणा करतात का ? (३२-३३)
भगवानपि गोविन्दो ब्रह्मण्यो भक्तवत्सलः ।
कच्चित्पुरे सुधर्मायां सुखमास्ते सुहृद्वृतः ॥ ३४ ॥
भक्तप्रिय द्विजभक्त श्रीकृष्ण स्वजनासह । सुधर्मा या सभेमध्ये विराजे का सुखे तिथे ॥ ३४ ॥
भगवान् - सर्वगुणसंपन्न - ब्रह्मण्यः - ज्ञानीजनांचे कल्याण करणारा - भक्त-वत्सलः - भक्तांवर प्रेम करणारा - गोविंदः - श्रीकृष्ण - अपि - सुद्धा - सुहृद्वतः - मित्रांसह - पुरे - द्वारकेत - सुधर्मायां - सुधर्मा नावाच्या सभेमध्ये - सुखं - क्षेमकुशल - आस्ते कच्चित् - आहे का ? ॥३४॥
भक्तवत्सल ब्राह्मणभक्त भगवान श्रीकृष्ण, आपल्या स्वकीयांसह द्वारकेतील सुधर्मासभेत आनंदात आहेत ना ? (३४)
मङ्गलाय च लोकानां क्षेमाय च भवाय च ।
आस्ते यदुकुलाम्भोधौ आद्योऽनन्तसखः पुमान् ॥ ३५ ॥ यद्बाहुदण्डगुप्तायां स्वपुर्यां यदवोऽर्चिताः । क्रीडन्ति परमानन्दं महापौरुषिका इव ॥ ३६ ॥
क्षीराब्धीचा हरी तेथे कल्याणा यदुच्या कुळा । बलरामासवे हो ना जो विराजोनि राहिला ॥ ३५ ॥ द्वारकापुरिचे लोक त्यांच्या बाहूबळे तिथे । मित्रांच्या परि आनंदे नांदती का सुखात त्या ॥ ३६ ॥
आद्यः - सर्वांच्या आधी उत्पन्न झालेला - अनन्तसखः - शेषावतारी बलराम आहे मित्र ज्याचा असा - पुमान् - पुरुष श्रीकृष्ण - लोकानां - लोकांच्या - मङगलाय - मंगलाकरिता - च - आणि - क्षेमाय - कल्याणाकरिता - च - आणि - भवाय - उत्कर्षाकरिता - यदुकुलाम्भोधौ - यादवरूपी समुद्रात - आस्ते - आहे. ॥३५॥
अर्चिताः - पूजिलेले - यदवः - यादव - यद्वाहुदण्डगुप्तायां - ज्याच्या बाहुदंडाने रक्षण केलेल्या - स्वपुर्यां - आपल्या द्वारका नगरीत - महापौरुषिकः - विष्णूच्या पार्षदगण - इव - प्रमाणे - परमानन्दं - मोठया आनंदाने - क्रीडन्ति - खेळतात. ॥३६॥
ते आदिपुरुष श्रीकृष्ण, बलरामांसह जगाचे परम मंगल, कल्याण आणि उन्नती व्हावी, म्हणून यदुवंशरूपी क्षीरसागरात विराजमान आहेत. त्यांच्याच शौर्यामुळे सुरक्षित असलेल्या द्वारकापुरीतील यदुवंशीय पृथ्वीवरील सर्वांच्या द्वारा सन्मानित झाले असून श्रीविष्णूंच्या पार्षदांप्रमाणे मोठ्या आनंदाने विहार करीत आहेत. (३५-३६)
यत् पादशुश्रूषणमुख्य कर्मणा
सत्यादयो द्व्यष्टसहस्रयोषितः । निर्जित्य सङ्ख्ये त्रिदशांस्तदाशिषो हरन्ति वज्रायुधवल्लभोचिताः ॥ ३७ ॥
(इंद्रवज्रा) त्याच्या पदासी सगळ्याच राण्या सेवेत राहोनि अभीष्ट वस्तू । ते पारिजातादि अमूल्य भोग दंडोनि इंद्राहि समस्त घेती ॥ ३७ ॥
सत्यादयः - सत्यभामा वगैरे - ह्यष्टसहस्त्रयोषितः - सोळा हजार स्त्रिया - यत्पादशुश्रूषणमुख्यकर्मणा - ज्या श्रीकृष्णाच्या चरणसेवारूपी मुख्य कर्माने - संख्ये - युद्धात - त्रिदशान् - देवांना - निर्जित्य - जिंकून - वज्रायुधवल्लभोचिताः - इंद्राच्या स्त्रियांना योग्य अशा - तदाशिषः - त्यांच्या भोग्य वस्तु - हरन्ति - हरितात. ॥३७॥
सत्यभामा इत्यादी सोळा हजार राण्या केवळ भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करण्यामुळे युधामध्ये इंद्र आदी देवतांचा पराभव करून इंद्राणीलाच उपभोग्य असणार्या पारिजात आदी वस्तूंचा उपभोग घेत आहेत. (३७)
यद्बाहुदण्डाभ्युदयानुजीविनो
यदुप्रवीरा ह्यकुतोभया मुहुः । अधिक्रमन्त्यङ्घ्रिभिराहृतां बलात् सभां सुधर्मां सुरसत्तमोचिताम् ॥ ३८ ॥
बाहूबळासी असती खुशाल कृष्णो बळी मानु नि सर्व लोक । देवासची जे असतील योग्य त्या आसनी ते बसती सुखाने ॥ ३८ ॥
हि - खरोखर - यद्वाहुदण्डाभ्युदयानुजीविनः - ज्याच्या बाहुदंडाच्या पराक्रमावर अवलंबून राहिलेले - अकुतोभयाः - निर्भय - युदुप्रवीराः - यादवश्रेष्ठ - बलात् - जबरदस्तीने - आहृतां - आणलेल्या - सुरसत्तमोचितां - देवश्रेष्ठांनाच योग्य अशा - सुधर्मां - सुधर्मा नावाच्या - सभां - सभेला - अङ्घ्रिभिः - पायांनी - मुहुः - वारंवार - अधिक्रमन्ति - तुडवितात म्हणजे पादाक्रांत करितात. ॥३८॥
यदुवंशी वीर श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर सुरक्षित आणि निर्भयपणे राहतात आणि बलपूर्वक आणलेल्या मोठमोठ्या देवतांनी बसण्यास योग्य अशी सुधर्मासभा आपल्या चरणांनी आक्रमण करीत आहेत. (३८)
कच्चित्तेऽनामयं तात भ्रष्टतेजा विभासि मे ।
अलब्धमानोऽवज्ञातः किं वा तात चिरोषितः ॥ ३९ ॥
(अनुष्टुप्) अर्जुन सांग तू कैसा आहेस सुखरूप ना । श्रीहीन दिससी ऐसा झाला का अवमान् कुठे ॥ ३९ ॥
तात - बाबा अर्जुना - ते - तुझे - अनामयं - आरोग्य - कच्चित् - आहे काय - मे - मला - भ्रष्टतेजाः - निस्तेज - विभासि - भासतोस - तात - बाबा - चिरोषितः - फार दिवस राहिलेला - अलब्धमानः - अपमानिलेला - अवज्ञातः - तिरस्कार केलेला - किंवा - काय ? ॥३९॥
बंधु अर्जुना ! हे पण सांग की तू कुशल आहेस ना ? मला तू निस्तेज दिसतोस. तू तेथे पुष्कळ दिवस राहिलास. यावेळी तुझ्या मानसन्मानात कमतरता तर आली नाही ना ? तुझा कोणी अपमान तर केला नाही ना ? (३९)
कच्चित् नाभिहतोऽभावैः शब्दादिभिरमङ्गलैः ।
न दत्तमुक्तमर्थिभ्य आशया यत्प्रतिश्रुतम् ॥ ४० ॥
अभद्र बोलुनी कोणी तुझे चित्त दुखाविले । याचका दान देण्यास कां झाला असमर्थ तू ॥ ४० ॥
अमंगलैः - अशुभ - अभावैः - व प्रेमशून्य अशा - शब्दादिभिः - शब्दादिकांनी - अभिहतः - ताडिलेला - न कच्चित् - नाहीस ना - यत् - जे - आशया - आशा दाखवून - प्रतिश्रुतं - वचनपूर्वक - उक्तं - सांगितलेले - अर्थिभ्यः - याचक लोकांना - न दत्तं - दिले नाहीस काय ? ॥४०॥
अपमानास्पद, अमंगल अशा शब्दांनी कोणी तुझे अंतःकरण दुखावले नाही ना ? किंवा तुझ्याकडे आशेने आलेल्या याचकाला त्याने मागितलेली अगर तू देण्याची प्रतिज्ञा केलेली वस्तू दिली नाहीस, असे तर झाले नाही ना ? (४०)
कच्चित्त्वं ब्राह्मणं बालं गां वृद्धं रोगिणं स्त्रियम् ।
शरणोपसृतं सत्त्वं नात्याक्षीः शरणप्रदः ॥ ४१ ॥
आश्रिता रक्षिसी नित्य गो विप्र वृध्द रोगि ही । अबला अथवा प्राणी आश्रिता त्यागिलेस कां? ॥ ४१ ॥
शरणप्रदः - शरणागतांचा आश्रय - त्वं - तू - ब्राह्मण - ब्राह्मणाला - बालं - बालकाला - गां - गाईला - वृद्धं - वृद्धाला - रोगिणं - रोग्याला - स्त्रियं - स्त्रीला - शरणोपसृतं - शरणागत - सत्त्वं - प्राण्याला - न अत्याक्षीः - उपेक्षिले नाहीस - कच्चित् - ना ? ॥४१॥
तू नेहमी शरण आलेल्याचे रक्षण करीत आलेला आहेस. तुला शरण आलेला एखादा ब्राह्मण, बालक, गाय, वृद्ध, रोगी, स्त्री किंवा अन्य प्राणी अशाला तू झिडकारले नाहीस ना ? (४१)
कच्चित्त्वं नागमोऽगम्यां गम्यां वासत्कृतां स्त्रियम् ।
पराजितो वाथ भवान् नोत्तमैर्नासमैः पथि ॥ ४२ ॥
असंग स्त्रीसि कां कोठे झालासे संग तो तुझा । अथवा गमना योग्य स्त्रीने तुज अव्हेरिले । का सानापासुनी मार्गी हार तूं घेतलीस ती ॥ ४२ ॥
त्वं - तू - अगम्यां - गमनास अयोग्य अशा - स्त्रियं - स्त्रीशी - वा - किंवा - गम्यां - गमनयोग्य स्त्रीला - असत्कृतां - अनादर करून - न अगमः - गमन केले नाहीस - कच्चित् - ना ? - अथवा - किंवा - भवान् - आपण - नोत्तमैः - श्रेष्ठ नव्हे अशा - नासमैः - नीचांनी - पथि - वाटेत - पराजितः - जिंकिला गेलास काय ? ॥४२॥
तू समागमास अयोग्य स्त्रीशी समागम तर केला नाहीस ना ? किंवा समागमास योग्य स्त्रीशी असभ्य रीतीने वागला नाहीस ना ? येताना वाटेत तुझ्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्या असणार्याने तुला पराजित तर केले नाही ना ? (४२)
अपि स्वित्पर्यभुङ्क्थास्त्वं सम्भोज्यान् वृद्धबालकान् ।
जुगुप्सितं कर्म किञ्चित् कृतवान्न यदक्षमम् ॥ ४३ ॥
मुले वृध्दास ठेवोनी एकटा जेवलास का । विश्वास मनि हा माझ्या तूं निंद्य कर्म नाचरी ॥ ४३ ॥
अपिस्वित् - आणखीही - त्वं - तू - संभोज्यान् - भोजन देण्यास योग्य अशा - वृद्धबालकान् - वृद्ध व मुले ह्यांना - पर्यभुंक्थाः - सोडून भोजन केलेस काय ? - यत् - जे - अक्षमं - अनुचित - किंचित् - थोडे तरी - जुगुप्सितं - निंद्य - कर्म - कृत्याला - म कृतवान् - केले नाहीस ना ? ॥४३॥
किंवा ज्यांना अन्न दिले पाहिजे अशा मुलांना अथवा वृद्धांना सोडून तू एकट्यानेच भोजन तर केले नाहीस ना ? तुला न शोभणारे असे निंदनीय कृत्य तू केले नसशील, याची मला खात्री आहे. (४३)
कच्चित्प्रेष्ठतमेनाथ हृदयेनात्मबन्धुना ।
शून्योऽस्मि रहितो नित्यं मन्यसे तेऽन्यथा न रुक् ॥ ४४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे युधिष्टिरवितर्को नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
असूदे! सांग तो कृष्ण अभिन्न ह्रदयी असा । सोडिले का तुला त्याने शून्य आपण त्या विना । त्या शिवाय असे दुःख तुजला दुसरे नसे ॥ ४४ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्र्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ चौदावा अध्याय हा ॥१ ॥ १४ ॥ हरि ॐ तस्तत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
अथ कच्चित् - अथवा असे आहे काय ? - प्रेष्टतमेन - अत्यंत प्रिय - आत्मबन्धुना - स्वतःचा बंधु आशा - हृदेन - हृदयाने - रहितः - रहित - शून्यः - शून्य - अस्मि - आहे - नित्यं - नेहमी - मन्यसे - मानतोस - अन्यथा - त्याशिवाय - ते - तुला - रुक् - रोग - न - नाही. ॥४४॥
न जाणो, परम प्रियतम, अभिन्न हृदय, परम सुहृद, अशा भगवान श्रीकृष्णांचा तुला कायमचा विरह झाला असेल. म्हणूनच तू असा उदास असावास. याशिवाय तुला दुःख होण्याचे दुसरे कोणतेच कारण असणार नाही. (४४)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |